July 2018

इंडोनेशिया - इंडोनेशियामध्ये भूकंपानंतर जमीन धसल्याने अडकून पडलेल्या ५००हून अधिक गिर्यारोहकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. रविवारी पहाटे माऊंट रिन्जानी या डोंगराजवळ ६.४ रिस्टर स्केलच्या तिव्रतेचा भूकंप झाला. भुकंपाच्या झटक्यांमुळे डोंगर उतारावरील माती मोठ्या प्रमाणावर घसरून खाली आली आणि अनेक जागी जमीनही धसली. त्यामुळे ट्रेकला गेलेले ट्रेकर्स आणि हायकर्स आणि त्यांचे वाटाडे असे हजारहून अधिकजण डोंगरावर जाणारा रस्ता बंद झाल्याने अडकून पडले. अडकलेल्यांपैकी ७२३ ट्रेकर्स हे परदेशी असल्याची माहिती झिंग्वा या चीनमधील अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.अडकलेल्या एकूण ट्रेकर्स आणि हायकर्सची संख्या सातशेहून अधिक होती. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड, थायलंड, जर्मनी, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमधील ट्रेकर्सचे गट डोंगरावर अडकले. एवढ्या मोठ्या संख्येने ट्रेकर्स अडकल्याने तातडीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आले.

नवी दिल्ली - भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मान्सून सत्र बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासमवेत पार्टीतील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी इटावा येथील खासदार अशोक दोहरे हात जोडत पंतप्रधानांच्या दिशेने आले. पंतप्रधानांनीही त्यांना हात जोडून अभिवादन केले तेव्हा खासदार अचानकपणे पंतप्रधानांच्या पाया पडायला खाली वाकले पण पंतप्रधानांनी त्यांना असे करू दिले नाही.आपल्या कोणी पाया पडू नये असे आदेश पंतप्रधानांनी याआधीच खासदार आणि आमदारांना दिले आहेत. एवढंच नव्हे तर 'सन्मानासाठी मोठमोठे बुके देण्याऐवजी गुलाबाचं फुल द्या' असेही त्यांनी सांगितले.


नवी दिल्ली - भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त करत आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली आहे. विजय मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला. व्हिडीओ सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. १२ सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.याआधीही प्रत्यार्पणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. भारताने न्यायालयात कारागृहाचे फोटो सादर केले होते. मात्र त्यावरुन आपण अंदाज बांधू शकत नसल्याचे सांगत न्यायाधीशांनी व्हिडीओ मागितला आहे.

नवी दिल्ली (ऑनलाईन) - टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात ५ मॅचेसची टेस्ट सीरीज उद्यापासून एजबेस्टन येथे सुरू होते आहे. त्यासाठी इंग्लंडने २४ तास अगोदर आपला संघ जहिर केला. २०१४ मध्ये टीम इंडियाला भारी पडलेला ऑफ स्पिनर मोइन अली याला मात्र इंग्लंडने या संघात स्थान देण्यात आलेले नाही.इंग्लंडच्या या प्लेईंग इलेवन संघात जो रूट, एलिस्टर कुक, कीटॉन जेनिंग्स, डेविड मलान यांना खेळण्याची संधी मिळीली आहे. तसेच सद्या फॉर्मात असलेले बॅट्समन जॉनी बेयरस्टो आणि जो बटलर हे देखील या संघात आहेत. इंग्लंडने या संघात डावखुऱ्या जलद बॉलर सैम कर्रनला सुद्धा घेतले आहे. याशिवाय क्रिस ब्रॉड आणि जेम्स एंडरसन हे देखील या टिममध्ये आहेत. ऑलराउंडर बेन स्टोक्स सुद्धा या प्लेईंग इलेवन असून, आदिल रशीद याला स्पिनर म्हणून घेण्यात आले आहे.

ऑनलाईन - आरोग्यदायी आहार, कमी अल्कोहोल सेवन व सातत्याने व्यायाम या अटींचे पालन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता कमी होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. कॅन्सर रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात कर्करोगावरचे हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात न्यूट्रिनेट सँटे माहिती अहवालाचा वापर केला आहे. २००९ पासून पोषक आहार व आरोग्य यांचा अभ्यास फ्रान्समध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानुसार एकूण ४० व त्यावरील वयोगटाच्या ४१५४३ व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्यात कर्करोगाचे निदान कधीच झालेले नव्हते. जागतिक कर्करोग संशोधन निधी, अमेरिकन कर्करोग संशोधन संस्था यांनी म्हटले आहे की, पोषक आहार, कमी अल्कोहोल व व्यायाम या तीन अटी पाळल्या तर स्तनाचा कर्करोग, आतडय़ाचा कर्करोग हे विकसनशील देशात ३५ टक्के व ४५ टक्के प्रमाणात टाळता येतात. या संसोधनातील वैज्ञानिक बर्नार्ड स्रोर यांनी सांगितले की, धान्ये, फळे, भाज्या यांचा वापर अन्नात असावा त्यात फास्ट फूड, लाल मांस, प्रक्रिया केलेले मांस, अल्कोहोल व साखर असलेले पेय यांचा समावेश नसावा. एकूणच या अटी पाळल्या तर कर्करोगाचे एकूण प्रमाण विकसित देशात १२ टक्के कमी होऊ शकते. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण १४ टक्के व पूरस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचे प्रमाण १२ टक्के कमी होऊ शकते. फळे व भाज्या यामुळे डीएनएची हानी कमी होते. व्यायामाने रक्तदाब वाढत नाही त्यामुळे फायदा होतो. सोडियमयुक्त अन्नाने रक्तदाब वाढतो. लाल मांस, संस्कारित मांस यामुळे डीएनएची हानी होते.

लातूर - लातूरमधील औसा तालुक्यात टाका येथे आठ जणांनी मराठा आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी आठही तरुणांना ताब्यात घेतले.टाका येथे मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक पवित्रा घेतला. आरक्षण द्यावे अन्यथा तहसील कार्यालयात आत्मदहन करु असा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यासंदर्भातील निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलक तहसील कार्य़ालयात घोषणाबाजी करत पोहोचले. मात्र, पोलिसांनी तहसील कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अजित शिंदे, रमेश शिंदे, राजकिरण साठे, चेतन गोरे, रविकांत पाटील, जगदीश शिंदे, विलास शिंदे, शेषेराव सावंत अशी या ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची नावे आहेत.तहसील कार्यालयात सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

यवतमाळ - किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.किटकनाशकाची फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने ही विषबाधा झाल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगीतले. गेल्या वर्षी फवारणी दरम्यान विषबाधेमुळे २१ शेतमजुरांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर राज्य सरकारने फक्त मोठ मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि शेतमजुरांना फवार णी साठी कीट देणार असल्याचे आश्वासन कृषी विभागानं दिले होते.

नाशिक - निफाड येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने मुलीची हत्या केली. चाकू हल्ला करीत असताना मुलीचे वडील आपल्या मुलीला वाचविण्यासाठी मदतीला गेले असता या माथेफिरुने त्यांच्यावरही चाकू हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विद्या चंद्रकांत ढेंगळे हिच्यावर सुरज चव्हाण या माथेफिरुचे एकतर्फी प्रेम होते. प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने वडिलांसमोरच विद्यावर चाकू हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, मुलीवर हल्ला होत असल्याचे लक्षात येतात तिला वाचविण्यासाठी चंद्रकांत ढेंगळे धावले. यावेळी या माथेफीरुने त्यांच्यावरही हल्ला केला. दरम्यान, चाकू हल्ल्यात विद्या हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी सुरज याला अटक केली आहे.

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथे ‘एक मराठा जातोय’ अशा आशयाचा मजकूर लिहून ३१ वर्षांच्या प्रमोद जयसिंग होरे पाटील या तरुणाने आत्महत्या केल्याने मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा चिघळले. सकाळी ९ ते दुपारी दीड वाजेपर्यंत औरंगाबाद-जालना रस्त्यावरची वाहतूक पूर्णत: ठप्प होती. दरम्यान, हिंगोलीमध्येही ५० वर्षांच्या व्यक्तीने गांधी चौकातील इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलने सुरू होती. प्रमोद होरे पाटील याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच आंदोलकांनी औरंगाबाद-जालना वाहतूक बंद करत रास्ता रोको केले. आंदोलन चिघळेल असे लक्षात येताच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि मृताच्या नातेवाइकास आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस पात्रतेनुसार सरकारी नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बीड - सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून नांदेड व बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.नांदेड जिल्ह्यातील माष्टी (ता. बिलोली) येथील लक्ष्मण जकोजी जाधव (३०) यांनी शेतातील झाडास गळफास घेऊस आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत कुरुळा (ता. कंधार) येथे रामदास उर्फ बाळू मारोती श्रीरामे यांनी नापिकीला कंटाळून आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील शेतकरी जालिंदर भगवान तोंडे (४५) यांनी कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतला. जालिंदर हे गाडवदरा शिवारामध्ये जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र ते घरी न परतल्याने शोध घेतला असता असता कडुलिंबाच्या झाडाला त्यांच्या मृतदेह लटकलेला आढळला.

नवी दिल्ली - १२ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या चिमुरडींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिफारस करणारं फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर झालं आहे. यामुळे लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांभोवती कायद्याचा फास आवळता येणे शक्य होणार आहे. कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र भावना उमटल्या होत्या. बलात्कारातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. यानंतर कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. यानंतर सध्याच्या फौजदारी गुन्हा कायद्यात दुरुस्ती करण्याचे ठरवण्यात आले होते. दरम्यान लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे.

नवी दिल्ली - जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे विधेयक आणणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. यवतमाळ येथे नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना अहीर यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मुले पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात नाथजोगी समाजाच्या ५ जणांची जमावाने हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांची भेट घेतली.

सिल्लोड - मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधीही पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांची संख्या आता ७ झाली आहे. राजीनामा देण्यासाठी आमदारांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणे अपेक्षित असते. मात्र हर्षवर्धन जाधव सोडून आणखी कोणत्याही आमदारांनी ते धाडस दाखवलेले नाही. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.


इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी हा पक्ष बहुमतापासून अद्यापि दूर आहे. इम्रान खान यांनी पाच जागांवर निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले आहेत. त्यामुळे त्यांना चार जागा सोडाव्या लागणार असल्याने त्यांच्या पक्षाच्या अडचणींमध्ये भरच पडणार आहे.इम्रान खान यांचा पक्ष बहुमतापासून दूर असल्याने १३७ हा जादूई आकडा गाठताना त्यांची दमछाक होत आहे. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाला ११५ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र इम्रान खान पाचही जागांवर निवडून आल्याने त्यांना चार जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे संख्याबळ १११ होणार आहे.बहुमतासाठी इम्रान खान यांचा पक्ष देशातील लहान पक्ष आणि अपक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘द न्यूज’ ने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान यांच्या पक्षाने पीएमएल-क्यू आणि बलुचिस्तान अवामी पार्टी यांच्यासोबत आघाडी केल्यास या आघाडीचे १२४ सदस्य होतात. एमक्यूएम, जीडीए आणि अपक्षांचा पािठबा मिळविल्यास ही संख्या १३७ पर्यंत जाऊ शकते. तूर्त बहुमताचा आकडा गाठताना पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या इम्रान खान यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलन व्यापक स्वरूप धारण करत असतानाच आंदोलनालाला हिंसक वळणही प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीपासून ते राजकीय आणि सरकारी आणि सामाजिक पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.ला बसला आहे. २० ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ३५३ एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक १३६ बसेस एकट्या सोलापूर जिल्ह्यात फोडण्यात आल्या. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे एसटीचे १ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले,तर आंदोलनामुळे रद्द कराव्या लागलेल्या फेऱ्यांमुळे २२ कोटी २ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. चाकणमध्ये आज (मंगळवार, ३१ जुलै) सकाळी तणावपूर्ण शांतता आहे. चाकणमध्ये जाणारी एसटी सेवा बंद आहे. सकाळपासून पीएमपीएमएलची बससेवाही ठप्प आहे.सोमवारी चाकणमध्ये १२ ते १५ बसेस फोडण्यात आल्या. चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आली.मुंबई - गोरेगावच्या मंडईवर होणाऱ्या नियोजित नाट्यगृहाला मृणालताई गोरेंचे नाव द्यावे ही मागणी राष्ट्र सेवा दल आणि गोरेगावकरांनी आज पुन्हा केली,त्याकडे दुर्लक्ष करून या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ३० जुलै २०१८ रोजी सोमवारी ११ वाजता ठेवण्यात आला होता त्याच कार्यक्रमात पालिका प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या मनमानीपणाचा विरोधात गोरेगाव सेवा दल सैनिकांनी निषेध करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला.गोरेगावची मंडई मा.मृणाल ताई गोरे यांच्या कार्यकाळात स्थापन झाली आहे. गोरेगाव मंडईच्या जागी होणाऱ्या नाट्यगृहाला गोरेगावच्या भुमीकन्या गोरेगावच्या साथी मृणालताई गोरे यांचे नाव दिले गेले पाहिजे.या मंडईच्या जागी नाट्यगृह होण्यासाठी प्रथम मागणी मृणालताई गोरे यांनी त्यांच्या काळात केली होती मात्र शिवसेनेच राज्य असलेल्या महापालिकने कधीच या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. मृणालताईचां निधनानंतर २०१३ मध्ये या नाट्यगृहाला गोरेगावातील राहणारे राष्ट्र सेवा दलाचे नेते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी महापालिकेला पत्र लिहून मृणालताई गोरे यांच्या नावाची मागणी केली होती तसेच रसिक गोरेगावकरांचा वतीने एक सह्यांची मोहीम चालवण्यात आली होती या विषयावर सर्वत्र फलक लावण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी सुध्दा मृणालताई गोरे यांच्या नावाची मागणी केली होती. मात्र मृणालताई गोरे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर आपली दिशाभूल होण्यासाठी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकने उड्डाणपूलला मृणालताई गोरे यांचे नाव देण्यात आले उड्डाण पुलला नाव देण्याची मागणी आम्ही कोणी केली नव्हती असे राष्ट्रदलाकडून सांगण्यात आले.मृणालताई जिथे राहत होत्या तेथेच नाट्यगृह होणार आहे त्यामुळे त्यांचेच नाव दिले गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच प्रभाकर पणशीकर हे गिरगावात रहात होते त्यांचे नाव गोरेगावच्या नाटगृहाला कशाला ? त्यामुळे गिरगाव साहित्य संघाच्या नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर हे नाव देण्यात यावे मृणालताई गोरे (पाणीवाली बाई) यांचे नाव गोरेगावातुन पुसण्यासाठी डाव आहे का? अशाहीप्रश्न उपथित केला गेला.ज्या महिलेने सामाजिक राजकीय तसेच सांस्कृतिक चळवळ ज्या परिसरातून उभी केली गोरेगाव हे नाव राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेल्या त्या महिलेचे नाव त्यांचा कर्मभूमीच्या भव्य नाट्यगृहाला द्यायला काय हरकत आहे जिथे हे नाट्यगृह उभे राहणार आहे तिथे बाजुला मृणालताईचे घर होते हा परिसर या देशातील सामाजिक व राजकीय वर्तुळातील महत्वाचे स्थान आहे याच परिसरातून अनेक महत्त्वाचे व ऐतिहासिक कामगिरी झाली आहेमृणाल ताई गोरे नाट्यगृह झाले पाहिजे या साठीशासकीय भूमिपूजन कार्यक्रम स्थळी आदित्य ठाकरे व सुभाष देसाई यांच्या समोर सेवा दल सैनिकांनी जोरदार निषेध व्यक्त केला परिसर दणाणून सोडला यावेळी अनेक सेवा दल सैनिक सहभागी होते. मुंबई - पुन्हा एकदा श्रेयवादावरून सेना भाजप आमने- सामने आल्याचे गोरेगावमधील नाट्यगृहाच्या भूमिपूजनावेळी दिसून आले. गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईच्या कामावरुन शिवसेना- भाजपात श्रेयवादाची लढाई जुंपली. गोरेगावची नवी सांस्कृतिक ओळख होणाऱ्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईचा भूमिपूजन सोहळा आज सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना व भाजपात पुन्हा कामाच्या श्रेयवादावरुन जुंपली असून जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.परिसरात अक्षरशः चेंगाचेंगरी झाली,तर कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे झेंडे हंडी लावून फडकविले. या भूमिपूजन सोहळ्याआधीच शनिवारी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भाजपाने राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या भाजपा आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले होते. यापूर्वी २२ डिसेंबर २०१६ रोजी राम मंदिर रेल्वे स्थानक लोकार्पण सोहळा व २९ मार्च २०१८ रोजी गोरेगाव ते सीएसटी हार्बर रेल्वे विस्तारीकरण उदघाटन सोहळा यावेळी सेना व भाजपात या कामांच्या श्रेयवादावरून जोरदार घोषणा व पोस्टारबाजी झाली होती.या नाट्यगृहात ८०० आसन,अत्याधुनिक व २१० गाळे विक्री असलेले टोपीवाला मंडई आणि ५३ सदनिका असलेली इमारत येथे भविष्यात साकारणार आहे. या कामासाठी पालिकेने १२२ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.नाट्यगृहाचे भूमिपूजन दोनदा केल्याने यावेळी गोरेगावकरांनी संताप व्यक्त केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


गोरेगाव नाट्यगृह भूमिपूजन कार्यक्रमाला जोरदार विरोध..... 

गोरेगावच्या मंडईवर होणाऱ्या नियोजित नाट्यगृहाला मृणालताई गोरेंचे नाव द्यावे ही मागणी राष्ट्र सेवा दल आणि गोरेगावकरांनी आज पुन्हा केली,त्याकडे दुर्लक्ष करून या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ३० जुलै २०१८ रोजी सोमवारी ११ वाजता ठेवण्यात आला होता त्याच कार्यक्रमात पालिका प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या मनमानीपणाचा विरोधात गोरेगाव सेवा दल सैनिकांनी निषेध करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला.गोरेगावची मंडई मा.मृणाल ताई गोरे यांच्या कार्यकाळात स्थापन झाली आहे. गोरेगाव मंडईच्या जागी होणाऱ्या नाट्यगृहाला गोरेगावच्या भुमीकन्या गोरेगावच्या साथी मृणालताई गोरे यांचे नाव दिले गेले पाहिजे.या मंडईच्या जागी नाट्यगृह होण्यासाठी प्रथम मागणी मृणालताई गोरे यांनी त्यांच्या काळात केली होती मात्र शिवसेनेच राज्य असलेल्या महापालिकने कधीच या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. मृणालताईचां निधनानंतर २०१३ मध्ये या नाट्यगृहाला गोरेगावातील राहणारे राष्ट्र सेवा दलाचे नेते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी महापालिकेला पत्र लिहून मृणालताई गोरे यांच्या नावाची मागणी केली होती तसेच रसिक गोरेगावकरांचा वतीने एक सह्यांची मोहीम चालवण्यात आली होती या विषयावर सर्वत्र फलक लावण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी सुध्दा मृणालताई गोरे यांच्या नावाची मागणी केली होती. मात्र मृणालताई गोरे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर आपली दिशाभूल होण्यासाठी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकने उड्डाणपूलला मृणालताई गोरे यांचे नाव देण्यात आले उड्डाण पुलला नाव देण्याची मागणी आम्ही कोणी केली नव्हती असे राष्ट्रदलाकडून सांगण्यात आले.मृणालताई जिथे राहत होत्या तेथेच नाट्यगृह होणार आहे त्यामुळे त्यांचेच नाव दिले गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच प्रभाकर पणशीकर हे गिरगावात रहात होते त्यांचे नाव गोरेगावच्या नाटगृहाला कशाला ? त्यामुळे गिरगाव साहित्य संघाच्या नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर हे नाव देण्यात यावे मृणालताई गोरे (पाणीवाली बाई) यांचे नाव गोरेगावातुन पुसण्यासाठी डाव आहे का? अशाहीप्रश्न उपथित केला गेला.ज्या महिलेने सामाजिक राजकीय तसेच सांस्कृतिक चळवळ ज्या परिसरातून उभी केली गोरेगाव हे नाव राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेल्या त्या महिलेचे नाव त्यांचा कर्मभूमीच्या भव्य नाट्यगृहाला द्यायला काय हरकत आहे जिथे हे नाट्यगृह उभे राहणार आहे तिथे बाजुला मृणालताईचे घर होते हा परिसर या देशातील सामाजिक व राजकीय वर्तुळातील महत्वाचे स्थान आहे याच परिसरातून अनेक महत्त्वाचे व ऐतिहासिक कामगिरी झाली आहेमृणाल ताई गोरे नाट्यगृह झाले पाहिजे या साठीशासकीय भूमिपूजन कार्यक्रम स्थळी आदित्य ठाकरे व सुभाष देसाई यांच्या समोर सेवा दल सैनिकांनी जोरदार निषेध व्यक्त केला परिसर दणाणून सोडला यावेळी अनेक सेवा दल सैनिक सहभागी होते. 

चेन्नई - तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करूणानिधी यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. रक्तदाब खालावल्याने शनिवारी त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यांना मुत्रपींडाचा त्रासही होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.के.स्टॅलिन यांना फोन करून करूणानिधींच्या प्रकृतींच्या तब्येतीची विचारपूस केली. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. वय जास्त झाल्याने औषधोपचारही फारसा प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांच्या चिंता वाढल्या आहेत. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही हॉस्पिटलमध्ये जावून करूणानिधींच्या प्रकृतीची विचारपूस केली.चेन्नईत पावसाची रिपरिप असूनही डीएमकेच्या मुख्यालयाबाहेर आणि कावेरी हॉस्पिटलसमोर डीएमकेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.

नवी दिल्ली - आधार क्रमांक सार्वजनिक करणे किती सुरक्षित आहे यावरुन देशात नव्याने वाद सुरू झालाआहे. एक दिवसापूर्वीच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी आधार क्रमांक सार्वजनिक केला आणि यामुळे गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा केला होता. आपल्याला यामुळे कोणतीही हानी होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असे चँलेंजच शर्मा यांनी नेटिझन्सना दिले होते. त्यानंतर अनेक हॅकर्सनी शर्मा यांच्या गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा केला. इलियट अँडरसन या फ्रान्सच्या सुरक्षा तज्ज्ञाने तर शर्मा यांची बरीच गोपनीय माहिती उघड केली, आणि आता एथिकल हॅकर्स या ग्रुपने शर्मा यांचे बॅंक डिटेल्स मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांनी शर्मा यांना पेटीएम आणि भिम अॅपद्वारे १ रुपया पाठवल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांची हत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दहशतवाद्यांकडून वारंवार जवान आणि पोलिसांना टार्गेट करण्यात येत आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारीदेखील (२९जुलै) सीआरपीएफचे जवान नसीर अहमद राठेर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात काल दिवसभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर आज हा बंद ठेवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात ही बंदची हाक देण्यात आली आहे.सोलापूर बंदला धनगर, मुस्लिम, दलित, लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिला. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी पेठ व्यापारी असोशिएशननेही पाठिंबा जाहीर केला. यावेळी दिवसभर जागरण गोंधळ करण्यात आले. तसेच सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची बैठकही काल घेण्यात आली. दरम्यान आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे हिंसक वळण देवू नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाकार्ता - इंडोनेशियात शक्तिशाली भूकंपात १४ ठार तर १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इंडोनेशियाच्या लोंबोक या पर्यटन बेटावर हा भूकंप झाला. भूकंपात एक हजार घरे कोसळली असून बाली येथेही हा धक्का जाणवला. तेथे मात्र कुठलेही नुकसान झाले नाही. अमेरिकी भूगर्भशास्त्रीय संस्थेने म्हटले आहे की, ६.४ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपाची खोली ७ किलोमीटर होती.इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्व लोंबोक जिल्ह्य़ास धक्का बसला असून त्यात १० जण मरण पावले त्यात मलेशियन पर्यटकांचा समावेश आहे. यात मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अजून माहिती गोळा करण्यात येत आहे. एकूण १६२ जण जखमी झाले असून त्यातील ६७ जणांना गंभीर दुखापतीने रुग्णालयात दाखल केले आहे. प्रवक्ता म्हणाला की, मृतांची संख्या आधी कमी होती पण आता ती वाढत चालली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले. भूकंपामुळे माउंट रिंजानी येथे मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.

मुंबई - मराठा आरक्षण आणि त्यासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या स्वतंत्र बैठका पार पडल्यानंतर दोन्ही पक्षांची एकत्र बैठकही होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा. त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिक - अलीकडच्या काळात सोशल मीडियावर प्रत्येकजण सक्रिय सहभागी होऊ लागलाय. मात्र, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आपला आर्थिक हित साधत आहेत. एक आंतरराष्ट्रीय टोळी भारतात सक्रिय होऊ लागली आहे. बीटकॉईन स्वरुपात पैसे जमा करा नाहीतर, अश्लील व्हिडिओ तुमच्या फेसबूकवर उपलोड करू, अशी धमकी ते देत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला. अशा प्रकारच्या तीन घटना सायबर तज्ज्ञांपर्यन्त पोहचल्या आहेत. काहीजण भीतीपोटी आणि बदनामी होईल म्हणून माहिती देत नाहीत. अलीकडे अशा प्रकारचे मेसेजेस आणि संपर्क करणारी टोळी सक्रिय होत असल्याने आपल्याकडील असलेली सुरक्षितता जपायला हवी. त्यासाठी सायबर तज्ज्ञांचा सल्ला असा की, सर्व मेसेज आणि संवाद डिलीट करू नये आणि असा प्रकार घडल्यास सायबर सेलशी संवाद साधावा.

पुणे - राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी ५ ऑगस्टला पुण्यात कृती समितीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ५ ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. यासाठी राज्यभर मराठा मोर्चाकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.मुंबई - सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) मध्ये इन्स्पेक्टर पदाची भरती सुरू आहे. यासाठी इच्छूक उमेदवार ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही भरती कॉंन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. रिटायर्ट ऑफिसरदेखील याचा हिस्सा बनू शकतात. सीबीआय हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पटना आणि शोध पथकाच्यया झोनसाठी ही भरती होत आहे. १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. सीबीआयने या पदासाठी ४० हजार प्रतिमहा पगार ठरवलाय तर वयोमर्यादा देखील सीबीआयच्या नियमानुसार असणार आहे. सीबीआयच्या www.cbi.gov.in या वेबसाईटवरही उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात.

मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी किंवा त्याच्याशी समकक्ष आणि १० वर्षांचा अनुभव

पदांचे विवरण 

CBI, ACB, नागपुर, अमरावती: ०१
CBI, ACB, जम्मू: ०१
CBI, ACB, चेन्नई:०३
CBI, ACB, हैदराबाद: ०१
CBI, ACB, विशाखापट्टणम: ०३
CBI, ACB, बंगळुरू, धारवाड़: ०३
CBI, ACB, भुवनेश्वर: ०४
CBI, ACB, पुणे:०१
CBI, ACB, गुवाहाटी: ०२
CBI, ACB, पटना: ०३
CBI, ACB, रांची: ०२
CBI, ACB, धनबाद: ०४

पोलादपूर - पिकनिकसाठी जाणार मिनी बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला. बसमध्ये चालकासह ३४ जण होते. त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. एकाने बसमधून उडी घेतल्याने तो सुदैवाने बचावल्याची आहे. सर्व कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि क्लेरिकल स्टाफ असल्याची माहिती मिळाली आहे.संदीप सुर्वे, प्रफुल्ल अहिरे, संदीप भोसले, संदीप झगडे, प्रशांत भांबीड, सुयश बाळ, सुनील कदम अशी मृतांचे नावे हाती आली आहेत. दापोलीहून महाबळेश्वरला ही बस निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. पुण्याचे NDRF चे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. या भीषण अपघातात सुदैवाने एकमेवर बचावलेल्या तरुणाचे पाव प्रताप सावंत असे आहे.

चेन्नई - द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांची प्रकृती गुरुवारी बिघडली. करुणानिधी ९४ वर्षांचे आहेत, त्यांना युरिन इन्फेक्शन झाले आहे. त्यांच्यावर कावेरी रुग्णालयाच्याडॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. करुणानिधी यांचे सुपुत्र स्टालिन यांनी माहिती दिली की, त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. इन्फेक्शनही कमी झाले आहे.पंतप्रधानांनी ट्विट केले की, ''करुणानिधी यांचे सुपुत्र स्टालिन आणि कन्या कनिमोझी यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्याकडून करुणानिधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली आणि मदतीबाबत विचारणाही केली. ईश्वराकडे ते ठीक होण्याची कामना करतो.

मुंबई - राज्यात मराठा आंदोलन अधिक तीव्र झाल्याने अखेर केंद्रातील मोदी सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे. मराठा आरक्षण देता येईल का, याचा विचार सुरु आहे,दिल्लीतून हालचाली सुरु झाल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणाबाबत आशा निर्माण झाली आहे.देशात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत असून त्यासाठी अनेक समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षण, गुजरातमध्ये पटेल आरक्षण, राजस्थानसह अन्य काही राज्यांत सुरु असलेल्या जाट, गुर्जर आंदोलनांची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना घटनेच्या चौकटीत राहून आरक्षण देता येईल का? याची चाचपणी केंद्र सरकारने सुरु केली आहे.म्हणून केंद्र सरकारने हा प्रस्ताव मागितल्याची सूत्रांची माहिती आहे

मुंबई - 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा अखेर लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. तिचे लग्न ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, प्रियंकाने गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त हाती आले आहे. लंडन येथे प्रियंकाने तिचा मित्र निक जोनासबरोबर साखरपुडा केल्याचे अमेरिकन मीडियाने दिले. या दोघांनी आठवडाभरापूर्वीच लंडन गुपचूप साखरपुडा उरकून घेतला. प्रियंकाच्या वाढदिवशीच साखरपुडा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.प्रियंका ही सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, ती पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रीय होण्याचे वृत आले होते. प्रियंका दिग्दर्शक अली अब्बास जाफर याच्या 'भारत' सिनेमातून ती कमबॅक करण्याच्या तयारीत होती. मात्र, तिने तडकाफडकी हा सिनेमा सोडून दिला. आपण एका महत्वाच्या कामासाठी हा सिनेमा करणार नाही, असे सांगत तिने 'भारत' सिनेमाला नकार दिला होता. 

मुंबई - काही महिन्‍यांपूर्वीच बीडमधील कॉन्‍स्‍टेबल ललिता साळवे यांनी यशस्‍वीरीत्‍या लिंगपरिवर्तन ऑपरेशन केले होते. यानंतर आसाम येथील रीता देवी यांचेदेखील लिंगपरिवर्तन ऑपरेशन होणार आहे. यासाठी त्‍यांना मुंबईतील जॉर्ज हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट करण्‍यात आले आहे. त्‍यांना एका आठवड्यापर्यंत हॉस्पिटलमध्‍ये ठेवले जाणार आहे.हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्‍यात आलेल्‍या माहितीनूसार, ललिताला ज्‍या हार्मोन्‍स समस्‍या होत्‍या, त्‍याच समस्‍या रीताच्‍याही आहेत. रीताच्‍या काही चाचण्‍यानंतर त्‍याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत हॉस्पिटलचे सुपरिटेंडेंट डॉ. मधूकर गायकवाड यांनी सांगितले की,'रीताच्‍या गुप्‍तांगाचा विकास झालेला नाही. त्‍यामुळे तिच्‍या भावना पुरूषासारख्या आहेत. त्‍यामुळे रीताची प्रथम हार्मोनल टेस्‍ट केली जाईल. त्‍यामध्‍ये रीताला जेंडर डिस्‍फोरिया डिसऑर्डर आहे, असे आढळून आले, तर तिच्‍यावर सेक्‍स रीअसाइनमेंट सर्जरी केली जाईल.


नवी दिल्ली - पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय पाळीवर नाही, तर राज्य स्तरावरच विविध पक्षांशी काँग्रेस समझोते करणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैटकीत यावर चर्चा झाल्यानंतर आघाड्यांसाठी जी समिती स्थापन केली आहे, राष्ट्रीय पातळीवर समझोते करणे पक्षाच्या हिताचे नाही, असे काँग्रेस नेतृत्वाला सांगितले आहे.निवडणुकांचे जे निकाल येतील, त्याआधारेच काँग्रेसप्रणित आघाडीचा नेता निश्चित करावा, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या नेतृत्वाबाबत बसपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये, जागांबाबत मायवती यांनी केलेले विधान यानंतर राहुल गांधी यांनी अद्याप महाआघाडीच न झाल्याने तिचे नेतृत्व कोण करेल, याची चर्चा करण्यात अर्थ नाही, प्रादेशिक पक्षालाही नेतृत्व मिळू शकते, असेही या नेत्याने स्पष्ट केले.दरम्यान,आघाडीचे नेतृत्व आपल्या नेत्याला मिळावे, असे मत व्यक्त करायला प्रादेशिक पक्षांनी सुरुवात केली आहे. 

मुंबई - कुख्यात गँगस्‍टर अबू सालेमने 'संजू' चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बॉलीवुड स्‍टार संजय दत्‍तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'संजू'ला बॉक्स ऑफिसवर प्रचंड रिपॉन्‍स मिळाला आहे. चित्रपटाने ३०० कोटी रुपयांहून जास्त कमाई केली आहे.मुंबई बॉम्ब हल्ल्यांतील आरोपी अबू सालेमचे म्हणणे आहे की, 'संजू' चित्रपटात त्याचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्याच्याबाबत चुकीची माहिती चित्रपटात देण्यात आली आहे. यासाठी चित्रपट निर्मात्यांनी त्याची माफी मागितली पाहिजे. नोटिशीत म्हटले आहे की, जर १५ दिवसांत माफी मागितली नाही, तर चित्रपट निर्मात्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला जाईल. अबू सालेमला २००५ मध्ये पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले. सालेम आणि मोनिका बेदीला बनावट व्हिसामुळे पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती.उत्‍तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील सरायमीर गावात एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात अबूचा जन्म झाला होता. अबू सालेमचा जन्म १९६८ मध्ये झाला होता. त्याचे वडील वकील होते. बालपणीच एका रस्ते अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याने मॅकेनिकचे काम सुरू केले. तथापि, दरम्यान बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने घर सोडून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला.

नवी मुंबई - सकल मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर कोपरखैरणेत बुधवारी सायंकाळी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यानंतर हा तणाव मध्यरात्रीपर्यंत कायम होता. शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. याच वेळी आगरी-कोळी युथचे संदीप पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या वेळी हॉटेलांवर दगडफेक करून प्रचंड नासधूस करण्यात आली.कोपरखैरणे सेक्टर-१९ मध्ये जमावाकडून सुमारे दीडशेच्या आसपास चारचाकी वाहनांची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तणाव कायम होता. गुरुवारी पाच वाजल्यानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. रात्री येथील दुकाने उघडण्यात आली. या परिसरातील बहुतांश शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

तामिळनाडू - द्रमुक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आले असून तिथेच त्यांच्यावर सर्व उपचार केले जात आहेत, अशी माहिती द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी दिली. ‘द्रमुक’चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती किंचितशी खालावली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले होते. त्यानंतर लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही स्टॅलिन यांनी केले.करुणानिधी हे ९६ वर्षाचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. करुणानिधी हे मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कावेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय बुलेटिनमधून देण्यात आली आहे.

नाशिक - शिवसेनेची पदाधिकारी असलेल्या लक्ष्मी ताठे नावाच्या महिला गांजा तस्कराला नाशिक पोलिसांनी गजाआड केले आहे. लक्ष्मी ताठे ही शिवसेनेची पदाधिकारी आहे. शहरात गांजा नेटवर्कची प्रमुख म्हणून लक्ष्मी ताठे ओळखली जात होती. देशभरात सुरू असलेल्या गांजा तस्करीत ती महत्त्वाची भूमिका निभावत होती.पोलीस कारवाईची कुणकुण लागल्यावर ती पंधरवड्यापासून फरार होती. एक दिवसापेक्षा अधिक काळ ती कुठेही मुक्काम करत नव्हती. पोलीस सतत तिच्या मागावर होते. अखेर नाशिक पोलिसांनी लक्ष्मी ताठेला बेड्या ठोकण्यात यश मिळाले.

औरंगाबद - औरंगाबादेतील बेगमपुरा भागात जुनाट इमारत आज पहाटे कोसळली. पहाटे चार वाजताची घटना आहे. इमारत जुनी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ती रिकामी होती. त्यामुळे या एवढ्या मोठ्या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. थत्ते हौदच्या शेजारी ही इमारत होती. ही इमारत फार जुनी होती त्यात ती पावसाच्या पाण्यामुळे जीर्ण झाली होती. त्यामुळे तिला पाडण्यात येणार होते पण तिला पाडण्याआधीच ही इमारत कोसळली आहे. आता अग्निशमन दलाकडून ढिगारे उचलण्याचे काम सुरू आहे.मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दगडफेकीत रोहन तोडकर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. जे जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला. कोपरखैरणेतही हिंसाचार करत दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये रोहन तोडकर जखमी झाला.उपचारासाठी रोहन तोडकरला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, मात्र गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा करणाऱ्या ५६ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही परप्रांतीय असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - केंद्राच्या 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार आहेत. 'राष्ट्रीय वैद्यक परिषद' बरखास्त करुन 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' स्थापण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. संपात साधारण तीन लाख डॉक्टर्स सहभागी होतील. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या विधेयकानुसार वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण आणि वैद्याकीय संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी चार स्वायत्त मंडळं स्थापन करण्यात येणार आहेत. डॉक्टर, वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन आणि डॉक्टरांची नोंदणी, त्यांचे नुतनीकरण ही काम त्याअंतर्गत पार पडतील. या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य शासननियुक्त असतील.तर इतर पाच सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येतील,तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.

सोलापूर - सोलापुरातील अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ देवस्थान मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून स्वामीभक्तांची दर्शनासाठी गर्दी झालीय. पहाटे पाचच्या काकड आरतीने झालीय. स्वामी समर्थांच्या जयघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमून गेलीय. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील भक्त अक्कलकोट नगरीत दाखल झालेत. आज पालखी प्रदक्षिणा दुपारी साडे चार वाजता काढण्यात येणार आहे.

मुंबई - मराठा आरक्षणबाबत थेट मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचा विषय छेडणाऱ्या सत्तेतल्या शिवसेनेला बाजूला ठेवत पक्षाची स्वतंत्र बैठक घेत भाजपाने आरक्षण मुद्यावरची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यासह भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत विनोद तावडे यांच्या निवासस्थानी तीन तासांपेक्षा जास्त वेळ मॅरेथॉन बैठक घेत चर्चा केली.

अलिबाग - इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या आंतराष्‍ट्रीय सेक्स रॅकेटचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच परदेशी मुलींसह अन्य नऊ जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. अलिबागमधल्या रेडीसन ब्लू या पंचतारांकीत हॉटेलवर छापा टाकून तीन परदेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर मुंबईतल्या विविध भागातून आणखी सहा जणांना तब्यात घेतले आहे. यात दोन परदेशी मुली आणि एका भारतीय महिलेचा समावेश आहे.या सर्व महिला दक्षिण अमेरीकेतल्या कोलंबियातून भारतात पर्यटनासाठी आल्या होत्या. दरम्यान या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सर्वांना अलिबागच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पाचही परदेशी मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - आधी लोकसभेने हे विधेयक मंजूर केले होते. या नव्या कायद्यानुसार विदेशा पळून गेले तरी भारतीय कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर देश विदेशातली संपत्ती जप्त करण्याचे अधिकारही तपास यंत्रणांना देण्यात आले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात अनेक पळवाटा होत्या. कर्जबुडव्या व्यक्ती दर विदेशात पळून गेला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्याची संपत्ती जप्त करणे, चौकशी करणे अशा अनेक अडचणी होत्या मात्र आता या पळवाटा बंद झाल्याने नीरव मोदी आणि विजय मल्ल्या सारख्या धेंडांना पळून जावून अलिशान जीवन जगणे आता शक्य होणार नाही.

नवी दिल्ली - गुवाहटीहून दिल्लीत आलेल्या एअर एशियाच्या विमानातील टॉयलेटमध्ये बुधवारी सहा महिन्यांचे मृत अर्भक सापडले. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. विमानातील चालक दलाच्या टीमने गोंधळ घातल्यानंतर १९ वर्षांच्या तायक्वांडो खेळाडुने आपण याला जन्म दिल्याचे सांगितले. विमानातील शौचालयाच नवजात भ्रुण सापडल्याचे एअर एशियातर्फे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये एका टुर्नामेंटला ही महिला खेळाडु निघाली होती. तिच्यासोबत तिचे प्रशिक्षकदेखील होते.चालक दल नियमित विमानाची पाहणी करत असते. त्या दरम्यान त्यांना टॉयलेट पेपरमध्ये गुंडाळलेले मृत अर्भक सापडले. उड्डाण क्र. ५७८४ हे इंफाल येथून निघाले होते. विमान साधारण साडेतीन वाजता इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी ३ टर्मिनल्सवर उतरले होते.

नवी दिल्ली - आता लाच स्वीकारणाऱ्याबरोबरच देणाराही आरोपी मानला जाईल आणि त्यालाही शिक्षा भोगावी लागेल, अशा प्रकारची तरतूद असलेले भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) २०१८ विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. यात लाच देणाऱ्यास तुरुंगवासाची शिक्षा अथवा दंड अथवा दोन्ही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.लाच स्वीकारणाऱ्यास कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुरुस्ती विधेयकात भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे दोन वर्षांत निकाली काढण्याची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभेने मंगळवारी या विधेयकास आवाजी मतदानाने मंजुरी दिली. राज्यसभेने गेल्याच आठवड्यात या विधेयकास मंजुरी दिली होती. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी लोकसभेत चर्चेस मंजुरी देताना हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे म्हटले.


मुंबई - आज कारगील विजयी दिवस आहे. १९ वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध हे युद्ध झाले होते. ८ मे १९९९ मध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस युद्ध चालले होते. २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून कारगिलला मुक्त करण्यात आले. पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. शत्रुविरोधात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहिम सुरु केली होती. या युद्धात ५०० पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर तेराशे जवान जखमी झाले होते. देश आज त्या शहिद जवानांची आठवण काढत आहे. कारगिलमध्ये शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


सीरिया - सीरियातील दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२० जण ठार झाले. सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असून या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.दक्षिण सीरियातील सुवैदा या भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी सुवैदा आणि लगतच्या गावांमध्ये ठिकठिकाणी आत्मघाती स्फोट घडवले. यातील एका ठिकाणी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दोघेही हल्ला करण्याच्या तयारीत असताना सुरक्षा दलांनी त्यांना कंठस्नान घातले.‘दहशतवाद्यांनी गावात घुसून सामूहिक हत्याच केल्या. त्यांनी घरात घुसून निष्पाप लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, असे स्थानिक पत्रकारांनी सांगितले. मृतांमधील २२० पैकी १२७ जण हे नागरिक आहेत. सुवैदा भागातील हा आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

पुणे - 'सकल मराठा क्रांती मोर्चा'ने बुधवारी दुपारी 'मुंबई बंद' आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतु, त्यानंतरही अनेक भागांत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचे हिंसक आंदोलन सुरूच होते. आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा झाल्यानंतरही कळंबोली आणि कोपरखैरणे येथील मराठा आंदोलक काही केल्या माघार घ्यायला तयार नव्हते.या आंदोलना दरम्यान अनेक हिंसक घटनाही घडल्या. आंदोलनात राजकीय अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले, असा आरोपह समन्वयक समितीचे सदस्य वीरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. यानंतर या आंदोलनाला एका चेहऱ्याची आवश्यकता असल्याची गरज 'संभाजी ब्रिगेड'ने व्यक्त केली. मराठा समाजाच्या आरक्षणासहित विविध मागण्यांबाबत राजकीय नेत्यांवर विश्‍वास राहिला नसल्याने आता खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजी राजे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या या मागणीवर उदयनराजे आणि संभाजीराजे या दोघांनीही विचार करावा त्यांचे नेतृत्व मिळाले तर आंदोलनाला नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी म्हटलेआहे. या आंदोलनात राज्य सरकारच्या आदेशावरून जवळपास ५००० कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत. आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकार अधिकारांचा गैरवापर करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लातूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता भाजपाकडून निवडून आलेल्या जिल्हा परिषद समितीच्या एका सदस्यानं राजीनामा दिला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीचे भाजप सदस्य जनार्दन रतन कास्ते यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. लातूर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य पदाचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरच हा राजीनामा आपण दिल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.जनार्दन कास्ते हे गेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून औसा तालुक्यातील लोदगा गणातून ते निवडून आले होते. इतरही मराठा लोकप्रतिनिधींनीही मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याचे आवाहनही जनार्दन कास्ते यांनी केले आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget