July 2017शिर्डी - देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी १ लाख ३६ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू आहेत, राज्यात रेल्वेचे जाळे वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगतानाच रेल्वेच्या सर्वागीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत देशातील भाविकांना चारिधाम यात्रेला जाता यावे व त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वेने या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शिर्डी येथे बोलताना दिली
शिर्डी रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमाचे उद्घाटन तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ शिर्डी रेल्वे स्थानकावर प्रभू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा योगिता शेळके, खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठीची विविध सर्वेक्षणांच्या अहवालानंतर निश्चित केलेल्या भाजपाच्या ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांनी हिरवा कंदिल दिलेल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (31 जुलै) जाहिर केली जाणार आहे. पण यादी जाहीर होण्याआधीच निश्चित उमेदवारांचे अर्ज भाजपाने भरण्यास घेतले आहेत. त्यांच्या उमेदवारांच्या यादीवर आमदार नरेंद्र मेहता यांची छाप असून काही ज्येष्ठ व विद्यमान नगरसेवकांची नावं पहिल्या यादीत नसल्याने त्यांना धक्का देण्याची शक्यता आहे.
मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाकडे २६७ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज भरले होते. ही यादी पाठवण्यात आली आहे. मीरा भार्इंदर महापालिका निवडणूक भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार हे पक्ष नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. स्थानिक भाजपा संघटना व नगरसेवकांवर आमदार मेहतांची पकड सर्वश्रूत आहे.
महापौर गीता जैन यांच्यासह पक्षातील काही ज्येष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांशी आमदार मेहतांचे पटत नसल्याने त्यांना विविध ठिकाणी डावलणे तसेच त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याची नाराजी पक्षांतर्गत होत आली आहे. ज्येष्ठांनी देखील भाजपात चाललेली खोगीर भरती, मनमानी कार्यपद्धती आदींवरुन टिकेची झोड उठवली होती.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना होणाऱ्या विरोधाची तीव्रता वाढली आहे. काँग्रेसने त्यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्या सर्व धोके पत्करून आम्ही हाती तिरंगा घेतला आहे. जम्मू-काश्मीरबाबतचे ३५-अ कलम रद्द केले किंवा त्यात काही फेरफार केला तर राज्यात तिरंगा हाती धरणारे कोणी उरणार नाही, असे मेहबूबा यांनी शुक्रवारी दिल्लीत एका कार्यक्रमात म्हटले होते. राज्यातील फुटीरतावाद्यांना तुम्ही लक्ष्य करत नाही. तर ज्यांनी भारतात राहण्याचा पर्याय स्वीकारला आहे, जे जम्मू-काश्मीरचे भारतातील विलीनीकरण अधिक मजबूत करू पाहत आहेत, ज्यांनी निवडणुकीत भाग घेतला आहे अशा शक्तींना तुम्ही कमकुवत करत आहात, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यासह त्यांनी पाकव्याप्त काश्मीरशी असलेला व्यापार बंद करण्यास नकार दर्शवत आणखी व्यापारमार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मेहबूबा यांच्या वक्तव्यावरून मोठे वादंग माजले आहे. राज्यात मेहबूबा यांच्या पीडीपीचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपमधूनही त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. आता त्याचा जोर वाढला असून काँग्रेसही मेहबूबा यांच्या विरोधात उतरला आहे. काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर राज्य शाखेचे प्रवक्ते रवींदर शर्मा यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण त्याच्यासाठी अनेकांनी मोठे बलिदान केले असून त्याच्याशी राष्ट्राचा सन्मान जोडला गेला आहे. मेहबूबा यांच्या बोलण्याचा संदर्भ कोणताही असला तरी त्यांना राष्ट्रध्वजाच्या बाबतीत असे उदाहरण देण्याचा अधिकार नाही.

मुंबई - चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरविणाऱ्या बाबू खेमचंद चौहान (५५) या इसमाला अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने बाबू चौहानला अटक केली. बाबू चौहानने अफवेच्या फोनची कबुली दिली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मूळचा अहमदाबादचा असणारा बाबू चौहान सध्या माहिम येथील खांडेपारकर हॉस्पिटलसमोरील पदपथावर वास्तव्यास होता. बिगारी आणि कॅटरिंग काम बाबू करत असे. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने बाबूकडे चर्चगेट स्थानकाच्या फोनबाबत विचारणा केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
‘श्रीनगर येथील बॉम्बस्फोटासारखा बॉम्बस्फोट चर्चगेट स्थानकांत होणार आहे,’ असा निनावी फोन रेल्वे सुरक्षा बलाच्या १८२ या क्रमांकावर आला होता. १३ जुलैला सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी हा फोन आल्यानंतर, चर्चगेट स्थानकात हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला. त्याच बरोबर स्थानकात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, दहशतवादविरोधी पथकासह डॉग स्क्वॉडदेखील दाखल झाले. चर्चगेट स्थानकासह स्थानकांतील सर्व रेल्वे बोगींची तपासणी सुरू झाली. तपासाअंती ही केवळ अफवा असल्याने, सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.

अहमदाबाद - गुजरातमध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने मोठा घोडेबाजार पाहायला मिळत आहे. यासंदर्भात अब्दासा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते शक्तीसिंह गोहील यांना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या गुजरातमध्ये पूर परिस्थिती असूनही अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघाबाहेर आहेत. कारण, भाजपकडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने यापैकी अनेक आमदारांना १५ कोटी रूपये आणि आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवायला सुरूवात केली आहे. भाजपकडून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. आमदारांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना आयकर विभाग किंवा सीबीआयचे छापे टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये कधीही असा प्रकार घडला नव्हता. मात्र, आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रकार सुरू झाला आहे, असे शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखेतील १५३ निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. यामध्ये कला शाखा- ७८, तंत्रज्ञान-४८, विज्ञान-१०, व्यवस्थापन-१०, वाणिज्य-७, असे एकुण १५३ निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
वाणिज्य व विधी विद्याशाखा वगळता बहुतांश शाखेतील ९० ते ९८ टक्के मुल्यांकन झाले असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे. विविध विद्याशाखेतील ५५ निकाल तयार असून ते लवकरच जाहिर केले जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाने नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठाची मदत घेतल्यामुळे मुल्यांकनाच्या कामाला गती मिळाली आहे. एकुण १७ लाख ३६ हजार १४५ उत्तरपत्रिकांपैकी ९० टक्के उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन झाले असून ३ लाख २५ हजार ३०५ उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन लवकर पूर्ण होणार असल्यचे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे. निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रखडलेल्या निकालाप्रकरणी मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची मुदत दिली होती. अखेर मुंबई विद्यापीठाने रविवारी रात्री उशिरा १५३ निकाल जाहीर केले.

अहमदाबाद - भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनाºयालगतच्या समुद्रात एक परकीय व्यापारी जहाज अडवून त्यातून १,५०० किलो हेरॉइन पकडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ३,५०० कोटी रुपये आहे. हे हेरॉइन तस्करीने मुंबईत आणले जाणार होते, असे समजते.
संरक्षण दलाचे प्रवक्ते अभिषेक मतिमान यांनी सांगितले की, आधी मिळालेल्या पक्क्या गुप्तवार्तेवरून तटरक्षक दलाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली. पकडलेले व्यापारी जहाज व त्यावरील अमली पदार्थांचा साठा पोरबंदर येथे आणण्यात आला असून तटरक्षक दल, इन्टेलिजन्स ब्युरो (आयबी), सीमाशुल्क विभाग, पोलीस आणि नौदल अशा अनेक संस्था मिळून पुढील तपास करीत आहेत. तस्करीसाठी एका जहाजातूनहेरॉईन आणले जात आहे, अशी पक्की खबर २७ जुलै रोजी मिळाल्यानंतर तटरक्षक दलाची ‘समुद्र पावक’ आणि ‘अंकित’ ही दोन गस्ती जहाजे शोधकार्यावर रवाना झाली. या जहाजांनी आणि तटरक्षक दलाच्या टेहळणी विमानांनी समुद्राच्या त्या पट्ट्यात ये-जा करणाऱ्या प्रत्येक जहाजावर बारकाईने नजर ठेवली.
अखेर शनिवारी दुपारी पनामामध्ये नोंदणी झालेल्या ‘एमव्ही हेन्री’ या छोटेखानी व्यापारी जहाजास संश्यावरून घेरून अडविण्यात आले. अधिकाºयांनी ‘हेन्री’ जहाजावर जाऊन शोध घेतला असता प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेले १,५०० किलो हेरॉईन मिळाले. हेरॉईन जप्त करून आठ खलाशांसह जहाजही ताब्यात घेण्यात आले.
देशात आत्तापर्यंत तस्करीच्या मार्गाने आणताना पकडला गेलेला हेरॉईनसारख्या अंमली पदार्थांचा हा सर्वात मोठा साठा आहे.

मुंबई - राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी, तसेच मोबाइलवरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली.
राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. पोलीस दलाच्या ‘दक्षता’ मासिकाच्या गणेशोत्सव व स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे, तसेच मासिकाच्या फेसबुक पेजचे अनावरणही या वेळी करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, ‘पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात यावा. राज्यातील अनेक अधिकाºयांकडे नवनवीन कल्पना आहेत. या कल्पना एकत्रित करून, त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यात गुन्हे व गुन्हेगारी माग काढण्यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली (सीसीटीएनएस) हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आहे. त्याचे विश्लेषण करून त्याचा वापर दैनंदिन कामात वाढविण्यासाठी पोलीस अधिकाºयांनी प्रयत्न करावेत,’ असेही त्यांनी पुढे सांगितले. या वेळी गृहराज्यमंत्री केसरकर व डॉ. रणजित पाटील यांची भाषणे झाली. पोलीस महासंचालक माथुर व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या योजनांचे सादरीकरण केले. या वेळी अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी, आस्थापना विभागाचे राजेंद्रसिंंह, नियोजन व तरतूद विभागाचे लक्ष्मीनारायण अधिकारी उपस्थित होते

गडचिरोली - शहीद सप्ताहादरम्यान माओवाद्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम सुरूच आहे. भामरागड तालुक्यातील गावकऱ्यांनी शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले. शुक्रवारी बंद असलेल्या कोरचीत पोलिसांनी शांतता रॅली काढल्या. सोबतच माओवाद्यांनी उभारलेली दोन शहीद स्मारके उद्‍ध्वस्त केले.
शहीद सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कोरचीचा अपवाद वगळता सर्वत्र व्यवहार सुरळीत होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कोरचीमध्ये पोलिसांनी शांतता रॅली काढली. गावकऱ्यांसह विद्यार्थीही सहभागी झाले. बंदचा उल्लेखही या रॅलीदरम्यान करण्यात आला. बंदुका पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या पोलिसांच्या आवाहनाला भामरागड तालुक्यात प्रतिसाद मिळाला. १३ गावातील नागरिकांनी आपल्याकडील बंदुका भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या स्वाधीन केल्या. भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी उभारण्यात आलेले माओवाद्यांची स्मारके जिल्हा पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी उद्‍ध्वस्त केले. यात पोमके धोडराज हद्दीतील पेनगुंडा व पोमके कोठी हद्दीतील तुमरकोडी- तोयनार येथील माओवादी स्मारकांचा समावेश आहे.

नाशिक - सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव द्या अशी मागणी करत लासलगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लासलगाव येथे शीतगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर शेतकऱ्यांनी सभेत घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी अचानक घोषणाबाजी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खाली बसण्याची विनंती केली. यावेळी नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना खडे बोलही सुनावले. घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज विरून जावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. मात्र शेतकऱ्यांनी आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यानच्या काळात शिवडे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालून निवेदन सादर केले. समृद्धी महामार्गाला विरोध म्हणूनच नाशिकच्या सभेत शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडल्यानंतर लगेचच मुहूर्त ठरवून भाजपने बिहारची सत्ता उपभोगायचा प्रयत्न सफळ केला. गेले काही दिवस याची चर्चा सुरू होती; पण नितीशकुमार यांचा राजीनामा, त्यानंतर लालूप्रसाद यादव यांचा थयथयाट आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नितीशकुमार यांचा शपथविधी या सर्व घडामोडी इतक्या वेगाने घडेल याची अपेक्षा कोणाला नव्हती. सत्ता मिळविण्यासाठी आपण एका रात्रीत काय करू शकतो याची चुणूक भाजपने गोव्यात दाखविली होतीच. मात्र, नितीशकुमार आपल्याला बाहेरचा रास्ता दाखविणार नाहीत, असा अंदाज बांधत लालूप्रसाद गाफील राहिले आणि त्यांची पंचाईत झाली. लालूपुत्र तेजस्वी यांच्यावरील आरोपाचा उल्लेख करून भ्रष्टाचाराच्या विरोधात पाऊल उचलत असल्याचे नितीशकुमार यांनी कितीही म्हटले असले, तरी नितिशकुमार यांनी, सत्तेच्या खेळात कोणाहीपेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले. दोन वर्षांपूर्वी बिहारमधील आपले जुनेपुराणे हाडवैरी लालूप्रसाद यादव यांना सोबत घेऊन, त्यांनी कॉंग्रेससह "महागठबंधन' उभे केले, तेव्हाही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट बिहारचे राज्य आपल्या हातात ठेवणे, हेच होते. आताही त्यांनी तेच केले आहे; मात्र ते करताना त्यांनी स्वत:च देशाला दाखविलेले "संघमुक्तत भारता'चे स्वप्न उद्‌ध्वस्त करून टाकले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भाजप त्यावेळी जितका जातीयवादी, मनुवादी होता तितकाच आजही आहे. त्यातही फरक पडलेला नाही. त्यामुळे अचानक बाजू बदलण्याचे कारण काय ?"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर "विरोधी पक्षांचे ऐक्यम हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले होते. आता स्वत:चेच हे शब्द कानाआड करून त्यांनी केलेली भाजपबरोबरची हातमिळवणी याला संधिसाधूपणा म्हणायचे की मुत्सद्देगिरी? भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केली, तेव्हा "सेक्युलर' नितीशकुमार यांनी भाजपबरोबरचा १७ वर्षांचा संसार मोडला. शिवाय "मिस्टर क्लीरन' ही प्रतिमा होतीच. त्या जोरावर विरोधकांच्या हातातील हुकमाचा एक्का बनले होते. आता ते सगळे संपले आहे. खरे तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला, तेव्हाच वारे उलट्या दिशेने वाहत असल्याची चुणूक दिसली होती. मे महिन्यात लालूप्रसादांवरील पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणाचा खटला तातडीने चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले, तेव्हापासूनच नितीशकुमार अस्वस्थ होते. पुढे उपमुख्यमंत्री तेजस्वी लालूप्रसाद यादव यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकले. या घडामोडींनंतर "सेक्युूलर'पेक्षा "मिस्टर क्लिपन' प्रतिमा जपणे जास्त निकडीचे आहे, असे त्यांनी जाणूनच हे पाऊल उचलेले काय असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. नितीशकुमार यांनी विरोधी ऐक्यासला दगाफटका करून सुरुंग लावल्याचा राग लालूप्रसाद आणि कॉंग्रेसजन आळवत आहेत. ते खरेही असले तरी हिंदुत्ववादाची लढाई इतकी महत्त्वाची होती, तर आपले चिरंजीव तेजस्वी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात लालूप्रसादांना काय अडचण होती?लालूंना बिहारमधील सत्तेचे एक केंद्र आपल्या घरातच हवे होते आणि नेमके तेच नितीश यांना अडचणीचे होते. अखेर नितीश हे आपल्या मार्गाने गेले आणि जाताना त्यांनी मनातले पंतप्रधानपदाचे स्वप्नही उधळून लावले. २०१९ मध्ये भाजपच पुन्हा सत्तेवर येणार, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी बहुधा केंद्राच्या मदतीने बिहारच्या विकासाचे कंकण हाती घेतलेले दिसते.परंतु रजकारण हे गजकरण असते असे काही नेत्या मंडळींनीच म्हटले आहे.बिहारची सत्तेत सहभागी झाल्याने भाजपाला आता समुर्ण रानच मोकळे झाले आहे आता नितीश कुमारांचा कधी काटा काढणार हेच पाहण्यासारखे असेल.

लखनऊ -  उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला मोठा हादरा बसला असून पक्षाच्या दोन आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. राष्ट्रीय शिया समाजचे संस्थापक बुक्कल नवाब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत समाजवादीला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत आमदार यशवंत सिंह यांनीदेखील पक्षाला अलविदा केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा हे शनिवारपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. अमित शहांचा दौरा सुरु होत असतानाच समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला. विधान परिषदेतील आमदार बुक्कल नवाब आणि यशवंत सिंह या दोघांनी राजीनामा दिला असून त्यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बुक्कवादी आखाडा असे ठेवले पाहिजे. या पक्षात अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून जो मुलगा वडिलांचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होईल अशा शब्दात त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले.विशेष म्हणजे समाजवादीवर टीका करतानाच बुक्कल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. योगी आदित्यनाथ राज्यात चांगले काम करत असून त्यांच्या कार्यकाळात अजून एकही घोटाळा झालेला नाही असे त्यांनी सांगितले. नवाब आणि यशवंत सिंह हे दोघेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. ‘समाजवादी पक्षातील अनेक आमदार नाराज असून तेदेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे’ असा दावाही बुक्कल यांनी केला. दोन आमदारांनी राजीनामा का दिला हे आता अखिलेश यादवच सांगू शकतील असा टोला भाजप नेते आणि उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनाथ सिंह यांनी लगावला. बहुजन समाज पक्षाचे ठाकूर जयवीरसिंह यांनीदेखील पक्षाचा राजीनामा दिला असून विधानपरिषदेतील एकूण तीन आमदारांनी राजीनामाला दिला आहे.अहमदाबाद - गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पार्टीमध्ये भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गुजरातमधील काँग्रेसच्या ६ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या ४० आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मुंबई - एरव्ही विषय कोणताही असो, सरकारवर किंवा सत्ताधारी पक्षांवर तुटून पडणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर मात्र सौम्य, संयत व सावध टीका केली. थेट नगराध्यक्षांच्या निवडीमुळे नगरपालिकांमध्ये राजकीय गोंधळ सुरू झाला असून, त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.विधान परिषदेत शुक्रवारी विरोधी पक्षांनी मुंबईसह राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिका नगर पंचायती यांची ढासळणारी आर्थिक स्थिती, नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत, चटईक्षेत्र, टीडीआर घोटाळे, शहरांच्या नियोजनाचा उडालेला बोजवारा, इत्यादी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता.नारायण राणे यांनी चर्चेला सुरुवात केली. राज्यात नगर पंचायती स्थापन केल्या, परंतु त्यांना निधी नाही, पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा मिळत नाहीत. केंद्राच्या योजना बंद केल्याने निधी मिळत नाही, त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यातच थेट नगराध्यक्षांची निवड करून राज्य सरकारने एक नवाच गोंधळ सुरू केला आहे.

मुंबई - 'वंदे मातरम्'वरुन गेले दोन दिवस वादाला तोंड फुटले आहे. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानंतर शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये विधानसभेचे दोन सदस्य अबू आझमी व वारीस पठाण यांचा धर्मांध साप असा उल्लेख करत फटकारले आहे. ‘‘कोणताही खरा मुसलमान ‘वंदे मातरम’ गाणार नाही’’. या सापोबांनी पुढे असाही डंख मारला आहे की, ‘‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम’ गाणार नाही.’’ पठाण म्हणतात की, ‘‘माझ्या गळय़ावर सुरी ठेवली तरी मी ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही.’’, महाराष्ट्र विधानसभेचे म्हणजे कायदेमंडळाचे दोन सदस्य अशी राष्ट्रविरोधी भाषा वापरणार असतील तर फडणवीस यांचे कायद्याचे राज्य त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे?, असा प्रश्न उद्धव यांनी सामना संपादकीयमध्ये उपस्थित केला आहे.

मुंबई - सलमान खान आणि शाहरुख खान आतपर्यंत एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले आहे. आता इंटस्ट्रीतले हे दोन खान एकमेकांसमोर उभे राहताना दिसणार आहेत. टेलीचक्करने दिलेल्या रिपोर्टनुसार शाहरुख खान टेड टॉक नयी सोच हा टीव्ही शो तर सलमान खानच्या बिग बॉसचा 11वा सीजन एकच वेळेस रिलीज होणार आहेत. या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार किंग खानच्या नवा शो टेड टॉक: नयी सोचचा प्रोमो 19 ऑगस्टला शूट करणार आहे तर सलमान खान बिग बॉस 11च्या प्रोमोचे शूट 30 जुलैला करणार आहे. शाहरुखचा शो रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार तर सलमानचा शो रात्री 10:30 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
छोट्या पडद्यावर सलमानची पॉप्युलारिटी ही शाहरुखपेक्षा जास्त आहे. किंग खानने या आधी 'कौन बनेगा करोडपती' आणि 'पाचवी पाससे तेज' या शो चे सूत्रसंचालन केले आहे मात्र म्हणावे तसे यश त्याच्या शो ला मिळाले नाही. तर दुसरीकेड सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसची टीआरपी सगळ्यात जास्त आहे. ऐवढचे नाही तर सलमान लवकरच दस का दम हा शो सुद्धा छोट्या पडद्यावर पुन्हा घेऊन येणार असल्याचे समजते आहे.मुंबई - घर हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो झोपडदीवासीयांनी शुक्रवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला.यामध्ये फेरीवाले बांधकाम कामगार,सफाई कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरीक सामील होते. २०१६ पर्यंतच्या बांधलेल्या सर्व झोपडपट्टी आणि चाळींना संरक्षण देण्याची यांची प्रमुख मागणी होती.या समितीने दिलेल्या माहिती नुसार मुंबई मध्ये ६९% जनता हि झोपड्पट्टीमधे राहत आहे.नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे आश्वासन जरी दिले असले तरी,राज्य सरकारकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही.त्यामुळे या गरीब जनतेला बेघर करू नये.त्यांना लवकरात लवकर अधिकृत घोषित करून पुनर्वसन करण्याची मागणीही यावेळी केली.
या सभेला मा. आ. विदयाताई चव्हाण, मा.आ. कपिल पाटील. मा., आ.हरिभाऊ बागाडे आणि युवा क्रांती सभेचे विशाल हिवाळे यांनी संबोधित केले. या मोर्च्यास जवळ जवळ ५००० हजार झोपडीधारक व फेरिवाले आले होते.

मुंबई - प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिका-यानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई आयकर विभागातील टीडीएस विभागाचे अतिरिक्त आयुक्त विवेक बत्रा यांच्यासह पत्नी प्रियांका आणि अन्य तिघांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. याच प्रकरणात सीबीआयने त्याच्या मुंबईसह ठाणे, गोवा, सिल्व्हासा आणि दिल्ली येथील १० ठिकाणांवरील घर, कार्यालयांवर छापे टाकले.
विवेक बत्रा हे १९९२ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते सध्या आयकर विभागाच्या टीडीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. कामाच्या कालावधीत त्यांनी बेनामी मालमत्ता बाळगल्याबाबत सीबीआयकडे तक्रार आली होती. १ एप्रिल २००८ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली. सीबीआयने अधिक चौकशी सुरू केली तेव्हा तपासात बत्रा यांच्या उत्पन्नापेक्षा बेनामी स्थावर तसेच जंगम मालमत्ता अधिक आढळून आली. ही मालमत्ता त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. त्यामुळे पत्नीही सहआरोपी आहे. बत्रा यांच्याकडे एकूण ६ कोटी ७९ लाख ५१ हजार ११६ रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आली. मात्र, एवढी मालमत्ता कशी व कोठून आली याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे सीबीआयने बत्रा, त्यांच्या पत्नी प्रियांका, सीए शिरीष शहा, विराज प्रोफाइल लिमिटेडचे एमडी नीरज कुमार, अलोक इंडस्ट्रिजचे संचालक दिलीप जिवारजीका यांच्याविरुद्ध् बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला शुक्रवारपासून सुरुवात झालेली असतांना गडचिरोलीच्या जंगलात स्थानिक आदिवासींनीच नक्षलवाद्यांच्या फलकाची जाळपोळ करून या शहीद सप्ताहाचा तीव्र निषेध केला आहे. नक्षलवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजवर आम्ही बंदमध्ये सहभागी झालो. परंतु त्याचा काही फायदा आम्हाला झाला नाही. उलट आम्ही विकासापासून दूर गेलो. परंतु आता आम्ही नक्षलवाद्यांच्या आव्हानाला भीक घालणार नाही, उलट त्यांनी लावलेल्या फलकांची होळी करू, अशी कठोर भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने लोकांचे समर्थन कमी होत असल्याचे बघून शहीद सप्ताहात प्रथमच नक्षलवादी हादरले आहेत.

सोलापूर - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीयदृष्टय़ा मागे पडलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन झाले असले तरी त्यांच्या या नियुक्तीचा काँग्रेसला सोलापूरमध्ये कितपत फायदा होतो याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.बारामती म्हणजे शरद पवार, लातूर विलासराव देशमुख, सिंधुदुर्ग नारायण राणे तसेच सोलापूर म्हणजे सुशीलकुमार शिंदे ही राज्याच्या राजकारणातील समीकरणे तयार झाली होती. या नेत्यांवरून त्यांच्या गावांची ओळख निर्माण झाली होती. सुशीलकुमार शिंदे यांचे गेले चार दशके सोलापूरमध्ये वर्चस्व होते. शिंदे यांच्या शब्दाप्रमाणे स्थानिक राजकारण चालत असे. महानगरपालिकेत काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. हा अपवाद वगळता अनेक वर्षे सोलापूरमध्ये शिंदे निवडणुकीत उतरल्यावर त्यांचा विजय निश्चित असायचा. २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांची कन्या प्रणिती यासुद्धा विजयी झाल्या होत्या.लोकसभेचे नेते आणि गृहमंत्रिपद भूषवीत असतानाही शिंदे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती. त्यात शिंदे यांच्याकडे इतके वर्षे नेतृत्व असूनही सोलापूरचा विकास झाला नाही यावर मोदी यांनी भर दिला होता. मोदी लाटेत शिंदे यांचाही पराभव झाला. पराभवापासून शिंदे राजकीयदृष्टय़ा काहीसे मागे पडले होते. गेल्याच आठवडय़ात पक्षाने त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे.

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीची तुरूंगात खास बडदास्त ठेवली जात आहे. तिला तुरूंगात फेशियल आणि मसाज सारख्या सुविधा मिळत असल्याची शंका उपस्थित करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत गृहखात्याचे वाभाडे काढले आहे. मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडण्यात आली. त्यावरील चर्चेत सहभाग घेताना आशिष शेलार यांनी गृह विभागाची पोलखोल करत सरकारला घरचा आहेर दिला. भायखळा कारागृहात इंद्राणी मुखर्जीला पेडिक्युअर, फेशियल आणि मसाज सारख्या सुविधा मिळाल्या. तिला या सुविधा मिळाव्यात म्हणून मंजुळा शेट्येची मदत घेतली गेल्याची चर्चा असल्याचे सांगत शेलार यांनी एकच खळबळ उडवून दिली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली.

अहमदाबाद - बिहारमध्ये आघाडी सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंह राजपूत, आमदार तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले आहे.बलवंतसिंह राजपूत हे शंकरसिंह वाघेलांचे व्याही असून त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. वाघेलांच्या जाळ्यात काँग्रेस अडकत चालली असून, त्यात राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. गुजरात काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून, अंतर्गत कलाहामुळे तीन आमदारांनी पक्ष सोडल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि गुजरात सरकार विकासकामांवर भर देत असल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसचे पाटीदार समाजाबाबतचे धोरण अमान्य असल्याने आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे सांगितले.

धुळे - गुड्डया खून प्रकरणातील सहावा आरोपी पोलिसांच्या गळाला लागला. विक्की उर्फ विक्रम रमेश चावरे (२७ रा.एकता नगर,धुळे) याला पोलिसांनी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राऊ गावातून अटक केली. प्रमुख ११ पैकी आता पोलिसांच्या हाती ६ आरोपी लागले असून गोयर बंधू मात्र अद्यापही फरार आहे. रफीयोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डया या गुंडाची १८ जुलैला गोपाल टी हाऊस येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करुन मारेकरी पसार झाले. या आरोपींचा शोध घेण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांची पथके दिवस रात्र प्रयत्न करत असून आतापर्यंत ६ आरोपींना राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. गुरुवारी पुन्हा एका प्रमुख आरोपीला शोध पथकाने पकडले. पोलीस निरिक्षक राठोड, हवालदार दिपक पाटील, पो. ना. रमेश माळी, पो. ना. कुणाल पानपाटील, पो. कॉ. रवी राठोड यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊ गावातून विक्रम उर्फ विक्की रमेश चावरे (वय २७ रा.एकता नगर,धुळे) या आरोपीला शिताफिने अटक केली. त्याला सकाळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

मुंबई  - बॉंबस्फोटाच्या खटल्यातील दोषी आरोपी अभिनेता संजय दत्त याची कारागृहातून चांगल्या वर्तणुकीच्या कोणत्या निकषांवर सुटका केली, याचा खुलासा दोन आठवड्यांत करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिला. येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या संजयला कारागृह प्रशासनाने फर्लो व पॅरोल (संचित रजा) अशा दोन्ही सुट्या एकाच वेळी कशा दिल्या. तसेच दोन महिन्यांतच त्याची चांगली वर्तणूक कशी ओळखली, असा सवालही खंडपीठाने गुरुवारी केला. 
सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी संजयच्या शिक्षेविरोधात न्यायालयात जनहित याचिका केली आहे. न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर  सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने विविध सवाल केले. नियमानुसार फर्लो व पॅरोल या दोन्ही सुट्या कैद्यांना एकाच वेळी घेता येत नाहीत. त्या मंजूर करण्यामागे सबळ कारण असावे लागते. त्यामुळे त्याचाही तपशील दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

नवी दिल्ली - ‘भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी करून नितीशकुमार यांनी बिहारची फसवणूक केली आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यास आमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयास सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ,’ असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
लालूप्रसाद म्हणाले, ‘राष्ट्रीय जनता दल हा विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष होता. असे असताना सरकार स्थापन करण्याची संधी आम्हाला मिळायला हवी होती. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आम्हाला सकाळी ११ वाजता भेटण्याची वेळ दिली होती. असे असताना राज्यपालांनी रात्रीच सरकार स्थापनेचे आमंत्रण संयुक्त जनता दल आणि भाजपला दिले. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा विचार आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ आणि त्यानुसार कोर्टात जाऊ.’
‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच महाआघाडी स्थापन करण्यात आली होती. मला वाटले असते तर फक्त ७१ आमदार असताना मी त्यांना मुख्यमंत्रीही केले नसते. नितीश यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भोजन केले. हा प्रकार आधीच ठरला होता. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर सीबीआय, ईडीचे छापे घालायला लावून प्रतिमा खराब करण्यात आली. भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे,’ असा आरोप लालूप्रसाद यांनी केला.

मुंबई - महिला आणि लहान मुलांच्या अवैध व्यापारात आणि त्यांच्या खरेदी-विक्रीत टोळ्या गुंतल्या आहेत. या अवैध व्यवसायाला संघटित गुन्हेगारीचे स्वरूप येत आहे. त्यामुळे सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना ‘मोक्का’ लावण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगतले.
राज्य महिला आयोग व इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या वतीने मुंबईत महिला व लहान मुलांच्या अवैध व्यापाराच्या विरोधात जनजागृतीसाठी दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. गुरुवारी या परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थ‌तिीत उद‍्घाटन झाले. यावेळी बोलताना पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी महिला व बालकांच्या अवैध व्यापाराबद्दल चिंता व्यक्त केली. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते. या अवैध व्यापारात संघटित गुन्हेगारी टोळ्या गुंतल्या आहेत. त्यामुळे या अवैध व्यापारात गुंतलेल्या संघटित गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा विचार आहे. तसेच या व्यवसायातील आर्थिक साखळी तोडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यापूर्वी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांचा अवैध व्यापार हा मानवतेच्या विरोधातील गुन्हाच असल्याचे सांगितले.राज्यात प्रभावी उपाय योजल्यामुळे बालकांच्या अवैध व्यापाराचे प्रमाण ४० टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सोलापूर - अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़ दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी सीसी कॅमेºयातील फुटेजवरून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे़ 
प्रकाश अशोक चव्हाण (वय ४४, रा़ अहिल्याबाई शाळा, आदर्श नगर, सोलापूर) असे खून झालेल्या कापड व्यापाऱ्याचे नाव असून बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़ 
मयत प्रकाश चव्हाण हे रेडिमेड कापड विक्रेते होते़ सुनील नगरमध्ये ‘कूल वेअर’ नावाचे होजिअरी दुकान आहे़ नेहमीप्रमाणे दुकान उघडून ते आत बसले होते़ दीड वाजण्याच्या सुमारास दोन तरुण दुकानात आले़ त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली. वादविवादात त्या दोघांनी काउंटरवरून आत उडी घेतली आणि धारदार हत्याराने चव्हाण यांच्या पाठीवर आणि हातावर वार केले़ त्यानंतर मारेकऱ्यानी तेथून तत्काळ पळ काढला़ 
यानंतर रक्ताळलेल्या स्थितीत चव्हाण हे दुकानातून बाहेर धावत आले़ जवळच पाण्याची टाकी असून या चौकात एका गाडीवर चंद्रशेखर कोळी आणि प्रकाश कोळी हे दोघे गाडीवरील भेळ खात थांबले होते़ ते वाचवा़ वाचवा़ म्हणत आले आणि खाली कोसळले़ यावेळी चंद्रशेखर कोळी आणि प्रकाश कोळी या दोघांनी त्याला कोणी मारले, का मारले विचारले असता मारेकऱ्याना ओळखतो, एवढेच त्यांनी सांगितले़ मारण्याचे कारण त्यांना सांगता आले नाही़ त्या दोघांनी त्यांना तत्काळ रिक्षातून शासकीय रुग्णालयात हलविले़ यावेळी डॉ़ गीता गावडे यांनी त्यास मृत घोषित केले़ मयत चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़

कोल्हापूर - ‘करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झालेलीच नाही. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार मूर्तीची झीज झाला नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे मूर्तीची झीज झाली असल्याच्या निष्कर्षात कोणतेही तथ्य नाही’ असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळाच्या ​अधिवेशनात केले आहे. मंत्री तावडे यांचे हे विधान धादांत खोटे आहे. या विधानाबाबत त्यांनी आठ दिवसांत माफी न मा​गितल्यास तावडे यांना कोल्हापुरात प्रवेशबंदी करण्याचा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी देण्यात आला.
दोन वर्षापूर्वी अंबाबाई मूर्तीवर केलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर तीन महिन्यांपूर्वी मूर्तीवर पांढरे डाग पडत असल्याचे निदर्शनास आले. यावरून मूर्ती संवर्धन प्रक्रिया फोल ठरल्याचे स्पष्ट होत असल्याचा प्रश्न शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला होता. यासंदर्भात उत्तर देताना तावडे यांनी मूर्तीची झीज झालीच नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्यावतीने कोल्हापुरात घेण्यात आलेल्या पत्रकार प​रिषदेत तावडे यांनी विधान मागे घ्यावे अन्यथा कोल्हापुरात त्यांना प्रवेशबंदी आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट केले.
समितीचे सदस्य, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘दोन वर्षापूर्वी संवर्धन झाल्यानंतर सहा महिन्यांनी मूर्तीची पाहणी पुरातत्व विभाग व रासायनिक संवर्धन समितीचे प्रमुख मनेजर सिंग यांनी केली होती. त्यावेळी संवर्धनपश्चात मूर्तीची शास्त्रीय काळजी घेण्याबाबत समितीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी पुजाऱ्यांनी केली नसल्याचा अहवाल दिला होता. तसेच २​ जून २०१६ रोजी औरंगाबाद येथील पुरातत्व रसायन तज्ज्ञ समितीनेही मूर्तीची पाहणी करून झीज झाल्याच्या निष्कर्षाला अहवालद्वारे दुजारो दिला आहे. त्यामुळे तावडे यांच्याकडून करण्यात आलेले, मूर्तीची झीज झालीच नसल्याचे विधान पुजाऱ्यांना पाठीशी घालणारे आहे.’

पाटणा - लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी केलेली सत्तासोयरिक अवघ्या दोन वर्षांत मोडून काढून बुधवारी संध्याकाळी राजीनामा देणाऱ्या नितीशकुमार यांनी गुरुवारी सकाळी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने बिनशर्त पुढे केलेल्या हातावर नितीश यांनी आनंदाने ‘टाळी’ दिल्याने बिहारमध्ये संयुक्त जनता दल-भाजप सरकार स्थापन होणार आहे. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश यांना आज, शुक्रवारी बहुमत सिद्ध करावे लागेल

मुंबई - तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.
मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्रातही तशी सक्ती लागू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पत्रकारांना सांगितले. यासंदर्भात आझमी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी विरोधी भूमिका घेतली. वंदे मातरमचा मी सन्मान करतो; मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मी वंदे मातरा म्हणणार नाही. माझ्यावर कारवाई झाली, मला जेलमध्ये टाकले वा देशाबाहेर काढले तरी मी यावर ठाम असेन, असे आझमी म्हणाले.
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनीही आझमी यांच्या सुरात सूर मिसळला. माझ्या मानेवर सुरी ठेवली वा माझ्यावर गोळी झाडली तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही, असे पठाण म्हणाले.

बोरी - जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकºयांनी बँकेवर दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.
बोरी येथे महा-ई-सेवा केंद्रावरील वेबसाइट ठप्प झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून गर्दी केली होती. मात्र बँकेचा बोजा असलेल्या शेतकºयांनी आमच्या शाखेत पीक विमा भरू नये, असे शाखाधिकारी आर.व्ही. सरोदे यांनी सांगितले. बचत खाते ज्या बँकेत आहे, त्याच बँकेत शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तेथे गोंधळ घालून बँकेचे कामकाज बंद पाडले. त्यानंतर परभणी-जिंतूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केले. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाखाधिकाऱ्यांना भेटून पीक विमा भरण्याचे काम सुरू करा, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर बँकेचे शटर उघडत असताना काही जणांनी बँकेवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार सुरू केला. त्यानंतर आंदोलक पळून गेले.पुणे - चलानतून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी चाललेल्या 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गीता शहा असे या ७० वर्षीय वृद्धेचं नाव आहे. जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात येणार असून आणि पुढील चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येईल , अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गीता शहा या इस्टेट एजंट आहेत. गीता शहा जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. गीता शहा रिक्षातून एफसी रोडवर पोहोचल्या असता पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे एक कोटींच्या जुन्या नोटा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत.मुंबई - आझाद मैदानावर धडकणाऱ्या आंदोलकांवर ‘सोनू’ची जादू दिसत आहे. ‘सोनू तुझा सरकारवर भरोसा नाय काय!’ या नव्या गाण्यावर ठेका धरत हलबा जमातीच्या आंदोलकांनी सरकारविरोधात बुधवारी आझाद मैदानात जोरदार घोषणा दिल्या.
हलबा व हलबी अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांची सेवा जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे संपुष्टात आणण्यात आली आहे. त्याविरोधात राज्य सरकारने विशेष अधिकार वापरून शासन निर्णय घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाची मुख्य मागणी होती. त्यासाठी आंदोलकांनी सरकारला खास ‘सोनू स्टाईल’मध्ये गाऱ्हाणे घातले.
महिला आंदोलकांनी एका सुरात गायलेल्या या गाण्यानंतर संपूर्ण आझाद मैदानात हलबा जमातीच्या मागण्यांची चर्चा ऐकू आली. आश्चर्याची बाब म्हणजे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणारे इतर आंदोलकही या वेळी हलबा आंदोलकांना साद देताना दिसले.

नागपूर - वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध मोहीम राबवून ३०९ वाहनांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ११०९ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांविरुद्ध चालानची कारवाई केली आहे. तीन दिवसांपर्यंत चालणाºया या विशेष मोहिमेमुळे पालकात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी पूर्वीच विना परवाना वाहन चालविणाºयांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी सकाळी शाळा-महाविद्यालयांसमोर मोहीम सुरू केली. वाहतूक पोलिसांनी ८३६ विद्यार्थी आणि २७३ पालकांविरुद्ध कारवाई केली. कारवाईदरम्यान ३०९ दुचाकी वाहनांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे पालकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांमार्फत पालकास बोलविले. मुलांनी कारवाई सुरू असल्याचे सांगताच पालक वाहतूक कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी त्यांचे मार्गदर्शन केले. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन सोपविल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. यातील अनेक विद्यार्थी विना हेल्मेट वाहन चालवीत होते. अशा पद्धतीने मुलांचा जीव धोक्यात घालून वाहतूक नियमांचे उल्लंघन कितपत योग्य आहे, अशी विचारणा पालकांना करण्यात आली. बहुतांश पालकांनी आपली चूक मान्य केली. शिक्षकांनीही वाहतूक पोलिसांच्या कारवाईची आधीच माहिती दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्याशिवाय मुलांना वाहन देणे ही आपली चूक असल्याचे पालकांनी कबूल केले. अशी चूक भविष्यात होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाºया, अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कलम १८१ (४) आणि त्यांच्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कलम १८१(५)नुसार कारवाई केली. ज्या चालकांजवळ कागदपत्र नव्हते त्यांचे वाहन ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कागदपत्र सोपविल्यानंतर त्यांचे वाहन सोडून देण्यात आले.बिहार - नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या धक्कातून सावरत यादव कुटुंबिय आणि राष्ट्रीय जनता दलाने (राजद) आक्रमकपणे स्वत:चा बचाव करायला सुरूवात केली. नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर काहीवेळातच लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर काल रात्री या सगळ्या राजकीय नाट्यात खलनायक ठरलेल्या तेजस्वी यादव यांनीही आपली भूमिका मांडली. मी केवळ निमित्तमात्र ठरलो, नितीश यांना भाजपच्या गोटात जायचेच होते, असा पलटवार त्यांनी केला.या सगळ्या राजकीय भूकंपानंतर तेजस्वी यादव यांनी काल रात्री उशीरा सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडून गुरूवारी सकाळी १० वाजता नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर तेजस्वी यादव आणखीनच संतापले. प्रामाणिक असणारे नेते एवढी घाई आणि गोंधळ का करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. याशिवाय, माझी बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. बिहारची जनता हे सर्व काही पाहत आहे. बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी द्यायला पाहिजे, एवढेच आमचे सांगणे आहे. नितीश यांची प्रत्येक चाल ही पूर्वनियोजित आहे. नाहीतर, सगळ्या गोष्टी एवढ्या घाईने का उरकल्या जात आहेत? नितीश कोणत्या तोंडाने आम्हाला प्रश्न विचारतायत. ते स्वत: कलंकित आहेत, त्यांच्यावर ३०२ कलमातंर्गत गुन्हा दाखल आहे. राजद, काँग्रेस आणि आमचे सहकारी पक्ष मिळून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि नितीश कुमार यांचा विरोध करू. आम्ही आंदोलन करू, धरणे धरू , पुतळे जाळू, असा इशाराही यावेळी तेजस्वी यांनी दिला.

नवी दिल्ली - मोदी सरकारचा ‘थिंक टँक’ असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लवकरच संसदेत प्रवेश करणार आहेत. काल दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शहा यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या ८ तारखेला गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्या शहा हे गुजरातचे आमदार आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे अमित शहा ही निवडणूक लढवणार किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आता ते राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाल्याने त्यांच्या गुजरातच्या राजकारणात परतण्याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्या आहेत. गुजरातमधील एकूण ११ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या १८ ऑगस्ट रोजी संपत आहे. यामध्ये स्मृती इराणी आणि दिलीप भाई पंड्या यांचाही समावेश आहे.

जळगाव - अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या जळगाव शाखेतर्फे आज (दि. २७) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांनी दि. १६ जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष अरूण चांगरे व राष्ट्रीय अध्यक्ष चरणस‌िंग टाक यांच्या उपस्थितीत उल्हासनगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय शिबिरात ठरल्याप्रमाणे युनियनच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी हे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून सात-बारा कोरा करावा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नयेत आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय किसान सभेतर्फे पुकारलेल्या देशव्यापी जेलभरो आंदोलनात ३०० शेतकऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. किसान सभा व भाकपच्या वतीने बुधवारी देशव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा सचिव राजू देसले, सहसचिव भास्कर शिंदे, सचिव देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निदर्शने केली. शासनाने सरसकट कर्जमुक्तीची घोषणा केली, परंतु ही फसवी घोषणा आहे. कर्जमाफीसोबत जाहीर केलेले दहा हजार रुपये अनुदान कोणत्याही शेतकऱ्याला मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सात-बारा कोरा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सुकाणू समितीने पुकारलेल्या आंदोलनाची शासनाला दखल घ्यावी लागली याकडे लक्ष वेधण्यात आले. कसत असलेल्या वनजमिनी नावावर कराव्यात, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील वनदावे त्वरित मंजूर करावे, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांसोबत पॉलिहाऊस, शेडनेटधारक शेतकरी, उपसा जलसिंचन बंद पडलेल्या आळंदी उपसा जलसिंचन संस्था यांनाही कर्जमुक्त करावे, शेतकरी विरोधी समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नये. नागपूरला जोडणाऱ्या उर्वरित दोन महामार्गाचे विस्तारीकरण करावे, शेतकरी, शेतमजुरांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा कायदा करा, भूमी अधिग्रहण कायदा २०१३ ची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या. त्याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देऊन चर्चा केली. आंदोलनावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. पोलिसांनी अटक केलेल्या सुमारे ३०० शेतकऱ्यांना दुपारनंतर सोडून देण्यात आले.

कर्जत - तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे गावामध्ये सुरू असलेली बेकायदा दारूविक्री तातडीने बंद करावी या मागणीसाठी युवा नेते व माजी उपसभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक व महिलांनी कर्जत-जामखेड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी सर्व महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्या वेळी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक यांनी आंदोलकांचा अवमान करताच आंदोलक संतप्त झाले. महिलांच्या आक्रमतेपुढे अखेर उपनिरीक्षकांनी माफी मागितल्यावर आंदोलक शांत झाले; मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या या कृतीवर सर्वत्र जोरदार टीका करण्यात येत आहे.
सरंपच संध्याराणी फरताडे, उपसरंपच सागर ढोबे, सुधीर फरताडे, आबासाहेब फरताडे, नवनाथ अखाडे, सविता अखाडे, शोभा सकट, स्वाती अखाडे, मंदा आव्हाड, सुजाता काळे, गंगासागर अखाडे, सविता अखाडे, विनोद अखाडे, रमेश अखाडे, विजय सकट, अंकुश ढोबे, रघू कासार, लक्ष्मण ढोबे, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरी - ‘महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे काही नियम आणि अटींवर बैलगाडा शर्यती पूर्ववत होतील,’ असा दावा आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी केला.
बैलगाडा शर्यतीचा मार्ग बऱ्यापैकी खुला झाला आहे. महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली असून, विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात येतील, असे लांडगे यांनी स्पष्ट केले.

वसई - होलसेलच्या दुकानातून आणलेली अंडी प्लास्ट‌िकची असल्याची तक्रार वसईतील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला चौकशी करण्याची विनंती केली आहे. चुळणे गावात राहणारे सामाजिक कार्यकर्ते जॅक गोम्स यांनी शनिवारी चुळणे भागातील एका होलसेल दुकानातून १२ अंडी विकत घेतली. मंगळवारी दुपारी ऑमलेट बनविण्यासाठी त्यांनी त्यापैकी एक अंड घेतले. त्यावेळी हे अंड ‘वेगळे’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशाप्रकारे प्लास्टिकची अंडी बाजारात कोण पोहोचवते, याबाबत चौकशी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

धुळे - धुळ्यातील शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले. शेवाळी ता. शिंदखेडा येथील तक्रारदाराला आरोपपत्राची झेरॉक्स हवी होती. त्यासाठी वारंवार मागणी करुन देखील पोलीस ठाण्यात त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. अखेर तक्रारदाराने निरीक्षक देविदास भोज यांची भेट घेऊन आरोपपत्राच्या झेरॉक्सची मागणी केली. ती देण्यासाठी निरीक्षक भोज यानी तक्रादाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.उपअधिक्षक शत्रुघ्न माळी यांच्यासह जितेंद्र परदेशी, प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून शिंदखेडा येथील भुषण हॉटेलच्या रुम क्रमांक ४ मधून पोलीस निरीक्षक देविदास भोज यांना हातोहात पकडले. याप्रकरणी भोज या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात भोज यांची कारकीर्द अगोदरपासूनच वादग्रस्त राहिल्याची नागरिकांत चर्चा सुरु झाली आहेपाटणा - नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांनी त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर केलेले आरोप, विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरून त्यांचं केलेलं कौतुक, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला पाठिंबा तसंच सत्तास्थापनेची संधी मिळावी यासाठी आक्रमक झालेलं राष्ट्रीय जनता दल आणि त्यानंतर राज्यपालांकडून करण्यात आलेली नितीश कुमारांच्या शपथविधीची घोषणा, या सर्व घटना बिहारमध्ये रंगत असलेलं राजकीय नाट्य दाखविणाऱ्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश कुमार यांची इच्छा होती. पण दबावापुढे झुकायला ते तयार नव्हते. दोन दिवसांपूर्वी नितीश यांनी तेजस्वी यांची भेट घेऊन त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला होता. पण बुधवारी तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, असं लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केलं. तेव्हाच नितीश कुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.आज पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्र्याची शपथ घेणार आहेत.यासर्व राजकीय घडामोडीने बिहारची जनता मात्र चक्रावून गेली आहे असेच चित्र दिसत आहे.

घडामोडी...

- बुधवारी संध्याकाळी नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत बैठक झाली.
- आमदारांसोबतच्या बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीसाठी राजभवानाकडे गेले होते.
- राज्यपालांच्या भेटीमध्ये नितीश कुमारांनी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
-राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं.
- नितीश कुमारांनी राजीनाम दिल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं.
- नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर काहीवेळातच लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश यांच्यावर गंभीर आरोप केले.

मुंबई - रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब यासह सर्व वाहनांना शाळेपर्यंत जाण्याकरिता एकच रस्ता असतानाही त्यावर बेकायदा बांधकाम करून रस्ता अरुंद केल्याबद्दल मुंबई महापालिकेला ‘शिक्षा’ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले असतानाही ते पुन्हा उभारल्याबद्दल न्यायालयाने महापालिकेला बुधवारी ५० हजार रुपयांचा दंड केला आहे.
‘नरसी पाडा, मौजे आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व येथे पालिकेने केलेले ‘ओपन ऑडिटोरियम शेड’चे बेकायदा बांधकाम आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत तोडावे. त्याकरिता पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिक पोलिसांनी संरक्षण द्यावे. तसेच पालिकेने ५० हजारांच्या दंडाची रक्कम याचिकादार शिवदत्त एज्युकेशनल ट्रस्टला दोन महिन्यांत द्यावी’, असे आदेश न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने विद्यालयाच्या याचिकेवर निर्णय देताना दिले.

रघुवीर माध्यमिक विद्यालय व शिवदत्त एज्युकेशनल ट्रस्टने याचिका केली होती. शाळेजवळ अतिक्रमणे वाढत जाऊन मुख्य आंबेडकर रस्त्याला जोडणारा रस्ता अरुंद झाला असताना त्यावर बेकायदा मंदिर बांधण्यात आले होते. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शाळेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशाने ते बांधकाम तोडण्यात आले होते. असे असताना गेल्या वर्षी पालिकेनेच तेथे बेकायदा शेड उभारली. त्यामुळे शाळेने पुन्हा याचिका करत हे बांधकाम धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द अग्निशमन दलाने पुन्हा दिला असल्याचे निदर्शनास आणले. तथापि, तत्कालीन स्थानिक नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर यांच्या प्रस्तावाप्रमाणे ठराव झाल्याने पालिकेने सुमारे पाच लाख रुपये खर्चून हे बांधकाम केल्याचे उत्तर पालिकेने प्रतिज्ञापत्रात दिले. याबद्दल न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त करत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले.

काश्मीर - पाकिस्तानकडून टेरर फंडिंग घेणाऱ्या आणि काळा पैसा जमविणाऱ्या काश्मीरमधील फुटरतावादी नेत्यांविरोधात सक्त वसूली संचालनालयाने (ईडी) जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचाच एक भाग म्हणून काश्मीरमधील फुटरतावादी गटाचे नेते शब्बीर शाहला ईडीने मंगळवारी अटक केली. दशकभरापूर्वी मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
एनआयएने या आधीच हुर्रियतच्या ७ नेत्यांना अटक केली आहे. त्यानंतर शब्बीर शाह यालाही अटक करण्यात आल्याने काश्मीरमधील फुटरतावादी गटाचे कंबरडे मोडले गेले आहे. शाह याला बुधवारी दिल्लीत आणण्यात येणार असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शाहला ईडीने अनेकदा समन्स पाठवले होते. तरीही ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. त्यानंतर त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलं होतं. ईडीने यापूर्वी हवाला दलाल मोहम्मद असलम वानीला अटक केली होती. वानीची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने मनी लाँड्रिंग प्रकरणात शाह आणि त्याच्या कुटुंबीयांना २.२५ कोटी रूपये हप्त्याहप्त्याने दिल्याची कबुली दिली होती. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली. दरम्यान एनआयएने सोमवारी फुटीरतावादी नेते सैयद अली शाह गिलानी यांच्या जावयालाही टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.मुंबई - घाटकोपरमधल्या साई दर्शन इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा नेता सुनील सितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सातपविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली.
घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ साई अपार्टमेंटची इमारत सकाळी कोसळली. या दुर्घटनेत आता पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. साईदर्शन इमारत दुर्घटनेला शिवसेनेचा स्थानिक नेता जबाबदार असल्याचा आरोप दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशाने केला. सुनील सितप याचे हे नर्सिंग होम आहे. हे नर्सिंग होम तोडून सुनील सितप इमारतीच्या तळमजल्यावर हॉटेल सुरू करणार होता. सितपने हॉटेलसाठी नुतनीकरण करताना इमारतीचे बिम तोडल्याचा आरोप केलाय. सितपच्या बायकोने शिवसेनेच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढवली होती. दुर्घटनेनंतर सुनील सितप फरार झाला होता.

कल्याण - आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या १७ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणात घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चंद्रशेखर पडियाची याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
ही मुलगी आंबिवली येथे राहत असून कल्याण पूर्वेकडील मेट्रो टॉवरमध्ये राहणाऱ्या चंद्रशेखर पडियाची याच्याकडे काम करते. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रशेखर याने या मुलीला मटण आणण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. तेथे ज्यूसमधून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिला एका इमारतीमधील खोलीची साफसफाई करण्यास सांगितले. यादरम्यान तरुणीला चक्कर आल्याने ती बेडरूममध्ये बसली असताना ही संधी साधत चंद्रशेखरने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी चंद्रशेखरविरोधात गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या हक्कांसंदर्भात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सुरू असलेली सुनावणी बेकायदा आहे. या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पुजारी हटाओ संघर्ष समितीनेही या याचिकेवर तीन अर्ज दाखल केले आहेत. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी ते दाखल करून घेत दोन्ही बाजूचा युक्त‌िवाद ऐकून घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनीही वकिलांमार्फत कोर्टात लेखी म्हणणे मांडले. याबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. २८) होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीबरोबरच आता कोर्टातही याप्रश्नी सुनावणी सुरू राहणार आहे. अंबाबाई मंदिरातील पुजारी आणि पुजारी हटाओ संघर्ष समितीतील वादावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू होताच मुनीश्वार यांनी दिवाणी कोर्टात धाव घेतली. ‘याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणीचे अधिकार नाहीत, त्यामुळे सुनावणीला स्थगिती मिळावी,’ अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत मुनीश्वरांच्या याचिकेवर अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने तीन अर्ज दाखल करण्यात आले. दिलीप पाटील, दिलीप देसाई यांनी अॅड. सतीश माने आणि सूर्यकांत चौगुले यांच्याकरवी अर्ज दाखल केला. ते कोर्टाने दाखल करून घेतले.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने या तिन्ही  जागा लढवायचा निर्धार केल्यामुळे मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.
काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले व महत्वाकांक्षी नेते शंकरसिंह वाघेला यांना भाजपने तिसरी जागा लढवा, असे संकेत दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुढील महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असून तीत वाघेला यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाघेला यांचे चांगले संबंध आहेत. तथापि, वाघेला नाखुष असून या तिसºया जागेसाठी माझ्या पसंतीच्या उमेदवाराचा विचार करावा, असे त्यांनी सूचवले आहे. भाजपला तिन्ही जागा जिंकण्यासाठी अतिरिक्त १७ आमदारांची गरज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख २८ जुलै आहे. भाजपचे संसदीय मंडळ अंतिम निर्णय २६ जुलै रोजी घेईल. वाघेला यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून केलेल्या बंडामुळे भाजपमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्याने काँग्रेसचे अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा करण्याचे ठरवले.
वाघेला यांनी पुढे येऊन परत भाजपात दाखल व्हावे व स्वत:च राज्यसभेची तिसरी जागा लढवावी अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. परंतु वाघेलांची त्यास तयारी नाही. या पार्श्वभूमीवर अहमद पटेल यांची फेरनिवड सहजपणे होण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे. १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपचे १२३ आमदार असून भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय राज्यसभेवर निश्चित आहे.

नवी दिल्ली- संसदेत सत्तारूढ भाजप सदस्यांच्या उपस्थितीच्या वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकवार जाहीरपणे चिंता व्यक्त केली. "याबाबत आता मलाच काही लक्ष घालावे लागेल असे दिसते,' अशा शब्दांत त्यांनी राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजप खासदारांना खडसावल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक बालयोगी सभागृहात झाली. या वेळी मोदींनी, सत्तारूढ सदस्यांच्या संसदीय उपस्थितीबाबत आपण अजूनही समाधानी नाही, असे सांगितले. सरकारला तीन वर्षे उलटल्यावरही संसदेत उपस्थित राहा असे स्वपक्षीय खासदारांना पुन्हा पुन्हा सांगावे लागणे सूचक मानले जाते. दांडीबहाद्दर खासदारांची संख्या वाढल्याबद्दल त्यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली. या संसदीय बैठकीत लोकसभा व राज्यसभेतील कामकाजाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेच्या कामकाजाची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झालेल्या भाजपच्या कथित फजितीचाही उल्लेख केला. तो संदर्भ घेऊन मोदींनी अनुपस्थितीबद्दल भाजप खासदारांचे पुन्हा कान उपटले.

मुंबई - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेली कर्जमाफीची योजना, ही शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करणारी ठरत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यापेक्षा सरकार ‘वनटाइम सेंटलमेंट’च्या नावाखाली शेतकऱ्यांकडूनच कर्जाची वसुली करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. अभिनंदनाच्या ठरावाऐवजी सर्वंकष कर्जमाफीचा ठराव आणायला हवा होता, असे सांगत विरोधकांनी या मुद्द्यावर दोनदा सभात्याग केला. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेबद्दल सत्ताधारी पक्षात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला विरोध करत अजित पवार यांनी कर्जमाफीच्या घोषणेवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी या योजनेत अनेक सुधारणा आवश्यक आहेत. यात अनेक जाचक अटी, निकष लावल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहे. पाच लाखाचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, तर पहिल्यांदा साडेतीन लाख रुपये भरावे लागतील. आर्थिक संकटात असलेला शेतकरी ही रक्कम कुठून आणणार, असे पवार म्हणाले. या कर्जमाफीतून जवानांच्या शेतकरी कुटुंबीयांना वगळू नये, तसेच सरकारी, जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका व पतसंस्थाचा कर्जदार असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश या योजनेत हवा होता, अशी मागणी पवार यांनी केली.मुंबई - पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापन विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शासनाचे निकष व नियमाचा योग्य विचार न करता, पोलीस अधिकाºयांना सेवाज्येष्ठता (सीनिअ‍ॅरिटी) देण्याचा निर्णय अंगलट आला आहे. त्याबाबत महाराष्ट प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) दिलेल्या चपराकीनंतर, ४७७ उपनिरीक्षकांची सेवाज्येष्ठता रद्द करण्याची नामुष्की पत्करावी लागली.

हे सर्व अधिकारी सध्या राज्यभरात विविध ठिकाणी सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘मॅट’च्या आदेशानुसार पोलीस मुख्यालयाकडून त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या गलथानपणाबाबत काही अधिकाºयांनी गेली दोन वर्षे दिलेली कायदेशीर लढाई यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांना आता तुलनेत लवकर पदोन्नती मिळणार आहे. २००० साली उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांतील ४७७ अधिकाºयांना, दोन टप्प्यांत म्हणजे २००१ व २००४ साली प्रशिक्षणाला पाठविण्यात आले. त्यानंतर, ते उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाले. मात्र, एकाच वर्षात उत्तीर्ण झाले असताना, प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रशिक्षणाच्या कालावधीला विलंब झाल्याचे सांगत, संबंधित अधिकाºयांनी सेवाज्येष्ठता एकाच वेळी देण्याची मागणी केली. त्यानुसार, मुख्यालयातील आस्थापना विभागाने, २६ एप्रिल २००१ रोजी ट्रेनिंगला गेलेले १३१ व एक जून २००४ रोजी गेलेल्या ३४६ अधिकाऱ्यांना त्या-त्या वर्षाऐवजी, एकाच दिवशी म्हणजे २२ मार्च २००० या तारखेपासूनची सेवाज्येष्ठता दिली. या निर्णयाला आक्षेप घेत, सुरेश शिंगटे व रमाकांत कोथळीकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र याचिकेद्वारे ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. ४७७ अधिकारी आमच्याहून कनिष्ठ असूनही, त्यांना ज्येष्ठता मिळाल्याने आमच्यावर अन्याय झाला, असा त्यांनी युक्तिवाद केला. ‘मॅट’चे सदस्य मलिक व अगरवाल यांनी तो मान्य करत, सेवाज्येष्ठता देण्याचा अधिकार महासंचालकांना नव्हे, तर शासनाला आहे, असे सांगत महासंचालकांचा निर्णय अयोग्य असल्याचा निकाल ६ जून २०१७ रोजी दिला. त्यांच्याकडून चपराक मिळाल्याने मुख्यालयाने चूक मान्य करीत, या ४७७ अधिकाऱ्यांना पूर्वी दिलेली सेवाज्येष्ठता रद्द करण्याचे आदेश बजाविले आहेत.नवी दिल्ली - भारतीय सशस्त्र दले देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पुरेशी सुसज्ज आहेत, असे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. भारतीय लष्कराकडे युद्धकाळात दहा दिवस पुरेल एवढाच दारूगोळा असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले होते, त्या बाबत राज्यसभेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या संरक्षण सिद्धतेच्या प्रश्नावर ते बोलत होते. कॅगने त्यांच्या अहवालात असे म्हटले होते, की १५२ प्रकारच्या दारूगोळय़ापैकी ६१ प्रकारचा दारूगोळा युद्धकाळात दहा दिवस पुरेल एवढाच आहे म्हणजे दारूगोळय़ात ४० टक्क्यांचा तुटवडा आहे. लष्कराने अटीतटीच्या युद्धप्रसंगी किमान चाळीस दिवस पुरेल एवढा दारूगोळय़ाचा साठा ठेवणे आवश्यक आहे.
जेटली यांनी या बाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर सांगितले, की कॅगच्या अहवालात कालसंदर्भात दारूगोळय़ाचा तुटवडा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी त्यात कुठला काळ गृहीत धरला हे माहीत नाही, पण त्यानंतर दारूगोळा साठा पुरेसा वाढलेला आहे. दारूगोळा व शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. यातील खरेदीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, दारूगोळय़ाचा पुरेसा साठा आहे तसेच लष्करी दले पुरेशी सुसज्ज आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget