January 2019मुंबई - जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पाच जण दृष्टिहीन झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी बुधवारी आयुक्तांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त कुंदन, उपायुक्त, आरोग्य हे चौकशी करतील. सात दिवसांत चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल.सर्वपक्षीय गटनेत्यांनी बुधवारी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. घटनेची जबाबदारी अधीक्षकांची असताना पर्यवेक्षकावर कारवाई झाल्याचे रवी राजा यांनी नमूद केले. या प्रकरणात ज्यांची दृष्टी गेली त्यांना नुकसानभरपाई म्हणून २० लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

मुंबई - मुंबईकरांना जलमार्गाने जलद प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने उबर कंपनीसोबत स्पीड बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होईल. गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटा व मांडवा जेट्टी या ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्यात येईल. ६ ते ८ आसनी व १० आसनी बोटींची सुविधा यामध्ये पुरविण्यात येईल.मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार व उबरचे प्रभजीत सिंह या वेळी उपस्थित होते. भाटिया यांनी यामुळे मुंबईतील जलप्रवास अधिक सुखकर व जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला.मुंबई - लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याबाबत सेना-भाजपमध्ये एकमत झाले तर राज्य सरकारला विधानसभा विसर्जित करावी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपते. त्याआधी सहा महिने म्हणजे ९ मेनंतर केव्हाही विधानसभा निवडणुका घेण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकार असला, तरी सत्ताबदल झाल्यास काळजीवाहू सरकार चार-पाच महिने धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नसल्याने विधानसभेची मुदत संपण्याच्या एक-दीड महिना आधीच निवडणूक घेतली जाते, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले. मात्र, एकत्रित निवडणुकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असून त्या नियोजित वेळीच व्हाव्यात, ही भूमिका आहे, तर शिवसेनेसह विरोधी पक्षांची एकत्रित निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे.
एकत्रित निवडणूक झाल्यास पैसे, वेळ, मनुष्यबळ यात बचत होणार असून आचारसंहिता कालावधीही एकाच वेळी राहिल्याने प्रशासनावरही परिणाम होणार नाही. त्यासाठीच ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली असून २०२४ पासून निवडणुका एकत्र घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.
मात्र मेमध्ये लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक घेतल्यास आणि सत्ताबदल झाल्यास नवीन विधानसभा अस्तित्वात येऊन नवीन सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत काळजीवाहू सरकारला महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत. त्यासाठी विधानसभेची मुदत संपण्याआधी एक-दीड महिना आधी निवडणूक घेतली जाते. पण राज्य सरकारने फेब्रुवारी अखेपर्यंत किंवा लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधी विधानसभा विसर्जित केली, तर लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्रित घेणे आयोगाला सुकर होईल, असे संबंधितांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ५२५ कोटी रुपये तर विधानसभेसाठी ५९० कोटी रुपये इतका खर्च आला होता. एकत्रित निवडणुका घेतल्यास सव्वा लाख अतिरिक्त मतदान यंत्रे अन्य राज्यांमधून घ्यावी लागतील व ती उपलब्ध असल्याची माहिती उच्चपदस्थांनी दिली.नवी दिल्ली - आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याच्या ते तयारीत आहेत. दरम्यान, संपूर्ण अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर, सरकारनेही विरोधकांना उत्तर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल.वर्तमान लोकसभेच्या अंतिम सत्रामध्ये राफेल प्रकणावरुन विरोधक सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारनेही यावर उत्तर देण्याची जय्यत तयारी केली आहे. तसेच नोटाबंदीने कथित बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, असा अहवाल सांख्यिकीय आयोग प्रसिद्ध करणार होते. मात्र, सरकारने हा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. या प्रकरणावरही विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश - ‘आपण राम आणि कृष्णाचे भक्त…धुम्रपान सोडा’, रामदेव बाबांचं कुंभ मेळ्यातील साधूंना आवाहनयोगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संत आणि साधूंना धुम्रपान सोडण्याचे आवाहन केले आहे. ‘आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धुम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता ? आपण धुम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे’, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.‘आपण साधू असून आपण सगळ्याचा त्याग केला आहे. एका मोठ्या कारणासाठी आपण घर, आई, वडील सगळ्यांना सोडलं आहे. पण मग धुम्रपान का सोडू शकत नाही’. रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात असणाऱ्या अनेक साधूंकडून चिल्लम गोळा केली आणि आपण पुन्हा कधी तंबाखूला हात लावणार नाही अशी शपथ घेण्यास सांगितले.रत्नागिरी - प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकारकडून सुकथनकर समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ५ व ६ फेब्रुवारीला रत्नागिरीत येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.राजापूर आणि देवगड येथे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीकडून रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांचा जोरदार विरोध आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, काढण्यात आले होते. त्यामुळे हा विसंवाद दूर करण्यासाठी द.म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची रचना करण्यात आली आहे. सुकथनकर यांच्यासह समितीमध्ये डॉ. श्रीरंग कद्रेकर ( माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ), ज्येष्ठराज जोशी ( ICT चे माजी संचालक ) यांचा समावेश आहे.ही समिती प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचे म्हणणे ऐकून घेवून आपले अभिप्राय सादर करणार आहे. त्याकरिता सुकथनकर समितीचे सदस्य ५ आणि ६ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी पावणे सहा यावेळात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहे.

पंढरपूर : मनसे आणि आमची विचारधारा निराळी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे दिले. आम्हा दोन पक्षात आघाडी होणार असल्याची चर्चा ही वावडय़ा असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा बुधवारी पंढरपूर येथे आली होती. या वेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. मनसे आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.पाटील म्हणाले, की मनसे आणि आमची विचारधारा निराळी आहे. आमच्यात युतीसाठी कुठल्याही प्रकारची चर्चाही सुरू नाही. या प्रकारच्या गप्पा या वावडय़ा आहेत.अहमदनगर - लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण येथे आंदोलनाला सुरूवात केली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून बुधवारी रात्री ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे आज राळेगणसिद्धीतील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती अण्णांसोबत उपोषणास बसणार आहे.
अण्णा हजार यांनी आंदोलनाला सुरूवात करताच बुधवारी रात्री राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेत आंदोलन कशा पद्धतीने प्रभावीपणे पुढे नेता येईल, याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज ग्रामस्थांचे उपोषण आंदोलन, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. बुधवारी दिवसभरात अण्णांनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारच्यावतीने बोलणी करण्यासाठी येणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आलेच नाही, ते आज किंवा उद्या राळेगणसिद्धीमध्ये येण्याची शक्यता आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अण्णांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा किमान वेळ सरकारला हवा आहे. अण्णांच्या सर्व मागण्या सरकारला मान्य असल्याने अण्णांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकायुक्त कायदा करण्यात येणार आहे. त्यामुळे अण्णांनी उपोषण आंदोलन मागे घ्यावे, असे महाजन यांनी आवाहन केले आहे.मुंबई - विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र सेनानी विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांना हिंदुत्ववादी विचारधारना असलेले कट्टरपंथी आणि दहशतवादी सांगितले आहे. विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासात वीर सावरकरांचा चुकीचा इतिहास सांगितला आहे. १८८५ साली सुरु झालेल्या भारतीय संघर्ष चळवळी बद्दल चुकीची माहिती पुस्तकात छापण्यात आली आहे. पुस्तकातील 'दहशतवादी क्रांतिकारी आंदोलन' धड्यात वीर सावरकर वासुदेव बलवंत फड़के, पंजाबचे रामसिंग कुका, लाला हरदयाल, रास बिहारी बोस यांसारख्या क्रांतिकारकांची नावे आहेत.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशतवाद आणि कट्टरवाद पसरवण्यात आला होता आणि धड्याच्या स्वध्यायात 'दहशतवादी क्रांतिकारी आंदोलनत वीर सावरकरांची काय भूमिका होती?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि प्रश्नाचे उत्तर 'आतंकवादी' असे देण्यात आले आहे.मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नारायण मेहरे यांनी सांगितले पुस्तकातील वादाचे मुद्दे बदलण्यात येणार आहेत. ते म्हणाले 'पुस्तकात सावरकरांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. हे पुस्तक २००१ साली लिहलेलले आहे. पण याआधी कधीही विवाद झालेला नाही. फक्त माराठी माध्यामातून ही तक्रार आली आहे. मला कोणताही विवाद नको आहे, म्हणून पुस्तकातून विवादित भाग काढला जात आहे'. हे पुस्तक प्रध्यापक एनसी दीक्षित आणि प्रध्यापक अरुण भोसले यांनी लिहले आहे.

अहमदाबाद - गांधी घराण्याने न्यायालयाच्या कितीही चकरा मारल्या तरी एक दिवस त्यांना तुरुंगात जावेच लागेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते बुधवारी सुरत येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना थेट इशारा दिला. यावेळी मोदी यांनी म्हटले की, गांधी घराण्याच्या जवळपास चार पिढ्यांनी देशावर राज्य केले. त्यांचे नाव घेतले की देशातील लोक थरथर कापायचे. मात्र, कोणीही कल्पना केली नव्हती की, चार पिढ्या देशावर राज्य करणाऱ्यांना एक चहावाला आव्हान देईल. तुम्हाला माहितीच असेल की, गांधी घराणे सध्या जामिनावर आहेत. त्यांचे अनेक सहकारी देखील न्यायालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र, त्यांनी न्यायालयाच्या कितीही चकरा मारल्या तरी एक दिवस गांधी घराण्याला तुरुंगात जावेच लागेल, असे मोदी यांनी सांगितले.

मुंबई - सरकारकडून लागू करण्यात आलेला लोकायुक्त कायदा फसवा आहे. या कायद्यात मुख्यमंत्र्यांवरील कारवाईसाठीचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. त्यामुळे चौकशी कशी होईल? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस केंद्राचा लोकायुक्तासाठीचा कायदा लागू करावा, अशी मागणी करत होते. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या कायद्यात बदल केला आहे. या बदलांमुळे लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांची चौकशी करता येणार नसून राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.फडणवीसांनी २०१४ला केंद्राकडून करण्यात आलेला लोकायुक्त कायदा लागू का केला नाही? असा सवाल करत मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. नव्या कायद्यानुसार लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री कार्यालय आणले असेल, तर लोकायुक्तांना ३१ ऑक्टोबर २०१४ पासून चौकशी करण्याचे अधिकार द्यावेत. शिवाय मुंबईतील डीपी प्लॅन, मुंबई, पुणे, नागपूर आदी मेट्रोच्या कामांसोबत मुख्यमंत्री कार्यालयात असलेल्या बिगर सरकारी लोकांचीही चौकशी करण्याचे अधिकार यात देण्यासाठी सुधारणा करा, तरच यामागे स्वच्छ भूमिका आहे. हे जनतेला कळेल अन्यथा ही एक धूळफेक ठरेल, असेही मलिक म्हणाले.विधानसभेचा कालावधी संपत आलेला असताना मुख्यमंत्र्यांना हा कायदा का आणावा वाटला. शिवाय याच काळात समाजसेवक अण्णा हजारे यांनी हा विषय लावून धरल्याने त्यात हजारे आणि फडणवीस यांनी काही हातमिळवणी केली काय, असा सवाल करत मलिक यांनी टीका केली.या कायद्यात मुख्यमंत्र्यांवरील कारवाईसाठीचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. त्यामुळे चौकशी कशी होईल, असा सवाल त्यांच्याकडून करण्यात आला.अलीगड - ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरातून वाहण्यात आली. मात्र हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर या पुतळयाचे दहन केले. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडला. अलीगड येथे हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. यावेळी हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय हिने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर पिस्तुलामधून गोळ्या झाडल्या. तसेच यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केला. तसेच मिठाई वाटण्यात आली. ''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे योग्य नाही. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेय हिने केले. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 


तेलंगणा - शहरातील नामपल्ली भागात भरलेल्या ऑल इंडिया इंडस्ट्रियल एक्सिबिशनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत.नवी दिल्ली - व्हिडिओकॉन प्रकरणी चंदा कोचर आयसीआयसीआयच्या आचारसंहिता आणि धोरणांच्या उल्लंघनप्रकरणी दोषी ठरल्या आहेत. बँकेच्या अंतर्गत चौकशीच्या अहवालानुसार, कोचर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना त्यांनी वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटींचे कर्ज दिले होते.
आयसीआयसीआय ही देशातील तिसरी मोठी बँक आहे. यापुढे चंदा कोचर यांना बोनससह अन्य भत्ते देण्यात येणार नाहीत. सीबीआयने त्यांना, त्यांचे पती व उद्योजक दीपक कोचर, व्हिडिओकॉनचे व्यवस्थापक धूत आणि आणखी काही जणांना गुन्हेगारी कट आणि कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ६ दिवसांनी बँकेकडून ही कारवाई करण्यात आली.
सेवानिवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली जारी करण्यात आलेल्या अहवालात कोचर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदी असताना बँकेकडून वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटींचे कर्ज देण्यात आले. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता. चंदा कोचर या नियमबाह्य वर्तनासंबंधी आयसीआयसीआय बँकेने अंतर्गत चौकशी सुरु केल्यानंतर सुरुवातीला त्या दीर्घ रजेवर गेल्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात चंदा कोचर यांनी बँकेतील पदांचा राजीनामा दिला.केरळ - केरळमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ओ एम जॉर्ज असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच काँग्रेसने जॉर्जची पक्षातून हकालपट्टी केली आहे.वायनाड जिल्ह्यातील पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी जॉर्ज यांच्या घरात एक आदिवासी कुटुंब घरकाम करायचे. या कुटुंबात १७ वर्षांची मुलगी देखील होती. गेल्या दीड वर्षांपासून जॉर्ज त्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. हे अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
पीडितेने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. जॉर्जने पीडित मुलीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
जॉर्जविरोधात बलात्कार आणि ऍस्ट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यापासून जॉर्ज पसार झाला आहे. आम्ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देणार नाही, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले.


मुंबई - सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. यामुळे युती झाली तरीही ही जागा भाजपकडे जाणार नसून यामुळे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेले आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून संभ्रम असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युती होणार अशी चर्चा सुरु झाली होती. आता शिवसेनेने भाजपला 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मुंबई - बोरिवली नॅशनल पार्क परिसरात एका तरुणीवर मित्राकडूनच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित तरुणी मित्रासोबत नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेली होती. मात्र या दोघांमध्ये काही कारणांवरुन वादावादी झाली. यानंतर रागाच्या भरात त्यानं मैत्रिणीवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. मैत्रिणीवर हल्ला करुन त्याने स्वतःवरदेखील चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.स्थानिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधत घडला प्रकार सांगितला. यानंतर कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दोघांवरही उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरुणाने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला का केला?,याचा शोध पोलीस घेत आहेत. 

आसाम - आसाममधील २००८ मधील बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयच्या जलदगती न्यायालयाने नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रण्ट ऑफ बोडोलॅण्डचा (एनडीएफबी) प्रमुख रंजन दाईमरी याच्यासह अन्य ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.एनडीएफबीने ३० ऑक्टोबर २००८ रोजी गुवाहाटी, कोकराजहर, बोंगईगाव आणि बारपेटा येथे बॉम्बस्फोट मालिका घडविली होती. त्यामध्ये ८८ जण ठार झाले होते तर ४०० हून अधिक जखमी झाले होते. सीबीआयने आसाम पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता आणि २२ आरोपींची नावे असलेली दोन आरोपपत्रे दाखल केली. या प्रकरणातील सात आरोपी अद्याप फरार आहेत. पहिले आरोपपत्र २००९ मध्ये दाखल करण्यात आले तर दुसरे आणि अंतिम आरोपपत्र २० डिसेंबर २०१० रोजी सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी २०११ मध्ये सुरू झाली आणि २०१७ मध्ये हे प्रकरण जलदगती न्यायालयात आले. सुनावणीदरम्यान ६५० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.


मुंबई - राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या लहान मुलांना १ फेब्रुवारीपासून "जंगल सफारी" अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी पालिका ५० रुपये शुल्क आकारणार आहे. "ऍनिमल प्लॅनेट" आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
काही वर्षापासून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण सुरू आहे. या नूतनीकरणाचा एक भाग म्हणून २०० आसने असणारे थ्री डी थिएटर उभारण्यात आले आहे. या थिएटरमध्ये सध्या "टू डी" पद्धतीचे ४ शो दाखवले जाणार आहेत. हे शो सकाळी ११, दुपारी १२.३०, २.३० व सायंकाळी ४ वाजता दाखवण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना हे शो मोफत पाहायला मिळणार असून इतर नागरिकांना व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे."ऍनिमल प्लॅनेट"मुळे उद्यानाला भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांना ही अनोखी पर्वणी असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. ऍनिमल प्लॅनेटमुळे प्राणी संग्रहालयात येणाऱ्या बालकांना दर्जेदार अशा चित्रफिती पाहता येतील असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी म्हणाले.मुंबई - म्हाडाच्या प्राधिकरणाच्या बैठकीत म्हाडाच्या पुनर्विकासच्या इमारती 'महारेरा'च्या कक्षेत येणार आहे, या निर्णयाचे मुंबई ग्राहक पंचायतीने स्वागत केले आहे. महारेरा अस्तित्वात आल्यापासून पुनर्विकासाच्या इमारतीदेखील महारेराच्या कक्षेत याव्या, अशी आग्रही मागणी आम्ही केली होती, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितलेप्राधिकरणाच्या बैठकीत पुनर्विकासाच्या इमारतीदेखील महारेराचे संरक्षण मिळावे यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुनर्विकास प्रकल्पांना महारेराचे संरक्षण प्राप्त व्हावे यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने महारेरा अस्तित्वात आल्यापासून हा विषय पकडून ठेवला होता. मुख्यमंत्र्यांनादेखील पत्र लिहिले होते. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आता म्हाडाच्या इमारतींना सुरक्षा प्राप्त होणार आहे. 
ठराव मंजूर झाला आहे. प्रकल्प हे महारेरा अंतर्गत आले पाहिजे. याबाबत महारेरा आणि आमच्यात मतभेद होते. कारण महारेराचे म्हणणे होते या कायद्यामध्ये नवीन इमारत येऊ शकते. जुनी इमारत येत नाही असे त्यांनी आम्हाला सांगितले. पण आम्ही त्यांना सांगितले की या कायद्याच्या घटनेमध्ये कुठेही असे लिहिलेले नाही. हा कायदा हाऊसिंग सेक्टर वाढावा यासाठी आहे. मुंबईत अनेक इमारतींचा पुनर्विकास होत आहे. अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडला आहे. विकासक भाडे वेळेवर देत नाहीत. काही जण बेघर ही झाले आहेत. त्यामुळे महारेरा म्हाडासह सर्व इमारतींना लागू झाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.


अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या राळेगणसिद्धी गावातील यादवबाबा मंदिरासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने दूत म्हणून येणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट अचानकपणे रद्द झाल्याची माहिती आहे.यापूर्वी जनलोकपालसाठी राज्यभरातून गर्दी आली होती. यंदा मात्र राळेगणसिद्धीमध्ये अशी गर्दी पहावयास मिळाली नाही. स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि काही कार्यकर्ते इतर जिल्ह्यातून आले आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काहीशी शांतता दिसून येत आहे. मात्र आंदोलनाचे उपोषणाचे दिवस जसे वाढत जातात अण्णांच्या आंदोलनाला धार चढते असा अनुभव आहे.
उपोषणस्थळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णा यांनी केंद्र व राज्य सरकावर टीका केली. 'सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नको असल्याने लोकपाल कायदा लागू केला जात नाही,' असा आरोप त्यांनी यावेळी केला. अण्णा हजारे यांनी पद्मावती मंदिर येथे जाऊन पद्मावती व संत निळोबाराय मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले. गावाच्या शाळेतील विद्यार्थ्यंसोबत यादवबाबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. 
सरकारच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज अण्णांच्या भेटीला येणार आहेत. मात्र उद्या येण्याची शक्यता असल्याची बोललो जात आहे. अण्णांचे उपोषण आंदोलन पाहता सरकारच्यावतीने आतापर्यंत दोनदा गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीमध्ये येऊन अण्णांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. बलिया - राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केल्यापासून प्रियंका गांधी यांच्यावर भाजपाकडून मोठ्याप्रमाणात शाब्दिक हल्ले होताना दिसत आहे. यामध्ये आता उत्तर प्रदेशमधील बलिया मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी प्रियंका गांधींना शूर्पणखा म्हटले आहे तर राहुल गांधींची रावणाशी तुलना केली.प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुरेंद्र सिंह म्हणाले की, जेव्हा राम आणि रावण यांचे युद्ध होणार होते. त्यावेळी रावणाने आधी आपल्या बहिणीला पाठवले होते. आता रामाच्या भूमिकेत मोदी आणि रावणाच्या रूपात राहुल आहेत. त्यांनी शूर्पणखाच्या रूपात आपली बहीण प्रियंका यांना मैदानात उतरवले आहे. आता आम्ही लंकेवर विजय मिळवला असे समजा.मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सवच ठिकाणच्या उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची नावे निश्चित करण्यात आली. नांदेडमधून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी आ.अमिता चव्हाण यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस करण्यात येणार आहे.टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा समित्यांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. या चर्चेअंती नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आ. अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, वर्धा येथून चारूलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या नावाची दिल्लीतील केंद्रीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय झाला. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.मुंबई - महाआघाडीच्या जागावाटपासंदर्भात मंगळवारी भारीपचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या घरी आघाडीच्या नेत्यांची तब्बल दोन तास बैठक झाली. पण, या बैठकीतूनही काहीच निष्पन्न झाले नसल्याचे समजते आहे. कारण बैठकीनंतर या तिघांच्या विधानांमध्येही काहिसी विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे महाआघाडीतली बिघाडी अटळ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.पारनेर - लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे बुधवारपासून राळेगणसिद्धीत बेमुदत उपोषणास बसणार आहेत. दरम्यान, राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याच्या निर्णयाचे हजारे यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असला तरी विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होणार नसल्याने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी सांगितले.
याच मागण्यांसाठी हजारे यांनी दिल्लीमध्ये उपोषण केले होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. पुढील सहा महिन्यात हजारे यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले होते. सहा महिन्याचा कालावधी उलटूनही हजारे यांच्या मागण्यांवर काहीही निर्णय झाला नाही त्यामुळे पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे २ ऑक्टोबरपासून राळेगसिद्धीत आंदोलन करण्याची हजारे यांनी तयारी केली. त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीस तीनदा भेट देऊन हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त केले होते. हजारे यांच्या मागण्यांवर ९० टक्के निर्णय झाले असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असे त्यावेळी महाजन यांनी सांगितले होते. दरम्यानच्या काळात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा पत्र पाठवून मागण्यांबाबत स्मरण करून दिले होते, परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. सरकारकडून चालढकल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश बापट यांनी पुन्हा हजारे यांची दोनदा भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरला. दरम्यान, हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी बुधवारी सर्वत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत १० तें १५  आंबेडकर समर्थकांनी रिपाईच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची धिंड काडली. हा धक्कादायक प्रकार आंबेजोगाई शहरातील शिवाजी चौकात मंगळवारी सायंकाळी घडला. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या रिपाई कार्यकर्त्याचं नाव महेंद्र निकाळजे (वय ४५) असून, त्यांने प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट आणि विडिओ टाकले होते अशी माहिती आहे. या वरून राग मनात धरून त्याला बेदम मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आहे. अमानुष मारहाणीमुळे गंभीर जखमि झालेल्या महेंद्रवर शहरातील 'स्वराती' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भर चौकात दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकाराबाबत रात्री उशीरापर्यंत कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.मुंबई - आपल्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी नंदीवाले समाजाकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून नंदीवाले समाजातील ५ हजार लोक सहभागी झाले होते. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत लढा देत राहू, असा इशारा नंदीवाले समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोठ्या संख्येने नंदिवाला समाज मुंबई जाम करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नंदीवाले समाज हा परंपरागत भटकंती करणारा, अत्यंत दारिद्र्यात भिक्षूही मोलमजुरी करणारा, चरितार्थ चालवणाऱ्या व शासकीय सवलतीपासून शिक्षणापासून वंचित असणारा नंदीवाला समाज आहे. नंदीवाले समाज हा मूळ भारतीय आदिवासी समाज असून त्यांच्याकडे स्त्रियांसाठी मालकीची शेतजमीन नाही, तसेच कसलाही परंपरागत व्यवसाय नाही. भटकंती करण्या पलीकडे या समाजाचे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अनेक काळापासून आरोग्य, शिक्षण यापासून हा समाज पिछाडीवर आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा समाज याच अवस्थेत आहे. समाजात आजपर्यंत योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेच नाही. महाराष्ट्रात प्रशासकीय व शासनात एकही नंदिवाला समाजाचा अधिकारी नाही. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून आजपर्यंत प्रतिनिधी सदस्यही राहिलेल्या नाही. हा समाज संपूर्ण शिक्षणापासून व सर्व सवलतींपासून वंचित आहे. त्यामुळे या समाज यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आज आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे.

मुंबई - भाजपच्या कारकिर्दीत भाजप कार्यकर्ते किंवा त्यांच्या समर्थकांवरील मागे घेण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्यांबाबत एका जनहित याचिकेद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. २०१७ ते २०१८ पर्यंत ४१ फौजदारी प्रकरणे मागे घेण्यात आली. २,३०० लोकांना सरकारने दिलासा दिला असून त्यात मनोहर (संभाजी) भिडे यांचाही समावेश आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ४१ फौजदारी प्रकरणे रद्द करून सुमारे २,३०० लोकांना दिलासा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अहमद यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
४१ प्रकरणांपैकी ३६ ही चुकून रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती अहमद यांना आरटीआयद्वारे मिळाली आहे. ‘गुन्हे रद्द करण्याची राज्य सरकारची कृती योग्य आहे; तर सर्वसामान्यांनाही हाच न्याय लागू करण्यात यावा,’ असे अहमद यांनी याचिकेत म्हटले आहे.
राजकीय आणि सामाजिक स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात २०१० मध्ये काढण्यात आलेल्या अधिसूचनेचा आधार घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला. धरणे, मोर्चा इत्यादीसारख्या गुन्ह्यांमधील आरोपींवरील गुन्हे रद्द करण्यात यावे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
या सरकारने जून २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधील अशी ४१ प्रकरणे रद्द केली. गुन्हे रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपसमितीने ३६ केसेसमध्ये कायद्याचे उल्लंघन केले आहे. वास्तविकता संबंधित उपसमितीला कायद्याचे ज्ञान नसल्याने ते निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही श्रेणीत नसलेल्या आरोपींवरील गुन्हेही रद्द करण्यात आले आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 'तालिबानी' दिदी सारख्या वागत आहेत, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. बंगालमधील पूर्व मिदनापूर येथून अमित शाहंच्या रॅलीतून परत येत असताना भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्याप्रकारे वाहनांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांना आग लावण्यात आली. यावरून पश्चिम बंगालमधील सद्यस्थिती दिसून येते. हा ममता बॅनर्जींचा खरा चेहरा आहे, असे पात्रा म्हणाले. ही कुठल्या प्रकारची वागणूक आहे. तुम्ही 'तालिबानी' दिदी सारख्या वागत आहात, असेही पात्रा म्हणाले. भाजपला राज्यात मिळणारा प्रतिसाद बघून ममता घाबरल्या असल्याचेही पात्रा म्हणाले.
बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांचे प्रस्थ वाढत आहे. आजच्या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचेही ते म्हणाले. तुम्ही बंगालमध्ये सीबीआयला येऊ देत नाही. तुम्ही राज्यात भाजपच्या नेत्यांना रॅली करू देत नाही. तुम्ही लष्कर आणि बीएसएफवर शंका घेता. तुम्ही राज्यात कुठल्याही लोकशाही पद्धतीनुसार काम करत नाही. ही लोकशाही आहे का?, असा सवालही पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.

पाटणा - राजकीय पुढाऱ्यांचे समर्थक नेहमीच त्यांच्या नेत्यांना देवीदेवतांच्या भूमिकेत सादर करत असतात. हे विशेषत: निवडणुकांच्या तोंडावर पाहायला मिळते. पाटणामध्ये राहुल गांधी यांना भगवान राम यांच्या वेशभूषेत दाखवणारे पोस्टर लागले आहेत.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भगवान राम आणि अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा समोर येत आहे. या मुद्द्यांवरून मतांचे ध्रुवीकरण करत येते, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष याचा फायदा घेते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना भगवान शंकरांच्या भूमिकेत दाखवणारे पोस्टर्सही लागले होते. राहुल हे खरे शिवभक्त आहेत, असा मजकूर त्या पोस्टर्सवर दिसून येत होता.


अहमदनगर - लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली म्हणजे कायदा झाला असे नाही. या कायद्यास विधानसभेत मान्यता मिळणे गरजेचे आहे. आपण आंदोलनावर ठाम असल्याचे मत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 
अण्णा हजारे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकित लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे अभिनंदन करत आहे. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजुर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नाही. 
मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. आज राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार असून, मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत.

मुंबई - कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी निधन झाले. देशभरातून फर्नांडिस यांना श्रध्दांजली वाहिली जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'सम्राट कायमचा बंद झाला' असे ट्वीट करत व्यंगचित्र शेअर केले.फर्नांडिस यांनी मुंबईतील कामगारांसाठी अनेक लढे दिले. त्यामुळे त्यांना मुंबई कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या चळवळीचा धागा पकडून राज ठाकरे यांनी फर्नांडिस यांचे भाषण करतानाचे व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे.अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता व सर्वोपचार रुग्णालयात विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) 'झोपा काढा' आंदोलन करण्यात आले. औषधांचा तुटवडा, रुग्णांची प्रचंड होत असलेली गैरसोय, स्वच्छतेचा अभाव, वेळेवर वैद्यकीय अधिकारी उपस्थित न होणे, एम्एमआयआर मशीन उपलब्ध न करून देणे तसेच उपहारगृहामध्ये झालेली चोरी प्रकरण या गोष्टींची दखल घेऊन दोषींवर तातडीने कार्यवाही करावी. या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, यासाठी एनएसयुआयचे प्रदेश महासचिव आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सारवान व अमोल काळणे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला जाग आणण्याकरीता 'झोपा काढा' आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, याआधी प्रहार संघटनेने याच मागण्यांसाठी काही दिवसाआधी आंदोलन केले होते. 
यावेळी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील, महानगर अध्यक्ष सारंग शिंदे, अनुसूचित जाती-जमाती तालुका अध्यक्ष विजय जामणीक, सोलु गवई, एनएसयुआयचे महासचिव अक्षय राडेकर, सम्राट ठाकरे, हृषीकेश जामदे, सोलु सारवान, वैभव सुळकर, कुणाल झामरे, अभिजित तवर, अश्विक खडसे, रवि बैरे, मुकुंद सरनाईक, जय सिहे, आकाश ग्रोवर, संतोष झांझोटे, सुरज भायोडे, शंतनु बोटकर, सुमित पांडे, सोहेल खान, अंगद काकडे, आदि युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मुंबई - मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. यासंदर्भातील लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. अखेर आज राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार असून, मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत. 

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय 

1. लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता.

2. गावातील मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्याचा निर्णय.

3. उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास मंजुरी.

4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल 15 टक्के मार्जिन मनी देण्याचा निर्णय.

5. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेस मान्यता.

6. औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर (नझूल जमिनी वगळून) अधिमुल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार.

7. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषि महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.

8. मुंबई शहरात अतिरिक्त 5625 सीसीटीव्ही बसविण्यासाठी येणाऱ्या 323 कोटी खर्चास मान्यता. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या वाढीव खर्चासही सुधारित मान्यता.

9. वर्ष 2015 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2015 च्या अधिनियमातील तरतुदी लागू होण्यासाठी सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 66 मध्ये सुधारणा.


अहमदाबाद - गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी वाघेला यांनी काँग्रेसला रामराम करत स्वत:चा जनविकल्प नावाचा पक्ष सुरू केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सर्व १२५ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली होती.

मुंबई - भारतीय जनता पार्टीने युतीबाबत ठोस प्रस्ताव देऊन १५ दिवसांत काय तो निर्णय करावा; अन्यथा आम्ही वेगळे लढण्यास मोकळे आहोत, असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपाला दिला. स्वबळावर लढलो तर काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी सगळी ताकद उभी करेन, असा दिलासाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांना दिला.शिवसेना खासदारांची सोमवारी ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या वेळी उद्धव म्हणाले, भाजपावर विश्वास तरी कसा ठेवायचा? राज्यात आणि केंद्रात आम्हाला त्यांनी योग्य वाटा दिला नाही. जे कबूल केले तेही दिले नाही. आता ते काय देणार आहेत हे त्यांनी टीव्हीसमोर येऊन सांगावे. उगाच बातम्या पसरवू नयेत. आमच्या अटी मान्य केल्या, तरच युती करू. अन्यथा, स्वबळावर लढण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाने निवडून आलेल्या पाच जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. आम्ही तर आमच्या हक्काच्या जागा मागत आहोत, असे सांगत उद्या युती झाली तर त्याचे समर्थन काय द्यायचे ते मी पाहीन, तुम्ही त्याची काळजी करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित खासदारांना सांगितले. आमच्यासाठी तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि तो गहाण ठेवून कदापिही भाजपाशी युती करू नका. 

कोल्हापूर - महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होऊन निर्णय झाला आहे. उरलेल्या जागावाटपाचा निर्णयही लवकरच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त अजित पवार सोमवारी कोल्हापूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल माहिती दिली.ते म्हणाले, ४४ जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून निर्णय झाला आहे. आता उर्वरित चार जागांचा निर्णय झाला की दोन्ही पक्ष एकत्रितपणे जागावाटपाची माहिती देतील आणि आघाडीची औपचारिक घोषणाही होईल. आघाडीमध्ये कोल्हापूरप्रमाणे साताऱ्याच्या जागेबाबतही काहीशी धुसफूस होती. मात्र, तिथेही आता मनोमिलन झाले आहे. काही लोकांची मागणीच जास्त असल्यामुळे जागा वाटपाचा विषय प्रलंबित राहतो. पण लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागितलेल्या १२ जागांच्या मागणीवरही सध्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा करण्यासाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून सातत्याने बैठका होत आहेत. यापैकी काही बैठका दिल्लीतही पार पडल्या आहेत. या बैठकांनंतर आता दोन्ही पक्षांनी ४४ जागांचा निर्णय अंतिम केला आहे. कोणता पक्ष कोणती जागा लढवणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील राजकीय वातावरण ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - दुकानांवर इंग्रजी भाषेतील अक्षरांएवढीच मराठी भाषेतील अक्षरांची पाटी लावण्याचा इशारा मनसेने लालबाग व परळमधील दुकानदारांना दिला आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमाची प्रत आणि निवेदन देत १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.परळ व लालबाग परिसरात बऱ्याच नामांकित व ब्रँडेड वस्तूंची दुकाने व आस्थापने आहेत. मात्र या आस्थापनांवर लावण्यात येणाऱ्या नामफलकांत इंग्रजी अक्षरांचा आकार मोठा असतो. याउलट नामफलकावरील मराठी नावांतील अक्षरांचा आकार खूपच लहान असतो. राज्य शासनाच्या नियमानुसार दुकाने व आस्थापनांवरील मराठी भाषा व इतर भाषेतील अक्षरांचा आकार समान असावा. तरी दुकानदारांनी तत्काळ दुकानांवरील दोन्ही भाषेंतील नामफलक हे समान आकाराचे व देवनागरी भाषेत लावण्याचे आवाहन करणारे निवेदन दुकानदारांना दिले आहे. त्यामुळे दुकानदारांनी त्यांचे नामफलक येत्या १५ दिवसांत बदलून घेण्याचे आवाहन मनसेने केले आहे. तसेच शासनानेही १५ दिवसांत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाहीतर, मनसे स्टाइलने दुकानदारांना उत्तर दिले जाईल, असेही मनसेकडून सांगण्यात आले आहे.

जालना - भाजपची पुढची बैठक आता थेट लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरच होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्षाची आक्रमक रणनीती स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून आगामी निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी पडद्यामागे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शिवसेनेने जास्त जागांची मागणी करुन हा प्रस्ताव अडवून ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नमते घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ते जालना येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ही भाजपची निवडणुकीपूर्वीची शेवटची बैठक आहे. यानंतरची बैठक थेट लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरच होईल. आम्हाला देशाच्या कल्याणासाठी युती करायची आहे. मात्र, त्यासाठी भाजप लाचारी पत्कारणार नाही. ज्यांना हिंदुत्त्ववाद हवा आहे, ते आमच्यासोबत येतील. ज्यांना हिंदुत्त्व नको असेल ते दूर जातील. जे सोबत असतील त्यांच्या साथीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. आता विजय हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.अहमदाबाद - काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे जे आमदार त्यांना पाठिंबा देऊ इच्छित नव्हते त्यांना लाच दिल्याचे भाजपा नेते बलवंतसिंह राजपूत यांनी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाला सांगितले.काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे जे आमदार त्यांना पाठिंबा देऊ इच्छित नव्हते त्यांना लाच दिल्याचे भाजपा नेते बलवंतसिंह राजपूत यांनी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाला सांगितले. राजपूत यांना पराभूत करून पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर राजपूत यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.पटेल यांनी लाच देत अनैतिक मार्ग वापरल्याचा आरोप राजपूत यांनी केला. दरम्यान, पटेल यांनी या आरोपांचे यापूर्वीच खंडन केलेले आहे. पटेल यांनी बंगळुरू येथे काँग्रेस आमदारांच्या सहलीसाठी १८ लाख रूपये खर्च केल्याचा आरोप राजपूत यांनी न्या. बेला त्रिवेदी यांच्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
उज्जैन - भैरवगढ ठाण्याच्या क्षेत्रात भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. नागदा रोडवर झालेल्या या अपघातात ठार झालेल्यांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.उज्जैन-उन्हेल मार्गावर रामगजवळ मारुती व्हॅन व टाटा हैक्सा यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात जागेवरच १२ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास झाला. मृत हे उज्जैनमधील महेश नगर, नगरकोट आणि तिलकेश्वर येथील रहिवासी आहेत. नागदामध्ये लग्न समारंभ उरकून येत असताना हा अपघात झाला. उज्जैनकडून येणाऱया कारने व्हॅनला धडक दिली. या अपघातात व्हॅन सुमारे ५० फूट दूर गेली होती. व्हॅनमधील लोकांचा मृत्यू झाला. तर एयर बॅगमुळे दूसऱ्या कारमध्ये बसलेल्या लोक वाचले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.मुंबई - पाच नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य तर नगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. रायगडमधील कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसला.पाच नगरपालिकांच्या एकूण ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३९ उमेदवार निवडून आले. काँग्रेस (३०), राष्ट्रवादी काँग्रेस (१०) तर शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. पाचपैकी भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक नगराध्यक्ष निवडून आला.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget