September 2017

मुंबई - गुजरात येथील सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणातून आयपीएस अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान का दिले नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला केला. एवढेच नव्हे, तर विशेष न्यायालयाच्या निर्णयाबाबत सोहराबुद्दीनच्या भावाप्रमाणेच सीबीआयनेही असमाधानी असायला हवे, असे नमूद करताना या निर्णयाला आव्हान देण्याचा सीबीआयचा विचार तरी आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने सीबीआयकडे केली. तसेच प्रकरणातील कुठल्याही आरोपीविरोधात पुढील सुनावणीपर्यंत आरोपनिश्चिती न करण्याचे तोंडी आदेश सीबीआयला दिले. राजकुमार पंडियन, डी. जी. वंजारा आणि दिनेश एम. एन. या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना खटल्यातून दोषमुक्त करण्यात आले आहे. त्यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने आव्हान दिले असून न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्यासमोर शुक्रवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी या तीन अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयामुळे अन्य काही आरोपीही प्रकरणातून दोषमुक्त झाल्याची बाब सोहराबुद्दीनच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक ती मंजुरी न मिळल्याचे एकमेव कारण या अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्यामागे आहे का, असा सवाल न्यायालयाने सीबीआयकडे केला.

मुंबई - कंत्राटी सफाई कामगारांनी सेवेत कायम करण्यासाठी चार वर्षापूर्वी संप केल्याच्या काळात जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी जातीवाचक शब्द वापरल्याच्या तक्रारीमध्ये कोणताही सबळ पुरावा सत्र न्यायालयापुढे मांडता आला नसल्याने शुक्रवारी न्यायालयाने डॉ. लहाने यांची निर्दोष सुटका केली. डॉ. लहाने यांच्याविरुद्ध अत्याचारप्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सत्र न्यायालयाचे न्या. जी. ए. शेट्ये यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यात तक्रारदारासह चार साक्षीदार तपासण्यात आले. डॉ. लहाने यांच्यावतीने अॅड. स्वप्ना कोदे यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील संजना शर्मा यांनी काम पाहिले.मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी (ता. 29) सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा उघड झाली आहे. रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार द्या आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन झालेल्या काकोडकर समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा, अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत.
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाशांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

नवी दिल्ली - भाजपची ‘व्होट बँक’ म्हणून ओळखल्या जाणा-या व्यापारी-व्यावसायिकांत केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध तीव्र असंतोष वाढत असून, कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) यासह अनेक प्रमुख व्यापारी संघटना सरकारी धोरणांविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. हे आंदोलन देशव्यापी असणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, सरकारी धोरणातील अनेक मुद्दे व्यापारी संघटनांना खुपत आहेत. थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांतील प्रस्तावित शिथिलीकरण, बहु-ब्रँड किरकोळ व्यापार, जीएसटीमुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि नोटाबंदी यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये संघटनांनी स्थानिक घाऊक आणि किरकोळ व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यावर विचार करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. तथापि, त्यावर तीन वर्षांत काहीही काम झालेले नाही.राष्ट्रीय देशांतर्गत व्यापार नियामक स्थापन करावा, एकात्मिक देशांतर्गत व्यापारी धोरण आणावे आणि देशांतर्गत व्यापारासाठी एक बोर्ड स्थापन करावे, अशा काही प्रस्तावांचा त्यात समावेश होता. त्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या बैठकाही झाल्या. निर्णय मात्र काहीच झाला नाही.ऐन सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्यांकडून जाहिरात करून मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिले जात असल्यानेही व्यावसायिक नाराज आहेत.

नवी दिल्ली - म्यानमारहून भारतात आलेले रोहिंग्या हे शरणार्थी नसून घुसखोर आहेत. त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत. अशा लोकांप्रती सहानुभूती व्यक्त करणारे लोक पाहून वाईट वाटते, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. रोहिंग्यांबाबत भारत सरकारने आपली भूमिका या आधीच स्पष्ट केली आहे. म्यानमारमधून आलेले रोहिंग्या हे शरणार्थी नाहीत. ते घुसखोर आहेत. त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत. म्यानमारमधील अनेक निष्पाप हिंदुंची त्यांनी हत्या केली आहे, असे आदित्यनाथ यांनी ‘एएनआय’बरोबर बोलताना म्हटले. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. भारतात अवैधरित्या आलेल्या रोहिंग्यांकडून भारतीय नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येते तसेच त्यांच्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

नवी दिल्ली - मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेमध्ये २२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. ही घटना मानवनिर्मित असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. या घटनेमध्ये मुंबईकर जखमी झाले ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच जे लोक या घटनेत मारले गेले त्यांना आदरांजलीही वाहिली. मुंबईतील रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर आहे, त्याचमुळे आज झालेली चेंगराचेंगरीची घटना मानवनिर्मित आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. असे अपघात टाळता येणे शक्य असते, मात्र सरकारचे लोकांकडे सातत्याने दुर्लक्ष होते आहे. त्यांची सुरक्षा आणि त्यांचे आयुष्य याच्याशी केंद्र आणि राज्य सरकारला काहीही घेणेदेणे नाही असाही आरोप सोनिया गांधी यांनी केला.

जेजुरी - साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेला जेजुरीचा खंडोबा हे मराठेशाहीचं दैवत, अठरापगड जातीचं श्रध्दास्थान. या देवाच्या वर्षभर होणाऱ्या यात्रा-उत्सवामध्ये दसरा उत्सवाला विशेष महत्त्व आहे. येथील दसरा हा खऱ्या अर्थाने मराठेशाहीच्या स्मृती जागवणारा व पारंपरिक लोकसंस्कृतीशी नाते जपणारा आहे. तब्बल १८ तास डोंगरदरीच्या परिसरात चालणारा हा सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वीस वर्षांपूर्वी रात्रभर डोळे भरून पाहिला आणि त्यांच्या तोंडून सहजच शब्द आले हा साधासुधा दसरा नाही हा तर शिवशाहीची आठवण करून देणारा ‘मर्दानी दसरा.’ त्या वेळेपासून जेजुरीच्या दसऱ्याला ‘ मर्दानी दसरा’ हे नाव पडले. मध्यरात्रीचे चांदणे, गार वाऱ्याची मंद झुळूक, कडेपठारच्या डोंगरदरीतील ‘रमणा ’ या ठिकाणी हजारो भाविकांच्या भक्तिप्रेमाला आलेले उधाण, सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत भाविकांकडून होणारी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण. काळोख्या रात्रीला छेदून आकाशाकडे झेपावणाऱ्या रंगीत तोफा, दरीमध्ये घुमणारा फटाक्यांचा आवाज, या साऱ्या भारलेल्या वातावरणात आपण सारी रात्र डोंगरात काढली हे लक्षातही येत नाही. आश्विन शुध्द प्रतिपदेला सनई-चौघडय़ाच्या मंगल स्वरात खंडोबा गडावरील नवरात्र महालात घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या दिवसात पारंपरिक कलावंत व वाघ्या-मुरळी गायन व नृत्य करतात. नेत्रदीपक विद्युत रोषणाईने सारा गड रात्रीच्या वेळी उजळून निघतो. राज्यातील अनेक कलावंत येथे हजेरी देण्यासाठी येतात. यावेळी शाहीर राम मराठे, सगनभाऊ, होनाजी बाळा यांची कवने, लावण्या म्हणून देवाचे मनोरंजन केले जाते. रात्री अकरानंतर घडशी समाजातील कलावंत सनई-चौघडय़ाचे वादन करतात. यामुळे साऱ्या जेजुरीत चतन्याचे वातावरण असते.

नवी मुंबई - कळंबोलीतील गॅलेक्सी हायटेक इफ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यवसायिक कंपनीने न्यु इं‌डिया इन्शुरन्स या सुप्रसिद्ध विमा कंपनीच्या १४ कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांमध्ये फ्लॅट बांधून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ६० हजार रुपयांची बुकिंगची रक्कम उकळली. परंतु त्यांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी गॅलेक्सी हायटेक इफ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यवसायिक कंपनीचे दोन संचालक आणि मध्यस्थी करणारा एजंट अशा तिघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले १४ कर्मचारी हे हे न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीत कामाला आहेत. ते सर्व जण सध्या अंधेरी येथील न्यू इंडिया वसाहतीत राहण्यास आहेत. २०१४मध्ये या वसाहतीत राहणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकीचे घर घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या सर्वांना परवडतील, अशा किमतीमध्ये तसेच त्यांना ग्रुप बुकिंग हवे असल्याने त्यांनी तशा बिल्डरची शोधाशोध सुरू केली होती. यादरम्यान न्यू इंडिया वसाहतीत रहाणारे सुदेश परब यांच्या ओळखीचे विजय जाधव यांनी कळंबोली येथील गॅलेक्सी हायटेक इफ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यावसायिकाची माहिती दिली. त्यामुळे या सर्वांनी कळंबोली येथील बिल्डरच्या कार्यालयात जाऊन बशीर शेख, जमिल शेख यांची भेट घेतली. या बिल्डर बंधूंनी पनवेल करंजाडे येथील सेक्टर-४मधील १३४ क्रमांकाचा भूखंड दाखवून त्याठिकाणी अठरा महिन्यांमध्ये इमारत उभारून त्यातील फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.

वाई - वाईजवळील धोम येथील गाजलेल्या साखळी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष पोळ याने मी ६ नाही, ३६ खून केले असल्याचा अर्ज सातारा न्यायालयात सादर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अर्जानुसार त्याच्याकडे अधिक चौकशी करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पोळ आणि त्याची साथीदार ज्योती मांढरे यांनी मिळून वाई तालुक्यातील धोम येथे सहा जणांचे साखळी पद्धतीने खून केल्याचे उघड झाले होते. याबाबत पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात सातारा जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू असताना पोळ याने काही दिवसांपूर्वी आपण ६ नाही, तर ३६ खून केले असल्याचा अर्ज न्यायालयात सादर केला. त्याच्या या अर्जामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अर्जावर गुरूवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी पोलिसांनी पोळ याच्या या नव्या अर्जानुसार त्याची फेरचौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी टॉम अल्टर यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. मात्र, यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. टॉम अल्टर यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. टॉम अल्टर यांनी 1976 मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस : द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. मात्र जबान संभालके (1993-1997) या शो (सिटकॉम) नंतर ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी 300हून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला. तसेच, अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. नव्वदच्या दशकात दूरदर्शनवरील जुनून या मालिकेत त्यांनी साकारलेली गॅंगस्टर केशव कलसीची भूमिका बरीच गाजली होती. याचबरोबर, जुगलबंदी, भारत एक खोज, घुटन, शक्तीमान, मेरे घर आणा जिंदगी, यहॉं के हम सिकंदर यासारख्या मालिकामधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.नागपूर - गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी. त्यांना दंड व्हावा असं स्पष्ट मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात दस-यानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. गायींना वाचवण्यासाठी हिंसा करणा-यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. मुळात गोरक्षा करणारे हिंसा करुच शकत नाही, धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य आहे असं मोहन भागवत बोलले आहेत. 
मोहन भागवत यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य करत आपलं मत मांडलं. रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मोहन भागवत बोलले की, 'बांगलादेशी घुसखोरांची समस्या अद्याप सुटली नसताना आता रोहिंग्यांचा प्रश्न पुढे आला आहे. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भर पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. माणुसकी वैगेरे ठीक आहे पण आपला विनाश करुन माणुसकी दाखवता येत नाही'.भाषणाची सुरुवात करताना मोहन भागवत यांनी मुंबईतील एल्फिन्सटन स्थानकावर घडलेल्या घटनेवर दुख: व्यक्त केलं. मुंबईत जी घटना घडली त्याचं दुख: आपल्या सगळ्यांच्या मनात असणं साहजिक आहे. अशा घटनांनंतरही आयुष्य पुढे सुरुच राहतं, आणि ते ठेवावंच लागतं असं मोहन भागवत बोलले आहेत. 

मोहन भागवत यांनी केंद्र सरकारच्या कामकाजावरही संतृष्ट असल्याचं यावेळी सांगितलं. भारत काहीतरी करत आहे याची जगानेही नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आपल्या मनात आदर निर्माण होत असून लक्षात येत आहे. छोट्या छोट्या कुरापती करणा-या देशांना चोख उत्तर दिलं जात आहे. डोकलाम प्रकरणी ज्याप्रकारे संयम ठेवला आणि कूटनीतीचा वापर केला गेला त्याचं कौतुक आहे असं मोहन भागवत बोलले आहेत.

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल)  - दार्जिलिंगमधील 104 दिवस सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्यात आल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले आहे. वेगळ्या दार्जिलिंगच्या मागणीसाठी राजकीय आंदोलन, हिंसाचार आणि तणावामुळे घुसमटलेल्या दार्जिलिंगने पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेतला आहे.
चहाच्या मळ्यांचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून, मळ्यातील स्वच्छतेचे काम सकाळपासून कामगारांनी सुरू केल्याचे चित्र दिसले. दार्जिलिंगमधील बंदचा फटका चहाच्या मळ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. निर्यातीसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या दुसऱ्या हंगामातील चहाचे उत्पादन वाया गेले होते. दार्जिलिंगमधील सर्व दुकाने आणि बाजारपेठा सुरू झाल्या असून, रस्त्यांवरील वाहतूकही नेहमीप्रमाणे दिसत आहे. पर्यटक येथे पुन्हा येऊन पर्यटनाला बहर येईल, अशी आशा सहलींचे आयोजक आणि हॉटेल मालक व्यक्त करीत आहेत. गोरखा जनमुक्ती मोर्चासह सर्वच राजकीय पक्षांनी दार्जिलिंगमधील नागरिकांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मिठाईचे वाटपही केले आहे. येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, ती 25 सप्टेंबरपासून पूर्ववत करण्यात आली. गोरखा जनमुक्ती मोर्चाने दार्जिलिंगमधील बेमुदत बंद 27 सप्टेंबरपासून मागे घेतला आहे.लखनऊ - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव लखनऊतील मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाजपेयी लखनऊ महानगरपालिका क्षेत्रातील पत्त्यावर राहतच नाहीत. त्यामुळे मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेनंतर त्यांचे नाव यादीतून काढून टाकण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी स्पष्ट केले.
अटलबिहारी वाजपेयी हे लखनऊ महानगरपालिकेच्या बाबू बनारसी दास वॉर्डातील मतदार होते. बासमंडी परिसरातील घर क्रमांक ९२/९८-१ हा त्यांचा पत्ता मतदार यादीत होता. या जागेवर सध्या किसान संघाचे कार्यालय आहे. २००० साली झालेल्या लखनऊ महापालिकेच्या निवडणुकीत वाजपेयींनी मतदान केले होते. त्यानंतर, २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी लखनऊमध्येच मतदानाचा हक्क बजावला होता.

मुंबई - नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने व्हावा, यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. राज्यातील शासकीय, निम-शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संदर्भात मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. अशा अर्जदारांनी 4 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 10.45 वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित राहावे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्र्यांसमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे, असेही सामान्य प्रशासन विभागातर्फे एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

अयोध्या - लंकेवर विजय मिळवल्यानंतर भगवान राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत आले होते. त्यावेळी भव्यदिव्य स्वरुपात दिवाळी साजरी झाली होती, असे सांगितले जाते. तशीच भव्य आणि दिव्य स्वरुपातील दसरा आणि दिवाळी यंदा अयोध्येत साजरी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. सरकारने तशी जय्यत तयारीही केली आहे. सरकारकडून आर्थिक मदत न मिळाल्याने दोन वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी झाली नव्हती. मात्र, यंदा भाजप सत्तेत आल्यानंतर पुन्हा दसरा, दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. दसऱ्याला अयोध्यानगरी लाखो दिव्यांनी उजळणार आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येत भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याला मोठ्या संख्येने साधू-संत उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. शरयू घाटाजवळील सर्व इमारतींवर दिव्यांची सजावट करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्रीही उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे, त्याची तयारीही सुरू झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अयोध्या पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा, हा कार्यक्रमाच्या आयेजनामागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारने जुलैमध्ये सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात अयोध्या, वाराणसी आणि मथुरा या शहरांसाठी विशेष तरतूद केली होती.

जयपूर - राजस्थानच्या बिकानरेमध्ये नवी दिल्लीतील एका महिलेवर तब्बल २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (२८ सप्टेंबर ) एकूण सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. २३ जणांनी बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेनं दोन दिवसांपूर्वी बिकानेरच्या पोलीस उपायुक्तांकडे केली होती. या २३ जणांपैकी दोन जणांचे नावही माहिती असल्याचे पीडितेनं सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित महिलेनं पोलीस उपायुक्त सवाई सिंह गोदारा यांची भेट घेतली आणि २३ जणांनी आपलं अपहरण करुन बलात्कार केल्याची तक्रार तिनं नोंदवली. याप्रकरणी जय नारायण वियास कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असून आरोपींचा शोधही सुरू करण्यात आला आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

मुंबई - एसआरएचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त होताना मंजूर केलेल्या १३७ एसआरए प्रकरणाच्या फाइल्सपैकी ३३ प्रकरणात अनियमितता आढळून आली आहे. ज्या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे वादात सापडले होते, त्या ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊड एसआरए प्रकरणातही पाटील यांनी वाढीव एफएसआय बेकायदा मंजूर केल्याचे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या एसआरए प्रकरणाच्या चौकशीचा अंतरिम अहवाल बनविला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील हे यावर्षी ३० जूनला सेवानिवृत्त झाले. परंतु सेवानिवृत्तीच्या आठवडाभर आधी त्यांनी एसआरएच्या सुमारे दोनशेच्या आसपास प्रकरणांना जलदगतीने मान्यता दिली. त्यांनी इतके वेगवान काम केले की, ते अनेकांच्या नजरेत आले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांनी मंजूर केलेल्या १३७ एसआरएच्या प्रकरणांना स्थगिती दिली, तसेच या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले. राज्याचे नगरविकास संचालक, गृहनिर्माण खात्याचे अधिकारी यांचे पॅनेल तयार करून त्यांच्याकडे पाटील यांच्या एसआरए प्रकरणाची चौकशी दिली. या पॅनेलने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे.
पाटील यांच्यावर अंतरिम अहवालात ठपका ठेवलेल्या प्रकरणांत ताडदेवच्या एमपी मिल कंपाऊड एसआरएचा समावेश आहे. याच प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पाटील यांनी बिल्डरला वाढीव एफएसआय बेकायदा दिला असल्याचाही ठपका आहे. मात्र एमपी मिल प्रकरणात मी अंतिम निर्णय घेतलेला नाही, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.

मुंबई - गरजू रुग्णांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सांताक्रूझ येथील बीसीजे म्हणजेच आशा पारेख रुग्णालय येत्या ३० सप्टेंबरपासून बंद होणार आहे. बुधवारी या रुग्णालयातील उर्वरित चार डॉक्टरांना या आठवड्यात काम बंद करण्यास सांगण्यात आले.
मागील दहा वर्षांत हे रुग्णालय नोव्हेंबर, २००७ आणि एप्रिल, २००९ अशा दोन वेळेस बंद करण्यात आले आहे. ज्येष्ठ सिनेअभिनेत्री आशा पारेख या रुग्णालयाच्या विश्वस्त आहेत. गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी या रुग्णालयांमधून माफक दरातील वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी हे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न पारेख यांच्याकडून सुरू आहेत.

मुंबई - आरेच्या मुख्य रस्त्यांवरील खचलेल्या पुलाचे नव्याने करण्यात येणारे काम दिवस-रात्र करून युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिका तसेच आरेच्या अधिकाऱ्याना दिले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत आरेतील रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुसळधार पावसामुळे गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी युनिट क्रमांक २ जवळील मुख्य रस्त्यावरील पूल अचानक खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल खचल्याची माहिती मिळताच वायकर यांनी स्वत: पाहणी करत पुलाच्या दुरुस्तीचा आढावा घेतला. 
हा मुख्य रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असल्याचे वायकर यांनी सांगितले. सध्याचा पूल हा ७ मीटर रुंद असून, तो २० मीटर रुंद करण्यात येणार आहे. पूल, रस्ते, नाले, गटारे इत्यादी कामांसाठी साधारणत: २५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती महापालिकेने या वेळी वायकर यांना दिली. पूल नव्याने उभारण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे कामाच्या ठेकेदारांनी वायकर यांना सांगितले. पुलाचे काम दिवस-रात्र केल्यास २ ते ३ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होऊ शकते. त्यानुसार ठेकेदारांनी प्रयत्न करावा, अशा सूचना वायकर यांनी या वेळी केल्या.

मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे १ आॅक्टोबरला नवीन पक्ष स्थापनेची घोषणा करतील. सध्याच्या स्वाभिमान संघटनेचे पक्षात रूपांतर केले जाईल व तो पक्ष भाजपाला पाठिंबा देईल. त्याबदल्यात राणे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे निश्चित झाले आहे. आता कृती करणे बाकी आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
दिल्लीत झालेल्या अमित शहा-राणे भेटीत याला अंतिम स्वरूप दिले, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राणेंसोबत किती लोक येतील, याचा अंदाज घेतला गेला आहे. येणाऱ्याचे पुनर्वसन कसे करायचे, यासाठी चर्चेच्या दोन फेऱ्या राणे यांच्या कार्यालयात झाल्या. त्या वेळी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हजर होते, असे कळते.
भाजपाचे पहिले लक्ष्य शिवसेना असेल. सेनेतील काही नाराज नेते थेट भाजपात जाऊ इच्छित नाहीत. त्यांना राणे यांच्या पक्षात प्रवेश दिला जाईल. त्याशिवाय मतदारसंघनिहाय स्थानिक गणिते, मतदारसंघातील भाजपाचे स्थान लक्षात घेऊन कोणाला थेट भाजपात आणि कोणाला राणे यांच्यामार्फत प्रवेश द्यायचे, याचे नियोजन सुरू असल्याचेही तो नेता म्हणाला. राणे यांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे काही आमदार राणे यांच्या संपर्कात असले तरी ते पक्ष सोडण्याची शक्यता तूर्त नाही, राणे यांनी त्यांचा मुलगा नितेश यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मग आम्ही पक्ष का सोडावा, असा सूर काही काँग्रेस आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ सप्टेंबरला परदेशातून येतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख ३० तारखेच्या दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर करतील. त्यानंतर या घडामोडी होतील.

मुंबई -   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे,  अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. अमित शहा यांच्याशी बरे संबंध असल्यामुळेच चंद्रकांत पाटील आज महसूलमंत्री पदावर आहेत. शिवाय, ‘राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने सरकारवर तोफ डागली. महागाईविरोधात आंदोलन केल्याने शिवसेनेचे हसे झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे व सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे. ‘‘अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत’’ असे सांगून सत्तेत आल्यावरही ते ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.  

मुंबई - महात्मा गांधी यांची हत्या झाल्याच्या घटनेविषयी अमेरिकेच्या राजदूतांनी पाठविलेल्या तीन टेलिग्रामपैकी एक गोपनीय आहे. हा टेलिग्राम उघड करण्यात यावा, अशी विनंती अभिनव भारत सोसायटीचे विश्वस्त व संशोधक डॉ. पंकज फडणीस हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ऑनलाइन अर्जाद्वारे करणार आहेत. गांधी हत्येची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका डॉ. फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात अगोदरच केली आहे. त्याशिवाय २ ऑक्टोबरला डॉ. फडणीस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाठविण्यासाठी ऑनलाइन अर्जमोहीम हाती घेणार आहेत. महात्मा गांधी यांची ३० जानेवारी, १९४८ रोजी हत्या झाली होती. त्यावेळी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये (सध्याचे गांधी स्मारक) अमेरिकन दूतावासातील राजदूत हर्बट टॉम रेनर यांनी मारेकरी नथुराम गोडसे याला पकडले होते. रेनर यांनी घटनेविषयी तीन टेलिग्राम अमेरिकन सरकारला त्यावेळी पाठविले होते. त्यापैकी तिसरा टेलिग्राम गोपनीय असून त्यात घटनाक्रमाचा सर्व तपशील देण्यात आला आहे.

कोल्हापूर - ‘पोलिसांनी संदीप तोडकर याच्यावर दाखल केलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरीत असून, जाणीवपूर्वक बदनामीसाठी आणि मंत्र‌िपद रोखण्यासाठी केलेले हे षङ्यंत्र आहे. खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात तत्थ्य आढळल्यास मी थेट राज्यपालांकडे आमदारकीचा राजीनामा देईन. खोटा गुन्हा दाखल करणारे डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे मेलद्वारे तक्रार केली आहे’, असा खुलासा आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला. क्षीरसागर यांचे पीए तोडकर यांच्यावर पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल आहे.
आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘वर्षापुर्वीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माझ्या पीएवर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राजकीय विरोधकांनी माझी कोंडी करण्यासाठी जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले आहे. यात काही पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हेल्मेट सक्ती, गणेशोत्सवातील साऊंड सिस्टिमसाठी नागरिकांची बाजू घेतल्याने संतापलेल्या यंत्रणांनी माझ्या बदनामीचा प्रयत्न केला आहे. कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल केला असल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मेलद्वारे तक्रार पाठवली आहे. खोट्या गुन्ह्याबद्दल डॉ. वाईकर यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,’ अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.पिंपरी पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीला स्वच्छ भारत दिवस आणि राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर हा पुरस्कार सुरू केला आहे. गांधी जयंतीदिनी (ता. 2 ऑक्‍टोबर) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्राने या अभियानात सहभाग घेणाऱ्या संस्था, संघटना, सोसायट्यांचे अहवाल मागविले होते. त्यानुसार, रोझलॅंड सोसायटीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला 70 पानी अहवाल दिला होता. तसेच उपक्रमांविषयीची चित्रफीतही दिली होती. चित्रफीत व अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला. या अहवालाच्या अभ्यासाअंती केंद्राने संपूर्ण भारतातून 'इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड प्रॅक्‍टिसेस अंडर आरडब्ल्यूएच' या प्रकारात रोझलॅंडची निवड केली. त्याबाबतचे लेखी पत्र ऑफिस ऑफ नॅशनल मिशन संचालनालयाकडून बुधवारी (ता. 28) सोसायटीला प्राप्त झाले, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर यांनी दिली.

मीरा रोड - देशात आणि राज्यात १ जुलैपासून जीएसटी लागू होऊन स्थानिक संस्था कर (एलबीटी), जकात आदींसह २३ कर रद्द झाले असले तरी राज्यभरातील २५ महापालिकांमध्ये अजूनही मुद्रांक शुल्कावर एलबीटीच्या एक टक्का अधिभाराचा भूर्दंड सर्वसामान्यांच्या माथी सरकारने कायम ठेवत दुहेरी करआखारणी सुरू ठेवली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना महसुली उत्पन्न मिळवून देण्यात जकात किंवा एलबीटीचा मोठा वाटा होता. त्यातच मुद्रांक शुल्कावरही १ टक्का एलबीटी आकारली जाऊ लागली. व्यापाऱ्याच्या विरोधामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी सरसकट बंद न करता ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यासाठी एलबीटी कायम ठेवण्यात आला.
जकात किंवा एलबीटी ही व्यापाऱ्याकडून वसूल होणे अपेक्षित असते. परंतु ५० कोटी रुपयांच्या आत उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्या ना एकीकडे एलबीटी माफ करताना शासनाने सदनिका, गाळा व जमीन आदी खरेदी करणाऱ्याना तसेच देणगी, फलोपगहाण करार करणाऱ्यावरील मुद्रांक शुल्काचा एक टक्का एलबीटीचा अधिभार कायम ठेवला. ५० कोटींच्या खाली उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्याना एलबीटी माफ; तर घर, गाळा व जमीनखरेदी तसेच देणगी, फलोपगहाण करार करणाऱ्यावर मात्र सरसकट एलबीटीचा भूर्दंड शासनाने कायम ठेवला. त्याचा फटका राज्यभरातील २५ महापालिकांच्या हद्दीत स्वत:चे घराचे स्वप्न साकारणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. आतापर्यंत या एक टक्का एलबीटी अधिभारातून सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रूपये उकळण्यात आले आहेत.

ठाणे - देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणा-या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार खंडणी वसुलीचे जाळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह पुणे, नाशिक, दिल्ली तसेच लखनऊपर्यंत पसरल्याचे समजते. तर या प्रकरणात बोरीवलीतून मटकाकिंग पंकज गांगरला गुरुवारी अटक करण्यात आली.
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरसह तिघांना १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. छोटा शकील या टोळीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले. पुणे, नाशिक, दिल्ली आणि लखनऊ या शहरांमधूनही डी कंपनीने खंडणी वसुली केल्याचा संशय पोलिसांना आहे.
व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी या डी कंपनीकडून परराज्यांतील गुंडांना पोसले जाते. खंडणीसाठी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या असून, त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
इक्बाल कासकरला फंडिंग करत असल्याच्या संशयातून बुधवारी रात्री ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने नागपाड्यातून अस्लम हाजी लकडावालाला ताब्यात घेतले. लकडावाला हा कंत्राटदार आहे. जे.जे. मार्ग परिसरात सुरू असलेल्या एसबीयूटीकडून क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत काही इमारतींचे काम त्याने हाती घेतल्याचे समजते.

सोलापूर - भाजप सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे त्याच वेगाने कोसळेल, असे वक्तव्य राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते गुरूवारी सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, राज्यातही सरकारची शेतकऱ्यांबाबतची धोरणे चुकत आहेत. सरकारची धोरणे ही केवळ उद्योगपतींचे भले करणारी आहेत. शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने मस्तीत वागू नये. जनता ही मस्ती उतरवू शकते. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार पर्यंत राजकारणाची संस्कृती जोपासली. आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

श्रीरामपूर - बहुप्रतिक्षीत शिर्डी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज होण्यास दोन तपाचा कालावधी लागला. काम पुर्णत्वास गेल्यानंतरही आघाडी सरकारमधील नेतृत्वाच्या इच्छाशक्तीअभावी हा विमानतळ कार्यान्वित होऊ शकला नाही. अन्यथा चार वर्षांपुर्वीच विमानसेवा सुरू झाली असती. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता या कामाचे श्रेय मिळाले आहे. भाजप सरकारने कुठलेही राजकारण न करता साईबाबांच्या श्रद्धा सबुरीचा मंत्र जोपासत साईभक्तांच्या सेवेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने विमानतळाचे काम पुर्ण झाले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बांधलेला हा पहिलाच विमानतळ असून त्याचे नियमनही हिच कंपनी करणार आहे. देशात आतापर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण विमानतळाची उभारणी करून तिचे संचलन करते. पण एखाद्या राज्याने असा उपक्रम करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. राज्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ चालविण्याचा बहुमान मिळविला असून भविष्यात दुसर्या टप्प्यात कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर नाशिक, पुणे, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही साईभक्तांबरोबर त्याचा फायदा होणार आहे. विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज झाले असून नुकतीच चाचणी पुर्ण झाली. पालकमंत्री राम शिंदे हे पहिले प्रवासी असलेले विमान नुकतेच शिर्डी विमानतळावर उतरले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या रविवार उद्घाटन होणार आहे. ज्या काकडी गावात साधी परिवहन महामंडळाची बस जात नाही तेथे विमानसेवा सुरू होणार आहे.

मुंबई - चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओत अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना न केल्याचे आढळल्यामुळे मुंबई अग्निशामक दलाने या स्टुडिओला दिलेले "ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) रद्द केले. पालिकेने याप्रकरणी स्टुडिओ व्यवस्थापनाला "कारणे दाखवा' नोटीसही बजावली आहे. या स्टुडिओला 16 सप्टेंबरला आग लागली होती. अग्निशामक दलाने केलेल्या चौकशीत अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना न केल्याचे आढळले होते. याप्रकरणी अग्निशामक दल संबंधितांवर खटलाही दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अग्निशामक दलाने या स्टुडिओला 2014 मध्ये "एनओसी' दिली होती; पण त्यातील सूचनांनुसार स्टुडिओच्या मालकांनी आणि व्यवस्थापनाने महत्त्वाच्या बाबींची पूर्तता केली नव्हती, असे चौकशीत आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई - माहीम बस आगाराात एका तरुणाने शर्टाच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मोहम्मद अमीन मोहम्मद हुसेन शेख (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून, माहीम पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
माहीम परिसरात कुटुंबीयांसोबत राहणा-या शेखचा लसूण विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला व्यसन जडले होते. मंगळवारी रात्रीपासून तो गायब होता. त्याचा शोध सुरू असताना माहीमच्या बस आगारात तो शर्टाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

पुणे - 'लाटणे घेऊन कोणी मोर्चा काढला तरी भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडत नाही. पक्षवाढीसाठी अशी आंदोलने करावीच लागतात,' अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या मोर्चाची खिल्ली उडवली. काही माध्यमांना या मोर्चाचे कौतुक वाटत असले, तरी भाजपला त्याचे सोयरसुतक नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यावर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटनेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

ठाणे - ठाणे पोलिसांचा मोर्चा आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलकडे वळला आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे इक्बालविरूद्ध मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी इक्बाल कासकरसह तिघांना ठाणे पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी अटक केली होती. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात इक्बालच्या टोळीकडून खंडणी वसुलीचा उद्योग सुरू होता. त्याच्या या धंद्याचा सूत्रधार छोटा शकील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दाऊद भारतातून फरार झाल्यापासून डी-कंपनीची सूत्रे छोटा शकीलकडेच आहेत. इक्बाल कासकर हा दाऊदचा
भाऊ असल्याने खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये शकीलने त्याला मदत केली. शस्त्र खरेदीसाठीही त्याने इक्बालला पैसा पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. इक्बालच्या हवाला रॅकेटमध्येही शकीलचा सहभाग पोलिसांना आढळला आहे.त्यामुळे दक्षिण आशियातील सर्वांत मोठा माफिया म्हणून कुख्यात असलेल्या छोटा शकीलच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाणे पोलिसांनी हालचाल सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई - नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील वाटचालीबाबत ते माहिती देणार आहेत. भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतरही नारायण राणे नेमकी काय भूमिका हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतच भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायण राणे 1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 
दसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करू, असं राणेंनी कुडाळमधील पत्रकार परिषदेत सांगितलं होते. शिवाय, कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका समर्थ विकास पॅनेलद्वारे लढवू, असेही ते म्हणाले होते. यानंतर राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजपा प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता आगामी पत्रकार परिषदेत राणे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली - जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) लवकरच त्यासाठी बच्चन कुटुंबीयांना नोटीस बजावली जाऊ शकते. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. गेल्यावर्षी पनामा पेपर्स घोटाळा उघड झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. जगभरातील अनेक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी परदेशात बोगस कंपन्या स्थापन करून आपल्याकडील काळा पैसा त्याठिकाणी गुंतविल्याची माहिती समोर आली होती. ‘पीटीआय’च्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी ‘ईडी’कडे याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यामुळे आता ‘ईडी’ बच्चन परिवारातील इतर सदस्यांनाही चौकशीसाठी पाचारण करणार असल्याचे समजते. याशिवाय, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक विभागानेही यापूर्वीच बच्चन कुटुंबीयांकडे त्यांनी परदेशात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे तपशील मागितले होते. त्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी ही माहिती ‘ईडी’पुढे सादर केली होती. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्स घोटाळ्यात अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आल्यानंतर आयकर खात्यानेही तपासाला सुरूवात केली होती. त्यांच्याकडूनही बच्चन यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी सुरू झाली होती. जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्समध्ये नमूद केल्याप्रमाणे आपला कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही, असा दावा अमिताभ यांनी केला होता. मात्र, त्यानंतर अमिताभ यांच्याविरोधात काही पुरावे समोर आले होते. पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. मात्र, हे वृत्त प्रसिद्ध झाल्याच दुसऱ्याच दिवशी अमिताभ यांनी त्याचा इन्कार करत आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या माहितीमुळे त्यांच्या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.नवी दिल्ली - 'आपण गरिबीत दिवस काढले आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्या अर्थमंत्र्यांमुळे मात्र देशातील जनतेला लवकरच जवळून गरिबी पहावी लागेल असे दिसत आहे. मंदीच्या काळात नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतले,' अशी सणसणीत टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर केली.
ज्येष्ठ नेते सिन्हा यांनी भाजप सरकारलाच कानपिचक्या दिल्यामुळे पक्षामध्ये एकच खळबळ माजली आहे. यशवंत सिन्हा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात याबाबत भाष्य करणारा लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा खरपूस समाचार घेतला आहे. मंदीचा काळ सुरू असताना नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतले असे त्यांनी म्हटले आहे. आपण गरिबी अत्यंत जवळून पाहिलीय, सोसलीय असा दावा पंतप्रधान मोदी करतात. त्यामुळे कदाचित देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचे अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करत आहेत, असा टोला सिन्हा यांनी अरुण जेटली यांना लगावला.

मुंबई - पश्चिम रेल्वेवर १ ऑक्टोबरपासून ३२ नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या नव्या वेळापत्रकाचा शुभारंभ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात येणार आहे. नव्या वेळपत्रकानुसार १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या ५४वर पोहोचली असून अनेक फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. रेल्वेमंत्रिपद स्वीकारल्यानंतर मुंबईकर असणाऱ्या गोयल यांच्या हस्ते मुंबईत हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. पश्चिम रेल्वेवर १ ऑक्टोबरपासून अप दिशेला १७ तर डाऊन दिशेला १५ फेऱ्या वाढणार आहेत. यातील चार फेऱ्या सकाळी आणि तीन फेऱ्या सायंकाळच्या गर्दीत चालविण्यात येणार आहेत. अंधेरी ते बोरिवलीमधील पाचव्या मार्गिकेवर नऊ फेऱ्या चालतील. १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या ४२ वरून ५४ होणार असून त्या रविवारीही धावणार आहेत. याशिवाय चार फेऱ्यांचा विस्तार केला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात २०१४ मध्ये पेशावरमध्ये शाळेवर हल्ला घडवणारा आणि अफगाणिस्तानच्या कैदेत असलेला दहशतवादी सोपवण्याचा प्रस्ताव मिळाला होता, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला आहे. २०१४ मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला करून मुलांची क्रूर हत्या करणारा दहशतवादी अफगाणिस्तानच्या कैदेत आहे. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दहशतवादी देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता, असा दावा असिफ यांनी ‘एशिया सोसायटी’मध्ये उपस्थितांना संबोधित करताना केला आहे. यावेळी त्यांनी दहशतवादी आणि प्रस्ताव ठेवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या नावांचा उल्लेख केला नाही. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांना राजनैतिक मदत देण्यात यावी, अशी भारताने अनेकदा मागणी केली होती. मात्र पाकिस्तानने ती मागणी मान्य केली नाही, असे भारताने म्हटले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जाते.

घोटी - धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे राज्यात व केंद्रात सरकार आहे. विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करीत शेतकऱ्याला बेघर केले जात आहे. शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे बँक ‘एजंट’ असल्याचे टीकास्त्र प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी सोडले. जनशक्ती प्रहार पक्षाच्या वतीने वाडिवऱ्हे येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष सचिन पनमंड, गोपाळ शिंदे, अनिल भडणगे आदी उपस्थित होते. वाढती महागाई सर्वसामान्यांच्या जिव्हारी लागली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस धरला गेला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्यांना गुंडाळण्याचे उद्योग होत असले तरी आपण भाजपला पुरून उरू असे कडू यांनी ठणकावले. नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले गेले. मुंबई व दिल्लीत कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेला पाकिस्तानचे खेळाडू भारतात खेळलेले चालत नाहीत, पण पाकिस्तानचा कांदा ते कसा भारतात खपवून घेतात, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे विरोधकही भांडवल करीत आहेत. शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले आहेत. मात्र आपण शेतकऱ्यांसाठीच लढत राहणार आहोत. शेतकऱ्यांचे संघटन होऊनही सरकार बधले नाही. सरकारला वठणीवर आणण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा कट्टरतावाद उभा करून आरपारची लढाई उभी करण्याचा इशारा त्यांनी दिलाजम्मू-काश्मीर - बंदीपो-यातील हाजीनमध्ये एक जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. बीएसएफचा जवान रमीझ अहमद पारे हे सुट्टी संपवून परतले असता दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील माणसेही जखमी झाली आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, रमीझ अहमद पारे यांचं घर हाजीनमधील पारे मोहल्ल्यात असून दहशतवाद्यांनी नियोजनद्धपणे रमीझ यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात रमीझ यांचा जागीच मृत्यू झाला तर रमीझ यांचे वडील, भाऊ आणि चुलती या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत. या तिघांपैकी रमीझ यांच्या चुलतीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - घाटकोपरच्या साईदर्शन अपार्टमेंट इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितप याला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात माघार घ्यावी लागली. सत्र न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही जामिनासाठी पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असताना थेट उच्च न्यायालयात आल्याने न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावणीस नकार दिल्याने शितपला आपला जामिनाचा अर्ज मागे घ्यावा लागला.
विक्रोळी दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शितपने सत्र न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याने अर्ज केला होता. तो सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र पोलिसांनी अधिक तपासानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आधी सत्र न्यायालयात जावे, असे शितपला सुचवण्यात आले. त्यानुसार त्याने आपला अर्ज मागे घेतला.

मुंबई - गरीब रुग्णांवरील उपचारांच्या योजना राबवताना आढळलेल्या त्रुटींबद्दल डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. धर्मादाय आयुक्त शि. ग. डिगे यांनी डॉ. नानावटी रुग्णालयाला काही दिवसांपूर्वी अचानक भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी तेथे गरीब रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भातील योजनेची माहिती व उपचार यामध्ये त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणी चौकशी करून व रुग्णालयाची बाजू ऐकून डिगे यांनी रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ६६ ख नुसार गुन्हा दाखल करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना परवानगी दिली आहे.
धर्मादाय आयुक्त डिगे यांनी डॉ. नानावटी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण म्हणून भेट दिली असता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबवण्याच्या योजनांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यात या योजनेसंदर्भातील फलक दर्शनी भागात लावण्यात आले नव्हते. तसेच या योजनेनुसार गरीब रुग्णांसाठी ३३ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी ३३ खाटा आरक्षित असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या जागी इतर रुग्ण आढळून आले.

मुंबई - केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यास अभ्यास समितीने अनुकूलता दर्शविली असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. मात्र, विभागीय चौकशा सुरू असलेल्या, वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र ठरलेल्या आणि अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देऊ नये, असे समितीचे मत असल्याचे कळते. या संदर्भातील अहवाल लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी निवृत्तीचे वय वाढविता येते का, याचा अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली.समितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु पुढे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार २४ ऑगस्टला मुदत संपली आहे. लवकरच अहवाल शासनास सादर केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे प्रधान सचिव व समितीचे सदस्य व्ही. गिरीराज यांनी दिली.

ठाणे - नोटाबंदीनंतर अडचणीत आलेल्या घोडबंदर रोडवर प्रकल्प सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या बांधकामांना ताबा प्रमाणपत्र (ओसी) बंदी असल्याने जोरदार फटका बसला आहे. या भागातील भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन न्यायालयाने नव्या "ओसी' देण्यास मनाई केल्याबाबत अद्याप तोडगा न निघाल्यामुळे 285 इमारतींना महापालिकेकडून "ओसी' नाकारण्यात आली आहे. त्यामुळे इमारती तयार होऊनही त्यांच्या विक्रीबाबत या बांधकाम व्यावसायिकांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.उच्च न्यायालयाने घोडबंदर रोडवरील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे आदेश दिल्यानंतर पुन्हा पाच वर्षांत या भागात किती बांधकामांना "ओसी' देण्यात आली आहे; तसेच किती बांधकामांना पाणीजोडणी दिली, याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने पाच वर्षांत 209 प्रकल्पांना "ओसी' दिली असून, त्यातील 206 प्रकल्पांना एक हजार 478 पाण्याचे कनेक्‍शन दिल्याची माहिती दिली आहे.

जळगाव - संपूर्ण देशातील शेतकरी आज अस्वस्थ असून देशातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा व स्वामिनाथन आयोग लागू करावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी १७० संघटना एकत्र आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षांत शेतकऱ्यांना कर्जमुक्त न केल्यास त्यांना पुन्हा लाल किल्ल्यावर जाता येणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला. येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी राज्यव्यापी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व हमी भाव शेतकरी परिषद झाली. परिषदेत शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विरोधी धोरणावर टीकास्त्र सोडले. २० ऑक्टोबर रोजी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून त्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर कलम ३०२, ४२०,३०६ नुसार राज्यभरात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला.राज्य सरकार देवस्थानावर कोटय़वधी रुपये खर्च करते. त्यांच्या राज्यात देव सुखी आहे, परंतु शेतकरी दु:खी आहे. कर्जमाफी योजनेचे नाव बदलून शेतकरी सन्मानऐवजी ‘शेतकरी अपमान योजना’ असे ठेवावे, असा चिमटाही शेट्टी यांनी काढला. नोटबंदीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे देशद्रोही सुकाणू समिती नसून नोटबंदी करणारे आहेत. मुख्यमंत्र्यांना देशभक्ती बघायची असेल, तर आपण दोन्ही राजीनामा देऊ न सीमेवर जाऊन लढू, बघू कोण किती शत्रू मारतो, असे आव्हानही त्यांनी दिले. साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहिल्या आहेत. आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. हमीभावाची लढाई उभी करावी लागेल, असे शेट्टी यांनी नमूद केले. या वेळी ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’ अशी घोषणाबाजी उपस्थितांकडून करण्यात आली.मुंबई - सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषण नुकतीच केली आहे. ही मानधनवाढ मान्य करून राज्यातील 23 हजार 533 अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर झाल्याचा दावा महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे यांनी चर्चा केली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, की काही अंगणवाडी संघटना मात्र अट्टहास करत असून, अधिक मानधनवाढीसाठी अजूनही संपावर आहेत. बालकांना उपाशी ठेवणे अत्यंत चुकीचे असून, पोषण आहारपुरवठा ही दैनंदीन अत्यावश्‍यक बाब आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवरही शासन सकारात्मक असून, त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही तातडीने संप मागे घेऊन बालकांना उपाशी न ठेवता त्यांचा पोषण आहारपुरवठा सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.
'मानधनवाढीनंतर राज्यात कालपर्यंत 11 हजार 235 अंगणवाडी सेविका, 11 हजार 86 मदतनीस व एक हजार 212 मिनी अंगणवाडीसेविका कामावर हजर झाल्या आहेत. याशिवाय 1 हजार 131 इतक्‍या "आशा' कर्मचाऱ्यांमार्फत पोषण आहारपुरवठ्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. कालपर्यंत राज्यातील साधारण 28 हजार 539 अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारपुरवठ्याचे कामकाज सुरू झाले असून, उद्याप साधारण 50 हजार अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारपुरवठा सुरू होईल,'' असा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्‍त केला.

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सीबीआयने लालूप्रसाद यांना रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी चौकशीसाठी तीन ऑक्टोबरला बोलावले आहे. तर लालूंचे सुपुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही चौकशीसाठी समन्स धाडले आहे. याप्रकरणी आता दोघा पितापुत्रांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तेजस्वींची चार ऑक्टोबर रोजी चौकशी केली जाईल. यापूर्वीही ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी सीबीआयने लालूंच्या पाटणा येथील निवासस्थानी छापा मारला होता.गुन्ह्याचा कट रचणे, फसवणूक आणि भ्रष्ट्राचाराशी संबंधित इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपानुसार पुरी आणि रांची येथील भारतीय रेल्वेच्या बीएनआर हॉटेलचे नियंत्रण सुरूवातीला आयआरसीटीसीकडे देण्यात आले होते. त्यानंतर या हॉटेलची देखभाल, त्याचे नियंत्रण आणि विकासाचे काम पाटणा येथील सुजाता हॉटेल प्रायव्हेट लि. ला देण्यात आले होते. सुजाता हॉटेलला फायदा पोहोचवण्यासाठी टेंडरच्या अटी शिथील करण्यात आल्या होत्या. याच्या बदल्यात पूर्व पाटणा येथील ३ एकर जमीन नाममात्र दरात डिलाईट मार्केटिंगला देण्यात आली. लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयाची ही कंपनी आहे. नंतर ही जमीन लारा प्राजेक्ट्सकडे हस्तांतरित करण्यात आली. या कंपनीचे मालक लालूंच्या कुटुंबीयातील सदस्य आहेत.बेनामी संपत्ती प्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर पदाचा वापर करत बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने नुकतेच याप्रकरणी १२ बेनामी संपत्ती सील केल्या आहेत. याप्रकरणी लालूंची कन्या मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार यांच्यावरही आरोप आहेत. पण यादव कुटुंबीय सुरूवातीपासूनच या आरोपांमागे राजकीय कट असल्याचा दावा करत आहेत.लखनौ - अलाहाबादला 2019 मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी गंगेमध्ये पडणारा कचरा आणि दूषित पाणी रोखण्याच्या दृष्टीने मोठा कृती आराखडा आखल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. इशा फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आदित्यनाथ यांनी गंगा शुद्धीकरणाबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती सांगितली. "प्रयागला (अलाहाबाद) दोन वर्षांनंतर होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी एकही नाला अथवा कचरा गंगेच्या पाण्यात पडणार नाही. यासाठी मोठा कृती आराखडा आखण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "नमामि गंगे' प्रकल्पाअंतर्गत तीस हजार कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून, याअंतर्गत गंगा आणि तिच्या उपनद्या कायम प्रवाही आणि स्वच्छ करणार आहे,' असे आदित्यनाथ म्हणाले. या दोन वर्षांमध्ये कोणालाही गंगेमध्ये घाण टाकू दिली जाणार नाही.
ठिकठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून दूषित पाणी शुद्ध करूनच नदीत सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नदीकिनारी असलेली सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आल्याचे आदित्यनाथ यांनी आवर्जून सांगितले.

नवी दिल्ली - “बौद्धधर्मीय म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध चालू केलेल्या लष्करी कारवाईने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी बौद्धांच्या केलेल्या कत्तली आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते?”, असा सवाल करणारी घणाघाती टीका भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी केली.मानवतावादी दृष्टिकोनातून रोहिंग्यांना भारताने आश्रय देण्याची मागणी आंबेडकरांनी नुकतीच केली होती. त्याला साबळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. म्यानमारमध्ये बौद्धांच्याच कत्तली होत असताना आंबेडकरांनी कधी आवाज उठविला नाही. रोहिंग्यांच्या समर्थनासाठी रझा अकादमीने मुंबईत काढलेल्या मोर्चामध्ये थेट पोलिसांवरच हल्लाबोल केला, तेव्हा आंबेडकर गुळण्या धरून बसले होते. ‘रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायजेशन’ या कुख्यात संघटनेच्या दहशतवादी कारवायांकडे आणि त्यांचे समर्थन करणारया ‘हिब्ज-ए- इस्लामी’, ‘जमात –ए-इस्लामी’, ‘हरकत-उल-जिहाद’सारख्या दहशतवादी संघटनांकडे आंबेडकरांनी कानाडोळा केला. पण बौद्धांचा संयम संपल्यानंतर मात्र आंबेडकरांना रोहिंग्यांची दया येते. हा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार आहे. त्यांनी किमान देशाची सुरक्षितता तरी लक्षात घ्यायला पाहिजे,” अशी तोफ साबळेंनी डागली.

नवी दिल्ली - भाजप प्रवेशासाठी ताटकळलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोमवारच्या दिल्लीवारीत भाजपश्रेष्ठींकडून त्यांच्या सिंधुदुर्गच्या रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीचे आश्वासन मिळाल्याचे समजते. या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शब्द टाकण्याचे आश्वासनही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुहुर्तावर दिल्लीत भाजप प्रवेशाच्या उद्देशाने दाखल झालेल्या नारायण राणे यांची सोमवारी रात्री अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या ११, अकबर रोड निवासस्थानी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन शहा यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन - तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. ही वर्तुळं घालविण्यासाठी मग बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरली जातात. त्यातील घटकांची योग्य ती माहिती नसल्याने ही उत्पादने अनेकदा त्वचेसाठी घातक ठरु शकतात. केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार व्हायला हवा. हे एखाद्या आजाराचे सूचक लक्षण असू शकते. त्यामुळे ही वर्तुळे कशाने तयार झाली यांच्या मूळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत. अशाप्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते. तरीही डोळ्याखाली वर्तुळं येत असतील तर काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –
टोमॅटो
एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण १० मिनीटे डोळ्यांवर ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोनवेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो. याबरोबरच टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस प्यायल्यासही काळी वर्तुळे कमी होण्यास फायदा होतो.

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजतागायत स्वतःची कोणत्याही कायद्याखाली नोंदणी केलेली नसतानाही त्यांना ‘एके-४७’सारखी अत्याधुनिक शस्त्रे कशी काय उपलब्ध होतात, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला.संघाच्या विजयादशमी उत्सवातील शस्त्रपूजनाला आक्षेप घेताना आंबेडकरांनी कोणत्याही कायद्याच्या कक्षेत नसलेल्या संघाकडील सर्व शस्त्रे जप्त करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. तसेच संघाला दहाच दिवसांमध्ये नोंदणी करण्याचा आदेशही देण्याची मागणी मोदींकडे केली. एक पत्रकाद्वारे त्यांनी याबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे.

मुंबई - दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे, असे संकेत मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीतून मिळाले. दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणा-या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करतील, अशी चर्चा सुरू होती. विशेषत: महागाईविरोधात शिवसेनेने जे आंदोलन केले, ते पाहता शिवसेना आता सत्तेत राहणारच नाही, असे कार्यकर्त्यांना वाटू लागले होते. पण तसे घडण्याची आता तरी शक्यता दिसत नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मराठवाड्यातील अनेक आमदार आज मातोश्रीवर गेले होते. तेव्हा सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर सोडा. मात्र काही मंत्र्यांना बदलावे या आमदारांच्या भावनेबाबत मात्र मी योग्य वेळी निर्णय घेईन, असे उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आमदारांना सांगितले असल्याचे समजते.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget