March 2017

मुंबई - मेट्रोच्या खोदकामावेळी बुधवारी महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्यानंतर कंपनीने दुरुस्तीसाठी गॅस पुरवठा खंडीत केल्याने घरगुती गॅस तसेच सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या १८ पंपांवरील गॅस पुरवठा खंडीत ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये गुरुवारीही स्वयंपाकाचे गॅस बंद राहिले. तर गुरुवारी १० टक्के रिक्षा आणि कारचालकांना सीएनजी न मिळाल्याने अनेकांना गाड्या उभ्याच ठेवाव्या लागल्या.
गॅस पाइपलाइन फुटल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून गॅसचा पुरवठाच खंडित करण्यात आला. त्यामुळे कांदिवली ते भाईंदर या पट्ट्यातील हजारो गॅसग्राहकांचे प्रचंड हाल झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गॅसपुरवठा बंदच होता. त्या भागात स्वयंपाकासाठी महानगर गॅसशिवाय पर्याय नाही. अशा आणीबाणीच्या वेळी महानगर गॅसने काही तरी पर्यायी सोय करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया भाईंदर येथील अर्चना गुजर या ग्राहकाने दिली. या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी उशिरापर्यंत सुरू होते. लवकरात लवकर गॅसपुरवठा सुरळीत होईल, असे महानगर गॅसच्या प्रवक्त्याने सांगितले.

भुवनेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओडिशा दौऱ्यालाविरोध करत नक्षलवाद्यांनी तेथील डोइकल्लु रेल्वे स्टेशनवर आज पहाटे सशस्त्र हल्ला केला. ३० हून अधिक नक्षलवाद्यांनी रेल्वे स्टेशनची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. नक्षलवाद्यांनी हल्ल्यावेळी दोन स्फोटही घडवले. जाताना त्यांनी रेल्वेचे दोन वॉकी टॉकी पळवून नेले.मुंबई - जातपडताळणी समितीच्या उपाध्यक्षांना "न्यायमूर्ती' हा दर्जा लागू होत नाही. त्यामुळे त्यांनी तसे वागू नये, अशी तंबी गुरुवारी उच्च न्यायालयाने श्रीनिवास कर्वे यांना दिली.जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष श्रीनिवास कर्वे यांनी लोकप्रतिनिधींचा अनादर केल्याप्रकरणी महाधिवक्‍त्यांनी उत्तर सादर करावे, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले.कर्वे यांच्याविरोधातील अवमान याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झाली. आमदार पांडुरंग फुंडकर यांनी कर्वे यांना दूरध्वनी करून जातपडताळणीची किती प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी विचारणा केली होती. यशोमती ठाकूर यांच्या दूरध्वनीलाही कर्वे यांनी उत्तर दिले नव्हते. कर्वे यांच्या अशा प्रकारच्या वर्तनाबाबत विधिमंडळांची भूमिका काय आहे, याबाबतची माहिती महाधिवक्‍त्यांनी न्यायालयात उपस्थित राहून द्यावी, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

विधिमंडळाच्या जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष असलेल्या फुंडकर आणि ठाकूर यांना माहिती देण्यास कर्वे यांनी नकार दिला होता. तसेच मला विचारणारे तुम्ही कोण? मी न्यायाधीश आहे, अशी उत्तरे कर्वे यांनी दिली होती. सरकारी कर्मचारी असलेल्या कर्वे यांना ते जातपडताळणी समितीचे उपाध्यक्ष असल्याने न्यायाधीकरणाचे अधिकार आहेत; मात्र ही नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या आदेशाने झालेली नसल्याने त्यांना न्यायमूर्तीपदाचा दर्जा लागू होत नाही; तसेच ज्युडिशिएल प्रोटेक्‍शन ऍक्‍टखाली त्यांच्याविरोधात अवमान नोटीस बजावता येत नसल्याने, विधिमंडळाने त्यांच्या या कृत्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. कर्वे यांना विधिमंडळ समितीनेही ब्रीच ऑफ नोटीस (कायदेभंग) बजावली. लोकप्रतिनिधींचा आदर सरकारी कर्मचाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे, असे त्यात नमूद केले होते. याप्रकरणी झालेल्या शिक्षेला कर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मुंढे यांच्या बदलीनंतर रबाळे, गोठवली आणि एरोली येथील अनधिकृत इमारतींच्या कामाला सुरुवात

नवी मुंबई - नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होताच त्यांच्या काळात कारवाई करण्यात आलेल्या रबाळे, गोठवली, आणि ऐरोली येथील काही बेकायदा इमारतींच्या फेरबांधणीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन आयुक्त रामास्वामी यांच्या काळात बेकायदेशीर बांधकामांचा भस्मासूर पुन्हा उभा राहणार का अशी भीती निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात फार मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे आहेत. दिघा येथील ९९ बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील ग्रामीण भागात फिफ्टी फिफ्टी या तत्त्वावर काही ग्रामस्थांच्या पूर्वजांच्या निवासस्थानावर इमारती उभारल्या जात आहेत तर काही घरे ही गावाजवळील सिडकोला विकण्यात आलेल्या मोकळ्या जमिनीवर बांधण्यात आलेली आहेत. डिसेंबर २०१५ पूर्वीची सर्व बेकायदेशीर बांधकामे कायम करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करीत असून तसे धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी ते न्यायालयाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले होते. ते न्यायालयाने फेटाळून लावल्याने नवी मुंबईतील डिसेंबर २०१५ पर्यंतच्या बेकायेदशीर बांधकामांवर टांगती तलवार आहे. मुंढे यांनी डिसेंबर २०१५ नंतरच्या व सुरू असलेल्या बेकायेदशीर बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे आदेश अनधिकृत बांधकामविरोधी पथकाला दिले होते.त्यामुळे केवळ मुंढे यांच्या काळात छोटय़ा-मोठय़ा साडेतीन हजार बेकायेदशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. यात काही धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मात्र मुंढे यांची बदली होताच कारवाई करण्यात आलेल्या काही बेकायदा इमारतींच्या पुनर्बाधणीला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील रबाले, ऐरोली व गोठवली या अतिबेकायेदशीर भागात ही पुनर्बाधणी शनिवार-रविवारपासून करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंढे यांच्या बदलीचे आदेश जारी झाले होते.

मुंढे यांची बदली फटाके वाजवून साजरी

मुंढे यांच्या बदलीने ग्रामीण भागात आनंद व्यक्त केला गेला तर काही अतिउत्साही प्रकल्पग्रस्तांनी फटाकडय़ा वाजवून त्याची छायाचित्र सोशल मिडियावर प्रसारित केल्याचे दिसून येत होते. मुंढे आणि रामास्वामी हे दोन्ही अधिकारी कार्यक्षम असले तरी मुंढे जहाळ तर रामास्वामी मवाळ स्वभावाचे असल्याने मुंढे यांच्या काळात सुरु झालेली बेकायदेशीर बांधकामांवर वरील कारवाई पुढे अशीच सुरु राहिल का याबाबत शंका उपस्थित केली जात असून गेली पंधरा दिवस ही कारवाई स्थगित असल्याचे चित्र आहे. त्यात मुंढे यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करताना बेधडक कारवाई करण्यात आघाडीवर असलेले प्रभार उपायुक्त डॉ. कैलाश गायकवाड यांना मुंढे यांच्या काळातच हटविण्यात आल्याने ह्य़ा कारवाईला सध्या कोणी वाली नसल्याचे दिसून येते. गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात पालिका आयुक्तांची भूमिका सरकारी वकिलांच्या वतीने स्पष्ट केल्याने त्यांना अनधिकृत बांधकाम विभागातून बाजूला करण्यात आले होते.मुंबई - ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिल्पा शिंदेने इंडियन फिल्म्स अॅण्ड टिव्ही प्रोड्यूसर्स काउंसिलविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शिल्पाने केलेल्या तक्रारीमध्ये इंडियन फिल्म अॅण्ड टिव्ही प्रोड्यूसर कौन्सिलचे (आयएफटीपीसी) अध्यक्ष हॅरी बावेजा, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष दिलीप पीठवा आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत सिंग यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून ‘अंगुरी भाभी’ म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेला टेलिव्हिजन विश्वातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्याची भूमिका ‘सिन्टा’ने (सिने अँडी टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) घेतली होती. निर्मात्यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिसीला उत्तर दिले असताना कोणताही अधिकार नसताना संघटनांनी काम करण्यावर बंदी घातल्याचे शिल्पाने म्हटले आहे.
‘भाभी जी घर पे है’ या मालिकेतून पूर्वसूचना न देता काम थांबवणाऱ्या शिल्पा शिंदेच्या विरोधात निर्मात्यांनी ‘सिन्टा’कडे तक्रार केली होती. या संदर्भात वारंवार नोटीस देऊनही तिने काहीही उत्तर न दिल्याने तिच्यावर कायमची बंदी घालावी, असा निर्णय संघटनेने घेतला होता. त्यामुळे टेलिव्हिजन विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कलाकाराला अशा प्रकारच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. निर्मात्यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्याला मी उत्तर दिले आहे. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असल्याने ‘सिन्टा’ला या प्रकरणात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. अशी बाजू यापूर्वी शिल्पाने मांडली होती.मुंबई - बेस्टला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबल्याचा आरोप होत आहे. बेस्ट आता 50 बसेस भाड्याने घेऊन त्या वापरणार आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार असून तसा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या चालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता आहे. महापालिका भविष्यात कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आऊटसोर्सिंगचा मार्ग स्वीकारणार असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी अर्थसंकल्पात केले असतानाच बेस्टच्या या प्रस्तावामुळे त्याची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.
मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत झाला नाही. पैशांअभावी बेस्टवर ही नामुष्की ओढवली आहे. पुढील महिन्यातही पगार वेळेवर होईल याची खात्री नाही. त्यातच पालिकाही कोणतीही ठोस मदत करण्यास अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे बस विकत घेण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा खासगी बसेस भाड्याने घेण्याचा पर्याय बेस्ट प्रशासनाने स्वीकारला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून बेस्टने 50 बस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्यात पाच हजार किलोमीटरप्रमाणे बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार आहेत. प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन या कंपनीकडून या एकमजली बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. या बससाठी कंपनीचा चालक असेल; तर बेस्टचा वाहक असेल. एवढेच नाही, तर बसची रंगसंगती बेस्ट बसप्रमाणे असल्यामुळे खासगी बस व बेस्ट बसमधील फरक समजणार नाही.

चालक खासगी कंपनीचा असल्याने भविष्यात चालकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्‍यता आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी भविष्यात आऊटसोर्सिंगवर भर देण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात केले आहे. त्याचा पहिला टप्पा बेस्टपासून सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.वसई - वसई विरारच्या पाणी टंचाईवर मात करणाऱ्या सूर्या टप्पा तीनचे काम अंतिम टप्यात असून एप्रिलपासून दररोज शंभर एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा सुुरु होईल अशी ग्वाही महापालिकेने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना विविध अडथळयांची शर्यत पार करीत अंतिम टप्यात पोहचली असतांनाच ७० मीटर लांबीच्या दगडाचा अडसर काही दिवसात दूर झाल्यानंतर वसई विरारसह ६९ गावांना पाणी पुरवठा होणार आहे.
सध्या वसई विरार शहराला उसगाव, पेल्हार, पापडखिंड आणि सूर्यातून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता वसई विरारला आणखी ९२ एमएमलडी पाण्याची गरज आहे. ती गरज भागवण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सूर्या टप्पा तीन योजनेतून शंभर एमएलडी पाणी पुरवठा योजना मंजुरी करून घेतली होती. नगरोत्थान योजनेतून या योजनेला मंजुरी ंिमळाली असून त्यासाठी २९६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील १३० कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या कामाला २०१४ रोजी सुरुवात करण्यात आली होती. १ मार्च २०१५ पर्यंत योजना पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरु होणार होता. मात्र, त्यात अनेक अडथळे आल्याने ही योजना दोन वर्षे रखडून पडली होती.
सुरुवातीली वनखात्याने हरकत घेतल्याने योजनेचे काम सुरु होऊ शकले नाही. वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जलवाहिन्या जाणार असल्याने आणि त्यावर ११०० झाडे असल्याने आक्षेप घेतला होता. या मोबदल्यात महापालिकेने वनखात्याला पोलादपूर येथे पर्यायी जागा दिली होती. पण, संपूर्ण जागा नावावर झाल्याशिवाय झाडे कापणार नाही अशी भूमिका वनखात्याने त्यानंतर घेतली होती.
झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये जमाही केले होते. पण, अवघा ४० गुंठ्याचा सातबारा नावावर न झाल्याने वनखात्याने खोडा घातला होता. महसूलचा सर्व्हर डाऊन झाल्याने सातबारा नावावर होण्यास विलंब झाला होता. तो नावावर झाल्यानंतर वनखात्याचा अडसर दूर झाला होता.
मध्यंतरी वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर हरित लवादाने आक्षेप घेतला होता. काही क्षेत्र संरक्षित वनांतर्गत राखीव असल्याने शोभा फडणवीस यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. फडणवीस आणि हरित लवादाचा अडसर दूर करण्यासाठी काही महिने वाया गेले होते. हे अडथळे पार करीत योजना पुढे सरकली आहे. आता काही दिवसांचा कालावधी राहिला असतांनाचा ७० मीटरच्या दगडाने खोडा घातला आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर वरई येथे बोगदा खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुुरु असताना त्याठिकाणी ७० मीटरचा दगड लागला आहे. या दगडातून बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अत्याधुनिक बोगदा तयार करून त्यातून पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील ही माहिती बविआचे नेते जीतूभाई शहा यांनी दिली.पालघर - अनेक गंभीर प्रश्ना विरोधात भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी काही मोर्चेकऱ्यांनी हातगाडीवाले, वडापाववाले यांची लूट करून सामानाची मोडतोड केल्याची तक्र ार पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन्स,वाढवणं बंदर,मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस महामार्ग,फ्रेंट कॉरिडोर ई. विनाशकारी प्रकल्प राबविले जात असल्याच्या निषेधार्थ भूमीसेना-एकता परिषदेच्या वतीने २७मार्च रोजी पालघरच्या चार रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ ते ९ हजारांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी वडा पाव,ऊसाचा रस, चहा, कलिंगड यावर ताव मारला, पैसे दिले नाही. शिवाय गल्ल्यातील रक्कम चोरून नेली अशी तक्रार भूषण दूतकर, सुभेदार यादव,आशिष यादव, विनय यादव, निरांजन यादव, सीताराम यादव, राज ठाकूर,पप्पू यादव,राम परवेश यादव, राकेश हरजिन, मोहनसिंग कुमावत, ईश्विरसंग कुदेवडा, लक्ष्मी पटेल ई नी केली आहे. या लुटमारीत आपले १ लाखांचे नुकसानही झाल्याचे तक्र ारदाराचे म्हणणे आहे.ह्या मोर्च्या दरम्यान वाट काढीत पुढे जाणार्या काही लोकांनाही मारहाण करण्यात आली असून वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही यावेळी मद्यपान केलेल्या काही मोर्चेकरांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी भूमीसेना आणि एकता परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती दिली.कळंबोली - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कळंबोली परिसरात गुरु वारी वाहिनी फुटल्याने वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी घटना असल्याने रहिवासी त्रस्तआहेत. सिडको प्रशासन मात्र एमजेपीकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहे.

एमजेपीची भोकरपाडा येथील जलशुद्धिकरण केंद्रातून सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारी वाहिनी जीर्ण झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटणे आणि लाखो लिटर पाणी वाया जाणे, ही बाब नित्याचीच झाली आहे. वारंवार वाहिनी फुटल्याने वसाहतींमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे. सिडकोची स्वत:ची यंत्रणा नसल्याने एमजेपीवर तहान भागविण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. ही वाहिनी बदलण्यासाठी एमजेपीने सिडको, जेएनपीटी, पनवेल महापालिका या ग्राहक संस्थांकडे भागभांडवलाची मागणी केली होती. सिडकोने सुरु वातीला आपला हिस्सा देण्याकरिता संचालक बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेतली होती; परंतु महापालिका झाल्याने सिडकोने हात वर केले आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वारंवार वाहिन्या फुटल्याने पनवेल शहरासह कळंबोली नवीन पनवेलला पाणी मागणीप्रमाणे देता येत नाही.

मुंबई - वाढदिवस साजरा करण्यासाठी विजेची चोरी तसेच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी दहिसरमध्ये घडला. मुख्य म्हणजे या प्रकरणात संबंधितांना अटकाव करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली असून, त्यानुसार तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.दहिसर पूर्वेकडील अंबावाडी परिसरात डी.एन. दुबे रोडच्या मशिदीजवळ हा प्रकार घडला. सेलोट नामक इसमासह एकूण तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सेलोटच्या वाढदिवसासाठी आकडा टाकून घटनास्थळी रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. तसेच फटाकेही फोडले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तेथी धाव घेतली़मुंबई - मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी गैरव्यवहारप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मुख्य पर्यवेक्षक विजयकुमार कासकर (वय 57) याला बुधवारी (ता. 29) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
महापालिकेच्या "डी' विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात बनावट कागदपत्रांद्वारे 44 जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली होती. या प्रकरणात कासकर सामील असल्याचे उजेडात आले होते. कासकरला 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणात अटक झालेल्या 58 जणांपैकी 13 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
"डी' विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी विभाग कार्यालयात खेपा मारत होती. दर खेपेला "फाईल क्‍लीअर' झाली नाही, अमुक विभागात अडकली आहे, अशा प्रकारची उत्तरे तिला मिळत होती. अखेर या महिलेने ग्राहक समाजसेवा संस्थेशी संपर्क साधल्यानंतर संस्थेने डी विभाग कार्यालयात चौकशी केली. त्यातून या महिलेच्या नावावर भलतीच महिला कामावर असल्याचे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारानुसार मागितलेल्या कागदपत्रांतून, या महिलेच्या नावाने भलत्याच महिलेने मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच पोलिसांच्या विशेष शाखेचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे उघडकीस आले होते.
मृत कर्मचाऱ्याच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्याच्या नातलगांना नोकरी देण्याऐवजी भलत्यालाच नोकरी देण्याचा हा प्रकार सध्या गाजत आहे. आतापर्यंत असे 44 प्रकार घडल्याची तक्रार ग्राहक समाजसेवा संस्थेचे सहसचिव शिवप्रकाश तिवारी यांनी पोलिसांकडे केली. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या कक्ष-3 कडे सोपवण्यात आले होते.मुंबई - सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज)मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने वाहन कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकारातील वाहनांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने बीएस-३ प्रकारातील वाहनांवर कंपन्यांकडून २० ते ३० टक्के सवलत देण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बीएस-३ प्रकारातील वाहनांचा साठा असणारे महाराष्ट्रातील शोरूम वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ३१ मार्च रोजी रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (महाराष्ट्र)घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत वाहनांची खरेदीविक्री झाली तर त्यांची नोंदणी नंतरही करता येऊ शकते, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. बीएस-४ हे कमीत कमी वायु प्रदूषण करणारे असून त्यामुळे हे इंजिन वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा फटका बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांना बसणार असल्याने वाहन कंपन्यांची एकच धावपळ उडाली आहे. १ एप्रिलपासून अशा वाहनांची खरेदी-विक्री होऊ शकणार नाही. हे पाहता वाहन कंपन्यांनी वाहन खरेदीवर सवलत दिली आहे. ३१ मार्चपर्यंतच ही सवलत असेल. यामध्ये होंडा, टीव्हीएस, महिंद्रा अशा कंपन्यांचा समावेश आहे. होंडाच्या दुचाकींवर पाच हजारांपासून ते १२ हजारापर्यंत तर टीव्हीएसच्या वाहन खरेदीवर १५ हजार ते २0 हजारापर्यंत सवलत देण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंतच बीएस-३ मानांकनातील वाहनांची विक्री होणार असल्याने शोरूममध्ये सवलत दिल्या जाणाऱ्या वाहने खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, फेडरेशन आॅफ आॅटोमोबाईल डीलर्सचे (फाडा) संचालक (आंतरराष्ट्रीय व्यवहार) निकुंज सांघी यांनी सांगितले की, दुचाकी उद्योगात एवढी मोठी किंमत सवलत यापूर्वी कधी ऐकली नाही. सध्या तरी आम्ही जास्तीत जास्त गाड्या विकण्यावर भर दिला आहे. आमचे लोक संभाव्य ग्राहकांना फोन करून सवलतीची माहिती देत आहेत.

नवी दिल्ली - सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करताना इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, आता हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरुध्द खेळणार असल्याने बॅडमिंटनप्रेमींमध्ये या ‘हायव्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१४, २१-१२ असा धुव्वा उडवला. तसेच, सिंधूने पुन्हा जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान २१-१६, २३-२१ असे परतावले. पुरुषांमध्ये समीर वर्माने उपांत्यपुर्व फेरीत गाठताना हाँगकाँगच्या हू युनविरुद्ध २१-१७, २१-१५ अशी बाजी मारली.

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील अल्पसंख्याक अहमदिया समुदायाशी निगडीत असलेले आणि पाकिस्तानच्या पहिले नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी घटना घडली आहे. 
जमात-ए-अहमदियाचे नेते अॅड. मलिक सलीम लतीफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड.मलिक सलीम लतीफ आणि त्यांचा मुलगा अॅड. फरहान यांच्यावर कोर्टात जात असताना गोळीबार करण्यात आला. ज्यात लतीफ यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
पंजाब प्रांतातील लाहोरजवळील त्यांच्या घरापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. अहमदिया समुदायाचे प्रवक्ते सलीमुद्दीन यांनी लतीफ यांच्या हत्येची माहितीला दुजोरा दिला आहे. सलीम हे पाकिस्तानी नोबेल पुरस्कार विजेता शास्त्रज्ञ अब्दुस सलाम यांचे चुलत भाऊ. 1979 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

लष्कर-ए-झांगवीने स्वीकारली जबाबदारी

या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-झांगवीने स्वीकारली आहे. अहमदिया समुदायाच्या लोकांना धमकी मिळणे ही सामान्य बाब आहे. लतीफ हे अहमदिया समुदायाला मान्यता मिळण्यासाठी झटत होते. तसेच ते अहमदिया समुदायाचे मोठे नेते आणि प्रसिद्ध वकील होते, अशी माहिती सलीमुद्दीन यांनी दिली. यापूर्वीही अहमदिया समाजावर सातत्याने हल्ले झाल्याचंही सलीमुद्दीन यांनी सांगितले. 
पाकिस्तानच्या अहमदिया समुदायाच्या लोकांना स्वत:ला मुस्लिम मानणे आणि इस्लामिक प्रतिकांचा वापर करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्या लोकांवर ईशनिंदेचा खटला दाखल होतो. गेल्या 30 वर्षांमध्ये अशा 1335 प्रकरणांत 494 लोकांवर खटले दाखल करण्यात आलेत. दरम्यान, सुरक्षा दल या प्रकरणाचा तपास करत हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

नवी दिल्ली - राज्यसभेने सूचविलेल्या पाच सुधारणा लोकसभेने फेटाळल्यानंतर २0१७ च्या वित्त विधेयकास गुरुवारी लोकसभेने मंजुरी दिली. राज्यसभेने काल वित्त विधेयकात सुचविलेल्या तब्बल पाच महत्त्वपूर्ण सुधारणांना मंजुरी देऊन सरकारची कोंडी केली होती. राज्यसभेने सुचविलेल्या सुधारणांवरील चर्चेला उत्तर देताना वित्तमंत्री जेटली यांनी म्हटले की, या सुधारणा स्वीकारता येण्याजोग्या नाही. आवाजी मतदानाने या सुधारणा नामंजूर झाल्या.नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शरद पवार यांचा सन्मान होत असताना खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या. यावेळी अजित पवारही उपस्थित होते.विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती, शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांच्यासारख्या दिग्गजांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई- अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठ्या समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. मराठीतही राजकीय पटांची मोठी परंपरा आहे. राजकारण एक असा खेळ आहे, की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो. तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. याच धर्तीवर ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक एक नायक’ हा आगामी मराठी चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

धुळे - धुळे येथील पोलीस निरीक्षकाकडे घरफोडीची घटना ताजी असतानाच शहर वाहतूक पोलिसाची मोटरसायकल चोरीस गेली आहे. मोटरसायकल थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या आवरातूनच चोरून चोरांनी पोलिसांनाच पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. धुळे शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्याचे एकच आवार आहे. यामुळे रात्रंदिवस याठिकाणी पोलिसांचा वावर असतो. तरी देखील पोलीस अधिकार्‍याच्या घरात आणि आता पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने पोलिसांवर स्वरक्षणाची वेळ आल्याचे येथील स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत. पोलीस हवालदार राजेंद्र विश्‍वास हिरे (रा.धुळे) हे दि. १७ मार्च रोजी सकाळी अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांच्या वाहनांच्या पायलटींग ड्युटीवर असतांना त्यांनी त्यांची मोटरसायकल वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातून चोरीला गेली. मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच हिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर - सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठीच लढत असतात, याला काँग्रेस पक्ष अपवाद ठरला आहे. महापालिका निवडणुकीला अवघे १९ दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षातील गटबाजी विकोपाला गेली असून माजी खासदार नरेश पुगलिया व आमदार विजय वडेट्टीवार हे दोन्ही गट एकमेकांना जणूकाही पराभूत करण्यासाठीच रिंगणात उतरले आहेत, असे चित्र निर्माण झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.चंद्रपूर जिल्हय़ात १९९६ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र या पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आणि आजची स्थिती अशी आहे की लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत तथा पंचायत समिती अशा सात निवडणुकांत काँग्रेस पक्ष केवळ गटबाजीमुळे पराभूत झाला आहे. पूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया विरुद्ध वामनराव गड्डमवार व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे गट सक्रिय होते. आज पुगलिया विरुद्ध विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार या दोन गटांतील वाद विकोपाला गेला आहे. या गटबाजीची सुरुवात महापालिकेतील अर्थकारणातून झालेली आहे. महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २६ नगरसेवक आहेत. याच संख्याबळावर महापालिकेत पहिले अडीच वष्रे काँग्रेसची सत्ता होती. पुगलियांच्या आशीर्वादाने संगीता अमृतकर या महापौर होत्या. मात्र काँग्रेसचे १२ नगरसेवक व पुगलिया यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. त्याचा परिणाम रामू तिवारी, संतोष लहामगे व माजी महापौर संगीता अमृतकर यांच्या नेतृत्वातील १२ नगरसेवकांचा एक गट फुटला. या गटाने थेट भाजपशी हातमिळवणी केली. बंडखोर गटाच्या राखी कंचर्लावार नंतरच्या अडीच वर्षांसाठी महापौर झाल्या. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, महापालिकेत भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभे करू आणि स्वत: निवडणुकीतून अंग काढून घेऊ, अशी भूमिका पुगलिया यांनी घेतली आहे. शहर अध्यक्ष नंदू नागरकर सध्या पुगलिया गटात आहेत. तर वडेट्टीवार यांनी १२ नगरसेवक पक्ष सोडून गेले नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर यांना दिले होते. त्यानुसारच नागरकर यांनी राजीव गांधी कामगार भवनात दुसऱ्यांना पक्ष निरीक्षक शिवाजीराव मोघे व आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत मुलाखतींचे आयोजन केले. परंतु विजय वडेट्टीवार व महापलिकेत भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांच्या गटाने याला सुरुंग लावला. त्याचा परिणाम वडेट्टीवार यांनी परिचय मेळावा, तर पुगलियांनी मुलाखती असे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले.

मुंबई - भाजपाशी काडीमोड घेत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली जाणार नाही पण सरकारमध्ये राहून संघर्ष मात्र करीत राहा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांना दिले. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक ठाकरे यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर घेतली. पक्षाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री बैठकीला उपस्थित होते. सरकारला असलेला शिवसेनेचा पाठिंबा कायम राहील पण भाजपासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही. आपल्या आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यांना जास्तीतजास्त निधी विकास कामांसाठी मिळाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर मंत्र्यांवर दबाव आणा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे मंत्री शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करतील, असा निर्णयही झाला.शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना जादा अधिकार मिळावेत, धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री व भाजपाच्या प्रमुख मंत्र्यांनी विश्वासात घ्यावे, हे मुद्देही मुख्यमंत्र्यांसमोर उद्या मांडले जातील, अशी माहिती आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये निधी, योजनांच्या वाटपाचे सूत्र ठरलेले होते. तसे या सरकारमध्ये काहीही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपाच्या मर्जीवर शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये निधी दिला जातो. या बाबत मातोश्रीवरील  बैठकीत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.विधिमंडळाच्या कामकाजात भाजपाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय दिसतो तेवढा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे बरेचदा आपलेच दोन मंत्री एकाच विषयावर वेगवेगळी भूमिका घेताना दिसतात. महत्त्वाच्या विषयावर आधीच एकत्रित चर्चा करून भूमिका ठरवा, असे उद्धव यांनी मंत्र्यांना बजावल्याची माहिती आहे.
आमदारांची कामे करा - मंत्र्यांना सुनावले
मंत्रालयात येणारे शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदारांची कामे प्राधान्याने करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. तसे होत नसल्याच्या खूप तक्रारी आहेत, अशी समज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मंत्र्यांना दिल्याचे समजते. शिवसैनिकांची कामे मंत्रालयात जलदगतीने व्हावीत यासाठी समन्वय यंत्रणा उभारण्यासही त्यांनी सांगितले.१० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडणुकीचा आढावादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. ज्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या जिल्ह्यात शिवसेनेला सत्तेत आणले त्यांचे उद्धव यांनी अभिनंदन केले.शिवसेनेला महत्त्वाची काही खाती (जसे ऊर्जा, महसूल) मिळायला हवीत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट शब्दांत मागणी करायला हवी, असे मत एका कॅबिनेट मंत्र्याने या बैठकीत व्यक्त केले.

मुंबई - 1 एप्रिलपासून जिओची ‘हॅप्पी न्यू इअर’ मोफत सेवा बंद होणार आहे. सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या या ऑफरनुसार ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि डेटा प्लान देण्यात आला होता. मात्र आता ही मोफत सेवा बंद होत असून ग्राहकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. जिओची प्राईम मेंबरशीप हवी असल्यास आज म्हणजेच 31 मार्च शेवटची मुदत आहेत. 31 मार्चनंतर ही ऑफरही बंद केली जाणार आहे. प्राईम मेंबरशीप घेतल्यास दर महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 28 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 
प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे. याशिवाय जिओनं 499 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. प्राईम मेंबरशीपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. यानंतर 12 महिन्यांसाठी 303 रुपयांचा प्लान घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये मिळणा-या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात.
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या.पुणे - ‘कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडालेल्या पुण्यात बस वाहतूक मार्गावर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
तुकाराम मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. आज त्यानुसार मुंढे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. राज्य सरकारकडून पीएमपीच्या अध्यक्षपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पीएमपीचा पदभार घेण्यास मुंढे इच्छुक नाहीत. त्यामुळे नियुक्ती होऊनदेखील मुंढे यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही, अशी चर्चा होती. 
तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना आता पीएमपीची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यातील मनसेचे शहर प्रमुख हेमंत संभूस यांनी कुणाल कुमार यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ संपत आला असून, एक- दोन महिन्यांत त्यांची बदली होणार आहे. त्याचा विचार करून तुकाराम मुंढे यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्त करायला हवा, अशी मागणी केली होती.

आयोध्या - राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा हा मुस्लिमांसाठी साधा मुद्दा नाही, तर ती एक अहंहमिका (इगो वॉर) आहे, असे भाजपचे नेते विनय कटियार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुस्लिमांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी राम मंदिर तिथेच बांधले जाईल, असे त्यांनी सांगितले. कटियार म्हणाले, "परस्पर सहमतीने हे प्रकरण संपावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, मुस्लिम सहमती दर्शविणार नाहीत. ते चर्चेपासून दूर पळत आहेत. त्याबाबत आम्ही काय करू शकतो?" राम मंदिराच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावाचे कटिया यांनी स्वागत केले. कटियार म्हणाले, "आयोध्येत अनेक मशिदी आहेत, त्यामुळे मुस्लिमांना मशीद बांधण्याची चिंता नाही. मशीद बांधण्यासाठीचा हा संघर्ष नाही, तर केवळ तिथेच मशीद बांधण्याची ही अहंहमिका आहे."ती जमीन आमची आहे आणि तिथे राम मंदिर बांधले जाईल याची दक्षता आम्ही घेऊ, असे त्यांनी सांगतिले. त्या ठिकाणी मंदिर आणि मशीद दोन्हींचे बांधकाम सुरू करण्याची आमची तयारी आहे. परंतु, मशिदीचे बांधकाम नदीच्या पलीकडे करण्यात यावे, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर तातडीची सुनावणी घेतली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी परस्पर सामंजस्याने हे प्रकरण सोडविण्यास सांगितले. बोलणी फिसकटल्यास सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांनी मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी सुनावणीदरम्यान दर्शवली होती.मुंबई - पत्रकारांनी जीन्स आणि टी शर्ट घालावेत की नको, याबद्दल आता कदाचित मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल! बुधवारी उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांनी विचारणा केली, की जीन्स आणि टी शर्ट ही योग्य वेशभुषा आहे का?न्या. चेल्लूर यांनी अशी वेशभुषा म्हणजे 'बॉम्बे कल्चर' आहे का, अशीही विचारणा केली. मुख्य न्यायाधिशांच्या अनपेक्षित टिप्पणीने दुखावलेल्या पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला. मुंबई - विनोदवीर कपिल शर्माच्या अडचणी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी त्यामध्ये भरच पडताना दिसते आहे. सुनील ग्रोवरसोबतच्या वादानंतर कपिलचा कार्यक्रम अधांतरी झाल्याची चर्चा रंगत असताना या आठवड्यात कपिल शर्माला सोनी टिव्हीने रविवारी सुट्टी दिली आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून कपिल आठवड्यातून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, या आठवड्यात कपिल फक्त शनिवारीच प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. सुनील ग्रोवरच्या वादाचे प्रकरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत असताना कपिल शर्माच्या शोला सोनीने कात्री लावली का? असा प्रश्न नक्कीच निर्माण होईल. मात्र, असे काहीही नसून, सोनी टिव्हीवर सध्या सुरु असणाऱ्या इंडियन आयडॉल या कार्यक्रमामुळे कपिलला सुट्टी देण्यात आल्याचे समजते.

इंडियन आयडॉलच्या नवव्या पर्वातील फिनाले रविवारी रंगणार असून, ८ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत चालणार आहे. त्यामुळे कपिलचा शो रविवारी प्रसारित करण्यात येणार नाही. या वृत्ताबाबत सोनी टिव्ही किंवा कपिलने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. सुनील ग्रोवरच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम होत असल्याचे दिसते आहे. विमान प्रवासामध्ये कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यात वादाचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. कपिलसोबतच्या वादानंतर सुनील ग्रोवर दिल्लीत लाइव्ह कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादानंतर सुनीलसह अली असगर आणि चंदन प्राभाकर या कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. या पात्रांच्या अनुपस्थितीमुळे कपिलच्या शोवर परिणाम होईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. सध्या ‘द कपिल शर्मा शो’चा घसरलेल्या टीआरपीमुळे या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहेत. मात्र, सोनी टेलिव्हिजनने यासाठी कपिलला साथ देण्यासाठी नव्या कलाकारांना घेऊन येणार आहे.मुंबई - भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना थेट ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये देशासाठी सर्वाधिक गोल नोंदवणारा छेत्री जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे इंग्लंडचा स्टार खेळाडू वेन रुनीला पिछाडीवर टाकून छेत्रीने चौथे स्थान पटकावल्याने जागतिक फुटबॉलचे लक्ष भारताकडे वळले आहे.

नुकताच झालेल्या म्यानमारविरुध्दच्या सामन्यात छेत्रीने आपल्या कारकिर्दीतील ५३वा गोल झळकावला. यासह सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणारा तो चौथा खेळाडू ठरला असून पोर्तुगालचा रोनाल्डो, अर्जेंटिनाचा मेस्सी आणि अमेरिकेचा क्लिंट डेम्पसे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, स्टार खेळाडू वेन रुनीनेही आपल्या कारकिर्दीतील ५३ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. परंतु यासाठी त्याने ११९ सामने खेळले असून छेत्रीने हीच कामगिरी ९३ सामन्यांत केली. त्यामुळे छेत्रीने रुनीला मागे टाकत चौथे स्थान पटकावले.यंदा पाचव्या पर्वात १२ संघ, १३०हून अधिक सामने आणि १३ आठवडय़ांचा थरार

मुंबई - लीगच्या सूत्राने खेळाचे अर्थकारण बदलू शकते, हा विश्वास देणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा यंदा दशकपूर्तीच्या उंबरठय़ावर आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत दहा संघापर्यंतची उंची गाठून नंतर पुन्हा आठ संघांपर्यंत मर्यादित राहणाऱ्या आयपीएलपेक्षा प्रो कबड्डी लीगचा दम भारी असल्याचे प्रत्ययास येत आहे. प्रो कबड्डीचे गेल्या तीन वर्षांत चार यशस्वी हंगाम झाले. मात्र आता पाचव्या पर्वात या लीगचे स्वरूप विस्तारणार आहे. जुलैमध्ये सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामात १२ संघांमध्ये १३०हून अधिक सामने असा १३ आठवडय़ांचा जागतिक फुटबॉल लीगसारखा हंगाम कबड्डीरसिकांना अनुभवता येणार आहे.२००८मध्ये आठ संघांसह आयपीएलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. त्यानंतर २०११मध्ये ही संघसंख्या दहापर्यंत गेली. नंतर २०१२ आणि २०१३मध्ये ती नऊपर्यंत खाली आली. मग आयपीएल डागाळल्यामुळे मागील तीन वष्रे ओळीने आठ संघांमध्येच आयपीएलचा विस्तार खुंटला आहे. मात्र प्रो कबड्डीच्या आगामी हंगामात चार संघ वाढणार आहे. तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांशी निगडित ते संघ असतील. सध्या प्रो कबड्डीत बेंगळुरू, हैदराबाद/विशाखापट्टणम्, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि पाटणा असे आठ संघ समाविष्ट आहेत.

‘‘प्रो कबड्डीमधील संघांची संख्या वाढल्यामुळे भौगोलिक दृष्टय़ा प्रो कबड्डीने अन्य भारतीय खेळांमधील लीगना सहज मागे टाकले आहे. कारण येत्या हंगामात ११ राज्यांमधील १२ संघ खेळणार आहेत. लीगच्या विस्तारासाठी सर्व भागधारकांनी पुढाकार घेतल्यामुळे शक्य होत आहे,’’ अशी माहिती प्रो कबड्डीच्या संयोजकांनी दिली आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राहत असलेले त्यांचे बालपणातील घर एका अज्ञात व्यक्तीने १२ कोटी रुपयांना घेतले आहे. हे घर न्यूयॉर्कमध्ये आहे. १९४० मध्ये हे घर ट्रम्प यांचे वडील फ्रेड यांनी बांधले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्म प्रमाणपत्रावर याच घराचा उल्लेख आहे. ट्रम्प हे लहानपणी चार वर्षे या घरात राहिले. ट्रम्प स्वत: एक रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. कमी किमतीतील अनेक घरे त्यांनी उभारली आहेत. ट्रम्प हे १९५१ मध्ये नव्या मोठ्या घरात स्थलांतरित झाले. या जुन्या घरात ट्रम्प राहिल्यामुळे त्याची किंमत १८ कोटींपर्यंत येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. येथील रहिवासी हे घर आॅक्टोबरमध्येच विकू इच्छित होते; पण नोव्हेंबरमधील निवडणुकीत ट्रम्प जिंकले तर घराची किंमत अधिक येईल, असा आडाखा बांधून हे घर तेव्हा विकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता या घराची विक्री करण्यात आली आहे.अबूधाबी - एका पाकिस्तानी तरुणाच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या १0 भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी त्यांची आता सुटका होण्याची शक्यता आहे. ज्या मुलाची त्यांनी हत्या केली, त्या मुलाच्या वडिलांनी त्या १0 जणांना माफ केलं आहे. तसं त्याने न्यायालयाला कळवलं आहे. एका मोहमद्द फरहान या पाकिस्तानी तरुणाची या १0 जणांनी २0१५ साली हत्या केली होती. मोहमद्द फरहानच्या वडिलांनी इस्लामिक कायदा शरीयतनुसार न्यायालयात अर्ज करून, दोघांच्या सहमतीने प्रकरण मिटवण्याची परवानगी मागितली आहे. शरियत कायद्यानुसार अशी संमती दिली जाते. अर्थात त्यासाठी ब्लडमनी द्यावा लागतो. म्हणजेच या १0 जणांना मोहम्मद फरहानच्या वडिलांना काही ठराविक रक्कम द्यावी लागेल.

न्यायालयानेही अर्जाचा सहानुभूतीने विचार करण्याची मान्य केलं आहे. माझा मुलगा आता परत येणार नाही. तसंच या १0 जणांना फाशीची शिक्षा झाल्यास त्यांची कुटुंबंही आर्थिक अडचणीत सापडतील. तसं व्हावं, अशी माझी इच्छा नाही, असं फरहानच्या वडिलांचं म्हणणं आहे. फरहानच्या वडिलांना दोन लाख डिरहाम देऊ न हे प्रकरण मिटवलं जाईल, असा अंदाज आहे. या १0 जणांकडे इतकी रक्कमही नाही. त्यामुळे दुबईत राहणारे भारतीय उद्योगपती एस. पी. सिंग ओबेराय यांची संस्था त्यांना ही रक्कम देणार आहे. हे १0 जण पंजाब व हरयाणा राज्यांतील आहेत.साडेचार कोटी रुपये खर्चून १२ इंचांची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय

मुंबई - मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या बोरिवलीच्या गोराई गावातील तब्बल ८ हजार गोराईवासीयांना अखेर हक्काचे पाणी मिळणार आहे. ईस्टरच्या तोंडावरच पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील रहिवाशी आनंदात आहेत.

बोरिवली पश्चिमेला गोराई खाडी ओलांडल्यानंतर गोराई गाव लागते. याच गावात एस्सेल वर्ल्डसारखी मनोरंजन पार्क आणि वॉटर किंगडमसारखी वॉटर पार्कदेखील आहेत. या ठिकाणी दररोज पाण्याची उधळण होत असताना गोराईकर मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते. मालाड मनोरीमार्गे आलेल्या अवघ्या सहा इंचांच्या जलवाहिनीद्वारे येणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरच गोराईकरांची भिस्त होती. हे पाणी येथील लॉज आणि हॉटेलमालकच पळवीत असल्याने रहिवाशांना रोजच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. मात्र आता फक्त गोराईकरांकरिता तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम पालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. ही नवीन जलवाहिनी तब्बल १२ इंचांची असणार आहे.येत्या दहा दिवसांत या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास येणार असून गोराईवासीयांच्या पाण्याची ददात कायमची मिटणार आहे.

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. द्रुतगती मार्गावरील रसायनी परिसरात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त वॅगन आर कार ही मुंबईच्या दिशेने येत होती. या गाडीत एकूण पाचजण होते. हा अपघात इतका भीषण होता की, अपघात झाल्यानंतर सुरूवातीला कार तब्बल ३० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यानंतर ही कार पुलावरून थेट २५ ते ३० फूट खाली कोसळली. त्यामुळे गाडीतील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, गाडीतील एका व्यक्तीला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. या सर्व जखमींवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.श्रीनगर - हिंसक संघर्षानंतर काश्मीर खोऱ्याच्या संवेदनशील भागात बुधवारी अतिरिक्त सुरक्ष दले तैनात करण्यात आली. सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत सामान्य नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.परिस्थितीच्या दृष्टिकोनातून काश्मीर विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ काश्मीर आणि इस्लामिक युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुरक्षा दले आणि त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्यांत मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन तरुण ठार, तर इतर १८ जण जखमी झाले होते. हे लोक दगडफेक करून सुरक्षा दलांची दहशतवाद प्रतिबंधक मोहीम उधळू पाहत होते.बडगाम येथे एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर ही मोहीम संपुष्टात आली. श्रीनगरमध्ये आज बंदमुळे बहुतांश दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप आणि शहरातील शैक्षणिक संस्था बंद होत्या. सरकारी वाहनेही रस्त्यावरून गायब होती, तर शहराच्या काही भागांत खासगी कार, कॅब आणि आॅटोरिक्षांची वाहतूक सुरू होती.खोऱ्यातील इतर जिल्हा मुख्यालयांतही बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची वृत्ते आहेत. मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदुरासारख्या संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.हुर्रियत गटांचे प्रमुख सय्यद अली शाह गिलानी, मिरवैज उमर फारुक आणि जेकेएलएफप्रमुख मोहंमद यासीन मलिक यांनी कालच्या घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते. फुटीरवाद्यांनी लोकांना शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शने करण्याचे आवाहन केले होते.मोर्चा उधळला, आमदार ताब्यात

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणारे अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.कार्यकर्ते रशीद यांच्या जवाहरनगर येथील सरकारी निवासस्थानी गोळा झाले होते. त्यानंतर मुफ्ती यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी त्यांनी गुपकार रोडच्या दिशेने मोर्चा काढला. तथापि, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मोर्चा हाणून पाडला.

मुंबई - मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प एक गुड न्यूज घेऊन आला. यावर्षी पाणीकपात होणार नाही, असे पालिका आयुक्त अजाॅय मेहता यांनी सांगितले.गेल्या वर्षी मुंबईकरांना १५ टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. पण पाण्याचं नियोजन योग्य केल्यामुळे यावर्षी पाणीकपात होणार नाही, असे आयुक्त म्हणाले.किती कडक उन्हाळा पडला, तरीही धरणात साठा पुरेसा आहे. त्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवणार नाही.मुंबई - वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यंत तर उत्तरेकडे मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
मुंबईत मेट्रोचे मेट्रो ३, २ अ, २ ब, ४, ७ हे प्रकल्प सुरू आहेत. १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० किमीपर्यंत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएनएनगर ते दहिसर ही मेट्रो २ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो ७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत तर उत्तर बाजूकडे मीराभार्इंदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलाबा-सिप्झ मेट्रो ३ आणि डीएननगर ते मंडाले मेट्रो २ ब, वडाळा-घाटकोपर कासरवडवली मेट्रो ४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर - विक्रोळी मेट्रो ६ या सगळ्यांचं इंटिग्रेशन मेट्रो प्रकल्पाशी झाले असून यामुळे शहरातील कोणत्याही भागापासून कोणत्याही भागापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई मेट्रो भाग २ दहिसर पूर्व डीएनएनगर १८.५० किमी लांबीच्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. रेल्वे लाइन ७ अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व १६.५० किमीच्या प्रकल्पासाठी ६२०८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मेट्रो २ ब डीएननगर-वांद्रे-मानखुर्द-मंडाले या २३ किमीच्या लांबीच्या प्रकल्प १०,९८६ कोटी रुपये तर मेट्रो मार्ग ४ वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ३२ किमीच्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १४ हजार ५४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असून निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा २०१७-१८चा ६ हजार ८९१.४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार असून, सुमारे १४ हजार ४४० घरे बांधण्यात येणार आहेत. तर मुंबईतील ६७९ इमारतींची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.
लॉटरी झालेल्या इमारतीच्या वितरणापोटी चालू वर्षी ६५५ कोटींपर्यंतची रक्कम घरांच्या विक्रीतून वसूल झाली आहे. पुणे, कोकण मंडळाकडे निर्माण झालेल्या घरांच्या विक्रीसह संपूर्ण राज्यातून ४ हजार २६६ कोटी मिळणार आहेत. म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरबांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यासाठी सुमारे १ हजार ५९६.९७ कोटी खर्च अपेक्षित आहे. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार आहे.

        अण्णा हजारे यांचा हल्लाबोल, पुन्हा रामलीलावर आंदोलनाचा इशारा

‘ना खाऊंगा ना खाने दूँगा’ अशी निवडणूक काळात घोषणा करून देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कार्यकाल तीन वर्षांचा होऊनही देशातील भ्रष्टाचार थांबलेला नाही, भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणाऱ्या लोकपालाची नियुक्ती करण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नसून जनतेसाठी पुन्हा दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज, बुधवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना दिला.

पारनेर -  केंद्रात लोकपाल व राज्यात लोकआयुक्तांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात ५ ते ६ जनहित याचिका दाखल असून रविवारी त्यावर झालेल्या सुनावणीप्रसंगी सरकारच्या वतीने केंद्रात विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपालाची नियुक्ती करता येणार नसल्याचे म्हणणे सादर केले. केंद्रात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी करूनही सरकारने त्यास असमर्थता दर्शविली. सरकारची लोकपाल व लोकआयुक्त नियुक्त करण्याची इच्छा दिसत नसून सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे हजारे म्हणाले. विरोधी पक्षनेता नसताना सीबीआय प्रमुखाची नियुक्ती कशी करण्यात आली? ही नियुक्ती होत असताना लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी काही करणे असंभव होते का, असा सवालही हजारे यांनी केला.लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात विरोधी पक्षनेत्याची अडचण पुढे केली आहे. परंतु राज्यात लोकआयुक्त नियुक्त करण्यास काय अडचण होती, याचेही आकलन होत नाही, लोकआयुक्ताच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेत्याचीही गरज नव्हती. सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली आहेत. त्याच वेळी लोकआयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असती तर भ्रष्टाचारास मोठय़ा प्रमाणावर ब्रेक लागला असता. राळेगणसिद्धीच्या भेटीला विविध राज्यांतून येणाऱ्या लोकांकडून पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहेत. मोदींनी सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार निर्मूलनास प्राथमिकता देण्याचे वचन दिले होते, ही प्राथमिकता आता कोठे गेली? पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र पाठवून कळविले जाते की लोकआयुक्तांच्या नियुक्तीची जबाबदारी राज्यांची आहे. मग ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे तेथे लोकआयुक्तांची का नियुक्ती करण्यात आली नाही? सरकारच्या या भूमिकेबाबत जनतेने काय समजावे? भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे हाच त्याचा अर्थ होतो. गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचार रोखण्यासाठी भाषणबाजीशिवाय काहीच झालेले नाही, असा टोलाही हजारे यांनी लागावला.
सन २०१२ मध्ये रामलीला मैदानावर लोकपालाच्या कायद्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे तत्कालीन सरकारला या कायद्याचा मसुदा मंजूर करावा लागला. कायदा झाला परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी नाही, हा जनतेचा अवमान आहे. कायद्याच्या आधारावर चालणारा आपला देश असून देशासाठी व जनतेसाठी पुन्हा रामलीला मैदानावर जावे लागेल. गेली तीन वर्षे या विरोधात मी काही बोललो नाही. पत्रांद्वारे मात्र सरकारशी संवाद सुरू होता. परंतु सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने आता आंदोलनाचे अस्त्र हाती घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संदर्भात आपण पंतप्रधानांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.
आंदोलनात सहभागाचे आवाहन
लवकरच रामलीला मैदानावर करण्यात येणाऱ्या आंदोलनात देशातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन हजारे यांनी केले आहे. हजारे यांचे फेसबुकवरील पेज लाइक केल्यानंतर संबंधित व्यक्ती आंदोलनाशी जोडली जाईल. या पेजवर आंदोलनासबंधी माहिती अपलोड करण्यात येणार असून नागरिकांनी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन हजारे यांनी केले आहे.ठाणे - बृहन्मुंबईतील ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात माफी देण्याच्या वचननाम्यातील घोषणेपासून शिवसेनेने घूमजाव केल्याने त्याच धर्तीवर ठाणेकरांनाही सवलत मिळण्याची शक्यता मावळली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे आगामी वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील, मात्र त्यामध्ये वचननाम्यातील लोकानुनयी घोषणांचा अंतर्भाव नसेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.बृहन्मुंबईत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात संपूर्ण माफी, तर ५०० ते ७०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ती घोषणा बृहन्मुंबईत लागू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याचा समावेश आयुक्तांनी केलेला नाही. ठाण्यातही ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुंबईतच घोषणा हवेत विरली, तर ठाण्यात तिची अंमलबजावणी होण्याची चिन्हे अत्यंत धूसर आहेत. मुंबईकरांपेक्षा ठाणेकरांनी यावेळच्या निवडणुकीत सेनेला भरभरून मते दिली. आतापर्यंत शिवसेनेला कधीही ठामपात न मिळालेले बहुमत प्राप्त झाले असल्याने आता ठाणेकरांच्या ऋणातून शिवसेना कशी उतराई होणार, असा सवाल केला जात आहे.निवडणुकांमुळे लांबलेल्या ठाणे महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पास अखेर मुहूर्त मिळाला असून गुरु वारी सकाळी आयुक्त संजीव जयस्वाल तो सर्वसाधारण सभेपुढे सादर करतील. सरकारने करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याची तंबी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. ठाणे महापालिकेस राज्य सरकारच्या आदेशांची किती अंमलबजावणी करता आली आहे, हेदेखील स्पष्ट होणार आहे. अर्थसंकल्पात शहराचा पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा सादर केला जाण्याची शक्यता असून करसवलतींबरोबरच करवाढीची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीत शिवसेनेने घोषणांचा पाऊस पाडला होता. या घोषणांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात किती ठोस पावले उचलली, हे स्पष्ट होईल. 

गेल्या वर्षभरात शहरात रस्ते रुंदीकरण कामाचा धडाका अभियांत्रिकी विभागाने लावला आहे. याशिवाय, कळवा येथील चौपाटी प्रकल्पाची आखणी महापालिकेने केली असून येत्या काळात यासाठीची निविदा प्रक्रि या पूर्ण केली जाणार आहे.महापालिका निवडणुकीनंतर जयस्वाल यांच्या बदलीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शेजारील नवी मुंबई महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची एसटी महामंडळात अलीकडेच बदली केली गेली.ही पार्श्वभूमी पाहता जयस्वाल यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे हे वर्ष असल्याने राज्य सरकार त्यांना प्रकल्प साकारण्याची संधी देते की, त्यापूर्वीच त्यांची बदली होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ठामपा आयुक्त म्हणून जयस्वाल यांचा हा तिसरा अर्थसंकल्प. गेल्यावर्षी आखलेले महत्त्वाचे प्रकल्प प्रगतीपथावर अथवा निविदा प्रक्रि येत असल्याने आणखी कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश केला जातो, याविषयी उत्सुकता आहे.अद्वय हिरे यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा

मालेगाव - गैरव्यवहाराच्या आरोपावरून सध्या तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मालेगावच्या हिरे कुटूंबियांमधील राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. परंतु भाजपा नेते अद्वय हिरे यांनी बुधवारी मुंबई सत्र न्यायालय भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून त्याद्वारे या दोघा कुटूंबियांमध्ये दिलजमाई घडून आल्याचा अर्थ काढला जात आहे.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या माझगाव मतदार संघात पराभूत झाल्यावर भुजबळांनी सुरू केलेल्या सुरक्षित मतदार संघाची शोध मोहीम येवल्यात येऊन थांबली. त्यानंतर नाशिकच्या राजकारणात भुजबळांचा उत्तरोत्तर दबदबा वाढत गेला. जिल्ह्याच्या विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भुजबळ सांगतील तोच शब्द प्रमाण समजला जाऊ लागला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काळात चौदा-पंधरा वर्षे ते मंत्रिमंडळात होते. काही काळ उप मुख्यमंत्रिपदासारखे महत्वाचे पदही पक्षाने त्यांच्याकडे सोपविले होते. राष्ट्रवादीतील वजनदार नेते अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या भुजबळांच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधकांची मात्र मोठीच राजकीय पिछेहाट झाल्याचे बघावयास मिळाले. स्वपक्षाच्या उमेदवारांच्या वेळोवेळी झालेल्या पराभवाचे खापर त्यामुळे अनेकांनी भुजबळांवर फोडले होते. स्वार्थी तसेच जातीय राजकारण करण्याचे आरोप त्यांच्यावर झाले.जिल्ह्यात भुजबळांचे प्रस्थ वाढण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मालेगावच्या हिरे कुटूंबियांचा दबदबा होता. या कुटूंबाचे वारसदार माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांना २००४ व २००९ अशा सलग दोन निवडणुकामंध्ये पराभव पत्कारावा लागला. त्यावेळी पक्षांतर्गत विरोधक म्हणून भुजबळांनी केलेल्या दगा फटक्यामुळेच हिरेंना पराभूत व्हावे लागल्याचे आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केले होते. या साऱ्या स्थितीत एकाच पक्षात राहुनही हिरे व भुजबळ कुटूंबियांमध्ये टोकाचे हाडवैर निर्माण होत गेले. दरम्यानच्या काळात पक्षात घुसमट होत असल्याची तक्रार करत हिरे हे भाजपवासी झाले. इतकेच नव्हे तर, मालेगाव बाह्य़ हा पारंपरिक व तुलनेने सोपा मतदार संघ सोडून अद्वय हिरे यांनी २०१४ मध्ये शेजारच्या नांदगाव मतदार संघातून भाजपची उमेदवारी घेऊन थेट भुजबळांचे पुत्र पंकज यांनाच आव्हान दिले होते. अर्थात त्यात यश आले नसले तरी भुजबळांना पराभूत करण्यासाठीची हिरेंनी दाखवलेली कमालीची इर्षां लपून राहिली नव्हती.

या पाश्र्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या तालुका पंचायत समिती सभापती निवडणुकीत पंधरा वर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेला पायउतार करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हिरे यांना राष्ट्रवादीची मोलाची साथ लाभली. या तडजोडीत भुजबळ समर्थक राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्याला सभापतीपदाची लॉटरी लागली आणि भाजपच्या पदरात फारसे काही पडले नाही तरी सेनेला सत्तेतून घालविण्यात यश आल्याने हिरे समर्थक आनंदले. या निवडणुकीच्या विजयी सभेत बोलतांना हिरे यांचा भुजबळांच्या विरोधातील आधीचा सूर पालटल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना नियमित तारखेसाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी अद्वय हिरे यांनी न्यायालयाच्या आवारात त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. या राजकीय घडामोडींची जिल्ह्य़ाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात अद्वय हिरे यांच्याशी संपर्क साधल्यावर वैयक्तीक न्यायालयीन कामासाठी गेलो असतांना भुजबळांशी योगायोगाने भेट झाल्याचे त्यांनी नमूद केले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगतानाच भुजबळ व आमचे भिन्न राजकीय पक्ष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दुसरीकडे भुजबळ व हिरे हे परस्परांचे राजकीय विरोधक असले तरी राजकारणाच्या पलीकडे दोघांमध्ये असलेली ‘कटूता’ कमी होण्याच्या दृष्टीने उभयतांमधील भेट सहाय्यभूत होईल, असा विश्वास भुजबळांच्या एका निकटवर्तीयाने बोलून दाखवला.नवी दिल्ली - बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक एप्रिलपासून देशभर बंदी घातली आहे. तसे निर्देश सरकारला दिले. या बंदीमुळे देशभरात तयार असणाऱ्या आणि नोंदणी न झालेल्या जवळपास आठ लाख नव्या कोऱ्या गाड्या भंगारात जाण्याची शक्यता आहे.स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांच्या व्यावसायिक हितापेक्षा लक्षावधी लोकांच्या आरोग्याचे फार फार महत्व आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 

कंपन्यांकडील साठा

कंपन्यांकडे सध्या ९६,७२४ व्यावसायिक वाहने, सहा लाख ७१ हजार ३०८ दुचाकी, ४० हजार ४८ तीनचाकी आणि १६,0९८ कार्स अशी आठ लाख २४ हजार २७५ वाहने आहेत३१ /१२ /२०१६ पासून बीएस-४ च्या दुचाकी व व्यावसायिक वाहनांच्या साठ्यात वेगाने वाढ झाली आहे याचा अर्थ असा की वाहन उत्पादकांनी बीएस-४ चे उत्पादन वाढवले आहे, असे या तज्ज्ञाने म्हटले.

बीएस-४चे उत्पादन वाढवले

सध्या बाजारात बीएस-४ चे निकष पूर्ण करणाऱ्या १४.७ लाख दुचाकी व ३९६४६ व्यावसायिक वाहने आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.याचा अर्थ असा की बाजारात आज बीएस-३ निकषांच्या दुचाकींच्या साठ्यापेक्षा बीएस-४ निकषांच्या दुचाकींचा साठा दुपटीपेक्षा जास्त आहे तसेच बीएस-४ चा व्यावसायिक वाहनांचा साठा बीएस-३ च्या न विकल्या गेलेल्या वाहनांच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे.

न्यायालयाने सुनावले

बीएस-चार निकष एक एप्रिलापासून अमलात येणार आहेत हे माहीत असतानाही उत्पादकांनी बीएस-४ च्या निकषांनुसार वाहनांच्या उत्पादनासाठी कृती न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांची कानउघडणी केली.सरकारने वाहन उत्पादकांची बाजू घेऊन सध्याचा बीएस-३ वाहनांचा साठा विकण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली परंतु न्यायालयाने ती फेटाळली. नवे उत्सर्जन निकष २००५ व २०१० मध्ये सक्तीचे केले गेल्यानंतर जुना वाहनांचा साठा विकण्यास परवानगी दिली गेल्याचे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.जुने तंत्रज्ञान असलेल्या वाहनांच्या उत्पादनाला बंदी असली तरी सध्याचा वाहनांचा साठा विकण्यास ती नाही, असे सरकारने सांगितल्यानंतरही खंडपीठाने बीएस-३ वाहने रस्त्यावर आणण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. जबलपूरहून निजामुद्दीनकडे निघालेल्या महाकौशल एक्सप्रेसला गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास माहोबा-कुलपहाड स्टेशनांदरम्यान हा अपघात घडला.जबलपूरहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी महाकौशल एक्स्प्रेस माहोबाजवळीस चरखारी रेल्वेस्टेशनाजवळ एक्स्प्रेसचे मागील आठ डबे रुळावरून घसरले. अपघातग्रस्त झालेल्या डब्यांमध्ये तीन एसी आणि तीन सामान्य वर्गातील डब्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. रात्रीच्या दाट अंधारात मदत आणि बचाव कार्यं सुरू होते.

नवी दिल्ली - दिल्लीचे नवे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारला बुधवारी पहिला दणका दिला. नियमबाह्य जाहिराती केल्याबद्दल आम आदमी पक्षाकडून ९७ कोटी रुपये वसूल करा, असा आदेश बैजल यांनी मुख्य सचिवांना दिला आहे. या जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्या प्रतिमा निर्मितीसाठी केलेल्या जाहिरातींवर किती खर्च करण्यात आला, याची चौकशी करावी; तसेच या प्रकरणी दोष निश्चिती करावी, असेही बैजल यांनी मुख्य सचिवांना सांगितले आहे. जाहिरातींवर खर्च केलेली रक्कम भरण्यासाठी आपला महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. जाहिरातींवरील खर्चासाठी राज्याच्या महसुलाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून केंद्र सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यी समितीने दिल्ली सरकारला दोषी ठरविले होते. महिनाभरापूर्वी समितीने अहवाल सादर केला होता. ज्या ९७ कोटी रुपयांच्या जाहिरातींपैकी विविध जाहिरात संस्थांना आतापर्यंत ४२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. ते वसूल करावेत, असा आदेश नायब राज्यपालांनी मुख्य सचिव एम. एम. कुट्टी यांना दिला आहे.
दिल्ली सरकारने मर्यादा ओलांडून दिल्लीबाहेर केजरीवाल यांच्या जाहिराती केल्या असून, त्यासाठी २९ कोटी रुपये खर्च केल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखापालांनीही (कॅग) ठेवला आहे.रोहतक - हरियानातील रोहतक जिल्हा न्यायालयाच्या आवारात महिलांच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या केलेल्य गोळीबारात कुख्यात गॅगस्टर रमेश लोहार याचा साथीदार ठार झाला. या गोळीबारात लोहार व त्याच्या वकिलासह पाच जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गुंड लोहार हा त्याचे वकील व अन्य पाच जणांसह खटल्याच्या सुनावणीला आला होता. त्या वेळी सलवार कमीज अशा महिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी न्यायालयाबाहेरच लोहारवर गोळीबार केला. पंधरा राउंड झाडून हल्लेखोर तत्काळ मोटारसायकलवरून पळून गेले. या गोळीबारातून लोहार बचावला; पण त्याच्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. मात्र, त्याचा सहकारी संजीत या हल्ल्यात ठार झाला.''
जखमींना रोहतकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लोहार व त्याचा प्रतिस्पर्धी गॅगस्टर काला यांच्या टोळीत वाद होता. या टोळ्यांतील संघर्षामुळे ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी व्यापक मोहीम उघडली आहे.

नागपूर - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. यासाठी चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली जात आहे. दरम्यान, शेतक-यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी ए.सी. मर्सिडीज बेन्झ बसमधून नागपूरहून चंद्रपुरात दाखल झाले. शेतक-यांसाठी काढलेल्या यात्रेला एवढा तामझाम कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन विरोधकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, भाजपाला एकटं पाडण्यासाठी काँग्रेसला शिवसेनेचा मॉरल सपोर्ट हवा आहे. संघर्षयात्रेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांना या यात्रेत सहभागी व्हावे, असे जाहीर निमंत्रण देत शिवसेनेचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे सूचित केले.यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. दरम्यान, या नेत्यांनी संपादकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिवसेनेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून आले. यावेळी अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली. शिवसेनेचे आमदारही या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर आले. हे करून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

मुंबई - गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला असताना पवई आणि धारावी येथे बॉम्ब सापडल्याच्या माहितीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी या माहितीच्या आधारे सर्वत्र तपासणी केली; मात्र ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.

पवईतील एका प्रसिद्ध शाळेनजीकच्या परिसरात सुरक्षा रक्षकाला संशयास्पद वस्तू आढळली. शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने भयभीत झालेल्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने संशयास्पद वस्तूची तपासणी केली. एका वस्तूला असंख्य वायर जोडल्या होत्या. त्यात दिवाही लागत होता. त्यामुळे ते बॉम्ब असल्यासारखे वाटत होते. मात्र, तपासणीत ती वस्तू मोजमापाचे उपकरण असल्याचे स्पष्ट झाले. असा प्रकार धारावीत घडला. खंबादेवी रोडवरील कल्पतरू सोसायटीत बॉम्ब ठेवल्याची माहिती नियंत्रण कक्षाला सोमवारी सायंकाळी 5 वाजता मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढून सोसायटीची तपासणी केली. मात्र बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

लखनऊ - लखनऊमधील मंत्रालयात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. दुसऱ्या मजल्यावरील बापू भवनमध्ये ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच इमारत रिकामी करण्यात आली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बापू भवनमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांना लगेच बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.श्रीनगर - काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत एकमेव अतिरेक्याला मारण्यात यश आले. त्यावेळी सुरक्षा दलांवर स्थानिक लोकांनी जोरदार दगडफेक केली. त्यावेळी सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन नागरिकांचा मृत्यू झाला, १८ जण जखमी झाले.घटनास्थळाहून काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. एकमेव अतिरेक्याला ठार मारण्यात आले आहे. कारवाईत एक जवान जखमी झाला आहे. मारल्या गेलेल्या तिघांचे वय २0 च्या आसपास आहे. अतिरेक्याला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी तेथे दगडफेक होत होती.दहशतवाद्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने चदुरा भागात दरबाग परिसराला घेरले. मोहीम सुरू असताना अतिरेक्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
मारल्या गेलेल्या तीन जणांमध्ये जाहीद डार, सादिक अहमद आणि इशफाक अहमद वाणी यांचा समावेश आहे. 

इशारा देऊनही हाती दगड

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यापूर्वीच येथील आंदोलकांना इशारा दिला होता की, दहशतवादविरोधी आंदोलनात येथील तरुणांनी हस्तक्षेप करू नये. एन्काउंटर स्थळापासून तीन कि.मी.च्या परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतरही तरुण येथे हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येत आहे.पुणे - स्वाईन फ्लूमुळे पुण्यात सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुण्यातच राहणारे होते. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूच्या २४ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ८ रुग्ण पुण्यातील रहिवासी होते, तर इतर शहराच्या आसपासच्या भागातून, तसेच जवळच्या जिल्ह्य़ांमधून उपचारांसाठी पुण्यात आले होते.सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे दिसत असताना अनेकदा ४-५ दिवस घरीच उपचार घेऊन पाहण्याकडे रुग्णांचा कल असतो. परंतु सध्याच्या स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावात आजार अंगावर काढणे टाळून लक्षणे दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरी सल्ला घ्या, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. ज्या रुग्णांना सर्दी-खोकला व उलटय़ा-जुलाब ही लक्षणे एकत्रितपणे दिसत असतील त्यांच्यावर उपचार करतानाही स्वाइन फ्लूची शक्यता डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवी, असे सांगण्यात आले आहे.

पुण्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या चार मृत्यूंमध्ये एका ८ वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. २३ मार्च रोजी तिची स्वाईन फ्लूसाठी चाचणी करण्यात आली होती, तर २७ मार्चला तिच्या आजाराचे निदान झाले, परंतु त्यापूर्वीच- २३ मार्चलाच तिचा मृत्यू झाला. तिला कोणतेही इतर आजार नव्हते, तसेच तिच्या उपचारांनाही उशीर झाला नव्हता, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मृतांमध्ये ३६ वर्षे व ३८ वर्षांच्या दोन तरुणांचा व एका ४७ वर्षांच्या पुरूष रुग्णाचाही समावेश आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात १३५ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यातील २४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या २९ स्वाईन फ्लू रुग्ण शहरात विविध रुग्णालयांत दाखल असून त्यातील १६ रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.

हे लक्षात ठेवा

* प्रत्येक सर्दी-खोकला स्वाईन फ्लू नसतो, परंतु आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.

* फ्लूवरील उपचारांना प्रयोगशाळा तपासण्यांची गरज नाही.

* डॉक्टरी सल्ल्याने औषध सुरू करण्याबरोबर दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात मीठ-हळद टाकून गुळण्या करा. गरम पाण्याची वाफही घ्या, तसेच विश्रांती आवश्यक.

* सर्वानी तोंडावर मास्क वापरण्याची गरज नाही. सामान्य व्यक्तींसाठी चार पदरी हातरूमाल पुरेसा असतो.ऑनलाईन - टोबी मॅग्वॉयर, अँड्रय़ू गारफिल्ड या दोन चेहऱ्यांचा पीटर पार्कर आणि त्यांच्या ‘स्पायडरमॅन’ अवताराच्या गोष्टी पाहिल्यानंतर हिच चित्रपट मालिका पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी स्पायडरमॅनच्या मुखवटय़ामागचा चेहरा अभिनेता टॉम हॉलंड याचा आहे. तर या तिसऱ्या अभिनेत्याबरोबर जिवंत झालेला ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ हा चित्रपट ७ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांनी अभिनव योजना आखली असून पहिल्यांदाच या चित्रपटाचा प्रोमो मराठीसह दहा भारतीय भाषांमध्ये करण्यात येणार आहे.‘स्पायडरमॅन : होमकमिंग’चा अधिकृत प्रोमो मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, गुजराती, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, कन्नड आणि बंगाली अशा दहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाचे निर्माते असलेल्या ‘सोनी पिक्चर्स’ने घेतला आहे. दरदिवशी एक याप्रमाणे या दहा भाषांमधील प्रोमो प्रदर्शित होणार आहेत. ‘स्पायडरमॅन चित्रपट मालिकेला भारतीय प्रेक्षकांकडून नेहमीच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. याआधीच्या प्रत्येक चित्रपटाने भारतीय तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे ‘स्पायडरमॅन होमकमिंग’मधून नव्या स्पायडरमॅनची ओळख प्रेक्षकांना होत असताना एक आपलेपणा वाटावा या हेतूने प्रत्येक भाषेत प्रोमो प्रदर्शित करण्याचा निर्णय ‘सोनी पिक्चर्स’ने घेतला आहे’, अशी माहिती ‘सोनी पिक्चर्स एंटरटेन्मेट’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक कृष्णानी यांनी दिली.

‘स्पायडरमॅन’चा हा नवा अवतार त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा अधिक भव्य आणि पूर्णपणे वेगळा असणार आहे. ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ या संकल्पनेंतर्गत जिथे ‘माव्‍‌र्हल’चे अनेक सुपरहिरो चित्रपटांमधून एकत्र आले आहेत. त्याच संकल्पनेत स्पायडरमॅनचाही समावेश झाला आहे. त्याची झलक गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कॅ प्टन अमेरिका सिव्हील वॉर’मध्ये पहायला मिळाली होती. या चित्रपटात मूळ ‘अ‍ॅव्हेंजर्स सुपरहिरोज’बरोबर माव्‍‌र्हलच्या अँटमॅन आणि स्पायडरमॅन या दोन्ही सुपरहिरोंचा समावेश करण्यात आला होता.मुंबई - ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना जयपूरपासून ते कोल्हापूपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सहकाऱ्यांना लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले आहे. चित्रीकरणस्थळी येऊन मारहाण करण्यापासून ते सेट जाळण्यापर्यंत अनेक वाईट अनुभवातून सध्या भन्साळी जात असून चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी याविरोधात वेगवेगळ्या माध्यमांतून असंतोष व्यक्त केला आहे. मात्र, खुद्द भन्साळी यांनी या प्रकरणावर काही न बोलणे पसंत केले होते. अखेर, आपला चित्रपट हा महाराणी पद्मावतीसारख्या शूर राजपूत वीरांगनेने दिलेल्या धारदार लढय़ाची कहाणी आहे, असे सांगत भन्साळी या प्रकरणी बोलते झाले आहेत.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांच्यात प्रेमसंबंध दाखवण्यात येणार असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. मात्र असे काहीही आपल्या चित्रपटात दाखवण्यात येणार नसल्याचे वारंवार स्पष्ट करूनही आपल्याला विनाकारण अशा प्रकारच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे, अशी खंत भन्साळी यांनी व्यक्त केली आहे. माझ्या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात चुकीच्या कल्पना आहेत. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हा चित्रपट बनवण्याआधी महाराणी पद्मावती यांच्याबद्दल उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती, संदर्भ गोळा केले आहेत. माझ्या पटकथेत कुठेही पद्मावती आणि खिलजी यांच्यात प्रणय प्रसंग रंगवण्यात आलेला नाही किंवा त्यांच्यात प्रेम दाखवणारे कुठलेही काल्पनिक गाणेही चित्रपटात नाही, असे भन्साळी यांनी स्पष्ट केले.
एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून माझा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास आहे. मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेत असताना त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव, त्याचे भानही मला आहे. या चित्रपटातून कुठल्याही समुदायाच्या भावनांना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, असे सांगत चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा संपूर्ण मेवाडला या चित्रपटाबद्दल गर्व वाटेल, असा विश्वासही भन्साळी यांनी व्यक्त केला.मुंबई - ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक’ हा चित्रपट ३१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी या चित्रपटाच्या गीतांना रसिकांची जोरदार पसंती मिळत आहे. ‘नगरसेवक’ चित्रपटात आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी गायलेले ‘हळद लागली’ हे हळदी गीत अल्पावधीत सुपरहिट ठरले असून, टीव्ही, रेडिओ आणि समारंभामध्ये हे गीत चांगलेच गाजत आहे. सोशल मीडियावर अकरा लाखांहून अधिक लोकांची पसंती या गीताला मिळाली आहे. गीतकार बिपीन धायगुडे आणि अभिजित कुलकर्णी लिखित या गीताला संगीतकार देव-आशिष यांनी संगीत दिले आहे.

दीपक कदम दिग्दर्शित ‘नगरसेवक’ या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, अभिजित कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयूरी देशमुख या लाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget