January 2017

नवी दिल्ली - भारतीय बॅंकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्यांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेस आज औपचारिकरित्या सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) शपथपत्र सादर करणार आहे. त्यात विजय मल्ल्या ‘वांटेड क्रिमिनल’ आहे असा उल्लेख आहे. त्यामुळे विजय मल्ल्यांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला औपचारिक प्रारंभ होईल. विजय मल्ल्यांविरोधात आयडीबीआय कर्ज प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. आज सीबीआय आपले शपथपत्र परराष्ट्र मंत्रालयाकडे सादर करणार आहे. परराष्ट्र खाते हे शपथपत्र इंग्लंड सरकारला सादर करणार आहे.आयडीबीआय बॅंकेकडून ९०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडविल्याप्रकरणी तसेच या फसवणूक आणि कट कारस्थान रचणे हे गुन्हे मल्ल्यांवर ठेवण्यात आले आहेत. या कर्जाच्या रकमेतील २५० कोटी रुपये रक्कम ही विमानाचे सुटे भाग घेण्यासाठी मंजूर करण्यात आली होती. ती रक्कम मल्ल्यांनी भारताबाहेर पाठवली असे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. २४ जानेवारीला मुंबई न्यायालयात हे चार्जशीट सादर करण्यात आले आहे. मल्ल्या हे पळून गेले आहेत असाही उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. हे चार्जशीट सादर करण्यात आल्यानंतर मल्ल्यांनी ट्विटरवरुन या गोष्टीचा निषेध केला आहे. आपण न केलेल्या गुन्ह्याची आपणास शिक्षा मिळत असल्याचे मल्ल्यांनी म्हटले.

मुंबई - भारतीय शेअर बाजारात आज (मंगळवार) आयटी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळले. अमेरिकी संसदेत एच 1- बी सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. प्रस्तावित विधेयकानुसार एच1-बी व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन 1 लाख 30 हजार डॉलर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या देशांना मोठा फटका बसणार आहे.

भारतातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीत 60 टक्के वाटा अमेरिकेचा आहे. परिणामी, आज भारतीय शेअर बाजारातील 5 दिग्गज आयटी कंपन्यांनी 50 हजार कोटींचे भांडवल गमावले आहे. यामध्ये टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस या कंपन्यांचा समावेश आहे.

शिमला - हिमाचल प्रदेशमध्ये सुबाथु छावणी बाहेर आयसिस समर्थकांनी धमकीचे पोस्टर लावल्याचे आढळले. या पोस्टरवर चार वेळा आयसिस लिहिलेले आहे. या पोस्टरमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हिमाचलमध्ये सोलन जिल्ह्यात सुबाथु छावणी आहे. तेथे आयसिसच्या समर्थकांनी काही भीत्तीपत्रके लावली. त्या पत्रकांवर पंतप्रधान मोदी बूम आणि नेपाल बूम असे लिहिलेले सापडले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांच्यासोबत फॉरेंसिक तज्ज्ञ देखील आले आहेत. सुबाथु ते नेपाळ या भागात तीन स्फोट होतील अशी धमकी देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सुबाथु छावणी बाहेर आयसिस समर्थकांनी धमकीचे पोस्टर लावल्याचे आढळले. या पोस्टरवर चार वेळा आयसिस लिहिलेले आहे. या पोस्टरमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हिमाचलमध्ये सोलन जिल्ह्यात सुबाथु छावणी आहे. तेथे आयसिसच्या समर्थकांनी काही भीत्तीपत्रके लावली. त्या पत्रकांवर पंतप्रधान मोदी बूम आणि नेपाल बूम असे लिहिलेले सापडले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांच्यासोबत फॉरेंसिक तज्ज्ञ देखील आले आहेत. सुबाथु ते नेपाळ या भागात तीन स्फोट होतील अशी धमकी देण्यात आली आहे.

बेबी डॉल सनी लिओनी सध्या ‘लैला में लैया’ या ‘रईस’ चित्रपटातील गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सनी लिओनीच्या या गाण्यातील ठुमक्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे दिसते. शाहरुखसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केलेले सनीचे हे गाणे या वर्षातील सर्वोत्कृष्ट आयटम साँग ठरेल, अशी चर्चा देखील बॉलिवूड वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. सनी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ‘बी टाऊन’मधील सर्वात मादक अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख असणाऱ्या सनीने पती डेनियल सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रावरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनीची मादक अदा पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेईल अशीच आहे. फोटोमध्ये सनी आणि पती डॅनियल एका बाथ टबमध्ये दिसत आहेत. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. सनीची अदा ज्याप्रमाणे घायाळ करते अगदी तसाच डेनियलचा लूक देखील कमालीचा दिसत आहे. सनी अनेक कार्यक्रमांमध्ये पती डॅनियल वेबरसोबत दिसली आहे.

रियाध - मागच्या दोन वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमती कोसळत असल्याने लवकरच त्याचे चटके सौदी अरेबियात राहणा-या नागरीकांना सहन करावे लागणार आहेत. लवकरच सौदीमध्ये करमुक्त जीवन भूतकाळ होणार आहे. सौदीच्या मंत्रिमंडळाने सोमवारी नागरीकांकडून करवसुलीच्या निर्णयाला मान्यता दिली.

तेल संपन्न सौदी अरेबियामध्ये राहणा-या नागरीकांना बरीच वर्ष करमुक्तता आणि विविध सवलती मिळाल्या. पण 2014 पासून कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घसरण सुरु झाली आणि सौदीमध्ये कपात आणि महसूलाचे नवे मार्ग शोधण्यास सुरुवात झाली. सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असून, अरब देशांमध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे.

नाशिक- ठरविलेल्याच ठिकाणीच सहभागी होणे, शिस्तबद्धरित्या चक्का जाम आंदोलन करणे, आंदोलनाला गालबोट लागेल असे वर्तन टाळावे, कोणी संशयित असेल तर पोलिसांना माहिती द्यावी, वाहनावर दगडफेक करू नये, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्यावा अशा सूचनांचे काटेकोरपणे पालन करत मराठा मोर्चा नाशिक जिल्ह्यात शांततेत पार पडला.जिल्ह्यात व शहरात विविध ठिकाणी आज सकाळी ११ वाजेपासून मराठा मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी येथे घडलेल्या अनुचित प्रकारात सामील असलेल्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, शेतक-यांना हमी भाव मिळाला पाहिजे अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या. कोठेही तोडफोड, गोंधळाचे वातावरण निर्माण झाले नाही. आंदोलकांनी काही काळ रस्त्यावर ठाण मांडून विविध घोषणा दिल्या. राष्ट्रगीतानंतर या आंदोलनाची सांगता झाली. शहरातील गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, मुंबई नाका, द्वारका चौक, सिन्नर फाटा (नाशिकरोड), आडगाव, जत्रा हॉटेल चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन पार पडले. यानंतर दुपारी साडेबारा वाजेदरम्यान सर्व ठिकाणी वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रास्ता रोको दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आडगावसह विविध ठिकाणची वाहतुक पर्यायी मार्गांवरून यावेळी वळवण्यात आली. जिल्ह्याभरातही ओझर, चांदवड, वाडीवऱ्हे,गरवारे, गोंदे, डोंगरगाव फाटा, सिन्नर, पिंपळगाव, सिन्नर आदी ठिकाणी हे आंदोलन पार पडले. शहरात बससेवा, रिक्षा व इतर सर्व वाहतूक देखील सुरळीतपणे सुरु होती.

नवी दिल्ली - सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना, भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशाप्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागातून हिंदूच्या पलायनाचा दावाही सत्य असल्याचे सांगत लवकरच हा परिसरदेखील आणि एक काश्मीर बनले, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

ज्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यासाठी भाग पाडलं जात आहे, त्याचप्रमाणे पश्चिम उत्तर प्रदेशातील हिंदूंमध्येही दहशत पसरवली जात आहे, असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला. मात्र, आम्ही या परिसराला दुसरे काश्मीर बनू देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

मुंबई - अलीकडे मराठी चित्रपटांतील कथांमध्ये आलेले वैविध्य लक्षणीय आहे. ‘बाबांची शाळा’ हा असाच एक वेगळ्या कथेवरचा,वेगळे भावविश्व रेखाटणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर होणार आहे. रविवार ५ फेब्रुवारीला दुपारी १.०० आणि रात्री साडेआठ वाजता हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

एखाद्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला मिळालेली शिक्षा ही केवळ त्याच्यापुरतीच रहात नाही, तर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते. रागाच्या भरात हातून गंभीर गुन्हा घडल्यानंतर महिपत घोरपडेला न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. या कटू अनुभवावर महिपत कशा पद्धतीनं मात करतो, आपल्या लहान मुलीबरोबरचं भावनिक नातं कसं जपतो याचं चित्रण या चित्रपटात आहे. आपल्या गुन्हाची शिक्षा भोगणारा महिपत घोरपडे, त्याची मुलगी सोनाली, तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता साटम यांची गोष्ट या चित्रपटात आहे.

मुंबई - मागच्या आठवडयात प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबिल या दोन चित्रपटांमध्ये रईसने बाजी मारली असली तरी, काबिलनेही चांगला व्यवसाय केला आहे. दोन्ही चित्रपट प्रेक्षकवर्गाला चित्रपटगृहाकडे आणण्यात यशस्वी ठरले आहेत.

रईस 100 कोटीच्या क्लबमध्ये सहभागी होण्याच्या वाटेवर असून, या चित्रपटाने आतापर्यंत 90 ते 92 कोटींची कमाई केली आहे तर हृतिकच्या काबिलने 69 ते 70 कोटींचा व्यवसाय केला आहे. रईसला जास्त चित्रपटगृहे मिळाल्याचा फायदा झाला आहे तर, काबिल चित्रपटाला माऊथ पब्लिकसिटी फायद्याची ठरली आहे.

नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली उद्या, मंगळवारी देशाचे आर्थिक सर्व्हेक्षण संसदेत सादर करणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती काय असेल ते यातून समजणार आहे. पण, काँग्रेसने सोमवारीच याबाबत ९० पानांचा समीक्षा अहवाल सादर केला आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा योग्य नसल्याचे संकेत दिले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तर म्हणाले की, मोदी सरकार ज्या दिशेने जात आहे ते पाहता विकासाचा दर ६.६ टक्केही राहणार नाही.

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी म्हणाले की, आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत समाधानी नाही. यूपीएच्या काळात जीडीपीचा सरासरी दर ७.५ टक्के होता. मोदी सरकारने चांगले काम करावे. त्यात आम्हालाही आनंद आहे. पण, देशाचे काही प्रश्न आहेत. त्याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. देशात रोजगार कुठे आहेत? सरकार काय करत आहे? जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फक्त ७७ हजार रोजगार निर्मिती झाली. सरकारचे आश्वासन काय होते? आमची क्रेडिट ग्रोथ आतापर्यंतच्या सर्वात नीचांकावर आहे. ती फक्त पाच टक्के आहे. देशाच्या इतिहासात असे कधीच झाले नाही.

मेलबर्न - वयाच्या पस्तिशीत ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई करणाऱ्या रॉजर फेडररने निवृत्तीचा क्षण समीप आल्याचे संकेत दिले आहेत. तुल्यबळ प्रतिस्पर्धी राफेल नदालला नमवत फेडररने पाच वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवला. गेले दशकभराहून अधिक काळ ग्रँड स्लॅम जेतेपदांवर मक्तेदारी राखणाऱ्या फेडररला दुखापतींमुळे आणखी प्रदीर्घ काळ खेळता येणार नसल्याची जाणीव झाली आहे. दिग्गज खेळाडू रॉड लेव्हर यांच्याकडून जेतेपदाचा चषक स्वीकारल्यावर केलेल्या भाषणातही फेडररने ही भावना मांडली.

‘‘पुढच्या वर्षीही तुमचे प्रेम मिळण्याची आशा आहे. जरी मी येऊ शकलो नाही तरी यंदाचा अनुभव सुखावणारा होता. रॉड लेव्हर प्रांगणात ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे पाचवे जेतेपद पटकावण्याचा क्षण चिरंतन स्मरणात राहील,’’ असे फेडररने सांगितले.

गेली अनेक वर्षे निवृत्तीचे वृत्त फेडरर फेटाळत असे. मात्र दुखापतींचे स्वरूप लक्षात घेता आता खूप वर्षे खेळता येणार नाही, हे वास्तव फेडररने स्वीकारले आहे. गुडघ्यावरच्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या वर्षभरात सहा महिने फेडरर कोर्टपासून दूर होता. मग ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत फेडरर खेळणार का, याबाबत साशंकता होती. पण शिस्तबद्ध प्रयत्नांच्या जोरावर फेडररने पुनरागमन केले.

नवी दिल्ली - बुधवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वे संसदेत सादर केला. या आर्थिक सर्वेमधून नोटाबंदीचा प्रभाव देशाच्या आर्थिक विकासावर पडल्याचे अधोरेखित झाले असून, नोटाबंदीमुळे पुढच्या वर्षभरात देशाचा विकासदर 6.75 ते 7.50 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील काळात देशातील मालमत्तांचे दर घटतील, कृषिक्षेत्राचा विकास समाधानकारक गतीने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सध्या सरकारी अखत्यारित असलेल्या फर्टिलायझर्स, नागरी हवाई वाहतूक आणि बँकिंग या क्षेत्रांत खासगीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिना आधी सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन ही नव्या परंपरेची सुरुवात असून, सर्व राजकीय पक्ष हे अधिवेशन शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
मोदी म्हणाले, "आज एका नव्या परंपरेचा प्रारंभ होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प एक महिना आधीच सादर होणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पसुद्धा यात समाविष्ट करण्यात आला आहे. संसदेतही त्यावर चर्चा होईल. त्यामुळे येत्या काय फायदे होतील, हेही समोर येईल,"
यावेळी मोदींनी सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, मला आशा आहे की यावेळी सर्व राजकीय पक्ष सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा करून सभागृहाला पुढे नेण्यात सहकार्य करतील. अर्थसंकल्पाबाबत संसदेत सकारात्मक आणि विस्ताराने चर्चा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - रोजगार निर्मितीमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल चढवला. आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण करत सरकारने राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला. तसेच नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक या मुद्यांचाही उल्लेख करत सरकारचे कौतुक केले.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ' तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हा सध्या देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र सरकार यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे' अशी टीका त्यांनी केली.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारकडून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिझ सईद याच्यासह चार जणांना लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

दहशतवादी संघटना 'जमात-उद-दावा'च्यानुसार पंजाब सरकारच्या गृह खात्याने सईदच्या नजरबंदीचे आदेश जारी केले आणि लाहोर पोलिसांनी चौबुरजीमधील 'जमात-उद-दावा'च्या मुख्यालयात पोहोचून या आदेशाची अंमलबजावणी केली. नजरकैदे कारवाई झाल्यानंतर कोंडी झाल्यामुळे बिथरलेल्या हाफिज सईदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. व्हिडीओद्वारे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला.


क्युबेक सिटी : कॅनडाततील एका बंदूकधाऱ्याने क्युबेक सिटीतील इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले.

क्युबेक पोलिसांचे प्रवक्ते ख्रिस्तीन कौलोंब यांनी या गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक केल्याचे सांगितले. तिसरा संशयित फरार असल्याची शक्यता त्यांना वाटत आहे. हल्ल्यामागील नेमके कारण मात्र समजलेले नाही. रात्री आठ नंतर गोळीबार झाला त्यावेळी काही डझन लोक या सेंटरमध्ये होते, असे सीबीसीने वृत्त दिले.

मशिदीत सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर हल्ला झाला. मशिदीमध्ये चेहरा झाकलेले दोन लोक शिरले व त्यांनी गोळीबार सुरू केला, असे साक्षीदाराच्या हवाल्याने रेडिओ-कॅनडाने वृत्त दिले.

हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांनी सोमवारी म्हटले. प्रार्थनास्थळी आणि निर्वासितांच्या केंद्रावरील या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे त्रुदेऊ यांनी निवेदनात म्हटले. मुस्लीम-कॅनेडियन हे आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा महत्वाचा भाग आहेत. अशा स्वरुपाच्या हिंसाचाराला आमच्या समाजात, शहरात व देशात कोणतीही जागा नाही, असे त्रुदेऊ म्हणाले.

रात्री ७.१५ च्या सुमारास चेहरे झाकलेले दोन बंदूकधारी या केंद्रात शिरले. ठार झालेले ३५ ते ७० या वयोगटातील आहेत. त्रुदेऊ यांनी मुस्लीम आणि निर्वासितांचे कॅनडामध्ये स्वागत आहे, असे म्हटल्यानंतर हल्ला झाला.


लातूर- लातूरमध्ये ऑईल कंपनीत टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी सोमवारी रात्री घडली. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरु झाली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांने दिली.

लातूर एमआयडीसीमध्ये किर्ती ऑईल मिल ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये खाद्य तेलाचे उत्पादन केले जाते. उत्पादन प्रक्रियेदरम्यान निघणारे टाकाऊ द्रव्य एका टाकीत जमा केले जायचे. त्याच्यावर प्रक्रीया केल्यानंतर ते बाहेर सोडले जायचे. यासाठी कंपनीच्या आवारात सहाशे चौरस फूटाची आणि २० फूट खोल अशी टाकी तयार करण्यात आली होती. दरमहिन्याला या टाकीची साफसफाई केली जायची. सोमवारीदेखील या टाकीची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी कंत्राटी कामगारांना बोलवण्यात आले होते. संध्याकाळी टाकी साफ करण्यासाठी तीन कामगार टाकीत उतरले. ते बराच वेळ झाले तरी बाहेर येत नसल्याने साफसफाईचे काम घेणारा कंत्राटदार आणि अन्य पाच कामगारही टाकीत उतरले. मात्र तेदेखील बाहेर आले नाही. शेवटी रात्री एका कामगाराला दोरीने बांधून टाकीच्या आत सोडण्यात आले. टाकीत विषारी वायू असल्याचे त्या कामगाराच्या लक्षात येताच तातडीने त्याला बाहेर काढण्यात आले. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. पोकलेन मशिनच्या आधारे टाकीचा काही भाग खोदण्यात आला. टाकीतून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. विषारी वायूमुळेच या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबई - मराठा आरक्षणासहीत विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानं आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईसह राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली असून यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण चक्का जाम आंदोलन शांततेत होईल, असे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.


मुंबई - मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. एकवेळ शिवसेना पुन्हा सत्तेवर आली तर चालेल, अशी भूमिका काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाकडून मांडण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती पुढे आली आहे.

राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शक्‍य असेल तेथेही भाजपला रोखा, शिवसेना ही सॉफ्टटार्गेट ठेवा, अशीच रणनितीच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भाजपला रोखण्यात यश मिळण्यास त्याचा संदेश देशभर जाईल, असे काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाला वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

काँग्रेसची व्यूहरचना
मुंबईत 25 टक्‍के मराठी लोकसंख्या असली तरी, मराठीबहुल भागात ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असेल तेथे काँग्रेसने अधिक ताकद लावू नये. तसेच मुस्लिम, उत्तरभारतीय, गुजराती मारवाडी,तेलगू आदी अमराठी लोकवस्ती असलेल्या मतदारसंघावर अधिक भर देण्याची काँग्रेसने व्यूहरचना केल्याचे समजते. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हमखास निवडून येणार असेल तेथे काँग्रेसने ताकद लावावी, अशी रणनीती ठरल्याचे समजते.

कराड - शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्यामुळे राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होईल. जिल्हा परिषदेनंतर विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतील असा दावा करताना, जातीयवादी पक्षाला थारा देऊ नका, या जातीयवादी पक्षांचे पितळ लवकरच उघडे पडणार असल्याची टीका आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात उंब्रज (ता. कराड) येथे ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,की प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे काम करताना अडचणी निर्माण झाल्या. परंतु भाजपाच काँग्रेसचा प्रतिस्पर्धी आहे. आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांना साथ द्या, पुन्हा काँग्रेसची वैभवशाली प्रतिमा उभी करू या असे आवाहन त्यांनी केले. सरकारमध्ये असताना लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची आमची भूमिका राहिली परंतु आज देशामध्ये विचित्र परिस्थिती माजली असून, अर्थव्यवस्था संकटात आली आहे. भाजपचे सरकार हे नुसते घोषणा करणारे सरकार असल्याचा आरोप करत या सरकारने लोकांची दिशाभूल केली. भाजपाला कळत न कळत पाठिंबा देणाऱ्यांची भूमिका काय असेल हे माहीत नसल्याचे ते म्हणाले. उंब्रजची नगरपंचायत झाल्याशिवाय उंब्रजचा विकास होणार नाही, त्यामुळे उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी आवाज उठवू. सरकारमध्ये असताना १४६ ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. मी उंब्रजचा आमदार नसलो तरी, उंब्रजचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली.


नागपूर- नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ५ धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला. भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह आणि अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा यांंनी अखेरच्या तीन षटकात केलेल्या अप्रतीम गोलंदाजीमुळे विजय साजरा करता आला. बुमराह विजयाचा शिल्पकार ठरला. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी आठ धावांची आवश्यकता असताना बुमराहने यॉर्कर आणि स्लोअर वन्सच्या अस्त्राने इंग्लंडला घायाळ केले. बुमराहने आपल्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना बुमराहने मोईन अलीला डॉट बॉल टाकून विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. बंगळुरु येथे होणारा अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला १४४ धावांवर रोखले होते. त्यामुळे भारताच्या कमकुवत आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने खूप चांगली सुरूवात देखील केली होती. खरंतर सामन्याच्या १६ व्या षटकापर्यंत सामना इंग्लंडच्या बाजूने होता. पण गोलंदाजीच्या जोरावरही ट्वेन्टी-२० सामने जिंकता येतात याचा प्रत्यय नेहरा आणि बुमराह यांनी दिला. नेहराने इंग्लंडच्या सलामीजोडीला एकाच षटकात माघारी धाडले होते. पण त्यानंतर जो रुट आणि इऑन मॉर्गन या अनुभवी जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱया विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. अमित मिश्राने कर्णधार इऑन मॉर्गनला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्स देखील शून्यावर क्लीनबोल्ड झाला होता. पण मिश्राने टाकलेला चेंडू नो बॉल असल्याचे रिव्ह्यूमध्ये निष्पन्न झाल्याने स्टोक्सला जीवनदान मिळाले. स्टोक्सने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत जोरदार फटकेबाजी सुरू केली. बेन स्टोक्स भारतीय संघासाठी घातक ठरू लागला होता. नेहराने सामन्याच्या १७ व्या षटकात बेन स्टोक्सला चालते करून संघाच्या विजयी आशा पल्लवीत केल्या. मग जसप्रीत बुमराहने केलेली गोलंदाजीने इंग्लंडच्या खेळाडूंना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले. बुमराहने १८ व्या षटकात केवळ तीन धावा दिल्या. नेहराने सामन्याचे १९ वे षटक टाकले. इंग्लंडला १० चेंडूत २१ धावांची गरज होती. जोस बटलरने एक चौकार आणि षटकार ठोकून सामना ६ चेंडूत ८ धावा अशा रंगतदार स्थितीत आणला. बुमराहने निर्णयाक षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जो रुटला(३८) पायचीत केल्याने भारताला इंग्लंडवर दबाव निर्माण करता आला. त्यानंतरचे दोन चेंडू स्लोअर वन्सच्या जोरावर बुमराहने निर्धाव टाकले. मग बुमराहला मोठा फटका मारण्याच्या नादात जोस बटलर क्लीन बोल्ड झाला. पुढील चेंडूवर जॉर्डनने एक धाव घेऊन, मोईन अलीला स्ट्राईक दिली. अखेरच्या चेंडूवर षटकार आवश्यक असताना बुमराहने डावखुऱया अलीच्या ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करून डॉट बॉल काढला आणि भारताने सामना पाच धावांनी जिंकला.


लखनो- ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू हिने अपेक्षेप्रमाणे सय्यद मोदी चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या विजेतेपदावर आपली मोहोर नोंदविली. पुरुषांच्या एकेरीत भारताच्या समीर वर्मा याने आपलाच सहकारी बी.साईप्रणीत याच्यावर मात करीत अजिंक्यपद पटकाविले.

सिंधूने अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्काचे आव्हान २१-१३, २१-१४ असे केवळ तीस मिनिटांमध्ये परतविले. समीर याला साईप्रणीतविरुद्ध २१-१९, २१-१६ असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. मिश्रदुहेरीत भारताच्या प्रणव चोप्रा व एन.सिक्की रेड्डी यांनी अजिंक्यपद मिळविताना आपलेच सहकारी बी.सुमेध रेड्डी व अश्विनी पोनप्पा यांचा २२-२०, २१-१० असा पराभव केला. सिक्की रेड्डी हिला महिलांच्या दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डेन्मार्कच्या कॅमिला ज्युहेल व ख्रिस्तियाना पेडरसन यांनी सिक्की रेड्डी व अश्विनी यांच्यावर २१-१६, २१-१८ असा विजय नोंदविला. पुरुषांच्या दुहेरीत डेन्मार्कच्या मथायस बोई व कर्स्टन मोगेन्सन यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांनी चीन तैपेईच्या लुचिंग याओ व यांग पोहान यांना २१-१४, २१-१५ असे हरविले.

सिंधू हिने मारिस्काविरुद्धच्या सामन्यात नियोजनपूर्वक खेळ केला. तिने पहिल्या गेममध्ये ड्रॉपशॉट्सबरोबरच स्मॅशिंगच्या वेगवान फटक्यांचाही उपयोग केला. सिंधू हिला उंचीचा फायदा घेत आला. मारिस्काचे परतीचे फटके परतविताना तिला फारशी अडचण आली नाही. मारिस्का हिने कॉर्नरजवळ कल्पकतेने परतीचे फटके मारले तरीही सिंधूच्या आक्रमक खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. अग्रमानांकित सिंधू हिला स्थानिक प्रेक्षकांच्या भरघोस पाठिंब्याचाही लाभ घेता आला.

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांतून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या टेहळणी आणि खर्च निरीक्षक पथकाने ९६ कोटी रुपयांची रोकड, २५ कोटी २२ लाख रुपयांची दारू आणि १९ कोटी ८३ लाख रुपये किमतीचे ४,७०० किलो अमलीपदार्थ जप्त केले. सर्वाधिक जप्ती उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून करण्यात आली आहे.
निवडणुकांची घोषणा झाल्यापासून काल शनिवारपर्यंत उत्तर प्रदेशातून ८७ कोटी ६७ लाख रुपये, पंजाबमधून ६ कोटी ६० लाख रुपये, गोव्यातून १ कोटी २७ लाख रुपये, उत्तराखंडमधून ४७ लाख आणि मणिपूरमधून ८ लाख १३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यास अवैध मार्गाने दारू आणि अमली पदार्थांचे आमिष दाखविण्यात आल्याचा संशय असून, या पाच राज्यांतून २५ कोटी २२ लाख रुपये किमतीची दारू (१४ लाख २७ हजार लिटर) जप्त केली आहे.

नवी दिल्ली - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्यावर टीका करताना केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजपा नेते संजीव बलियान यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. मुलायम सिंह यांचा जगण्याचा काळ संपला असून त्यांच्या मरणाची वेळ आली आहे, असे वादग्रस्त विधान संजीव बलियान यांनी केले. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. तर वादग्रस्त विधानं करणा-या भाजपा नेत्यांच्या यादी आता संजीव बलियान यांचेही नाव जोडले गेले आहे.
'मुलायम सिंह नेहमी सांप्रदायिकतेचं राजकारण करत आलेत, अशी टीका करत बलियान पुढे म्हणाले की, 'मी त्यांना सांगू इच्छितो की आता मरणाची वेळ आली आहे. आता तर त्यांचा जगण्याचा काळ राहिला नाही. समाजवादी पार्टी या निवडणुकांमध्ये पूर्ण गाडली जाईल'. मथुरेतील छाता येथील रॅलीदरम्यान त्यांनी हे विधान केले.

नवी दिल्ली - पाच राज्यात निवडणुका होत आहेत. तेव्हा या राज्यात निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांची बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवावी असे पत्र निवडणूक आयोगाने आरबीआयला लिहिले आहे. निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि उमेदवारांना प्रचारासाठी रोख रकमेची आवश्यकता आहे. तेव्हा आठवड्याला २४,००० रुपये त्यांना कसे पुरतील? असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. उमेदवारांची पैसे काढण्याची मर्यादा वाढवून ती आठवड्याला २ लाख रुपये करावी अशी विनंती निवडणूक आयोगाने आरबीआयला केली आहे. २५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने आरबीआयला पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी उमेदावारांसाठी मर्यादा वाढवून २४,००० रुपयांवरुन २ लाखांवर न्यावी असे म्हटले होते. पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीसाठी पैसे खर्च करण्याची मर्यादा २८ लाख रुपये आहे. तर मणिपूर आणि गोवा राज्यात खर्चाची मर्यादा २० लाख रुपये आहे. जर सध्या बॅंकांनी जी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे ती पाहता एखादा उमेदवार निवडणुका संपेपर्यंत १ लाख रुपये काढू शकेल. निवडणुकीचा प्रचार एक महिनाच करावा लागतो तेव्हा १ लाख रुपयांमध्ये निवडणूक लढविणे उमेदवाराला अशक्य आहे. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.तप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घातली. नोटाबंदी झाल्यानंतर ५०० च्या नव्या आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. नोटाबंदीमुळे चलनात असलेल्या ८६ टक्के नोटा व्यवहारातून बाद झाल्या. या नोटाबंदीमुळे बाजारात रोख व्यवहार करणे अशक्य झाले होते. त्यामुळेच सरकारने एटीएम आणि बॅंकेतून पैसे काढण्यावर निर्बंध लावले होते. ऐन निवडणुकीच्या काळातच चलनकल्लोळ झाल्यामुळे सर्व उमेदवारांना त्रास होत आहे तेव्हा त्यांच्याकडे पाहा अशी विनंती निवडणूक आयोगाने आरबीआयला केली आहे.नागपूर - अवघ्या ५०० रुपयासाठी चार भावांनी मिळून दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात काही वेळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भागात टोपरेंची विहीर आहे. या विहिरीजवळ आरोपी अश्विन बारापात्रेचे घर आहे. काही अंतरावर दर्शिल निमजे (वय २३) याचेही घर आहे. हे दोघे आणि त्यांचे नातेवाईक रोजमजुरीचे काम करतात. पाच महिन्यांपूर्वी निमजेने बारापात्रेच्या भावाला ५०० रुपये उधार दिले होते.

ते परत करण्यासाठी आरोपी बारापात्रे बंधू टाळाटाळ करीत होते. अडचण असल्यामुळे रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास दर्शिल आणि त्याचा मोठा भाऊ मिथून खेमचंद निमजे (वय २५) हे दोघे ५०० रुपये मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. तेथे त्यांचा वाद झाल्यानंतर आरोपी अश्विन, नीलेश, प्रवीण आणि अजय बारापात्रे या चौघांनी घातक शस्त्रांनी मिथूनवर हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या दर्शिलवरही आरोपींनी सपासप घाव घातले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. दर्शिल आणि मिथून रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी पळून गेले.

आजूबाजूच्यांनी या दोघांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी दर्शिलला मृत घोषित केले तर, मिथूनची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती कळताच तहसील आणि पाचपावली ठाण्याचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी आरोपींची शोधाशोध करीत अश्विन आणि नीलेशला अटक केली. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आम्हीच ५०० रुपये निमजेला उधार दिले होते. ते परत मागितले म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यातून हा प्रकार घडल्याचे सांगितले. दरम्यान, फरार झालेल्या प्रवीण आणि अजय बारापात्रेचा शोध घेतला जात आहे.

मुंबई - शिवसेना- भाजप युती तुटल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अच्छे दिन आले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक जागा मिळण्याची शक्‍यता असल्याने आठवले गटाच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडत 2011 मध्ये शिवशक्‍ती- भीमशक्‍तीचा नारा दिला आणि त्यांनी शिवसेनेची साथ धरली. लोकसभा निवडणुकीनंतर आठवले भाजपसोबत गेले असले, तरी 2011 पासून युतीत तणाव निर्माण न होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान युती अस्तित्वात असताना देखील रिपाइंला मुंबई महापालिकेत 29 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या कोट्यातून 21, तर भाजपने आपल्या कोट्यातील 8 जागा आठवले यांना दिल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत युती तुटल्यामुळे अधिक जागा मिळतील, असे रिपाइंला वाटते. रिपाइंने भाजपकडे सध्या 65 जागांचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी किमान 45 जागा नक्‍कीच मिळतील, असा विश्‍वास रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. जागा अधिक मिळल्यास पक्षाला निश्‍चितच फायदा होणार असल्याचा विश्‍वास महातेकर यांनी व्यक्‍त केला. तसेच, उपमहापौरपद आणि अडीच वर्षे स्थायी समितीची मागणी रामदास आठवले यांनी भाजपकडे यापूर्वीच केली आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यास इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव "मातोश्री'वर दिला. शिवसेना आणि मनसेतील आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, यावर नवीन राजकीय समीकरणांची मांडणी होणार आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी "मातोश्री'वर उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई व राहुल शेवाळे, आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज यांचा निरोप दिल्याचे समजते. त्यानंतर, उद्धव यांच्याशी चर्चा करून कळवतो, असे शिवसेना नेत्यांनी नांदगावकर यांना सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना- मनसे महापालिकेत एकत्र येणार का, अशी चर्चा होती. त्यातच आता नांदगावकर यांनी थेट "मातोश्री'ची पायरी चढल्याने या चर्चांना एक प्रकारे दुजोरा मिळाला आहे. मात्र, उद्धव यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणुकांच्या वातावरणात शिवसेना- भाजप युतीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होतो, त्या वेळी मनसे "फॅक्‍टर' हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- मनसे एकत्र येणार अशी नव्याने चर्चा सुरू झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती तुटली, त्या वेळी मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा जोरात रंगली होती. राज- उद्धव यांच्यात प्रत्यक्षात फोनवर चर्चाही झाली होती. मात्र, दोन्ही बंधूंच्या मनोमिलनाचा निर्णय होऊ शकला नाही.

भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर लगेच शिवसेना आणि मनसे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केलेल्या विधानांनी पाठबळ मिळते आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र' असे विधान केले, तर नांदगावकर यांनी या दोन भावांनी एकत्र येण्यासाठी आपली राजकीय हयात खर्ची करण्याचे वक्‍तव्य केले होते. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गोव्यातील वक्‍तव्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे. युतीबाबत मनसेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही असे विधान राऊत यांनी केले होते, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पुण्यात दोन बंधू एकत्र आल्यास इतिहास घडेल, असे विधान केले होते. यापुढे एक पाऊल टाकत नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव शिवसेनेकडे दिला.


धुळे - कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ माळी यांना त्यांच्याच कारमध्ये बांधून जाळण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी साक्री येथे उघड झाला. माळी हे ३० जानेवारी रोजी स्वेच्छानिवृत्त होणार होते. जळीतकांड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

साक्री तहसील कार्यालयासमोर पाटबंधारे विभागाच्या आवारातच माळी यांचे हातपाय बांधून वाहनात डांबल्यानंतर जाळून टाकण्यात आल्याने पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. पेटलेल्या वाहनांत माळी यांचा अक्षरश: कोळसा झाला होता. त्यांच्या तोंडात बोळा कोंबण्यात आल्याचे तसेच आसनाला बांधून ठेवण्यात आल्याचे दिसून येत होते. गोकुळ माळी यांना नंदुरबार येथील त्यांच्या हिस्याचे घर विकायचे होते. त्यांचे भाऊ आणि बहिणी या व्यवहारासाठी आवश्यक सहकार्य करीत नव्हते असे म्हटले जाते. या वादातूनच माळी यांना जाळून मारण्यात आले असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. गोकुळ माळी हे समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच साक्री पाटबंधारे विभागात ते वाहनचालक या पदावर कार्यरत होते.


पोलिसांनी माळी यांचा मुलगा धीरज याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून काशीराम माळी, तुकाराम माळी, प्रल्हाद माळी, विजय माळी यांना नंदुरबार येथून ताब्यात घेतले आहे. आपल्या वडिलांना याआधी दोन वेळा धमकाविण्यात आले होते, असे धनंजय माळी यांचे म्हणणे आहे. तीन डिसेंबर २०१६ रोजी दोन जणांनी साक्री तालुक्यातील जैताणे येथे वडिलांना आमच्याविरुद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा बरेवाईट करू अशी धमकी दिली होती. १७ डिसेंबरलाही अशीच धमकी देण्यात आली होती, असे धनंजय यांचे म्हणणे आहे.


ठाणे - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत तब्बल ९० घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या नीलेश उर्फ डॉन गुजर (रा. कोपरी, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचे १८ तोळे सोने हस्तगत केले असून, ते संबंधित फिर्यादी विश्वेश कवडी यांना नौपाडा पोलिसांनी शनिवारी हस्तांतरित केले.

नौपाड्यातील, हिंदू कॉलनी येथील रहिवासी विश्वेश कवडी यांच्या घरात चोरी झाली. ही चोरी विश्वेशनेच केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल बनकर, हवालदार महेश भोसले यांना मिळाली होती. त्याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-३ च्या पथकाने अलीकडेच अटक केली. नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी न्यायालयामार्फत मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा मिळवला. त्याच्याकडून दागिने हस्तगत करण्यात आले. दागिने न्यायालयीन प्रक्रियेनंतर नौपाडा पोलिसांनी फिर्यादी कवडी यांना सुपुर्द केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

मुंबई - लालबाग फ्लायओव्हरील वाहतूक सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. फ्लायओव्हरवर मोठा तडा गेल्याने खबरदारी म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर 2016 पासून ते आतापर्यंत तडा गेल्याची घटना तिस-यांदा घडली आहे.
आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. फ्लायओव्हरवर वारंवार तडा जाण्याच्या घटना समोर येत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याचे दिसत आहे. शिवाय पुलाच्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत मुस्लिम बहुल देशांतील लोकांना बंदी घालण्याच्या यादीत आगामी काळात पाकिस्तानचेही नाव समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे, असे संकेत व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिका-याने दिले आहेत. कट्टरतावादी मुस्लिम दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या सात देशांतील लोकांना अमेरिकेमध्ये सध्या नो एन्ट्री लागू करण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी रियन्स प्रीबस यांनी सांगितले की,'अमेरिका प्रवेशबंदी करण्यात आलेल्या 7 देशांमध्ये घातक, धोकादायक दहशतवाद निर्माण होत असल्याचे काँग्रेस आणि तत्कालीन ओबामा प्रशासनाच्या निदर्शनास आले. याच कारणामुळे या देशांतील लोकांना अमेरिका प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला'. यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली.


मुंबई - सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरलेला मनवीर गुर्जर बिग बॉस १०चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या अंतिम भागात बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी एक या स्पर्धेचा विजेता ठरणार होता. मनू पंजाबीने दहा लाख रुपये घेत फिनाले मधून बाहेर पडला, यामुळे बानी, मनवीर व लोपामुद्रा यांच्यात सरळ लढत झाली. यात बानीला मागे टाकत मनवीरने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मनवीरला ट्रॉफीसह ४० लाख रुपये मिळाले. मनवीरच्या वडिलांनी बक्षिसामधील रक्कमेतील २० लाख रुपये सलमानच्या बीइंग ह्युमन या सामाजिक संस्थेला दान म्हणून दिले आहेत. या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक बानी फर्स्ट रनर अप तर लोपा सेकंड रनर अप ठरली.बिग बॉसच्या फिनालेमध्ये हृतिक रोशन व यामी गौतम यांनी हजेरी लावली होती. रंगतदार ठरलेल्या फिनालेची सुरुवात सलमान खानच्या डान्सने झाली. बिग बॉसच्या फिनालेमध्ये प्रियांका जग्गा व स्वामी ओम सोडून अन्य सर्व स्पर्धक सामील झाले होते. ओम स्वामीला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे असेही सांगण्यात येते.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपसोबतची युती तोडल्यावर आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यावर शिवसेनेतही मोठं इनकमिंग सुरू झालं आहे. दुसऱ्या पक्षातील अनेक मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर पक्ष प्रवेश करत आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत.युती तुटल्यानंतर मुंबईतील पूर्ण 227 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांना आता संधी मिळत आहे. त्याचाच परीणाम म्हणजे आता थेट माजी विरोधी पक्ष नेताच शिवसेनेत प्रवेश करत आहे.देवेंद्र आंबेरकर यांचा शिवसेनेतला प्रवेश म्हणजे काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.काँगेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. कामत यांनी दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांच्या मनमानी कारभारावर जाहीरपणे टीका केली होती.


मुंबई - जसे लाल किल्ल्यावर भाषण केल्यावर पंतप्रधान होत नाही, तसे स्वतःला कृष्ण म्हणवून कोण कृष्ण बनत नाही, स्वतःला पांडव म्हटल्यानं कोणी पांडव होत नाही, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, उद्धव यांची दुर्योधनाशी तर भाजपची पांडवांशी अप्रत्यक्ष तुलना केली होती. हा प्रकार बघून कोकणातला दशावतार सुरु असावे असे वाटत असल्याचे उद्धव म्हणाले.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या भाजप मेळाव्यात शिवसेनेवर केलेल्या घणाघाती टीकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. मात्र उद्धव यांनी फार बोलणार नाही, नाहीतर घसा बसेल, अशा शब्दात फडणवीसांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर काहीही बोलायचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. भाजपला काय टीका करायची ती करु द्या, आपण आपलं काम घेऊन लोकांपुढे जाऊ, असे कार्यकर्त्यांना सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही आमची मुंबई घडवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती, मात्र ती आता मलिन झाली आहे. आता ते गुंडाचे मंत्री आहेत का असा प्रश्न पडतो, असे म्हणत मी मांडलेल्या पारदर्शकतेच्या मुद्यावर कोणीच बोलत नाही, आता अच्छे दिनबद्दल कोणी का बोलत नाही, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

भाजपला वाटत केंद्रात सरकार आले म्हणून ते राम मंदिर बांधतील. त्यावेळी हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील, त्यामुळे राम मंदिर बांधायला सुरुवात होईल, असा घणाघातही उद्धव यांनी केला. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत आणि त्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत, असे सांगताना आपण मुंबई-ठाणेकरांना दिलेले वचन पाळणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमध्ये नऊ ते २० हजार फूट उंचीवरील चौक्या सांभाळणाऱ्या लष्करी जवानांना पाककडून होणारी आगळीक व घुसखोरांना प्रतिबंध घालण्याबरोबर सध्या नैसर्गिक आपत्तीशीही निकराची झुंज द्यावी लागत आहे. बर्फाच्छादित द्रास, कारगिल, दक्षिण काश्मीर आणि लेह-लडाखच्या आघाडीवरील निम्म्यांहून अधिक चौकींसमोर सध्या गुरेझ व सोनमर्गसारखे नैसर्गिक आपत्तीचे आव्हान उभे आहे. हिमकडा कोसळल्याने उद्भवलेल्या स्थितीचा अभ्यास लष्कराने सुरू केला आहे. त्याअंतर्गत विविध पातळीवर विश्लेषण करताना नियंत्रण रेषेलगतच्या काही चौक्यांची ठिकाणे पुढील हिवाळ्यात बदलावी लागतील काय, याचाही विचार होणार आहे.हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जवान मृत्युमुखी पडल्यानंतर लष्कराने त्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्याचे उपरोक्त भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या क्षेत्रात दरवर्षी हिम वादळे आणि हिमकडा कोसळणे या नैसर्गिक आपत्ती तसेच या वातावरणाने थकवा व हृदयविकाराच्या धक्क्याने आजवर शेकडो अधिकारी-जवानांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय सीमा रेषेच्या तुलनेत नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषेची सुरक्षितता राखणे अधिक जिकिरीचे ठरते. जम्मूतील पूँछपासून उत्तुंग पीरपंजाल पर्वतरांगाना सुरुवात होते. काश्मीरमध्ये ही उंची वाढत जाऊन लेह-लडाख विभागात ती १८ हजापर्यंत पोहोचते. सियाचीन ही तर जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी. नऊ हजार फूटहून अधिक उंचीवरील हे संपूर्ण पर्वतीय क्षेत्र सध्या बर्फाच्छादित आहे. या भागात तैनात जवानांना हवामानाची पूर्वसूचना देऊन गस्त घालण्याच्या वेळा बदलवणे, गस्तीसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकीत कार्यरत जवानांची एरवी विशिष्ट काळाने लष्करी तळाकडून अदलाबदली होते. परंतु, या काळात ही प्रक्रिया थांबते. या स्थितीत आपली चौकी सांभाळणे व गस्त घालण्याचे काम तैनात जवान करतात. त्यावेळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते. परंतु, अकस्मात कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसमोर कधीकधी पर्याय राहत नाही, अशी पुष्टी अन्य अधिकाऱ्याने जोडली.जयपूर - दाट धुक्‍यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर आज सकाळी पन्नास वाहने एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

आज सकाळी सात वाजता जयपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर पन्नास वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. सुरुवातीला काही वाहनांची टक्कर झाली होती. मात्र, दाट धुक्‍यामुळे मागून येणारी वाहने धडकू लागली. या प्रकारात पन्नास वाहने अपघातग्रस्त झाली. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांची जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत रांग लागली होती. या अपघातात दोन जण ठार तर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. वाहने आदळून झालेला हा अपघात इतका भीषण होता की बहुतेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील काही भागात गेल्या काही दिवसांपासून दाट धुक्‍यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतुकीसह रेल्वे आणि हवाई वाहतूकीवरही विपरित परिणाम झाला आहे.

उल्हासनगर - कलंकित नेत्यांना पक्षप्रवेश दिल्यामुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या भाजपने शनिवारी पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांना थेट पक्षात घेण्याऐवजी त्यांच्यासोबत आघाडी करण्याचा पर्याय निवडला. रिपाइं, ओमी आणि भाजप या तिघांची उल्हासनगर विकास आघाडीची अधिकृत घोषणा भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ओमी यांचा जणू भाजपमध्ये प्रवेश होत आहे, अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी यांनी मात्र स्वत:ला या प्रक्रियेपासून दूर ठेवले असले तरी त्यांचाही छुपा पाठिंबा ओमी यांच्या भाजप आघाडीस असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमधील राजकारण वेगळ्याच टप्प्यावर गेले होते. टीम ओमी कलानीच्या भाजप प्रवेशाने पक्षाला महापालिका निवडणुकीत बळ मिळणार असल्याचे सांगत ओमीच्या प्रवेशासाठी भाजपमधील एका गटाने कंबर कसली होती. मात्र प्रवेशाच्या दोन दिवसांपूर्वी आपला निर्णय बदलत ओमी कलानी यांनी भाजप आणि रिपब्लिकन पक्षासोबत नवी आघाडी स्थापण्याचा निर्णय घेतला. उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात एका भव्य कार्यक्रमात ओमी कलानी, रिपाइं आणि भाजप अशा नव्या ‘उल्हासनगर विकास आघाडी’ची घोषणा करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या ओमी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकारण ढवळून निघाले असताना त्यांनी अचानकपणे स्थापन केलेल्या उल्हासनगर विकास आघाडीमुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ओमी कलानीच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या कुमार आयलानी गटाने केलेल्या राजकीय खेळीमुळे त्यांचा भाजप प्रवेश टळला गेल्याचे बोलले जाते.


बदलापूर - कुळगाव-बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर दोन अनोळखी तरु णांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास तलवारीने हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली आहे.

तेली हे प्रभागातील सोसायटीत पूजेसाठी गेले होते. तेथून ते कार्यकर्त्यांसमवेत परतत असताना दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. मात्र, वार चुकल्याने त्यांच्या मानेवर तलवारीची धार नसलेली बाजू लागली आणि त्यात ते खाली पडले. हा हल्ला नक्की कोणत्या कारणांमुळे झाला आणि तो कोणी केला, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, तेली यांना उपचारासाठी बदलापुरातील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर आज प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळताना परस्परांची मुक्तकंठाने प्रशंसा केली एका बाजूला राहुल गांधी यांनी अखिलेश यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत संबंधांचा हवाला दिला. तर दुसरीकडे अखिलेश यांनी आपण आणि राहुल एकाच सायकलची दोन चाके असल्याचे सांगितले.
या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान, दोन्ही पक्षांचे प्रचार गीत "यूपी को यह साथ पसंद है' प्रसिद्घ करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि सपाची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच द्वेशाच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही आघाडी केल्याचे ते म्हणाले. या परिषदेत दोघांचाही रोख मायावती यांच्यापेक्षा मोदींवरच अधिक असल्याचे दिसून आले.
राहुल म्हणाले, "द्वेशाच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. पण उत्तर प्रदेशच्या डीएनएमध्ये प्रेम आणि बंधुभाव आहे. द्वेश नाही. आता उत्तर प्रदेशच्या तरुणांना आम्ही नवा रस्ता दाखवू इच्छितोय. नव्या प्रकारचे राजकारण देऊ इच्छित आहोत. आम्ही वैचारिक समानतेच्या मुद्यावर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत."
तर अखिलेश यांनीही राहुल यांची प्रशंसा केली. "राहुल आणि मी एकाच सायकलची दोन चाके आहोत. हात आणि सायकल एकत्र असतील तर वेग वाढणारच, आता उत्तर प्रदेश देशाला रस्ता दाखवतो आणि आम्ही या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ," असे अखिलेश यांनी सांगितले.

जळगाव - राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या चारचाकी वाहनाचे मागील चाकाचे टायर अचानक फुटल्याची घटना रविवारी सकाळी 10.30 वाजता जामनेरनजीक घडली. टायर फुटताच चालकाने वाहन ( एम.एच. १९ सीएन ०९०९) रस्त्याच्या कडेला थांबविले. त्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला. यावेळी वाहनात गिरीश महाजन यांच्यासह चार जण होते.मीरा रोड - मीरा रोड येथील गोल्डन नेस्ट परिसरातील एका इमारतीत २९ वर्षीय महिलेचा तिच्या नऊ वर्षीय मुलीसह कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातून दरुगधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

सोनम सरोवर या इमारतीत राहणाऱ्या दीपिका संघवी आणि त्यांची मुलगी हित्वी यांचे मृतदेह ते राहात असलेल्या चौथ्या मजल्यावरील घरात सापडून आले. दीपिका यांचा मृतदेह घराच्या हॉलमध्ये आणि हित्वीचा मृतदेह चादरीत गुंडाळून पलंगामध्ये ठेवण्यात आला होता. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या दीपिका या पतीशी घटस्फोट झाल्याने आपल्या मुलीसह एकटय़ाच या इमारतीत राहात होत्या. मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत सापडल्याने या दोघींची हत्या करण्यात आली आहे का याबाबत लगेचच निष्कर्ष काढणे कठीण असले तरी दीपिका यांच्या डोक्याला मार लागल्याचे तसेच हित्वी हिचा गळा आवळला असल्याची शक्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने थंड डोक्याने या हत्या करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत नक्की सांगता येईल असे पोलिसांनी सांगितले.

भाजपसमवेत पंचवीस वर्षे युतीत राहिल्याने शिवसेना सडली असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. पक्षनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केले आणि पुढे जात भाजपसमवेतची युती तुटली असे त्यांनी जाहीर केले.पक्षाचे प्रमुख म्हणून तो त्यांचा निश्चितच अधिकार आहे. कोणी कोणाबरोबर युती करावी कि नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न असतो. त्यात इतर पक्षातील नेत्यांना नाक खुपसायचे काहीही कारण नाही. या युतीमुळे सेनेचे नुकसानच होत आहे, असे त्यांना वाटत असेल तर आपल्या पक्षाबाबत हवा तो निर्णय घेण्यास ते मुखत्यार आहेतच. तेव्हा या पक्षाने इतके दिवस काय केले आणि तूर्त तो काय करू इच्छितो हा प्रश्न आहे आणि तो पक्ष सत्तेत असल्याने त्या पक्षप्रमुखाच्या निर्णयाचा हिशेब मागणे गरजेचे आहे. आपला पक्ष युतीमुळे सडला असे जर उद्धव ठाकरे यांना वाटत असेल आणि आपल्याच शिवसैनिकान समोर ते तशी भावना व्यक्त करीत असतील तर काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भात उपस्थित होतात.भारतीय जनता पक्षाशी सव्वादोन वर्षे सुरू असलेल्या हमरीतुमरीचे रूपांतर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर युतीचा निकालअखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला आणि यापुढे कोणत्याही निवडणुकीत कोणाही पुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे न राहण्याचे जाहीर केले! खरे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ती तोडल्यानंतर शिवसेनेने सरकारमध्ये सामील व्हायलाच नको होते अशी कित्येक शिवसेना नेत्यांची आणि शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र, मोठ्या प्रमाणात पक्षातील नेते फुटण्याच्या भीतीनेच उद्धव यांनी तो निर्णय घेतला असावा. झालेल्या चुकीची काही प्रमाणात आता ते दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असले, तरी सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस मात्र त्यांना दाखवता आलेले नाही आणि त्यामुळेच पक्षफुटीची टांगती तलवार अद्यापही त्यांच्या डोक्‍यावर लटकत आहे काय, अशी शंका घ्यायला हरकत नाही. मुंबई महापालिकेच्या सत्तेत दोन-अडीच दशके शिवसेनेबरोबर सामील असतानाही भाजपच्या नेत्यांनी तोंडसुख घेत मुंबई महापालिकेत माफियाराजअसल्याचे आरोप सातत्याने केले. त्यामुळेच युती तुटली मात्र, अत्यंत घणाघाती भाषण करून उद्धव यांनी भाजपबरोबर संबंध न ठेवण्याचे धोरण जाहीर केल्यानंतरच्या १२ तासांत शिवसेनेचे मंत्री सरकारी कार्यालयांतील देव-देवतांचे फोटो काढण्याचे परिपत्रक काढण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांपुढे झोळी पसरून उभे राहिल्यामुळे सत्तेत भागीदार असलेल्या या दोन पक्षांचे संबंध यापुढे नेमके कसे राहणार, याबाबतचा गोंधळ कायमच आहे.उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे नवे वळण देऊ शकतो; शिवाय ही शिवसेनेबरोबरच भाजपचीही सत्त्वपरीक्षा आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून ३५ हजार कोटींहून अधिक ताळेबंद असलेल्या मुंबई महापालिकेत हे दोन पक्ष एकत्र येणार की नाही, याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. एकीकडे दोन्ही पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेकही जोरात चालली होती. ते आता संपले असून, ‘मुंबई कोणाची?’ हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय, मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून गेलीच, तर त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावरच घाला पडू शकतो. विधानसभा निवडणुकीत युती तोडल्यानंतर सरकार स्थापन करताना शिवसेनेला पूर्णपणे डावलले जात आहे.त्यामुळेच आता पुन्हा मुंबई महापालिका शिवसेनेच्या हाती आलीच, तर उद्धव आणि त्यांचे मावळे याचा बदला घेतील काय आणि तो बदला त्यांना फडणवीस घेऊ देतील काय, हे कळीचे प्रश्‍न आहेत. शिवाय, या लढतीचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी कितपत उठवतात, हाही प्रश्‍न आहेच. मात्र, आता शिवसेना-भाजप लढत आकर्षित ठरत असल्याने नागरिकांच्या समस्या नाल्यात वाहून जातील यात मात्र शंका नाही!भाजपमुळे आपला पक्ष सडला असे उद्धव यांना वाटत असेल तर मग अशा पक्षापासून कायमचा काडीमोड का घेतला जात नाही? याही आधी २०१४ सालच्या निवडणुकीत उद्धव यांनी भाजपपासून स्वतंत्र झाल्याचे नाटक करीत विधानसभा स्वतंत्रपणे लढवली. परंतु त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या? दुर्दैवाने त्यांना एकहाती सत्ता मिळाली नाही. अशा वेळी आपल्या ताठ कण्याचा आदर राखीत उद्धव यांनी खरे तर भाजपच्या सत्तेपासून स्वत:च्या पक्षास चार हात लांब ठेवावयास हवे होते. तसे ते करू शकले असते तर राष्ट्रवादी वा अन्यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची तारांबळ उडताना पाहण्याचा आनंद उद्धव यांना लुटता आला असता. परंतु तसे न करता उद्धव यांनी आपले मर्द मराठे मावळे हे भाजपच्या दरबारात बांधण्याचा निर्णय घेतला. परिणामी भाजप देईल ती खाती पदरात घेऊन त्यांना गुमान राहावे लागले. या खात्यांतून पक्षासाठी काही हाताशी लागत नसल्याने उद्धव यांची नाराजी समजून घेणे अवघड नाही. परंतु तरीही त्यांनी सत्तेत राहणे सोडले नाही. खरे तर हीच सेनेच्या सडण्याची सुरुवात होती. त्यामुळे आपल्या पक्षाचे सडणे आनंदाने पाहण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय उद्धव यांच्यासमोर राहिला नाही.भाजपमुळेच शिवसेना सडली असली तर प्रामाणिकपणा राखून सेनेने भाजपबरोबर असलेली राज्य सरकारमधील युती तोडण्याची हिंमत दाखवली असती. आता हा घटस्फोट निवडणुकी पुरताच कि ?पुन्हा मुंबई महापालिकेत युती करून सत्तेचा लाभ भोगणार आहे.


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओद्वारे 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं. 'मन की बात'चा हा 28 वा भाग होता. 30 जानेवारीला महात्मा गांधींची पुण्यिथी आहे त्या दिवशी सकाळी 11 वाजता 2 मिनिट मौन पाळण्याचे आवाहन मोदींनी केले. तसेच प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार मिळालेल्या जवानांचेआणि त्यांच्या कुटुंबियांचेही अभिनंदन केचे.

लवकरच देशात विद्यार्थ्यांच्या बोर्ड परिक्षा सुरू होणार आहेत. यावेळी बोलताना मोदींनी विद्यार्थांना खास टीप दिली. परिक्षेच्या काळात तुम्ही जेवढे आनंदी राहाल तितके जास्त तुम्हाला गुण मिळतील असे म्हणत 'स्माइल मोअर, स्कोर मोअर' असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत पंतप्रधान विद्यार्थ्यांना म्हणाले, ' स्पर्धा स्वत:शी करा.' परिक्षेच्या दिवसांमध्ये घरातील वातावरणात तणाव असू नये, एखाद्या सणाप्रमाणे घरचे वातावरण असावे असे त्यांनी पालकांना सांगितले. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.


तेहरान - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या 7 देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. अमेरिकेच्या या कारवाईला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी केली आहे.
इराणच्या परराष्ट्रमंत्रालयाने शनिवारी याबाबत माहिती दिली. अमेरिकेने घेतलेला निर्णय अवमानकारक असून आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारा आहे, असं इराणकडून सांगण्यात आलं आहे. जोपर्यंत इराणवर अमेरिकेद्वारे घालण्यात आलेली बंदी हटवण्यात येत नाही तोपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेश देणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे.


मुंबई - शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना दिली असून, त्यांच्या दिमतीला युवा सेनेची फौज दिली आहे. ते सोशल मीडिया आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रचाराची धुरा वाहणार आहेत. त्याची चुणूक त्यांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजपला ट्विटरवर उत्तर देऊन दाखवली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडिया ही भाजपच्या प्रचाराची ताकद झाली आहे. त्याला उत्तर देण्याची जबाबदारी शिवसेनेने युवा सेनेला दिली आहे. व्हॉट्‌सऍपवरील प्रचाराची जबाबदारी युवा सेनेवर आहे. मुंबईच्या प्रचाराची धुरा आदित्य यांच्या खांद्यावर आहे. ते भाजपच्या आरोपांना आणि टीकेला ट्विटरवर उत्तर देतील. त्याची त्यांनी सुरवात केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्य असतात. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासनाकडून मांडला जातो. अशी पद्धत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये नाही, असा टोला त्यांनी ट्विटरवर लगावला आहे. आदित्य यांचे मुंबईत 24 रोड शो होणार आहेत.


नवी मुंबई-सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वितरण अंतिम टप्प्यात असताना यातील बनवाबनवी अद्याप संपुष्टात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करंजाडे येथील संचिका (फाइल) क्रमांक ४९७ मध्ये वकिलाची स्वाक्षरी बनावट आढळल्याने सिडकोने शिल्लक सर्व प्रकरणांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. परिणामी जून २०१६ पासून या योजनेअंर्तगत जाहीर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांतील स्वाक्षऱ्या पुन्हा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सर्वच लाभधारकांना पुन्हा पुरावे आणि कागदपत्रांसाठी उठाठेव करावी लागणार आहे. वितरणात काटेकोर तपासणी होणार असल्यामुळे शिल्लक प्रकरणांतील भूखंड अदा करण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारला दिलेल्या जमिनींवर नवी मुंबई शहर उभारले गेले आहे. साठ हजार शेतकऱ्यांनी १६ हजार हेक्टर जमीन दिल्यानंतर शासकीय जमिनींचा अंतर्भाव करून हे नियोजनबद्ध शहर उभे राहिले आहे. या मोबदल्यात जानेवारी १९८४ रोजी झालेल्या आंदोलनामुळे शासनाने प्रकल्पग्रस्तांना एकरी साडेबारा टक्के भूखंड देण्याची योजना १० वर्षांनंतर जाहीर केली. या योजनेतील भूखंडांचे श्रीखंड अनेक विकासक, राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी यापूर्वी ओरबाडले आहे. त्याचे किस्से जगजाहीर असून सिडकोची प्रतिमा बिघडण्यास कारणीभूत ठरणारे आहेत.

आता ही योजना अंतिम टप्यात आहे. सिडकोच्या दृष्टीने ९० टक्के भूखंड वितरित झाले असून केवळ १० टक्के भूखंड वितरण शिल्लक आहे. यात आपआपसातील हेवेदावे, तक्रारी, न्यायालयीन निवाडे, बेकायदा बांधकामे, वारसा हक्क यांसारख्या कारणांचा समावेश आहे.

वितरण धिम्या गतीने सुरू आहे, मात्र हा विभाग लवकरच बंद करण्याच्या दृष्टीने सिडकोने शिल्लक प्रकरणांचा निपटारा हाती घेतला आहे. त्यातच करंजाडे येथील ४९७ क्रमांकाच्या फाइलमध्ये एका वकिलाची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आल्यामुळे भूखंडांसाठी सुरू असलेली बनवाबनवी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

या विभागात अद्याप नवी मुंबई (ठाणे) पनवेल, उरण (रायगड) भागांतील अडीच हजार लाभार्थीना भूखंड देणे शिल्लक आहेत. आपआपसातील वाद, भांडणतंटे सामोपचाराने सोडविल्यास हे वितरण सिडकोला शक्य आहे. त्यासाठी सिडकोने आता नव्याने नियमावली जारी केली आहे.नागपूर : चिटफंडच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये गोळा करून एका पोलीस कर्मचाऱ्याने पलायन केले. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या बनवाबनवीची वरिष्ठांकडे तक्रार झाल्यानंतर आता ठगबाज पोलीस कर्मचारी बबलू बागडे याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी फसणुकीचा गुन्हा दाखल केला.

आरोपी बबलू बागडे गिट्टीखदानमधील फे्रण्डस् कॉलनीत राहतो. तो पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. त्याच्याकडे टपाल वाटपाचे काम होते. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयासह विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्याचे जाणे-येणे होते. त्याचमुळे त्याची अनेकांसोबत ओळख होती. गेल्या काही वर्षांपूर्वी त्याने ‘चिटफंड योजना’ सुरू केली.

‘वार्षिक फंड’ असे नाव त्याने या योजनेला दिले होते. यात सहभागी होणाऱ्याकडून दर महिन्याला तो विशिष्ट रक्कम घ्यायचा. बाराव्या महिन्यात तो संबंधित व्यक्तीला २५ टक्के अधिक रक्कम द्यायचा. अर्थात एका कर्मचाऱ्याकडून दर महिन्याला एक हजार रुपये जमा केले जात असेल तर १२ महिन्यात त्या कर्मचाऱ्याचे १२ हजार रुपये जमा व्हायचे. १२ महिने पूर्ण होताच बागडे त्याला १५ हजार रुपये परत करायचा. तत्पूर्वी रक्कम स्वीकारल्यानंतर त्याची तो रितसर पावतीही देत होता.


चंदीगड - पंजाबमध्ये निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला आहे. शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षात तिहेरी लढत होणार आहे. जसा जसा प्रचाराला वेग येत आहे तसे राजकीय नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या मतदारांना फेसबुक लाइव्हद्वारे एक आवाहन केले आहे. ज्या उमेदवाराची शेवटची निवडणूक असते त्याला मतदान करू नका असे त्यांनी लाइव्ह चॅटमध्ये म्हटले आहे. काँग्रेस नेते अमरिंदर सिंग आणि मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांची ही शेवटची निवडणूक आहे.

हे दोघेही नेते म्हणत आहेत की ही आमची शेवटची निवडणूक आहे. तेव्हा या दोन्ही नेत्यांना मतदान करू नका असे केजरीवाल म्हणत आहेत. ज्या व्यक्तीची शेवटची निवडणूक असते तो जनतेचे काम करण्यासाठी थोडाच येतो, असे ते म्हणाले. त्या व्यक्तीला फक्त भ्रष्टाचार करायचा असतो तेव्हा तुम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रकाश बादल यांना मतदान करू नका असे केजरीवाल यांनी म्हटले.जर समजा तुम्ही एखाद्या नेत्याकडे जाता आणि त्याला मदत मागतात. समजा त्याने मदत नाकारली तर तुम्ही काय करता. असा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला. तेव्हा तुम्ही असेच म्हणता ना, पुढच्या वेळी मत मागायला या मग आम्ही सांगू तुम्हाला. जर तुम्ही प्रकाश सिंग आणि अमरिंदर यांच्याकडे गेला आणि त्यांनी काम करण्यास नकार दिला तर तुम्ही त्यांना काय बोलाल असे केजरीवाल यांनी विचारले. ते तर म्हणतील की आम्ही पुढच्या निवडणुकीत उभेच राहणार नाहीत तेव्हा तुम्ही आमचे काय बिघडवू शकाल? तेव्हा तुम्ही त्यांना मतदान करू नका असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. दरम्यान, आपण ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे. मी आतापर्यंत कधीच पराभूत झालो नाही असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले. अकाली दल हा भ्रष्ट पक्ष आहे आणि आम आदमी पक्ष हा बाहेरच्या लोकांचा पक्ष आहे तेव्हा या निवडणुकीबदद्ल मला आत्मविश्वास आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले. पंजाबला ड्रग्सच्या विळख्यात अडकला आहे. आपण सत्तेमध्ये आल्यावर चार आठवड्यांच्या आत हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करू असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.


मेलबोर्न - ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे. सानिया आणि तिचा क्रोएशियाचा सहकारी इवान डोडिग या दुसऱ्या मानांकित जोडीला आॉस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या एबिगेल स्पियर्स व कोलंबियाच्या युआन सबेस्टियन कबाल या बिगरमानांकित जोडीने त्यांचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-4 असा पराभव केला.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच स्पियर्स आणि कबाल जोडीने आक्रमक खेळ केला आणि सानिया-डोडिग जोडीला लय मिळवणं कठीण गेलं. केवळ 26 मिनिटात सानिया-डोडीग जोडीने पहिला सेट 6-2 असा गमावला. दुस-या सेटमध्ये दोघांनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पियर्स आणि कबाल जोडीने वर्चस्व गाजवत 6-4 असा दुसरा सेट जिंकला आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.

सानिया व डोडिगने गेल्या वर्षीही फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण लिएंडर पेस व मार्टिना हिंगीस यांच्याविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

सानियाने पाचव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. 2008 मध्ये महेश भूपतीच्या साथीने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर त्यानंतरच्या वर्षी या जोडीने जेतेपद पटकावले होते. २०१४ मध्ये होरिया तेकाऊच्या साथीने सानिया उपविजेती ठरली होती. यंदाही सानियाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे.


लखनऊ - उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने पुन्हा राम मंदिर बांधण्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर आणला आहे. मात्र राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल, अशीही जोड या वेळी देण्यात आली आहे. मुस्लिमांच्या तीनदा तलाकचा मुद्दाही भाजपाने उपस्थित केला आहे.

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा सादर केला. या जाहीरनाम्याला लोककल्याण संकल्पपत्र असे नाव देण्यात आले असून, त्यात घटनेच्या चौकटीत राहूनच राम मंदिर उभारण्याचा भाजपा प्रयत्न करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत अमित शहा म्हणाले की, मुस्लिमांमधील तीनदा तलाक म्हणून महिलेला घटस्फोट देण्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, मुस्लीम महिलांना होणारा त्रास टाळण्याचे प्रयत्न केंद्र सरकार निश्चितपणे करीत आहे. अर्थात राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुस्लीम महिलांचे म्हणणे ऐकूनच केंद्र सरकार आपली बाजू न्यायालयात मांडेल.

भाजपा सत्तेवर आल्यानंतरच राजस्थान आणि मध्य प्रदेश यांचा विकास झाला, याचे उदाहरण त्यांनी या निमित्ताने दिले. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी उत्तर प्रदेशला १५ वर्षे मागे नेते, असा आरोपही त्यांनी केला. सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाचे केवळ ४७ आमदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यात १२ जाहीर सभा घेणार आहेत.


दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ज्या एनएसई मैदानावर सभा झाली, त्याच ठिकाणी मुंबई भाजपाने आज घेतलेल्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध आमची विचारांची लढाई आहे. शिवसेना व भाजपा या दोघांचाही विचार हिंदुत्वाचा आहे, पण शिवसेनेविरुद्धची आमची लढाई आचारांची आहे. प्रामाणिकतेशी फारकत घेतलेल्यांविरुद्धचे, महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट आचाराविरुद्धचे हे धर्मयुद्ध आहे आणि ते आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.


मुंबई-मुंबई महापालिकेतील सर्व कंत्राटदार हे भाजपचेच आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आल्यानंतर या दोन पक्षातील नेत्यांनी एक-दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल काळी पत्रिका काढण्याचे सोमय्या यांनी जाहीर केले. त्याला शेवाळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सोमय्या यांच्या आडून त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात शिवाजीनगरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सोमय्या यांच्या सह्य़ांचे पत्र आहे. १५० रुपयांऐवजी ७०० ते ८०० रुपयांना टँकर विकल्याचा प्रतिआरोप शेवाळे यांनी केला. कचरा कंत्राटदारांकडून भाजपच्या कार्यक्रमांना प्रायोजक मिळाल्याची टीकाही त्यांनी केली. या आरोप-प्रत्यारोपामुळे मुंबई पालिका निवडणुकीत रंगत आली आहे.


मुंबई - मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे प्रभाग क्र. 57चे नगरसेवक देवेंद्र(बाळा)आंबेरकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
काँगेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. कामत यांनी दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांच्या मनमानी कारभारावर जाहीरपणे टीका केली होती. शिवसेना प्रऴेशानंतर आंबेरकर प्रभाग क्र 68 मधून निवडणुक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी 11.30 वाजता आंबेरकर शिवसेनेत प्रवेश करतील यावेळी विभागप्रमुख व आमदार डॉ.अनिल परब,खासदार गाजनन कीर्तिकर,स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फ़णसे आणि आदी उपस्थित राहणार आहेत.

वॉशिंग्टन - सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेमध्ये नो एन्टी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फतवा काढला आहे. शुक्रवारी या संबंधीचा एक नवा आदेश जारी करण्यात आला असून याद्वारे 7 मुस्लिम देशांतील निर्वासितांनी अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यास हा निर्णय घेण्यात आला आहे. सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. 'कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून, केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या, अमेरिकेवर प्रेम करणा-यांचाच स्वीकार करू', असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ते पेंटागॉन येते बोलत होते.(ट्रम्प यांच्या शपथविधीचे छायाचित्र)

नवी दिल्ली - दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
देशाच्या स्वांतत्र्य लढयामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर आधारीत देखावा महाराष्ट्राच्या चित्ररथातून मांडण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते, त्यामध्ये ' महाराष्ट्राचा चित्ररथ' अव्वल ठरला होता, तर दुस-या क्रमांकावर आहे तामिळनाडूचा चित्ररथ होता.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget