February 2019


ऑनलाईन - शारीरिक संबंधाबाबत अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात. त्यात महिलांना असणारी एक मोठी समस्या म्हणजे स्वत:च्या शरीराबाबत वाटणारा संकोच. अनेक महिलांना शरीराबाबत संकोच वाटत असल्याने लैंगिक क्रियेत अनेक अडचणी येतात. जर तुम्ही स्वत: तुमच्या शरीराबाबत सहज नसाल तर अर्थातच पार्टनर समोर आल्यावर तुम्हालाही संकोच वाटणारच. या सर्व गोष्टीमुळे नात्यात सहजताच राहणार नाही आणि तुम्हाला पार्टनरसोबत कनेक्टेड वाटणार नाही. शरीराबाबत असहज असण्यामुळे लैंगिक जीवन प्रभावित होतं आणि तुम्हाला संतुष्टी मिळणार नाही. एक्सपर्ट्सनुसार, एकच अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला चांगला लैंगिक अनुभव मिळू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे पार्टनरची स्तुती, तिचे कौतुक करणे. ही बाब जरी फारच शुल्लक किंवा विचित्र वाटत असली तरी ही गोष्ट केल्याने तुमचे लैंगिक जीवन वेगळे ठरू शकते. जर्नल ऑफ सेक्स अँड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका रिसर्चसाठी १८ ते ३० वयोगटातील २०० महिलांवर अभ्यास करण्यात आला. या सर्व महिला कमिटेड रिलेशनशिपमध्ये होत्या. या रिसर्चदरम्यान महिलांना विचारण्यात आले की, त्यांना त्यांच्या बॉडीबाबत काय वाटते? आणि त्यांचे पार्टनर त्यांच्या बॉडीबाबत काय विचार करतात?तसेच अभ्यासकांनी महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत आणखीही काही प्रश्न विचारले. त्यात त्यांना शारीरिक संबंधाची इच्छा किती वेळ जागृत होते, त्यांच्या उत्तेजनेचा स्तर काय असतो, लुब्रिकेशन, किती वेळा ऑर्गॅज्मचा अनुभव होतो आणि शारीरिक संबंधानंतर संतुष्टीचा अनुभव होतो का? हे प्रश्न विचारण्यात आलेत.त्यावरून काढण्यात आलेले या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, ज्या महिलांच्या पार्टनरने त्यांच्या लुक्सचे आणि शरीराचे कौतुक केले त्या महिलांना जास्त संतुष्टीचा अनुभव मिळाला आणि त्यांची कामेच्छा सुद्धा अनेक पटीने जास्त होती. पण ज्या महिला त्यांच्या शरीराबाबत असहज होत्या किंवा ज्यांना संकोच वाटला, त्यांना यातील कुठलाच चांगला अनुभव आला नाही. या रिसर्चनुसार, जे पुरूष पार्टनर खास क्षणांवेळी त्यांच्या पार्टनरचे कौतुक करतात किंवा त्यांची स्तुती करतात त्या महिलांची कामेच्छा अधिक चांगली असते. 

ऑनलाईन - अ‍ॅपल ही तंत्रज्ञान जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणुन ओळखली जाते. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा जवळपास प्रत्येक व्यक्ती अ‍ॅपल कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहात असतो. परंतु याच अ‍ॅपलने तब्बल १९० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे कर्मचारी अ‍ॅपलच्या अगामी सेल्फ ड्राइविंग कार प्रोजेक्टवर काम करत होते. यांतील ३८ इंजिनीयर प्रोगामिंग, ३३ हार्डवेअर, ३१ प्रोडक्ट डिझाईन, तर २२ सॉफ्टवेअर विभागात काम करत होते. कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यामागचे कारण अ‍ॅपलने अद्याप स्पष्ट केलेले नाही. या आधीही अनेकदा अ‍ॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याच्या घटना घडल्या आहेत.सर्जनशीलता व अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणारी अ‍ॅपल कंपनी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. सध्या ते सेल्फ ड्राइविंग कारवर संशोधन करत आहेत.

मुंबई - बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर जान्हवीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून ती लवकरच ‘तख्त’ आणि फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. सध्या गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचे चित्रीकरण सुरु असून जान्हवी या चित्रपटामध्ये गुंजन यांची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीदेवी यांच्या रील आणि रिअल अशा दोन्ही मुली पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांची ही शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी निर्माता दिग्दर्शक करण जोहर सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींना एकत्र आणणार आहे. या चित्रपटात जान्हवीची मुख्य भूमिका असून बालकलाकार रिवा अरोडादेखील आता या चित्रपटाचा एक भाग होणार आहे.रिवा गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने रिवा आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. रिवाने याविषयी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.


मुंबई - वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारताच्या महिला संघाचा दोन विकेटने पराभ केला आहे. तीन सामन्याची मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्वादित वर्चस्व गाजवले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत शेवट गोड केला आहे. महाराष्ट्राच्या स्मृती मानधना आणि पूनम राऊत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर महिला संघाने इंग्लंडसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या इंग्लंडने ४९ व्या षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्याच षटकात सलामीची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज बाद झाली. त्यानंतर पूनम राऊत आणि स्मृती मानधना यांनी शतकी भागिदारी केली. मानधनाने ७४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. पुनम राऊतने ९७ चेंडूत संयमी ५६ धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राज आपल्या लौकिकास खेळी करण्यात अपयशी ठरली. अखेरच्या काही षटकांमध्ये दिप्ती शर्माने २७ तर शिखा पांडेने केलेल्या २६ धावांमुळे भारताला २०० धावांचा टप्पा पार करता आला.प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या इंग्लंडची सलामी जोडी झुलन गोस्वामीने फोडली. झुलनने ३३ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. इंग्लंडच्या डॅनिअल वॅटने अर्धशतक करून इंग्लंडला सावरले. मात्र शिखा पांडेने तिला तंबूत धाडून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. त्यानंतर जॉर्जिया एल्वीसीसने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत सावध खेळ करून इंग्लंडला विजय मिळवून दिला.मुंबई - शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील.सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. ६ जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील. 
शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.१०,००१ यापैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.मुंबई - जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे विधानपरिषदेतील भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे बुधवारी निलंबन मागे घेण्यात आले आहे.स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचारसभेत, विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते.
पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसेच आहे,असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले होते.

इस्लामाबाद - पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायु दलाचे जवान अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान उद्या सोडणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये ही घोषणा केली. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तात्काळ मुक्त करावे. मात्र, त्यासाठी भारत कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही, असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकिस्तानला नमावे लागले आहे.दोन्ही देशातील संबंध सुधारणार असतील तर आम्ही भारताच्या वैमानिकास सोडण्याचा विचार करणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर भारताने संतप्त प्रतिक्रीया दिली होती. पाकिस्तानने वैमानिकास त्वरीत मुक्त करवावे. मात्र, या बदल्यात आपण असा कोणताही करार करणार नाही ज्यामुळे दहशतवाद विरोधी कामगीरी कमकूवत होईल, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली होती. यानंतर पुढच्या परिणामांची दक्षता घेत पाकिस्तनने हा निर्णय घेतला.


श्रीनगर - पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला बुधवारी यश आले होते. हे विमान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं. या विमानाचे अवशेष सापडले असून यासंबंधीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करतानाही दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या ७ नॉर्थन लाइट इंफन्ट्रीचे कमांडिंग अधिकारी आहेत.
मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. भारताला पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले होते.

मुंबई - पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदी संजय बर्वे यांची नियुक्ती जवळपास निश्चीत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यापाठोपाठ परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत. देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे शुक्रवारी तात्काळ ही पदे भरण्यात येणार आहेत. सुबोध कुमार जैस्वाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, भाजप नेत्यांशी जवळीक या जमेच्या बाजू ठरली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख संजय बर्वे हे १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख पद त्यांनी भूषवले होते. बर्वेचे नाव मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी जवळपास निश्चीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठी अधिकारी म्हणून भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचाही बर्वेंना पाठिंबा असल्यामुळे त्यांचे नाव आयुक्त पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. बर्वे याचवर्षी निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही शेवटी संधी आहे. त्यांच्या पाठोपाठ परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत.१९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सिंग यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. याबाबत आज गृहविभाग आदेश जारी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती बुधवारी रात्रीपर्यंत बर्वे यांनी सिंग यांना या स्पर्धेत मागे टाकले होते.


मुंबई - भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये मुंबईचाही समावेश आहे.सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंर मुंबई मेट्रो १ कडून सर्व १२ स्थानकांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई मेट्रोकडून ही माहिती देण्यात आली असून सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे.
दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकेही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत अशीही माहिती समोर आली आहे.मुंबई - देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचे अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठक सुरु झाली आहे.राज्याच्या सुरक्षा यंत्रणेकडून काही अलर्ट आले आहेत. राज्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या फोर्सची गरज आहे. त्या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, सभापती, सर्वपक्षीय गटनेते उपस्थित आहेत.

ठाणे - सहकारी महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि सध्या पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांना ठाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.एच. झा यांनी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली.काळे हे २००९ मध्ये ठाणे आयुक्तालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्या. झा यांच्या न्यायालयात झाली. आपल्याशी अंगलट करण्याचा प्रकार काळे यांनी केल्याची तक्रार पीडित कर्मचारी महिलेने केली होती. त्यांनी तिची अनुपस्थिती लावून तिच्याविरुद्ध पोलीस डायरीमध्ये शेराही मारला होता. घटनेच्या एक महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून काळे यांच्यावर कारवाईचीही मागणी तिने केली. तसेच आयुक्तालयातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तिने दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी दाद दिली नाही. आपल्याविरुद्ध तक्रार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच काळे यांनी तिच्याविरुद्ध पोलीस उपायुक्तांकडे रिपोर्ट पाठवला. त्यामुळे तिला एप्रिल २०११ मध्ये निलंबितही करण्यात आले. सतत दोन वर्षे त्रास झाल्यानंतर पुन्हा निलंबनाचीही कारवाई झाल्याने या महिला पोलीस कॉन्स्टेबलने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर, चौकशीचे आदेश देत न्यायालयाने विशाखा समितीच्या अध्यक्षा तत्कालीन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे ही चौकशी सोपवली. दरम्यान, २०१२ मध्ये करंदीकर यांनी ठाणे प्रथम वर्ग न्यायालयात काळे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करून ५०९ आणि विनयभंगाच्या कलम ३५४ सह आरोपपत्र दाखल केले.याबाबतची सुनावणी सुरू झाल्यानंतरही आरोपी काळे यांनी या महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्यावर खोटे आरोप करून निलंबन झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर तिला पुन्हा सेवेत घेतले. काळे हे अनेक सुनावणींना गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढले होते. या सर्व बाबी सहायक सरकारी वकील रश्मी क्षीरसागर यांनी न्यायालयासमोर मांडत आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली.मुंबई - इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्यास मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. तसेच या बसेस घेण्यासाठी फेम इंडियाकडून अनुदान मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाने यापुर्वी भाडेतत्वावर बस घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला कामगार युनियनने न्यायालयात आव्हान दिल्याने हा प्रस्ताव रखडला.मार्च महिन्यात या बस खरेदी न केल्यास केंद्र सरकारचे अनुदान रद्द होणार आहे. यामुळे फेम इंडिया अंतर्गत बेस्टच्या ताफ्यात बिगर वातानुकुलित २० मिडी बस आणि वातानुकुलित २० मिनी इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला. बेस्ट बसेसचा उपक्रम आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे. बेस्टच्या आर्थिक स्थितीत सुधाराणा व्हावी, यासाठी पालिका आयुक्तांनी अनेक सुचना सुचविल्या होत्या. बेस्टच्या कामकाजात सुधारणा करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले होते. त्यानुसार बेस्ट समितीने यात अनेक सुधारणा केल्या, मात्र भाडेतत्वावर बसेस घ्यायला मंजुरी दिली नव्हती. याचदरम्यान भाडेतत्वावर बसेस घेतल्यास कामगारांना कमी केले जाईल, बेस्टचे खासगीकरण केले जाईल असे सांगत कामगार संघटनांनी विरोध दर्शवला. त्यासाठी कामगार संघटना न्यायालयातही गेली होती.
या बसेस घेण्यासाठी फेम इंडियाकडून ७० टक्के (२७ कोटी रुपये) आर्थिक मदत अनुदान म्हणून मिळणार आहे. ३१ मार्चपर्यंत जर हा निधी वापरला नाही तर तो परत जाणार आहे. याचा विचार करून सदर बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समितीला केली. सध्या प्रस्ताव जरी मंजूर करण्यात आला तरी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नंतरच बसेस खरेदी केल्या जातील, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आले.

मुंबई - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या परवानग्या कोण रोखत आहे? परवानगीच नसताना सरकारने तीन वेळा स्मारकाचे भूमिपूजन कसे केले, असे सवाल उपस्थित करत विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कामकाज ४० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.शेकापचे जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शिवस्मारकाचा प्रश्न उपस्थित केला. शिवस्मारकाच्या कामाच्या परवानग्या नेमके कोणते अधिकारी नाकारत आहेत. परवानग्या नसताना कोणते अधिकारी टेंडर काढत आहेत, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. स्मारकाच्या कामात अडथळे येत असताना शिवस्मारक समिती काय काम करीत होती, असा सवाल करत ही समितीच बरखास्त करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.पर्यावरण खात्याची परवानगी नसताना पंतप्रधानांनी या स्मारकाचे भूमिपूजन केलेच कसे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मराठा आंदोलन तीव्र झाल्याने तो दाबण्यासाठी भूमिपूजन उरकण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला. आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिले होते. त्यातही चुकीच्या पद्धतीने स्मारकाच्या कामाचे टेंडर दिल्याचे मान्य केले आहे. हे पत्र आणि आता स्मारकाच्या कामाला कशामुळे स्थगिती मिळाली, याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.


सोलापूर - पाचशे रुपयांची पाणीपट्टी थकल्याने शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने चढविलेला बोजा दंडासह संपूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरुनदेखील सातबारा उताऱ्यावरील सरकारने बोजा कमी केला नाही. त्यामुळे एका वयोवृध्द शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे ही घटना घडली.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या त्या दुर्दैवी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई जोपर्यत होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तर याच प्रश्नावर प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन हाती घेतले होते.सिध्दप्पा महारप्पा विभूते (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या वृध्द शेतक ऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात विभूते कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सिध्दप्पा विभूते यांची मुस्ती गावात शेती आहे.
३५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ साली त्यांच्याकडे पाचशे रुपयाची पाणीपट्टी थकल्यामुळे महसूल प्रशासनाने त्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविला होता. परंतु नंतर विभूते यांनी थकीत पाणीपट्टीची रक्कम पाच हजार रुपये दंडासह भरली होती.त्यामुळे आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील शासनाचा बोजा कमी व्हावा म्हणून विभूते हे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडे खेटे घालत होते.परंतु सातबारा उताऱ्यावरील शासनाचा बोजा कमी केला जात नव्हता. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांकडेही दाद मागितली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विभूते यांनी आत्महत्या केली. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे

पुणे - कोथरूड येथील भेलके नगर परिसरात पीएमपीएमएल बसला बुधवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली.अग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले.ब्रेकडाऊन झाल्यामुळे पीएमपीचे कर्मचारी, ही बस आगारात घेऊन जात होते. त्याच वेळी बसला आग लागली. या आगीत बसचा अर्धा भाग पूर्णपणे जळून खाक झाला, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भेलके नगर भागात ही बस बंद पडली होती. यानंतर पीएमपीएमएलचे कर्मचारी ही बस घेऊन डेपोत चालले होते. अचानक या बसच्या समोरील भागातून धूर निघण्यास सुरुवात झाली. समोरून जाणाऱ्या एका नागरिकाने हे ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर ड्रायव्हरने बस थांबवून अग्निशमन दलाला ही माहिती कळवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बसचा अर्धा भाग जळाला होता.नागपूर - सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाधव याने सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आल्याने वाडी पोलिसात खळबळ उडाली होती. अटकेच्या भीतीपोटी जाधव वैद्यकीय रजेवर गेले होते व अटकपूर्व जमीनही मिळवीला होता.प्राप्त माहितीनुसार पीडिता ही नागपूर शहरातील असून पोलीस विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मुलगी होती. पीडिता वाडी पोलीस स्टेशनला ३१ डिसेंबर २०१७ ला एका मुलीच्या मिसिंग बाबत तक्रार करण्यासाठी मैत्रिणीसोबत आली असता प्रशांत जाधव याच्या संपर्कात आली. त्याने या प्रकरणात तिला मदत केली. यानंतर तिचा नंबर घेऊन सारखे फोन करून तू मला भेटायला ये तुझा फोटो पाठव मला झोप येत नाही,आपण कुठेतरी फिरायला जाऊ. माझा संपूर्ण परिवार एका अपघातात संपला असून माझे आता कुणीही नाही. मी तुझ्यासोबत लग्न करतो शासकीय नोकरी लावून देतो अशा प्रकारचे आमिष देत होता. त्याच्या या भूलथापांना तरुणी बळी पडली. जयताळा तसेच शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या भेटी झाल्या.त्याने फेब्रुवारी २०१७ ला नोकरी लावून देण्यासाठी बायोडाटाची गरज असल्याचे सांगत तरुणीला डिफेन्स गेट न २ जवळ सायंकाळी बोलाविले. तेथून प्रशांत जाधव याने डिफेन्सस्थित सेक्टर नंबर १/३/७१ क्वॉर्टर न. ६ मध्ये नेऊन रात्रभर पीडितास तेथे थांबवून शारीरिक शोषण केले. यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे जाधव निघून गेला.गावावरून परत आल्यावर पीडिता दातांची तपासणी करण्याकरिता लता मंगेशकर येथे आहे अशी माहिती मिळाल्यावर तिला त्याने परत डिफेन्स क्वॉर्टर मध्ये आणून लग्नाचे आमिष देत शोषण केले अशाप्रकारे नित्यनेमाने तो पीडितावर बलात्कार करीत होता. तो पीडिताला गर्भनिरोधकाच्या गोळ्या देत असल्याने शारीरिक संबंध होऊनही गर्भधारणा झाली नाही. कालांतराने दोघात वाद झाला. यानंतर पीडिताला मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.आपली फसवणूक झाली असल्याचे पीडिताच्या लक्षात येताच ती वाडी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्याला भेटायला वारंवार यायची.पण त्याची भेट व्हायची नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी वाडी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. याबाबत पीडिताचे नातेवाईक व पोलिसांची राहुल हॉटेलमध्ये बैठकही झाली होती. परंतु पीडिता तडजोड करायला तयार झाली नाही. आपली तक्रार वाडी पोलीस घेणार नाही म्हणून शेवटी पीडिताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची लेखी तक्रार पोलीस आयुक्तकडे केली. यानंतर या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोेलीस अधिकाऱ्यांनी केली असता पीडिताने आरोपी संदर्भात दिलेल्या पुराव्यात चौकशीत तथ्य आढल्याने पोलिसांनी तिच्या लेखी तक्रारीनुसार प्रशांत जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


सांगली - भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा गुरूवारी होणारा सांगली व कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. शहा सांगलीत गणेश दर्शन आणि कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेणार होते. यासाठी पोलिसांनी सांगलीत बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेतली होती.लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहा यांचा सांगली दौरा आयोजित करण्यात आला होता. याची तयारीही पक्षीय पातळीवर सुरू होती. शहरात दर्शनी ठिकाणी संवाद मेळाव्याचे डिजिटल फलकही झळकले आहेत. मात्र सीमेवर तणाव निर्माण झाल्याने शहा यांचा दौरा अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आला असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
यापूर्वी जानेवारीच्या अखेरच्या सप्ताहात तासगावमध्ये शहा यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. तोही अखेरच्या क्षणी रद्द केल्यानंतर या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, नियोजनाप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी यांची भाजपा संघटन संवाद बैठक कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे होणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांनी दिली. या बठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी, सांगली व मिरज विधानसभा मतदार संघातील बूथ कार्यकत्रे उपस्थित राहणार आहेत.

बंगळुरू - कराची बेकरी बॉम्बने उडवणार, अशी फोनद्वारे धमकी आल्याची तक्रार बेकरीच्या मॅनेजरने पोलिसात केली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.कर्नाटकातील बंगळुरु याठिकाणी असलेल्या बेकरीच्या मॅनेजरला हा फोन आला. 'कराची बेकरी' नावातून 'कराची' हा शब्द न वगळल्यास बॉम्बने बेकरी उडवणार, अशी धमकी फोनद्वारे दिल्याचे मॅनेजरने सांगितले. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.


श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये २ वैमानिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. नाशिकचा निनाद औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचा माजी विद्यार्थी होता. तिथून त्याची निवड पुणे येथे एनडीएमध्ये झाली. त्यानंतर तो हेलिकॉप्टर पायलट झाला.बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या अपघातात निनादचा मृत्यू झाला. डीजीपीनगर नाशिकचे निनाद यांचा जन्म १९८६ ला झाला होता. निनादचे शिक्षण (पाचवी ते दहावीपर्यंत) भोसला मिलिटरी मध्ये तर ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झाले होते. नंतर त्याने बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर २००९ ला एअर फोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. ज्यानंतर ही दुःखद घटना घडली आहे.
.


श्रीनगर - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान एकीकडे सीमा तणाव कमी करण्यासाठी चर्चेची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैनिकांकडून सीमा परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. आजही पाकिस्तानने पुंछमधील कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी ६ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघण करण्यात आले.या भागात पाकिस्तानी लष्कराकडून १ तास गोळीबार करण्यात आला होता. भारताकडून सीमेजवळील भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.भारतीय हवाईदलाकडून मंगळवारी पाकिस्तानातील जैशच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सीमाभागात पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पाकिस्तानकडून करण्यात येत असलेला गोळीबारमध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही


कोलकाता - पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून ‘जमात- ऊल- मुजाहिद्दीन बांगलादेश’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.मंगळवारी रात्री कोलकाता आणि मुर्शिदाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुशिबूर रहमान (वय ३५) आणि राहुल अमिन (वय २६) या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दोघेही जेएमबीचा नेता कौसरच्या संपर्कात होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. यानुसार दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही जेएमबीसाठी अॅसिड बॉम्ब तयार करायचे, अशी माहिती समोर येत आहे.मुंबई - गेल्या ५ महिन्यांपासून राज्य सरकारने मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. यानिषेधार्थ स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मार्गासवर्गीय कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात रॅली काढली.पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मागासलेपणा सिद्ध करण्याची अट न्यायालयाने रद्द केली आहे. त्यानंतरही गेल्या पाच महिन्यात राज्य सरकारने मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात रॅली काढली.विजय घोगरे विरुद्ध महाराष्ट्र शासन यासंदर्भात निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याचा शासन आदेश रद्द केला होता. यामुळे लाखो कर्मचारी अधिकारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांनी निर्णय देताना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मागासलेपणा सिद्ध करण्याची अट रद्द केली. तसेच पर्याप्त आकडेवारीनुसार आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी पाटील यांनी केली.

शिर्डी - शिर्डी साईबाबा संस्थानमधील २ हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितले. तसेच शासनाने जेव्हापासून सातवा वेतन आयोग लागू केले आहे तेव्हापासून आजपर्यंतचा फरक देखील कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत असा प्रस्तावही यामध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.साई संस्थानच्या विविध विभागात गेल्या १५ वर्षापासून आऊट सोर्सिंगमध्ये अडीच हजार कर्मचारी करत आहेत. या कर्मचाऱ्यांना साई संस्थानचे कायम कर्मचारी म्हणून घेण्याचा निर्णय आज साई संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला. १८ ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याचे हावरे यांनी सांगितले.या कर्मचाऱ्यांना ६ ते ७ हजार रुपये पगार साईसंस्थानकडून दिले जात होते. आता यांना कायम कर्मचारी म्हणून संस्थानने घेतल्यानंतर साधरणतः २१ ते २२ हजार रुपये पगार महिन्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या महिन्याला ४ सुट्ट्या, त्यांच्या कुटुंबीयांना साई संस्थानच्या रूग्णालयात मोफत उपचार आणि शैक्षणिक खर्चही साई संस्थान करणार आहे. जुन्या २ हजार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर १० लाख रुपये एका कर्मचाऱ्याला असे मिळत होते. ते आता १० लाखाहून २० लाख रुपयांपर्यंत लागू करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे मान्‍यतेसाठी पाठविण्‍यात येणार असल्याचेही सुरेश हावरे यांनी सांगितले. 

पालघर - पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपाच्या बाबतच्या चर्चेची प्राथमिक फेरी झाली आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असावा, असा आग्रह या पक्षाच्या प्रतिनिधींनी आघाडीच्या चर्चेदरम्यान पुढे आणला आहे. या प्रस्तावावर विचार करण्यास काँग्रेसने अवधी मागितला असून काँग्रेसची भूमिका ही आघाडीच्या बाबत निर्णायक ठरणार आहे.पालघर नगर परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक तर काँग्रेसचा एक असे बलाबल असून नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने प्राधिकृत केलेल्या सदस्यांची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे पुढे केली आहेत. सध्याचे नगर परिषदेमधील पक्षीय बलाबल पाहता आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चेदरम्यान घेतली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता (इलेक्ट्रॉल मेरिट) अधिक असल्यास अशा उमेदवाराला राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला आहे. याबाबत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे निरीक्षक दोन मार्च रोजी पालघरच्या दौऱ्यावर येणार असून निरीक्षकांमार्फत आघाडी करण्याबाबतचा प्रस्तावावर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार घेतला जाणार आहे. यामुळे या आघाडीसंदर्भात दोन मार्चनंतरच निर्णय होणे अपेक्षित आहे.वुझन (चीन) - दहशतवादाला देशांनी सहन करू नये. दहशतवादाला समूळ गाडण्यासाठी इतर देशांनी भारतासारखी धडक कारवाई करावी. दहशतवादावर निर्णायक कारवाई करण्याची वेळ आहे, असे वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनमध्ये सुरू असलेल्या भारत, चीन, रशिया या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत केले.हा लष्करी हल्ला नव्हता, पाकिस्तानच्या लष्कराला आम्ही लक्ष्य केले नव्हते. जैश-ए-मोहम्मदकडून आमच्यावर होणारा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी दहशतवाद्यांवर केलेली ही कारवाई आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सावध झाला होता, त्यांच्या पुढच्या कारवाई आधी आम्ही संयुक्त राष्ट्रांचे नियम पाळून हा हल्ला केला आहे, असे स्वराज यांनी सांगितले.
भारताने कारवाई करताना इतर लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. भारत आणि चीनमधील संबंध दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या आहेत, असेही स्वराज म्हणाल्यामुंबई - राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात दुपारी २ वाजता सादर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर केल्या जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहेतअर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात येणार असून राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिक, वंचित घटक समोर ठेवून अर्थसंकल्प तयार केला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यात केवळ पुढील ४ महिन्यांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होणाऱ्या मुख्य अर्थसंकल्पाची दिशा असेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. आज ४ महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान सादर केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. 
राज्याच्या प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या आर्थिक तरतूदी या अर्थसंकल्पामध्ये असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. युतीतील मुख्य घटक पक्ष शिवसेनेच्या मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. मुंबईमध्ये ५०० स्केअर फुटच्या फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट देणे आम्ही मान्य केले आहे. त्यानुसार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर २०१८ ला केलेली मानधनवाढीवर राज्य शासनाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट न मिळाल्याने कर्मचारी कृती समितीने त्यांचा निषेध व्यक्त करत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर कृती समितीने मोर्चाची सांगता केल्याची माहिती कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी दिली.
मोर्चादरम्यान मुंडे यांची भेट न मिळाल्याने नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक दिली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिलेल्या वेळेची कल्पना देत शांत राहण्याचे आवाहन केले. यावर दिलीप उटाणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर केंद्र शासनाने ६० टक्क्यांपैकी केवळ ३० टक्के निधीच राज्य शासनाकडे पाठवला आहे. याउलट राज्य शासनाकडूनही ४० टक्के निधीची तरतूद करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर युती सरकारविरोधात सर्व कर्मचारी प्रचार करतील, असा इशारा कृती समितीने दिला आहे.मुंबई - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला मंगळवारी १२ दिवस पूर्ण होत असतानाच भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले. यात ३५० दहशतवादी मारले गेले. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरातील राजकीय पक्षांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.पणजी - माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत 'घर वापसी' केली. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यांचे स्वागत केले.दक्षिण गोव्यातील मडगाव येथे भाजपतर्फे युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते.
२०१२ मध्ये मनोहर पर्रीकर सरकारमध्ये तवडकर यांच्याकडे क्रीडा आणि कृषी खाते होते. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपपासून फारकत घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, सकाळी प्रदेश भाजप कार्यालयात समन्वय समिती कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी केंद्रीय संघटनमंत्री बी. ए. संतोष, सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सरचिटणीस दामोदर नाईक, सदानंद तानवडे आदी उपस्थित होते.
रविवारी भाजपचे शिरोड्याचे माजी आमदार महादेव नाईक यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा पोटनिवडणुकीत भाजपवर परिणाम होईल असे वाटते का? असे विचारले असता, तेंडुलकर म्हणाले, त्याचा भाजपच्या मतांवर फारसा परिणाम होणार नाही. मताधिक्यात ७०० ते ८०० चा फरक पडू शकतो. तर दुसरीकडे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांचे मताधिक्य राहणार आहे. शिवाय नाईक हे काँग्रेसमधूनच भाजपात आले होतेसोलापूर - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्व ४८ जागा बसपा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती पक्षाचे राज्याचे प्रभारी अ‍ॅड. संजीव सदाफुले यांनी सोलापुरात दिली. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे असोत वा भाजपचे कोणीही असोत, त्यांच्या विरोधात चिवटपणे बसपा लढणार असल्याचा दावाही त्यांनी केला.सोमवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात बसपाची बैठक झाली. या वेळी अ‍ॅड. सदाफुले यांच्यासह पक्षाचे दुसरे प्रभारी प्रा. ना. तु. खंदारे यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे सर्वेसर्वा मायावती यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा आदेश दिला आहे. राज्यात आतापर्यंत बसपा सत्तेवर आला नसला तरी आतापर्यंत राज्यात आपला पक्ष लोकसभा वा विधानसभा अशा कोणत्याही निवडणुकांमध्ये पराभूत होत आला असला तरी आता मात्र इतर प्रमुख पक्षांचे उमेदवार पाडण्याची ताकद आमच्या पक्षाने निर्माण केली आहे. निवडणुकीच्या राजकारणात कालपर्यंत आमचा पक्ष पराभूत होत होता. आता दुसऱ्या पक्षाच्या बडय़ा बडय़ा नेत्यांना पाडू शकतो. याच वाटचालीत आगामी काळात आमचा पक्ष राज्यात प्रमुख सत्ताधारी म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही, असाही दावा अ‍ॅड. सदाफुले यांनी केला.आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बसपा ताकदीनिशी उतरणार आहे. त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या घटकांना सोबत घेतले जाईल. पक्षाने दिलेले उमेदवार तन-मन-धनाने आणि चिकाटीने लढतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. . या बैठकीस पक्षाचे प्रदेश सचिव बबलू गायकवाड, सोलापूर महापालिकेतील बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे, शहराध्यक्ष देवा उघडे, नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे आदींची उपस्थिती होती.

पुणे - मूकबधिर बांधव, दिव्यांग बांधव आपल्या हक्कांसाठी लढत असताना त्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. निष्ठुर निर्दयी, पाषाणहृदयी सरकार गेलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे.पुण्यातली समाज कल्याण आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या दिव्यांग बांधवांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला. याच घटनेचा निषेध जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवला आहेराजौरी - भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला आहे. राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. कृष्णा घाटीमध्येही संध्याकाळी साडेपाच वाजता गोळीबार करण्यात आला.
भारताच्या हल्ल्याला पाकिस्तान तेवढ्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देईल, असे पाकिस्ताने म्हटले आहे. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी, पाकिस्तानने भारताचा हवाई हल्ल्याचा दावा फेटाळून लावला.पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या हल्ल्याला उशिरा प्रतिकार केला, या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला.पाकिस्तानने अखनूर, नौशेरा आणि पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. पाकिस्तानचा अखनूर, नौशेरासह पुंछ आणि राजोरीतल्या मिळून जवळपास सात विविध सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.श्रीनगर - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ इब्राहिम, मेहुणा युसुफ अजहरसह जवळपास ३०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. १२ 'मिराज-२०००' लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.दरम्यान, ही कारवाई युद्धाचा भाग नसून गुप्तचर संस्थानी दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी केलेली कारवाई आहे. बालाकोट आणि इतर भागातील आत्मघातकी बॉम्बद्वारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत जवळपास ३०० दहशतवादी ठार झाले आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई २१ मिनिटे चालू होती. त्यात ३०० दहशतवादी ठार झाले. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून १ हजार किलो वजनाचे बॉम्ब टाकले. बॉम्ब हल्ल्यांमुळे जैशच्या तळांसह टेरर लॉन्च पॅडही उद्ध्वस्त झाले आहेत.


नवी दिल्ली - यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिले आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात मला नाहक गोवण्यात आले असून या प्रकरणी सुरू असलेली चौकशी संपल्यानंतर देशवासीयांच्या सेवेसाठी आणि त्यातही उत्तर प्रदेशातील जनतेसाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे, असे वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. 
वाड्रा यांनी एक प्रदीर्घ पोस्ट लिहून आपलं मन मोकळं केलं आहे. वाड्रा यांची मनी लाँडरिंग प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू असून त्यावरच बोट ठेवत त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. दिल्ली, राजस्थान येथे ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिलो. आठ-आठ तास चौकशी झाली. प्रत्येक नियमाचे मी पालन केले. अर्थात मी किंवा अन्य कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, याची पूर्ण जाणीव मला आहे. या सगळ्याच गोष्टींतून मला बरेच काही शिकायला मिळत आहे. मी अधिक कणखर बनत आहे, असेही वाड्रा यांनी पुढे नमूद केले. वाड्रा यांनी इंग्रजी आणि हिंदीतून ही पोस्ट लिहिली असून केरळ आणि नेपाळमधील मदतकार्याचे काही फोटोही शेअर केले आहेत.


नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु व्हायला आता काही काळच बाकी राहीला आहे. लवकरच प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन शेवटच्या ‘मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधला. मात्र, निवडणुकीनंतरही आपण पुढील मन की बातमधून संवाद साधू असे म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधानपदी असू असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. मोदी म्हणाले, पुढील दोन महिन्यांसाठी आम्ही सर्वजण निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त राहणार आहोत. मी स्वतः या निवडणुकीत उमेदवार आहे. निरोगी लोकशाही परंपरेचा सन्मान करताना पुढची ‘मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. मार्च, एप्रिल आणि संपूर्ण मे महिना या तीन महिन्यांच्या काळात आमच्या सर्व भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आपल्यासमोर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमांतून मांडेन त्यानंतर अनेक वर्षे आपल्याशी संवाद साधत राहिन, अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पुन्हा पुढील सरकार स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला.


मुंबई - फेरिवाला धोरणानुसार मुंबईत फेरीचा व्यवसाय करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपविधी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर आता अधिकृत फेरिवाल्यांचे मासिक शुल्कही निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार दुप्पट शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित आकारणी सुरू करण्यात येणार आहे. 
महापालिकेने सन २०१४ मध्ये मुंबईतील सर्व फेरिवाल्यांकडून अर्ज मागविले होते. या अर्जांची पडताळणी करून परिमंडळ फेरिवाला समिती आणि शहर नियोजन फेरिवाला समितीसमोर मांडण्यात येत आहे. फेरिवाल्यांचे शुल्क निश्चित करण्यात येत आहे. पदपथ विक्रेता उपविधी तयार केल्यानंतर आता फेरिवाल्यांच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये सध्या आकारण्यात येणाºया शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तर अतिरिक्त शुल्कातही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अ, ब, क या तीन प्रवर्गात अनुक्रमे २५, १५ आणि १२ रुपये याप्रकारे मासिक शुल्क आकारले जाते होते. यापुढे अ आणि ब असे दोन प्रवर्ग बनवून त्याप्रमाणे अनुक्रमे ५०, २५ रुपये असे शुल्क आकारले जाणार आहे.


मुंबई - मुंबई विद्यापीठाचा यंदाचा सुमारे ६५६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प ६१ कोटी रुपये तुटीचा असून तो आयत्यावेळी सादर करण्यात आल्यामुळे परिषदेतील दोन सदस्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच विद्यापीठाच्या या कारभारासंदर्भात राज्यपालांकडे तक्रार करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. 
मुंबई विद्यापीठाचा हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने तयार केलेला अर्थसंकल्प विद्यापीठ कायद्यानुसार हा अर्थसंकल्प सिनेटसमोर मांडण्याआधीच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेपुढे मांडून मान्यता घ्यावी लागते. मात्र या नियमाचा विसरच मुंबई विद्यापीठाला पडला असल्याची धक्कादायक बाब शनिवारी उजेडात आली. शनिवारी विद्यापीठ प्रशासनाने मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर हजर होते. मात्र, इतर अनेक महत्त्वाच्या सदस्यांनी हजेरी लावलेली नव्हती. या बैठकीला २२ सदस्यांपैकी १० सदस्यच उपस्थित होते. तर वित्त अधिकारीदेखील अनुपस्थित होते. मुळात इतकी कमी सदस्य संख्या असताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता अर्थसंकल्प सादर का करण्यात आला?, असा प्रश्न व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला. आजपर्यंत विद्यापीठाचा इतका अनागोंदी कारभार पाहिला नसल्याची टीकाही त्यांनी केली. या सर्व प्रकरणावर आम्ही निषेधाचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विरोधात मांडला आहे. याप्रकरणी आम्ही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार करणार आहोत असेही ते म्हणाले. 
दुसरीकडे, 'बुक्टो' या संघटनेनेदेखील याविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. बुक्टोच्या मुंबई विद्यापीठाच्या माजी मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्या मधु परांजपे म्हणाल्या की, विद्यापीठ अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयाबाबतही गंभीर नाही. हे दुर्दैवी आहे. अर्थसंकल्पासारख्या विषयाची कल्पना अगोदर देणे आवश्यक आहे. जोपर्यंत अर्थसंकल्पाची माहिती सदस्यांना मिळणार नाही, तो जोपर्यंत पूर्ण वाचत नाही, तोपर्यंत त्यावर मते मांडता येणार नाही. विद्यापीठाच्या इतिहासात अशा प्रकारे घटना कधीच घडली नसल्याची टीका त्यांनी ही यावेळी केली.


नागपूर - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली. पण, त्यामध्ये रिपाइंचा विचार न झाल्याने केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. यावर त्यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपली नाराजी देखील बोलून दाखवली आहे. शिवाय, युतीमध्ये राहायचे की नाही याचा निर्णय पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य देखील यावेळी रामदास आठवले यांनी केले आहे.युतीमध्ये एकही जागा रिपाइंला दिली नाही ही बाब संतापजनक अशी आहे. रिपाइंमुळे NDAला २०१४ मध्ये यश मिळाले होते. ही बाब विसरता कामा नये, आम्हाला लोकसभेसाठी दक्षिण मुंबईची जागा आणि विधानसभेसाठी १० जागा द्याव्यात', अशी मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे.आम्हाला फरफटत नेण्याची भाजपची भूमिका असून आम्हाला महामंडळ देखील दिले गेले नाही. त्यामुळे देखील आमची नाराजी आहे. मी देशभर भाजपची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना रिपाइंला दुर्लक्षित करण्यात आले आहे. काँग्रेससोबत असताना असे दुर्लक्षित नव्हतो', अशा शब्दात रामदास आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.


परळी - राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा बीडमधले नेते करतात, मात्र लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे हे चिक्की खाण्याएवढे सोपे नाही असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर शरसंधान केले. परळीमध्ये सहा जिल्हापरिषद नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक आमचे आहेत. हिंमत असेल तर समोरासमोर या कोण संपतंय पाहू असे आव्हानही पंकजा मुंडे यांना त्यांनी दिले आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचे डिपॉझिट जप्त करू असे वक्तव्य केले होते. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. परळीत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. 
या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री परळीत आले होते, त्यांनी परळीवर टीका केली. मात्र मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा मस्तवाल सत्तेचा शेवट परळीत होतो. तुम्हाला परळीबद्दल इतकी अडचण आहे तर तुम्ही सुरुवात परळीपासून का केली? रायगडासारख्या पवित्र भूमितून का केली नाही? तुमच्या मनात काळं आहे हे यावरूनच स्पष्ट होत आहे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तुमच्या सोळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवाल का? असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि महामंडळ झालेच नाही. विधानसभेत मी पराभूत झालो तरीही पवारसाहेबांनी मला विरोधी पक्ष नेतेपद दिले, त्यामुळेच मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून त्यावर आवाज उठवू शकलो, परळीत आजवर मी एवढी मोठी सभा पाहिलेली नाही असेही धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हटले. 
या सभेला जोगेंद्र कवाडेंचीही उपस्थिती होती. देशाच्या मातीत जातीयवादी सरकार मिसळून टाकण्याची वेळ आली आहे आहे. आपण सगळ्यांनीच हा निर्धार करायचा आहे. देशात कुणीही सुरक्षित नाही, संभाजी भिडेंसारख्या लोकांना संरक्षण देणारे हे सरकार आहे लोकांनी त्यांच्या मनातला आक्रोश मतपेटीत उतरवला पाहिजे असे जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी म्हटले.


इंदापूर - धाडसी महिला जर राज्याचे नेतृत्व करायला पुढे येत असेल, तर आपल्याला आनंदच आहे. यामुळे पंकजा मुंडे या मुख्यमंत्री झाल्या तरी मला चालेल. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. ‘राज्याचे राजकारण नक्की कोणती दिशा घेत आहे हे सामान्य जनतेला समजन्यापलिकडे असून, आगामी निवडणूकांचे पडघम वाजल्याने अनेक राजकीय व्यक्ती वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत,’ असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. बीडच्या सभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे बोलताना, ‘मी वाघीण आहे, मला राज्यभर सभेसाठी बोलावतात,’ असे वक्तव्य केले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता, कोणतीही धाडसी महिला राज्याचे नेतृत्व करत असेल, तर मला आवडेलच. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत,असे सुळे म्हणाल्या. सध्याचे सरकार असंवेदनशील आहे. ५६ इंची छाती असतानादेखील पाकिस्ताने पुलवामा येथे हल्ला केलाच कसा. सरकारच्या अनेक योजना निष्फळ झाल्या आहेत. तसेच शेतीला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, महारुद्र पाटील, अमोल भिसे आदी उपस्थित होते.


जालना - जालनातील भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे विरूद्ध सेनाचे नेते आणि राज्यामंत्री अर्जुन खोतकर या वादाचा फायदा घेण्याची काँग्रेस पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. खोतकर यांना काँग्रेस पक्षात घेण्सासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दिल्लीतील काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांनी खोतकर काँग्रेस पक्षातील हालचाली याबाबत दिला दुजोरा दिला आहे. खोतकर यांना “हात” देत युतीत वाद वाढवण्याची शक्यता आहे. खोतकर यांनी यापुर्वीच रावसाहेब दानवे विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. दानवे - खोतकर वाद विकोपाला गेल्याचा राजकीय फायदा काँग्रेस करून घेण्याच्या तयारीत आहे.


इंदापूर - मित्र पक्षांची आघाडी सन्मानपूर्वक असली पाहिजे. लोकसभा निवडणूक झाल्यावर विधानसभा निवडणुकीत आमचा गळा कापून आमच्या छाताडावर पाय ठेवून बसू नका. दुर्बलतेतून नव्हे, तर देशातील जातीयवादी सरकार घालविण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला आहे, हे देशाचे नेतृत्व करायला निघालेल्या कोणीही मोठय़ा नेत्याने विसरू नये, असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून दिला.इंदापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी समारंभ चव्हाण यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, नगराध्यक्षा अंकिता शहा, भरत शहा, गटनेते कैलास कदम, कृषाजी यादव, सभापती करणसिंह घोलप या वेळी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले,की दुर्बलतेतून नव्हे, तर देशातील जातीयवादी सरकार घालविण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने शहरातील मतदार जोपासण्यासाठी शेतमालाच्या किंमती दाबल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला. कर्जमाफी किती झाली ते हे लोक सांगत नाहीत. दूध धंदा तोटय़ात आहे. जास्त उत्पादन झाल्यावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा या सरकारकडे नाही. पाच राज्यांतील निवडणुकीत तीन राज्यातील यांची सत्ता लोकांनी घालवली. म्हणून शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये इतकी तटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे.पाटील म्हणाले,की मताचे विभाजन होऊ नये म्हणून आघाडी झाली आहे. मात्र आघाडीचा धर्म मित्र पक्षानेही पाळला पाहिजे. मतदार हुशार झाला असून आम्ही मतदारांना काही सांगण्याची गरजच राहिलेली नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभेसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करुनच आघाडी करावी.आमटोली - कामडारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आमटोली जंगल भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या भागात अद्याप माओवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कामडारा पोलीस आणि कोबरा बटालियनद्वारे संयुक्त कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी दोन माओवाद्यांना ठार केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन माओवाद्यांना ठार केल्यानंतर संपूर्ण परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. ठार झालेले माओवादी या परिसरात कुप्रसिद्ध होते असे सांगण्यात येत आहे.


पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री पर्रिकरांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. मात्र, त्यांचा प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.पुढील ४८ तासांच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, पर्रिकर यांना व्हॅटिंलेटरवर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र, शनिवारी दुपारी पर्रिकरांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर गोव्याचे वरिष्ठ मंत्री विजय सरदेसाई यांनी या चर्चांचे खंडन केले आहे.मुख्यमंत्री वैद्यकिय निरिक्षणाखाली आहेत. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. दोन दिवसांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आम्ही उपचारांसाठी स्वतंत्र रुममध्ये ठेवले आहे. डॉक्टरांना त्यांच्या काही चाचण्या करायच्या असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुख्यमंत्री लढाऊ आहेत. एक दिवसानंतर त्यांना पुन्हा घरी नेण्यात येईल, असे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे सांगितले.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी लढत आहेत. त्यांनी यापूर्वी गोवा, मुंबई, न्यूयॉर्क, दिल्ली येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत.


राजस्थान - आपला लढा दहशतवाद्यांविरुद्ध आहे, काश्मिरींविरुद्ध नाही, असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामाच्या हल्लेखोरांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल, दहशतवादाला कसे चिरडायचे हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा दिला.आपली सशस्त्र दले, सरकार आणि आई भवानीचा आशीर्वाद यावर विश्वास ठेवा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ातील भाजपच्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. इम्रान यांनी आपले शब्द खरे करून दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मोदी यांनी सुनावले.पुलवामातील १४ फेब्रुवारीच्या आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, ‘दहशतवाद असाच सुरू राहिला तर जगात शांतता नांदणे शक्य नाही. संपूर्ण जग दहशतवादाविरुद्ध एकवटले आहे. तो पसरवणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी पुढे जात आहोत.’ केवळ भारतच नाही तर पुलवामा जिल्ह्य़ातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत सारे जग आहे, जवान आणि सरकारवर विश्वास ठेवा, असे आवाहनही मोदी यांनी केले. भारतात राहून फुटीरतावाद पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून ती पुढेही सुरू राहील. हा बदललेला भारत आहे, आता दुख सहन केले जाणार नाही. दुख सोसल्यानंतर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला दहशतवादाला कसे चिरडायचे हे माहीत आहे. हा नव्या धोरणांचा अंगिकार केलेला भारत आहे, असा इशारा मोदी यांनी दिला.


नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १ मार्चपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी दिल्ली विधानसभेत केली. केजरीवाल म्हणाले, 'दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यासाठी मी बेमुदत उपोषण करणार आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील. लोकांनी आम्हाला इतके दिले की त्यांच्यासाठी आयुष्याचे बलिदान करावे लागले तरी बेहत्तर.' स्वातंत्र्यानंतर दिल्लीचे नागरिक अन्याय आणि अपमान सहन करत आहेत. कारण त्यांनी निवडून दिलेल्या सरकारकडे त्यांच्यासाठी काम करण्याच्या शक्तीचा अभाव आहे, असा केजरीवाल यांचा दावा आहे.वसई - वसई विरार महापालिकेचा १ हजार ७४८ कोटी रुपये आणि ४०६ कोटी रुपये शिलक्कीचा अर्थसंकल्प शुक्रवारी पालिकेच्या विशेष महासभेत स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आला.या अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांचा समावेश करण्यात आला असून देहरी आणि सुसरी प्रकल्पासाठी दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहराला ४९० दशलक्ष लिटर्स अतिरिक्त पाणी मिळणार आहे.वसई विरार शहर महापालिकेच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी मागील आठवड्यात सादर केले होते. त्यात सुधारण करून स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी महासभेत अर्थसंकल्प सादर केला. 

१. आरोग्य सेवा संपूर्णपणे मोफत 
२. वसई कौलसिटी येथे २०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि नालासोपाऱ्याच्या आचोळे येथे ३०० खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय प्रस्तावित 
३. देहरजा नदीवर आखण्यात आलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पालिकेने शासनाच्या जलसंपदा विभागाकडे १६७ कोटी आणि सुसरी प्रकल्पासाठी १६ कोटी रूपये जमा केले आहेत. 
४. देहरजी, सुसरी, सातिवली, राजावली, कामण, कवडास बंधाऱ्यांची उंची वाढवणार 
५. खोलसापाडा १ व २ योजनेस मंजुरी 
६. अमृत अभियानाअंतर्गत १३० कोटी रुपयांच्या अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेस मंजूरी. त्यासाठी २३३ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद


मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांनी नागरिकांना फुकट म्हणून वाटलेल्या कचऱ्याच्या डबेखरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच केल्याने पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांना पालिकेच्या वतीने कचºयाचे डबे मोफत वाटण्याचा ठराव केला होता. ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी हे डबे नागरिकांना मोफत देण्याचे ठरले. त्या अनुषंगाने पालिकेने निविदा मागवून तब्बल १४ हजार डबे खरेदी केले. कचºयाचे डबे ढकलता यावेत, म्हणून त्याला खाली रॉड बसवून चाके लावण्यात आली. यासाठी सुमारे अडीच कोटींचा खर्च असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. परंतु, या डब्यांच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार महापौरांनीच आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे. तक्रारीत महापौरांनी, पालिकेकडे कचºयाचे डबे पाच ते सहा महिन्यांपूर्वीच आले असताना त्याचे वाटप योग्यरीत्या करण्यात आले नाही, असे म्हटले आहे.कोणत्या प्रभागात कोणत्या नगरसेवकास किती डबे दिले, याची माहिती नसून काही प्रभागांत मोठ्या प्रमाणात डबेवाटप झाले आहे. काही नगरसेवकांनी तर स्वत:ची नावे टाकून डबे रहिवाशांना दिली आहेत. महापौरांनी त्यांच्या स्वत:च्याच प्रभागात वाटप केलेल्या डब्यांमध्ये तफावत असल्याचे म्हटले आहे. जवळपास २५० नग चाके आणि रॉड जास्त मिळाले आहेत. डबेवाटपावर कोणतेही नियंत्रण नसल्याने तब्बल पाच हजार चाके व रॉड कमी असल्याचे दिसून आले, असा गंभीर आरोप महापौरांनी केला. या रॉड घोटाळाप्रकरणी आपली चूक लपवण्यासाठी उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी ज्या कंपनीकडून डबे खरेदी केले, त्यांना पत्र देऊन पाच हजार रॉड कमी असल्याचे कळवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.


पनवेल- सध्याचे युग हे संशोधनाचे युग असून, अवकाश संशोधन हे सर्वांच्या परिचयाचे व आवडीचे संशोधन क्षेत्र आहे. अमेरिकास्थित ‘नासा’ ही अवकाश संशोधन संस्था जगभरातील नंबर एकची संस्था समजली जाते. याच संस्थेने हाती घेतलेल्या एका उपक्रमासाठी पनवेलमधील प्रणित पाटील या तरुणाची निवड करण्यात आली आहे. प्रणितच्या निवडीमुळे पनवेलचे नाव जगभरात प्रसिद्ध होईल, यात शंका नाही.‘नासा’ व डॉ. जॉन सेपनियक यांच्या प्रकल्पांतर्गत अमेरिकेच्या यूहाट प्रांतात मंगळ डीरु ट रिसर्च स्टेशन या ठिकाणी संशोधन केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी मंगळ ग्रहाची कृत्रिम माती, मातीची निरनिराळी कार्बनयुक्त सयुंगे बनवणे, मंगळ ग्रहाचे कृत्रिम पर्यावरण तयार करून पृथ्वीवरील कृत्रिम बियांची पेरणी करण्यात येणार आहे. या वेळी दिसून येणारे परिणाम या संदर्भात हे संशोधन सुरू आहे.
भविष्यात मंगळ ग्रहावर वास्तव्य करण्याच्या दृष्टीने हे संशोधन सुरू आहे, याकरिता प्रणित पाटील याचे टीमसह २६ जानेवारी ते ९ फेब्रवारी दरम्यान यूहाट या संशोधन केंद्रावर वास्तव्य होते. संशोधन करताना राहणीमान, जेवण यामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याला दिवस काढावे लागले. बेचव जेवण, टोमॅटोची पावडर, अंघोळीसाठी जेली आदीच्या आधारे या संशोधन केंद्रात दिवस काढल्याचे प्रणित सांगतो. भविष्यात चंद्रावर जाण्याचा योग आल्यास त्यासाठी आवश्यक व उपयुक्त माहिती या संशोधनातून हाती लागल्याचे प्रणित सांगतो.प्रणित पाटील मूळचा अलिबागचा असला, तरी त्याचे शिक्षण पनवेलमध्ये झाले आहे. १९९१ मध्ये पनवेलमध्ये आल्यावर प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये झाले. २००९ मध्ये आयटी एमजीएम कॉलेज, कामोठे येथे पूर्ण केले. २०१० मध्ये घाटकोपर येथील प्रतिष्ठित कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून त्याने नऊ महिने काम केले. त्यानंतर २०१०-११ मध्ये अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून रु जू झाला. प्रणितचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget