2018
मुंबई - नगरच्या महापौर निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठींबा द्यायला तयार होतो. परंतू निवडणुकीच्या तीन दिवस आधीपर्यंत कोणीही स्थानिक नेते आमच्याशी बोलायला तयार नव्हते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, मी स्वतः आमच्या नेत्यांना सांगितले होते की, शिवसेनेकडून जर प्रस्ताव आला तर त्यांना बिनशर्त पाठींबा द्या. मात्र, निवडणुकीपूर्वी तीन दिवस आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही. उलट तुम्हीच आमच्या नेत्यांशी बोला आणि आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ असं सांगण्याची सुचना स्थानिक शिवसैनिकांनी आमच्याकडे केली. दरम्यान, शिवसेनेकडून स्वतःहून मागणी होत नसल्याने प्रसंगानुरुप निर्णय घेण्यास मी आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.झारखंड - मोहन भागवत यांच्या झारखंडमधील एका कार्यक्रमादरम्यान, कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. भागवत कार्यक्रम स्थळावरुन निघून गेल्यानंतर ही हाणामारी झाल्याचे कळते.सुत्रांच्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबाद येथे रविवारी क्रीडा भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री रघुबरदास हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जसे हे दोघेही निघून गेले त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. या वादाचे पर्यावसन नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी एकमेकांना शिव्यांची लाखोली आणि लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली.स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, भागवत ज्या गाडीतून आले होते. त्या ड्रायव्हरसोबत इतर कार्यकर्त्यांचा काही कारणाने वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तो थेट गुद्द्यांवर आला. मात्र, अद्यापही या मारहाणीचे कारण स्पष्ट झाले नाही.या घटनेपूर्वी कार्यक्रम शांततेत पार पाडला आणि भागवत तसेच मुख्यंमत्री घटनास्थळावरुन निघून गेले होते. दरम्यान, कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी शिक्षणाला धर्मासोबत जोडायला हवे अशी भुमिका मांडली. त्यांनी धर्म आणि शिक्षण हे एकमेकांना पुरक असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी शिक्षणाच्या बाजारीकरणावर चिंता व्यक्त केली.Add caption
सोलापूर - पंढरपूर ते सोलापूर दरम्यान 'लेडीज स्पेशल बस' सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगाराच्या वतीने फक्त महिलांसाठी ही बससेवा सुरू झाली असून पंढरपूर या तीर्थक्षेत्री जाणाऱ्या महिलांसाठी तसेच नोकरीच्या निमित्ताने दररोज ये-जा करणाऱ्या महिलांसाठी ही बससेवा सुरक्षित आणि फायद्याची ठरणार आहे.पंढरपूर दर्शनासाठी जाणाऱ्या महिला तसेच पंढरपूर ते सोलापूर नोकरीनिमित्त, कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या महिलांसाठी ही बससेवा एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगाराच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. सोलापूर ते पंढरपूर विनावाहक, विनाथांबा अशी ही बस असणार आहे. या बसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात पसंती आहे. सोलापूर-पंढरपूर विनावाहक विनाथांबा अनेक बस आहेत. या बसला मिळणारा प्रतिसाद पाहता महिलांसाठी विशेष बस सुरू करावी, अशी मागणी महिला प्रवाशांतून होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगाराने ही विशेष महिला बस सुरू केली आहे.महिलांसाठी स्पेशल असलेली ही बस सकाळी सव्वा आठ वाजता पंढरपूरवरून निघेल व सर्व थांब्यावर थांबून फक्त महिला प्रवाशांनाच बसमध्ये घेऊन सकाळी साडेनऊ वाजता सोलापूर शहरात पोहचेल. तसेच सायंकाळी सव्वासहा वाजता ही बस सोलापूरवरून निघेल आणि सायंकाळी साडेसात वाजता पंढरपूरला पोहोचेल. या महिला स्पेशल एसटी बसला वाहकही महिलाच असणार आहे.

धुळे - धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत.भाजपा आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत तीनवरून ५० जागांपर्यंत मुसंडी मारत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाशिक, जळगाव या महापालिका ताब्यात घेणारे निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीतही पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या जोडीने सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. यानिमित्ताने महापालिका निवडणूक जिंकण्याचा ‘महाजन पॅटर्न’ पुन्हा यशस्वी झाला.धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने 50, काँग्रेसने सहा, राष्ट्रवादीने आठ आणि एमआयएमने चार जागा जिंकल्या. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवरच समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम आणि बसपा प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यशस्वी राहिले. दोन जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.महानगरपालिका निवडणुकीत धुळेकरांनी ‘मिशन फिफ्टी प्लस’ यशस्वी केले. घाणेरडय़ा प्रचाराला धुळेकरांनीच चपराक दिली आहे. आता भयमुक्त शहर करणे, पाण्याची समस्या सोडविणे ही जबाबदारी आमची आहे. धुळेकरांना निश्चितच आता बदल घडवून दाखवू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री आणि भाजपच्या विजयाचे प्रमुख शिलेदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.


मुंबई - ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्यात सोनिया गांधी यांचे नाव समोर आले असून त्यासाठी त्यांनी उत्तर द्यावे. शिवाय या घोटाळ्यात एकाच परिवाराचे वारंवार नाव का येत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचे विदेशातील न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणात देशातील लोकांना १२५ कोटी रुपयांची दलाली देण्यात आली. त्यासाठी शेल कंपनी देखील स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे चोर चोर म्हणून ओरडणाऱ्या राहुल गांधी यांनी याविषयी उत्तर द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.रायगड - रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपाघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.महाड एमआयडीसीच्या झुआरी फर्टीलायझर कंपनी परिसरातील ही घटना आहे. भरधाव वेगात येणारा ट्रेलर धडकल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण शिवसैनिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, कालगुडे यांचा मृत्यू घातपात की अपघात असा संशय शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता वेगवेगळ्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.तर पोलिसांनी कालगुडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलीस तपास करणार आहेत.

नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(एनआयए)ने दिल्ली आणि अमरोहामध्ये रविवारी पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये ५ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मोठ्या संख्येने हत्यारे आणि ISISचे पॅमप्लेट जप्त केली आहेत.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने जाफराबाद, सीलमपुर परिसरात आणि अमरोहमध्ये छापेमारी केली. या आठवड्याची ही दुसरी छापेमारी आहे. NIA (राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी) ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशात छापे घालून १० संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतले. या प्लॅनचा मास्टरमाइंड परदेशात असण्याची शक्यता NIAचे प्रमुख अलोक मित्तल यांनी वर्तवली आहे. एक-दोन नव्हे तर शेकडो बाँब बनवण्याची त्यांची तयारी होती. प्रजासत्ताकदिनाच्या आसपास स्फोट घडवण्याचा त्यांचा प्लान होता.बांगलादेश - बांगलादेशाच्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने सर्वसाधारण निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे.बांगलादेशाच्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने सर्वसाधारण निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. रविवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीच्या काळात राजकीय हिंसेत देशभरात १७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षांनी मतदानात गडबड केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली आहे.माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. बांगलादेशातील डीबीसी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ३०० पैकी २९९ जागांचे निकाल हाती आले आहेत. अवामी लीगने २६६ जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्या सहकारी पक्षाने २१ जागा मिळवल्या आहेत. तर विरोधी आघाडी नॅशनल यूनिटी फ्रंटला अवघ्या ७ जागांवरच विजय मिळाला आहे.


मुंबई - जगन्नाथ यात्रेसह विविध ठिकाणी ग्रुपने यात्रेला निघालेल्या मुंबईतील अडीचशे ते तीनशे भाविकांना बनावट तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दादरमध्ये उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीच्या या ठगाने मुंबईसह ठाणे, दिल्लीतील हजारहून अधिक नागरिकांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.दादर परिसरात राहणारे कमलेश पाटील (४२) हे इंडियन एअरलाइन्स येथे व्हॉइस कम्युनिकेशनचे काम करतात. ते गिरगाव येथील श्री श्री राधागोपीनाथ मंदिराचे सेवक आहेत. गेल्या वर्षी जगन्नाथ यात्रेसाठी मित्राने दिल्लीतील कमल खन्ना याच्या चैतन्य ट्रॅव्हल्सकडून विमान तिकीट खरेदी केले. त्यांच्या मेव्हण्यालाही तिकीट हवे असल्याने त्यांनी तिकिटावरील कमल खन्नाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र तिकीट उपलब्ध नसल्याने पाटील कुटुंबीय जगन्नाथ यात्रेला गेले. आठवडाभरानंतर पाटील हे यात्रेवरून परतले तेव्हा, कमल खन्नाने त्यांच्याकडे ग्रुप बुकिंगसाठी हट्ट धरला. बुकिंग केल्यास जास्तीचे कमिशन देण्याचे आमिष दाखविले.सुरुवातीला मे २०१८ मध्ये पाटील यांनी मंदिरातील ४० सेवकांना ६ नोव्हेंबरच्या जगन्नाथ यात्रेसाठी मुंबई ते भुवनेश्वर तिकिटाची बुकिंग कमल खन्नाला दिली. प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे दोन लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केले. त्यामुळे पाटील यांचा त्याच्यावर विश्वास बसला.त्याने याबाबत मित्र महेश गणपत नाटुस्करला सांगितले. दोघांनी खन्नाला अडीचशे ते तीनशे तिकिटांच्या बुकिंग दिल्या. मार्च २०१८ ते २७ डिसेंबरपर्यंत त्यांनी खन्नाला २२ लाख २० हजार ५७६ रुपये दिले. मात्र, प्रवासाची वेळ आली तेव्हा खन्नाने पाठविलेले तिकीट बनावट असल्याचे समजले आणि भाविकांना धक्का बसला. त्यातच खन्नाने अनेक भाविकांचे तिकीटही रद्द केल्याने काही जण गेलेल्या ठिकाणी अडकले.पाटील यांनी खन्नाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नॉट रिचेबल होता. अखेर त्यांनी गुरुवारी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी खन्नाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो दिल्लीचा रहिवासी आहे.खन्नाने ठाण्यातही शेकडो जणांची फसवणूक केली. या गुन्ह्यात नुकतीच मीरा रोड पोलिसांनी त्याला अटक केली. तपासात त्याच्याविरुद्ध दिल्लीतही गुन्हा दाखल असल्याचे समजले. तेथेही साडेतीनशे भाविकांना त्याने गंडा घातला. शिवाजी पार्क पोलीस लवकरच त्याचा ताबा घेतील.नाशिक - तंबाखू मुक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नाईट रनला नाशिककरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित या रनमध्ये कडाक्याच्या थंडीतही ४ हजार नाशिककर सहभागी झाले होते. डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून शहरवासीयांना तंबाखू मुक्तीचा संदेश देण्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने 'नाईट ऑफ रन फॉर जॉइन द चेंज'चे आयोजन करण्यात आले होते.तरुण पिढीला निर्व्यसनी, निरोगी व सुदृढ आयुष्य देण्याचा प्रयत्न नवीन वर्षात करण्यासाठी पोलीस दलाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. व्यसनमुक्तीसाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम सुरू आहेत. पोलीस आयुक्त तसेच डॉ. राज नगरकर यांच्या सहकार्याने या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, औद्योगिक वसाहत आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तंबाखूचे व्यसन न करण्याचा संकल्प करून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले होते.या नाईट रनची दखल राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी घेतली असून राज्यात अशाप्रकारे नाईट रनचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. नाईट रनमध्ये हजारो नागरिक सहभागी होत तंबाखूमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूमुक्त शहर करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य सुदृढ करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग असणे गरजेचे आहे. तंबाखूचे व्यसन जीवघेणे ठरत असून कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या मोठी असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी म्हटले आहे.शहर पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल, मानवतचे डॉक्टर राज नगरकर, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी,पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी हिरवा झेंडा दाखवत रनला प्रारंभ केला. ही रन आयुक्त कार्यालय, जुना गंगापूर नाका, विद्या विकास सर्कल, कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर, कुलकर्णी गार्डन, टिळक वाडी मार्गने पोलीस परेड मैदान येथे याची सांगता करण्यात आली.मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर २०१९ या वर्षांत आणखी दहा स्थानकांची भर पडणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळ वाचवा, नवीन गाडय़ा सेवेत याव्यात आणि नवीन स्थानके होऊन प्रवासी सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोकण रेल्वेने ‘क्रॉसिंग स्टेशन’ प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पांतर्गत दहा नवीन स्थानके नव्या वर्षांत प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या या सर्व स्थानकांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.कोकण रेल्वेवरून प्रत्यक्षात कोकण आणि त्या मार्गे जाणाऱ्या गाडय़ांची संख्या जास्त आहे. याशिवाय माल वाहतूकही मोठय़ा प्रमाणात होते. सध्या दोनच रेल्वे मार्ग असल्याने गर्दीच्या काळात मोठय़ा संख्येने जादा गाडय़ा सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते. त्यामुळे कोकण प्रवाशांचा मार्ग सुकर करण्यासाठी दुहेरीकरण, विद्युतीकरण याशिवाय क्रॉसिंग स्थानक (एकमेकांना रूळ छेदतात ते ठिकाण)अशी काही प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत.सध्या रोहा ते वीर दुहेरीकरणाचे काम सुरू असून डिसेंबर २०१९ पर्यंत, तर विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. यातील क्राँसिंग स्थानक प्रकल्पाला सध्या गती दिली जात आहे.

नगर - पुन्हा सत्ता मिळेल की नाही याची खात्री नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेच्या गैरवापराचा अतिरेक करून विरोधकांना अडचणीत आणत आहेत. हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील आरोपी मिशेलने घेतलेले सोनिया गांधी यांचे नाव हा असाच प्रकार असावा. मिशेलने विशिष्ट व्यक्तीचे नाव घ्यावे, यासाठी दबाव आणला गेला असावा, त्यामागे कटकारस्थान असावे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.आपल्या ५२ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत सत्तेचा असा गैरवापर आपण प्रथमच पाहात आहोत. सर्वोच्च न्यायालय, रिझव्‍‌र्ह बँक, सीबीआय यांसारख्या घटनात्मक संस्थांवर केंद्र सरकारकडून होणारे हल्ले, त्यांच्या कामात होणारे हस्तक्षेप, विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न हे प्रकार म्हणजे देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासारखेच आहे, असाही आरोप पवार यांनी केला. देशापुढे निर्माण झालेल्या या संकटाबाबत संसदेत सर्व विरोधी पक्ष चर्चा करण्यासाठी आग्रही असतील, असेही पवार म्हणाले.देशात अनेक सरकारे आली, पंतप्रधान झाले, परंतु त्यांनी कधी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचे आपल्या पाहण्यात नाही असे नमूद करून पवार म्हणाले, ‘‘देशावर आणीबाणी लादण्याची किंमत काँग्रेसलाही चुकवावी लागली, परंतु काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यावर आणीबाणीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारात संरक्षणविषयक गैरव्यवहारातील परदेशी लोकांना पकडून आणले जाईल, असे सांगितले. नंतर हेलिकॉप्टर गैरव्यवहारात मिशेलला अटक केली.’’ ‘मिशेलमामा’ आता बोलणार, काही लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता सोनिया गांधी यांचे नाव पुढे आले. कोणाचा मुलगा पंतप्रधान होणार हे सर्व मोदी दोन-तीन महिन्यांपासून सांगत होते. सत्तेचा गैरवापर हा कोणत्या पातळीवर गेला आहे, त्याचा अतिरेक पाहावयास मिळत आहे, अशी टिप्पणी पवार यांनी केली.पवार रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद हे विधेयक राज्यसभेत सादर करतील. या विधेयकाला सध्यातरी पाठिंबा देण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. तर भाजपने व्हीप जारी करून आपल्या सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.लोकसभेत २४५ मते घेऊन तिहेरी तलाक विधेयक २०१८ पारित झाले. राज्यसभेत केंद्राला पुरेसे बहुमत नाही. त्यामुळे या विधेयकार मोठी चर्चा तेथे होण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता. त्यामुळे राज्यसभेत या विधेयकावर त्यांचा असाच कल असेल का? यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. या विधेयकामध्ये दोषी पतीच्या विरोधात फौजदारी गुन्ह्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पती दोषी आढळल्यास त्याला ३ वर्षाचा तुरुंगवास होईल. तसेच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार करण्याचा अधिकार फक्त पत्नीच्या रक्तातील नातेवाईकांनाच देण्यात आला आहे. तर, न्यायदंडाधिकारी दर्जाचा अधिकाऱ्याच्या संमतीवरच गुन्हा नोंदवला जाणार आहे. या विधेयकाचे रुपांतर जर कायद्यात झाले तर मुस्लीम महिला रस्त्यावर येतील, असा युक्तीवाद खासदार असदुद्दीन ओवेसीने लोकसभेत मांडला होता. तर, या घटनेमधील तरतुदी अपूर्ण आहेत, असे म्हणत काँग्रेसने सभात्याग केला होता. मात्र, २४५ मतांनी हे विधेयक लोकसभेत पारित झाले.

श्रीनगर - भारतीय लष्कराने नौगाम सेक्टर मध्ये ३० डिसेंबरला पाकिस्तानच्या बॅट (बीएटी - बॉर्डर एक्शन टीम)च्या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. २ घुसखोरांना ठार करण्यात यश आले आहे. बॅटची ही तुकडी नियंत्रण रेषेजवळील जंगलातून लष्कराच्या चौकीवर अचानक हल्ला करण्याच्या तयारीत होती. त्यांनी उच्च क्षमतेच्या बंदुकांनी जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली.हे घुसखोर पाकिस्तानी कॉम्बॅट ड्रेस घातले होते. त्यांच्याकडे पाकिस्तानची 'मार्किंग' असलेले साहित्य होते. काहींच्या अंगावर बीएसएफ जवानांसारखे तर काहींच्या अंगावर भारतीय लष्कराच्या जुन्या 'पॅटर्न'चे ड्रेस होते. त्यांचा भारतीय लष्करावर जबरदस्त हल्ला करण्याचा मनसुबा होता.'हे सर्वजण पाकिस्तानी असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, त्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही सिद्ध होत आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी ठार झालेल्यांचे मृतदेह पाकिस्तानच्या हवाली करण्यात येणार आहेत. पाकिस्तानला हे मृतदेह स्वीकारण्यास सांगण्यात येणार आहे,' असे लष्करातर्फे सांगण्यात आले आहे.श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याला मोठे यश आले आहे. जवानांकडून ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून त्यांच्याजवळून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. सैनिकांना या क्षेत्रामध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या परिसराला वेढा देऊन त्यांनी शोधमोहीम राबवली.पुलवामाच्या हंजन येथे काही दहशतवादी लपून असल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. त्यावर योजना आखून त्यांनी या क्षेत्रामध्ये शोधमोहीम राबवली. दरम्यान दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या विरोधात 'ऑपरेशन ऑल आऊट' सुरू केले आहे. त्यानुसार सैनिकांनी ही कारवाई केली. अशाच प्रकारच्या एका चकमकीमध्ये शुक्रवारी एका दशतवाद्याचा खात्मा केला होता. त्यानंतर सैनिकांना हे मोठे यश मिळाले आहे. पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावर्षीदेखील लाखो अनुयायी येणार आहेत. गतवर्षी १ जानेवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी नवल किशोर राम यांनी कोरेगाव भीमा येथे काही अनुचित घडणार नाही याची आपल्याला ११० टक्के खात्री असल्याचा विश्वास व्यक्त केला.पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी यावेळी बोलताना सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी आत्तापर्यंत ४५ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. हेट मेसेजचे प्रमाण खूप कमी झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. गर्दी नियंत्रित करण्याची व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे. पार्किंगसाठी ११ जागा देण्यात आल्या आहेत. घातपात होऊ नये याकरता बीडीडीएसची सात पथकं, जिल्ह्याच्या सीमारेषेवर चेक पोस्ट्स, ५००० पोलीस कर्मचारी, १२ एसआरपीएफच्या तुकड्या, १२०० होम गार्ड्स, २००० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून सुरक्षितता, गर्दीचे नियमन, सोशल मीडियावरील मेसेजेसवर लक्ष ठेवलं जात आहे. ज्यांच्यावर संशय आहे, जे शांतता भंग करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे सांगताना विश्वास नांगरे पाटील यांनी कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला.१२११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्यांचा दंगल ,हिंसाचारात सहभाग आहे अशा ६४ जणांवर १४४ नुसार कारवाई करण्यात आली असून सहा जणांना तडीपार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी १ जानेवारीला दारुबंदी असल्याचे जाहीर केले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० व्हीडिओ कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामधील २० शिरूर तर २० हवेली तालुक्यात बसवण्यात येणार आहेत. १२ ड्रोन परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहेत. यामधील सहा शिरूर आणि सहा हवेली तालुक्यात असतील. चाकणमध्येही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विजयस्तंभ आणि त्याच्यापासून सात ते आठ किमी परिसरात ३०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ७ ते १० लाख लोक येतील हे गृहीत धरून तयारी करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी १५० पीएमपी बसेस आणि काही खासगी बसेस चालवण्यात येणार आहेत. येणाऱ्या लोकांसाठी ३०० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असणार आहे.नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील अटकेत असलेला मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेल याने या प्रकरणामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे. मात्र, ते कोणत्या संदर्भात घेण्यात आले हे अद्यापही त्याने सांगितले नाही, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सांगितले आहे. आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात मिशेलने आपला पक्ष मांडला त्यावेळी त्याने ही उत्तरे दिली. मिशेलला ७ दिवसांच्या ईडीच्या रिमांडमध्ये पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.ख्रिश्चियन मिशेलने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला कशाप्रकारे डीलमधून वगळण्यात आले तसेच त्याऐवजी टाटा कंपनीला यात कशाप्रकारे आणण्यात आले याविषयीही माहिती दिली. तसेच ईडीने न्यायालयात मिशेलला वकील देण्यासही बंदी घालण्याची मागणी केली. मिशेलने 'द सन ऑफ इटालियन लेडी' असा उल्लेख करत ते भविष्यात भारताचे पंतप्रधान बनणार असल्याचे म्हटले, असे ईडीने न्यायालयात सांगितले. मिशेलला भेटताना वकिलाने योग्य अंतर राखावे. तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी १५ मिनिटांसाठी वकील मिशेलला भेटू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
श्रीनगर - जम्मू येथील एका बस स्थानकाजवळ आज सकाळच्या सुमारास बॉम्ब स्फोट झाला आहे. मात्र, स्फोटाची तिव्रता कमी असल्याने, यात कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्त हाणी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटत मानवंदना दिली आहे. जयदेव ठाकरे यांनी बऱ्याच काळानंतर काढलेले हे व्यंगचित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.ठाकरे कुटुंब आणि व्यंगचित्र हे नाते काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे हे त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांसाठी ओळखले जातात. बाळासाहेबांचा मुलगा असलेले जयदेव ठाकरे हेदेखील व्यंगचित्र रेखाटत असतात.जयदेव ठाकरे यांचे एक नवे व्यंगचित्र समोर आले आहे. या व्यंगचित्रात त्यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आणि त्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा रेखाटली आहे.

अहमदनगर - भोंदूगिरी करुन देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूप, अंगारा देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. शिवा प्रकाश भालेराव असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उद्धव अशोक काळापहाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीची बहीण पुष्पा हिचे सासरे तुकाराम यांना विचित्र स्वप्ने पडत होती. त्यामुळे ते म्हसोबानगर येथील मुर्शतपूरमध्ये भोंदूबाबा भालेराव याच्याकडे नियमितपणे जायचे. त्यानंतर मेव्हणे अनिल यांच्या पोटात दुखू लागले. बहिणीचे सासरे तुकाराम हे मेव्हणे अनिल यांना घेऊन आरोपीकडे उपचारासाठी घेऊन गेले. त्यावेळी आरोपीने ‘तुम्हाला सासरच्या मंडळींनी दिवाळीच्या काळात जेवणातून काहीतरी खाऊ घातले आहे. त्यामुळे तुमचे पोट दुखत आहे 'लिंबू चौकी' देऊन तुम्ही बरे व्हाल, असे सांगितले.या प्रकारामुळे फिर्यादीच्या बहिणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी गुरुवारी सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे, पोलीस नाईक सुरेश देशमुख, शिंदे त्यांच्या मठात रुग्ण म्हणून गेले. गुरुवार असल्यामुळे तेथे मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. भोंदूबाबा प्रत्येकाला धागे-दोरे, लिंबू चौकी, अंगारा देत उदी खावून घ्या, तुम्हाला गुण येईल. पुढच्या गुरुवारी परत या, असे रुग्णांना सांगत असे. यावेळी पोलीस नाईक सुरेश देशमुख यांनी या घटनेचे चित्रण केले. हा भोंदूबाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून बुवाबाजी करुन नागरिकांची फसवणूक करत असल्याचे यावेळी दिसून आले आहे.

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रेशीमबाग स्मृतीभवन येथे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या चार ते पाच महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच राज्याच्या विधानसभा निवडणुका असतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघामधील महत्त्वाच्या नेत्यांच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. उमा भारती या नागपुरात मा.गो. वैद्य यांना भेटण्यासाठी येत-जात असतात. परंतु शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या नागपुरात पोहोचताच थेट संघ मुख्यालयात गेल्या. यानंतर त्यांनी मा.गो. वैद्य यांचीही भेट घेतली. उमा भारती या नागपूरला आल्या की, पत्रकारांशी थेट खुली चर्चा करतात. परंतु आजची बैठक मात्र त्यांनी अतिशय गोपनीय ठेवली होती. तसेच संघ मुख्यालयाबाहेर असलेल्या पत्रकारांशी कुठलीही चर्चा न करताच त्या निघून गेल्या. विशेष म्हणजे संघांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही त्यांच्या भेटीची माहिती नव्हती.अंबाला - हरियाणातील अंबालामध्ये शनिवारी सकाळी २ अज्ञात वाहनांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या धडकेत ७ जण ठार झाले. यात ३ लहान मुलांचा समावेश आहे. २ महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना चंदीगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर ३ जखमींना उपचारासाठी छावणी नागरिक रुग्णालयात नेण्यात आले आहे.अंबालातील बलदेवनगर येथे हा अपघात घडला. दा़ट धुक्यामुळे वाहन चालकांना एकमेकांचा अंदाज आला नाही. यामुळे ही धडक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत ७ जण ठार झाले.अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही गाड्या महामार्गावर उभ्या होत्या. दोन्ही गाड्यांमधील लोक चंदीगडहून वृंदावनला निघाले होते. सकाळी चारच्या दरम्यान अज्ञात वाहनाने या दोन्ही वाहनांना टक्कर दिली. हे वाहन धडक देऊन न थांबता पसार झाले.अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर बलदेव नगर परिसरातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. पोलिसांनी या वाहनांमधील सर्वांना अंबाला शहर जिल्हा नागरिक रुग्णालयात पोहोचवले. तेथे ७ जणांना मृत घोषित करण्यात आले.मुंबई - मागील वर्षी डिसेंबर महिन्यात परळ येथील कमला मिल परिसरातील २ पबला आग लागली होती. या आग प्रकरणी आयुक्तांनी तसेच उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.मुंबईमधील गिरण्या बंद झाल्या आहेत. त्यामध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगारांना त्यांची थकबाकी व घरे देता यावीत म्हणून आयटी पार्क उभारण्यास सरकारने परवानगी दिली होती. या परवानगीचा गैरवापर करत कमला मिलमध्ये पब आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. यापैकी वन अबव्ह, मोजोस ब्रिस्टो या दोन पबला २८ व २९ डिसेंबरच्या रात्री आग लागली. या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता.१४ जणांच्या मृत्यूप्रकरणी पबचे मालक व त्यांचे सहकारी अशा ५ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पालिकेवर टिका केली जात असल्याने याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी दरम्यान १२ जणांना दोषी ठरवण्यात आले. यामध्ये अभियंता, २ साहाय्यक आयुक्त, आरोग्य व अग्निशमन दलातील अधिकारी यांचा समावेश आहे. माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीनेही ९ अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर पदावनती, वेतनवाढ रोखणे किंवा बडतर्फी अशा स्वरुपाची कारवाई होऊ शकते.
हे अधिकारी झाले निलंबित -
मधुकर शेलार, इमारत व कारखाने विभागाचे दुय्यम अधिकारी दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे, विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे.मुंबई - नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पाच सुविधा देण्याची तयारी केली आहे. यात प्रवाशांना ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा मिळेल. रेल्वेच्या देखभालीसाठी रोबोटचा वापर करण्यात येईल. तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांनाही तिकिटात सवलत मिळेल.नवीन वर्षात प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी खास ८०० ट्रेन चालविण्यात येतील. यात मोफत वायफाय, बायो-टॉयलेट असेल. नवीन वर्षात विमानाप्रमाणे रेल्वेतही ‘आॅन बोर्ड शॉपिंग’ करता येईल. पश्चिम रेल्वेमार्गावर १६ मेल आणि एक्स्प्रेसमध्ये सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. शॉपिंग कार्टमध्ये सौंदर्य, घर, किचनमधील सामग्री उपलब्ध असेल.देशातील पहिली पंचतारांकित रेल्वे स्थानकांची सुरुवात होण्याची योजनाही नवीन वर्षासाठी आखण्यात आली आहे. हे स्थानक गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये आहे. या हॉटेलमध्ये १० मजले, ३०० खोल्या असतील. नव्या वर्षात रेल्वेच्या देखभालीसाठी रोबोट असतील. रेल्वेच्या नागपूरमधल्या अभियंता विभागात एक रोबोट तयार केला आहे. त्याला ‘उस्ताद’ असे नाव दिले आहे. हा रोबोट ट्रेनच्या खालील भागातील पार्टचे फोटो काढेल. त्यात तांत्रिक खराबी असल्यास नोटीस देईल. रोबोटमध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत. ते ३२० डिग्रीच्या कोनातून व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी करण्यास सक्षम आहेत.मुंबई - मुंबईतील सांताक्रूझ भागातील वाकोला परिसरातून अंमलीपदार्थ विरोधी शाखेच्या पोलिसांनी एका कारमधून १०० किलो फेंटानिल ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ३१ डिसेंबरला अवघे तीन दिवस उरलेले असताना मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.या १०० किलो ड्रग्जची किंमती जवळपास १ हजार कोटीच्या घरात आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. एका कारमध्ये पोलिसांना हा साठा सापडला. चार बॅगमध्ये प्रत्येकी २५ किलो फेंटानिल ड्रग भरण्यात आले होते.सलीम धाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि घनशाम सरोज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सलीम धालाला याआधी सुद्धा गांजा बाळगल्या प्रकरणी २०१३ मध्ये अटक झाली होती.फेंटानिल ड्रग्जचा कर्करोगाच्या उपचारामध्ये वापर केला जातो. बाहेर विक्री करण्यासाठी काही प्रयोगशाळांमध्ये गुप्त पद्धतीने फेंटानिल ड्रग तयार केले जाते. हेरॉईन, कोकेनमध्ये मिसळून किंवा पर्याय म्हणून फेंटानिलचे सेवन केले जाते. अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर फेंटानिल ड्रग्जचे सेवन केले जाते. फेंटानिलच्या ओव्हरडोसमुळे दरवर्षी अमेरिकेत हजारो मृत्यूंची नोंद होते.अंमलीपदार्थ विरोधी शाखेच्या आझाद मैदान युनिटने ड्रग्ज जप्तीची ही कारवाई केली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही वाकोला सुभाषनगर येथे सापळा रचून कारवाई केली अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.सलीम धाला कॉटन ग्रीन येथे वाहन चालक म्हणून काम करतो. संदीप तिवारी पदवीधर असून एका खासगी कंपनीत तो कामाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली व त्यांची नवी कोरी टाटा नेक्सन एसयूव्ही कार जप्त केली. या गाडीमध्येच हा साठा सापडला. चंद्रमणी तिवारीचे कांदिवली ठाकूर व्हिलेज येथे मोबाइलचे दुकान आहे. पोलिसांनी संदीप तिवारीची सुझूकी सुद्धा जप्त केली.एनडीपीएस कायद्याखाली चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्जचे नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. चारही आरोपी चौकशीत सहकार्य करत नसून हे ड्रग्ज त्यांना कोणाकडून मिळाले हे सांगायला तयार नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हे ड्रग काही परदेशी नागरिकांना देणार होते. ते हे ड्रग घेऊन अमेरिका आणि अन्य देशांमध्ये जाणार होते. कोकेन, हेरॉईन इतके हे महागडे ड्रग आहे.
पणजी - मुरगाव बंदरानजीक असलेली सरकारी जमीन बळकावून गोव्याच्या नगरविकास मंत्र्यांनी बेकायदेशीररित्या बंगला उभारणी सुरू केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. त्याबरोबरच संबंधित यंत्रणांनी याला स्थगिती देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी मंत्री नाईक यांच्या विरोधात यासंदर्भात दक्षता खात्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आज येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्ष प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी आणि म्हार्लोळकर उपस्थित होते.मंत्री नाईक यांनी पदाचा गैरवापर करत संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणून ना हरकत दाखले प्राप्त करून मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरणाची दिशाभूल केली. त्यावर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता मडगाव पालिका मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परवाने दिली, असा आरोप पणजीकर यांनी केला. नाईक यांनी बंगला उभारणी करण्यासाठी डोंगर कापणीस प्रारंभ केला आहे. मुरगाव बंदरावरील जागा ही नाईक यांच्या वडिलांसह अन्य ६ जणांच्या नावे आहे. ज्यामध्ये राज्य सरकार पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, त्यांनी ही जमीन आपलीच असल्याचे दाखवले असून कोणाचीही याबाबत ना हरकत घेतलेली नाही, असा आरोप करत पणजीकर यांनी केला. ते म्हणाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे पालिकेनेही बांधकाम परवाना दिला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून सर्व संबंधितांवर कारवाई करावी.दरम्यान, यासंदर्भात मंत्री मिलिंद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काँग्रेसने केलेले आरोपांचे मी का उत्तर द्यावे. जर खरे असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे. माझ्या माहितीप्रमाणे आणि आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. पात्रा यांनी प्रचारादरम्यान रस्त्यावरच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यासाठी भोपाळमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. संबित पात्रा आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एस. एस. उप्पल यांच्याविरोधात भुवनेश्वर मिश्र यांच्यावतीने अॅड. यावर खान यांनी कोर्टात तक्रार याचिका दाखल केली होती. न्या. प्रकाशकुमार उइके यांनी पात्रा यांच्याविरोधात हे वॉरंट जारी केले आहे.अकोला - मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न काँग्रेसने निरंतर प्रलंबित ठेवला आहे. काँग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र, त्यांना मुस्लिमांचे नेते नको आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोला येथे मुस्लीम आरक्षण महामोर्चादरम्यान ते बोलत होते.काँग्रेस मुस्लिमांचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करीत आहे. त्यामुळे त्यांना १९ टक्के आरक्षण देण्यासाठी काँग्रेसने कुठलीच पावले उचलली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले. मात्र, १९ टक्के असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदरांनी कुठलाच दबाव आणला नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडे अट ठेवली असल्याचे ते म्हणाले. 'एमआयएम' बहुजन महासंघासोबत आहे. त्यामुळे एमआयएमला सोबत घेऊनच काँग्रेससोबत युती करणार असल्याचे ते म्हणाले. आघाडीसाठी १२ जागा मागितल्या आहेत. त्यामध्ये धनगर, माळी, मुस्लीम, ओबीसी, भटक्या विमुक्तसाठी प्रत्येकी २ जागा याप्रमाणे १२ जागा मागितल्या असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती बदलत असल्यामुळे जागा मागितल्या आहेत. मात्र, आता काँग्रेस किती बदलणार ते बघणार असल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी - दापोली- खेड मार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत. डंपरने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.दापोली- खेड मार्गावर मॅक्सिमो गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. महामार्गावरील नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला आहे.परभणी - पाथरी शहरातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अचानक भेट दिली. त्यांनी सर्व वर्गांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.भेटीदरम्यान खोत यांनी मुलांना विविध प्रश्न विचारून माहिती मिळवली. मुलांनी देखील त्यांना समाधानकारक उत्तरे दिल्याने जिल्हा परिषदेची शाळा खरच आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा प्रत्यय त्यांना आला. माळीवाडा शाळेचे नाव महाराष्ट्रातच आहे. मात्र, आता ते देश पातळीवर नेण्याचे काम सर्वांचे असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांच्या फंडातील जास्तीत जास्त निधी या शाळेसाठी कसा देता येईल? यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचे कौतुकही केले. आदर्श शाळा ते आंतरराष्ट्रीय शाळा असा शाळेचा प्रवास डोंगरे आणि कराड यांनी सांगितला. शाळेतील उपक्रम व पुढील येऊ घातलेले नवीन उपक्रमांची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चिंचाणे यांनी दिली. यावेळी पाथरीचे आमदार मोहन फड, नगरसेवक गोविंद हारकळ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बि.पी., शिक्षणाधिकारी आशा गरुड उपस्थित होतेअहमदनगर - अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीसाठी भाजपने कर्नाटक पॅटर्न हाती घेतला आहे. सर्वात कमी जागा असूनही भाजपनं महापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. "आपलाच महापौर होणार", असा दावाच भाजपने केला आहे. १० डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिका निवडणुकांची मतमोजणी झाली. ६८ जागांपैकी शिवसेना-२४, राष्ट्रवादी-१८, भाजप-१४ अशा जागांवर आहे. परंतु, ३५ जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. आज महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनेही उडी घेतल्यामुळे चुरस वाढली आहे. भाजपकडून महापौरपदासाठी बाबासाहेब वाकळे यांनी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीचे संपत बरस्कार यांनी अर्ज भरला आहे. कमी जागा असूनही भाजपनं महापौरपदावर दावा केला आहे."आकड्याचे गणित जुळल्यामुळे भाजपनं महापौरपदाचा अर्ज भरला", अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने महापौरपदासह उपमहापौरपदासाठीही अर्ज भरला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून मालन ढोणे यांनी आपला अर्ज भरला आहे. तर शिवसेनेकडून गणेश कवडे आणि राष्ट्रवादीकडून रुपाली वारे यांनी अर्ज भरला आहे. महापौरपदासाठी कोण कुणाला पाठिंबा देणार याबद्दल सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे घोडेबाजाराला जोर आला आहे. तर दुसरीकडे अनेक नगरसेवकांचा संपर्क होत नसल्याचं समोर आले आहे. आता नगरमध्येही भाजपने कर्नाटकसारखीच खेळी केली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये कुणाचा महापौर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


सांगली - बनावट दाखले तयार करुन देणाऱ्या एका टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विविध शासकीय कामासाठी बनावट दाखले देण्याचा उद्योग या टोळीकडून सुरू होता. या प्रकरणी एका निवृत्त शिक्षकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. तासगावमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.सांगली पोलिसांकडून शासकीय कामांसाठी लागणारे विविध बनावट दाखले तयार करुन विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी तासगावच्या चिंचणी येथील एका निवृत्त शिक्षकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कामांसाठी शाळा सोडल्याचे दाखले, गुणपत्रिका असे दाखले या टोळीकडून विक्री करण्यात येत होते. या दाखल्यांसाठी १० ते १५ हजार रुपये घेण्यात येत होते. याबाबतची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर तासगावच्या वासुंबे येथून निवृत्त शिक्षक किरण होवाळे याला अटक करण्यात आली. या कारवाईत होवाळे यांच्याकडून बनावट शिक्के आणि काही गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या. तर चौकशीमध्ये सांगलीच्या आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. यानंतर अशोक इंगळे, हणमंत गोल्लार आणि बशीर मुल्ला या तिघांना अटक करण्यात आली. या टोळीने सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात बनावट दाखल्यांची विक्री केली असून २०१६ पासून हा बनावट दाखले विक्रीचा उद्योग सुरू असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हे बनावट दाखले ज्यांना विकले त्यांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


केरळ- कोची नेव्हल बेसमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा तुटून पडल्यानं दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता कोची नेव्हल बेसमध्ये घडली आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा या दोन्ही नौसैनिकांच्या अंगावर कोसळला आणि अपघातात त्या नौसैनिकांचा मत्यू झाला. या अपघातात आणखी दोन ते तीन नौसैनिक जखमी झाले असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - भाजप नेत्या लक्ष्मीकांता चावला यांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रेल्वेतून प्रवास करताना सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चावला यांनी म्हटले आहे. गाडीला उशीर झाल्यामुळे चावला चिडलेल्या असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे.चावला यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या रेल्वेमंत्रालयाला आणि मोदींना प्रश्न विचारताना दिसत आहेत. बुलेट ट्रेनला विसरा आणि सद्य परिस्थितीमधील गाड्यांच्या सुविधांकडे लक्ष केंद्रित करा, असा सल्ला चावला यांनी दिला आहे. विशेष सुविधा असेलल्या गाड्यांमधून प्रवास करण्याऐवजी कधीतरी सर्वसामान्यांप्रमाणे रेल्वेगाडीतून प्रवास करून दाखवा, असे आवाहनही चावला यांनी नेत्यांना केले आहे.आम्ही गेल्या २४ तासांपासून या गाडीतून प्रवास करत आहोत. ही गाडी उशिराने धावत आहे. मी सरकार आणि पंतप्रधान मोदींना विनंती करते की त्यांनी याकडे लक्ष द्यावे. आम्हाला कोणीच काही उत्तरे देत नाही. याठिकाणी खाण्याचीही सुविधा नाही, असे चावला व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. शताब्दी आणि राजधानी ह्या सोयीसुविधायुक्त गाड्या आहेत. मात्र, या गाड्यांमधून गरीब, कामगार आणि सैनिक प्रवास करतात का?, असा प्रश्नही चावला यांनी उपस्थित केला आहे.नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयकावरुन लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली असून हे विधेयक कोणत्याही समाज किंवा धर्माविरोधात नाही, असे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत स्पष्ट केले. हे विधेयक महिलांचे अधिकार आणि त्यांच्या न्यायासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून तिहेरी तलाक बेकायदा ठरवणारे नवे विधेयक केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत सादर केले होते. या विधेयकावर गुरुवारी लोकसभेत दुपारी दोन वाजता चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी भूमिका मांडली. हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक असून यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. हे विधेयक संविधानाशी संबंधित असून हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे, असे खरगे यांनी सांगितले. या विधेयकाचा थेट परिणाम ३० कोटी महिलांवर होणार असून त्यांचे रक्षणही महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी देखील खरगे यांच्या मताशी सहमती दर्शवली. सर्वच विरोधी पक्षांची ही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बाजू मांडली. ‘तिहेरी तलाक विधेयक कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही. हे विधेयक महिलांना सन्मान देण्यासंदर्भात आहे. काँग्रेस या विधेयकावर चर्चेला तयार होती. विरोधी पक्षांच्या शिफारशींची दखल घेत विधेयकात अनेक बदल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या विधेयकाकडे राजकारणाऐवजी माणुसकी आणि न्यायाच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात कठोर शिक्षेच्या तरतुदीसंदर्भात संसदेचे एकमत झाले होते. आपण महिलांच्या अधिकारावर भाष्य करतो, मग आता यावरही आपले एकमत झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

मुंबई - केंद्र आणि राज्यातल्या सरकारने जनतेचे जगणे मुश्किल करुन टाकले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या वाचाळविरांनी हैदोस घातला आहे. हे सत्ताधारी मनाला वाट्टेल ते बोलून लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.पवार म्हणाले, महत्वाच्या पदावर असताना तोलून मोजून बोलावे लागते. याचे भान सत्ताधाऱ्यांना राहीले नाही. रामदास आठवले म्हणतात रिझर्व बँक देत नाही म्हणुन १५ लाख रुपये खात्यात जमा केले नाहीत. नोटाबंदीवर सरकार आजही म्हणत आहे की तो योग्य निर्णय होता. व्यापारी मात्र त्रासलेला आहे. तसेच आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटाबंदीमुळे अर्थ व्यवस्था बिघडल्याचे सांगितले आहे.११ हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू करताना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ४-४ महीने मिळत नाही. सर्वच समाज घटक सरकारवर नाराज आहे. बुधवारी सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकले. ते दुधाला ५ रुपये अनुदान देतो म्हणाले होते, पण अजूनही अनुदान मिळालेले नाही. हे सरकार काम करायची नाही तर घोषणा तरी कशाला करते? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.आघाडीचे जागावाटप अजून निश्चित नाही. ८ जागांवर चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत बोलणार नाही, असे त्यांनी जागावाटपाच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

मुंबई - ‘ठाकरे’ चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार, त्या दिवशी अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला असतानाच यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना आणि भाजपावर टीकास्त्र सोडले. ‘आपण सर्व लोकशाहीत राहतो, इथे कायद्याचे राज्य असून जुलूमशाही नाही. शिवसेनेची अशी हिंमत कशी होते?, अशा लोकांना आधी तुरुंगात टाकावे’, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. ‘ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे, या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली. तर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा लोकरे यांनी ‘२५ जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ’, असे सांगितले होते. यावरुन वाद निर्माण होताच संजय राऊत यांनी देखील स्पष्टीकरण दिले. ‘ते शिवसैनिकाचे वैयक्तिक मत असून शिवसेनेची ही भूमिका नाही’, असे राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणानंतरही हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अंजली दमानिया यांनी ट्वटिरवरुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दमानिया म्हणतात, मुख्यमंत्रीजी, आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य आहे. जुलूमशाही नाही. शिवसेनेची अशी धमकी देण्याची हिंमत होतेच कशी ?, ‘ठाकरे’शिवाय २५ जानेवारीला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ?, अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. पण २०१९ मध्ये त्यांची (शिवसेनेची) गरज भासू शकते. त्यामुळे तुम्ही कारवाई करणार नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला.नागपूर - एका १९ वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक अत्याचार करून ब्लू फिल्म तयार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या ब्लू फिल्मच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करून देहव्यापारात ढकलण्यात आले. ही घटना शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. याप्रकरणी पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. शहनशाह शेख (वय, २७)आणि अजय श्रीवास (वय, २६) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत.शहनशाह आणि अजय हे पीडितेच्या पतीचे मित्र आहेत. ऑक्टोबरमध्ये शहनशाह आणि अजय तिच्या घरी आले. त्यांनी कचोरीत गुंगीचे औषध टाकून पीडितेला खायला दिली. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर संधी साधून शहनशाहने तिच्यावर अत्याचार केला. तर अजय श्रीवासने याची अश्लील चित्रफीत काढली. या घटनेवेळी पीडितेचा पती दारूच्या नशेत होता. पीडिता शुद्धीवर आल्यावर तिला चित्रफीत दाखविली आणि याबाबत वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेल, तसेच ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने पीडितेने याबद्दल कुणालाच सांगितले नाही. दरम्यान, आरोपी शहनशाह आणि अजय वारंवार तिच्यावर अत्याचार करू लागले. अत्याचारानंतर तिला पैसे द्यायचे. आरोपींचा छळ असह्य झाल्याने पीडितेने तिच्या सासूला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडिता आणि तिच्या सासूने गणेशपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढीत तपास सुरू आहे. मुंबई - मंत्रीमंडळात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. १ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. यामुळे राज्यातील सुमारे १९ लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे.राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या समितीने अहवाल सादर केला होता. या अहवालावर गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे. यामुळे राज्यातील सरकारी, निमसरकारी, सेवानिवृत्त अशा सुमारे २५ लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.सातवा वेतन आयोग लागू लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आणि इतर कर्मचारी संघटनांनी ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच सरकारकडून हा निर्णय घेण्यात अाल्याने लाखो कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून नववर्षांची भेट ठरली आहे.मुंबई - टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नुकत्याच जारी केलेल्या निर्णयानुसार डीटीएच कंपन्यांना २९ डिसेंबरपासून १०० चॅनल १३० रुपयांच्या किंमतीमध्ये दाखवावे लागणार आहेत. मात्र, टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून २९ डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये २९ डिसेंबरपूर्वी हे चॅनेल न घेतल्यास डीटीएच बंद होणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महत्वाचे म्हणजे आपण आधी हे समजून घेतले पाहिजे की ट्रायने हा निर्णय का आणि कोणाच्या फायद्यासाठी घेतला. टाटा स्काय, व्हिडिओकॉन, डीश टीव्ही, एअरटेलसाख्या डीटीएचवर देशाच्या भागानुसार पॅकेज देण्यात येत होते. यानंतर तुम्हाला मातृभाषेचे चॅनेल हवे असल्यास वेगळे पॅकेज, खेळांचे हवे असल्यास वेगळे, छोट्यांसाठीचे चॅनेल वेगळे आणि एचडीसाठी वेगळे असे भरमसाठ पैसे भरावे लागत होते. तसेच जवळपास ११०० चॅनेल दाखविले जात होते. यापैकी फारतर महिनाभरात १० ते २० चॅनल आवडीनुसार पाहिले जातात. यामुळे उरलेल्या चॅनलचे पैसे चॅनल न पाहताही भरावे लागत होते. यामुळॆ लाखो ग्राहकांनी ट्रायकडे याबाबत तक्रार केली होती. यावर ट्रायने हा निर्णय घेतला आहे. २९ डिसेंबरनंतर होणार महत्वाचा बदल म्हणजे आपल्याला हवे ते चॅनेल निवडता येणार आहेत. जर ग्राहक मराठी असेल तर त्याला साऊथचा म्हणजेच दक्षिणात्य पॅक घ्यायची गरज राहणार नाही. केवळ मराठी चॅनेल म्हणजेच स्टार, झी, आणि बातम्यांचे चॅनेल गरजेनुसार घेता येणार आहेत. शिवाय एखाद्या कंपनीचे सर्व चॅनेल पॅकेजमध्ये घेता येणार आहेत. उदा. स्टार टीव्हीचे चित्रपट, मालिका, स्पोर्ट असे वेगळे पॅकेजही कमी पैशांत पाहता येणार आहे. यामुळे अतिरिक्त चॅनलसाठी जो पैसा वसूल केला जात होता तो वाचणार आहे. या पॅकसह एखादा हिंदी, इंग्रजी बातम्या, सिनेमाचे चॅनलही वेगवेगळे खरेदी करता येणार आहेत. नवी दिल्ली - देशामधील काही शहरांचे नामांतरण झाल्यानंतर आता सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याची तयारी सुरु केली आहे. सरकारने नुकत्याच जारी केलेल्या जगांच्या नामांतरणाच्या यादीमध्ये या बेटांचा समावेश आहे. बेट समुहातील रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाष चंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात येणार असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.सुभाष चंद्रबोस यांनी पोर्ट ब्लेयर येथे भारतीय तिरंगा फडकावल्याच्या आमृतमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे नामांतरण करण्याचा सरकारचा विचार आहे. बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेयर येथे भारताचा झेंडा फडकवला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडविरुद्ध लढणाऱ्या जपानने अंदमान निकोबार बेटांचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर नेताजींची हे ध्वजारोहण केले होते. त्यावेळेस त्यांनी अंदमान निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज द्विप अशी नावं द्यावीत अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.मार्च २०१७मध्ये एका बाजपा नेत्याने राज्यसभेमध्ये हेवलॉक आइसलॅण्डच्या नामांतरणाची मागणी केली. १८५७ च्या उठावामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांविरुद्ध लढलेल्या व्यक्तीच्या नावाने हे बेट ओळखले जाते हे लज्जास्पद असल्याचे मत एल.ए. गणेशन यांनी व्यक्त केले होते. ब्रिटिश अधिकारी हेन्री हेवलॉक यांच्या नावावरुन बेटाचे नामकरण करण्यात आले आहे. हे अंदमान निकोबार बेट समुहातील सर्वात मोठे बेट आहे. लवकरच या बेटाचे नाव स्वराज द्विप असं करण्यात येणार आहे.


बंगळुरू - कर्नाटकातील सत्ताधारी पक्ष जनता दलाचे नेते प्रकाश यांच्या निघृण हत्येने खळबळ माजली आहे. या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांच्या तीव्र प्रतिक्रियेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे फोनवर बोलतानाच्या एका व्हिडिओने खळबळ माजली आहे. मृत प्रकाश हे एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा खून का केला हे माहित नाही. मात्र, मारेकऱ्याला शूटआऊटमध्ये बिनधास्त मारुन टाका, असे ते फोनवर आदेश देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामींनी सारवासारव करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांची हत्या करण्याचे आदेश मी दिले नव्हते. प्रकाश यांच्या हत्येमुळे मी भावनिक झालो होतो. प्रकाश यांचा मारेकरी पूर्वीच दोन खून केल्यामुळे तुरूंगात होता. दोन दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाल्यावर त्याने पुन्हा हा तिसरा खून केला. असे कुख्यात गुन्हेगार त्यांना मिळालेल्या जामिनाचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले. कुमारस्वामी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही मुख्यमंत्रीच मारण्याची आणि बदल्याची भाषा करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज ९४ वा जन्म दिवस. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. याशिवाय भाजप, काँग्रेस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अटलजींना आदरांजली वाहिली.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंती निमित्त आज राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील उपस्थित होते.पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरूनही अटलजींना आदरांजली वाहिली. यात, आपल्या सर्वांचे प्रिय, माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या जयंती निमित्त शत-शत नमन, असे मोदी यांनी म्हटले आहे.पुणे - शहरातल्या वानवडी परिसरातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाजवळून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ही कारवाई केली. चौकशीनंतर त्या व्यक्तीविरोधात वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.वानवडीत लष्कराचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी चोख बंदोबस्त असतो. सोमवारी एक व्यक्ती संशयास्पदरित्या महाविद्यालयच्या परिसरात फिरताना बंदोबस्तावर असलेल्या जवानांना आढळून आला. त्याने 'एएफएमसी' असा लिहिलेला गणवेश घातला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. अधिक चौकशीनंतर त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी दिली. वैजापूर - मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे, असे समता परिषदेचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणालेत. वैजापूर येथे आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला समता सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी मनुस्मृतीवर टीका करत आताही देशात एक प्रकारे मनुवृत्ती जागी झाली असून उसळी मारत आहे. समतेचे चक्र उलटे फिरत असल्याचे सांगितले. ज्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केले ती आज पुन्हा जाळण्याची वेळ आली आहे. मनुस्मृती माणसांमध्ये भेदभाव करते असे ते म्हणाले.साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले; पण आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता ५४ टक्के असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जणगणना करा, अशी मागणीही त्यांनी केली.देशात मंदिर मशिद वाद व राज्यात मराठा ओबीसींमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत अशी टीका त्यांनी यावेळी भाजपा सरकारवर केली. न्याय मागितला तर तुरुंगात टाकणारे हे सरकार आहे. देशात मंदिर, मशीद व राज्यात मराठा-ओबीसींंमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत. अच्छे दिनची भाषा करून शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.

बीड - खोट्या प्रतिष्ठेसाठी ७ दिवसांपूर्वी सुमित वाघमारे या २७ वर्षीय तरुणाची हत्या करून आरोपी फरार झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. अखेर बीड पोलिसांनी मंगळवारी पहाटे सुमित वाघमारे हत्या प्रकरणातील आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांनाही अमरावती जिल्ह्यातून अटक केली आहे. बालाजीचा मित्र कृष्णा क्षीरसागर याला पोलिसांनी सोमवारी पहाटे अटक केली होती.बालाजी लांडगे व संकेत वाघने १९ डिसेंबरला सुमित वाघमारेचा खून केला. सुमित वाघमारे याने बालाजी लांडगेच्या बहिणीशी २ महिन्यापूर्वी विवाह केला होता. हा विवाह बालाजीच्या मनाविरुद्ध झाला होता, हा राग मनात धरून बालाजीने भर रस्त्यात सुमितची पत्नी भाग्यश्रीसमोर सुमितचा खून केला होता.या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. एवढेच नाही तर बीड पोलिसांवर देखील मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी पहाटे बीड पोलिसांनी सापळा रचून बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.मुंबई - कांदिवलीतील दामू नगर येथे रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाले.त्यांच मृतदेह आज सापडले आहेत. या सर्वांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.राजू राधेशाम विश्वकर्मा (वय ३०), राजेश छोटेलाल विश्वकर्मा (वय ३६), भावेश वल्लभदास पारेख (वय ५१), सुदामा लालनसिंग (वय ३६) अशी मृतांची नावे आहेत.कांदिवलीच्या दामू नगर परिसरात रविवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास कपडा कारखान्यात आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून ४ जणांना आपला जीव गमवावा लागला. या कापड कारखान्यात जीन्स बनविण्याचे काम चालते. कारखान्यात मोठया प्रमाणात कापड असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाने सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी शोध मोहीम घेतली असता चार मृतदेह आढळून आले.गोरेगाव मोतीलाल नगर दुर्घटना;मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा 

मुंबई - गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलालनगरमध्ये बांधकाम सुरू असलेले दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. म्हाडा वसाहतीत घडलेल्या या दुर्घटनेत सहा जण जखमी झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली आहे.दुमजली चाळीचे अनधिकृत बांधकाम सुरू होते या संदर्भात महापालिका आणि म्हाडाकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु वेळीच या अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने हि दुर्घटना घडली आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.म्हाडाने निवासी वापरासाठी दिलेल्या जागेवर सध्या गोरेगाव पश्चिम येथे पी/दक्षिण मनपा इमारत विभागातील अभियंत्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या निवासी जागेवर बांधकाम करून अनिवासी वापर केला जात आहे,परंतु मनपा किंवा म्हाडा याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने अशा प्रकारचे अपघात होत आहेत.यावर आता पोलीस प्रशासन किती गंभीरतेने कारवाई करते याकडे सर्व स्थानिकांचे लक्ष लागून आहे.

मुंबई - जर तुमचे वय १६ वर्ष असेल तर आता तुम्हीदेखील ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. वय लहान आहे पण तुम्हाला दुचाकी आणि चारचाकी चालवता येत असेल तर आता तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. खरेतर केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी १८ वर्षांची मर्यादा ठेवली होती ती आता कमी करत १६ वर्षांची करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय यासाठी लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. यात अट एकच असेल की, दुचाकी ५० सीसीपेक्षा जास्त नसली पाहिजे. बरं इतकंच नाही तर वाहनांच्या स्पीडवरही मर्यादा दिल्या जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय यासाठी लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. यात अट एकच असेल की, दुचाकी ५० सीसीपेक्षा जास्त नसली पाहिजे. बरे इतकेच नाही तर वाहनांच्या स्पीडवरही मर्यादा दिल्या जातील. सूत्रांच्या माहितीनुसार, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय यासाठी लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. यात अट एकच असेल की, दुचाकी ५० सीसीपेक्षा जास्त नसली पाहिजे. लवकरच यासंबंधीच्या अधिसूचना आम्ही काढू असे परिवहन तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. देशात तब्बल २० लाख अल्पवयीन मुले - मुली आहेत जे ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच यासंबंधीच्या अधिसूचना आम्ही काढू असे परिवहन तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तर एकीकडे परिवहन मंत्रालय लवकरच ५० सीसी क्षमता असणारी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणणार आहेत.लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अयोध्येत जर कोणी राम मंदिर उभारु शकतो तर तो फक्त भाजपा पक्ष असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. भाजपा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली.‘अयोध्येत जर कोणी राम मंदिर उभारु शकतं तर ते फक्त आम्हीच…कोणी दुसरे नाही’, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘मत त्यालाच देणार जो मंदिर उभारणार’, अशी घोषणा यावेळी कार्यकर्ते करु लागले.पुढे बोलताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टीका केली. ते म्हणाले की, ‘काहीजण आपण ‘जनेऊ धारी’ असल्याचे तसेच गोत्र सांगत लोकांची दिशाभूल करत आहेत’. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget