November 2018


नवी दिल्ली - नाणारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बुधवारी विधिमंडळात दिली होती. या घोषणेला २४ तास उलटत नाहीत तोच, या प्रकल्पासाठी काही आठवड्यातच आम्हाला राज्य सरकारकडून जमीन मिळणार आहे, असे यूएईच्या राजदूतांनी नवी दिल्लीत गुरुवारी स्पष्ट केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वक्तव्यामुळे राज्यात नाणार प्रकल्पावरुन सुरु असलेला वाद पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.‘भारत-यूएई-सौदी अरेबिया यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच जमीन मिळेल’, असे यूएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. नाणार प्रकल्पात केंद्र सरकारच्या तिन्ही तेल कंपन्या, सौदी अरेबियातील सौदी आरमॅको व यूएईतील अबु धाबी नॅशनल आॅइल कंपनी (अ‍ॅडनॉक) यांची संयुक्त गुंतवणूक असेल.


दंतेवाडा - छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आहे. तसेच, आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, दंतेवाडामधील किरंदुल पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या हिरोली डोकापारामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला. मात्र, पोलिसांना नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत कॅम्प उद्ध्वस्त केले आणि नक्षलवाद्यांना अटक केली. डीआरजी, सीआरपीएफ आणि किरंदुल पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. मुंबई - मराठा आरक्षणानंतर आता विधिमंडळात मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मुस्लीम समाजातील मागासवर्गींयांना आरक्षण देण्यास तयार आहे, असे स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी विधानसभेत दिले आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेश बोलवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली.


नवी दिल्ली - नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा 'मौद्रिक झटका' होता, असं पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागर अरविंद सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे. सुब्रह्मण्यम यांच्या 'ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी' या गुरुवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला. नोटाबंदी झाल्यानंतर सुब्रह्मण्यम यांनी जी प्रतिक्रिया दिली होती, त्याच्या बरोबर उलट मत त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. त्यावेळी आपण नोटाबंदीचे समर्थन केलेअसले, तरी अभ्यासाअंती नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा धक्काच असल्याच्या निष्कर्षाप्रती आल्याचे सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे.नोटबंदी म्हणजे कठोर पाऊल आणि मौद्रिक झटका असल्याचे सुब्रह्मण्यम यांनी म्हटले. ज्यामुळे अर्थव्यवस्था कोसळली आणि पुढचे सात तिनमाहीपर्यंत कोसळत राहीली.जी आत्ता ६.८ टक्क्यांवर येऊन ठेपली नोटबंदीपूर्वी अर्थव्यवस्थेचा दर ८ टक्क्यांवर पोहचला होता. मुंबई - विधीमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलेलं मराठा आरक्षणाचे विधेयक आज राज्यापालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी आरक्षणाबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. या आरक्षणाला कुणी आव्हान देऊ नये यासाठी सोमवारीच उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे. आज विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोट्या विरोधी पक्षांनीही पाठिंबा दर्शवला.नवी दिल्ली - दिल्लीत जमलेले हजारो शेतकरी आज संसदेवर धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणार आहे. सध्या हे शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये आहेत. दिल्लीत आंदोलनात आँध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून हजारो शेतकरी दाखल झाले आहेत.संसदेचं २१ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीनं राष्ट्रपतींकडे केली आहे. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, महाग शिक्षण आणि आरोग्यसेवांमुळं वाढलेला कर्जाचा बोजा, कर्जामुळं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते जलसंकट, महिला शेतकऱ्यांचे अधिकार, शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांचे प्रश्न, शेतीचे भविष्य अशा सात विषयांवर संसदेत प्रत्येकी तीन दिवस चर्चा व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात वृद्ध शेतकऱ्यांपासून ते त्यांची शाळकरी मुलंही सहभागी झालेली पाहायला मिळत आहेत.संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव अशी या शेतकऱ्याच्या प्रमुख मागणी आहे. या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी म्हटले की, 'आम्हाला शुक्रवारी संसद भवनाकडे जाऊ न दिल्यास आम्ही नग्न होऊन मार्च करू.' तामिळनाडूतील शेतकरी आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकरी साथीदारांच्या कवटी घेऊन आले आहेत. यातून शेतकऱ्यांमधील टोकाच्या भावनेचा अंदाज येऊ शकतो.गेल्या काही काळापासून शेती हा किफायतशीर व्यवसाय राहिला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये ही उद्विग्नता दिसत आहे. ३० नोव्हेंबरला किसान सभेच्या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात शेतकरी नेते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतील, तर दुसऱ्या सत्रात विविध संघटनांचे नेते शेतकऱ्यांना संबोधित करतील.
कर्नाटक - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारी अचानक काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवाकुमार यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिवाकुमार भाजपामध्ये प्रवेश करणार ? कर्नाटकात सत्ता बदल होणार का ? अशा विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. येडियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय.राघवेंद्रही या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत होता.शिवाकुमार यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट राजकीय सत्ता समीकरणांसंदर्भात नव्हती तर शिवामोगामध्ये प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बी.वाय.राघवेंद्र शिवामोगामधून खासदार आहे तर डी.के.शिवाकुमार कर्नाटक सरकारमध्ये जलसिंचन मंत्री आहेत.दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही राजकीय भेट असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवामोगामधील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असे येडियुरप्पा यांनी या बैठकीनंतर सांगितले.मुंबई - मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. त्यावर बोलताना, ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण आपली जबाबदारी पार पाडली आहे. परुंतु, काही राजकारणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच मराठा आरक्षणासाठी ४० जणांनी आपला जीव दिला, त्यांचे बलिदान लक्षात ठेवायचे असते. त्यामुळे आज मी फेटा बांधला नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवारांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.मराठा आरक्षणासाठी आम्ही ८ दिवसांपासून तगादा लावला होता. त्यामुळेच, आम्ही ८ दिवस सभागृह चालू दिले नाही, हेही तुम्हाला माहिती आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर झाले. मात्र, २८८ आमदारांनी एकमताने हे विधेयक पास केले आहे. त्यामुळेच, आरक्षणाची मागणी पूर्णत्वाला गेली, असे म्हणत या आरक्षणाचा श्रेय सर्वांचच असल्याचे अजित पवार यांनी आझाद मैदानात जाऊन तेथील उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर बोलताना म्हटले.

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे काढले होते. त्यांच्या आंदोलनाला आणि संघर्षाला आज यश आले असून आज विधीमंडळात एक मताने मराठा आरक्षण कायदा मंजूर झाला. यासाठी मी मराठा समाजाचे अभिनंदन करतो. काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले, याचा आपल्याला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.विधानभवनात पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना सरकारने मागासवर्ग आयोगाचे गठन करणे, न्यायालयात कागदपत्रे सादर करणे अशा प्रक्रियांमध्ये वेळकाढूपणा केला. त्यामुळे राज्यातील समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला. जगाच्या इतिहासात नोंद होईल असे लाखोंचे मोर्चे निघाले तरीही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ४० तरूणांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले.मराठा समाजातील असंतोषाचा भडका उडाल्यावर व त्याचे चटके बसायला लागल्यावर सरकारने मराठा आरक्षण पुर्नस्थापित करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आणि आज मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मांडले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा काँग्रेस आघाडी सरकारचा निर्णय आज पूर्णत्वास गेला, याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. त्यामुळे मराठा समाजाने नक्कीच जल्लोष केला पाहिजे. आज जेवढा आनंद मराठा समाजाला झाला आहे, तेवढाच आनंद काँग्रेसला आहे. कारण काँग्रेस आघाडी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर आज विधीमंडळात शिक्कामोर्तब झाले आहे.

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळात एकमताने पारित झाले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया देताना ''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे,'' असे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अहवाल राणे समितीने सादर केला होता, हा अहवाल उच्च न्यायालयाने रद्द केला नव्हता. तर राज्य सरकारने उच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती, असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. ''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे'', असे सांगत फडणवीस सरकारने जाहीर केलेले आणि आज पारित झालेले आरक्षण हे राणे समितीने दिलेल्या अहवालासारखेच आहे, असे सांगण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, नारायण राणे यांनीही मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचा दावा केला आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात गुरुवारी सादर करण्यात आले. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. दुपारी यासंदर्भात कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.कृती अहवाल सादर केल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. धनगर आरक्षणासंदर्भातही उपसमिती नेमली जाईल आणि त्यानंतर एटीआर सादर करुन धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सकाळी विधानसभेत सांगितले. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे या कृती अहवालात म्हटले आहे. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही हे विधेयक चर्चेविना मंजूर झाले.


सोलापूर - खोटी कागदपत्रे सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचे अनुदान लाटल्याप्रकरणी लोकमंगलचे सर्वेसर्वा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र व लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्हचे अध्यक्ष रोहन देशमुख, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांच्यासह नऊ संचालकांवर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले आणि भीमाशंकर सिद्राम नरसगोंडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. सोलापूरचे दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग दादू येडगे यांनी या बाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे.कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे अवर सचिव राजेश गोविल यांच्या सहीने राज्याचे दुग्ध विकास आयुक्त यांना एक पत्र देऊन सोलापूरचे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांनी या प्रकरणी तातडीने स्थानिक पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्या नुसार सहकार मंत्र्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासह ९ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांनी सरकारची सुमारे १२ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.मुंबई - मुंबईमध्ये रात्री वीज चोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रात्रीच्या वेळी वीज चोरी करणाऱ्यांवर छापे टापे टाकण्यात आले. अँटॉप हिलमध्ये वीज चोरीचा हा प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी वीज चोरी करताना छापे टाकले आणि रंगे हात १२ लोकांना आणि काही बेस्ट कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यात वीज चोर माफियादेखील आहे ज्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.अँटॉप हिल परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी सापळा रचून छापेमारी केली. पोलिसांना पाहताच घटनास्थळी धावपळ झाली पण यात पोलिसांनी १२ लोकांनी ताब्यात घेतलं आहे.मुंबईच्या या एकाच परिसरातून तब्बल ६८ वीज चोरीला गेल्याचे गुन्हे रजिस्टर करण्यात आले आहेत. शिवाय मुंबईतील पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी करीत असल्याचे दिसते परंतु अद्यापही या ठिकाणी कारवाई झालेली नसल्याने वीज चोर सध्यातरी मोकाटच आहेत.


मुंबई - आज सकाळी साडे दहाच्या बैठकीनंतर दुपारी १२ वाजता विधीमंडळात आरक्षणाचा एटीआर आणि विधेयक मांडण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे. १२ वाजता कृती अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार आहे. या अहवालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. काही वेळातच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा करायची की नाही याबाबत विरोधकांची बैठक सुरू झाली आहे. एटीआर ठेवल्यानंतर काय भूमिका घ्यायची याबाबतही चर्चा होणार आहे.

मुंबई - सराकरने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण सरकारने देवू केल आहे परंतु ५२ टक्के ओबीसींना आजही पुरेसे आरक्षण दिले गेलेले नाही, त्यामुळे सरकारला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून गुरुवार 'साक्रोश धरणे आंदोलन' करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सामील होणार आहेत. तसेच यावेळी यामध्ये युवावर्गही मोठ्या संख्येने उतरणार आहे. २७ टक्के आरक्षण हे आता एकोणीस टक्क्यांवर आणले आहे, त्यात जातनिहाय जनगणना न करता मराठा समाजाला एकतर्फी सोळा टक्के आरक्षण देणे ही ओबीसी वर्गाची फसवणूक असल्याची भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे. ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून त्यानंतर आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे.

मुंबई - मुंबईतील उपनगरीय लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल्या आहेत. यासाठी येत्या दोन आठवड्यात योजनाबद्ध आराखडा सादर करण्याचे आदेशही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोयल यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोयल यांची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांनी हे आदेश दिले. या निर्णयामुळे मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेवरील १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे. पण गर्दीच्या वेळी सुमारे साडेपाच हजार प्रवासी एका गाडीतून प्रवास करतात. म्हणजे गर्दीच्या वेळी डब्यातील फक्त एका स्क्वेअर मीटरमध्ये तब्बल १६ जण प्रवास करतात, हे रेल्वेच्या निदर्शनास आलं आहे. तर १५ डब्यांच्या गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता ही ४, २०० इतकी आहे. पण या गाड्यांमधून सुमारे ७ हजार प्रवासी गर्दीच्या वेळी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेकडे सध्या फक्त ५ लोकल गाड्या १५ डब्यांच्या आहेत. या १५ डब्यांच्या गाड्यांच्या दिवसातू ५४ फेऱ्या होतात. तर मध्य रेल्वेकडे फक्त एकच लोकल १५ डब्यांची आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या एक एसली लोकल धावतेय. दुसरी एसी लोकल पुढच्या महिन्यात दाखल होणार आहे. तर मध्य रेल्वेवर पुढच्या वर्षी जूनमध्ये एसी लोकल धावेल. मुंबईत धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे लोकल गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. मध्य आणि पश्मिच रेल्वेच्या जलद मार्गावर या १५ डब्यांच्या लोकल सुरुवातीला धावतील. यानंतर धीम्या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.


अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरचा माजी उप-महापौर श्रीपाद छिंदमविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे. छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. याप्रकरणी छिंदमला अटकदेखील करण्यात आली होती. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या उद्गारामुळे बुधवारी विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही सदस्य डायसवर चढून त्यांनी संताप व्यक्त केला.काँग्रेसच्या नसीम खान यांना काही मुद्यांवर बोलायचे होते. त्यांच्या हातवा-यांवर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला व अध्यक्षांशी बोलण्याची ही पद्धत प्रथापरंपरेला धरून नाही. हीच तुमची संस्कृती आहे का, असा सवाल केला. नसीम खान यांना बोलण्याच्या ओघात अध्यक्ष बागडे यांनी काँग्रेस पक्षाबाबत काही वक्तव्य केले. त्यामुळे विरोधकांचा भडका उडाला.विखे पाटील पहिल्यांदाच अध्यक्षांसमोरील डायसवर चढले. वसंत चव्हाण यांनी राजदंड उचलला. अध्यक्षांचे विधान कामकाजातून काढण्याची मागणी त्यांनी केली. विरोधकांच्या भावना लक्षात घेऊन बागडे म्हणाले की, आपण रेकॉर्ड तपासून पाहू आणि आवश्यकता असल्यास ते कामकाजातून काढण्यात येईल.

नवी दिल्ली - रोहिणी येथील नरेला परिसरात मंगळवारी रात्री उशिरा धावत्या कारमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून रवी कुमार, मोहित आणि विनोद अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास संशयावरुन एका कारचा पाठलाग केला. कार रोखून तपासणी करताना आतमध्ये एका मुलीसह तिघे युवक दिसले. कारमधील १२ वर्षीय मुलीने या तीन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. आरोपी आणि मुले एकाच परिसरात राहणारी आहेत.पोलिसांनी घटनास्थळावरुन दोघांना अटक केली. एक जण तेथून पसार होण्यात यशस्वी झाला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

पटना - जेडीयू प्रमुख लालू प्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा मुलगा तेजप्रताप यांच्या घटस्फोटाच्या अर्जावरील सुनावणीचा काऊंडाऊन सुरू झाला आहे. या अर्जावरील सुनावणी आज आहे. काही दिवसांपुर्वी तेज प्रतापने पत्नी ऐश्वर्यावर खळबळजनक आरोप केले होते. असे असले तरीही ऐश्वर्या आणि तिच्या आई-वडीलांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्या आज आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे.हनीमूनवरुन तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा वाद झाल्याची चर्चा आहे. लोकल मीडियाच्या रिपोर्टसनुसार तेजप्रताप यादव यांनी म्हटलं की, त्यांची आणि पत्नीमध्ये हनीमूनवरुनच वाद सुरु झाला होता. ऐश्वर्याला हनीमूनसाठी इंडोनेशियाला जायचे होते. पण त्यासाठी नकार दिल्याने हा वाद सुरु झाला.ते एक धार्मिक व्यक्ती असल्याने अशा जागेवर जाणं शोभत नाही. ऐवढंच नाही तर तेजप्रतापने ऐश्वर्यावर आरोप केले आहेत की, आधुनिक विचारांच्या ऐश्वर्याला सिगरेट आणि ड्रिंक करण्याचा देखील शौक आहे.तेजप्रताप यांनी म्हटले की, ते आता संसाराची गाडी पुढे नाही नेऊ शकत. हा विवाह राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप देखील तेजप्रताप यांनी केला आहे. आपला या लग्नाला विरोध होता पण घरच्या व्यक्तींनी त्य़ांचे ऐकले नाही आणि जबरदस्ती त्यांचा विवाह करुन दिला.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (२८ नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शिवाय, दहशतवाद्यांकडील दारूगोळादेखील जप्त केला आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्यापपर्यंत ओळख स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, बुधवारी बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटला कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता. पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय हद्दीत जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवाय, यावर्षी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटमध्ये २४१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याने पाकिस्तान बिथरला आहे. गेल्या वर्षी जवानांनी २१३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

श्रीहरीकोटा - अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. इस्त्रोने गुरुवारी सकाळी पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी ३१ उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हायसिस हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. अन्य उपग्रहांमध्ये आठ देशांचे ३० छोटे उपग्रह असून अमेरिकेचे सर्वाधिक २३ उपग्रह आहेत.आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही सी ४३ ने सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने झेप घेतली. पीएसएलव्हीचे हे ४५ वे उड्डाण आहे. अवकाशातील दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे उपग्रह सोडण्यात येतील. ही संपूर्ण प्रक्रिया ११२ मिनिटांची असेल.

नाशिक - देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील शेतकरी पंडित मेधने यांनी कांद्याला भाव न मिळाल्याने विंचूर-प्रकाशा महामार्गावर पाचकंदील चौकात सायंकाळी पाचच्या सुमारास दोन ट्रॉली कांदा रस्त्यावर फेकून देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळेल आणि दोन पैसे हाती येतील, या अपेक्षेने वर्षभर कांदा चाळीत साठवून देखील दरात सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कांदा रस्त्यावर ओतण्याच्या या अचानक झालेल्या प्रकारानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी भेट देत पहाणी केली. तहसीलदारांनी पोलीस निरीक्षक आणि शेतकऱ्यांची बैठक घेत कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशी कृती करू नका, असे आवाहन केले. कळवण येथेही कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजता कळवण येथील बस स्थानक परिसरात अचानक रास्ता रोको आंदोलन केले. तसेच प्रांत कार्यालयासमोर कांदे ओतून शासनाच्या शेतीवरोधी धोरणांचा निषेध केला. महाराष्ट्रात गावठी कांद्यासाठी नाशिक जिल्हा आणि त्यातही कळवण तालुका प्रसिद्ध आहे. यंदा सुरूवातीपासूनच कांद्याला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बुधवारी कळवणचा आठवडा बाजार असल्याने आंदोलनासाठी गर्दी झाली होती. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला भाजप वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला . कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.


पुणे - सिंचन घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर केला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.सिंचन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात दाखल दोन जनहित याचिकांच्या सुनावणीत एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी अजित पवारांची पाठराखण केली. बुधवारी छगन भुजबळ हे पुण्यात असून त्यांनी महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आले. हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई - जर तुमचे खात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी. एसबीआयच्या ४ महत्वाच्या सेवा पुढील २ दिवसांत बंद होणार आहे. १ डिसेंबरपासून तुम्ही या चारही सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महत्वाची काम आटपून घ्या. जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही तर तुमची इंटरनेट बँकिंग सेवा किंवा ऑनलाइन बँकिंग सेवा बंद होऊ शकते. या संदर्भात बँकेकडून कायम नोटिफिकेशन पाठवून ग्राहकांना जागरूक केले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला नंबर लिंक करा. भारतीय स्टेट बँक आपले मोबाइल वॉलेट SBI Buddy १ डिसेंबरपासून बंद करणार आहे. बँकेनुसार आधीच ही वॉलेट सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु ज्या ग्राहकांचे या वॉलेटमध्ये पैसे आहेत त्यांनी ते पैसे कसे काढावेत याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. .

मध्य प्रदेश - मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये आज मतदान होत असून सकाळी आठ वाजल्यापासून येथे मतदानाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी मतदान होत असून येथील २८९९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. येथे चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून कसून प्रयत्न केले जात आहेत. तर काँग्रेसला राज्यातील मागील १५ वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे. त्याचबरोबर मिझोराममध्ये ४० जागांसाठी मतदान होत आहे. येथे ७.७० लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेतचीन - चीनमध्ये एका केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोटात २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच इतर २२ लोक जखमी झाल्याचे वृत्तसंस्था एएफपीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. उत्तर चीनमधील झांगजियाको शहरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

श्रीनगर - जम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवान जखमी झाले आहेत.बडगाममधील छत्तरगाम येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली असता एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर सुरक्षा दलातील तीन जवानही यात जखमी झाले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.

मुंबई - मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानंतर आरक्षणासंदर्भात विधिमंडळात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपाने हालचाली सुरू केल्या असून, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आरक्षणाला पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, आरक्षणाच्या प्रश्नावर उद्या विधिमंडळात विधेयक मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हिप बजावला आहेमुंबई - विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या गोंधळात गेल्या दोन दिवसात कोणत्याही चर्चेविना १४ विधेयके मंजूर झाली. शालेय शुल्कवाढी सारख्या महत्वाच्या विधेयकाचा यात समावेश आहे. आम्हाला या विधेयकांवर चर्चा करायची होती, पण सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालून विरोधकांना बोलू देत नाहीत. सरकारला कामकाज गुंडळण्याची घाई झाली आहे, असा आरोप विरोधकांनी केला.विधिमंडळात सोमवारी पाच आणि मंगळवारी ९ अशी एकूण १४ विधेयके मंजूर झाली. कामकाज रेटून नेण्याच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, कोणतीही चर्चा न होता १४ बिले मंजूर झाली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देखील विधेयकांवर चर्चा करायची होती. परंतु संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट सर्व बिले घ्या, असे सांगत होते. बापटांना एवढी काय घाई होती? सकाळी सभापतींच्या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे १ तास उशिरा आले. ज्येष्ठ मंत्र्यांना बाजूला सारुन मुख्यमंत्री राजकारण करत आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, याआधी ५१ अहवाल मांडले गेले नाहीत असे समर्थन मुख्यमंत्री करत असले तरी हा अहवाल विशिष्ट परिस्थितीत बनवला गेला. याआधी कोणतेही अहवाल सभागृहात मांडा, अशी मागणी झालेली नव्हती. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलचा अहवाल सरकार मांडत नाही. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याचा अध्यादेश काढत नाही. अहवाल सभागृहात मांडण्यास मनाई असल्याचे तरी कायद्यात कुठे नमूद केले आहे, असा सवालही विखे पाटील यांनी केला.


मुंबई - एलटीटीईचा संस्थापक आणि राजीव गांधींचा मारेकरी व्ही प्रभाकरन यांच्या जयंती दिनाचे फलक झळकावल्याने मुंबईतील मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे. प्रभाकरन हा आमचा नेता असून त्याचा जन्मदिवस हा शौर्य जन्म दिवस आहे. त्याला अभिवादन करण्यासाठी नाम तमिळ कच्ची या बॅनरखाली सर्व तमिळ जनतेने एकत्र यावे अशा आशयाचा हा फलक आहे. यावर नाम तमिळ कच्ची या पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे नाव नाही. त्यामुळे हा फलक नेमका कोणी लावला याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी भर चौकात हा फलक लागणे म्हणजेच गृहखात्याचे अपयश असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई - सिंचन घोटाळा प्रकरणात एसीबीनं राष्ट्रवादीचे नेते, तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ठपका ठेवल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मी वेळोवेळी आरोपांचे निरसन केले आहे.याआधीही चौकशीला सहकार्य केलेले आहे आणि करत राहणार' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. दरम्यान ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. तर जयंत पाटलांचा हा आरोप धुडकावून लावत ही कारवाई सूडबुद्धीने झाली नसल्याचे दावा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. अजित पवार यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार, अशी प्रतिक्रियाही गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर अजित पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार का? असात प्रश्न अनेकांना पडला आहे.मुंबई - वांद्रे येथील शास्त्रीनगर झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी (२७ नोव्हेंबर) आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वांद्रे पश्चिम येथील जामा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या शास्त्री नगर परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल २ ची आग म्हणून घोषित केले आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात भीषण आग लागली होती.

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये मराठा समाज आजपासून पुन्हा आंदोलन करणार आहे. आजपासून मराठा समाज कोल्हापुरात आमरण उपोषण करणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, सोमवारी मुंबईला आंदोलन करण्यासाठी जाण्यावरून आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. मोठं अटकसत्र सुरू होते.तर आजपासून कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलक ठिय्या आंदोलनही करणार आहे. तर आमरण उपोषण आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठी आता दसरा चौकात स्टेज बांधण्यात येणार आहे. पण त्यालाही पोलीस विरोध करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे एकीकडे सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण आणि इतर शैक्षणिक सवलती सुविधा योजना सुरू ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार अशी भूमिक मराठा आंदोलकांकडून घेण्यात आली आहे. एटीआर रिपोर्ट नाही तर संपूर्ण अहवाल मांडावा ही विरोधी पक्षांच्या गट नेत्यांची भूमिका आहे, अशी माहिती सुत्रांकजून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकल्याचे प्रकरण अजून निवळलेही नसताना आज (मंगळवारी) केजरीवालांच्या जनता दरबारातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपी तरुणाकडे चौकशी करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इमरान (वय – ३९) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलगी गोळी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत १२ अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात गेले होते अशी माहिती आहे. मात्र, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमात त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देत हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत इतरांसमोर आपल्या आचरणातून आदर्श ठेवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. देशातील ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही, अशा राज्यांच्या दौऱ्यावर असतेवेळी मोदींकडून केली जाणारी वक्तव्य आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा याविषयीही त्यांनी सजग रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आचरणातून इतरांसमोर आदर्श प्रस्थापित करावा. कारण, ती व्यक्ती देशातील नागरिकांचे प्रतिनिधीत्वं करत असते. त्यामुळे आपण पंतप्रधान पदावर आहोत, याचे भान त्या व्यक्तीला असणे अपेक्षित आहे, असं म्हणत सिंग यांनी मोदींना हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.मुंबई - वडाळा परिसरातील भक्ती पार्क येथे सोमवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पेट्रोलच्या टँकरने पेट घेतला. मोनोरेलच्या मार्गानजीकच ही दुर्घटना घडल्याचे कळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती ही टँकरचा चालक असल्याचं कळत आहे. आगीमध्ये टेम्पोला धडकून टँकर उलटल्याची माहिती समोर येत आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांच्या जामा मशिद उद्ध्वस्त करण्याच्या विधानानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनद्वारे त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. साक्षी महाराजांनी याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली असून झेड प्लस सुरक्षेची मागणी केली आहे.दोन वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन आला आणि बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली . सोमवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी आणि संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव मोहम्मद अंसारी सांगितलं आणि महाराष्ट्रातील अकोल्याचा रहिवासी असल्याचं सांगितलं, असं साक्षी महाराज यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. यापूर्वी २३ आणि २४ नोव्हेंबर रोजीही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी डी कंपनीचा हस्तक असल्याचे धमकी देणाऱ्याने सांगितले होते असेही साक्षी महाराजांनी पत्रात म्हटले आहे.जेव्हा मी राजकारणात आलो होतो तेव्हा माझी पहिली घोषणा होती की, अयोध्या-मथुरा-काशी सोडा, दिल्लीची जामा मशिद तोडा. ही मशीद तोडल्यानंतर इथं हिंदू देवतांच्या मुर्त्या सापडल्या नाहीत तर मला फाशीवर लटकवा. असे वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी गुरुवारी (दि. २२) झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हापासून त्यांना धमक्या येत आहेत.पुणे - अयोध्येत बुद्ध मंदिर असल्याचे उत्खननामध्ये आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी राम मंदिर आणि मशिदीबरोबरच बुद्ध मंदिर उभारण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. 'राममंदिराला पाठिंबा आहे. मात्र, हे मंदिर बेकायदा उभारण्यात येऊ नये,' असे त्यांनी सांगितले.अयोध्येत बुद्ध मंदिर असल्याचे उत्खननामध्ये आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी राम मंदिर आणि मशिदीबरोबरच बुद्ध मंदिर उभारण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. 'राममंदिराला पाठिंबा आहे. मात्र, हे मंदिर बेकायदा उभारण्यात येऊ नये,' असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट देऊन राम मंदिर उभारण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची मागणी केल्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार का, याबाबत विचारणा करण्यात आली असता आठवले म्हणाले, 'शिवसेनेला याचा फायदा होणार नाही. राम मंदिर उभारणीचा मूळ विषय भाजपचा आहे. मात्र, राम मंदिरापेक्षा 'सब का साथ, सब का विकास' या मुद्यावर भाजपला जास्त जागा मिळाल्या.' 'ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या भावनेचा विचार करावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाकिस्तानधार्जिण्या मुस्लिमांना विरोध होता. मात्र, अन्य मुस्लिमांना त्यांचा पाठिंबा होता,' असे त्यांनी नमूद केले. अमरावती - जुन्या पेन्शन योजनेसाठी जंतर मंतर ते संसद भवन दिल्लीपर्यंत असलेल्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या शेकडो शिक्षकांनी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. नागपूर येथून अमृतसर एक्सप्रेसने दिल्लीकरिता रवाना झाले आहेत.यावेळी अमृतसर एक्सप्रेसमध्ये चढतानाच पदाधिकारी यांनी शासन धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, मार्गदर्शक नितीन टाले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष निलेश तायडे, अकोला जिल्हा समन्वयक गजानन चौधरी, वाशिम जिल्हाध्यक्ष संदीप देशमख, बुलडाणा जिल्हाध्यक्ष दिलीप दांदडे, एस. एल.राठोड, अविनाश पाटिल, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष निलेश कानडे, राम देशमुख आदींनी शनिवारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.भारतीय राज्यघटनेमध्येच सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना लागू रहावी, असा उल्लेख असताना सुद्धा १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांसाठी नविन अंशदायी पेन्शन योजना लागू केली.ही भारतीय राज्यघटनेतील नियमांची पायमल्ली आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजनेमुळे शिक्षक व इतर सर्व कर्मचा-यांचे भविष्यकालीन जिवन अंध:कारमय झाले आहे. त्यांचा भविष्याचा आधार शासनाने हिसकावून घेतला आहे. याचा सरकारला जाब विचारण्यासाठीच जंतर मंतर ते संसद भवन दिल्ली पर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे.सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हा शिक्षक महासंघाचा निर्धार आहे. त्यासाठी शिक्षक महासंघ जुनी पेंशन हक्क संघटनेच्या खांद्याला खांदा लावुन लढणार आहे, 

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई हल्ल्यातील शहीदांना मरिन लाइन्स येथील पोलीस स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.दहा वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी सोमवारी मरिन लाइन्स येथील पोलीस स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज(सोमवारी)१० वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं एक मोठी घोषणा केली आहे. या हल्ल्याचे मास्टरमाईंड असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणाऱ्या व्यक्तीला ३५ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईतील १० ठिकाणी हल्ला केला. यामध्ये १६६ निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.'२६/११ च्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईद आणि झकी उर रहमान लख्वी यांना पकडण्यास मदत करणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षिस देण्यात येईल ,' अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी दिली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) माहिती अधिकार (आरटीआय) अधिनियमातील तरतुदीचा हवाला देत विदेशातून आणलेल्या काळ्या पैशाशी निगडीत माहिती देण्यास नकार दिला आहे. संबधित प्रकरणाचा तपास आणि आरोपींविरोधातीत खटल्यांमधील अडथळा लक्षात घेता आरटीआयच्या या अधिनियमानुसार माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो. केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) १६ ऑक्टोबरला एका प्रस्ताव पारित करुन पीएमओला १५ दिवसांच्या आत काळ्या पैशांशी निगडीत माहिती देण्यास सांगितले होते.काळ्या पैशाशी निगडीत आरटीअाय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पीएमओने म्हटले की, या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यांचा तपासही सुरु आहे.व्हिसलबोअर भारतीय वन सेवेतील अधिकारी (आयएफएस) संजीव चतुर्वेदी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती विचारली होती. याचे उत्तर देताना पीएमओने म्हटले की, सरकारकडून होत असलेल्या कारवाईची माहिती सध्या जाहीर केल्यास संपूर्ण तपास प्रक्रिया किंवा आरोपींविरोधातील कारवाई बाधीत होऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी आरटीआय कायदा कलम ८ (१) अंतर्गत माहिती जाहीर करण्यास सूट मिळते.हा तपास विविध सरकारी तपास संस्था आणि सुरक्षा संस्थांच्या कक्षेत असून त्याला आरटीआय कायद्याच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. चतुर्वेदी यांनी आरटीआयच्या माध्यमातून सरकारकडे माहिती मागितली होती. जून २०१४ ते आतापर्यंत विदेशातून किती काळा पैसा भारतात आणला अशी माहिती त्यांनी विचारली होती

अंदमान - अंदमान-निकोबार येथे अमेरिकन नागरिक जॉन अॅलन चाऊची हत्या झाल्यानंतर शनिवारी पोलिसांना एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला.अंदमान-निकोबार येथे अमेरिकन नागरिक जॉन अॅलन चाऊची हत्या झाल्यानंतर शनिवारी पोलिसांना एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. अमेरिकन नागरिक चाऊचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हातात धनुष्य-बाण घेतलेल्या आदिवासींना सामोरे जावे लागले. आदिवासींच्या हातातील धनुष्य पाहून पोलीस पथकाला आल्यापावली परतावे लागले.स्थानिक पोलीस प्रमुख दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, शनिवारी उत्तर संथाली बेटाकडे रवाना झालेल्या पथकाला तिथे काही आदिवासी दिसले. त्याच भागात चाऊ अखेरचा दिसला होता. किनाऱ्यापासून ४०० मीटर दूर समुद्रात बोटीत बसलेल्या जवानांनी दुर्बिणमधून पाहिले असता ते आदिवासी धनुष्य-बाण घेऊन उभे होते. आदिवासींचा तो पवित्रा पाहून पोलीस पथक पुन्हा माघारी फिरले.चाऊ हा आदिवासींना ख्रिश्चन धर्माबाबत काही सांगत होता. त्याचवेळी आदिवासींनी त्याची हत्या केली होती. पोलीस हे संथाली बेटावरील लोकांबरोबर संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.दि. १७ नोव्हेंबर रोजी चाऊचा मृत्यू झाला होता. अद्यापपर्यंत त्याचा मृतदेह मिळालेला नाही. चाऊला आदिवासींनी बेटावरच दफन केले असल्याचे काही मासेमाऱ्यांनी सांगितले आहे.मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरु केलेली संवाद यात्रा आज (सोमवारी) मुंबईत विधान भवनावर धडकणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक विधानभवनावर धडकणार आहेत. तर दुसरीकडे या संवाद यात्रेसाठी निघालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या भागांमधील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे.मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज झाल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला होता. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रा काढण्याची घोषणा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली होती. ही यात्रा सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे. या संवाद यात्रेत सामील होण्यासाठी निघालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला.
.मुंबई - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणे चांगलेच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाण हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.उद्धव ठाकरेंना रामाचे आशीर्वाद मिळतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आम्हाला आनंद आहे. राम मंदिर हा राजकीय विषय नाही. राम मंदिर झाले पाहिजे हे सर्व हिंदू बांधवांना वाटते. प्रभू श्रीराम अवघ्या भारताचे अराध्या दैवत आहेत. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभू श्री राम नक्कीच आशिर्वाद देतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अयोध्या - राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.अयोध्या - अयोध्येला छावणीचे स्वरुप; उद्धव ठाकरेंनी परिवारासह घेतले श्रीरामाचे दर्शन राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आज अयोध्येत हिंदुत्ववादी संघटनांनी ठाण मांडले आहे. विश्व हिंदू परिषदेसह आरएसएसच्या इतर संलग्न संघटनांकडून येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही धर्मसभा असणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख रामभक्त सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. हजारो शिवसैनिकही येथे उपस्थित आहेत.श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांना मोठे यश मिळाले आहे. येथे सुरु असलेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातले आहे. येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरु करण्यात आलेली कारवाई अद्यापही सुरुच आहे.शोपिया जिल्ह्याच्या कपरान बटागुंड क्षेत्रात सुरक्षा रक्षकांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांना तत्काळ शोधमोहिम सुरु केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारानंतर या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाई ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. अद्यापही येथे चकमक सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.शुक्रवारीच शोपियामध्ये काही अज्ञात बंदुकधाऱ्या लोकांनी एका माजी विशेष पोलीस अधिकाऱ्यासह (एसपीओ) तीन लोकांचे अपहरण केले होते. तर गेल्याच आठवड्यात दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांचे खबरी असल्याच्या संशयावरुन दोन लोकांची हत्या केली होती.नाशिक - नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. चांगल्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बदल्या होणे म्हणजे समाज, शहर व राज्याचे नुकसान असल्याचे हजारे यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांनी बदलीस न घाबरता काम करताना नियमात राहून काम करण्याची तयारी ठेवली तर जे ७२ वर्षांत घडले नाही ते केवळ १० वर्षांत होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगले काम करताना असे अधिकारी समाज व देशाचा विचार करतात, मात्र काही लोकांना हेच आवडत नाही. म्हणूनच चांगल्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. वारंवार बदल्यांविरोधात आपण २००३ मध्ये आझाद मैदानावर आंदोलन करून सरकारकडून बदल्यांचा कायदा संमत करून घेतला होता. त्यामुळे ३ वर्षे होण्याअगोदर बदली होणे चुकीचे आहे. वारंवार बदल्यांमुळे अधिकाऱ्यांची चांगले काम करण्याबद्दल उदासीनता तयार झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही हजारे यांनी उपस्थित केला. दबावातून झालेली मुंढे यांची बदली ही दुर्दैवी बाब असून त्याचे आपणास वाईट वाटल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget