2019

मुंबई - मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ‘देशभक्त’ मंत्री झाला, अशा शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन टीका केली आहे. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!? देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!? असे सोमय्यांनी ट्वीट केले आहे.
२०१५ मधील अधिवेशनात काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप, शिवसेना आमदारांनी विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचे कामकाज स्थगित केले होते. अस्लम शेख यांना २०१५ मधे शिवसेनेने ‘देशद्रोही’ म्हटले होते, मात्र तेच आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झाले’ असे सोमय्या म्हणाले.
अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस आमदार आहेत. २००९ पासून सलग तिसऱ्यांदा ते आमदारपदी निवडून आले आहेत. अस्लम शेख हे काँग्रेसचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जातात. अस्लम शेख यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
अस्लम शेख यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१५ मध्ये पत्र लिहिले होते. याकूब मेमनला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी या पत्रात केली होती. पत्राखाली तत्कालीन आमदार आरिफ खान, अस्लम शेख आणि अमिन पटेल यांच्यासह काँग्रेसमधील आठ नेत्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्यात आली होती.
बीड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याला काळे फासण्यात आले आहे. हा प्रकार बीड पंचायत समितीच्या आवारात सोमवारी दुपारी घडला. फेसबुकवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर संतप्त महिला शिवसैनिकांनी शाई फेकत तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त टिप्पणी (कमेंट) केली होती. त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांनी कार्यालयात जाऊन कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकली. एवढेच नाही तर सुनील कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्याचा देखील प्रयत्न केला.इथून पुढे ठाकरे सरकारबद्दल अपशब्द काढला, तर याद राख, असा सज्जड दम देखील दिला. बीड पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या प्रकाराची सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

नवी दिल्ली - लष्करप्रमुख म्हणून मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे आज पदभार स्वीकारणार आहेत. जनरल बिपीन रावत आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होत आहेत. गेले सहा महिने ते व्हॉईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम पाहत होते. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांच्यावर देशाच्या सामरिक व्यवस्थापनात सर्वोच्च स्तरावर होणाऱ्या महत्वाच्या बदलांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होत आहेत. मात्र लगेच ते तीनही सैन्यदलांचे प्रमुखपद म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद स्वीकारणार आहेत. जनरल रावत वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत या पदावर राहतील. तीनही सेनादलांशी संबंधित मुद्द्यांवर ते संरक्षणमंत्र्यांना सल्ला देतील. 

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून भाजप-शिवसेनेत जुंपली आहे. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये उमटले आहे. सेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न वरून कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा घातला होता. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळ्याला काळी शाई फासली.वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करत कर्नाटक सरकारचा युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी कर्नाटकच्या बसेसवर दगडफेक केली आहे. 
दरम्यान, बेळगावमधील कन्नड संघटनेच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यानंतर सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने आता भाजपला लक्ष्य केले आहे. 'एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच,' असे आव्हान देत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 
भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात हे आता पक्के झाले. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत? ते हिंदूच आहेत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व?' असा सवाल भाजपला विचारण्यात आला आहे. 
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, अशी भाषा कन्नड संघटनेने केली आहे. हे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. कर्नाटकात कोणाचेही राज्य आले तरी सीमा भागातील मराठी मंडळींवरील अन्याय-अत्याचार काही थांबत नाहीत. उलट सत्ताधाऱयांत अत्याचार करण्याची चढाओढच लागलेली असते. आताही कोणी एक भीमाशंकर पाटील व त्याची कर्नाटक नवनिर्माण सेना आहे. त्याने बेळगावात येऊन सांगितले की, ‘सीमा प्रश्नावरून गेली ६० वर्षे बेळगावच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थांबवून गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल.’ मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयोग गेल्या ६० वर्षांपासून सुरूच आहेत. त्या सर्व अघोरी प्रयोगांना सीमा भागातील जनता पुरून उरल्याने आता त्यांना गोळय़ा घालण्याची मागणी सुरू झाली आहे. 
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळय़ा घालण्याची भाषा ज्यांनी केली त्यांनी आधी आमच्या सीमा पार करून एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ अंगावर येणाऱयांचा कसा फडशा पाडतात ते समजेल. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी समन्वय मंत्री नेमले आहेत व हे मंत्री मागच्या भाजप सरकारने नेमले तसे नाहीत. सीमा आंदोलनात, बेळगावात जाऊन ज्यांनी लाठय़ा खाल्ल्या व बेळगावी पोलिसांचा अघोरी पाहुणचार सोसला असे छगन भुजबळ व एकनाथ शिंदे हे दोन मंत्री सीमाप्रश्नी तेथील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी नेमले आहेत.

नाशिक - नाशिकसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात तसे सूतोवाच केले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र मेट्रोवरून भाजप महाविकास आघाडीवर टीका करतं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोवरून चांगलाच वाद उफाळून आल्याचे दिसले. सरकार बदललं की धोरण आणि प्रकल्पही बदलतात आणि त्याचाच प्रत्यय आता येऊ लागला आहे. भाजप शिवसेनेचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नाशिकच्या नियो मेट्रो प्रकल्पासह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या नव्या शासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना भुजबळ यांनी राज्यातील मेट्रो प्रकल्पांच्या गरजेबाबत प्रश्न उपस्थित करत, या प्रकल्पांवर टीका करत अप्रत्यक्षपणे विरोध केला. 
मी स्थगिती द्या असे म्हणत नाही, पण तज्ज्ञांना घेऊन विचार करा असे म्हणालो होतो. नागपूरच्या परिस्थितीची काय झाली, मुंबईची मोनो रेल फेल झाली. माझा विकास कामांना विरोध नाही, मी विकास करणारा आहे. त्यामुळे लोकांची गरज पाहून काम करायला पाहिजे, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. 
तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही छगन भुजबळ यांच्या विधानाचे समर्थन करत या प्रकल्पाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. 'भाजपने मुळात निवडणुका डोळयासमोर ठेऊन मेट्रोची घोषणा केली होती. हा चुनावी जुमला होता. मुळात स्मार्ट प्रकल्पांची काय अवस्था करून ठेवलीय. मेट्रोची काय करणार आहे. भुजबळ म्हणाले ते खरे आहे. कराचा बोजा नाशिककरांवर पडेल. फायदा काय होईल याचा विचार केला पाहिजे', असे नाशिक महापालिकेतले विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले आहेत.छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर भाजप आमदारांनी मात्र ही महाविकास आघाडी नसून महास्थगिती असल्याची टीका केली. हे प्रकल्प न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. 
शहरातील वाहतूक आणि शहराचा विकास करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. मेट्रो देखील गरजेची आहे. वाहतूक कोंडी होत असताना शहराचा विकास करत असताना मेट्रोच काम व्हायला पाहिजे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक कामांना स्थगिती देत आहे. महाविकास आघाडीचे सरकार नसून महास्थगिती सरकार आहे. मेट्रोला स्थगिती दिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे.

अहमदनगर - दोन वर्षांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेच भाजपमध्ये जाण्याच्या तयारी होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. ते नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले की, बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कुणाकुणाच्या भेटी घेतल्या त्याची माहिती माझ्याकडे आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी थोरातांनी काँग्रेसची फरपट केली आणि पक्ष दावणीला बांधला. आता ते केवळ नशीबामुळे सत्तेत बसले आहेत. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाचा फुटबॉल झाला आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यांनी नुकतीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांची भेटही घेतली होती. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांना टोला लगावला होता. 'जिथे गेला तिथे सुखाने नांदा, असे त्यांनी विखे-पाटलांना उद्देशून म्हटले होते. 
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या या टीकेला विखे-पाटलांनी प्रत्युत्तर दिले. अहमदनगरमध्ये १२ जिल्ह्यांपैकी यांना अवघ्या तीन जागा लढवता आल्या. त्यातच यांना कसेबसे यश मिळाले. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाची काळजी करु नये. विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये हेलिकॉप्टर आणून ठेवले होते. मात्र, त्यांना स्वत:चा मतदारसंघ सोडून प्रचारासाठी बाहेर जाताच आले नाही, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना शनिवारी उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. प्रियांका गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनावेळी अटक झालेले माजी सनदी अधिकारी एस.आर. धरपुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत वाहनांचा नेहमीचा ताफा नव्हता. त्या एका कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवर बसून धरपुरी यांच्या कुटुंबीयांना भेटायला निघाल्या होत्या. मात्र, यावेळी पोलिसांनी आपल्याला रस्त्यात अडवले. पोलिसांकडून आपला गळा दाबण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. 
पोलिसांनी प्रियांका गांधी यांना मोटारसायकलवरून उतरवल्यानंतर त्या रस्त्यावरून चालत धरपुरी यांच्या घराच्या दिशेने निघाल्या. यावेळी पोलीस त्यांच्यापाठी धावत होते. मात्र, प्रियांका गांधी ऐकायला तयार नव्हत्या. त्या आपल्या कार्यकर्त्यांसोबत मार्गक्रमण करत राहिल्या. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ ट्विट करण्यात आला आहे. मात्र, आता या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी यांना रस्त्यात रोखून धक्काबुक्की केली. एका पोलिसाने प्रियांका गांधी यांचा गळा पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियांका गांधी त्यांना ऐकल्या नाहीत. तब्बल आठ किलोमीटर चालत त्यांनी एस.आर. धरपुरी यांचे घर गाठले आणि त्यांच्या आजारी पत्नीची भेट घेतली, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 
यापूर्वी मेरठमध्ये यूपी पोलिसांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांना जिल्ह्याच्या सीमेवरून परत पाठवले होते. CAA विरोधात निदर्शने करताना मेरठमध्ये मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या राहुल आणि प्रियांका यांनाही मंगळवारी रात्री पोलिसांनी अडवले होते.

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचा १३५ वा स्थापना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, ए. के अॅन्टोनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 
दिल्लीतील अकबर रोड येथील कार्यालयात सोनिया गांधी यांनी ध्वज फडकावला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.१३५ वर्षांची एकता, न्याय, समानता, अहिंसा, स्वातंत्र्य आज आपण साजरी करत आहोत. आज आपण काँग्रेसचा १३५ वा स्थापन दिवस साजरा करत आहोत, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.२८ डिसेंबर १८८५ साली ऐ. ओ ह्युम यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेवर असलेल्या मंदीच्या सावटामध्येच आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं आणखी एक इशारा दिला आहे. पुढच्या नऊ महिन्यांमध्ये बँकामध्ये असलेल्या थकीत कर्जांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यीच भीती आरबीआयने व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, कर्ज फेडण्यात अपय़श तसेच क्रेडिट ग्रोथ कमी झाल्याने असे होत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. वर्षातून दोनवेळा जून आणि डिसेंबरमध्ये प्रकाशित होणाऱ्या आरबीआयच्या फायनान्शिअल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये रेटिंग शॉपिंगकडेही लक्ष वेधले आहे. 
मोठ्या कार्पोरेट कंपन्यांकडे सध्या पैशाची कमी नाही. त्यामुळे त्यांना कर्जाची आवश्यकता नाही. सध्या क्रेडिट ग्रोथ कमी होण्याचे कारण हेच आहे. या अहवालानुसार सप्टेंबर २०१९ पर्यंत सरकारी बँकांची क्रेडिट ग्रोथ कमी होऊन ८.७ टक्के इतकी झाली आहे तर प्रायव्हेट बँकांमध्ये हेच प्रमाण १६.५ टक्क्यांवर आले आहे.सप्टेंबर २०१९ मध्ये थकित कर्जांचे प्रमाण ९.३ टक्के इतके होते. ते सप्टेंबर २०२० मध्ये ९.९ टक्क्यांवर पोहचेल असेही आरबीआयने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेतील मंदी, कर्ज फेडण्याचे प्रमाण घटले, तसेच क्रेडिट ग्रोथ घसरल्याने बॅंकाच्या थकीत कर्जात वाढ झाली असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 
सरकारी बँकांचे सप्टेंबर २०१९ पर्यंत १२.७ टक्के कर्ज थकीत आहे. ते सप्टेंबर २०२० पर्यंत १३.२ टक्क्यांवर पोहचेल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खासगी बँकांमध्ये हे प्रमाण ३.९ टक्क्यांवरून ४.२ टक्के होईल असाही अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.

लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी एक हजार विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटलेली नाही.१५ ऑक्टोबरला अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला होता. तसेच अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. 
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. यामध्ये १७ ते १८ जणांचा मृत्यूही झाला आहे. हिंसा पसरवणाऱ्या लोकांची संपत्ती जप्त केली जाईल, असे याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार कारवाईही करण्यात आली आहे. राज्यातील अनेक संवेदनशील स्थळी अजूनही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गुवाहाटी - आसामचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमण होऊ देणार नाही. आरएसएसच्या चड्डीवाल्यांच्या हातात आसाम जाऊ देणार नाही, असे नमूद करतानाच आसामचा कारभार आसामची जनताच हाकेल, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला.गुवाहाटी येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी ठिकठिकाणच्या हिंसक आंदोलनांचा दाखला देत देशात पुन्हा एकदा नोटबंदीनंतर जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. सध्या देशात जे काही घडत आहे त्यामागे भाजप सरकारचा कुटील डाव आहे. लोकांना आपसात लढवण्यासाठीच हे सगळे सुरू आहे. हे जिथे जातात तिथे केवळ द्वेष पसरवण्याचेच काम करतात, असे राहुल म्हणाले. आसाममध्ये भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही. द्वेष आसामला मान्य नसून येथील जनता शांततेचा मार्ग चोखाळून सलोखा जपूनच पुढे मार्गक्रमण करेल, असे राहुल म्हणाले. आसामध्ये युवावर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. संपूर्ण देशात हेच वातावरण आहे. मात्र, आंदोलकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. जनतेचा आवाज भाजपला ऐकायचा नाही. तुमच्या आवाजाची भीती या सरकारला वाटतेय. तुमचा आवाज दाबून टाकण्याचे धोरण या सरकारने आखले, असा घणाघात राहुल यांनी केला. 
आसामच्या जनतेला राहुल यांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. आसामची संस्कृती, आसामचा इतिहास यावर आम्ही तुमचे आक्रमण होऊ देणार नाही, असे भाजपला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आपण सगळे एक राहिलो तर येथे द्वेष पसरवण्याचे कुणाचेही कारस्थान यशस्वी होणार नाही, असे राहुल म्हणाले.

लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात झालेल्या आंदोलनात उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले होते. मुस्लिम समाजातील लोकांनी नमाज पठणानंतर जिल्हा प्रशासनाला नुकसान भरपाई म्हणून ६ लाख २७ हजार ५०७ रुपये दिले. बुलंदशहर प्रशासनाने शुक्रवारच्या नमाज पठण शांततेत पार पडावे यासाठी खबरदारी घेतली होती. नमाज पठणानंतर मुस्लिम समुदायातील लोकांनी जिल्हाधिकारी रविंद्र कुमार आणि एसएसपी संतोष कुमार यांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम समाजाकडून नुकसान भरपाईपोटी ६ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट प्रशासनाकडे सोपवण्यात आला.गेल्या आठवड्यात नागरिकत्व कायद्याविरोधात बुलंदशहरमध्ये आंदोलन झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक ठिकाणी जाळपोळ आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले होते.एसएसपी कुमार यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या नमाज पठणानंतर आंदोलकांनी सरकारी वाहनांसह सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले होते. आता नुकसान भरपाईसाठी डिमांड ड्राफ्ट देण्यात आले असून ही एक चांगली सुरुवात आहे. मुस्लिम समाजाकडून भेटण्यासाठी आलेल्या लोकांचे म्हणणे होते की जिल्ह्यात हिंसा व्हायला नको होती.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हिंसाचारात सहभागी असलेल्यांना नोटिस पाठवण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशसह देशातील वेगवेगळ्या भागात शांततेत कायद्याविरोधात आंदोलन होत आहे.

नवी मुंबई - पुढील वर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण होण्याचे भाजप सरकारच्या काळातील आश्वासन होते.परंतु, विमानतळ धावपट्टीच्या कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने नवी मुंबई विमातळाला आणखी दीड ते दोन वर्षे विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.विमानतळासाठी लागणारे सपाटीकरण पूर्ण झाले असले तरी धावपट्टी आणि टर्मिनल या कामांचा अद्याप ठावठिकाणा नसल्याने हे उड्डाण लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येते. विमानतळाच्या या रखडपट्टीला सध्याची आर्थिक मंदी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.राज्यातील पहिल्या युती शासनाच्या काळात २१ वर्षांपूर्वी नवी मुंबई विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पर्यावरणविषयक परवानग्या या चक्रव्यूहात अडकलेल्या या प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नवी मुंबई विमातनळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. या प्रकल्पासाठी दहा गावे स्थलांतरित करण्यात आली आहेत. या दहा गावांतील ६७१ हेक्टर जमिनी या प्रकल्पासाठी लागणार आहे. सध्या ही गावांची जमीन मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
आतापर्यंत विमानतळाची रखडपट्टी ही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व पुनस्र्थापना या कारणाने होत होती मात्र सध्या विमानतळासाठी लागणाऱ्या ११६० हेक्टर जमिनीचे सपाटीकरण झाल्यानंतरही विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. संपूर्ण विमानतळाचे काम करणाऱ्या जीव्हीके लेड कंपनीने धावपट्टी व टर्मिनल चे काम एल अ‍ॅण्ड टी या बांधकाम कंपनीला दिलेले आहे. त्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे विमानतळाच्या बांधकामाचे एकूण गणितच बिघडू लागले असून विमानतळावरील पहिल्या उड्डाणाला आता दीड ते दोन वर्षांचा विलंब होणार आहे.या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी या विमानतळावरील उड्डाण २०२० पर्यंत होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र आता हे उड्डाण २०२२ अखरे पर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण - गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेले गुडविन ज्वेलर्सचे सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण हे दोन्ही बंधू १३ डिसेंबर रोजी न्यायालयात शरण आल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची नौपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू गुरुवारी डोंबिवली रामनगर पोलिसांनी या आरोपींचा ताबा घेतला होता. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने गुडविन या प्रतिष्ठित ज्वेलर्सने नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथमधील हजारो ग्राहकांनी दुप्पट पैशांच्या अमिषाला भुलून सुमारे होती, मात्र ठाण्याबरोबरच डोंबिवली आणि अंबरनाथमध्येदेखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्यामुळे १५ कोटी रुपयांची गुंतवणूक या ज्वेलर्सकडे केली होती. यानंतर २१ ऑक्टोबरपासून गुडविनची सर्व दुकाने बंद झाली आणि मालक फरार झाले. यानंतर ग्राहकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती. घटनेची माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी दररोज तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली होती. यामुळे गुंतवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत होता. यानंतर पोलिसांनी त्यांच्या दुकानाची झडती घेतली असता दुकानातील सर्व दागिनेदेखील त्यांनी गायब करत ग्राहकांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची सर्व खाती गोठवली होती. तर, त्यांची सर्व संपत्तीदेखील जप्त केली होती. यानंतर १३ डिसेंबर रोजी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार हे दोन्ही बंधू ठाणे न्यायालयात शरण आले होते. यानंतर नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली होती. त्यांच्या विरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी नौपाडा पोलिसांनी त्यांचा ताबा डोंबिवली पोलिसाकडे दिला आहे. डोंबिवली पोलिसांनी त्यांच्या केरळमधील संपत्तीची चौकशी करणे बाकी असल्यामुळे तपासासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना ११ दिवस म्हणजेच ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे - ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन खाती तसेच विविध योजनांची खासगी बँकेतील खाती शासकीय बँकांमध्ये वळविण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला.महापालिकेच्या योजनांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत असून या बँकेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता उच्च पदावर आहेत. त्यामुळे खाती वळविण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने फडणवीस यांना एकप्रकारे धक्का दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. 
तत्कालिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्यामुळेच पोलीसांची वेतन खाती आणि अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेतून अ‍ॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप होत आहे. सत्तापालटानंतर पोलिसांची अ‍ॅक्सिस बँकेतील वेतन खाती पुन्हा भारतीय स्टेट बँकेत वळविण्याचा निर्णय शिवसेना घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन खाती शासकीय बँकांमध्ये वळविण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने गुरुवारी घेतला. तशाप्रकारचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, खासगी बँका बुडल्या तर महापालिकेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच महापालिकेची खासगी बँकेतील खाती शासकीय बँकेत वळविण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर म्हस्के यांनी स्पष्ट केले.

ठाणे - एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा संतापजनक प्रकार शाळेतील मुख्याध्यापकानेच केला आहे. प्रमोद रामदेव नायक (४२) असे या नराधमाचे नाव आहे. येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला ३० डिसेंबरपर्यंत म्हणजे ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.एका १४ वर्षीय मुलीवर या नराधमाने अश्लील चाळे करून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. यानंतर मुख्याधापक प्रमोद नायक याला गुरुवारी संतप्त नागरिक व पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले होते.हेही वाचा - ८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा प्रवासयासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात विकृत मुख्याध्यापकाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास ३० डिसेंबरपर्यंत अर्थात चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. त्यात आता वर्षा बंगल्यांच्या भितींचीही भर पडली आहे. फडणवीस यांची लहान मुलगी दिवीजा राहत असलेल्या खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये नंतर हा बंगला नवीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांना राहण्यासाठी सुपूर्द करण्यात येणाआक्षेपार्ह लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे.राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगला सोडावा लागला होता. वर्षा हे सरकारी निवास्थान सोडताना दिरंगाई केली होती. त्यार आहे. मात्र त्यापूर्वी या बंगल्याची पाहणी केली असता काहींना वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिले असल्याचे आढळले.दिविजा फडणवीस राहत असलेल्या खोलीच्या भिंतीवर Who is UT? UT Is mean? Shut Up अशी वाक्य लिहिण्यात आली आहे. Who is UT? युटी कोण आहेत, UT Is mean? युटी वाईट आहेत असे वर्षा बंगल्याच्या भितींवर लिहिलले आहे. BJP is rock, Bjp and shivsena were friend, Fadnavis rock असेही या भितींवर लिहिले आहे.दिविजा राहत असलेल्या खोलीमधील सर्वच भिंतीवर अशाप्रकारे लिहिले आहे. अशाप्रकारे भिंतीवर लिहिलेल्या या वाक्यांमुळे फडणवीस कुटुंब उद्धव ठाकरेंचा किती द्वेष करु लागलेत हे दिसून येत आहेत. 
काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेदरम्यान “उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?” असा प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचे अत्यंत हसतखेळत उत्तर दिले. “मी वर्षावर फक्त कामासाठी जाणार” असे त्यांनी सांगितले. 
फडणवीस म्हणाले की, बंगला सोडण्यापूर्वी आम्ही एक एक कोपरा चेक केला होता.तिथे कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत आणि त्यांची मुलेही खेळत असतात. मला नाही माहिती ते कोणी लिहिले. हे खूप वाईट आणि खालच्या पातळीचे राजकारण असून बदनामीसाठी केले जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई - उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांवर काढलेलं कर्ज फेडणं शक्य नाही. सध्याच्या कर्जमाफीच्या आदेशानुसार, हा शेतकरी थकबाकीदार ठरत नाही तसेच तो हे कर्ज बँकांना परतही करु शकत नाही कारण त्याच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार, मागील वर्षी जो शेतकरी थकबात्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी आहेत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची पिकं गेली ते शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरणार नाहीत. कारण त्यांच्या कर्जाची मुदत जून कीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढले ते पात्र ठरत नाहीत. २०२० साली संपणार आहे. त्यामुळे हे कर्ज थकबाकीत जाणार नाही. त्यामुळे हा शेतकरी नव्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे सरकार सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करु शकलेले नाही. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जांची पूर्ण माहिती न घेता घाईगडबडीत निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे सरकारने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा,असे राजू शेट्टी म्हणाले. 
उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा अध्यादेश काढला आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतले आहे त्यांच्या कर्ज खात्याचं व्याज आणि थकबाकी ही २ लाखांपर्यंत असावी, अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे. तसेच अशा शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.

मुंबई - पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणामुळे सुमारे एक लाख ३७ हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. करमाफी मिळेपर्यंत या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके न पाठवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीला ३३५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. सन २०१७ मध्ये जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा पालिकेच्या महसुलाचा मुख्य स्रोत राहिला आहे. राज्य सरकारने ५०० चौरस फुटांपर्यंच्या सदनिकांना सर्वसाधारण कर न आकारण्याचा अध्यादेश १० मार्च २०१९ रोजी जारी केला. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे २०१९-२० या वर्षाची मालमत्ता करदेयके जारी करण्याच्या पद्धतीत बदल करणे भाग पडले आहे. मालमत्ता कराची बिले १ एप्रिल ते ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर ते ३१ मार्च अशी दोन वेळा निघतात. त्यांची रक्कम ३० जून आणि ३१ जुलैपूर्वी जमा केल्यास सदनिकाधारकांना 'अर्ली बर्ड इन्स्टेंटिव्ह' योजनेअंतर्गत करसवलत मिळते. मात्र ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याच्या घोषणेचा घोळ कायम असल्याने करसंकलन खाते पहिल्या सहामाहीची बिले पाठवू शकले नाही.सरकारचा निर्णय झाल्यानंतर बिले पाठवायची, तर देयके जारी करण्याच्या विहित पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार संगणक प्रणालीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करून घेण्यात आली. तरीदेखील २०१९-२० या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ३० जून २०१९ पर्यंत पाठविणे शक्य झाले नाही. परिणामी मालमत्ता कर वेळेत भरू इच्छिणाऱ्या करदात्यांना 'अर्ली बर्ड' सवलत मिळू शकली नाही. 
'अर्ली बर्ड' योजनेबाबत बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. 'अर्ली बर्ड' योजनेसाठी एकूण करपात्र सदनिकाधारक किती, त्यापैकी किती बिलांचे वाटप करण्यात आले, याची त्यांनी माहिती मागितली. भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे असिफ झकेरिया आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले. 

------------------------------

मुंबई - ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेमुळे नावारुपास आलेली अभिनेत्री मोना सिंह विवाहबंधनात अडकली आहे. दाक्षिणात्य बॉयफ्रेण्ड श्यामसोबत शुक्रवारी मोनाचा विवाह सोहळा पार पडला.या लग्न समारंभाला मोनाचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मोनाचे लाल लेहंग्यातील फोटो अभिनेता गौरव गेरा, अभिनेत्री रक्षंदा खान यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मोनाच्या लग्नाची गुड न्यूज समोर येताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.पंजाबी पद्धतीने मोना आणि श्याम यांचा विवाहसोहळा पार पडला. ३८ वर्षीय मोना सिंह गेल्या वर्षभरापासून श्यामसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मोनाचा पती श्याम हा इन्व्हेसमेंट बँकर असल्याची माहिती आहे.‘मिशन ओव्हर मार्स’ या वेब सीरिजमध्ये मोना नुकतीच झळकली होती. याआधी तिने कहने को है हमसफर, ये मेरी फॅमिली सारख्या वेब सीरिजही गेल्या वर्षी केल्या होत्या. राधा की बेटिया कुछ कर दिखायेगी, क्या हुआ तेरा वादा यासारख्या मालिका, थ्री इडियट्स सारख्या चित्रपटातील भूमिकांमुळे ती गाजली. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती.‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतील चष्मीष लूकमुळे मोना उत्सुकतेचा विषय ठरली होती. मालिकेच्या सुरुवातील मोना सिंह प्रत्यक्षात कशी दिसते, याविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यानंतर मोनाचा खरा लूक समोर आला. २००३ मध्ये सुरु झालेल्या एकता कपूरच्या या मालिकेने तीन वर्ष तूफान लोकप्रियता मिळवली होती. 

मुंबई - ख्रिसमस, इयर एंडिंग सेलिब्रेशन अशा सध्याच्या मूडला पूरक असलेला सिनेमा प्रदर्शित करण्यात बॉलिवूडचा हात कोणी धरू शकत नाही. तशात 'धर्मा प्रॉडक्शन'चा सिनेमा म्हणजे मग काय बोलायचीच सोय नाही. 'ख्रिसमस व्हेकेशन'चा मूड पकडून निर्माता करण जोहर, शशांक खैतान, अपूर्व मेहता आणि दिग्दर्शक राज मेहता यांनी 'गुड न्यूज' नावाचा एक हलका-फुलका आणि 'टाइमपास' सिनेमा ' आणला आहे. 'लाइट कॉमेडी'चा आधार घेऊन तो सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा प्रश्न मांडतो. मुंबईतील एका हाय-फाय सोसायटीत राहणारे वरुण बत्रा (अक्षयकुमार) आणि त्याची पत्नी दीप्ती बत्रा (करिना कपूर-खान) लग्नानंतर सात वर्षे उलटून गेल्यानंतरही आई-बाबा होऊ शकलेले नाहीत. कुटुंबाचा दबावही त्यांच्यावर आहेच. अनेक प्रयत्न करूनही यश येत नसल्याने दोघेही 'आयव्हीएफ' तंत्रज्ञानाच्या साह्याने अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे चंडीगडमध्ये राहणारे हनी बत्रा (दिलजीत दोसांज) आणि मोनिका (कियारा अडवाणी) यांचीही हीच समस्या आहे. 'आयव्हीएफ'साठी वरुण -दीप्ती आणि हनी-मोनिका मुंबईतील नामांकित 'आयव्हीएफ' तज्ज्ञ डॉक्टर जोशी (आदिल हुसैन) यांच्याकडे जातात. मात्र, आडनावातील साधर्म्यामुळे वरुण आणि हनी यांचे 'स्पर्म एक्सेंज' होतात आणि एकच गोंधळ उडतो. दोन्ही बत्रा दाम्पत्य मूळापासून हादरून जातात. उच्चभ्रू वर्तुळात राहणारे बत्रा दाम्पत्य आणि दुसरीकडे चंडीगडमध्ये काहीसे निवांत आणि 'रफ अँड टफ' जगणरे दुसरे बात्रा दाम्पत्य यामध्ये हल्लकल्लोळ उडतो. 'स्पर्म एक्सेंज'मुळे दोन टोकाच्या कुटुंबांचे गुणधर्मही एकमेकांमध्ये येणार तर नाहीत ना, अशी भीती चौघांनाही वाटू लागते. मग त्यानंतर काय होते? 'आयव्हीएफ'चा हा प्रयोग यशस्वी होतो का? त्या दरम्यान कोणत्या गमती-जमती होतात? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 'गुड न्यूज' पाहायला हवा. 
आधुनिक तंत्रज्ञानातील घोळामुळे होणारी विनोदनिर्मिती हा या सिनेमाचा 'वनलायनर' म्हणावा लागेल. पालकत्वाची जबाबदारी निभावण्याचा निर्णय घेताना पती-पत्नीची होणारी मनस्थिती, अनेक वर्षे प्रयत्न करूनही मूल होऊ न शकणाऱ्या दाम्पत्यांची व्यथा आदी विषयही या सिनेमातून येतात. अर्थात त्यासाठी निवडलेला आकृतिबंध हा विनोदी सिनेमाचा आहे. मध्यंतरापर्यंत सिनेमा उत्तम जमला आहे. मध्यंतरानंतर काहीसा 'मेलोड्रामा' आणि भावनिक प्रसंगांचा अतिरेक होतो. मात्र, सिनेमाचा आशयही तोच असल्यामुळे या सगळ्या गोष्टी चालून जातात. 'स्पर्म एक्सेंज' हा तसा संवेदनशील विषय असूनही सिनेमाची भाषा किंवा प्रसंगांची मांडणी अश्लिलतेकडे झुकत नाही. पांचट कमेंट्स आणि कमरेखालचे विनोद इथे कटाक्षाने टाळले जातात. लेखक-दिग्दर्शकाचे हे यश म्हणावे लागते. काही प्रसंग 'विकी डोनर'ची आठवण करून देतात. मध्यंतरानंतर दोन्ही दाम्पत्यातलं 'बाँडिंग' दाखवण्यासाठी काही प्रसंग जुळवून आणले जातात. म्हणजे मोनिकाच्या 'डिलिव्हरी'वेळी वरुण 'सेंटी' होतो, तर दीप्तीला 'डिलिव्हरी'साठी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी हनी मदतीचा हात पुढे करतो. सिनेमाला एक टिपिकल करण जोहर टाइप 'गुडी गुडी' फील आहे. उच्चभ्रू सोसायट्या, त्यांच्या जंगी पार्ट्या, टिपिकल पंजाबी धुडगूस आदी सारं काही दाखवलं जातं. सिनेमाची चौकट ही एका टिपिकल कॉमेडी बॉलिवूडपटाचीच असल्यामुळे काही 'हट के' दाखवण्याची धडपड केली जात नाही. अर्थात 'स्पर्म एक्सेंज'सारखा विषयच 'हट के' आहे. त्यावर मर्यादांची चौकट आखून सिनेमा करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. लेखक ज्योती कपूर, राज मेहता यांनी ही कसरत उत्तमपणे केली आहे. अक्षयकुमार आणि करिनाची 'केमिस्ट्री' मस्त जुळते. अक्षयकुमारचे विनोदाचे टायमिंगही भन्नाट. दिलजित दोसांज आणि कियारा अडवाणी यांनीही आपापली भूमिका चोख केली आहे. आदिल हुसैन वेगळ्या पठडीची भूमिका साकारतो. 'सौदा खरा खरा', 'चंडीगड में' सारखी गाणी डिजे-पबसाठी उत्तम. म्हणजे थोडक्यात काय तर, 'गुड न्यूज' हा डोक्याला फार न ताण देता पाहायचा सिनेमा आहे. 


मुंबई - भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवास्थानी जवळपास १ तास बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये सध्याचे राजकीय चित्र आणि राज यांची आगामी भूमिका याबाबत चर्चा झाल्याचे समजते.राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पुणे मेळाव्यादरम्यान पहिल्यांदाच सक्रीय झालेले पाहायला मिळाले होते. राज्यात तयार झालेल्या नवीन राजकीय समीकरणांमुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे यावेळी राज म्हणाले होते.आता भाजप नेते आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत शेलार यांना विचारले असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, ही मैत्रीपूर्ण भेट असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.मात्र या चर्चेमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई - भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे आता बंडाच्या पावित्र्यात असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्यास भाग पाडू नका असा इशाराच पक्षश्रेष्ठींना दिला. गोपीनाथ गडावर झालेल्या भाषणात त्यांनी अतिशय स्पष्टपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातली सत्ता गेल्याने भाजप आधीच अडचणीत आहे. झारखंडही हातातून गेला. या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता थेट दिल्लीतून सूत्र हलवली जात असून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी खडसेंशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.चर्चेसाठी खडसेंना दिल्लीत बोलावून नड्डा यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा राज्यातल्या राजकारणावर झाली असून त्यांना मी सगळी वस्तूस्थिती सांगितली. त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता अशी माहिती खडसे यांनी दिली. पक्षश्रेष्ठींनी कारवाई केल्यावरच त्यांना मी किती समाधानी झालो हे कळेल असेही खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तसेच एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी खडसे यांच्याबाबत एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.एकनाथ खडसे यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मात्र त्यांचे समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नाही, असे म्हणत शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण केला. याबाबत विचारले असता एकनाथ खडसे यांनी मौन बाळगले. त्यामुळे एकनाथ खडसे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात, याकडेच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
.कझाकिस्तान - कझाकिस्तानमध्ये अलमाटी विमानतळावर विमानाला अपघात झाला आहे. टेक ऑफवेळी विमान दुमजली इमारतीला धडकून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमानात एकून १०० प्रवासी होते. त्यापैकी ७ जणांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघातस्थळी बचाव कार्य सुरु असून प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बेक एयर फ्लाइट २१०० चे स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे.

बेळगाव - बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सीमाभागात संतप्त पडसाद उमटत आहेत.महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमाप्रश्न गेल्या ६० वर्षांपासून सुटत नाही. इथल्या मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर अगोदर मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घालून विषय संपवा, असे वादग्रस्त वक्तव्य भीमाशंकर पाटील यांनी केले.
दरम्यान, भीमाशंकर पाटील यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि अन्य शिवसैनिकांनी दिला. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी बोलताना बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न केला होता. 

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले. खातेवाटपात काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित एकही महत्त्वाचे खाते मिळालेले नाही. कृषी, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा या चार महत्वाच्या खात्यापैकी एकही खाते काँग्रेसकडे नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खातेवाटपाच्या चर्चेत याबाबत ठोस भूमिका न मांडल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ग्रामीण भागाशी संबंधित एखादे जादा खाते पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा खटाटोप सुरू झाला आहे.
येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यासाठी महाविकासआघाडीने तयारी देखील केली आहे. या विस्तारात नव्या ३६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज भवनाऐवजी विधान भवनात हा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी विधान भवनात सुरु झाली आहे. पण त्याआधी काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे.
याआधी ही काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आला होता. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून नावे आली नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार पुढेढकलण्यात आल्याचे या भेटीनंतर समोर आले होते.

नवी दिल्ली - भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी वर्षभराच्या आतच काँग्रेस पक्ष सोडला. फुले आता स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.सावित्रीबाई फुले यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा राजीनामा दिला. सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून जेमतेम वर्ष झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.काँग्रेसमध्ये आपला आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठी दिली. आता आपण स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचे फुले यांनी जाहीर केले.
सावित्रीबाई फुले यांनी २०१२ मध्ये भाजपच्या तिकिटावर बलहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. निवडणूक जिंकत फुलेंनी संसदेत प्रवेश केला. भाजपचा अनुसूचित जातीवर्गाचा महिला चेहरा म्हणून त्यांना ओळख मिळाली होती.

मुंबई - म्हाडा अध्यक्ष आमदार मा. उदय सामंत यांचा आज २६ डिसेंबर रोजी जन्मदिवस आहे .प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवस त्यांच्या आमदार क्षेत्रामध्येच होत असतो.मुंबई आणि इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या गावी पाली येथे त्यांचे चाहते पोहचत असतात.परंतु, या वर्षी म्हाडातील युनियन मधील अधिकाऱ्यांनी ठरविले होते कि, मा. उदय सामंत यांचा वाढ दिवस मुंबईमध्येच साजरा करायचा.त्यांनी म्हाडा वसाहतीमध्ये असलेले इलाईट या हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मोठ्या प्रमाणात म्हाडातील सोसायट्यामधील अनेक पधादिकारी यावेळी उपस्थित राहिले होते.शिवाय म्हाडातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यावेळी एकत्रित दिसले. मोठ्या उत्साहात मा. उदय सामंत यांचा वाढदिवस या ठिकाणी केक कापून साजरा केला.यावेळी मा. उदय सामंत यांनी उपस्थितांना संबोधित केले.कायर्क्रम साजरा केल्याबद्धल म्हाडातील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मा. उदय सामंत यांनी आभार मानले. 


मुंबई - ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या ३६ मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा राज भवनाऐवजी विधान भवनात पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार तसेच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी विधान भवनात सुरु झाली आहे.३० डिसेंबरला दुपारी १ वाजता हा शपथविधी होणार आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांची नावं निश्चित न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आला होता.महाविकासाघाडीच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री (एकूण १३ मंत्री) आणि काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचा शपथविधी गेल्या २८ नोव्हेंबरला पार पडला होता. 

शिवसेना
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणाकुणाची वर्णी लागते, याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रविंद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि शंभूराज देसाई-पाटण यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे आणि डॉ. किरण लहामटे यांच्या नावाचा समावेश आहे.
काँग्रेस
काँग्रेस मंत्र्यांची अंतिम यादी नवी दिल्लीत निश्चित होते आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्यासह विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि प्रणिती शिंदे यांचा संभाव्य मंत्र्यांमध्ये समावेश आहे.
मुंबई - मुंबईवर नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.त्याशिवाय आता मुंबईत अतिरिक्त ५५०० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यापैकी ५०० सीसीटीव्ही हे मुंबई महापालिका बसवणार आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या सीसीटीव्हीची करडी नजर रस्त्यावर कचरा, डेब्रीज टाकणाऱ्यांवर असणार आहे. मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत मुंबईत जास्त काळजी घेतली जाते. शहरात प्रत्येक चौकात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांना मुंबई पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या प्रत्येक चौकात, सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईच्या पोलिसांना मोठी मदत करत आहेत. आता मुंबई महापालिकासुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे.
या नव्या तंत्रामुळे, झाड कोसळणे, इमारत पडणे, पूरस्थिती निर्माण होणे, अवैधरित्या कचरा टाकणे, डेब्रीज टाकणे, चेंगराचेंगरीची परिस्थिती या बाबींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.मुंबई सुरक्षित करण्यासोबतच मुंबई दूर्घटनामुक्त, कचरामुक्त करण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तापालटाचा फटका अ‍ॅक्सिस बँके’सारख्या खाजगी क्षेत्रातील बँकेलाही बसण्याची शक्यता आहे. पोलिस विभागाची वेतन खाती (सॅलरी अकाऊण्ट्स) अ‍ॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली ठाकरे सरकारने सुरु केल्या आहेत. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची चिन्हं आहेत.
महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार ११ हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता. सत्तापालटानंतर महाविकास आघाडी सरकारकडून ही खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसारखा मोठा ग्राहक अ‍ॅक्सिस बाहेर जाणार आहे. महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक खात्याला मंत्री मिळाल्यानंतर हा बदल करण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची यादी रखडल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार लांबल्याचे सांगण्यत येत होते. पण, आता मात्र चित्र स्पष्ट झाले आहे.३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून दुपारी १ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांच्यी नावे निश्चित न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून अजून नावंच आली नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आल्याचं या भेटीनंतर समोर आले. 
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर पार पडलेलल्या हिवाळी अधिवेशनानंतर लागलीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता होती. सोमवारचा दिवस याविषयीच्या अनेक घडामोडींनी परिपूर्ण होता. पण, यामध्येच काँग्रेसकडून मंत्रीपदासाठीची संधी कोणाच्या वाट्याला जाणार हे मात्र स्पष्ट झाले नाही. परिणामी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. लांबणीवर पडलेल्या याच विस्तारासाठी आता ३० डिसेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. तेव्हा हा दिवस राज्याच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. 

मुंबई - झारखंडच्या जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. देशात अशीच परिस्थिती राहिली तर संधी मिळेल तेव्हा देशातील जनताही झारखंडप्रमाणेच निर्णय घेईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने सत्ता आणि संपत्तीचा वापर करून झारखंड हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासीबहुल लोकसंख्या असणाऱ्या झारखंडने तसे होऊन दिले नाही. यासाठी मी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन करतो, असे शरद पवार म्हणाले..केंद्र सरकारने देशाचे अर्थकारण योग्यरित्या हाताळले नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, देशातील मंदी वाढत आहे. या सगळ्याची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. झारखंडमधील जनतेने यावर नापसंती व्यक्त केल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीविषयी (एनआरसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले. काल दिल्लीतील सभेत मोदींनी केलेले वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले आम्ही एनआरसीविषयी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसदेत चर्चा केलेली नाही. मात्र, राज्यसभेतील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे देशभरात एनआरसी लागू करणार असे सांगितले होते. त्यावेळी मी स्वत: आणि प्रुफल्ल पटेल राज्यसभेत उपस्थित होतो. त्यापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवेळीही गृहमंत्र्यांनी हीच भूमिका मांडली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या भूमिकेतील विरोधाभास दिसून येत आहे. या सगळ्यामुळे देशात कारण नसतानाही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

बीड - पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट झाल्याने खळबळ उडाली असून, या स्फोटात एक तरुण गंभीर झाला आहे. परळी स्टेशनवर रेल्वे उभी होती त्यावेळी ही घटना घडली. सय्यद अक्रम असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.सय्यद अक्रम हा तरुण पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत त्याच्या कुटुंबासमवेत चढला होता. ही रेल्वे परळी रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी रेल्वेचे इंजिन बदलण्याचे काम सुरू असताना रेल्वे डब्यातील शौचालयात स्फोट झाल्याचा आवाज आल्याने काही प्रवाशांनी शौचालयाचा दरवाजा उघडला असता त्यात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.या स्फोटानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमी तरुणाला रुग्णालयात हलविले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र स्फोट नेमका कशाचा होता, याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

मुंबई - दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी भाकर फाऊंडेशन, बाल सभा गोरेगाव येथे 'evolv' the power of thought या गृपच्या माध्यमातून ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात 'इवोल्व' चे CEO निलकबिर आणि इतर सदस्यांनी मुलांसोबत विविध खेळामध्ये सहभाग घेतला त्याच दरम्यान मुलांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या त्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमात 'इवोल्व' CEO निलकबिर, CAO अनिश जेसवाणी, वर्षाताई कांबळे तसेच 'इवोल्व' आणि भाकर फाऊंडेशनचे पदाधिकारी व बाल सभेचे सदस्य उपस्थित होते.अतिशय चांगल्या पध्दतीने ख्रिसमस पार्टी साजरी करण्यात आली. भाकर फाऊंडेशन मुंबई तर्फे इवोल्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.


रांची - झारखंड विधानसभा निवडणूक २०१९ ची मतमोजणी सुरु झाली आहे. ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान ५ टप्प्यांमध्ये मतदान झाले. आज या मतांची मोजणी होत आहे. ही प्रक्रिया सकाळी 24 जिल्हा मुख्यालयांमध्ये सुरु झाली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये यासाठी व्यवस्था केली आहे. मतमोजणीच्या सर्वाधिक २८ फेऱ्या चतरामध्ये तर सर्वात कमी 2 फेऱ्या चंदनकियारी आणि तोरपा येथे होतील. पहिला निकाल दुपारी १ वाजता येण्याची शक्यता आहे. परंतु सध्याच्या निकाल पाहता काँग्रेस आणि जेएमएम पक्ष आघाडीवर आहेत.अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेस झारखंडमध्ये सत्ता स्थापन करेल.

मुंबई - शिवसेना भाजपमध्ये संबंध ताणलेले असताना, त्यात आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या हि काहींना काही ट्विट करत असतात. "फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही", असा थेट हल्लाबोलच अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे केला आहे. आपण सावरकर नाही असे विधान राहुल गांधींनी केले होते. त्याला देवेंद्र फडणवीसांनी १४ डिसेंबरला ट्विटद्वारे उत्तर दिले. त्यांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी रविवारी रिट्विट करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. 
फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही, असा टोला लागवत त्यांनी पुढे म्हटले आहे की, एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा कायम विचार केला. यासाठी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान दिले असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. तर, सावरकरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अमृता यांनी प्रश्न उभे केले असल्याचे चित्र आहे.
दिल्लीत ८ डिसेंबरला अनाज मंडी परिसरात भीषण आग लागली होती. त्यात ४३ लोकांचा मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली - दिल्लीमधील किराडी परिसरात इंदर एनक्लेवमध्ये रात्री एका गोदामाला आग लागली एका घराच्या ग्राऊंड फ्लोअरवर कपड्यांचे गोदाम होते. तेथूनच आग पसरली या भीषण आगीत ९ लोकांचा मृत्यू झाला. या घरात एकूण ११ लोक राहत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. जखमींना दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाच महिन्यातील दिल्लीतील ही तिसरी आगीची घटना आहे.
आग इतकी भीषण होती की विझवण्यासाठी घटनास्थळावर ७ अग्निशामक गाड्यांना जवळपास ३ तास मेहनत घ्यावी लागली. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर कपड्यांचचे गोदाम होते. आणि इमारतीचे वरचे दोन मजले निवासासाठी वापरले जात होते. इमारतीत अग्नि सुरक्षा यंत्रणा नव्हती. त्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण गेले. दुसऱ्या मजल्यावर एका गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याची माहिती आहे.


मुंबई - विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. आता ही थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये १९ डिसेंबरपासून १० रुपयांच्या थाळीची सुरुवात करण्यात आली आहे.पालिकेच्या कॅन्टिनमध्ये १० रुपयांत जेवणाची थाळी सुरु करण्यात आली आहे. या जेवणाच्या थाळीमध्ये दोन चपात्या, भात, डाळ आणि दोन भाज्या असा आहार असणार आहे. परंतु ही थाळी केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. 
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महागाई लक्षात घेता दहा रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास ५० रुपयांचा खर्च येणार आहे. उर्वरित ४० रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा मुद्दा या प्रस्तावात असल्याची माहिती मिळत आहे. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार आहे. 
दरम्यान, नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना विधानभवनाच्या परिसरात ५ ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. नागपूर पोलिसांनी बंदोबस्तासाठी आलेल्या हजारो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी १० रुपयांची खास थाळी सुरू केली. चपाती, भाजी, भात, मिठाई आणि सलाड असे या थाळीचे स्वरूप आहे. रोज ६ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच गरम जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. ड्युटीच्या ठिकाणी वेळेत जेवण मिळत असल्याने महत्वाची सेवा उपलब्ध झाल्याची भावना पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.


नागपूर - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत हे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच सिंचन प्रकल्पाची कामे जी कामे राहिली आहेत, ती आधी पूर्ण केली जातील. तसेच राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. समृद्धी महामार्गासाठी आता राज्य सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच समृद्धी महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीचत समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच १० रुपयांत थाळी ५० ठिकाणी आधी सुरु करण्यात येणार आहेत.तसेच यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष निधीची घोषणाही केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मदत करण्याची विनंती केली. मोदी मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात मग महाराष्ट्राला का देत नाहीत?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारले जाणार आहे. राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

नालासोपारा - फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तुळिंज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुतर्फा बसलेल्या बेकायदा फेरीवाल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या होती. त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. पालिका प्रशासनावर वाढता दबाव पाहता वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण अधिकारी गोकुळ पाटील कर्मचाऱ्यांसह गाला नगरच्या राज नगर परिसरात गेले होते. यावेळी फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका हातगाडीवाल्याशी हातापायी झाली. त्यावेळी एका महिला फेरीवाली व तिच्या इतर साथीदारांकडून चाकूहल्ला करण्यात आला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.

नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोलीतील डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेल्या ९ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. यामध्ये एक टक्का कमिशन भेटत नाही म्हणून जाणीवपूर्वक रखडले असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी महासभेत केला.नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ऐरोलीत डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाचे पाहिल्या टप्प्यात उद्घाटन झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी आहे. या कामाला दिरंगाई होत असल्याने नगरसेवक संजू वाडे यांनी हे काम कधी होईल? असा सवाल महासभेत विचारत शहर अभियंत्याच्या कार्यशैलीवर घणाघात केला. हे काम होत नाही तोपर्यंत २४ डिसेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. यावर शहर अभियंता यांनी या भवनाचे काम अडीच महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. यावर माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना धारेवर धरले. या भवनाचा मुख्य गाभा डोम आहे. त्यावर कधीतरी चढून कामाची पाहणी केली आहे का? असा सवाल करत हे काम एक टक्का कमिशनपोटी जाणीवपूर्वक रखडवले जात आहे. तसेच हे कमिशन कोण मागत आहे? याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कमिशन घेतले जात आहे, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे हे काम लवकर करण्यात यावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इमारतीचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जात आहे. या इमारतीच्या बांधकाम, डोमवर कोट्यवधीचा घोटाळा केला जात आहे. नऊ वर्षात हे काम झाले नाही, तर ते अडीच महिन्यात कसे पूर्ण करणार? असेही सोनवणे म्हणाले.झालेल्या गंभीर आरोपांवर समिती स्थापन करून चौकशी होणार. तसेच त्याची शहानिशा केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास त्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे नवी मुंबईतील महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ म्हणाले.येत्या २४ डिसेंबरपासून स्मारकाच्या आवारात उपोषणाला बसणार आहे. काम कधी पूर्ण होणार? याचा कालावधी सांगितला जात नाही, तोपर्यंत उपोषणाला बसणार आहे, असे नगरसेवक संजू वाडे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. या कामात भ्रष्टाचार सुरू असून एक टक्का कमिशनसाठी हे काम जाणीवपूर्वक लांबवले जात आहे. यामध्ये कोण कमिशन मागत आहे? त्याबाबत माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, असेही ते म्हणाले.

ठाणे - चोरट्यांनी एटीएम मशिन फोडून तब्बल १३ लाखांची रोकड चोरल्याचा प्रकार शहापूर तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही काढून ठेवण्यात आले होते. त्यानंतर हा चोरीचा प्रकार घडला असून याठिकाणी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात आली नव्हती.आसनगावमधील संभाजीनगरमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर असून १३ डिसेंबर रोजी मशिनमध्ये पाच लाख रुपये भरण्यात आले होते. त्यावेळी मशिनमध्ये एकूण १३ लाख ९४ हजार ६०० रुपये इतकी रक्कम होती. मात्र १८ डिसेंबर रोजी सकाळी एटीएम मशिनचे नेटवर्क डाऊन असल्याचा मेसेज संबंधित एटीएमच्या अधिकाऱ्याला आला. काहीतरी गडबड असल्याच्या शक्यतेवरून दुपारी अधिकाऱ्यांनी धाव घेत मशिनची पाहणी केली. तर मशीनचा पुढील भाग उचकटलेला असल्याचे दिसले. मशिनचा इतरही काही भाग खाली पडला होता. चोरट्यांनी मशिन फोडून लाखो रुपयांची रोकड लांबवली असल्याचे आढळून आले. मशिनमध्ये केवळ ११ हजार रुपयेच शिल्लक होते. मशीनमधील १३ लाख १ हजार ७०० रुपयांची रोकड चोरीला गेली असून ही चोरी रात्री १ ते पहाटे ४.१८ दरम्यान झालेली आहे. रात्री १ वाजून ९ मिनिटांनी मशिनमधून ८१ हजार ९०० रुपये काढण्यात आले होते. त्यानंतर मशिनमधून लाखो रुपये गायब झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे एटीएम सेंटरममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. आठ दिवसांपूर्वी कॅमेरे काढण्यात आले होते. कॅमेरे असते तर चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले असते. त्यामुळे आरोपींचा शोध तात्काळ लागला असता. परंतु आता आरोपींना अटक करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. 


मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'दबंग ३' २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सलमानच्या चाहत्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता होती. 'दबंग ३'च्या प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते. 'बॉक्स ऑफिस इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, 'दबंग ३'ने ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर जवळपास ३० कोटींहून अधिक कमाई केल्याची माहिती मिळत आहे. प्रभु देवा दिग्दर्शित 'दबंग ३'मध्ये सलमान खानशिवाय सोनाक्षी सिन्हा, डिंपल कपाडिया, सई मांजरेकर, अरबाज खान आणि सुदीप किच्चा प्रमुख भूमिका साकारत आहेत. जेष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सईने सलमानच्या प्रेयसीच्या भूमिका साकारली आहे. 
प्रदर्शनाच्या दोन दिवस अगोदरच बुधवारी संध्याकाळी 'बॉयकॉट दबंग ३' ट्विटरवर ट्रेंड होत होता. 'दबंग ३' सिनेमातील 'हुड हुड दबंग...' सिनेमातील गाण्याला कडाडून विरोध होत होता. या सिनेमातील गाण्यात साधू संतांना गिटार पकडून डान्स करताना दाखवण्यात आले होते. काही लोकांनी गाण्यातील या दृष्याला विरोध केला होता. अधिकृत केलेल्या घोषणेत ही दृश्ये काढण्यात आल्याच सांगण्यात आले आहे. nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget