February 2017

मुंबई - मुंबईतील ब्रिटीशकालीन वास्तू, मंदिर, समुद्रकिनारे ही जशी मुंबईची ओळख आहे तसेच बेस्ट उपक्रमाची बससेवाही या शहराची एक ओळख आहे. परराज्यातून येणा-या पर्यटकांना, लहान मुलांना मुंबईतील लाल रंगाच्या बससेवेचे प्रचंड आकर्षण असते. लवकरच मुंबई शहराची ओळख असलेल्या या बेस्ट बसेसचा रंग बदलण्याचा प्रस्ताव आहे. 
बेस्टच्या सर्व बसेसना सफेद आणि पिवळा रंग देण्याचा प्रशासनाचा विचार आहे पण हा बदल करण्याआधी लोकांचे मत विचारात घेण्यात येईल. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रायोगित तत्वावर सफेद आणि पिवळा रंगाच्या दोन बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील. 
रंगबदल हा बेस्टच्या परिवहन व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याच्या योजनेचा भाग आहे. लवकरच बस स्टॉपवर आणि बसमध्ये वाय-फाय सुविधा, किती मिनिटात बस येणार त्याची माहिती एकूणच प्रवासात प्रवाशांना मोबाईलवर मनोरंजनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची बेस्टची योजना आहे.मुंबई - मिठी नदीच्या साफसफाईसाठी यंदा तीन कोटी 82 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही मिठी कोट्यवधी रुपये गिळणार आहे.
मुंबईतील नद्या, मोठे नाले, पातमुखे यात माती, कचरा साचतो. नदी नाले गाळाने भरतात. पर्जन्य जलवाहिन्यांतून सांडपाणी आणि काही प्रमाणात मल वाहून जातो. काही पर्जन्य जलवाहिन्या भरती-ओहोटीमुळे बाधित होतात. परिणामी तुंबलेल्या पाण्याचा निचरा होत नाही आणि कचरा वाहून जात नाही. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांतील गाळ दरवर्षी काढला जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 26 जुलै 2005 च्या महापुरानंतर महापालिकेने मिठी नदीवर लक्ष केंद्रित केले आहे.
पावसाळ्यापूर्वीची पहिल्या टप्प्यातील नालेसफाईची कामे 1 एप्रिलपासून सुरू करून 31 मेपर्यंत संपवायची आहेत. या कालावधीत 60 टक्के गाळ काढण्यात येणार आहे. मिठीच्याही कामाला सुरुवात होणार आहे. मिठीतून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे क्षेपणभूमी नाही. त्यामुळे कंत्राटदाराने स्वतःहून गाळाची विल्हेवाट लावावी, असे आदेश प्रशासनाने कंत्राटदारांना दिले आहेत. गेल्या वर्षीही गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर होती; मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मिठी नदीतून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी यंदाही कंत्राटदारांवर आहे. पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सीएसटी पूल (कुर्ला) ते फिल्टरपाडा (पवई) यादरम्यानचा मिठीतील गाळ काढण्याचे काम भारती कन्स्ट्रक्‍शनला देण्यात येणार आहे. हे कंत्राट तीन कोटी 82 लाखांचे आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई - देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना ठोकून काढू असा दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. आमदार असो की कोणीही, त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.
जे सैनिक आपले संपूर्ण आयुष्याची आहुती देतात. त्यांच्या बायकांना माहीत ही नसतं की आपला पती परत घरी येईल का नाही ते. त्यांच्याबद्दल असे शब्द बोलणे अशोभनीय आहे. लाज वाटायला पाहिजे. कसं बोलतात, काय बोलतात, कधी बोलायचं. हे माझ्या बुद्धिच्या पलीकडे आहे. शप्पथ सांगतो, आमदार असू दे चुकून आलाय आत्ता निवडून ठोकणार म्हणजे ठोकणार, असे वक्तव्य उदयनराजे यांनी केले.
एखाद्या आमदाराने असे बोलणे निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले. आमदार परिचारक यांच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील आजी- माजी सैनिकांच्या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याचवेळी या संघटनांनी खासदार उदयनराजे भोसले यांनाही निवेदन दिले.
आमदार परिचारक यांनी पंढरपूर जिल्ह्यातील भोसे येथे जिल्हापरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण राज्यात पडसाद उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात मोर्चे निघत आहेत. गाव बंद ठेऊनही परिचारक यांचा निषेध करण्यात येत आहे. आमदार परिचारकांनी माफी मागूनही त्यांच्याविरोधातील असंतोष कमी होताना दिसत नाही.नवी दिल्ली - निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात उत्तर प्रदेशमधील कैराना, अलीगढ आणि मुजफ्फरनगर येथे हिंदू व मुस्लीमांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या भागांमध्ये दौरा केल्यानंतर फर्स्टपोस्टमध्ये आपलं निरीक्षण नोंदवताना ज्येष्ठ पत्रकार टुफेल अहमद यांनी या भागामध्ये फाळणीसारखी स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

- मुजफ्फरनगर आणि शामली परिसरात छोट्या कारणामुळे दोन गटात झालेल्या भांडणानंतर जातीय दंगल उसळली होती. यामध्ये झालेल्या हिंसाचारात 60 च्यावर लोक मृत्युमुखी पडले होते. तर सुमारे 40,000 लोकांना स्थलांतर करावे लागले होते. याप्रकरणी 110 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

- पश्चिम उत्तरप्रदेश मधल्या शामली जिल्ह्यातलं कैराना हे एक छोटंसं गांव. मुसलमान लोक बहुसंख्येने असले तरी हिंदूंचीही संख्या कमी नाही. हिंदू मुस्लिम लोक मिळून-मिसळून राहायचे. पण 2013 मध्ये कैरानाच्या लोकसंख्येमध्ये एक खूप मोठं स्थित्यंतर झालं. अर्थात, असं स्थलांतर झाल्याचं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे, तर विरोधकांना हे मान्य नाही.

- जर समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी झाला तर कैरानामधून आणखी मोठ्या प्रमाणावर हिंदू स्थलांतर करतील असं स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितलं.

- कैरानामध्ये ड्रग्ज, लुटमार, मद्यविक्रि, वेश्याव्यवसाय अशा अनेक अनेक अनैतिक धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम युवक सहभागी असून हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही समाजाचे लोक त्रस्त असल्याचे अहररूल इस्लामचे युपी प्रमुख मोहम्मद अली यांनी सांगितले आहे.

- कैरानामध्ये तर लष्कर पाचारण करायला हवं असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

- खंडणीखोरांचा फटका प्रामुख्यानं हिंदूंना बसलेला असला तरी अनेक मुस्लीम व्यापारीही खंडणीखोरांमुळे त्रस्त आहेत.

- पोलीसांनी काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण समाज पोलीस ठाण्याला वेढा घालतो आणि गुन्हेगारीचा प्रश्न हिंदू मुस्लीम समाजातील तेढ असा बनतो असा अनुभव आहे, त्यामुळे पोलीसांचे कामही जिकिरीचे आहे.

- यापूर्वी हिंदू व मुस्लीम येथे साहचर्यानं राहत होते, परंतु आता मुस्लीमांची संख्या प्रचंड वाढल्याने तणाव निर्माण झाल्याचं मत सुधीर चौधरी या पत्रकारानं व्यक्त केलं आहे.

- स्थानिक आमदार नाहिद हुसैन गुन्हेगारांना पाठिसी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

- मुजफ्फरनगरमध्येही अशीच परिस्थिती असून जर पोलीसांना गुन्हेगाराला मुस्लीम वस्तीतून अटक करायची असेल, तर सैनिकांची बटालियन लागते असा अनुभव एका डॉक्टरने व्यक्त केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या या भागामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असून हिंदू व मुस्लीमांमध्ये फाळणीसारकी स्थिती निर्माण झाल्याचे मत निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.लॉस एंजल्स - सात देशांतील मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशावर घातलेल्या बंदीमुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यास राजकीय रंग चढला. सादरकर्ते जिमी किमेल व ऑस्कर विजेत्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याच मुद्दय़ाला अनुसरून टीका केली.

लाखो अमेरिकी लोक व जगातील २२५ देशांचे लोक हा कार्यक्रम पाहात आहेत पण ते आता अमेरिकेचा तिरस्कार करतात. मला आठवते त्याप्रमाणे ऑस्करमध्ये गेल्यावर्षी वंशवादाची छाया होती तरी ते चित्रपटांसाठी चांगले वर्ष म्हणावे लागेल. कृष्णवर्णीयांनी नासाला वाचवले. श्वेतवर्णीयांनी जॅझला वाचवले त्याला तुम्ही प्रगती म्हणाला होतात, असे किमेल म्हणाले.

ट्रम्प यांनी मेरील स्टीपला तिच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारातील भाषणाबद्दल अहंकारी असे संबोधले होते. त्यावर किमेल यांनी वीस मिनिटे विनोद केले. मेरील स्ट्रीपची कामगिरी सुमार आहे, तिचा अभिनय चांगला नाही तरी तिने ५० चित्रपटांत किमान २० वेळा ऑस्कर नामांकन मिळवले असे ते उपरोधाने म्हणाले.

एका विजेत्याने त्याचे ऑस्कर स्थलांतरितांना अर्पण केले. लघुपटाचा पुरस्कार स्वीकारणारे निर्माते व दिग्दर्शक एझरा एडलमन यांनी राजकीय हिंसाचार व क्रूरतेचा बळी ठरलेल्यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारलाव्हायोला डेव्हीस हिने येथे जमलेल्या लोकांची क्षमता फार मोठी आहे पण त्यांची जागा स्मशानात आहे असे ती उपरोधाने म्हणाली. मूनलाईटचे दिग्दर्शक बॅरी जेनकिन्स यांनी सांगितले की, अकादमी तुमच्या पाठीशी आहे. पुढील चार वर्षे आम्ही तुम्हाला एकटे सोडणार नाही, आम्ही तुम्हाला विसरणार नाही.

टॅरेल अल्वीन मॅकक्रॅनी यांनी सांगितले की, त्या काळ्या, गहू वर्णीय मुलामुलींना जे लिंगभेद मानत नाहीत त्यांची कहाणी आम्ही चित्रपटात मांडली आहे. मूनलाईटच्या निर्मात्या अडेल रोमान्स्की यांनी पुरस्कार स्वीकारताना तो वंचित कृष्णवर्णीय मुले व गहू वर्णीय मुलींना अर्पण केला.

मेक्सिकन अभिनेते गेल गार्शिया बेर्नल यांनी ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला विरोध करताना सांगितले की, माणूस म्हणून मी आम्हाला वेगळे करणाऱ्या कुठल्याही भिंतीच्या विरोधात आहे. इराणी चित्रपट निर्माते व द सेल्समनचे दिग्दर्शक असगर फरहादी यांना परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला पण ते उपस्थित नव्हते. ट्रम्प यांच्या आदेशाचा निषेध म्हणून ते अनुपस्थित राहिले.
बडोदा - शहरातील एका सरकारी बँकेच्या एटीएमसमोर एका पेटीत २४.६८ लाख रुपये सापडल्याने पोलिसांची दमछाक झाली. हे पैसे एटीएममध्ये नोटा भरणाऱ्या संस्थेचे कर्मचाऱ्यांकडून विसरून राहिल्याचे नंतर स्पष्ट झाले.२ हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम होती. जव्हेर नगर भागातील वाघोडिया रोडवर शनिवारी रात्री एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ही पेटी दिसली. उघडून पाहिल्यानंतर त्याला त्यात पैसे दिसले. रात्री उशिरा ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. विशेष म्हणजे, २३ फेब्रुवारीपासून ही पेटी एटीएमबाहेर पडून होती. सुमारे चार दिवसांपर्यंत तिच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. ही लुटीची रक्कम असावी, असा संशय आल्याने विद्यार्थ्याने पोलिसांना कळविले.
नांदेड - राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करून सत्तास्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यात सोमवारी सकाळी तासभर चर्चा झाली. जेथे ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त तेथे त्या पक्षाचा अध्यक्ष हे सूत्र पवार-चव्हाण यांच्यातील चच्रेनंतर नक्की झाले. या माहितीला स्वत: चव्हाण यांनी नंतर दुजोरा दिला. ही चर्चा अत्यंत सकारात्मकपणे झाल्याचे खासदार चव्हाण यांनी नंतर ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पवार वेगवेगळय़ा कार्यक्रमांच्या निमित्ताने रविवारी दिवसभर नांदेडमध्ये होते. या दरम्यान भाजपच्या काही नेत्यांसह शिवसेनेच्या दोन स्थानिक आमदारांनी खासदार पवारांची भेट घेऊन, नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसऐवजी आमच्यासोबत आघाडी करा, पदांची वाटणीही तुम्हीच ठरवा, अशी गळ घातली. पवारांनी त्यांचे म्हणणे फक्त ऐकून घेतले.

खासदार पवार सोमवारी सकाळी येथून पुण्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी खासदार चव्हाण यांनी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह त्यांची भेट घेऊन केवळ नांदेडच नव्हे, तर अन्य ज्या जि.प.मध्ये संख्याबळ जुळते तेथे आघाडी करण्याबाबत चर्चा केली. या चच्रेनंतर उभय पक्ष मार्चच्या पहिल्या आठवडय़ात जिल्हा परिषदांतील संख्याबळाच्या जिल्हानिहाय आढावा घेऊन आघाडीचे सूत्र निश्चित करणार आहेत.मुंबई - काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून मुख्यमंत्र्यांनी चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून भाजपची 'काँग्रेस' केली आहे, त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेनेने मुखपत्र 'सामना'मधून भाजपवर टीका केली आहे. 'मेहबुबा मुफ्तींसोबत जाण्यापेक्षा काँग्रेस परवडली,' असे म्हणत शिवसेनेने मुंबई महापालिकेत ऐनवेळी काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपला अनुक्रमे 84 आणि 82 अशा जागा मिळाल्याने महापौर पदासाठी सेना-भाजपमध्ये मोठी चुरस आहे. दरम्यान, कोणत्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेनेने 'सामना'मधून वरील टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी असे बोलायला हवे होते की, ''आम्ही म्हणजेच भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, पण पाकिस्तानवादी मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार!'' काँग्रेस नक्कीच संशयास्पद आहे, पण अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांचे खुले समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीबरोबर 'सत्ता' उबवणे हे जास्त घातक आहे. अर्थात हा 'घातकी' प्रकार राष्ट्रासाठी केल्याची टिमकी वाजवायला हे मोकळेच आहेत!

अफझल गुरूला काँग्रेस राजवटीत फासावर लटकावले व मेहबुबा मुफ्ती या भाजपबरोबर सत्तेत असताना अफझल गुरूला 'हुतात्मा' वगैरे मानतात हे शिवरायांसमोर मस्तक टेकणाऱयांना चालते काय? अफझल गुरूला शहीद किंवा क्रांतिकारक मानणे म्हणजे अफझलखानास शिवशाहीचे प्रेरणास्थान मानण्यासारखेच आहे, अशी खरमरीत टीका करीत फडणवीस यांच्या युतीबाबतच्या वक्तव्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. 

मुंबईपासून महाराष्ट्रापर्यंत शिवसेना आणि भाजपा यांच्यात गेली २५ वर्षे टिकलेली युती यावेळी तुटली व त्या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उतरविले. कालपर्यंत एकत्र राहिलेली माणसे आज परस्परांविरुद्ध उभी राहिली की त्यांच्या भांडणातील तीव्रता व चुरस मोठी असते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस ज्या तऱ्हेची टीका एकमेकांवर करताना दिसले तो प्रकार जेवढा अभूतपूर्व तेवढाच तो त्यांच्यातील संघर्षाची तीव्रता प्रकट करताना दिसला. शिवसेनेला तिची ‘औकात’ दाखविण्याची भाषा फडणवीसांनी वापरली तर तुमचे सरकार आमच्या भरवशावर उभे आहे हे सेनेनेही फडणवीसांना ऐकविले. काय वाट्टेल ते झाले तरी मुंबई जिंकायचीच या ईर्षेने भाजपाचे कार्यकर्ते लढताना दिसले. तर ‘मेरी मुंबई नही दुंगी’ असा आवेश सेनेतही दिसला. ही हमरीतुमरी मग मुंबईपुरतीच मर्यादित राहिली नाही. तिने सारा महाराष्ट्रच व्यापलेला दिसला. सेनेने आपली आघाडी फडणवीसांच्या नागपूरपर्यंत नेली तर फडणवीस मुंबईतून महाराष्ट्राची लढाई लढताना दिसले. राज्यातील १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करून नागरिकांनी या राजकीय पक्षांना आपली कामे करण्याचा अधिकार नव्याने प्रदान केला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय निवडणुकांच्या तुलनेत बहुदा कमी मतदान होते. मात्र या निवडणुकीत तरुण मतदारांचा उत्साह मोठा होता.सेना आणि भाजपाचे पुढारी जिल्ह्याजिल्ह्यात फिरून मोठं मोठ्या सभा घेतल्या परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी पुढाऱ्यांनी तसे काही केले नाही. म्हणूनच हि लढाई भाजप विरुद्ध सेना अशीच रंगली होती. काँग्रेसला पराभवाची सवय अजून व्हायची आहे आणि राष्ट्रवादीला तिच्या विजयाच्या मर्यादांची जाणीव आहे. काँग्रेस पक्ष त्याच्या २०१४ मधील पराभवाच्या चक्रातून अजून बाहेर पडला नाही हेही येथे दिसून येते.खरेतर संस्थांचा संबंध लोकजीवनाशी येतो व तो केंद्र आणि राज्य सरकारांच्या तुलनेत अधिक जवळचा व प्राथमिक असतो. त्यातले लोकप्रतिनिधी जनतेच्या अधिक जवळचे किंबहुना त्यांच्यापैकीच असतात. त्यामुळे या संस्थांची जनतेबाबतची जबाबदारी अधिक महत्त्वाची असते. जनतेशी जवळीक राखणाऱ्या व आपले प्रामाणिकपण सिद्ध करणाऱ्या उमेदवारांना त्यात यशाची पावती मिळण्याची शक्यताही मोठी असते. प्रथमच निवडणुकीत उतरलेले नव्या दमाचे काही उमेदवार त्यात विजयी होतात. मात्र त्यांची खरी ओळख निवडणुकीनंतरच त्यांच्या मतदारांना होत असते.हे मात्र खरे. समाज व देशाचे उद्याचे नेते याच वर्गातून पुढे येतात. त्यासाठी त्यांना स्वच्छ, पारदर्शी, कार्यशील व लोकहितदक्ष असावे व दिसावे लागते. महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये काम केलेली किती माणसे गेल्या २५ वर्षात राज्य सरकारात व केंद्रात आली ते येथे लक्षात घ्यायचे. आपल्या विकेंद्रित लोकशाहीवरील एक मोठा आक्षेप हा की येथे सत्ता खालून वर जाण्याऐवजी वरून खालपर्यंत राबविली जाते. जशी सत्ता वरून खाली येते तसे वरचे दोषही खाली येतात. केंद्र भ्रष्ट असेल तर राज्येही भ्रष्ट होतात आणि राज्ये भ्रष्ट झाली की स्थानिक स्वराज्य संस्थाही स्वच्छ राहात नाहीत. महाराष्ट्रातील अशा अस्वच्छ व भ्रष्टाचाराने लिप्त असलेल्या संस्थांची नावे पुन्हा एकवार डोळ्यासमोर आणावी. निवडून आलेल्या प्रतिनिधींना या संस्थांवरील काळे डाग धुवून काढायची आहे आणि आपल्या संस्था स्वच्छ राहतील याची काळजी घ्यायची आहे. स्वच्छ माणसेच स्वच्छ संस्था उभ्या करतात हे राजकारणाएवढेच सार्वत्रिक वास्तव आहे. आपल्या स्वच्छ व पारदर्शी कारभारातून या संस्थांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्य व केंद्र सरकारलाही धडा घालून दिला पाहिजे. मात्र ही माणसे भ्रष्टाचाराच्या महत्त्वाकांक्षा घेऊनच या संस्थात येत असतील तर राजकारण आणि समाजकारण यातल्या स्वच्छतेच्या सगळ्या शक्यताच संपून जातात. सामान्य माणूस हा लोकशाही व्यवस्थेतला केंद्रबिंदू आहे. त्याच्या मूलभूत गरजांची काळजी घेणे यात यशस्वी लोकशाहीच्या खऱ्या कसोट्या आहेत.मतदारांनी आपली जबाबदारी पार पडून आपल्याला यश दिले आहे.आता सत्तेवर येणाऱ्या संथांना आपली जबाबदारी पार पडायची वेळ आली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या जुलैैत होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलले असून आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू व मुरली मनोहर जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपदासाठी डावलण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील चर्चेनंतर ही नावे पुढे आली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मुरलीमनोहर जोशी (८३) हे १९४४ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. अयोध्येत राम मंदिराची मोहीम सुरु असताना १९९१ च्या काळात ते भाजपचे अध्यक्ष होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये ते संसद सदस्य होते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर एकता यात्रा काढली होती. आणीबाणीत त्यांना तुरुंगवासही झाला होता.

नवी दिल्ली - देशातील सगळ्यात मोठी मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने तिच्या हॅचबॅक श्रेणीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही लोकप्रिय असलेल्या रिट्झ कारची विक्री थांबवली आहे.पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारांत २००९ साली सुरू करण्यात आलेल्या रिट्झ ब्रँडच्या ४ लाख मोटारी आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. आमच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओत नवी भर घालण्यासाठी आम्ही सतत त्यांचा आढावा घेऊन नवे मॉडेल्स बाजारात आणत असतो, असे मारुतीच्या प्रवक्त्याने या घडामोडीला दुजोरा देताना सांगितले.रिट्झ ही मारुती सुझुकी इंडियाच्या ताफ्यातील सर्वाधिक यशस्वी मॉडेलपैकी एक राहिलेली असून, आधुनिक काम्पॅक्ट मोटारींमध्ये कंपनीचे अस्तित्व बळकट करण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली, असेही हा प्रवक्ता म्हणाला. हे मॉडेल बंद झाले तरी तिचे सुटे भाग आणि सव्‍‌र्हिस पुढील १० वर्षे उपलब्ध करून देण्यास कंपनी बांधील असल्याचे त्याने सांगितले.

शिलाँग - मेघालयामध्ये पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यात झालेल्या एका अपघातामध्ये १६ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. वेस्ट खासी हिल्स या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नॉगस्टॉइन येथून ११ किमी दूर असलेल्या दोहक्रोह या ठिकाणी ही घटना घडली. घटनास्थळीच १२ जणांचा मृत्यू झाला. तर, रुग्णालयात दाखल केल्यानंतर चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ महिला आहेत. हे सर्व लोक प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. या ट्रकमध्ये ७० जण होते. सकाळी एका ट्रकमध्ये बसून हे सर्व लोक प्रार्थनेसाठी जात होते. त्यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर हा ट्रक गेला. त्यातून हा अपघात झाला.हा ट्रक अतिवेगाने जात होता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर चढला. त्यामुळे, हे लोक मृत्युमुखी पडले असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. जखमींना शिलाँगच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या अपघाताची माहिती कळताच प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. रुग्णवाहिकेने जखमींना रुग्णालयालत नेण्यात आले. या घटनेमुळे या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेघालयचे आरोग्य मंत्री लिंगडोह यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.नांदेड - मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपा आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे. शिवसेना जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेल, मात्र वेळ आलीच तर भाजपा वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून खा. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आपण भाजपाला पाठिंबा देणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या असून, एका अपक्षासह विजयी झालेल्या तीन बंडखोर उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी, सेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपाकडे ८२ जागा आहेत. संख्याबळानुसार शिवसेना किंवा भाजपा दोन्ही पक्ष स्वबळावर महापौर निवडून आणू शकत नाहीत. एकतर दोघांना एकत्र यावे लागेल, अथवा काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागेल. मात्र, शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तरच पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसने घातली आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या विधानाला महत्त्व आहे.कॅलिफोर्नियातील - अॅण्ड दी ऑस्कर गोज् टू…हे चिरपरिचीत शब्द ऐकायला मिळणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हृदयाचा ठोका चुकायला लावणा-या, हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणा-या ' २०१७ ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली असून यंदाचे हे पुरस्कार सोहळ्याचे ८९ वे वर्ष आहे. कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये सुरू असलेल्या या कार्यक्रमाला हॉलिवूडसह बॉलिवूड ता-यांचीही मांदियाळी जमली आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यंदाही सोहळ्यास उपस्थित असून पांढ-या रंगाच्या गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या प्रियांकाचे सौंदर्य खुलून दिसत होते.दरम्यान, सुप्रसिद्ध टेलिव्हीजन अँकर जिमी किमेल यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहे. 'ला ला लॅण्ड’, ‘मूनलाइट’, ‘फेन्स’, ‘लायन’, ‘अरायव्हल’, ‘मँचेस्टर बाय द सी’, ‘हेल ऑर हाय वॉटर’, ‘हिडन फिगर्स’, ‘हॅकसॉ रिज’ या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस आहे. 

मुंबई - 'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. ' मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ' काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे.

मुंबई - जीटीबी नगर येथे मालगाडीचे चार डबे घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावर वडाळा-कुर्ला लाइन बंद ठेवण्यात आल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गाड्यांचा प्रॉब्लेम झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान सीएसटी-पनवेल मेनलाईनवरून वाहतूक सुरू आहे.

नाशिक - महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजापाविरोधातच एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाने निवडणूक प्रक्रिया प्रभावित करून लोकशाहीविरोधी कृत्य करून सत्ता मिळविल्याचा आरोप करून विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांचे पुरावे गोळा केले असून, या पुराव्यांसह याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

हुतात्मा स्मारक येथे पाराभूत उमेदवारांनी रविवारी (दि.२६) बैठक घेऊन निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्यासाठी कोर कमिटीची स्थापना केली असून या प्रकरणी सर्वपक्षीय उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. कें द्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने लोकशाही प्रक्रियेतून सर्वसामान्य नागरिकांना हद्दपार करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे निवडणुकी प्रक्रियेत मतदार याद्यांमध्ये घोळ करून अनेक मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्याचप्रमाणे इव्हीएममशीनमध्येही छेडछाड करण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय उमेदवारांनी केला आहे. इव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेतही मोठ्या प्रमाणात कुचराई झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला असून निवडणूक आयोगाच्या नियोजनाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत ३ मार्च रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळयासमोर सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगा विरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय उमेदवारांनी घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपाकलिके साठी पुन्हा मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात येणार असून यावेळी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीचे आयोजक डॉ. डीएल कऱ्हाड, संजय अपरांती यांच्यासह सर्व ३१ प्रभागांमधील पराभूत उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांपैकी २२ जणांच्या कोर कमिटीची स्थापना करण्यात आली असूनही कोर कमिटी निवडणूक अयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.झारखंड - मुलीवरील उपचारानंतर बिल चुकवता न आल्याने संबंधित रुग्णालयाने तिला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे तणावातून मुलीच्या वडिलांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. तपन लेटे असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बर्दवानमधील रुग्णालयाच्या व्यवस्थापकासह तीन मालकांनाही ताब्यात घेतले आहे.

तपन लेटे हा गरीब शेतकरी असून झारखंडमधील दुमका येथे राहत होता. एका खासगी रुग्णालयात त्याच्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी आलेला खर्च जमा न केल्याने रुग्णालयाने तिला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे तणावातून तपनने गावातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तपनच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारीला तपनच्या मुलीने बीरभूम येथील रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. तेथील डॉक्टरांनी मुलीला संबंधित खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तपनने मुलीला रुग्णालयात दाखल केले होते. बीरभूममधील रुग्णालयाने कोणत्याही तपासण्या न करता मुलीला या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, मुलीला कोणता त्रास होत आहे, याबाबत काहीही सांगितले नाही, असा आरोप तपनच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले आहेत. तपनची मुलगी न्यूसिया या आजाराने ग्रस्त होती, असे बीरभूम येथील डॉक्टरांनी सांगितले.

पेइचिंग - दक्षिणपूर्व चीनमधील नानचांग शहरातील एका अलिशान हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलच्या नुतनीकरणाचं काम चालू असल्याने आग लागल्यानंतर काही लोकांसह कामगारही हॉटेलमध्ये अडकले होते. 
आग लागल्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामधून आगीचं भयंकर रुप समोर येत होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, आतमध्ये अजून काही लोक अडकले आहेत का याची पाहणी केली जात आहे.नवी दिल्ली -दिल्लीमध्ये २० वर्षीय विद्यार्थ्यीनीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्यामुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे. त्यापैकी काही जण हे तिच्या वर्गात शिकणारेच विद्यार्थी होते. तिच्यावर ३ फेब्रुवारी रोजी बलात्कार करण्यात आला. आरोपींच्या भीतीमुळे ही बाब तिने कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर ते तिला त्रास देऊ लागले त्यानंतर तिने तक्रार दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण पळून गेला आहे. तर एक जणाने त्यांना या गुन्ह्यात सहाय्य केले त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

नोएडामध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थीनीच्या कॉलेजमध्ये स्नेह संमेलन होते. स्नेह संमेलन संपल्यानंतर तिच्या वर्गमित्राने तिला आपल्या घरी येण्यास विचारले. आपल्या घरी छोटी पार्टी आहे तिथे अनेक मुली देखील आहेत असे त्याने सांगितले. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवले, त्याच्या सोबत आणखी एक वर्गमित्र आला. ते तिघे मिळून एका फरिदाबाद येथील एका फ्लॅटवर गेले. तिथे इतर तिघे जण आले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी म्हटले. बलात्कार झाल्यानंतर तिला धमकवण्यात आले. या घटनेनंतर तिला तिच्या फ्लॅटवर सोडण्यात आले.

तेव्हा जाताना देखील एका निर्जन ठिकाणी आरोपीने बलात्कार केल्याचे पोलिसांनी म्हटले. या घटनेनंतर तिला वारंवार धमक्या येऊ लागल्या होत्या आणि तिची छळवणूक केली जात होती. मुख्य आरोपीने तिच्या फ्लॅटवर जाऊन परत एकदा बलात्कार केल्याचेही तक्रारीमध्ये म्हटले आहे. या छळवणुकीला कंटाळून तिने कॉलेजच्या लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे तक्रार केली. त्या समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. भारतीय दंडविधान ३७६ ड आणि १२० ब नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांच्या असे लक्षात आले की या गुन्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीने साहाय्य केले आहे.


त्या ही व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. डिसेंबर २०१२ मध्ये २३ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्यानंतर दिल्लीमध्ये खळबळ उडाली होती. या बलात्कारादरम्यान तिला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शाळा आणि कॉलेजमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक समिती असावी अशी एक सूचना करण्यात आली होती. त्यानुसार कॉलेजमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली. त्या समितीकडे दिलेल्या तक्रारीमुळेच पुढील कारवाई झाली.

वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बातम्या देण्याचा आरोप असलेल्या माध्यम संस्थांना व्हाइट हाऊसमधील विस्तारित पत्रकार परिषदेत प्रवेश नाकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रवेश नाकारण्यात आलेल्या माध्यम संस्थांत न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि बीबीसी यासारख्या संस्थांचा समावेश आहे.वार्षिक कंझर्वेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांवर जोरदार टीका केल्यानंतर काहीच तासांत व्हाइट हाऊसने टीकाकार माध्यम संस्थांना पत्रपरिषदेत प्रवेश नाकारला. औपचारिक विस्तारित पत्रकार परिषदेला (आॅफ कॅमेरा एक्स्टेंडेड प्रेस गॅगल) व्हाइट हाऊसकडून मोजक्या माध्यम संस्थांना निमंत्रणे पाठविण्यात आली होती. न्यूयॉर्क टाइम्स, लॉस एंजेलिस टाइम्स, पॉलिटिको, बझफीड, बीबीसी, गार्डियन इ. अनेक मान्यवर संस्थांना निमंत्रणे पाठविण्यात आली नव्हती. प्रेस सचिव सीन स्पाइसर यांच्या कार्यालयात ही पत्रपरिषद झाली.व्हाइट हाऊसकडून दररोज आॅनकॅमेरा पत्रकार परिषद घेतली जाते. तिला फाटा देऊन ही आॅफ कॅमेरा पत्रपरिषद घेण्यात आली. निमंत्रण नसलेल्या माध्यम संस्थांचे प्रतिनिधी स्पाइसर यांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांना बाहेरच रोखण्यात आले.

लंडन - परदेशी व्यक्तीशी लग्न केलेल्या ब्रिटिश नागरिकाचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच त्या व्यक्तीला आपल्या पत्नी किंवा पतीला आणि मुलांना ब्रिटनमध्ये घेऊन येण्याची मुभा देणाऱ्या ब्रिटिश सरकारने केलेल्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने शेकडो भारतीय कुटुंबांची ताटातूट होण्याची चिन्हे आहेत.गेली पाच वर्षे ब्रिटिश सरकारने हे नियम उत्तरोत्तर अधिक कडक करून ‘किमान उत्पन्न मर्यादा’ वाढवत नेली. सध्या ती वर्षाला १८,६०० पौंड केली आहे. म्हणजेच युरोपीय संघाखेरीज अन्य देशाची नागरिक असलेल्या आपल्या जोडीदाराला ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणायचे असेल तर त्यांचे उत्पन्न किमान एवढे असणे बंधनकारक असेल. मुलालाही आणायचे तर ती २४,४00 पौंड आहे. शिवाय प्रत्येक वाढीव मुलागणिक त्यात २,४०० पौंडांची वाढ होत जाते.पाकिस्तान, लेबेनॉन आणि काँगो या देशांमधील जोडीदार असलेल्या ब्रिटिश नागरिकांनी ‘टेस्ट केस’ म्हणून कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेली प्रकरणे अखेर सर्वोच्च न्यायालयात आली होती. हे नियम युरोपीय मानवाधिकार करारांचे उल्लंघन करणारे आहेत व त्यामुळे मुलांच्या कल्याणाला बाधा येते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु या नियमांत तात्त्विकदृष्ट्या काहीच चूक नाही, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ब्रिटिश नागरिकांनी विदेशांतून त्यांची बायका-मुले येथे आणली तर त्यांचे संगोपन त्यांनी स्वत: सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या भरवशावर त्यांनी त्यांना येथे आणू नये, या सरकारच्या विचारात काही चूक नाही.

राजकोट - गुजरातच्या राजकोटमधून पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 4 शार्पशूटर्सना अटक केली आहे. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने जामनगर येथील एका व्यावसायिकाची हत्या करण्याची सुपारी त्यांना दिली होती. हे चारही आरोपी शिर्डीहून राजकोटला एका खासगी बसने येणार अशल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राजकोटच्या 30 किलोमीटरआधी कुवाडवा पोलीस स्थानकाजवळ बस थांबवून सर्च ऑपरेशन केलं असता बसमधून चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 पिस्तुल , 6 काडतुस, दोन चाकू, गाडीच्या काही नंबर प्लेट, 6 मोबाइल फोन आणि सिम कार्ड्स जप्त केले आहेत. चौकशी केल्यानंतर जामनगर येथील जहाज व्यवसायिक अशफाक खत्री यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई - द्राक्ष आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात, कारण हे पोषकतत्त्वांनी युक्त असतात. हे शारीरिक बळ वाढवणारे असतात. द्राक्षांचे वानस्पतिक नाव विटिस विनीफेरा आहे. द्राक्षांचे औषधी गुण पाहून म्हटले जाऊ शकते की, हे फळ रोग्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.द्राक्षांमध्ये क्लोराइड, पोटॅशियम क्लोरायइड, पोटॅशियम सल्फेट आणि एल्युमिन व इतर काही महत्त्वाचे पोषकतत्त्व उपलब्ध असतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या द्राक्षांचं नियमित सेवन नियंत्रण ठेवू शकतं. चला तर मग आज जाणुन घेऊया काळ्या द्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते.

- काळी द्राक्षे नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

- काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

- काळी द्राक्षे शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

- काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.

- काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.

- नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं. 

- दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

- काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.

- काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.ठाणे - सैन्य भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने राज्यासह देशभरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींसह ३५० विद्यार्थ्यांना अटक केल्याचे वृत्त एअनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. अटक झालेले बहुतांश आरोपी सैन्याशी संबंधित आहेत. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह गोव्यात शनिवारी रात्री उशीरा छापे टाकून पोलिसांनी आरोपी आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळपर्यंत पोलिसांची छापेमारी सुरू होती.
देशभरातील विविध केंद्रांवर सैन्य दलातील भरतीसाठी आज (रविवारी) ९ वाजता लेखी परीक्षा होते आहे. मात्र आदल्या दिवशी रात्रीच काही जण परीक्षेचा पेपर लिहित असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. हॉटेल आणि लॉजमध्ये विद्यार्थ्यांना गोळा करुन आरोपी पेपर लिहून घेत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. यानंतर ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये आतापर्यंत तब्बल ३६८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ३५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबई - अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि रेखा नंतर ह्या पुरस्काराचा मानकरी ठरणारा शाहरुख चौथा बॉलिवूड कलाकार झाला आहे. काल रात्री, शाहरुख खानला सदाबहार रेखांच्या हस्ते नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. सिनेसृष्टीतील असामान्य योगादानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.शाहरुख खानला जगभरातील अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. त्याच्या अभिनयासाठी, सामाजिक कार्यासाठी, सिनेसृष्टीतील योगदानासाठी मोठ-मोठ्या पुरस्कारांनी त्याला नावाजण्यात आलेले आहे. परंतु काल मिळालेला हा सन्मान त्याला भावनिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा वाटत आहे. शाहरुख आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मिळून अनेक चित्रपटांची निर्मिती केली.यश चोप्रा यांच्यासोबत शाहरुख खानचे भावनिक नातं जोडलं होतं म्हणून तर जेव्हा यश चोप्रा यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड त्याला प्रदान करण्यात आला तेव्हा भावनिक होऊन शाहरुख म्हणाला की, आजचा हा सन्मान माझ्या सर्वात महत्त्वाचा आहे. यशजींनी माझे संपूर्ण करिअर घडविले. माझ्या यशाचे श्रेय त्यांना जाते.पुरस्कार स्वीकारताना किंग खान म्हणाला की, आजची सायंकाळ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सायंकाळ आहे. मी खूप भावनिक आहे. यश चोप्रांनी एकहाती माझे करिअर उभे केले. त्यामुळे मला घडविलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिला जाणार पुरस्कार मला दिला जात असल्यामुळे एका अर्थाने नियतिचे चक्र पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. सोहळ्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, यशजींसोबतच्या माझ्या नात्यामुळे मला हा अवॉर्ड मिळत आहे. त्याचे श्रेय मी घेऊ शकत नाही.नवी दिल्ली - प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतीय जनतेशी संवाद साधतात. आजही मोंदी यांनी संवाद साधला. मोदींच्या याच कार्यक्रमावरुन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला रोज नविन वळण मिळतं आहे.अखिलेश यादव यांनी रॅलीला संबोधत असताना मोदी यांनी मन की बात न करता काम की बात करावी असे म्हणत टीका केली, ते म्हणाले, जे लोक मन की बातकरतात, ते स्वप्नांच्या दुनियेत राहतात. मात्र, वास्तव काही वेगळेच असते. जे लोक मन की बात करतात, त्यांनी उत्तर प्रदेशात काम की बात करायला हवी, असा टोला अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.तर खासदार डिंपल यादव म्हणाल्या मोदी तीन वर्षापासून मन की बात करत जनतेशी संवाद साधत आहेत, तीन वर्षात 400 रुपये किंमतीच्या गॅस सिलेंडरची किंमत 700 झाली तेव्हा ते काय करत आहे याचे भान त्यांना आहे का? पुढे बोलताना त्या म्हणाल्या जे लोक गेल्या तीन वर्षांपासून मन की बात करत आहेत त्यांच्या मनात काय आहे याचा विचार आपण केला का. त्यांच्या मनात आहे भेदभाव, त्यांच्या मनात आहे स्मशान आणि दफनभूमी त्यांच्या मनात आहे दिवाळी आणि रमजान असे म्हणत डिंपल यादव यांनी मोदींवर निशाणा साधला.नवी दिल्ली - दिल्ली पोलिस ही भाजपची एजंट झाल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीतील रामजस महाविद्यालयात झालेल्या संघर्षाबाबत दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर केजरीवाल यांनी हा आरोप केला असून, याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून वागू नका, अशी विनंती केली आहे.
राजमस महाविद्यालयात बुधवारी एबीव्हीपी आणि डाव्या विचारसरणीचे एआयएसए या दोन गटांत धुमश्‍चक्री झाली होती. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले, भाजप आणि एबीव्हीपी यांच्यासाठी दिल्ली पोलिस एजंटप्रमाणे काम करत असून, याचा मी तीव्र निषेध करतो. लोकांचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, एबीव्हीपी आणि भाजपला गुंडागिरी न करू देणे हेही त्यांचे काम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दिल्ली पोलिस पंतप्रधानांना अहवाल देत असले तरी पंतप्रधान हे काही लोकांचे नसून ते या देशाचे पंतप्रधान आहेत हे त्यांनी विसरू नये आणि त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे त्यांनी सांगितले.

मुंबई - मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्षाला धार चढत चालली आहे. राज्य सरकारमधून सरकार बाहेर पडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ, असे काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सांगितले जात असतानाच आता रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी युतीसाठी मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, असे ते म्हणाले.

मुंबई - महापौरपदाच्या निवडीसाठी काँग्रेसने शिवसेनेला मदत करू नये असे पत्र गुरुदास कामत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ८४ जागा आल्या. काही अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता त्यांचे संख्याबळ ८९ झाले आहे. महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेला आणखी २५ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे ३१ नगरसेवक आहेत. या परिस्थितीमध्ये काँग्रेस शिवसेनेची मदत करणार का याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. जर शिवसेनेनी राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर त्यांना पाठिंबा देण्याचा आम्ही विचार करू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची मदत घेणार का असे शिवसेना नेते अनिल परब यांना विचारले असता त्यांनी, कोणताही पक्ष शिवसेनेला अस्पृश्य नाही असे विधान केले. भाजपला काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती कशा चालू शकतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपण गेली कित्येक वर्षे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढलो आहोत तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणे अयोग्य असल्याचे मत गुरुदास कामत यांनी मांडले. हा शिवसेना आणि भाजपमधील मुद्दा आहे आपण त्यामध्ये पडता कामा नये, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेनी आपला पाठिंबा मागितला होता असे विधान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे. काही अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदत घेऊन आपण देखील महापौर पदावर आपला दावा सांगणार आहोत असे निरुपम यांनी म्हटले आहे. त्यांनी असे केल्यास अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा शिवसेनेलाच होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला फायदा होईल असे वागू नये असे गुरुदास कामत यांनी म्हटले आहे. गेली कित्येक वर्षे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या जातीयवादी पक्षांच्या विरोधात आपण लढलो त्यांना आपण सहकार्य करू नये असे कामत यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

मुंबई - मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना भवनात उद्दव ठाकरे यांची सेनेच्या नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. यासोबतच प्रलोभने, अमिषांन बळी पडू नका असं आवाहन त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केलं आहे. मतदार यादीत घोळ नसता तर चित्र वेगळं असतं असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.उद्धव ठाकरे यांच्याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर आमचाच होणार असं म्हटलं होतं. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसला युतीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला नसून, खोट्या बातम्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्याचा दावा केला होता. दुसरीकडे मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय रॅलीत बोलताना ,'भाजपा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, ज्याला त्यांच्यासोबत जायचं आहे ते जाऊ शकतात', असं म्हटलं आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेसला सोबत घेणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे. मनपा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापनासाठी दोन्ही पक्षांकडून सत्तेची समिकरणं जुळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यावर शिवसेनेने पाठिंब्यासाठी प्रस्ताव दिल्याचे समजले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यास आमचा नकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सांगितले. तसेच छोटे पक्ष मिळून महापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितले. संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, शिवसेनेकडून याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे, 'काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे', असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे.


मुंबई - मुंबईत शिवसेनेचा महापौर बनणार असेल तर काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला हरकत काय असे वक्तव्य शिवसेना आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले आहे.
मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा असेल याबाबत सस्पेन्स कायम असताना गरज पडल्यास शिवसेनेने काँग्रेसचा पाठिंबा स्विकारण्याची तयारी दर्शवली. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बनणार असेल तर काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला हरकत नसल्याचे वक्तव्यकेले आहे.
शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी जे जे मदत करतील त्यांची मदत शिवसेना नक्की घेईल असं त्यांनी सष्ट केले. काहीही झाले तरीही येत्या ९ मार्चला होणाऱ्या महापौर निवडणुकीत सेनेचाच महापौर होणार असे त्यांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी याबद्दल कोणतीही भूमिका मांडली नाही. थोडं थांबा वेळ आल्यावर सगळे काही सांगेन असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. पण, सेनेतून सत्तेसाठी कोणत्याही तडजोडीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई - ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवाराला विजयी घोषित करण्याच्या निवडणूक अधिका-यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गिरगाव चंदनवाडी वॉर्ड क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपा उमेदवार अतुल शहा यांना समसमान मते मिळाली. मतांमध्ये टाय झाल्याने निवडणूक अधिका-यांनी ईश्वरचिठ्ठीने विजेता निवडण्याचा निर्णय घेतला. 
त्यात अतुल शहा यांना विजयाची लॉटरी लागली. आता या निर्णयाविरोधात बागलकरांनी कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर, भाजपाला 82 जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अपक्षांना महत्व आले असून, प्रत्येक जागा दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे. 
शिवसेनेला 3 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ 87 झाले आहे. अशा परिस्थितीत वॉर्ड क्रमांक 220 संबंधी न्यायालयाचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकरांना दोघांना प्रत्येकी 5946 मते मिळाली. काँग्रेसच्या नरेश शेठ यांना 5358 मते मिळाली.

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसनाअंतर्गत लोअर परळ येथील इमारतीत खोल्या देण्याचे आमिष दाखवून एक कोटी 36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला नुकतीच अटक केली. तक्रारदारांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाने एसआरए प्राधिकरणाचे बनावट "ना हरकत' प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 13 तक्रारदार पुढे आले आहेत.तक्रारीनुसार, 2008 मध्ये आरोपी बांधकाम व्यावसायिकाने लोअर परळ येथील एका "झोपु' प्रकल्पात 300 चौरस फुटांचे घर देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून रोख व धनादेशाद्वारे पैसे घेतले; मात्र त्यांना घर दिले नाही. तक्रारदारांनी याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता आलेल्या "रंगून'मध्ये त्यांनी चाळीसच्या दशकातील कथा सांगितली आहे. सन 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणारी ही कहाणी आहे. त्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी लढा देत होती. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्‍वभूमी आणि त्यातच मांडलेला प्रेमाची त्रिकोण अशी "रंगून'ची कथा आहे. ज्युलिया (कंगना राणावत) ही एक त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असते. ती निर्माता व ऍक्‍टर रुसी बिलिमोरिया (सैफ अली खान)च्या इशाऱ्यावर चालत असते. रुसी हा एका स्टुडिओचा मालक असतो. त्याचं ज्युलियावर खूप प्रेम असतं. एके दिवशी ब्रिटिश सेनेचा मेजर जनरल डेव्हिड (रिचार्ज मॅकबे) रुसीशी बोलणी करून ज्युलियाला भारत आणि बर्मा येथे सीमारेषेवर असलेल्या ब्रिटिश सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी पाठवण्यास सांगतो. तिच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी आपण घेऊ, असं त्याला वचन देतो. मग रुसी ज्युलियाला तिथे पाठवण्यास तयार होतो. ज्युलियाच्या संरक्षणासाठी 
ब्रिटिश सैनिकांची एक तुकडी असते. त्यामध्ये जमादार नवाब मलिकही (शाहीद कपूर) असतो. पण अचानक स्थिती बिघडते आणि ज्युलिया व नवाब शत्रूने वेढलेल्या भागात अडकतात. धो धो कोसळणारा पाऊस, होणारी उपासमार आणि त्यातच शत्रूची भीती या सगळ्या प्रसंगातून वाटचाल करीत असतानाच ज्युलिया आणि नवाब एकमेकांच्या प्रेमात पडतात. कारण परिस्थितीच तशी निर्माण होते. त्यांची प्रेमकहाणी त्यादरम्यान फुलते. इकडे रुसी ज्युलियाचा शोध घेत असतो आणि अशातच ज्युलिया आपल्या तुकडीमध्ये सुखरूप पोहोचते. ज्युलियाला पाहताच रुसी आनंदित होतो. तो ज्युलियाबरोबर लग्नाचा बेत आखत असतो. एकीकडे रुसीचा ज्युलियाबरोबरचा हा लग्नाचा बेत; तर दुसरीकडे ज्युलिया आणि नवाब यांचा रोमान्स सुरू असतो. अशातच कथानक पुढे सरकतं. त्यातच अधेमधे या कथेत काही टर्न आणि ट्‌विस्ट येतात. खरं तर विशाल भारद्वाज हा अत्यंत कल्पक आणि हुशार दिग्दर्शक आहे. एखादी कथा निवडली की तिची मांडणी, कलाकारांची अचूक निवड, त्याला संगीताची साजेशी जोड वगैरे गोष्टींकडे तो बारकाईने बघत असतो. 
"रंगून' पाहताना त्याची प्रचीती नक्कीच येते. या चित्रपटासाठी त्याने शाहीद कपूर, कंगना राणावत आणि सैफ अली खान या कलाकारांची त्या-त्या पात्रांसाठी केलेली निवड अगदी योग्यच आहे. या तिन्ही कलाकारांनी जीव ओतून काम केलंय. विशेष कौतुक करावं लागेल ते कंगनाचं. तिने केलेली ऍक्‍शन जबरदस्त आहे. ऍक्‍शन आणि इमोशन्स करताना तिने डोळ्यांतून व्यक्त केलेले भाव अफलातून आहेत. तिचे डोळे बरंच काही सांगतात. तिच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण एक परिपक्व अभिनेत्री आहोत, हे तिने सिद्ध केलं आहे. सैफ अली खानने साकारलेला बिलिमोरियाही देखणा-दिमाखदार झाला आहे. त्याने आपल्या भूमिकेत श्रीमंती थाटमाट चांगलाच दाखवला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण झालंय. तेथील निसर्गरम्य दृश्‍यं सिनेमॅटोग्राफर पंकजकुमार यांनी आपल्या कॅमेऱ्यात नजाकतीने कैद केली आहेत. त्यांचंही कौतुक करावंच लागेल. संगीताची बाजू विशाल भारद्वाज यांनीच सांभाळलेली आहे. मात्र चित्रपटातील काही दृश्‍यं विनाकारण ताणलेली आहेत. काही दृश्‍यं अनावश्‍यक झालेली आहेत. त्या दृश्‍यांना संकलनाच्या वेळी कात्री लागली असती, तर सिनेमाची कथा अधिक आटोपशीर झाली असती. कंगनाची ऍक्‍शन जबरदस्त आहे. ऍक्‍शन आणि रोमान्स पुरेपूर या चित्रपटात आहे.मुंबई - मुंबई महापालिकेची सत्ता संपादन करण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोघांकडेही पुरेसे संख्याबळ नसल्याने उभयतांनी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. तीन अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यात शिवसेनेला यश आल्याने त्यांचे संख्याबळ आता ८७ वर पोहोचले आहे. तर ८२ वर स्थिरावलेल्या भाजपनेही छोटे पक्ष व अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अंकगणित आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रपक्षांनी एकत्र यावे, असा सूर लावला आहे. दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे.
शिवसेना आणि भाजपला अनुक्रमे ८४ आणि ८२ जागा मिळाल्याने महापौरपदासाठी उभय पक्षांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. स्नेहल मोरे, तुळशीदास शिंदे हे दोन बंडखोर तर चंगेज मुलतानी हे अपक्ष अशा तिघांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवल्याने सेनेची सदस्यसंख्या आता ८७ वर पोहोचली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेने महापौरपद काबीज करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. या पाश्र्वभूमीवर आज, शनिवारी सेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) - वैद्यकीय प्रमाणपत्र देऊनही रजा मंजूर न करता निवडणुकीच्या कामावर सक्तीने पाठविलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त शिक्षकांनी गुरुवारी (ता. 23) एटापल्ली येथील तहसील कार्यालयासमोर शिक्षकाचा मृतदेह ठेवून चार तास आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. एटापल्ली तालुक्‍यातील भगवंतराव आश्रम शाळा, भापडा येथील शिक्षक नामदेव ओकटु ओंडरे यांचा रक्तदाब वाढल्याने चंद्रपूर येथे उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ओंडरे यांनी प्रकृती चांगली नसल्याने निवडणुकीच्या कामावर पाठवू नये, अशा विनंतीचा अर्ज केला होता. सोबतच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडले होते. मात्र, त्यानंतरही ओंडरे यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी गेदा ते एटापल्ली असा सोळा किलोमीटरचा प्रवास ओंडरे यांना चालत करावा लागला. यातच प्रकृती खालावल्याने त्यांना एटापल्लीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यात विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस उपनिरीक्षक विश्राम मदने यांनी मारहाण केल्याचा आरोप मृत ओंडरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.ओंडरे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकावर बुर्गी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.

मुंबई - डिजिटल क्षेत्रातील कंपनी लिन टेरॅक्टिव्हला एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचे काम मिळाले आहे. दुचाकी वाहनांच्या विम्याच्या क्षेत्रात कंपनी नवीन मार्ग चोखाळणार आहे. एचडीएफसी एर्गोचा सर्व डिजिटल भाग लिन टेरॅक्टिव्ह विकसित करणार आहे. सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांच्या विम्यासाठी ही डिजिटल यंत्रणा वापरली जाणार आहे. एकदा विमा पॉलिसी घेतल्यानंतर वाहनधारक तिचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे नूतनीकरण क्षेत्रात काहीच व्यवसाय होत नाही. यात बदल घडवून ग्राहकांना विम्याचे नूतनीकरण करण्यास प्रवृत्त करता येईल, अशी यंत्रणा कंपनी उभी करीत आहे.

नवी दिल्ली - १ हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाच्या लिलावात पवन ऊर्जा क्षेत्रातील वीजेचा दर विक्रमी प्रमाणात घसरून प्रति युनिट ३.४६ रुपये झाला आहे. रेवा सोलार पार्कमधील सौर वीजेचा दर २.९७ रुपये प्रति युनिट झाला आहे. या सार्वकालिक कमी दर ठरला आहे. त्यापाठोपाठ आता पवन ऊर्जेच्या दरातही विक्रमी घसरण झाली आहे. देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा शुभशकून मानला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, मित्राह एनर्जी, ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी, आयनॉक्स विंड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, ओस्ट्रो कछ विंड आणि अदानी ग्रीन एनर्जी या पाच कंपन्यांनी १ हजार मेगावॅटच्या ब्लॉकसाठी ३.४६ रुपये प्रति युनिट दराच्या निविदा भरल्या आहेत.डेहरादून - उत्तराखंड विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यापूर्वीच मुख्यमंत्री हरीश रावत (काँग्रेस) यांचे सरकार वादात सापडले आहेत. ' क्रिकेटपटू विराट कोहलीची २०१५ साली उत्तराखंडच्या ब्रॅड अॅम्बॅसेडरपदी नियुक्ती झाली. त्यावेळी पर्यटन विभागाच्या ६० सेकंदांच्या जाहिरातीत काम केल्याबद्दल हरीश रावत सरकारने पूरग्रस्तांसाठी जमवण्यात आलेल्या निधीतून कोहलीला ४७.१९ लाख रुपये दिले होते' अशी माहिती आरटीआयच्या अहवालातून समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भाजपाचे सदस्य असलेल्या अजेंद्र अजय यांनी यासंबंधी याचिका दाखल करून प्रश्न विचारला होता. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरातूनच ही माहिती समोर आली आहे. मात्र कोहलीच्या एजंटने पैसे मिळाल्याचे वृत्त नाकारले आहे. सरकारतर्फे (आम्हाला) कोणतेही पैसे देण्यात आले नव्हते, असे त्याने स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री हरीश रावत यांचे मीडिया सल्लागार सुरेंद्र कुमार यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. ' पर्यटन क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतं. त्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्रांचे प्रमोशन करण्यासाठी, एखादा प्रसिद्ध चेहरा वापरला तर त्यात काय चुकलं'? असा सवाल त्यांनी विचारला. 'जे काही व्यवहार झाले ते कायदेशीररित्याच करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्व आरोप निराधार आहेत. केदारनाथचा विकास करणं हीच आमच्या सरकारची प्राथमिकता राहिली आहे, हे लोकांनाही माहीत आहे. भाजपाला निवडणुकीत आपला पराभव होताना दिसत असल्यानेच ते नैराश्यातून असे आरोप करताना दिसत आहेत' अशा शब्दांत कुमार यांनी भाजपाचे आरोप फेटाळून लावत त्यांना फटकारले. 

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कन्सास शहरात बुधवारी रात्री एका भारतीय तरुणाची वर्णविद्वेषातून निर्घृण हत्या झाली. श्रीनिवास कुचीभोतला (३२) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनली आहेत.गार्मिन या कंपनीच्या मुख्यालयात जीपीएस निर्माता म्हणून काम करणारा अभियंता श्रीनिवास त्याचा सहकारी आलोक मदासानी याच्याबरोबर ओलेद येथील ऑस्टिन्स बार अ‍ॅण्ड ग्रील या बारमध्ये फुटबॉलचा सामना पाहात होते. त्याच बारमध्ये अ‍ॅडम पुरिन्टन (५१) हा अमेरिकी नौदलातून निवृत्त झालेला सैनिकही बसला होता. अ‍ॅडमने श्रीनिवास आणि आलोक यांच्याशी वाद उकरून काढला. वादादरम्यान त्याने श्रीनिवास आणि आलोक यांना उद्देशून ‘तुम्ही दहशतवादी आहात. माझ्या देशातून चालते व्हा’, असे ओरडून सांगितले. तसेच ‘तुम्ही आमच्या देशात काय करत आहात’, अशी विचारणा करत दोघांवर चाल केली. मात्र बारमधील इतरांनी अ‍ॅडमला अडवले. त्यानंतर अ‍ॅडम तेथून बाहेर पडला व थोडय़ा वेळाने बंदूक घेऊन पुन्हा बारमध्ये आला. त्याने श्रीनिवास आणि आलोकवर अचानक गोळीबार सुरू केला. त्यात श्रीनिवास आणि आलोक जखमी झाले. उभयताना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्रीनिवासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आलोकची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. वर्णविद्वेषातून हा हल्ला झाला किंवा कसे, याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. एफबीआयनेही तपासात सहभाग घेतला असून वर्णविद्वेषातून ही घटना घडली असावी, असे म्हणणे घाईचे ठरेल, असे एफबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुरिन्टन याला गुरुवारी सकाळी पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील आपल्यावर टीका करणारी सर्व प्रसारमाध्यमे खोटय़ा बातम्या देत असतात असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करीत असले, तरी त्यांचा हा दावा अमेरिकी नागरिकांना फारसा पटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे ट्रम्प ज्या सीएनएन वाहिनीवर सातत्याने हल्ला करीत आहेत त्या वाहिनीच्या प्रेक्षकसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले असून, दुसरीकडे ‘गॅलप पोल’ या अमेरिकेतील सुप्रतिष्ठित सर्वेक्षण संस्थेने केलेल्या पाहणीनुसार ६८ टक्के नागरिकांना ट्रम्प हेच अप्रामाणिक असल्याचे वाटत आहे.‘गॅलप’च्या संकेतस्थळानुसार, या संस्थेने १ ते ५ फेब्रुवारी या काळात केलेल्या या पाहणीनुसार ट्रम्प यांची लोकमान्यता घसरून ४२ टक्क्यांवर आली आहे. ट्रम्प हे प्रामाणिक आणि विश्वासार्ह नेते आहेत काय, या प्रश्नावर ६८ टक्के नागरिकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पाठिराख्यांतील ८१ टक्के लोकांना मात्र ते प्रामाणिक आणि विश्वासार्ह वाटतात, तर १९ टक्के रिपब्लिकनांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये हेच प्रमाण तब्बल ९१ टक्के आहे.

‘फॉक्स न्यूज’ या ट्रम्पसमर्थक वृत्तवाहिनीने गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध केलेल्या पाहणीचा निष्कर्ष मात्र याहून वेगळा आहे. त्यात ट्रम्प आणि त्यांचे ‘व्हाइट हाऊस’ प्रशासन हे माध्यमांहून अधिक सत्यतावादी असल्याचे ४५ टक्के नागरिकांचे मत असल्याचे दिसून आले असून, ४२ टक्के नागरिकांना ट्रम्प यांच्याहून ‘व्हाइट हाऊस’चे वार्ताकन करणारे पत्रकार अधिक विश्वासार्ह वाटत आहेत.


दरम्यान, ट्रम्प हे सातत्याने ज्या वृत्तवाहिनीला टीका-आरोपांचे लक्ष्य करीत आहेत, त्या सीएनएन या वाहिनीचा प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचे ‘फोर्बस्’ मासिकाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याच कालावधीत ‘सीएनएन’च्या २५ ते ५४ या वयोगटांतील प्रेक्षकसंख्येत तब्बल ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकीय नाट्यात शुक्रवारी नव्या अंकाची भर पडली. जयललिता यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांचे भाचे दीपक जयकुमार यांनी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची बाजू घेत सरचिटणीस शशिकला यांना जाहीर विरोध केला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शशिकला यांच्या गटाचे जाणारे जयकुमार यांनी ही भूमिका घेतल्याने शशिकला यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. न्यायालयाने जयललिता यांना भरण्यास सांगितलेला शंभर कोटी रुपयांचा दंड भरण्याची तयारीही दीपक जयकुमार यांनी दर्शविली आहे. तर, पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे नेतृत्व द्यायला हवे, असेही ते म्हणाले. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार या सुरुवातीपासून शशिकला यांच्या विरोधात आणि पनीरसेल्वम यांच्या बाजूने उभ्या आहेत. दीपक जयकुमार म्हणाले की, दिनकरन यांची पक्षाच्या उप महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पण, ते या पदासाठी पात्र नाहीत. दिनकरन यांना जयललिता यांनी खासदार केले होते. पण, नंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. २०११ मध्ये जयललिता यांनी १४ जणांना पक्षातून काढून टाकले होते. नंतर शशिकला यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर २०१२ मध्ये फक्त शशिकला यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. मात्र तुरुंगात जाण्याआधी १५ फेब्रुवारी रोजी शशिकला यांनी दिनकरन यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे. दिनकरन हे शशिकला यांचे नातेवाईक आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पी. पनीरसेल्वम, ई. मधुसूदनन आणि सी. पोन्नायन यांच्यासारख्या नेत्यांची पक्षाला गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की, पनीरसेल्वम यांना दिनकरन यांचे पद (उप महासचिव) दिले जावे. अण्णाद्रमुक पक्ष एका कुटुंबाच्या हातात गेला आहे. जयललिता यांनी ज्यांना पोएस गार्डनमधून बाहेर काढले होते त्यांच्याकडून पक्ष परत आणू. हे धर्मयुद्ध आहे. यात न्यायाचा विजय होईल, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी नाव न घेता शशिकला यांना पुन्हा लक्ष्य केले.

भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचा हात असल्याचा आरोप म्हात्रे यांची आई यमुनाबाई यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करणारे आरोपी जोपर्यंत पकडले जात नाहीत तोवर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.म्हात्रे यांची हत्या अमानुषपणे झाली. तिचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांच्या घराजवळ हत्या होते ते पाहता या सरकारच्या काळात गुंडांचे धाडस किती वाढले आहे ते दिसते, असा आरोप राणे यांनी केला.म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी राणे शुक्रवारी अंजूरफाटा येथील त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी म्हात्रे यांची पत्नी वैशाली व मुलगी हर्षाली यांच्यासोबत एकांतात चर्चा केली आणि घटनेची माहिती घेतली.म्हात्रे यांची आई यमुनाबाई यांची त्यांनी भेट घेतली तेव्हा खासदार कपील पाटील यांचा या हत्येत हात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे सांत्वन करीत राणे यांनी आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी करीत त्यांनी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्याकडून तपासाबाबत तपशील घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नसल्याचा आरोप केला.गुंडांना राजकीय आशीर्वाद असल्याने घराजवळ हत्या करण्याचे धाडस केल्याचे सांगत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. आता म्हात्रे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.मनोज म्हात्रे यांची अमानुषपणे झालेली हत्या पाहून मन हेलावले. मुख्यमंत्र्यांकडे असलेले गृहखाते निष्क्रिय झाले आहे. त्यांनी गुंडांना पक्षांत प्रवेश देऊन पदे देण्यास सुरुवात केल्याने पोलीस काम कसे करतील? त्यामुळेच हत्येला ११ दिवस उलटूनही आरोपींना पोलीस पकडू शकले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.या वेळी राणेंसोबत माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार योगेश पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रदीप (पप्पू) रांका, तारीक फारूकी, राकेश पाटील, बाळकृष्ण पूर्णेकर, नगरसेवक इम्रान खान, मधुकर जगताप, शहराध्यक्ष शोएब खान, शहर सचिव ताज खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा आणि साई पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत या नव्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या शहरातील राजकीय अनिश्चितता संपुष्टात आली आहे. मात्र आजवर राजकीय वैर असलेले कलानी-ईदनानी यानिमित्ताने सत्तेसाठी एकत्र येणार आहेत.उल्हासनगरच्या विकासासाठी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे साई पक्षाचे प्रमुख जीवन ईदनानी यांनी सांगितले. मुख्यमंत्री, चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचा तपशील त्यांनी पुरवला. या सत्तेत कोणाचा किती वाटा असेल, महापौरपदाची विभागणी कशी असेल, अन्य समित्यांचे वाटप कसे होईल याचे सूत्र अजून ठरलेले नाही, असे ते म्हणाले.उल्हासनगरच्या ७८ सदस्यांपैकी ३२ जागांवर भाजपा-ओमी टीम, २५ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. साई पक्ष ११ जागांवर विजयी झाला होता. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने या त्रिशंकू स्थितीत शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील, अशी स्थिती होती. मात्र तोवर भाजपा आणि साई पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.साई पक्षाला शिवसेनेनेही पाठिंब्यासाठी गळ घातली होती. मात्र भाजपाने घाई करत त्या पक्षाला आपल्या गटात ओढून घेतले. एका एका छोट्या पक्षाची मोट बांधण्यापेक्षा भाजपाने आपले ३२ सदस्य, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा १ अशा ३४ सदस्यांसोबत साई पक्षाला घेतल्याने त्यांची सदस्यसंख्या ४५ वर गेली आहे.भाजपावर नाराज होऊन शिवसेनेसोबत गेलेल्या रिपब्लिकन पक्षाला चुचकारण्याचे प्रयत्नही भाजपाने केले होते. तोवर साई पक्षासोबतच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या.उल्हासनगरात ५ एप्रिलपूर्वी नव्या महापौरांची निवड होणे अपेक्षित असल्याने पुढील महिन्यात भाजपा-साई पक्षाची सत्ता अस्तित्वात येईल, असे मानले जाते.मुंबई - 'शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत 84 पेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. पण ते का झाले नाही याची कारणे तपासावी लागतील. मुंबईतील 12 लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून 'ठरवून' झाला काय?,' असा सवाल शिवसनेने उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचे 84, तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर कोणाचा होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर महापौर आमचाच होणार असे सांगत राजकीय परिस्थिती पाहून शिवसेनेने 'सामना'मधून भाजपवर शरसंधान केले आहे.

सेनेने म्हटले आहे की, 'मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व आणि मुसंडी महत्त्वाची आहे. जे झाले ते झाले, गंगेला मिळाले म्हणून वाहत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांतली शिवसेना नक्कीच नाही. महापालिका त्रिशंकू दिसत असली तरी मुंबईकरांचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने आहे.

काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत आला. आता ही ऊब भाजपला मिळत आहे. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामांची पर्वा आम्ही करीत नाही. लढाई सुरूच राहील. युद्धाला तोंड फुटले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आणि विचारांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच!

मुंबई - राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल शिवसेनेकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे यश निर्विवाद नसून भाजपकडून याबाबतची वस्तुस्थिती समोर आणली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप सेनेकडून करण्यात आला आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसणार, यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपकडून त्यांच्या यशाचा केला जाणारा गवगवा कितपत खरा आहे, अशी शंका सेनेकडून उपस्थित करण्यात आली आहे.जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दणका बसला, भाजपची संख्यात्मक वाढ झाली हे खरेच. मात्र, या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, असे सेनेने म्हटले आहे. राज्यातील दहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. यामध्ये मुंबई आणि ठाण्याचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी भाजपला लक्षणीय यश मिळाले आहे. केवळ शहरी भागातील म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून थेट गावापर्यंत जाऊन पोहोचल्याचे दिसून आले होते. जिल्हा परिषदेच्या एकूण १५०९ जागांपैकी तब्बल ४०६ तर २८३ पंचायत समितीच्या एकूण २९९० जागांपैकी ८३१ जागांवर कब्जा करीत भाजपने ग्रामीण राजकारणावरील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली. मात्र, भाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले ‘टक्के’ सांगितले जातात आणि बसलेले ‘टोणपे’ लपवले जातात इतकेच, असे सांगत सेनेने भाजपचे यश अपूर्ण असल्याचे सुचविले आहे. तसेच केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने भाजपला हा आकडा गाठता आला. विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि ‘मिसळलेला’ वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते, असा टोलाही सेनेने लगावला आहे.

नाशिक - जुने नाशिक परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बागवानपुरा, कथडा, कोकणीपुरा, चौकमंडई भागात राजकिय पक्षाचे दोन गट आमने-सामने आल्याने दंगलसदृश्य परिस्थीती निर्माण झाली होती. दगडफेक झाल्याने सुमारेच पाच चारचाकी वाहनांसह दुचाकींचे नुकसान झाले. समाजकंटकांनी वाहनांवर दगडफेक करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दंगलनियंत्रण पथकासह स्ट्रायकिंगच्या तुकड्यांना परिसरात पाचारण करत परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. अतिसंवेदनशील असलेल्या या परिसरात निवडणूकीमध्ये वाद-विवादाची शक्यता वर्तविली जात होती. निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी या भागात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला नव्हता यामुळे दगडफेकीची घटना घडल्याचे बोलले जात आहे. समाजकंटक घोषणाबाजी करत परिसरात दगड भिरकावीत असतानाही भद्रकाली पोलीस उशिरा घटनास्थळी पोहचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. परिसरात अघोषित संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

प्रभाग  आघाडी / विजेता  पक्ष मतं                                          पिछाडी / पराभूत  पक्ष   मतं
1. दहिसर (प)  तेजस्विनी घोसाळकर  शिवसेना                       
2. दहिसर (प)  जगदीश ओझा भाजपा                  
3. दहिसर (प)  बाळकृष्ण ब्रीद शिवसेना                       
4. दहिसर (प)  सुजाता पाटेकर शिवसेना                       
5. दहिसर (प)  संजय घाडी    शिवसेना                       
6. दहिसर (प)  हर्षद कारकर   शिवसेना                       
7. बोरिवली (प) शीतल म्हात्रे   शिवसेना                       
8. बोरिवली (प) हरीश छेडा    भाजपा                  
9. बोरिवली (प) श्वेता कोरगावकर     काँग्रेस                  
10. बोरिवली (प)      जितेंद्र पटेल   भाजपा                  
11. बोरिवली (प)      रिद्धी खुरसंगे   शिवसेना                       
12. बोरिवली (प)      गीता सिंगण   शिवसेना                       
13. बोरिवली (प)      विद्यार्थी सिंग भाजपा                  
14. बोरिवली (प)      आसावरी पाटील      भाजपा                  
15. बोरिवली (प)      प्रवीण शहा    भाजपा                  
16. बोरिवली (प)      अंजली खेडकर भाजपा                  
17. बोरिवली (प)      बीना दोशी    भाजपा                  
18. बोरिवली (प)      संध्या दोशी   शिवसेना                       
19. कांदिवली (प)     शुभदा गुढेकर  शिवसेना                       
20. कांदिवली (प)     बाळा तावडे    भाजपा                  
21. कांदिवली (प)     शैलजा गिरकर भाजपा                  
22. कांदिवली (प)     प्रियांका मोरे   भाजपा                  
23. कांदिवली (प)     शिवकुमार झा  भाजपा                  
24. कांदिवली (प)     सुनिता यादव  भाजपा                  
25. कांदिवली (प)     माधुरी भोईर   शिवसेना                       
26. कांदिवली (प)     प्रितम पंडागळे भाजपा                  
27. कांदिवली (प)     सुरेखा पाटील  भाजपा                  
28. कांदिवली (प)     राजपती यादव काँग्रेस                  
29. कांदिवली (प)     सागर सिंह    भाजपा                  
30. कांदिवली (प)     लीना देहरकर  भाजपा                  
31. कांदिवली (प)     कमलेश यादव भाजपा                  
32. मालाड (प) स्टेफी किन्नी  काँग्रेस                  
33. मालाड (प) वीरेंद्र चौधरी   काँग्रेस                  
34. मालाड (प) कमरजहाँ सिद्दीकी     काँग्रेस                  
35. मालाड (प) सेजल देसाई   भाजपा                  
36. मालाड (प) दक्षा पटेल    भाजपा                  
37. मालाड (प) प्रतिभा शिंदे   भाजपा                  
38. मालाड (प) आत्माराम चाचे शिवसेना                       
39. मालाड (प) विनया सावंत  शिवसेना                       
40. मालाड (प) सुहास वाडकर  शिवसेना                       
41. मालाड (प) तुळशीराम शिंदे अपक्ष                   
42. मालाड (प) धनश्री भराडकर राष्ट्रवादी                      
43. मालाड (प) विनोद मिश्रा   भाजपा                  
44. मालाड (प) संगीत शर्मा   भाजपा                  
45. मालाड (प) राम बारोट    भाजपा                  
46. मालाड (प) योगिता कोळी  भाजपा                  
47. मालाड (प) जयासतनाम सिंग     भाजपा                  
48. मालाड (प) सलमा अलमेलकर    काँग्रेस                  
49. मालाड (प) संगिता सुतार  शिवसेना                       
50. गोरेगाव (प) दीपक ठाकूर   भाजपा                  
51. गोरेगाव (प) स्वप्निल टेम्बलकर    शिवसेना              विनोद शेलार  भाजपा
52. गोरेगाव (प) प्रीती साटम   भाजपा                  
53. गोरेगाव (प) रेखा रामवंशी  शिवसेना                       
54. गोरेगाव (प) साधना माने   शिवसेना                       
55. गोरेगाव (प) हर्ष भार्गव     भाजपा                  
56. गोरेगाव (प) राजुल देसाई   भाजपा                  
57. गोरेगाव (प) श्रीकला पिल्ले  भाजपा                  
58. गोरेगाव (प) संदीप पटेल   भाजपा                  
59. अंधेरी (प)  प्रतिमा खोपडे  शिवसेना                       
60. अंधेरी (प)  योगराज दाभोळकर    भाजपा                यशोधर फणसे शिवसेना     
61. अंधेरी (प)  राजूल पटेल   शिवसेना                       
62. अंधेरी (प)                               
63. अंधेरी (प)  रंजना पाटील  भाजपा                  
64. अंधेरी (प)  शाहिदा खान   शिवसेना                       
65. अंधेरी (प)  अल्पा जाधव  काँग्रेस                  
66. अंधेरी (प)                               
67. अंधेरी (प)  सुधा सिंग     भाजपा                  
68. अंधेरी (प)  रोहन राठोड   भाजपा                  
69. अंधेरी (प)  रेणू हंसराज   भाजपा                  
70. अंधेरी (प)  सुनिता मेहता  भाजपा                  
71. अंधेरी (प)  अनिश मकवाने भाजपा                  
72. अंधेरी (पू)                               
73. अंधेरी (पू)                               
74. अंधेरी (पू)                               
75. अंधेरी (पू)  प्रियांका सावंत शिवसेना                       
76. अंधेरी (पू)  केशरबेन पटेल भाजपा                  
77. अंधेरी (पू)                               
78. अंधेरी (पू)  नाझीबानू सोफिया     राष्ट्रवादी                      
79. अंधेरी (पू)                               
80. अंधेरी (पू)  सुनील यादव   भाजपा                  
81. अंधेरी (पू)  मुरजी पटेल   भाजपा                  
82. अंधेरी (पू)                               
83. अंधेरी (पू)  विन्नी डिसोजा काँग्रेस                  
84. अंधेरी (पू)  अभिजीत सामंत      भाजपा                  
85. अंधेरी (पू)  ज्योती अळवणी भाजपा                  
86. अंधेरी (पू)  सुषमा राय    काँग्रेस                  
87. सांताक्रूज (पू)     विश्वनाथ महाडेश्वर   शिवसेना            कृष्णा पारकर  भाजपा
88. सांताक्रूज (पू)     सदानंद परब   शिवसेना                       
89. सांताक्रूज (पू)     दिनेश कुबल   शिवसेना                       
90. सांताक्रूज (पू)     तुलिप मिरिडा  शिवसेना                       
91. सांताक्रूज (पू)     सगुण नाईक   शिवसेना                       
92. सांताक्रूज (पू)     गुलनाज कुरेशी एमआयएम                     
93. सांताक्रूज (पू)     रोहिणी कांबळे शिवसेना                       
94. सांताक्रूज (पू)     प्रज्ञा भूतकर   शिवसेना                       
95. सांताक्रूज (पू)     शेखर वायंगणकर     शिवसेना                       
96. सांताक्रूज (पू)     हाजी मोहम्मद हालिम शिवसेना                       
97. बांद्रा (प)   हेतल गाला    भाजपा                  
98. बांद्रा (प)   अलका केरकर भाजपा                  
99. बांद्रा (प)   संजय अगलदरे शिवसेना                       
100. बांद्रा (प)  स्वप्ना म्हात्रे  भाजपा                  
101. बांद्रा (प)  असीफ झकारिया     काँग्रेस                  
102. बांद्रा (प)  मुमताज खान  अपक्ष                   
103. मुलुंड (प) मनोज कोटक  भाजपा                  
104. मुलुंड (प) प्रकाश गंगाधरे भाजपा                  
105. मुलुंड (प) कल्पना केणी  भाजपा                  
106. मुलुंड (प) प्रभाकर शिंदे   भाजपा                  
107. मुलुंड (प) समिता कांबले भाजपा                  
108. मुलुंड (प) नील किरीट सोमय्या  भाजपा                  
109. भांडुप (प) दीपाली गोसावी शिवसेना                       
110. भांडुप (प) आशा कोपरकर काँग्रेस                  
111. भांडुप (प) सारिका पवार  भाजपा                      भारती पिसाळ राष्ट्रवादी    
112. भांडुप (प) साक्षी दळवी   भाजपा                  
113. भांडुप (प) दीपमाला बढे  शिवसेना                       
114. भांडुप (प) रमेश कोरगावकर     शिवसेना                       
115. भांडुप (प) उमेश माने    शिवसेना                       
116. भांडुप (प) प्रमिला पाटील काँग्रेस                  
117. भांडुप (प) सुवर्णा करंजे   शिवसेना                       
118. भांडुप (प) उपेंद्र सावंत   शिवसेना                      मंगेश सांगळे  भाजपा
119. भांडुप (प) मनिषा राहटे   राष्ट्रवादी                      
120. भांडुप (प) राजराजेश्वरी रेडकरी   शिवसेना                       
121. भांडुप (प) चंद्रावती मोरे  शिवसेना                       
122. भांडुप (प) वैशाली पाटील  भाजपा                  
123. घाटकोपर (पू)    स्नेहल मोरे    अपक्ष                   
124. घाटकोपर (पू)    ज्योती खान   राष्ट्रवादी                      
125. घाटकोपर (पू)    रुपाली आवळे  शिवसेना                       
126. घाटकोपर (पू)    अर्चना भालेराव मनसे                   
127. घाटकोपर (पू)    तुकाराम पाटील शिवसेना               रितू तावडे    भाजपा
128. घाटकोपर (पू)    अश्विनी हांडे   शिवसेना                       
129. घाटकोपर (पू)                                 
130. घाटकोपर (पू)    बिंदू त्रिवेदी    भाजपा                  
131. घाटकोपर (पू)    राखी जाधव   राष्ट्रवादी                      
132. घाटकोपर (पू)    पराग शाह    भाजपा                  
133. घाटकोपर (पू)                                 
134. गोवंडी    सायरा खान   सपा                    
135. गोवंडी    समीक्षा सक्रे   शिवसेना                       
136. गोवंडी    रुक्साना सिद्दीकी      सपा                    
137. गोवंडी    आयेशा शेख   सपा                    
138. गोवंडी    आयेशा खान   सपा                    
139. गोवंडी    अब्दुल कुरेशी  सपा                    
140. गोवंडी    नादिया शेख   राष्ट्रवादी                      
141. गोवंडी    विठ्ठल लोकरे   काँग्रेस                  
142. गोवंडी    वैशाली शेवाळे  शिवसेना                       
143. गोवंडी    ऋतुजा तारी   शिवसेना                       
144. गोवंडी    अनिता पांचाळ भाजपा                      कामिनी शेवाळे शिवसेना     
145. गोवंडी                                 
146. गोवंडी                                 
147. गोवंडी                                 
148. गोवंडी                                 
149. चेंबूर                                  
150. चेंबूर                                  
151. चेंबूर     राजेश फुलवारीया     भाजपा                  
152. चेंबूर                                  
153. चेंबूर                                  
154. चेंबूर     महादेव शिगवण      भाजपा                  
155. चेंबूर                                  
156. कुर्ला (प)  अश्विनी माटेकर      मनसे                   
157. कुर्ला (प)  आकांक्षा शेट्ये शिवसेना                   रेश्मा चौघुले   भाजपा
158. कुर्ला (प)  चित्रा सांगळे   शिवसेना                       
159. कुर्ला (प)  प्रकाश मोरे    भाजपा                  
160. कुर्ला (प)  किरण लांडगे  अपक्ष                   
161. कुर्ला (प)  विजयेंद्र शिंदे  शिवसेना                       
162. कुर्ला (प)  वाजिद कुरेशी  काँग्रेस                  
163. कुर्ला (प)  दिलीप लांडे   मनसे                   
164. कुर्ला (प)  हरीश भांदिगे  भाजपा                  
165. कुर्ला (प)  अश्रफ आझमी काँग्रेस                  
166. कुर्ला (प)  संजत तुर्डे     मनसे                   
167. कुर्ला (प)                               
168. कुर्ला (प)  सईदा खान    राष्ट्रवादी             अनुराधा पेडणेकर     शिवसेना     
169. कुर्ला (प)                               
170. कुर्ला (प)  अब्दुल मलिक राष्ट्रवादी                      
171. कुर्ला (प)  सानवी तांडेल  शिवसेना                       
172. माटुंगा (पू)                             
173. माटुंगा (पू)                             
174. माटुंगा (पू)                             
175. माटुंगा (पू)                             
176. माटुंगा (पू)                             
177. माटुंगा (पू)                             
178. माटुंगा (पू)                             
179. माटुंगा (पू)                             
180. माटुंगा (पू)                             
181. माटुंगा (पू)                             
182. दादर (प)  मिलिंद वैद्य  शिवसेना                       
183. दादर (प)  गंगामाने      काँग्रेस                  
184. दादर (प)  बाबू खान     काँग्रेस                  
185. दादर (प)  जगदीश शैईवालापिल  शिवसेना                       
186. दादर (प)  वसंत नकाशे   शिवसेना                       
187. दादर (प)  मरिअम्मल थेवर     शिवसेना                       
188. दादर (प)  शेहनाजबानो शेख     शिवसेना                       
189. दादर (प)  हर्षला मोरे    मनसे                   
190. दादर (प)  शीतल गंभीर   भाजपा                  
191. दादर (प)  विशाखा राऊत शिवसेना                    स्वप्ना देशपांडे मनसे 
192. दादर (प)  प्रीती पाटणकर शिवसेना                       
193. दादर (प)  हेमांगी वरळीकर      शिवसेना                       
194. ना.म.जोशी मार्ग  समाधान सरवणकर   शिवसेना                       
195. ना.म.जोशी मार्ग  संतोष खरात         शिवसेना                       
196. ना.म.जोशी मार्ग  आशिष चेंबुरकर      शिवसेना                       
197. ना.म.जोशी मार्ग  दत्ताराम नरवणकर   मनसे                   
198. ना.म.जोशी मार्ग                               
199. ना.म.जोशी मार्ग  किशोरी पेडणेकर    शिवसेना                       
200. परळ     उर्मिला पांचाळ शिवसेना                       
201. परळ     सुप्रिया मोरे   काँग्रेस                  
202. परळ     श्रद्धा जाधव   शिवसेना                       
203. परळ     सिंधू मसुरकर  शिवसेना                       
204. परळ     अनिल कोकीळ शिवसेना                       
205. परळ     दत्ता पोंगडे   शिवसेना                       
206. परळ     सचिन पडवळ  शिवसेना                       
207. भायखळा (प)    सुरेखा लोखंड  भाजपा                  
208. भायखळा (प)    रमाकांत रहाटे  शिवसेना                       
209. भायखळा (प)    यशवंत जाधव  शिवसेना                       
210. भायखळा (प)    सोनम जामसुतकर    काँग्रेस           यामिनी जाधव शिवसेना     
211. भायखळा (प)    रईस शेख     सपा                    
212. भायखळा (प)    गीता गवळी   अभासे                  
213. भायखळा (प)    जावेद जुनेजा  काँग्रेस                  
214. नाना चौक                              
215. नाना चौक अरुंधती दुधवडकर    शिवसेना                       
216. नाना चौक                              
217. नाना चौक                              
218. नाना चौक                              
219. नाना चौक                              
220. चंदनवाडी  अतुल शाह    भाजपा                      सुरेंद्र बागुलकर शिवसेना     
221. चंदनवाडी                               
222. चंदनवाडी                               
223. बाबुल टॅंक क्रास लेन     उकार उनिसा अन्सारी एमआयएम                     
224. बाबुल टॅंक क्रास लेन     आफरीन शेख  काँग्रेस                  
225. शहीद भगतसिंग मार्ग    सुजाता सानप  शिवसेना                       
226. शहीद भगतसिंग मार्ग    हर्षिता नार्वेकर भाजपा                  
227. शहीद भगतसिंग मार्ग    मकरंद नार्वेकर भाजपा       

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget