June 2019

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ‘देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दात भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकालातील पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेचे आभार मानले.पुढे ते म्हणाले कि,आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क काढून घेण्यात आला.यावेळी त्यांनी जल संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित केले. पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. असे मोदी म्हणाले. ‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ असा संदेश त्यांनी दिला. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन केले पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली - लोकसभेची निवडणूक हरलो पण, आता विधानसभा निवडणुकीसाठी तरी संघटना मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्षांशी राज्य स्तरावर जागावाटपाची चर्चा सुरू करा, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी संध्याकाळी सुमारे दोन तास दोन वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून आपल्यामुळे प्रदेश स्तरावर पक्षनेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये यासाठी बैठका घेत असल्याचे राहुल यांनी पक्षनेत्यांना सांगितले. महाराष्ट्रासह, झारखंड, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार असून अन्य तीनही राज्यांतील नेत्यांशी राहुल यांनी चर्चा केली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण, आता हा विषय संपलेला असून त्यावर चर्चा केली जाणार नाही. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून सदस्य पुढील निर्णय घेतील, असे राहुल यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, वर्षां गायकवाड, रजनी पाटील, राजीव सातव, अमित देशमुख, माणिकराव ठाकरे आदी नेते बैठकीला उपस्थित होते.

इंदूर - पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. त्यांची रविवारी जेलमधून सुटका करण्यात आली. आकाश हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत.'पालिका अधिकाऱ्याचे अतिक्रमण विरोधी पथक एका महिलेला ओढत घराबाहेर काढत होते. म्हणून मी मारहाण केली. मी जे काही केले याची मला बिलकूल खंत नाही. या अधिकाऱ्यांनी मला पुन्हा कधी फलंदाजी कारायला लावू नये, अशी मी देवाकडे पार्थना करतो', असे विजय यांनी म्हटले आहे.इंदूर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून बुधवारी सकाळी कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असतानाच वाद झाला आणि आमदार आकाश विजयवर्गीय तिथे दाखल झाले. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला.पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या अधिकाऱ्याची सुटका झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आकाश यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करुन आकाश यांना अटक करण्यात आली होती.

कोईंबतूर - परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली कित्येकवेळा अनेकांची फसवणूक होत आहे. दुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली ४ भारतीय महिलांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलांना एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले गेले. मात्र दुबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना बार डान्सर म्हणून काम करण्यास भाग पाडले. पण, भारतीय दुतावासाने यामध्ये लक्ष घातल्यानंतर महिलांची सुटका करण्यात आली आहे. महिलांची सुटका करण्यामध्ये दुबई पोलिसांनी केलेली मदत हो मोलाची ठरली. शिवाय महिलांना दाखवलेल्या खंबीरपणामुळे देखील त्यांना भारतात येणे शक्य झाले आहे. चारही महिलांना भारतात पाठवले जाणार आहे. 
तामिळनाडूतील कोईंबतूर येथील चार महिलांना दुबईमध्ये एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करण्याचे सांगून दुबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर बारमध्ये काम करण्यास जबरदस्ती करण्यात येऊ लागली. त्यांना जबरदस्ती एका खोलीत बंद करण्यात आले होते.यावेळी प्रसंगावधान राखत एका महिलेने व्हॉटसअॅपवरून आपल्या कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली. अखेर भारतीय दुतावासाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दुबई पोलिसांना याची माहिती दिली. दुबई पोलिसांनी त्यानंतर या महिलांची सुटका केली आहे. या चारही महिलांना विमानाने कोडिकोडे येथे पाठवले जाणार आहे. तर, भारतीय दूतावास महिलांना दुबईला पाठवणाऱ्या एजंटविरोधात कारवाई करण्यासाठी तामिळनाडू सरकरला पत्र लिहिणार आहे. या पत्रामध्ये एजंटविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - 'जेट एअरवेज'च्या ७५ टक्के समभागासाठी कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्या आदि ग्रुपने मिळून बोली लावण्याची घोषणा शुक्रवारी केली. जेट एअरवेजला खरेदी करण्यासाठी हा एक प्रयत्न असेल. एनसीएलटीच्या प्रक्रियेचा सामना करणारी 'जेट एअरवेज' पहिलीच विमान कंपनी आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही अपयशी ठरली. एनसीएलटीमध्ये कंपनीविरुद्ध 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने २६ इतर कर्जदारांकडून २० जून रोजी दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली होती. जेट एअरवेजवर बँकांचे जवळपास ८५०० करोड रुपये तसेच वेंडर, पट्टा देणारे आणि कर्मचारी इत्यादी २५,००० करोड रुपये थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांचा समूह आणि आदि ग्रुपने एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. 
संयुक्तरित्या देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय विमान उद्योगाच्या इतिहासात हा एक नवीन प्रकाश असेल. एखाद्या विमान कंपनीचा प्रत्येक कर्मचारीच त्या कंपनीचा मालक असेल, हे इतिहासात पहिल्यांदाच घडेल. आर्थिक संकटांशी समाना करणारी जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे १७ एप्रिलपासून बंद आहेत. कर्मचाऱ्यांच्या समूहाने २५०० ते ५००० करोड रुपयांची तयारी जेट एअरवेजसाठी केली आहे.


रायपूर - छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी मोहन मारकम यांना प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यावेळी जनसभेला संबोधीत करताना ते भरसभेत ढसाढसा रडायला लागले. त्यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी परिस्थिती फार बिकिट होती मात्र आमच्या कार्येकर्त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. त्या कठीण काळात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे ते सभेला संबोधीत करताना म्हणाले. यावेळी सचिव गिरीश देवांगन यांच्याविषयी बोलताना ते भरसभेतच रडायला लागले.मोहन मारकम माझ्यासोबत नेहमीच राहिले आहेत. याचबरोबर टीएस सिंहदेव यांची सोबत मिळाली नसती तर ऐवढा मोठा विजय प्राप्त करु शकलो नसतो असे ही भूपेश बघेल म्हणाले.

जळगाव - भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून जावे लागणे आणि पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची संधी न मिळणे याची खंत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या भाजपच्या जळगावमधील बैठकीतही याचाच प्रत्यय आला. या बैठकीत खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय येथील कुणाचे किंवा मुख्यमंत्र्यांचेही नाही,असा टोला लगावत खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.दरम्यान, खडसे यांना मंत्रिपदापासून दूर व्हावे लागल्यानंतर अनेकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणातही त्यांच्या मनातली सल व्यक्त झाली. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. तिथून ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले,असे सांगत ते नशीबवान असल्याचे सांगायलाही खडसे विसरले नाहीत.

नागपूर - शहरातील लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिलीप टापरे असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तोतया पोलीस बनून लोकांकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून तो पोलिसाच्या वर्दीचा धाक दाखवून लोकांकडून आत्मविश्वासाने अवैद्यपणे पैसे उकळायचा. पोलिसांनी देखील दिलीपला खरा पोलीस समजून दुर्लक्ष केले होते. मात्र, नुकताच लकडगंज येथील गंगाजमूना परिसरात तो पैशासाठी हुज्जत घालताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी दिलीपला विचारणा केली, मात्र त्यादरम्यान दिलीपच्या वर्दीवर नेमप्लेट दिसली नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी तुरंत दिलीप टापरे याला बेड्या ठोकल्या.दिलीप मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातला असून, नागपूरात गाडगेबाबानगर परिसरात राहतो. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, २६०० रुपये रोख आणि दुचाकी जप्त केली आहे. लकडगंज पोलीस स्टेशनचे एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना उघडकिस आल्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सोलापूर - यंदाची लोकसभा निवडणूक ही विकासाच्या आधारे, जनसंपर्काच्या, गोरगरिबांच्या कल्याणाच्या आधारे झालेली नसून जातीपातीच्या मुद्द्यावर झाली आहे. परंतु याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सक्षमपणे मात करेल. शिंदे साहेबांनी आजपर्यंत जनतेची सेवा केली. कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 
यावेळी शिंदे यांनी, ये सफर बहोत है कठीण, ना उदास हो मेरे हमसफर, के है अगले मोड पर मंजीले, नही रहनेवाली मुश्कीले, मेरी बात पर यकीन कर, ना उदास हो मेरे हमसफर, अशी शायरी करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आयोजित केली होती.यावेळी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस पक्षाच्या माध्तूमातून मतदार नोंदणी, आरोग्य शिबीर व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत, असे म्हणाल्या. येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उभे करून जातीधर्मांत फूट पाडणाऱ्या विचारांच्या विरोधात आपली लढाई सुरूच राहील. शेवटी सत्याचाच विजय होतो. पुन्हा संघटित होऊन लढूया. सत्ता असो वा नसो सदैव जनतेच्या सेवेत राहू. आम्ही खचनार नाही पुन्हा जिंकून दाखवू, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अमरावती - खासदार नवनीत राणा यांनी शहरातील तहसील कार्यालयाला भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रामाणिकपणे काम करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.अमरावती तहसील कार्यालयात खासदार नवनीत राणा पोहोचताच श्रावण बाळ योजना, घरकुल योजना, सातबारा आशा विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा त्यांच्या पुढे वाचला. श्रावणबाळ योजनेचे पैसे वृद्धांना वर्ष होऊनही मिळत नासल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर आम्ही त्वरित पैसे देत असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर मात्र, उपस्थित लाभार्थ्यांनी ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला. लाभार्थ्यांकडून ही प्रतिक्रिया येताच खासदार नवनीत राणा यांनी तहसीलमध्ये काम कसे चालते मला ठाऊक आहे. ९ वर्षांपासून मी तहसीलचे काम पाहत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यापुढे तहसीलमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांनी दिले. त्याचबरोबर, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाप्रमाणेच तहसील कार्यालयालाही मी दर महिन्याला भेट देणार असल्याचे त्यांनी संहितले. त्यानंतर राणा यांनी उपविभागीय अधिकारी डी.यु राजपूत आणि तहसीलदार प्रज्ञा महंडूले यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडविणे, विधवा, बाळंतीण आणि वृद्ध महिलांची कामे तातडीने करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र त्वरित देणे व याठिकाणी एजंट लोकांना प्रवेश न देने. त्याचबरोबर लोकांची कामे थेट व्हावीत, असे निर्देशही खासदार राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई - आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्यापूर्वी झायराने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायराने अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. झायराने नुकतेच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिले आहे.
झायरा वसीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक ६ पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘५ वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझे आयुष्यच बदलून गेले. या क्षेत्रानं मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळाले. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे 'इमान'च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणात मी सातत्याने काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झाले. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचे मला ज्ञान नव्हते याची जाणीव झाली. आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणं असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते.

मुंबई - राजकुमार राव आणि कंगना रणौत यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेंटल है क्या?’ या चित्रपटाच्या शीर्षकावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टििफकेशनने (सीबीएफसी)’ चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत निर्मात्यांकडे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून हा चित्रपट आता नव्या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.‘मेंटल है क्या?’ हे शीर्षक आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी भेदभाव करणारे आणि हिणवणारे असल्याची तक्रार भारतीय मनोचिकित्सा संस्थेने केली होती. त्यानंतर या शीर्षकामध्ये बदल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे नाव ‘जजमेंटल है क्या?’ असे करण्यात आले आहे.‘जजमेंटल है क्या?’ या सिनेमाचं पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी वादामध्ये सापडत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या नावावर अनेकांनी टीकाही केली होती. यावर सीबीएफसीने आक्षेप घेत चित्रपटाचं नाव बदलण्याची सूचना दिली. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, चित्रपटामध्ये काही बदल केल्यानंतर सीबीएफसीनं ‘जजमेंटल है क्या?’ या चित्रपटाला यूए सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनातील मार्ग मोकळा झाला असून हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

गडचिरोली - छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्हय़ात शुक्रवारी नक्षलवादी व पोलीस दलात झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.बिजापूर जिल्हय़ातील भरमगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केशकुतूल येथे नक्षलवादी व पोलीस दलात चकमक झाली. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९९ बटालियनचे सहायक उपनिरीक्षक मधु पाटील, सहायक उपनिरीक्षक मदन पाल आणि हवालदार राजू ओटी हे तीन जवान शहीद झाले. या चकमकीत वाहनात बसलेल्या एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला. तर एक विद्यार्थिनी जखमी झाली.पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांना राजनांदगाव, कांकेर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हय़ाच्या सीमेवर कोहकाटोला गावात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर पोलीस कोहकाटोलाच्या दिशेने निघाले होते. मात्र, केशकुतूल येथेच नक्षलवाद्यांनी वाहनावर गोळीबार सुरू केला. यात घटनास्थळीच दोन जवान शहीद झाले. त्यानंतर अन्य एकाचा मृत्यू झाला. यातील एका जखमी जवानाला व विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांकडील साहित्य लुटून नेल्याचे सांगण्यात आले. छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात या घटनेनंतर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजला. विरोधी आणि सत्ताधारी पक्षानेही गदारोळ केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता. त्याला बगल देण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
धनगर समाजाला आरक्षणही दिले जात नाही आणि त्यांच्या संदर्भातील अहवालही सरकार सभागृहासमोर आणत नाही असा आक्षेप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला, तर, भाई जगताप यांनी असंसदीय शब्द वापरल्याने ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घेतली. यावेळी स्थगन प्रस्तावाद्वारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण उपस्थित करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या गदारोळामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तत्पूर्वी भाई जगताप यांचे विधान तपासून सोमवारी आपण निर्णय देऊ असे सभापतींनी जाहीर केले.

लखनऊ - योगी सरकारने मोठा निर्णय घेत १७ ओबीसी जातींना एससी वर्गात समाविष्ट केले आहे. योगींचा हा निर्णय यूपीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने कश्यप, कुम्हार आणि मल्लाह सारख्या ओबीसी जातींना एससी अंतर्गत आणले आहे. निषाद, बिंद, मल्लाह, केवट, कश्यप, भर, धीवर, बाथम, मछुआरा, प्रजापति, राजभर, कहार, कुम्हार, धीमर, मांझी, तुरहा, गौड या जातींचा यात समावेश आहे. यांच्या परिवारांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना या देण्यात आले आहेत. या आधीच्या सरकारनेही अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हाची सरकारे निर्णयापर्यंत पोहोचू शकली नव्हती. योगी सरकारने या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

अलिबाग - श्रीवर्धन शहरातील एका व्यापाऱ्याला मुलीने आपल्या जाळ्यात ओढून तिच्या साथीदारामार्फत ब्लॅकमेल करून पंधरा लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार २४ जून रोजी घडला आहे. याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह सहा जणांना अटक केली आहे, तर अन्य दोन महिला फरार आहेत. हे प्रकरण खंडणीचे असले तरी यामध्ये सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रीवर्धन शहरातील एका किराणा व्यापाराला २४ जून रोजी आरोपी पूजा हिने फोन करून तिच्या वडिलांच्या आजारपणाकरिता पशांची गरज असून फिर्यादी यांनी पैसे दिल्यास माझ्यासोबत हवे असेल तसे करू शकता असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे पूजाच्या बोलण्यावर भुलून माणगांव येथे गेले. त्यानंतर फिर्यादी पूजा हिला घेऊन माणगावमधील पूजा लॉजवर घेऊन गेले. लॉजवरील रूमवर पोहचल्यावर आरोपी विशाल मोरे व भूषण पतंगे हे लॉजच्या रूमवर येऊन धडकले. विशाल मोरे याने मी पूजा हिचा भाऊ आहे तर भूषण याने मी पत्रकार आहे असे सांगून इतर आरोपींनी फिर्यादी यास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जगदीश ठाकूर यांच्या झायलो कारमध्ये फिर्यादी याला टाकून अपहरण केले. त्यानंतर फिर्यादी याची सुटका करण्यासाठी १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.माणगाव येथे पशांची व्यवस्था न झाल्यामुळे त्या व्यापाऱ्यासह खंडणी मागणारे सगळे श्रीवर्धन येथे आले. श्रीवर्धन येथे आल्यानंतर सदर खंडणीखोर तडजोडीसाठी बसले. यावेळी तडजोडीला बसणाऱ्यांना समोरच्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे त्यांना घेऊन ते श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गेले. याबाबत फिर्यादी यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीवर्धन पोलिसांनी खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी व एक महिला फरार आहे.श्रीवर्धनमधील या व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचा प्रकार घडला असताना अजून काही व्यापाऱ्यांना लुटले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या खंडणी प्रकरणात भूषण पतंगे (२९), विशाल मोरे (३३), कुणाल बंदरी (२८), अलका ठाकूर (६५), सिद्धार्थ मोरे (२७), सर्व राहणार अलिबाग, जगदीश ठाकूर (४२) रा. बोर्ली मांडला, अक्षय दासगवकर (२५), रा माणगाव या सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिला फरार आहे.

मुंबई - मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून सुर्यदर्शनही झाले नाही. मात्र,पावसामुळे अनेक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.राज्यात मान्सूनचे आगमन झाले असतानाही मुंबईत पाऊस पडलेला नव्हता. तसेच तापमान देखील अधिक असल्याने मुंबईकर उकाड्यापासून त्रस्त झाले होते. मात्र, २८ आणि २९ जूनला जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू झाली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर भागात ही मुसळधार पाऊस पडतआहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे वाहतूक देखील खोळंबळी आहे. तसेच रेल्वे उशिराने धावत आहेत.

 नवी दिल्ली -  एक देश, एक निवडणूक या चर्चेनंतर आता एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर मोदी सरकारने काम सुरू केले आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. 
केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी गुरवारी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एक देश, एक रेशनकार्ड या योजनेविषयी माहिती दिली आहे. या बैठकीत सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यातील अधिकारी उपस्थित होते.
एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास बोगस रेशनकार्ड्ना आळा बसणार आहे. आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डलादेखील एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकणार आहे. याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत असलेल्या लोकांना होईल, असे पासवान यांनी सांगितले आहे.रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करण्याची सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

ओसाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी ओसाका इथे जी-२० समिट मध्ये सहभागी झाले. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये इराण, द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षेवर चर्चा झाली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प – मोदी भेट पहिल्यांदाच झाली. आम्ही चांगले मित्र झालो आहोत. शिवाय, दोन्ही देशांमधील संबंध देखील दिवसेंदिवस सुधारत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदीं यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.यावेळी नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा देखील मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद हा मानवतेसाठी धोका असल्याचं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. दहशतवादामुळे केवळ निष्पापांचे जीव नाही जात तर, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला खिळ बसते असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शिवाय, दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली.नवी दिल्ली - तोट्यात असणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यामध्ये एचटीएम, हिंदुस्तान केबल्स आणि इंडियन ड्रग्स या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. प्रकाश यांनी अवजड उद्योग आणि लोक उद्योग मंत्रालयाला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सध्या परिस्थितीबद्दल माहिती देण्याची विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी सरकारमधील केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली. याचवेळी सावंत यांनी तोट्यात चालणाऱ्या १९ सरकारी कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगत या कंपन्यांची यादी जाहीर केली.


हरियाणा -  एका काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हरियाणामध्ये प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर बंदुकीतून गोळ्या घालण्यात आल्यात. विकास चौधरी आपल्या कारमध्येच होते. गाडी पार्क करताना त्यांना गाडीतून खालू उतरुही दिले नाही. दोघे जण त्यांच्या कारच्या मागून धावत आलेत. एकाच्या हातात बंदूक होती. त्याने समोरुन थेट फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते दोघे पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
हरियाणामध्ये गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चौधरी हे सकाळी जिमला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. जिमला पोहोचल्यानंतर ते गाडीतून उतरणार होते इतक्यातच हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. 

मुंबई - मराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा आरक्षण कायदा वैध ठरवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही सांगितले. तसेच मराठा कार्यकर्त्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले. यापूर्वी सदावर्ते यांच्यावर न्यायालयाच्या आवारात हल्लाही झाला होता. यानंतर त्यांना पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. जाधव नावाचे एक पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडूनही ते मराठा असल्याने मला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. 
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या. आरक्षणविरोधी जनहित याचिकादार जयश्री पाटील यांची बाजू ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टासमोर मांडली होती. 

मुंबई - विधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतापले. एकाच लक्षवेधीत दोन खात्यांचा प्रश्न विचारण्यात आल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुलडाणा येथील लोणार सरोवरप्रकरणी पर्यटन विभागाचा आणि वन विभागाचा प्रश्न एकत्र करण्यात आला होता. मात्र कोणत्याही लक्षवेधीत विधिमंडळ कायद्यानुसार दोन विभागाचे प्रश्न एकत्र करता येत नाहीत ही बाब मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली. तसेच त्यावर संताप व्यक्त केला. 
अशा प्रकारचा प्रश्न सतत घडत असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. केंद्राच्या धर्तीवर आता अशा अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच ट्रेझरीला सांगून यांचे निवृत्तीवेतन बंद करतो, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. 

मुंबई - जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात झाली नाही. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढत चालली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा या राज्य सरकारच्या तलावांतून मुंबईसाठी रोज अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे, आवाहन पालिकेने केले आहे.
दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत पावसाची हजेरी लागते. मात्र, यंदा जूनच्या अखेरच्या आठवड्यांपर्यंतही पावसाचा पत्ताच नसल्याने पाणीपुरवठा करताना पालिका चिंतेत पडली आहे. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांमध्ये फक्त ७३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतून राखीव साठ्याचे पाणी पालिकेला घ्यावे लागते आहे. पालिकेच्या पाच धरणांमध्ये असलेला पाणीसाठा हा जुलैपर्यंतच पुरणारा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मागितली होती. ती सरकारकडून देण्यात आली आहे.

मुंबई - पुणे जिल्ह्य़ातील म्हतोबा देवस्थानच्या इनामी जमिनीच्या विक्रीप्रकरणात ४२ कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडवण्यास आणि बालेवाडी येथील एका प्रकरणात खेळाचे मैदान गिळंकृत करण्यास मालमत्ता व्यावसायिकांना मदत होईल असे निर्णय देत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी विधान भवनातील पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समोर बसून हजेरी लावली, आणि नंतर सर्व आरोप फेटाळून लावले.
म्हतोबा देवस्थानला १८६१ मध्ये २३ एकर जमीन चिमणा साळी यांना इनामी जमीन म्हणून व्यवस्थापनासाठी दिली गेली. १९०९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा वामन चिमणा साळी याचे नाव कागदपत्रांवर लागले. स्वातंत्र्यानंतर म्हतोबा देवस्थानतर्फे विश्वस्त चंद्रकांत चौगुले यांनी राधास्वामी सत्संग ब्यास या विश्वस्त संस्थेला जमीन आधी भाडेकरारावर दिली. नंतर चौगुले यांचे कुलमुखत्यारधारक एन. एस. छाब्रिया यांनी जमीन राधास्वामी सत्संग ब्यासला विकली. त्यानंतर ब्यासतर्फे हा व्यवहार नियमित करण्याचा आणि त्यापोटी सरकार आकारेल ते शुल्क भरण्याचे प्रतिज्ञापत्र विभागीय आयुक्त कार्यालयास २००८ मध्ये सादर झाले. २०१३ मध्ये पुन्हा ब्यासतर्फे अर्ज करण्यात आला व त्यात शुल्क आकारणी २००८ च्या दराने व्हावी अशी मागणी केली. २०१८ मध्ये जमिनीचा बिगरशेती वापरासाठी परवानगीचा अर्ज केला. पण इनामी जमीन असताना ४२ कोटी रुपयांचे सरकारी शुल्क भरले नसल्याने तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाने ती परवानगी फेटाळली. त्यावर ब्यासतर्फे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपिल करण्यात आले. त्यावर निकाल देताना ही जमीन खासगी असल्याने सरकारी शुल्क भरण्याचा प्रश्न नसल्याचा निर्वाळा चंद्रकांत पाटील यांना दिला. या प्रकरणात विशाल छुगेरा या मालमत्ता व्यावसायिकाला ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यास मदत झाली, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. आता ती जागा २५० कोटींच्या आसपास विकली जात असून हा मोठा जमीन घोटाळा असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
बालेवाडी येथे शिवप्रिया रियल्टर या कंपनीने त्यांच्या जमिनीला कुंपण घालताना शेजारी खेळासाठी आरक्षित असलेले मैदान गिळंकृत केले. भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक स्मिता गौड यांच्याशी संगनमत करून मैदानासह जमिनीची मोजणी करून घेतली व त्यामुळे ३६ ऐवजी ४६ गुंठे जमीन बिल्डरच्या नावावर नोंदली गेली. या प्रकरणात तक्रार झाली. अधीक्षकांनी गौड यांना लेखी विचारणा केल्यावर आपण चुकीची मोजणी केल्याचे त्यांनी कबूल केले. तरीही बिल्डरच्या अर्जावर निकाल देताना चंद्रकांत पाटील यांनी उपअधीक्षकांच्या मोजणीला स्थगिती दिली.त्यामुळे बिल्डरने संपूर्ण जमिनीवर इमारत बांधली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी त्यास मदत केल्याचे स्पष्ट होते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
देवस्थानची ही जमीन खासगी असून त्या व्यवहारात सरकारचा महसूल बुडाल्याचा आरोप निराधार आहे. एखादी जमीन देवस्थान इनाम जमीन आहे की नाही हे १८८५ मधील देवस्थान जमिनीच्या नोंदवहीत (रजिस्टर) त्या जमिनीची नोंद झाली आहे की नाही यावर ठरते. महसूलमंत्री या नात्याने माझ्याकडे प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर त्या नोंदवहीची पडताळणी केली असता, या जमिनीची नोंद त्यात इनाम जमीन म्हणून नव्हती. त्यामुळे आपोआपच ही जमीन इनाम जमीन नाही असे स्पष्ट होत असल्याने तसा निर्वाळा दिला. त्यामुळे सरकारचा महसूल बुडाल्याचा आरोपच निराधार ठरतो, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. बालेवाडीमधील प्रकरणात उपअधीक्षकांच्या मोजणीविरोधात माझ्याकडे अपील आले. त्यावर निर्णय देताना केवळ मोजणी दुसऱ्या अधिकाऱ्याला सोपवा हा प्रशासकीय निर्णयच आपण दिला. मोजणी योग्य की अयोग्य यावर काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे आदेश देऊन बिल्डरला मदत केली हा आरोप चुकीचा आहे, असे पाटील बोलून पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले.

हैदराबाद - जेष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजया निर्मला यांचे आज निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी गच्चीबोवली येथील कॉन्टिनेन्टल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.विजया निर्मला यांचा ​​जन्म तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी तेलुगूमध्ये ४४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर सर्वात जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या महिला दिग्दर्शक म्हणून २००२ मध्ये त्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती.
नवी दिल्ली - नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमोल कोल्हे यांच्या भाषणाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचे लक्ष्य वेधून घेतले. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचे कौतुक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता.
रायचूर - तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिली आणि आता तुमचे काम मी करावे अशी इच्छा आहे. तुमची अशी अपेक्षा आहे का की मी तुमचा आदर करावा? अशा शब्दात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यास आलेल्या लोकांचा अपमान केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी रायचूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर ते भडकले.येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. कुमारस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे मुख्यमंत्री भडकले आणि त्यांनी मोदींना मतदान केले आणि माझ्याकडून काम करून घेताय अशा शब्दात त्यांना सुनावले. मी तुमचा आदर का करू, तुम्ही निघा येथून नाही तर मला लाठीचार्ज करावा लागेल, अशा शब्दात निवेदन देण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हकलले.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मी १५ दिवसांचा वेळ मागितला होता. पण त्यांनी रास्ता रोको केला यामुळे राग आल्याचे ते म्हणाले. जर पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला तर ते मान्य असेल का? अशा प्रश्न देखील त्यांनी विचारला. राज्यातील सरकार सहिष्णु आहे पण असक्षम नाही. सरकारला माहिती आहे परिस्थितीशी कसे दोन हात करायचे, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

पुणे - हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांना रंगे हात पकडण्यात आले आहे.. पुणे पोलिसांना या कारवाईत यश आले असून तस्करांकडून हस्तीदंतासह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलीसांनी सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानाजवळ ही कारवाई केली. हस्तीदंत तस्करांविषयी पोलिसांना माहीती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 
आदित्य संदीप खांडगे (वय १९, देहूफाटा), ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८,पुणे), अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय२६,अहमदनगर), अमित अशोक पिस्का (वय २८,अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपांची नावे आहेत. त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात जप्त करण्यात आले आहेत. हे हस्तिदंत त्यांनी पुण्यात विक्रीसाठी आणले होते. या हस्तीदंतांची बाजारभावानुसार साडेतीन कोटी रुपये इतकी किंमत आहे.

नवी दिल्ली - वैष्णो देवीच्या भक्तांसाठी मोदी सरकार लवकरच गिफ्ट देणार आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक आणि वेगवान ट्रेन नवी दिल्ली ते कटारा मार्गावर धावणार आहे. नवी दिल्ली ते कटारा मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच याचे ट्रायल रन देखील सुरु होणार आहे. १३० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ ८ तासांचे होणार आहे. 
नवी दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस ३ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. वंदे भारत नवी दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या प्लाननुसार वंदे भारत सकाळी ६ वजता नवी दिल्लीच्या कटरा स्थानकातून रवाना होईल. यानंतर सकाळी ८.१० ला अंबाला जंक्शन पोहोचेल. ट्रेन ९.२२ वाजता लुधियाना स्थानकात पोहोचेल. ९.२४ ला लुधियानातून निघाल्यानंतर वंदे भारत १२.४० वाजता जम्मू तवी स्थानकावर पोहोचेल. ट्रेन दुपारी २ वाजता कटरा स्थानकावर आपल्या गंतव्य स्थानी पोहोचेल. 

मुंबई - अंधेरी येथील रुस्तमजी रिअलिटीमार्फत म्हाडा वसाहतीच्या विकासकामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात दिले होते. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या स्थगितीबाबत पुढील कारवाई न केल्याने त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.मुंबईतील अंधेरी येथील रुस्तमजी रिअलिटीमार्फत विकसित करण्यात येणाऱ्या म्हाडा वसाहतीच्या कामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्याला विखे-पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून उत्तर दिले. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते असताना विखे-पाटील यांनीच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्थगिती देण्याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. पुन्हा या विषयावरील लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर रुस्तमजी रिअलिटीने केलेल्या गैरव्यवहाराचे मुद्दे पुन्हा एका विधानसभेत उपस्थित करण्यात आले. तसेच याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री म्हणून विखे-पाटील यांनी म्हाडा अधिकाऱ्यांवर कारावाई करण्याचे आश्वासन दिले असून या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासनही दिले आहे.कारवाई न करणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.

मुंबई - सिल्लोड विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांनी आज, बुधवारी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशात संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. लवकरच सत्तार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही विखेंची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार विखेंसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असेही महाजन त्यावेळी म्हणाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असेल. त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले होते. परंतु,अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला केल्यामुळे काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले अब्दूल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारने आयपीएस सामंत गोयल यांची रॉ (RAW) म्हणजेच रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंगच्या प्रमुखपदी नेमणूक केली आहे. सामंत गोयल यांनीच २६ फेब्रुवारीच्या बालाकोट एअर स्ट्राइकचे (AIR STRIKE) नियोजन केले होते. गोयल हे पंजाब कॅडरचे १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सामंत गोयल यांची नियुक्ती झाली आहे. एअर स्ट्राइकची कामगिरी यशस्वी केल्यामुळे आता सामंत गोयल हे रॉ ची धुरा यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वास मोदी सरकारला आहे.
सामंत गोयल यांचा जन्म १३ जून १९६० चा. वयाच्या २४ व्या वर्षी ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात होशियारपूर जिल्ह्यात गढशंकरमध्ये केली. त्यानंतर ते फिरोजपूर, गुरुदासपूर आणि अमृतसरचे एसपी होते.

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकर याने दिली.. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. एक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरने दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरेच्या साथीने गोळ्या झाडल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने न्यायालयात म्हटले आता यावर ५ जुलैला न्यायालय निर्णय देणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचेही नाव घेतले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात २५ मे रोजी वकील संजीव पुनाळेकरांनाही सीबीआयने अटक केली होती. रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
पुनाळेकर यांनीच आपल्याला दाभोलकर हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, अशी कबुली शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसताना पुन्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचे कळते आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा कौर यांनी बाजी मारली. पण आता याच नवनीत राणा कौर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने नवनीत राणा कौर यांना विजय मिळवणे शक्य झाले.पण नवनीत राणा कौर यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. रवी राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर नवनीत कौर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, विदर्भात यंदा अमरावती मतदारसंघातली निवडणूक लक्षवेधी ठरली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने नवनीत राणा कौर यांना पाठिंबा दिला होता. कौर यांनी या निवडणुकीत युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाची उत्तम बांधणी करून त्यांनी हे यश मिळवले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली.हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रोड्डी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्या प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर चालवला. मंगळवारी रात्री प्रशासनाने प्रजा वेदिका पाडण्यास सुरुवात केली. त्याआधी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची दोन दिवस बैठक झाली होती. प्रशासनाने इमारतीतील फर्नीचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हटवली होती. सरकारच्या या कारवाईचा विरोध करण्यासाठी तेलगू देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी एक मोठी तुकडी या परिसरात तैनात केली होती.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. किमान दोन ते तीन अतिरेकी या भागात अडकल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.४२ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत.जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे.
आज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिला जम्मू-काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अमित शाह अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.अमित शाह राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यातील सुरक्षेसंबधी विषयावर त्याच्यासोबत चर्चा करतील. दरम्यान अमित शाह श्रीनगरमधील उच्चस्तरीय सुरक्षे संबधीत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यर्त्यांनादेखील संबोधित करणार आहेत.
यापुर्वीच्या कार्यक्रमानुसार अमित शाह ३० जूनला एका दिवसासाठी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये व्यस्त असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.अमरनाथ यात्रा पुढील महिण्यात सुरु होणार आहे. २०१७ मध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुच्या बसवर हल्ला केला होता. यामध्ये आठ यात्रेकरु ठार झाले होते. तर एकोणवीस जण जखमी झाले होते.
शिर्डी - अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचे काल मध्यरात्री अपहरण केल्याची माहिती मिळाली आहे. काल मध्यरात्री बाभळेश्वर जवळच्या एका हॉटेलसमोर जेवणासाठी थांबले असता एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांना गाडीत घालून घेऊन गेले.
अपहरणावेळी दत्तात्रय कोते यांच्यासोबत शिर्डीच्या एका नगरसेविकेचे पतीही होते, अशी माहिती समोर आली आहे. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिली. मात्र याबाबत अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. घटनेची सत्यता पडताळून आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सध्या शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लागलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आहे. 

मुंबई - मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ १० रुपयांच्या वादावरून ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. खून करून भाजी विक्रेता फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद हनीफ यांच्यात वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की सोनीलालने रागाच्या भरात मोहम्मदला चाकूने भोकसले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर भाजी विक्रेता सोनीलाल याने तेथून पळ काढला.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळ विस्तार प्रकरणी नवनिर्वाचित मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अविनाश महातेकर आणि जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावत चार आठवड्यांत नियुक्तीविरोधात दाखल याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
विखे-पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. १६ जून रोजी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लागलीच मंत्रिपद दिले. त्या पाठोपाठ जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करत त्यांना मंत्रिपद दिले. त्यांच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते सुरींदर अरोरा, संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या.एस.सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.‘प्रतिवाद्यांनाही (मंत्र्यांना) या याचिकेवर आक्षेप घेण्याची किंवा उत्तर देण्याची संधी मिळू दे,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी चार आठवडे तहकूब केली.
विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना, राज्याच्या मंत्रिमंडळात १३ नवीन मंत्र्यांचा समावेश केला. विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर यांचा यात समावेश आहे. त्यांना दिलेले मंत्रिपद घटनेविरोधात असल्याचा दावा याचिकेत आहे. तर, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत निवडणूक लढण्याचा तिघांचा हेतू नाही. भारतीय संविधानाच्या कलम १६४ (४) नुसार, एखादी व्यक्ती विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसताना मंत्री होऊ शकते. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांत विधासभेच्या एका तरी सभागृहाचे सदस्यत्व त्याला स्वीकारावे लागते, असे अपवादात्मक स्थितीत घडू शकते. त्यामुळे या १३ नव्या मंत्र्यांना कोणत्या अपवादात्मक स्थितीत मंत्रिपद दिले? याचे स्पष्टीकरण सरकारडे मागावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील वाढत्या असमानतेवर चिंता व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग म्हणाले, कल्याणकारी राज्यात असताना देशात खूप गरीबी किंवा आर्थिक विषमता असू शकत नाही.नुकताच सामाजिक विकास अहवाल 'भारतातील वाढती असमानता, २०१८' प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मनमोहन म्हणाले, काही क्षेत्रात आणि सामाजिक समुहांमध्ये गरीबी हटावचे विविध कार्यक्रम आणि ठोस रणनिती राबवूनही गरीबी कमी होऊ शकली नाही. भारत आज जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. परंतु, विकासाचा वाढता स्तर वाढत्या असमानतेला जोडलेल्या आहे. यामध्ये आर्थिक, सामाजिक, क्षेत्रीय आणि ग्रामीण व शहरी असामनतेचा समावेश आहे. ही वाढती असमानता आपल्यासाठी हानिकारक आहे. यामुळे सतत वेगाने वाढणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचू शकते. शिक्षणाचा अधिकार कायदा, सुचना अधिकार कायदा, वन अधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी योजना कायदा यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास असमानतेच्या प्रश्न सुटु शकतो, असेही मनमोहन सिंग म्हणाले. सामाजिक विकास परिषदेच्या अहवालानुसार भारतात २००० ते २०१७ या कालावधीत संपत्तीतील असमानतेमध्ये ६ पटीने वाढ झाली आहे. अहवालानुसार, २०१५ मध्ये देशात १ टक्के लोकसंख्येकडे २२ टक्के संपत्ती होती. १९८० पेक्षा यामध्ये ६ पटीने वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत लोकांकडे एकून संपत्तीपैकी ८०.७ टक्के संपत्ती आहे. याउलट, ९० टक्के लोकांकडे १९.३ टक्के संपत्ती आहे.

तेलंगाणा - तेलंगाणातील भाजप खासदार सोयम बापू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी एका समुदायाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करताना गळा कापण्याची धमकी दिली आहे. सोयम बापूच्या या वक्तव्यानंतर अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाजप खासदार सोयम बापू यांचे वादग्रस्त वक्तव्यसभेला संबोधित करताना सोयम बापू म्हणाले, मी मुसलमानांच्या मुलांना एवढेच सांगु इच्छितो, की आमच्या आदिवासी बांधवांच्या मागे गेलात तर, तुमच्या गळा कापला जाईल. तुम्ही आमच्या मागे पडू नका, आम्ही तुमच्या मागे पडलो तर, अवघड होऊन जाईल. तुमचे नाटक बंद करा. सोयम बापूंचा असा आरोप आहे, की तेलंगाणातील आदिवासी जिल्ह्यात मुस्लिम समुदायाच्या मुलांकडून आदिवासी समाजाच्या महिलांचे उत्पीडन होत आहे. त्यामुळे आम्ही याच्याविरोधात आहोत. मुस्लिम मुलांचे वागणे असेच राहिले, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असेही सोयम बापू म्हणाले आहेत.

नाशिक - नाशिकमध्ये मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर, इतर ४ आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान सोमवारी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादूर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. तर, उर्वरित आरोपींना लवकरच पकडू अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता दुसऱ्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या दरोडा प्रकरणात पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्वड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. ऑफिसमध्ये शिरल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये संजू सॅम्युअल नावाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर यात २ कर्मचारी जखमी झाले होते. दरोडेखोरांनी ऑफिसमधून मोठी मालमत्ता लंपास केली असल्याची माहितीही विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून देण्यात आली होती.

कोलकाता - मॅब लिंचिंगचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जय श्री राम अशी घोषणा दिली नाही म्हणून एका व्यक्तीला धावत्या रेल्वेतून बाहेर ढकलल्याचे घटना घडली आहे. हाफिझ मोहम्मद शाहरुख हल्दर या २६ वर्षीय तरुणाने हा आरोप केला आहे. हल्दर मदरशामध्ये शिक्षक असून पश्चिम बंगालमधील धाकुरीया आणि पार्क सर्कस या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडल्याचे त्याने म्हटले आहे.हल्दर गुरुवारी दुपारी दक्षिण २४ परगणा येथून हुगळीला जात असताना ही घटना घडली. रेल्वेत काही जण जय श्री राम अशा घोषणा देत होते. त्यांनी मला देखील घोषणा देण्यास सांगितले. मी त्यांनी नकार दिला. यावर मला मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडी जेव्हा पार्क सर्कस स्थानकावर आली तेव्हा त्यांनी मला बाहेर ढकलून दिले. त्यानंतर स्थानकावरील काहींनी माझी मदत केल्याचे हल्दरने सांगितले. त्याला किरकोळ मार लागला होता. काही स्थानिक लोकांनी त्याला चित्ररंजन रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेत चढण्या-उतरण्याच्या वादातून हा प्रकार झाला असावा. या घटनेत केवळ हल्दरच नाही तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.चंदीगढ - हत्या आणि बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित धर्मगुरू राम रहीम लवकरच पॅरोलवर सुटण्याची शक्यता आहे.काही दिवसांपासून राम रहीम तुरुंगातून सुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रसारमाध्यमांनी हरियाणाचे कारागृह मंत्री के.ए. पनवार यांना विचारणा केली. त्यावेळी पनवार यांनी म्हटले की, दोन वर्षांच्या शिक्षेनंतर कोणताही कैदी पॅरोल मिळवण्यास पात्र ठरतो. कैद्याची तुरुंगातील वर्तणूक चांगली असेल तर पोलीस अधीक्षकांकडून स्थानिक पोलिसांना पाठवण्यात येणाऱ्या अहवालात ही बाब नमूद केली जाते. यानंतर पोलीस आयुक्तांकडून अंतिम निर्णय घेतला जातो, असे पनवार यांनी म्हटले. राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने डेरा सच्चा सौदाच्या कार्यक्रमासाठी ४२ दिवसांचा पॅरोल मागितला आहे. याबाबत सिरसा पोलिसांकडून प्रथम सहायक आयुक्तांना अहवाल पाठवला जाईल. ते हा अहवाल रोहतक परिमंडळाच्या आयुक्तांकडे पाठवतील. यानंतर राम रहीमच्या पॅरोलबाबत अंतिम फैसला घेतला जाईल.सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग याला २०१७ साली दोषी ठरवले होते. या निकालानंतर हरयाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राम रहीम पॅरोलवर बाहेर आल्यास पुन्हा अशाप्रकराची कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असू शकतो असे वर्तविण्यात येत आहे

मुंबई - विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद त्यांनी व्यक्त केली. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. ते भाजमध्ये आले आणि मंत्री झाले असे सांगत ते नशीबवान असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.एकनाथ खडसे म्हणाले, विजय वडेट्टीवारांना योगायोगामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाले. विखे पाटीलांमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळाले. कधी कधी मुख्यमंत्र्यांना वाटते की मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? विखे पाटील नशीबवान आहेत की त्यांनी विरोधी पक्ष पद सोडले आणि त्यांना मंत्री पद मिळाले. आमच्यात नेमके काय झाले ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे असेही त्यांनी सांगितले.गिरीश आत्ता आला तो जवळ झाला आणि मुनगंटीवार ५ व्या नंबरचे मंत्री झालेत असा टोलाही त्यांनी लगावला.काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध पक्षनेत्याच्या आसनाजवळ जाऊन बसवले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंत सर्व नेत्यांनी वडेट्टीवारांना शुभेच्छा दिल्या. शेवटी वडेट्टीवारांनीही सर्वांचे आभार मानले. या सर्वांच्या भाषणात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा सर्वांनी आवर्जुन उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्यासाठी त्याचा वापर केला.विजय वडेट्टीवार म्हणाले, मी शिवसेनेत काम केले नसते तर मी आज या ठिकाणी आलो नसतो. मी सत्ताधाऱ्यांकडे जनतेच्या हिताची कामी घेऊन गेलो, वैयक्तिक काम कधीही नेली नाहीत. विरोधी पक्षनेते असताना खडसेंचे भाषण आम्ही बाहेर असेल तर धावत जाऊन ऐकायचो, नाथाभाऊंच्या मार्गदर्शनाची मला अत्यंत आवश्यकता आहे. थेट मार्गदर्शन करता येत नसेल तर त्यांनी अदृश्य रुपात मार्गदर्शन करावे अशी कोपरखळीही त्यांनी मारली.वडेट्टीवार पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना सरकारची पळता भुई थोडी व्हायची, टी ट्वेंटीची मॅच खेळताना एकटे खेळून चालत नाही चांगली टीम लागते असे त्यांनी अजित पवारांना सांगितले. ज्याला महत्त्वाकांक्षा नाही तो राजकारणात राहू शकत नाही. सीएम साहेब तुम्हाला दिल्लीत पाहायचे आहे असेही वडेट्टीवारांनी सांगितले.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावरून राहुल गांधी ठाम आहेत. सर्व ज्येष्ठ नेते त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते कुणालाही दाद देत नाहीत. किमान एक महिना तरी पदावर कायम राहण्याची विनंती फक्त त्यांनी मान्य केली. हा घोळ सुरू असतानाच फेररचना करण्यासाठी सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यामुळे काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर काँग्रेस वर्किंग समिती काही नावांवर चर्चा करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्बत होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण, सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची नावं देखील चर्चेत आहेत.

मुंबई - महापालिकेकडून सार्वजनिक शौचालय तोडल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीच्या सुदाम शिंदे या कार्यकर्त्यांने पालिका आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेताना सुरक्षा रक्षकांनी शिंदे यांना पकडून आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.एकीकडे सरकार स्वच्छतेचे धडे देत आहे, तर दुसरीकडे प्रशासनच सार्वजनिक शौचालये तोडत आहे. त्यामुळे संतापलेल्या एका कार्यकर्त्यांने थेट पालिकेच्या निषेध व्यक्त करत पालिका आयुक्त कार्यालयसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' इमारत तोडण्याचे आदेश दिले आहे. मंगळवारी इमारत तोडण्याचे काम सुरु होणार आहे. 'प्रजा वेदिका' येथे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहतात. काही दिवसांपूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून 'प्रजा वेदिका' याला विरोधी पक्षाचे निवासस्थान म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.
वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने शनिवारी चंद्राबाबू नायडू यांच्या अमरावती येथील प्रजा वेदिका इमारतीला ताब्यात घेतले. तेलुगू देशम पक्षाने ही कारवाई म्हणजे बदल्य़ाची भावना असल्याचे म्हटले आहे. जेव्हा आंध्र प्रदेशने आपले कामकाज हैदराबाद येथून अमरावतीला हलवले. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू कृष्णा नदीच्या किनारी असलेल्या उंदावल्ली येथील निवासस्थानी राहत होते. हैदाबाद आता तेलंगणाची राजधानी आहे. प्रजा वेदिकाचे निर्माण सरकारने आंध्र प्रदेशच्या राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थानाच्या रुपात केले होते. ५ कोटी खर्च करुन हे निवासस्थान बनवण्यात आले होते. या निवासस्थानाचा वापर नायडू हे सरकारी तसेच पक्षाच्या बैठकांसाठी देखील करत होते.नायडू यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून या इमारतीचा वापर बैठकांसाठी करण्य़ाची परवानगी मागितली. पण सरकारने ही इमारत ताब्यात घेतली. कलेक्टक संमेलन येथे होणार असल्य़ाची घोषणा सरकारने शुक्रवारी केली. आधी हे संमेलन राज्याच्या सचिवालयात होत होते.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget