May 2017

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये बुधवारी सकाळी भारतीय दुतावासाशेजारी बॉम्बस्फोट झाला आहे. भारतीय दूतावासातले अधिकारी, कर्मचारी सुरक्षित असून स्फोटामुळे केवळ दूतावास इमारतीच्या काचांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.मोदी-मर्केल यांच्यात द्विपक्षीय चर्चा

बर्लिन - भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशातील संबंधांच्या फलश्रुतीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदी यांनी व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा व दहशतवाद अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी मर्केल यांच्या उपस्थितीत सांगितले की, दोन्ही देशातील संबंध वेगाने वाढत असून त्यांची दिशा सकारात्मक व स्पष्ट आहे. भारत जर्मनीला सक्षम भागीदार देश मानतो.दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात सायबर गुन्हेगारी, विकास कार्यक्रम, शाश्वत शहर विकास, कौशल्य विकास, रेल्वे सुरक्षा यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी भारत-जर्मन कें द्राची स्थापनाही केली जाणार आहे. मर्केल यांनी सांगितले की, भारत हा विश्वासू भागीदार आहे हे सिद्ध झाले आहे, दोन्ही देशांचे सहकार्य वाढत आहे.दहशतवादाबाबत मोदी यांनी सांगितले की, मानवतावादी शक्तींनी या आव्हानाविरोधात एकजूट केली पाहिजे. भारत व जर्मनी यांच्यात द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांची दिशा निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यात आज चौथ्या फेरीची आंतरसरकारी चर्चा झाली. मोदी यांचे लष्करी सलामीत स्वागत करण्यात आले. त्यांचे मर्केल व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.मोदी यांनी त्यांच्या शिष्टमंडळाचा परिचय मर्केल यांना करून दिला. यावेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली, मोदी हे सध्या दोन दिवसांच्या जर्मनी भेटीवर आहेत. गेली दोन वर्षे उभय देशात आंतरसरकारी पातळीवर चर्चा होत आहे. आजच्या चर्चेच्या फेरीत विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, व्यापार मंत्री निर्मला सीतारामन, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र राज्य मंत्री एम.जे. अकबर उपस्थित होते. यापूर्वीची चर्चा ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. युरोपीय समुदायात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतात जर्मनीच्या १६०० कंपन्या असून ६०० संयुक्त प्रकल्प आहेत. मर्केल व मोदी यांची इंडो-जर्मन बिझीनेस शिखर बैठकीत व्यापार उद्योगधुरिणांशी चर्चा झाली. भारताच्या दृष्टीने जर्मनीशी आर्थिक हितसंबंध दृढ करणे महत्त्वाचे आहे असे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.ठाणे - ‘घरातील स्नानगृहात आंघोळ करत असताना मोबाइलद्वारे चोरून चित्रीकरण करणाऱ्या आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तेथे महिला पोलिसाऐवजी पुरुष कर्मचाऱ्याने तक्रार घेतली आणि माझ्यासमोरच त्याने व अन्य कर्मचाऱ्यांनी ‘ते’ चित्रीकरण वारंवार पाहिले. पोलिसांच्या या कृत्यामुळे माझा सातत्याने विनयभंग होत असल्याचे वाटले,’..
अश्लील चित्रीकरणाचा बळी ठरलेल्या पीडित महिलेचे हे उद्गार पोलीस यंत्रणेच्या पुरुषी मानसिकतेचे उदाहरण आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
ठाणे येथील चितळसर-मानपाडा भागातील शिवाजीनगर येथे राहणारी ही महिला (वय ३१) १५ मे रोजी सकाळी स्नानगृहात आंघोळ करत असताना शैलेश येंडे हा खिडकीतून तिचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करत होता. हा प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने त्याला पकडून त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. येंडे याने तेथून पलायन केले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व शैलेश याला अटकही करण्यात आली. परंतु, पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना आलेला अनुभव आपले चित्रीकरण होत असल्याच्या अनुभवापेक्षाही भीषण होता, अशा शब्दांत सदर महिलेने प्रसारमाध्यमांकडे आपली व्यथा मांडली.
‘या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गेले. घटनेचा पुरावा म्हणून आरोपीचा मोबाइल मी पोलिसांच्या स्वाधीन केला. परंतु, तेथे उपस्थित असलेले कर्मचारीच हे चित्रीकरण वारंवार पाहात होते. माझ्यासोबत विनयभंगची घटना एकदाच घडली होती. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे तो प्रकार माझ्यासोबत सातत्याने घडत होता,’ असे ती म्हणाली.

लखनऊ - ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच रेल्वे पोलिसांपैकी एकावर धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून पीडित महिला मेरठ येथे राहणारी असून ती लखनऊ-चंदीगड एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली.तिने चंदपूर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडली होती. पीडित महिला ज्या डब्ब्यामध्ये बसली होती. आरोपी सुद्धा तिथेच होता. तो जबरदस्तीने तिला रिकाम्या डब्ब्यात घेऊन गेला तिथे त्याने बलात्कार केला असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ट्रेन बिजनौर रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर लोकांनी आरोपी जीआरपी पोलीसाला पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. 
महिलेच्या तक्रारीवरुन आम्ही आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे असे रेल्वे पोलीस अधिकारी रवी मोहन शर्मा यांनी सांगितले. जीआरपी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काम करते. ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

नाशिकरोड - कर्जाला कंटाळून शिंदे गावातील शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़२९) घडली़ नामदेव देवराम झाडे (६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी रविवारी (दि़२८) विषारी औषध सेवन केले होते़ शिंदे गावातील शेतकरी नामदेव झाडे यांनी रविवारी विषारी औषध सेवन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी नामदेव झाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (दि. २९) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ नामदेव झाडे याची दीड एकर शेती असून, त्यांच्यावर सोसायटीचे ७० हजार रुपयांचे कर्ज होते़ झाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

दिंडोरी (नाशिक) - नाशिकमधील कोकणगाव येथे मंगळवारी (30 मे) मध्यरात्री एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा अशा एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके आणि हर्षद जगन शेळके अशी मृतांची नावं आहेत. 
दरम्यान, या तिघांची हत्या करण्यामागील कारणं अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसंच घटनास्थळ आणि आसपास परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वणी पोलीस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.

नागपूर - शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करून गुंडांवर अंकुश लावण्याची भाषा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरत असले तरी कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठांना दाद देत नाहीत. ते वरिष्ठांच्या आदेशांना न जुमानता कुख्यात गुंडांची साथ देतात. वाडी पोलीस कुख्यात जर्मन जापान गुंडांच्या टोळीविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणातून याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस झाले तरी वाडी पोलिसांनी कुख्यात जर्मन जपान टोळीच्या गुंडांविरुद्ध कारवाई केली नाही.वाडी पोलीस ठाणे अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असते. ठाण्याच्या आजूबाजूला अवैध धंद्यांची रेलचेल आहे. पोलिसांनी आजूबाजूला मटका अड्डेवाले, बुकी, अवैध दारू विक्री करणारांना मूक परवाने दिले आहेत. पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे औद्योगिक कंपन्या आणि मोठमोठ्या गोदामात नेहमीच चोऱ्या होत असतात. या भागात ट्रक चालकांना शस्त्राच्या धाकावर मारहाण करून लुटण्याचे गुन्हेही नेहमीच घडतात. वाडी पोलीस तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पार पाडतात. त्यानंतर प्रकरण थंडबस्त्यात पडते. कुख्यात जर्मन जापान टोळीविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचेही असेच झाले आहे. १९ मेच्या दुपारी १.३० वाजता ते अमरावती रोड, दत्तवाडीतील श्रीराम आॅटो ब्रदर्स गॅरेज येथे संतोषसिंग काश्मीरसिंग गादरी (वय ३४, रा. नारी) हे ट्रकमालक बसून होते. तेथे कुख्यात जर्मन जपान टोळीचे गुंड कल्लू इमरान खान (वय ३५), सोनू शर्मा (वय २८) आणि त्याचे सशस्त्र साथीदार स्वीफ्ट डिझायर कार (एमएच ३१/ सीआर २८६२) ने आले. त्यांनी आम्हाला एक लाख रुपये खंडणी दे, अन्यथा तुझा आयशर ट्रक सिझिंग करून आम्ही घेऊन जाऊ’ अशी भीती दाखविली. एवढेच नव्हे तर गादरी यांच्याकडून जबरदस्तीने घटनास्थळी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना एका एटीएम सेंटरमध्ये नेऊन तेथून पाच हजार रुपये काढण्यास भाग पाडले.हे दहा हजार रुपये हिसकावून घेतल्यानंतर आरोपींनी गादरी यांना धाक दाखवून जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवून कळमन्यातील महालगाव (कापसी) येथे नेले. तेथून गादरी यांचा आयशर ट्रक घेऊन गेले. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे गादरी गप्प बसले.याच दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जर्मन जपान टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करून शमसुन्निसा नामक निराधार महिलेला तिची जमीन परत करण्यास मदत केली. हे वृत्त कळल्यामुळे गादरी यांनी २२ मे रोजी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली. तिची शहानिशा केल्यानंतर एसीपी वाघचौरे यांनी वाडी पोलीस ठाण्यात यासंबंधाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

डोंबिवली - आयरे गावात मंगळवारी भर दिवसा एका तरुणाची हत्या झाली. विक्रांत ऊर्फ बाळू केणे (२६) असे या तरुणाचे नाव असून, तो युवा सेनेचा पदाधिकारी आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असला तरी रस्त्यात उभी असलेली गाडी बाजूला घेण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.विक्रांत हा डोंबिवली येथील आयरे गावात राहत होता. मंगळवारी दुपारी याच गावात तो कारने जात होता. या रस्त्याच्या मधोमध जेसीबी उभा असल्याने त्याला कार पुढे नेणे शक्य होत नव्हते. परिसरातील एका खासगी कामासाठी जेसीबी आणण्यात आला होता. त्यामुळे त्याने मंगेश भगत या तरुणास जेसीबी बाजूला काढण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. मात्र, या वादाच्या रागातून मंगेशने काही साथीदारांसह विक्रांतचे घर गाठले. तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादातून मंगेशने विक्रांतवर गोळी झाडली. त्यात विक्रांतचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंगेशसह त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला.विक्रांतचा मित्र वरुण शेट्टी याने हा सर्व प्रकार पाहिला असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी सांगितले.भार्इंदर - मीरारोेडच्या कनकिया पालिका कार्यालयापासून मंगलनगर नाक्यापर्यंतचा काँक्रीटचा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालिका व विकासक यांच्यातील वादातून हा रस्ता रखडला असुन पावसाळ््यात तर लोकांचे आणखीन हाल होणार आहेत.पालिकेने कनकिया व हाटकेश भागातील रस्ते हे टीडीआर (विकास हक्क हस्तांतरणा)च्या माध्यमातून काँक्रीटीकरणास घेतले आहेत. रस्ते काँक्रीटीकरणा करुन देण्याच्या बदल्यात पालिका रवी बिल्डरला टीडीआर देणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे काम पूर्ण होण्यापूर्वीच पालिकेने टीडीआर दिलेला आहे. रस्त्याच्या मोबदल्यात टीडीआर देणे चुकीचे असून विकासकाने रस्त्याची केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद सामंत, शिवसेनेचे सुलतान पटेल आदींनी केल्या आहेत. या घोटाळ्याकरिता विकासकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रवी बिल्डर रस्त्यांची कामे वेळेत करत नसल्याबद्दल यापूर्वी देखील पालिकेने त्याला नोटिसा बजावल्या आहेत. कनकिया येथील पालिकेच्या नगररचना कार्यालयापासून मंगल नगरपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करण्यासाठी खोदून ठेवण्यात आला. गेल्या वर्षभरापासून हे काम रखडले आहे. एका मार्गीकेचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु उर्वरीत काम बंद आहे.सुनील तटकरे यांचा दावा; पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

कराड - पश्चिम महाराष्ट्रातील तीन खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा असून, कोणाकडूनही पक्षांतर होणार नसल्याचा दावा करताना, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांकडून वारंवार प्रयत्न केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली. येत्या १ जूनपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर काढण्यात येणाऱ्या दौऱ्यात लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यासाठी संघर्षांची तयारी असल्याचे तटकरे म्हणाले.
या वेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने इथे राष्ट्रवादीचा निवडणुकीने पराभव करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने विरोधकांकडून राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जनतेत संभ्रम निर्माण केले जात आहेत. पण, अशा भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात बलाढय़ पक्ष असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे तीन खासदार भाजपाच्या संपर्कात अशा अफवा पसरविल्या जात असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

भाजपा सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असून, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या अडीच वर्षांत १० हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाला भाव नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आहे. सहकार चळवळ मोडीत निघाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे कोणीतरी आपल्या पाठीशी आहे. ही भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. यावर राज्य सरकारी झोप उडाली आहे. कायम शेतकऱ्यांचा दुजाभाव करणारे हे सरकार संवाद यात्रा काढत आहे. यात आमच्या संघर्ष यात्रेचे फलित असल्याचे ते म्हणाले.

नवी मुंबई - नवी मुंबईचे सिंगापूर होवू शकते, त्याकरिता नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदलाची गरज माजी मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. नाईक कुटुंब भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत असतानाच मंगळवारी वाशीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी पक्ष वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येवर जागतिक पर्यावरण दिनी प्रभागनिहाय स्वच्छता करून वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.बेलापूर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच चार दिवसांपूर्वी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा वाशीत कार्यकर्ता मेळावा घोषित करण्यात आला होता. यामुळे सदर मेळाव्यात नाईक कुटुंब कोणत्या प्रकारचा राजकीय स्फोट करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात मात्र मंगळवारी वाशीतील भावे नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात तसे काहीच घडले नाही. माजी मंत्री गणेश नाईक यांनी कोणतेही राजकीय भाष्य न करता केवळ उपस्थितांना मानसिक बळ देत शिस्तीचे धडे दिले. नवी मुंबईचे सिंगापूर अथवा दुबई होवू शकते, फक्त त्याकरिता प्रत्येकाने आपल्या मानसिकतेमध्ये बदल घडवायला हवा, असे ते म्हणाले. काही सेकंदासाठी सिग्नलवर वाहन थांबले असता, पाठीमागून हॉर्न वाजवणाऱ्यांनी संयम बाळगायला हवा, अन्यथा वाहन चालवताना केलेली घाई प्राणावर बेतू शकते हे त्यांनी काही उदाहरणांसह सांगितले. हेच सामाजिक भान प्रत्येकाने जपण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याशिवाय १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असल्याने, ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या संध्येवर प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवण्याच्या व प्रत्येकी एक झाड लावण्याच्याही सूचना गणेश नाईक यांनी केल्या. भविष्यात पैसा अथवा संघटन यावरच राजकारण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून जनतेच्या सेवेत सदैव उपलब्ध राहावे. जमेल त्या पध्दतीने त्यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय तसेच कौटुंबिक समस्या सोडवाव्यात, तरच जनता तुम्हाला पैसे धुडकारून आपलेसे करतील हे सांगत नाईक यांनी त्यांच्या १९९५ सालच्या विक्रमी विजयाचे उदाहरण दिले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार यांच्यासह इतर नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.मालेगाव - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या मुस्लिमबहुल भागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर मात केली असून हिंदूबहुल भागात शिवसेना व भाजपमध्ये रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत गतवेळीपेक्षा अधिक यश मिळविणाऱ्या सेनेची देखील सरशी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालिन आमदार राष्ट्रवादीचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासारख्या धार्मिक वलय लाभलेल्या नेत्याला पराभवाची धुळ चारण्याची किमया साधणारे काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांनी मालेगाव मध्य मतदार संघातील आपला करिश्मा कायम असल्याचे अधोरेखित केले आहे. दुसरीकडे अलीकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पडझडीद्वारे धोक्याचा इशारा मिळालेले ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी महापालिका निवडणुकीत ‘पुनरागमन’ करत मालेगाव बाह्य़ मतदार संघात शिवसेनाच वरचढ असल्याचे सिध्द केले आहे.
मालेगाव शहराची दोन विधानसभा मतदार संघात विभागणी झाली आहे. प्रामुख्याने मुस्लिमबहुल भाग मध्य तर हिंदूबहुल भाग बाह्य़ मतदार संघात मोडतो. मुस्लिमबहुल मध्य मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने प्राबल्य सिध्दतेसाठी चढाओढ असते. काही प्रमाणात धर्मनिरपेक्ष जनता दल तसेच विशिष्ट भागात एमआयएम या पक्षांचाही तेथे प्रभाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितरित्या धोबीपछाड दिला होता. आगामी काळात हे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकीच्या यशासाठी महापालिका ताब्यात असणे हे खचितच महत्वाचे असल्याने कोणत्याही स्थितीत पालिकेतील सत्ता टिकविणे ही राष्ट्रवादीची गरज आहे. त्याच अपरिहार्यतेतून कट्टर राजकीय हाडवैर विसरत सत्ताधारी राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्ष जनता दलाशी पालिका निवडणुकीत युती केली. कधीकाळी शहरात मोठा दबदबा असलेल्या जनता दलाचा प्रभाव गेल्या काही दिवसांत उतरणीला लागला होता. त्यामुळे जनता दलालाही अशा युतीच्या ‘बुस्टर’ची गरज होती. या युतीने मग काँग्रेसला आसमान दाखविण्याचा चंग बांधला खरा, पण त्यांचा हेतू काही साध्य होऊ शकला नाही.

मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयातील एका सनदी ‌अधिकाऱ्यांसह नऊ बड्या अधिकाऱ्यांनी शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या असून, त्या जमिनी नव्याने होऊ घातलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी मुंबईत केला. तसेच राज्यातील तमाम शेतकऱ्यांचा सात बारा महिन्याभरात कोरा करावा अन्यथा मोठ्या शहरांचा दूध-भाजीपाला पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी सरकारला दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी २२ जानेवारीपासून पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून निघालेल्या आत्मक्लेश यात्रेचा समारोप मंगळवारी भायखळ्यात झाला. त्यावेळी झालेल्या सभेत खा. शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकून टीका केली. आत्मक्लेश यात्रेमुळे दादरपासून मंत्रालयाच्या दिशेने येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक पूर्ण कोलमडून पडली होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत असा आरोप त्यांनी केला.

मुंबई - नालेसफाईची मुदत संपण्यास अवघे २४ तास उरले आहेत. यामुळे मुंबईत ९५ टक्के नाले साफ झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे. मात्र प्रत्यक्षात ठेकेदार नालेसफाईचे काम व्यवस्थित करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे. याविरोधात पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज एकमताने तहकूब करण्यात आली. ठेकेदार मिळत नसल्याने या वर्षी नालेसफाईला रडतखडत सुरुवात झाली. तरीही नालेसफाई दिलेल्या मुदतीत होणार असे प्रशासन छातीठोकपणे सांगत आहे. पालिकेच्या या दाव्यातील सत्य काँग्रेसने सोमवारी पाहणी दौऱ्यातून उजेडात आणले. नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत, अनेक नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवातही झालेली नाही. नाल्यांतून काढलेला गाळ नाल्यांच्या तोंडावर ठेवला जात आहे. ठेकेदारावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.

मुंबई - शेतक-यांची कर्जमाफी आणि रोजगार निर्मितीसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जे वक्तव्य केले त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेने सुद्धा या दोन मुद्यांवर जनतेकडे मते मागितल्याची त्यांनी कबुली दिली आहे. 
अयोध्येत राम मंदिराची उभारणी हे अजूनही फक्त आश्वासनच आहे तसेच शेतक-यांची कर्जमाफी आणि रोजगारनिर्मिती या दोन्ही वचनांचे आता राममंदिर झाले आहे अशी टीका उद्धव यांनी केली आहे. आश्वासने आणि वचने म्हणजे निवडणुका जिंकण्याचे जुमलेच झाले असतील तर जनतेचा निवडणुकांतील भाषणे आणि राजकारण्यांवरचा विश्वास उडून जाईल असे लेखात म्हटले आहे. कर्जमुक्ती व रोजगार देणे शक्य नाही असे सांगणे हे परखड असले तरी आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडण्यासारखे आहे अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मुंबई - अवैध फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका खासगी संस्थांची मदत घेणार आहे. कारवाईसाठी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागल्याने पालिकेने खासगी संस्थांना जाहिरातीद्वारे आवाहन केले आहे.
शहरात व उपनगरातील फेरीवाल्यांवर पालिकेतर्फे कारवाई सुरू केली जाते. मात्र कारवाईत सातत्य नसल्याने फेरीवाले पुन्हा बस्तान बसवतात. काही विभागांमध्ये फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. या तुलनेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते. याची दखल घेऊन पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाईसाठी खासगी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. लॉटरी पध्दतीने या कामगारांची निवड करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व विभागातील बेकायदा फेरीवाल्यांवर वेगाने कारवाई करण्यास या संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या कामगारांना रोज ५०० रुपये भत्ता दिला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

ऑनलाईन - कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि भन्नाट परफॉर्मन्स यामुळे कुशल बद्रिके महाराष्ट्राचा लाडका बनला आहे. विविध स्कीटच्या माध्यमातून कुशल असा काही परफॉर्मन्स देतो की रसिकांसोबत सेलिब्रिटीही त्याच्यावर फिदा झालेत. छोट्या पडद्यावरील विविध कॉमेडी शो, मालिकासोबतच त्याने सिनेमातही काम केलं आहे. आता सा-यांचा लाडका असणा-या कुशलचं रसिकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दर्शन होणार आहे. एका नव्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये कुशल सध्या बिझी झाला आहे. खुद्द कुशलनंच ही गुडन्यूज रसिकांना दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या नव्या आणि आगामी सिनेमाची बातमी त्याने रसिकांसोबत शेअर केली आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा खास फोटोही कुशलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुशलचा आगळा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. स्कीटमध्ये गावरान भूमिका कुशलनं मोठ्या खुबीनं साकारल्या आहेत. आता या सिनेमातही कुशलचा गावरान अंदाज रसिकांना पाहायला मिळणार आहे. गावरान लूकमधला फोटो त्यानं आपल्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. तुमच्या शुभेच्छा सदैव सोबत असू द्या अशी कॅप्शनही कुशलने या फोटोला दिली आहे. कुशलनं आपल्या या नव्या सिनेमाची ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर करताच रसिकांकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे.

नवी दिल्ली - नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे. सध्या तोटयात असलेल्या एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक केली तर, सरकारचा पैसा वाचेल आणि तोच पैसा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी वापरता येईल असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
या अहवालामुळे केंद्र सरकारला निर्गुतवणूकीची प्रक्रिया सुरु करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा नुकसानीमध्ये चालणा-या एअर इंडियाच्या विक्रीला पाठिंबा दिला आहे. एअर इंडियासंबंधी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 
निती आयोगाने एअर इंडियासंबंधी चौथा अहवाल सरकारला दिला असून त्यामध्ये निर्गुतवणूकीच्या प्रक्रियेच्या रोडमॅप असू शकतो. एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज असून, 21 हजार कोटींचे कर्ज विमानासंबंधी तर, 8 हजार कोटींचे भांडवली कर्ज आहे. एअर इंडियाच्या नव्या मालकाकडे ही दोन्ही कर्जे ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एअर इंडियाला आतापर्यंत 40 हजार कोटींचा तोटा झाला असून, चालू आर्थिकवर्षात 3 हजार कोटी रुपयांच्या रोख रक्कमेची कमतरता भासणार आहे. 2015-16 वर्षात एअर इंडियाचे ऑपरेटींग नफा 105 कोटी होता. पण नफ्याचा हा आकडा कायम राहणार नसल्याचा अंदाज आहे. मागच्या पाचवर्षात एअर इंडिया चालवण्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपये खर्च केले असून, पुढच्या काहीवर्षात इतकीच रक्कम खर्च करावी लागणार आहे. केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री गजपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी निती आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. पण त्या काय आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही. आम्हाला एअर इंडियाचा अभिमान असून सर्व पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. एअर इंडियाला व्यवहार्य बनवण्यासाठी निती आयोगाने काही कठोर उपाय सुचवले आहेत असे राजू यांनी सरकारच्या तिस-यावर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मदुराई - कत्तलीसाठी गुरांची खरेदीविक्री करण्यावर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला चेन्नई उच्च न्यायालयाने मंगळवारी चार आठवड्यांची स्थगिती दिली. या प्रकरणी हंगामी आदेश देताना, चार आठवड्यांत यावर उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. दरम्यान, राज्यांनी तसेच व्यापारी संघटनांनी मांडलेल्या मुद्द्यांचा सरकार अभ्यास करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.
कत्तलखान्यांना अथवा धार्मिक कार्यात बळी देण्यासाठी बैल, गायी, उंट या प्राण्यांची खरेदीविक्री करण्यास बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका चेन्नई उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठापुढे सुनावणीसाठी आल्या आहेत. हा नियम राज्यघटनेचा भंग करणारा आहे, संघराज्याच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारा आहे तसेच प्राण्यांशी क्रूर वागणुकीविरोधी कायदा १९६०शी विसंगत आहे, अशी भूमिका घेत या नियमाला आधी संसदेची मंजुरी घ्यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यावर न्या. एम. व्ही. मुरलीधरन आणि सी. व्ही. कार्तिकेयन यांचा समावेश असलेल्या पीठाने हे आदेश दिले.

रत्नागिरी - केरळमध्ये दाखल झालेला मान्सून अद्याप महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी, तळकोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. कोकणाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला असून, इथल्या नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे या दोन जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. 
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विशेषकरुन किनारपट्टी भागात पावसाचा जोर जास्त आहे. पावसाच्या सरींमुळे मागच्या तीन-चार महिन्यांपासून उकाडयाने हैराण झालेल्या इथल्या जनतेला दिलासा मिळाला असून, वातावरणातही सुखद गारवा निर्माण झाला आहे. कोकणाप्रमाणचे मराठवाडयात बीडमध्ये वादळी वा-यासह पाऊस सुरु आहे. सांगलीतही पावसाची संततधार सुरु आहे. 

मान्सून ईशान्येकडील राज्यांतही धडकला असून, याचे श्रेय मोरा वादळाला आहे. मान्सून केरळात १ जूनला येतो. मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा सध्या कोची, तोंडी, ऐझवाल, कोहिमा आणि देवमाळी येथून जात आहे. येत्या २४ तासांत मोरा वादळामुळे ईशान्येच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल व तो त्यानंतर कमी होईल.
मान्सून अंदमानच्या समुद्रात 14 मे रोजी दाखल झाल्यानंतर 1 जून आधीच मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मान्सून अंदमानच्या समुद्रात 20 मे पर्यंत पोहोचतो पण यंदा काहीदिवस आधी मान्सूनचे आगमन झाले. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडयाभराने महाराष्ट्रात दाखल होतो. मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक वातावरण राहिले तर, 4 ते 5 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. यंदाच्यावर्षी पुरेसा पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे बळीराजा, सरकार आणि उद्योगजगताची चिंता कमी झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मान्सूनच्या पावसावर अंवलबून आहे.

नवी दिल्ली - दहशतवादाच्या आरोपांवरून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) हवा असलेला वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक हा मलेशियाचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात असून त्याने त्यासाठी अर्ज केल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली.
नाईक सध्या कुठे आहे याचा ठावठिकाणा नसून त्याच्याविरोधात रेडकॉर्नर नोटीस काढण्याची मागणी एनआयएने इंटरपोलकडे केली आहे. तेव्हापासून नाईक संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया तसेच आफ्रिकी आणि आग्नेय आशियायी देशांमध्ये सातत्याने आपला मुक्काम हलवत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मलेशियाने त्याला कायमस्वरूपी निवासाचा दर्जा दिल्याचे समजते. त्याने आता त्या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, मात्र याबाबत तेथील यंत्रणांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे समजते.

नाशिक - जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास सोमवारी (दि.२९) झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.दरम्यान, कपात करण्यात आलेल्या विभागांमध्ये प्रामुख्याने बांधकाम, लघुपाटबंधारे व कृषी विभागातील योजनांचा समावेश आहे. मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी असलेली पाच लाखांची तरतूद वाढवून २० लाख करण्यात आली, तर ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी असलेली चारचाकी वाहन खरेदी योजना याही वर्षी धरण्यात येऊन त्यात एक कोटींनी वाढ करून या योजनेसाठी दोन कोटींचा निधी ठेवण्यात आला. पदाधिकारी व अधिकारी निवासस्थान व कार्यालय दुरुस्तीवरील धरण्यात आलेल्या एकूण तरतुदीत एक ते दीड कोटींनी कपात करण्यात येऊन हा निधी रस्ते व बंधारे दुरुस्तीसाठी तीन लाखांनी वाढविण्यात आला. अध्यक्षस्थानी शीतल उदय सांगळे होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती अर्पणा खोसकर, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज वितरणाचा आढावा घेण्यात आला. कंपनीकडील असलेल्या तक्रारींचा ओघ पाहून स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात मुद्रांक, वाहन व व्यवसाय करापोटी एकूण २७ कोटी ६१ लाख जमा होणार असल्याचे स्पष्ट केले. एकूण जमेच्या बाजू धरून ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२चा अर्थसंकल्प सादर केला. खर्चाच्या बाजू मांडताना डॉ. कुंभार्डे, धनराज महाले, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन पगार, नितीन पवार, उदय जाधव, भास्कर गावित, हिरामण खोसकर यांनी अधिकारी निवासस्थान तसेच कार्यालय दुरुस्तीसाठीच्या एक कोटी ३० लाखांपैकी ६५ लाखांच्या खर्चात कपात करून निधी सेसकडे वळविला.मध्यवर्ती ठाण्यात सर्वाधिक धोकादायक इमारती

ठाणे - गेल्या अनेक वर्षांपासून अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींच्या आकडेवारीमध्ये आघाडीवर असलेल्या कळवा, मुंब्रा तसेच वागळे परिसराला यंदा शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा विभागाने मागे टाकल्याची बाब पुढे आली आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात ६९ अतिधोकादायक तर ९१ धोकादायक इमारती असल्याची यादी प्रशासनाने जाहीर केली असून त्यापैकी एकटय़ा नौपाडा विभागात ३२ अतिधोकादायक तर २१ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. या भागातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.मान्सून काळात धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून शहरात घडत आहेत. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. तसेच या इमारती रिकाम्या करून त्या पाडण्याची कारवाई करण्यात येते. यंदाही प्रशासनाने अशा प्रकारची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ३ हजार ६९३ धोकादायक इमारती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या इमारतींचे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या गटात अतिधोकादायक तर उर्वरित तीन गटात धोकादायक इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये ६९ इमारतींचा समावेश आहे तर धोकादायक इमारतींच्या पहिल्या गटाच्या यादीत ९१ इमारतींचा समावेश आहे. पावसाळ्यामध्ये या इमारती कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने या इमारती रिकाम्या करण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच अतिधोकादायक इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. उर्वरित धोकादायक इमारतींच्या दोन गटांमध्ये एकूण ३ हजार ५३३ इमारतींचा समावेश असून या इमारतींची महापालिका अधिकारी तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. वागळे, कळवा तसेच मुंब्रा भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती असून त्यापैकी अनेक इमारती धोकादायक झाल्याचे महापालिकेच्या पाहणीतून यापूर्वीच समोर आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी जाहीर करण्यात येणाऱ्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये हे तीन विभाग आघाडीवर असायचे. मात्र, यंदाच्या यादीमध्ये नौपाडा विभाग आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

मुंबई - मालाड येथील कुरार गाव परिसरात असलेल्या एफ. ई. दिनशॉ ट्रस्टच्या जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्टी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये उद्योगपती नेस वाडिया, नस्ली वाडिया यांच्यासह मौरीन वाडिया, जहांगीर वाडिया, राजेशा बात्रा, सुकांत केळकर, सुनील जैस्वाल, शिवशंकर झा, राजकुमार मिश्रा आणि व्ही. शहा यांचा समावेश आहे.
पिंपरीपाडा परिसरात एफ. ई. दिनशॉ ट्रस्टची जागा होती. १९९२ मध्ये तक्रारदार अब्दुल वाहिद खान आणि त्याचे भाऊ सैफुल्ला खान यांनी निवेदा सादर करून ही जमीन खरेदी केली होती. मात्र व्यवहार झाल्यानंतर अनेक वर्षे उलटूनही ट्रस्टने कन्वेअन्स दिला नव्हता. तसेच ट्रस्टने दोन्ही भावांच्या नावाने बनावट कागदपत्रे,स्वाक्षरी करून वाढीव पैशांची मागणी केल्याचा आरोप अब्दुल यांनी केला आहे. याविरोधात या दोन्ही भावांनी न्यायालयात दाद मागितली असता, बोरिवली न्यायालयाच्या आदेशानुसार कुरार पोलिस ठाण्यात एफ. ई. दिनशॅा ट्रस्टचे ट्रस्टी,कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी दिली.

नाशिक - त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीचा विकास आराखडा तयार करताना हरित पट्ट्याचे पिवळ्या पट्ट्यात रूपांतर करण्याचा ठराव परस्पर घुसविणाऱ्या त्र्यंबक नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच झटका दिला असून, सोमवारी त्यांची झाडाझडती घेतानाच नगरपालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे.गेल्या महिन्यापासून हा विषय गाजत असून, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा मे महिन्यात रजेवर असल्याच्या काळातच त्यांनी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यात झोन बदलाचा प्रस्ताव मंजूर केल्याचे पत्र नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. मुळातच त्र्यंबकेश्वर व परिसराचा भाग हा इको झोन तसेच ना विकास क्षेत्र म्हणून शासनाने यापूर्वीच जाहीर केला असून, नगरपालिका हद्दीला लागून असलेल्या परिसर हा हरित पट्टा आहे. असे असताना सुमारे १९४ हेक्टरमधील हरित पट्ट्याचे पिवळ्या पट्ट्यात म्हणजेच निवास क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय त्र्यंबक नगराध्यक्षांनी घेतल्याची बाब गंभीर मानली गेली. त्यातही हा सारा प्रकार नगराध्यक्षांच्या पतीने काही बांधकाम व्यावसायिकांच्या सांगण्यावरून केल्याची तक्रार त्र्यंबकेश्वरच्या जवळपास तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याचबरोबर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील नगराध्यक्षांनी दिलेल्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयावर चर्चा झालेली नसतानाही परस्पर इतिवृत्तात विषय घुसवून झोन बदलाचा निर्णय घेतल्याप्रकरणी नगराध्यक्षांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबक नगराध्यक्षांना पत्र पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते.सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी त्यांच्या पतीसह जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी ते पत्र आपलेनाहीच असा पवित्रा घेणाऱ्या लढ्ढा यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले. सुटीवर असताना पत्र कसे देऊ शकतात, अशी विचारणा करून त्यासंदर्भात कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. सायंकाळी मात्र त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने मंजुरीसाठी पाठविलेल्या विकास आराखड्याला स्थगिती देण्यात आली.

नवी मुंबई - परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी मिळालेली खुर्ची टिकवण्यासाठी कॅटमध्ये धाव घ्यावी लागली आहे. मुख्यालयासाठी बदली होवून आलेल्या उपायुक्तांनी शासनाकडून परिमंडळ दोनसाठी बदलीचे नवे आदेश आणल्यामुळे ही तेढ निर्माण झाली आहे.शासनाने एप्रिल महिन्याच्या अखेरीस केलेल्या उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दोन अधिकाऱ्यांची मुंबईत बदली झालेली आहे. त्याचवेळी शासनाने कोल्हापूर येथून आर. बनसोडे तर मुंबईतून प्रवीण पवार यांची नवी मुंबई आयुक्तालयात बदली केली आहे. त्यापैकी पवार यांचे बदली आदेश काढतानाच शासनाने त्यांची मुख्यालयाच्या उपायुक्त पदासाठी नियुक्ती केलेली होती. मात्र यानंतर काही दिवसातच पहिल्या आदेशात बदल करून शासनाने त्यांचे परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठी नवे बदली आदेश काढले आहेत. या नव्या बदली आदेशासाठी पवार यांनी जंग पछाडल्याची चर्चा आहे. परंतु पवार यांच्या सुधारित बदली आदेशाला परिमंडळ दोनचे विद्यमान उपायुक्त राजेंद्र माने यांनी कॅटमध्ये आव्हान दिले आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. डिसेंबर २०१६ मध्ये परिमंडळ दोनचे तत्कालीन उपायुक्त विश्वास पांढरे यांची बदली झाल्यानंतर राजेंद्र माने यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी ते मुख्यालय उपायुक्त पदावरच कार्यरत होते. यामुळे अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा मुख्यालयाचा कार्यभार घेण्यास त्यांनी नकार दर्शवला आहे. शिवाय परिमंडळ दोनचा कार्यभार सांभाळल्यापासून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. उपायुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी देखील नवी मुंबई आयुक्तालयात परिमंडळ दोनचे उपायुक्त पद भूषवलेले आहे. सन २००५ ते २००८ पर्यंत ते नवी मुंबई आयुक्तालयात कार्यरत होते. त्यानंतर ९ वर्षांनी ते पुन्हा नवी मुंबईत बदली होवून आले आहेत. यामुळे एकदा बदली होवून गेल्यानंतरही पुन्हा त्याच आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बदली होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतरही त्यांच्याकडून परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठीच प्रयत्न झाल्याने बदली प्रकरण वादग्रस्त ठरत आहे. वर्षभरापूर्वी काही सहायक आयुक्तांनी देखील परिमंडळ दोनच मिळावे यासाठी मंत्रालयात जोरदार वशिलेबाजी चालवली होती. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये नेमकं दडलंय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.नवी मुंबई - कोपरखैरणेतील माथाडी रुग्णालयाच्या नव्या इमारत परिसराला समस्यांनी विळखा घातला आहे. वसाहतीअंतर्गत खासगी ट्रॅव्हल्सला परवानगी नसतानाही त्याठिकाणी अवैध बसथांबा तयार झालेला आहे. त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रवासी जमत असल्यामुळे फेरीवाल्यांनीही पदपथावर अतिक्रमण केले आहे.

कोपरखैरणेत सर्वात मोठी माथाडी कामगारांची वसाहत आहे. त्यांच्या सोयीसाठी जुन्या माथाडी कामगार रुग्णालयापासून काही अंतरावरच तीन टाकी चौकालगत नवे रुग्णालय उभारण्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय सुरू होण्याच्या स्थितीत आहे. परंतु रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच त्याभोवतीचा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. वाशी हायवे, सानपाडा हायवे पाठोपाठ कोपरखैरणे तीन टाकी चौकात खासगी ट्रॅव्हल्सचा अवैध बसथांबा तयार झाला आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी ट्रॅव्हल्सच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे इतर वाहनांना रहदारीला अडथळा होत आहे. तर ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याच्या निमित्ताने त्याठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी जमा होत आहेत. याची संधी साधूनच रुग्णालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्याठिकाणी भुर्जी पाव तसेच इतर खाद्यपदार्थ उघड्यावर बनवून विकले जात आहेत. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते पहाटेपर्यंत चालणाऱ्या या फेरीवाल्यांची नागरिकांनी अनेकदा पालिकेसह पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्याशिवाय सेक्टर १५ येथील नाक्यावर देखील रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या गाड्या लागलेल्या असतात. परंतु त्यावर कारवाईऐवजी संबंधित तक्रारदारालाच दमदाटी झाल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. यामुळे त्याठिकाणचा अवैध बसथांबा व अनधिकृत फेरीवाले यांना प्रशासनच पाठीशी घालत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.पनवेल - रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत शहरी मतदारांसह ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या असतानाच, पालिकेत आपला प्रतिनिधी निवडून देताना मतदारांनी उमेदवारांच्या शिक्षणावरही विशेष लक्ष दिल्याचे उघड होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ७८ नगरसेवकांपैकी ५२ नगरसेवकांचे शिक्षण दहावी व त्यापुढे झालेले आहे.
पालिकेच्या निवडणुकीचा निकाल गेल्या शुक्रवारी लागला. या निवडणुकीत ५१ जागा जिंकत भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. तर, शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीला अवघ्या २७ जागांवर विजय मिळवता आला. पनवेलच्या शहरी भागातील मतदारांनी भरभरून मते दिल्याने भाजपचा विजय झाल्याचे बोलले जात आहे. या पाश्र्वभूमीवर, नगरसेवकांच्या शिक्षण, संपत्ती, गुन्हेगारी पाश्र्वभूमी आदींचा वेध घेतला असता, सुशिक्षित उमेदवारांना मतदारांनी जास्त पसंती दिल्याचे दिसून येत आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये पाचवी शिकलेले आठ, नववी शिकलेले १८ तर दहावी शिकलेले १० व बारावी शिकलेले १९ तसेच पद्युत्तर शिक्षण झालेले ३ पदवीधर १२ तर डॉक्टर ५ व अभियंता १ व वकिल २ आहेत.
महापालिकेमध्ये एकहाती सत्ता असणाऱ्या सत्तारूढ भाजपचे परेश ठाकूर हे सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र परेश यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना ९५ कोटी ४७ लाख रूपयांच्या संपत्तीची नोंद केली आहे. त्याखालोखाल भाजपचे रामजी बेरा यांची संपत्ती २७ कोटी ३९ लाख रुपये असून त्या खालोखाल शेकापचे प्रितम म्हात्रे (२६ कोटी ७१ लाख), भाजपचे अ‍ॅड. मनोज भुजबळ (२२ कोटी ५४ लाख), भाजपचे राजेंद्र शर्मा (२१ कोटी ९५ लाख) यांचा क्रमांक लागतो. पालिकेत १० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या नगरसेवकांची संख्या दहाच्या घरात आहे. निवडणुकीत मतदारांना जोरात पैसेवाटप करण्यात आल्याचा आरोप होत होता, हे विशेष! मंजुळा कातकरी या पालिकेत सर्वात ‘गरीब’ नगरसेवक असून त्यांच्या नावे सहा हजार रुपये संपत्तीची नोंद आहे.

नागपूर - कोरडा पडलेल्या सोनेगाव तलावाला तीन वर्षांत गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने विविध विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी दोन कोटींची तरतूद केली जाणार आहे. तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पाच कोटींचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध होईल. यासोबतच शहरातील सर्व तलावांतील गाळ काढणे व येथील विकास कामांसाठी १०० कोटींची गरज आहे. यासंदर्भात महापौरांसह शहरातील आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भूजल सर्वेक्षण विभागाचे माजी सहसंचालक चेतन गजभिये उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाच्या दक्षिण-पश्चिम नागपूरतर्फे २१ मे रोजी जनसहभागातून सोनेगाव तलावाची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. गेल्या आठ दिवसात तलावातून ४,६०० ट्रक गाळ काढण्यात आला आहे. अजूनही तलावात १० हजार ट्रक गाळ शिल्लक असल्याचा अंदाज आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात वस्ती झाल्याने तलावात पावसाळ्याच्या दिवसात पुरेसे पाणी जमा होत नाही. तलावात येणारे प्रवाह थांबलेले आहेत तसेच संरक्षण भिंत नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. याला आळा घालण्यासाठी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणामुळे तलावाचा येवा बंद झाला आहे. तो पुनरुज्जीवित करण्यात येईल. पोहरा नाल्याला जोडणाऱ्या नाल्याचा येवा सोनेगाव तलावात आणला जाईल तसेच या भागातील नागरिकांना रेनवॉटर हार्वेस्टिंगकरिता प्रवृत्त केले जात आहे. महापालिके कडून प्राप्त होणाऱ्या दोन कोटींच्या निधीतून तलावाच्या बाजूला दोन बगीचे तसेच दोन बंधारे बाधण्यात येतील. पाच कोटींच्या निधीतून तलावाला रिचार्ज करण्यासाठी तलावात रिचार्ज कूपनलिका निर्माण करण्यात येतील. यातून भूगर्भात शुद्ध पाण्याचाच साठा होईल. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केला जाणार आहे. तलावातील संपूर्ण गाळ काढणे व विकास कामे एका वर्षात पूर्ण करणे शक्य नाही. याला किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल. तलावाचा भाग ऐतिहासिक वास्तूत येतो. यामुळे विकास कामे करताना अडचणी येतात. ही बाब विचारात घेता पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. पत्रपरिषदेला नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.नागपूर - भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीअगोदर त्यांनी भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. गावपातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्याची सूचना देत असताना २०२४ साली लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाह सध्या देशातील विविध भागांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. भाजपातर्फे १ जूनपासून विस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा अचानक नागपूर दौरा ठरला. नागपुरात येताच शाह यांनी अगोदर नागपुरातील आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती हेदेखील उपस्थित होते. नागपूर व विदर्भातील पक्षविस्तारासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. तसेच त्यांना विविध सूचना केल्या. २०१९ च्या निवडणुकांसोबतच २०२४ च्या टप्प्याकडे लक्ष देऊन पक्षबांधणीला लागा, अशी सूचना केली. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न नागपुरातील पदाधिकाऱ्यांनी शहा यांना केला. एकत्र निवडणुका घेणे शक्य आहे. मात्र लोकसभेसोबतच इतर निवडणुका घेण्यासाठी सर्वांची कालमर्यादा विचारात घ्यावी लागले. ही मोठी प्रक्रिया आहे. ती होईल तेव्हा होईल. मात्र असे झालेच तर आपली तयारी हवी या दृष्टीने संघटन बांधणी करायला हवी, असे शाह यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता या मुद्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र शहा यांनी कुठलेही स्पष्ट संकेत दिले नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मात्र वरील वृत्ताला दुजोरा दिला.

अमित शाह सायंकाळी ५ च्या सुमारास संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ.भागवत तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची भेट घेतली. तिघांमध्येही सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. शहा अडीच तास मुख्यालयात होते व सायंकाळी ७.४० वाजता ते तेथून रवाना झाले.या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले. शाह यांनीदेखील बोलण्यास नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमकुवत जनाधार असलेल्या प्रदेशावर जास्त लक्ष केंद्रित करावे. तसेच मित्रपक्षांशी प्रभावी समन्वयावर भर द्यावा, अशी सूचना संघातर्फे शहा यांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार, काश्मीरमधील तापलेले वातावरण, कर्नाटकमधील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका या मुद्यांवरदेखील चर्चा झाली. विशेष म्हणजे संघाचा तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग सुरू असताना शाह आल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीदेखील सकाळच्या सुमारास संघ मुख्यालयाला भेट दिली.

मुंबई - मुंबईतील व्यावसायिकाची बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी भाजप आमदार रणधीर सावरकर, खासदारांचे चिरंजीव अनुप संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे सावरकर गोत्यात आले असून यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सावरकर हे अकोला पूर्वचे आमदार आहेत.मुंबईतील रहिवासी सचिन काळे हे बांधकाम कंत्राटदार आहेत. त्यांनी मुंबईतील विक्रोळी पूर्व येथील बिल्डींग क्र.८७ च्या पुनर्विकासासाठी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसचे भागीदार सुरेश मोरे यांच्यासोबत ५ ऑक्टोबर २०११ रोजी करार केला होता. पहिल्या दोन मजल्याचे काम केल्यावर धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसकडे सचिन काळे यांनी देयक सादर केले. ६ मार्च २०१२ ला बळवंत महल्ले व रणधीर सावरकर यांनी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसच्या नावाचा ४५ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा धनादेश काळे यांना दिला. त्यानंतर काळे यांनी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसकडे टप्याटप्याने देयक सादर केल्यावर त्यापोटी अर्धवट रकमेचा धनादेश देण्यात आला. प्रकल्पाचे ८६.३० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकामाची थकीत रक्कम म्हणजेच ६ कोटी ५० लाख रुपयांची मागणी काळे यांनी केली. त्यावर बळवंत महल्ले आणि रणधीर सावरकर यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप काळे यांनी तक्रारीत केला आहे.धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसचे नोंदणीकृत भागीदार नसतांना आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळे यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बळवंत माणिकराव महल्ले, रणधीर प्रल्हादराव सावरकर, प्रकाश गोपाळराव पोहरे, ऋषिकेश प्रकाश पोहरे, अनुप संजय धोत्रे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ४२०, १२०(ब), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलीस तापस करीत आहेत.दरम्यान, आमदार सावरकर यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजली आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयात बाजू मांडू असे सावरकर यांनी सांगितले.सांगली/कोल्हापूर/ सातारा - गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे, की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपूर येथे डागली.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इस्लामपूर (जि.सांगली), मलकापूर (जि.सातारा) व गारगोटी (जि.कोल्हापूर) येथे शेतकरी मेळावे झाले. या तिन्ही मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
इस्लामपूर येथील मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यात शेतकऱ्यांचा कैवार घेऊन अनेकजण आंदोलन करत आहेत. आमच्यावर शेतकरीविरोधी असल्याची टीका करतात. मात्र, राज्यातील जनतेने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांचा सुफडासाफ करुन भाजपवर विश्वास दाखवला आहे. विधानसभेपाठोपाठ भाजप राज्यातील सर्वांत जास्त लोकप्रतिनिधी असणारा पक्ष बनला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या मिटल्या, असा आमचा दावा नाही. मात्र आम्ही प्रामाणिक आहोत. राज्यातील शेती क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. १९९५ च्या युती शासनाने पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरेची कामे सुरु केली. त्यानंतरच्या १५ वर्षात ही कामे का पूर्ण झाली नाहीत, याचे उत्तर तत्कालीन राज्यकर्त्यांनी द्यावे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून राज्याला २६ हजार कोटी मिळाले आहेत.गेल्या दोन वर्षात उसाच्या एफआरपीची ९९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात दिली़मुंबई - केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सोमवारी मंत्रालयावर धडकण्यासाठी दक्षिण मुंबईत दाखल झाली. सरकारने शेतकऱ्यांना अडवल्यास ‘अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ऊन सोसत नसल्याने ते यात्रेत सहभागी न झाल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असे आव्हान शेट्टी यांनी सरकारला दिले. सात-बारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी त्यांच्या मागण्या आहेत. पुण्याच्या फुले वाड्यापासून १९० किलोमीटरचा प्रवास यात्रेने केला आहे. राजू शेट्टी यांच्या सौरभ या मुलाला आज उष्णतेमुळे चक्कर आली. आधी सरकारचा पाठिंबा काढून शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढावी, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

१ जूनला संप होणारच
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तरच इतर मागण्यांबाबत चर्चेसाठी मुंबईत जाऊ, अन्यथा नाही. पुणतांबा येथे येऊन मुख्यमंत्र्यांनी संपकरी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत किसान क्रांती समिती व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावला. त्यांनी १ जूनपासून संपाची तयारी चालवली आहे.
हिंगोली - जिल्ह्यचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रसारमाध्यमांविरुद्ध बेताल वक्तव्य केल्याच्या पाश्र्वभूमीवर आता त्यांच्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचा सत्तेतील सहभागी मित्रपक्ष शिवसेनेच्या नेत्यांकडूनही चौफेर टीका होऊ लागली आहे. दिलीप कांबळे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने केली. तर खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्यावर भाजपनेच खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी माळहिवरा येथे भाजपच्या शिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने मंदिरात घेतलेल्या सभेत पत्रकारांविरुद्ध बेताल वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. कांबळे यांच्या विधानावर भाजपनेच खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. लोकशाहीत माध्यमांना सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र भाजपचे नेते आणि मंत्री सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या पत्रकारांना धमक्या देत आहेत. कांबळे यांनी पत्रकारांना जोडय़ाने मारेन, अशी उद्दाम भाषा केली. शिवाय, पक्षनेत्यांनीच आपल्याला शिकवण दिल्याचे ते सांगत सुटले असल्याने त्याबाबत आता पक्षानेच खुलासा करावा, अशी प्रतिक्रिया खासदार चव्हाण यांनी दिली. कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांनीही या प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केले. संवाद यात्रेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे अपेक्षित होते. कर्जमाफी आवश्यक आहे. शेतकरी ठिकठिकाणी प्रश्न विचारत असल्याने त्यांचे मूळ प्रश्नाकडून लक्ष विचलीत करण्यासाठी आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आता पालकमंत्री कांबळे यांनी बेताल वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांचे त्यांच्याच मंत्र्यांवर आता नियंत्रण राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. वसमतचे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा म्हणाले, की पालकमंत्री असे कसे बोलले हेच आश्चर्य वाटते. ते अत्यंत मवाळ स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडून असे वक्तव्य होईल, याची कल्पनाही करवत नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर म्हणाले, की प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकांसमोर ते वास्तव आणतात, मात्र पालकमंत्र्यांना बहुतेक ते रुचले नसावे, त्यामुळेच त्यांनी पत्रकारांना बुटाने मारण्याची भाषा वापरली. शिस्तीचा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपने अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.मेरठ - दहशतवाद्यांना आश्रय देऊन जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. काश्मीर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढणार अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. परकीय शक्ती जम्मू काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल करत आहे. पण आम्ही काश्मीर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढू असे सिंह म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, दहशतवाद्यांना आश्रय देऊन जम्मू काश्मीरसोबत संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. काश्मीर आमचाच असून काश्मिरी जनतादेखील आमची आहे असे त्यांनी पाकला ठणकावून सांगितले.हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी सबझार भट याला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे संकट निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी रविवारी काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागांत संचारबंदीसदृश निर्बंध लागू करण्यात आले होती. सबझारच्या अंत्ययात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते. सोमवारीदेखील जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. काही भागांमध्ये संचारबंदीसदृश परिस्थिती होती.
राज्यातील परिस्थती तणावाची असतानाही रविवारी काश्मिरातील ८०० तरुणांनी लष्कराच्या सामायिक प्रवेश परीक्षेत भाग घेत दहशतवाद्यांना चपराक लगावली होती. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती तणावाची असतानाच राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केली रविवारी केली होती. सीमा रेषेवर कुरापती सुरुच असून सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकला सुनावले आहे.

मुंबई - बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पात पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यावर करारनामा होईल. रहिवाशांना टू बीएचकेचे पाचशे स्क्वेअर फूटांचे घर मोफत मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा सुरु होणाऱ्या बायोमेट्र‌क्सिला रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाच्या वतीने सोमवारी करण्यात आले. तर या चाळीतील झोपड्या व स्टॉलधारकांचे झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पाअंतर्गत पुर्नवसन होईल, आश्वासनही म्हाडाच्या करण्यात आले. नायगाव व ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुर्नवसन प्रकल्पात रहिवाशांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सोमवारी नायगाव येथील श्रीकृष्ण सभागृहात सभा आयोजित केली होती. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष सुभाष लाखे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई - १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा, अब्दुल कय्युम, शेख फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दिकी आणि करीमुल्ला शेख यांच्याबाबत न्यायालय या दिवशी निकाल देणार आहे. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावलेल्या शिक्षेनुसार त्याला जुलै २०१५ मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून या सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे. अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आले. मात्र मला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्याप फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असलातरी अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अभिनेता आणि १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर आहे. याच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्तफा डोसावर बॉम्बस्फोट करण्यासाठीचा कट रचल्याचा व त्यासाठी नियोजित स्थळी शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. तर ताहीरवर या प्रकरणातील अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप आहे.नवी दिल्ली - दहशतवादाला पाठिंबा देणे पाकिस्तान थांबवित नाही, तोपर्यंत त्यांच्याबरोबर क्रिकेट मालिका होणार नाही, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आज स्पष्ट केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यामध्ये आज दुबई येथे या मुद्यावर बैठक होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोयल यांनी हे स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,""पाकिस्तानसमोर कोणताही प्रस्ताव ठेवताना बीसीसीआयने केंद्र सरकारशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकाच वेळी शक्‍य नाही. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असताना त्यांच्याशीच क्रिकेट मालिका खेळता येणार नाही.'' अर्थात, अनेक देशांचा सहभाग असलेल्या मालिकांमध्ये दोन्ही देशांचा सामना होत असल्याबाबत सरकारला काही म्हणायचे नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
"बीसीसीआय' आणि "पीसीबी' दरम्यान 2014 मध्ये सामंजस्य करार होऊन 2015 ते 2023 या काळामध्ये दोन देशांदरम्यान पाच मालिका आयोजित करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, सीमेवरील तणावग्रस्त परिस्थितीमुळे भारत सरकारने अशा मालिका आयोजित करण्यास परवानगी नाकारली आहे. कराराप्रमाणे मालिका न आयोजित केल्याबद्दल "पीसीबी'ने "बीसीसीआय'ला कायदेशीर नोटीस बजावत 387 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. सरकारच्या परवानगीशिवाय मालिका अशक्‍य असल्याचे दुबई येथे होणाऱ्या बैठकीत "पीसीबी'ला सांगितले जाण्याची शक्‍यता असून, नोटीस मागे घेण्याचीही विनंती केली जाऊ शकते. मात्र, "पीसीबी'ने आडमुठेपणा केल्यास त्यांना नुकसानभरपाई दिली जाण्याचीही शक्‍यता नाही.

नवी दिल्ली - बेदम मारहाणीत मृत्यू पावलेल्या एका ई-रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. रस्त्याच्या कडेला लघुशंका करणाऱ्याला रोखल्यामुळे रविंद्र कुमार या ई-रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता.
चार देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून ही मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी घडलेल्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेधझ केला असून असे अमानुष कृत्य करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या घटनेनंतर रविंद्र कुमार यांच्या नवी दिल्लीतील जीटीबी नगरात राहणाऱ्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. केंद्रीय मंत्री नायडू यांनी रविंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांना आपल्या वेतनातून ५० हजार रुपयांची मदत केली.

पठाणकोट - भारताच्या वायुदलाचा तळ असलेल्या पठाणकोटच्या डिफेन्स रोडनजीक लष्करी गणवेश असलेली एक बेवारस गोण आढळून आल्याने पंजाब पोलीस आणि लष्कराने पठाणकोट व मामून छावणी परिसर पिंजून काढला. रविवारी एका स्थानिक व्यक्तीने एक बॅग आढळल्याची माहिती कळविल्यानंतर पठाणकोट शहर आणि मामून छावणी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.गुरदासपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावरील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्र्रकार घडल्याने पोलीस आणि लष्कराने शिताफीने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली आहे. या गोणीत लष्करी गणवेश आढळल्याने पठाणकोटमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.या बेवारस गव्हाच्या पिठाच्या गोणीत लष्करी गणवेषाचे पाच शर्ट्स आणि दोन विजारी आढळल्या. यामागील संशयित व्यक्तीला शोधण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे कसून शोध घेण्यात आला. २०१५मध्ये लष्करी गणवेशातील तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी एक कार पळवून गुरुदासपूर जिल्ह्यातील दीना नगर पोलीस ठाण्यावर भयंकर हल्ला करून पोलीस अधीक्षकांसह सात जणांना गोळ्या घालून ठार केले होते.मागच्या वर्षीही चार दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून शिरकाव करून पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर १ आणि २ जानेवारीच्या रात्री हल्ला केला होता. यात सात सुरक्षा जवान शहीद झाले होते. पठाणकोट हा अतिशय संवेदनशील तळ आहे.

नवी दिल्ली - हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखालील दुहेरी बोगद्याचे बांधकाम पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. देशातील हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरणार आहे. कोलकात्यातील रेल्वेच्या १६.६ किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पांतर्गत ५२० मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे. नदीखाली ३० मीटर खोल या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. यातील एक मार्ग पूर्वेकडे, तर दुसरा मार्ग पश्चिमेकडे जाणार आहे. हावडा आणि महाकरण मेट्रो स्टेशनदरम्यान ये-जा करणारे प्रवासी या बोगद्यात प्रवासादरम्यान फक्त एक मिनिटासाठी असतील. मेट्रो ट्रेन या बोगद्यातून ८० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहे. १६.६ किमी लांबीच्या या मेट्रो प्रकल्पामध्ये १०.६ किमी लांबीचा बोगदा असून त्याचा ५२० मीटरचा भाग नदीखालून जाणार आहे. नदीखालून बोगदा तयार करण्यासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च आला आहे; तर संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा खर्च सुमारे ९ हजार कोटी रुपये आहे.
नदीखालील बोगद्याच्या निर्मितीचे काम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते. पूर्व-पश्चिम मेट्रो ऑगस्ट २०१९मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्यामध्ये पादचारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

लंडन - इंग्लंडमध्ये जवळपास २३ हजार संशयित दहशतवादी फरार असू शकतात, असे ब्रिटनच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे. मँचेस्टर येथे लिबियन वंशाच्या सलमान अबेदी (२२) याने घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार, तर ११९ जण जखमी झाले होते. अबेदीवर इंग्लंडच्या गुप्तचर संस्थांची नजर होती. या हल्ल्यानंतर गुप्तचरांनी जवळपास देशभर २३ हजार संशयित अतिरेकी फरार असल्याचे म्हटले आहे. अबेदीबद्दल एमआय १५ या गुप्तचर संस्थेकडे काय माहिती होती हे जाहीर करण्याचे दडपण वाढले आहे.सरकारी सूत्रांनी ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांतील एका गटाला, असे सांगितले आहे की, देशात अतिरेकी प्रवृत्तीचे २३ हजार ंलोक आहेत, असा आमचा विश्वास आहे. एकूण अतिरेक्यांपैकी जवळपास तीन हजार लोक धोकादायक असल्याचे मानले जाते. राहिलेले २० हजार लोक पूर्वी झालेल्या चौकशीत समोर आले होते व त्यांचाही समावेश ‘धोका’ अशा गटातच केला गेलेला आहे.दरम्यान, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी सीसीटीव्ही इमेजेस प्रसिद्ध केल्या असून, त्यानुसार आत्मघाती हल्लेखोर अबेदी हा मँचेस्टर एरेनावर हल्ला करायच्या आधी एरियाना गँ्रड कॉन्सर्टमध्ये शेवटचा दिसला होता. या हल्ल्यासंदर्भात अजून १४ ठिकाणांचा शोध घेतला जात आहे व दहशतवादी गुन्ह्यांच्या संशयावरून ११ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गुंतागुंतीच्या चौकशीमध्ये आम्ही महत्त्वाची प्रगती केली आहे. आम्ही ब्रिटनच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी पोलीस यंत्रणेचे नेटवर्क आणि इंग्लंडच्या गुप्तचरांसोबत काम करीत आहोत. लिबियातून अबेदी इंग्लंडमध्ये १८ मे रोजी आला, तेव्हापासून त्याच्या हालचालींची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.आमचे प्राधान्य या भयानक दहशतवादी घटनेचा प्रवास कसा झाला व यात आणखी किती लोक गुंतलेले आहेत हे समजून घेण्यास आहे, असे पोलिसांनी त्यात म्हटले. अकरा लोकांना अटक झाल्यामुळे ब्रिटनवरील हल्ल्याची पातळी शनिवारी ‘अतिगंभीर’ पातळीवरून ‘गंभीर’ पायरीवर उतरली. याचा अर्थ असा की हल्ले ताबडतोब होणार नसले तरी त्यांची शक्यता मोठी आहे.

ऑनलाईन - एकेकाळी गाजलेल्या पाकिजा चित्रपटाची त्या पिढीतील अनेकांनी पारायणे केली होती. या चित्रपटातून विशेष ओळख मिळालेल्या गीता कपूर या ज्येष्ठ अभिनेत्रीला वृद्धापकाळात अतिशय वाईट परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. एकेकाळी मोठा पडदा गाजविलेली ही अभिनेत्री अशाप्रकारे एकटी पडल्याचे चित्र आहे.वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर गीता कपूर यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला आहे. त्यामुळे त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला आहे. मात्र त्याचवेळी निर्माते रमेश तौरानी यांनी या अभिनेत्रीसाठी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे.गीता कपूर यांना २१ एप्रिल रोजी कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा राजा याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर तो रुग्णालयातून निघून गेला आणि पुन्हा आलाच नाही.गीता यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी नेण्यासाठी रुग्णालय प्रशासन राजा कपूर आणि गीता यांची मुलगी पूजा यांना मागील एक महिन्यापासून संपर्क करत आहेत. याशिवाय गीता यांच्या उपचाराचे बील जवळपास दिड लाख रुपये झाले असून याबाबत माहिती देण्यासाठी राजा आणि पूजा यांना अनेकदा संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.गीता यांच्या सांगण्यानुसार, राजा त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. आपण वृद्धाश्रमात जाण्यास तयार नसल्याने त्याने आपल्याला ३ ते ४ दिवस काहीही खायला न देता दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला. आणि अशापद्धतीने इथे सोडून दिले असा आरोप त्यांनी केला आहे.

मिसिसिपी - अमेरिकेतील मिसिसिपी येथे एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान ८ लोक ठार झाले आहेत. यामध्ये डेप्यूटी शेरीफचाही समावेश आहे. संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. मिसिसिपी येथील तपास यंत्रणेचे प्रवक्ते वॉरेन स्ट्रेन यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंकन काऊंटी येथील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये हा गोळीबार झाला. संशयिताविरोधात अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. हत्या करण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा तपास केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.चौकशी आयोग नेमण्याची मागणी

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता काय, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेत विचारण्यात आला आहे.गांधीजींवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असे पोलीस मानत असले, तरी नथुराम गोडसेशिवाय आणखी कुणी चौथी गोळीही झाडली होती काय? – यासारखे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येमागील व्यापक कारस्थान उघड करण्याची आवश्यकता असून त्यासाठी नवा चौकशी आयोग स्थापन केला जावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. गांधीजींची हत्या हे इतिहासातील दडपण्यात आलेले एक मोठे प्रकरण होते काय, आणि त्यांच्या मृत्यूसाठी विनायक दामोदर सावरकर यांना दोषी ठरवण्याचा काही आधार होता काय, असे प्रश्न विचारून, गांधीहत्येच्या तपासावर याचिकेत प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे.

चौकशी आयोगाच्या तपासावर प्रश्नचिन्ह
गांधीहत्येच्या चौकशीसाठी १९६६ साली स्थापन करण्यात आलेला न्या. जे.एल. कपूर चौकशी आयोग या हत्येमागील संपूर्ण कारस्थान उघडकीस आणू शकला नाही, असे मुंबईच्या अभिनव भारत संघटनेचे विश्वस्त आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी केलेल्या या जनहित याचिकेत म्हटले आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच, शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्नही आता उच्च न्यायालयात आला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला मुंबई महापौरांचा बंगला देण्यास आणि त्याकरिता सरकारतर्फे शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.भगवानजी रयानी यांनी ही याचिका केली आहे. उन्हाळी सुटीनंतर ५ जूनपासून उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर ही याचिका प्राथमिक सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब यांचे स्मारक उभारण्यास आपला विरोध नाही. मात्र, यासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा देण्यात येणार आहे. ही जागा वार्षिक एक रुपया दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच यादृष्टीने एमआरटीपी कायद्यात आवश्यक बदल करण्याकरिता राज्य सरकारने आधी वटहुकूम काढून नंतर विधिमंडळात कायदादुरुस्तीचे विधेयकही रीतसर मंजूर करून घेतले आहे. मात्र, ‘हेरिटेज-२ प्रवर्गाततील ही वास्तू पाच दशकांहून अधिक काळापासून मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे शासकीय निवासस्थान आहे. बाळासाहेबांनी आयुष्यात कधीही कोणतेही वैधानिक पद भूषवलेले नसून त्यांना हुतात्माही म्हणता येणार नाही. किंबहुना त्यांनी काही समाजांविषयी द्वेष पसरवण्याचे काम केले.

नाशिक - विद्यमान सरकार उत्पादकांपेक्षा ग्राहकहिताकडे अधिक लक्ष देत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काही करेल असे वाटत नाही. त्यासाठी आता सामुदायिक शक्ती उभी करण्याची गरज आहे. त्याकरिता आपण स्वत: पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रात फिरणार आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केली. शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव तसेच कायदेमंडळातील पाच दशकांच्या कार्याचा वेध घेणारी प्रकट मुलाखत असा कार्यक्रम रविवारी सायंकाळी येथील गंगापूर रस्त्याजवळील विश्वास लॉन्स येथे झाला. यावेळी मुलाखतीत प्रसिद्ध लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ यांच्या विविध प्रश्नांना पवार यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शरद पवार यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा वेध या मुलाखतीत घेण्यात आला. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास बँक आदींच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात शरद पवार यांचा जाहीर सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला. देशपातळीवर नेतृत्व करण्यासाठी व्यक्तिगत गुण किंवा पात्रता पुरेशी नसते. त्यासाठी राजकीय शक्तीची गरज असते. त्यासाठी आवश्यक राजकीय संख्याबळ उभे करू शकलो नाही. राजकारणात वास्तवतेचे भान ठेवून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळेच देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा विचार आपण मनातून काढून टाकला असल्याची भावनाही त्यांनी मांडली. काँग्रेसमध्ये असतांना महत्वाच्या प्रश्नांवर स्वच्छ भूमिका मांडली. त्याचे राजकीय दुष्परिणाम मात्र सहन करावे लागले, अशी कबुली पवार यांनी दिली. राजकारण प्रवेशाची पाश्र्वभूमी मांडतांना यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे आदर्श महाविद्यालयीन जीवनात आपल्यासमोर होते. एक मे १९६० रोजी शिवनेरीवर यशवंतरावांनी उगवत्या महाराष्ट्राविषयीची भूमिका मांडली. ती भूमिका भावल्याने आपण राजकारणात आल्याचे नमूद केले. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्रिपदी असतांना झालेला लातूर, किल्लारीचा भूकंप आणि १९९३ तील मुंबईमध्ये घडलेले साखळी बॉम्बस्फोट या दोन घटना आव्हानात्मक होत्या, याचा उल्लेख त्यांनी केला. राजकीय कार्यकर्ते, नेत्यांकडून सत्ता व संपत्तीचे होणारे ओंगळवाणे प्रदर्शन, क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असतांना केलेले कार्य, देशी खेळांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न या सर्वाचा उल्लेख पवार यांनी या मुलाखतीदरम्यान केला. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष विनायकदादा पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा आदी उपस्थित होते.तिघांना अटक; आठ जण फरारी

ठाणे - ठाणे येथील मानपाडा भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलेला रुग्ण मृत पावला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले म्हणून संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. या घटनेत मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि पोलिसांना मारहाण करत त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी शुक्रवारी चितळसर मानपाडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आठ आरोपी अजूनही फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. कापुरबावडी येथील अमराई झोपडपट्टी भागात राहणारे वासु बेलगिरे यांची गुरुवारी रात्री प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना मानपाडय़ातील टायटन रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून ते मृत पावले असल्याचे घोषित केले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील दोन दरवाजांच्या काचा हाताने फोडून डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकाराबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या चितळसर मानपाडा पोलिसांनी रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस नातेवाईकांनी पोलिसांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली असून यामध्ये पोलीस जखमी झालेले नाहीत. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बाबा पांडुरंग वाघमारे (३०), सागर आसाराम गरगडे (२३) आणि साईराम आसाराम गरगडे (२४) या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही कापुरबावडी येथील अमराई झोपडपट्टी परिसरात राहत असून ते मृताचे नातेवाईक आहेत. या प्रकरणात आठ आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई - मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने कोणतेच काम न केल्यामुळे त्याला दिलेले कंत्राट रद्द करण्याची वेळ पालिकेवर ओढवली. आता पुन्हा एकदा पालिकेने मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला असून कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याबाबत सल्ला घेण्यासाठी पालिका तब्बल सात कोटी रुपये मोजणार आहे. कचऱ्यातून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळविणाऱ्या माफियांचा आता मुलुंड कचराभूमीवर डोळा आहे. आता पालिकेने मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून विकासकामांसाठी जमीन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने कशी बंद करायची याबाबत सल्ला घेण्यासाठी पालिकेने निविदा मागवून सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिकेने मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनीअर्स सव्र्हिसेस लिमिटेड या कंपन्यांची सल्लागार म्हणून निवड करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंदाजपत्रक ठरविणे, प्रत्यक्षात देण्यात येणाऱ्या कामाचे दर निश्चित करणे, या कामासाठी लागणारी परवानगी मिळवून देण्यास मदत करणे, कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याबाबतचे काम योग्य पद्धतीने करण्याबाबत कंत्राटदार कंपनीला मार्गदर्शन करणे, एकूण कामावर देखरेख ठेवणे आदी कामे या सल्लागार कंपनीला करावी लागणार आहेत.एकीकडे पालिका प्रशासन मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करीत असताना दुसरीकडे कचरामाफिया सक्रिय होऊ लागले आहेत. कचराभूमीमधील कचऱ्यातून मोठी कमाई होत असल्याने अनेक माफियांनी मुलुंड कचराभूमीवर आपले लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये दरदिवशी तब्बल ९ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूर मार्ग येथील कचराभूमींमध्ये टाकण्यात येतो. त्यापैकी दोन हजार मेट्रिक टन कचरा मुलुंड कचराभूमीत टाकण्यात येत आहे. मुलुंड कचराभूमीची क्षमता यापूर्वीच संपुष्टात आल्यामुळे ती शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे काम पालिकेने तत्त्व ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी या कंपनीला २००९ मध्ये दिले होते. मात्र या कंपनीने मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना न केल्यामुळे अखेर २०१५ मध्ये पालिकेने कंपनीला दिलेले कंत्राट रद्द केले.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget