August 2019

मुंबई - बॉलिवूडमधल्या नवोदित चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सॅनॉन. २०१४ साली आलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून तिने अभिनेता टायगर श्रॉफसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या हसण्याने व मनमोकळ्या स्वभावाने ती कायमच प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. ‘बरेली की बर्फी’ ,’लुका छुपी’ अशा चित्रपटांमधून तिने कायमच अभिनयाची छाप पडली आहे. त्यानंतर आता क्रिती पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. क्रिती लवकरच ‘मिमी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.गेल्या काही दिवसापासून क्रितीच्या ‘मिमी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट सरोगसीवर आधारित असून क्रिती यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन हात आणि एक लहान बाळ दिसत आहे. यामध्ये एका हातामध्ये बाळ झोपलं असून त्याला घेण्यासाठी दुसरा हात पुढे सरसावताना दिसत आहे. हे पोस्टर क्रितीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. “आयुष्यातला असा प्रवास जो अशक्य अशा चमत्कारीक गोष्टींनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. ‘मिमी’ हा खूप खास असणार आहे”, असे कॅप्शन तिने या पोस्टरला दिले आहे.

मुंबई - बॉलिवूडचं हॉट कपल दीपवीर सध्या खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपासून दीपिका पदुकोण गरोदर असल्याचे बोलले जात आहे. हे कपल लंडनमध्ये स्पॉट झाले त्यावेळचे काही त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आल्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना जोर चढला आहे. यावेळी दीपिकाने जे कपडे घातले आहेत ते पाहून हा अंदाज लावला जात आहे. 
दीपिकाने यावेळी सैल कपडे घातले असल्यामुळे बेबी बंप लपवण्यासाठी दीपिका अशा प्रकारचे कपडे घालत असल्याचे बोलले जात आहे. मात्र सर्व चर्चा खऱ्या आहेत की अफवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रेग्नन्सी बाबत दीपिका किंवा रणवीरनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.मागच्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोण अतरंगी आणि ढगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिला ट्रोलही केले गेले. नेहमीच स्टायलिश आणि फिगर डिफायनिंग कपडे घालणारी दीपिका मागच्या काही दिवसांपासून सैल कपडे का घालत आहे यावर सगळीकडेच चर्चा होती.

मुंबई - ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटानंतर दोन वर्षांनी अभिनेता प्रभास ‘साहो’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बाहुबली’च्या दोन्ही चित्रपटांनंतर प्रभासच चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांच्या अपेक्षा फार वाढल्या होत्या. तब्बल ३५० कोटी रुपये खर्चून साकारलेला ‘साहो’ प्रभासचा आणखी एक ब्लॉकबस्टर ठरेल अशी अपेक्षा होती. 
प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा ही कलाकारांची गर्दी या चित्रपटात आहे. पण या गर्दीत मुख्य कथाच हरवली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून निर्माते, दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बरेच ऍक्शन सीन या चित्रपटात दाखवले आहेत. पण केवळ गाड्या एकमेकांवर आदळआपट करणे आणि गंडांना मारणे याशिवाय वेगळे काही पाहायला मिळत नाही. चित्रपटातील मोजून एक-दोन गाणी या सर्व गोंधळातून सावरण्यास काहीशी मदत करतात. चित्रपटातील प्रभास कोणा सुपरहिरोपेक्षा कमी नाही. कारण अगदी काही फुटांवरून गुंड त्याच्यावर गोळी झाडत असतात पण तरीही त्याला काहीच होत नाही. काही दृश्ये या चित्रपटांमध्ये का आहेत असाही प्रश्न वारंवार पडतो. इथे तर्क लावायचा प्रयत्न जरी केला तरी उत्तर सापडणार नाही. प्रभास त्याच्या स्टाइलसाठी सर्वाधिक ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटात त्याच्या कपड्यांवर फार खर्च करण्यात आला आहे. श्रद्धाच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाल्यास, इथेही तुम्हाला तर्क बाजूला ठेवावा लागेल. कारण तिची भूमिकासुद्धा पेचात पाडणारी आहे.एकंदरीत, ३५० कोटी रुपये खर्चून केलेला चित्रपट प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यात पूर्णपणे नापास ठरला आहे.

ठाणे - गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने ठाणे पूर्वेकडील स्थानक परिसरात बनावट नोटांसह मुंबईतील एका तरुणाला अटक करत शंभर रुपयांच्या ६०० बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तर, त्याचे दोन साथीदार फरार असून बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केल्याचेही समजते.अन्बलगन गणेशन मूर्तुवर (२८) असे या आरोपीचे नाव असून तो धारावीमध्ये राहतो. न्यायालयाने त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. दोन व्यक्ती ठाणे पूर्वेकडे बनावट नोटांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने आरोपींना पकडण्यासाठी येथील सिनेमागृहासमोरील रस्त्यावर सापळा लावला. आरोपी दिसताच पोलिसांनी घेराव घालून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र एक आरोपी रहदारीचा फायदा घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेला. अन्बलगन हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे शंभर रुपयांच्या बनावट नोटा होत्या. या नोटा जप्त करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नोटांबाबत अन्बलगनकडे पोलिसांनी चौकशी केली. या नोटा त्याचा मुंबईतील मित्र मारी मणी याच्या मदतीने छापल्या असल्याची कबुली त्याने दिली. नंतर या नोटा अन्बलगन आणि विष्णू या दोघांना विक्री करण्यासाठी देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली. आरोपींनी मुंबईत नोटा छापल्या असल्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून फरारी आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.


ठाणे - गणेशोत्सवानिमित्त ठाणे महापालिका सज्ज झाल्याचे दिसण्यात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतिम टप्प्यात असून शहरातील खड्डे भरणीची कामेही युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. शहरात घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव हे मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावे यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. यंदा महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर विविध उपाययोजना शहरात राबवण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने पर्यायी विसर्जन व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे. पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी लहान गणेशमूर्तीसोबतच पाच फूट आणि त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलश या सुविधेबरोबरच नागरिकांना विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.नागरिकांनी महापालिकेच्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून करण्यात आले आहे.

ठाणे - पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मानपाडा येथील रेंटल हाऊसिंग योजनेच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ठाणे न्यायालयाने आरोपीला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. संतोष शिंदे (४५) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी आणि पीडित मुलगी एकाच इमारतीमध्ये राहतात. मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. जेवणाचा डबा केला नसल्याने मुलगी घरीच होती. हीच संधी साधत आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सायंकाळी कामावरून आई घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यानुसार आरोपी संतोष याच्याविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला अटकही केली. आरोपीचे लग्न झाले असून मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणात कारवाई करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. परंतु पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असून तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

नवी मुंबई - सिडकोतर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील शिल्लक ८१४ घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ शुक्रवारी दुपारी १ वाजता मुंबईतील निर्मल भवन येथे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वसामान्यांकरिता परवडणाऱ्या दरातील घरे सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचा यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद निश्चितच द्विगुणीत होईल, असा विश्वास चंद्र यांनी व्यक्त केला. या सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या घरांचा ताबाही त्वरित मिळणार असल्याने अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होण्यास मदत होणार असल्याचे चंद्र यांनी यावेळी सांगितले.सिडकोतर्फे सन २०१४मध्ये स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेस प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत निसर्गरम्य खारघर नोड्मध्ये तीन हजारांहून अधिक घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता बांधण्यात आली होती. खारघर रेल्वे स्थानकापासून नजीकचे अंतर, परिसरातील नामांकित शिक्षण संस्थांची शाळा व कॉलेजे, सुसज्ज रुग्णालये इ. सोयी सुविधांमुळे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दरम्यान, स्वप्नपूर्ती संकुलातील उर्वरित ८१४ सदनिका आता सिडकोतर्फे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी १९५ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तर ६१९ सदनिका या अल्पउत्पन्न गटासाठी आहेत. सर्व सदनिका या १बीएचके प्रकारातील आहेत.सदर गृहनिर्माण योजनेशी संबंधित विविध प्रक्रिया, जसे अर्ज नोंदणी, शुल्कभरणा, सोडत इ. या ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. यासाठी सिडकोतर्फे https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचे वेळापत्रक, अर्जनोंदणी प्राक्रिया, सदनिकांचा तपशील, अनामत रक्कम, सदनिकेची अंदाजे किंमत इ. सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी योजना पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. योजना पुस्तिकेचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे एकंदरित सर्व प्रक्रिया या पारदर्शक, जलद व सुलभरित्या पार पडणार आहेत. तसेच अर्जदारांचा वेळही वाचणार आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात गिरगाव न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ३ ओक्टॉबरला राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बाजावण्यात आले आहे. मुंबईतील स्थानिक भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी याचिका दाखल केली आहे.याचिकाकर्ते महेश श्रीश्रीमल राजस्थान येथे पार पडलेल्या एक रॅलीदरम्यान 'गली गली मे शोर हे चौकीदार चोर है' अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ट्विट करत मोदी हे चोरांचे सरदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचे याचिकर्त्यांचे म्हणणे आहे.

रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी आपण आदिवासी असल्याचा केलेला दावा सरकारनियुक्त समितीने फेटाळल्यानंतर जोगी यांच्याविरुद्ध विलासपूर जिल्ह्य़ात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.अनुसूचित जमातीचे (एसटी) असल्याचा जोगी यांचा दावा सरकारच्या उच्चस्तरीय जात छाननी समितीने गेल्या आठवडय़ात फेटाळला आणि त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यामुळे गैरमार्गाने जात प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल जोगी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.आपण आदिवासी असल्याचा दावा यापूर्वीही जोगी यांनी अनेकदा केला होता, मात्र तेव्हाही हा दावा फेटाळण्यात आला होता. गुरुवारी रात्री जोगी यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे विलासपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने विलासपूरचे तहसीलदार टी. आर. भारद्वाज यांनी एफआयआर नोंदविला.

मुंबई - युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी वरळी येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात गटप्रमुखांनी केली. या विधानसभा निवडणुकीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे, आदित्य ठाकरेंनी याच विधानसभेतून निवडणूक लढण्याचा निश्चित कराव, असे मत अनिल परब यांनी भाषणात व्यक्त केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश देखील वरळी येथे शिवसैनिकांना देण्यात आले. यामुळे शिवसेना सर्व इतर पक्षाचे डिपॉझिट जप्त करू शकते, अशी पार्श्वभूमी आता वरळी विधानसभेची झाली आहे.
विधानसभेत या मतदारसंघातून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर १४५ जागा जिंकायला हव्या. त्यासाठी आदित्य ठाकरे यांना या विधानसभेत अडकवून न ठेवता त्यांना महाराष्ट्रात प्रचार करून देत प्रत्येकाने आदित्य ठाकरे होऊन मतदाराकडे गेले पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्यासारखा कमी वयाचा चेहरा निवडणुकीत उतरल्यास व उद्धव ठाकरे यांनी त्याला परवानगी दिल्यास ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल. आणि याकडे देशाचेच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागेल. आदित्य ठाकरे सिनेटच्या निवडणुकीत उतरले तेव्हा ८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आताही ते जिंकून वेगळा करिष्मा घडवतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.अनिल परब यांच्या मागणीचे आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केले. आदित्य ठाकरेंना 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला.

गुवाहाटी - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.जे लोक या यादीतून वगळले गेले असतील त्यांना परदेशी नागरिक लवादात दाद मागण्याची संधी देण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या ५१ तुकड्या राज्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे.ज्या लोकांची नावे यादीमध्ये नाहीत त्यांनी घाबरुन जाण्यीची गरज नाही. भारतीय नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी यादीत नाव नसणाऱ्यांना संधी दिली जाईल, तसेच कायदेशीर प्रक्रियेनंतरच यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री सोनोवाल यांनी जनतेला केले आहे.अनेक बांग्लादेशी नागरिक अनधिकृत स्थलांतर करुन भारतामध्ये आले आहेत. नागरिकत्त्व यादीमुळे भारताचे अधिकृत नागरिक कोण आणि परदेशी स्थलांतरीत कोण हे समजणार आहे.nrcassam.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. मागील वर्षी सकराने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मसुदा जाहीर केला होता. ३.९ कोटी अर्जदारांपैकी २.९ अर्जदारांचाच यादीमध्ये समावेश करण्यात आला होते. ४० लाख लोकांना या यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे आसममध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. नाव यादीत नसलेल्या ३६ लाख लोकांनी आपले नाव यादीत समाविष्ट व्हावे म्हणून अर्ज केला होता. कोणतीही अफवा पसरु नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. कोणी अफवा पसरवत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आसामचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

धुळे - शिरपुरमधील वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून स्फोट झाला दोन किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा परिणाम जाणवला.यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे शिरपुरसह आजुबाजुची गावांना मोठा हादरा बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.मिळालेली माहिती अशी की, शिरपूर-शहादा महामार्गावर असलेल्या वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला. फॅक्टरीत १०० कामगार काम करत होते. फॅक्टरीत कामगार अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.


भुसावळ - पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खान्देश हॉटेलमध्ये काउंटरवर दारू पिताना दोन जणांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून कटरने गळ्यावर वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. विकास वासुदेव साबळे (वय ३२, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकास हा नेपानगर येथे रेल्वेत गँगमन आहे.ही घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.आरोपी नीलेश चंद्रकांत ताकदे (वय-२६, रा. जुना सातारा, भुसावळ) यासा पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेली माहिती अशी की, पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे हा जामनेर रोडवरील खान्देश बिअर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मद्य प्राशनासाठी बसला होता. तिथे संशयित नीलेश चंद्रकांत ताकदे हा आला व त्याचा विकास याच्याशी वाद झाला. नीलेशने त्याच्याजवळील पेपर कटरने विकासच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जळगाव येथे हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय गुळींग आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. 

धुळे - राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आज लागणार आहे. धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ या हा निकाल देणार आहेत. या निकालात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भविष्याचा फैसला होणार आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत निकाल समोर येणार आहे. सुरुवातीला ५७ संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ४९ संशयितांबाबत हा निकाल येणार आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सर्व संशयित तसेच त्यांच्या वकिलांना न्यायालयात बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 
'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली होती.मात्र, काही काळानंतर या योजनेतील गैरव्यवहार समोर आला. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य़ पध्दतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ देण्यात आले. इतकेच नव्हे, तर ठेकेदारास विविध सुविधा देण्यात आल्या.तसेच निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान बिनव्याजी रक्कम वापरण्याला सातत्याने मुदतवाढ दिल्याने पालिका कर्जात डुबली. अखेर महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कठोर पावले उचलत ३ फेब्रुवारी २००६ रोजी घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केली होती.राजकीय वजनामुळे हे प्रकरण अनेक वर्षे लांबले होते.

पुणे - अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या वडनेर बुद्रुक येथे बिबट्याने ७० वर्षीय महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेच्या शरीराचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आढळुन आले. राधाबाई कारभारी वाजे, असे मृत महिलेचे नाव आहे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास राधाबाई वाजे ही महिला घराच्या बाजुलाच शौचालयास जात होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत अतिशय निघृणपणे महिलेची शिकार केली. हा हल्ला ऐवढा भयानक होता की महिलेचे सर्व अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले पाहायला मिळाले. यामुळे वडनेर बुद्रुक परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर हा लोकवस्तीत पाहायला मिळत होता. बिबट पाळीव प्राण्यांवर हल्ला करत होता. मात्र, आता हाच बिबट माणसांवर हल्ला करू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कर्नाटक - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ आता कर्नाटकातील काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी होणार आहे. त्यांच्यावरच ईडीच्या चौकशीचे संकट ओढावले आहे. गुरूवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत त्यांनी ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली असून आता त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी जावे लागणार आहे. दरम्यान, शुक्रवारी ते ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वीच कथित आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवकुमार यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी आयकर विभागाने शिवकुमार यांच्या दिल्लीतील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यामध्ये आठ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीने डी.के.शिवकुमार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्याविरोधात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता.ईडीने नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु गुरूवारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली असून आता त्यांना ईडीपुढे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

रामपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्यावर म्हैस चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ अली आणि जाकिर अली या दोघांनी रामपुर पोलीस स्थानकामध्ये खान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये खान यांच्याबरोबरच माजी कार्यकारी अधिकारी आले हसन यांच्यासहीत इतर सहा जणांच्या नावाचा समावेश आहे. सर्व आरोपींनी आमच्या घरात घुसून तोडफोड केली, शिविगाळ केला आणि आमची म्हैस चोरुन नेल्याचे आसिफ आणि जाकिर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवाब राजा अली खां यांनी सराय गेट येथे गरीबांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. याच ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून अली कुटुंब राहत होते. १५ ऑगस्ट २०१६ रोजी पहाटे सव्वापाच वाजता कार्यकारी अधिकारी आले हसन, ठेकेदार इस्लाम, शिपाई धर्मेंद्र, फसाहत शानू, वीरेंद्र गोयल यांच्यासहीत इतर २० ते २५ लोकांनी घरामध्ये बळजबरीने प्रवेश केला आणि घर खाली करण्याची धमकी देत घरातील वस्तूंची तोडफोड करु लागले. या ठिकाणी आझम खान यांना शाळा बांधायची असल्याने ते बळजबरीने घर खाली करण्यासाठी तेथे राहणाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.जीवे मारण्याची धमकी आम्हाला देण्यात आल्याचे अली यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर या कुटुंबाला घरातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांचे घर बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आले. घराबाहेर दावणीला बांधलेली म्हैसही या लोकांनी आपल्याबरोबर नेली असे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले. आजही ही म्हैस आझम खान यांच्या गोशाळेमध्ये आहे असेही या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात कलम ५०४, ५०६, ४२७, ३९५, ४४८, ४५२, ३२३, ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र ते भाजापात जाणार की नाही याबाबत संभ्रमही आहे. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी त्यांनी ‘मला तुमच्याशी काही बोलायचे आहे’ अशी कार्यकर्त्यांना फेसबुकच्या माध्यमातून भावनिक हाक दिली आहे. शनिवार ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर परिसंवादाचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय शनिवारीच होणार असल्याची शक्यता आहे.मागील महिनाभरापासून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे. तर आमदार राणाजगजितसिंह यांनी नुकतेच राज्य शासनाच्या अनेक चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले. शिवस्वराज्य यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात आली असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील हे वाशीच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले होते. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाटील घराण्याचे नाव न घेता टीका केली होती. यासर्व घडामोडी पाहता त्यांच्या भाजपमधील प्रवेशांच्या शक्यतांना अधिकच बळ मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार, १ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत येणार आहे. तर संध्याकाळी सोलापुरात जाणार आहे. या यात्रेचा समारोप सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोलापूर येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील अनेक आमदार व नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती भाजपा पदाधिकार्‍यांनी दिली आहे. या मेगाभरतीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनाही भाजप प्रवेश मिळणार की नाही, याचेही उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.

बीड - राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान उपस्थितांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.पंकजा मुंडे म्हणाल्या की,'बारामतीतील नेते येऊन माझ्यावर आरोप करतात पंकजा मुंडेंना परळीचे ज्योतिर्लिंग वाचवता आले का? तुमचे तुम्ही बघा आधी तुमचा पक्ष वाचवा, तुमच्या आजूबाजूला बसणारे उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर बसतील हे सांगता येत नाही, लागले टीका करायला अशा शब्दात पंकजांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
आम्ही दुष्काळमुक्त मराठवाडा करणारे आहोत, धरणात लघुशंका करण्याची भाषा बोलणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहेत. जे परळीचा नाला स्वच्छ करू शकले नाहीत ते लोक धरणाची काम करणार आहेत का? या लोकांची लायकी नाही. लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्याची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत, लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडता आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात, असे म्हणत पंकजाने धनंजय मुंडेंवर टीका केली.मी येथे परत येणार नाही असे नाही, तर आणखी मोठी होऊन येणार आहे.आता माझ्या लोकांची कामं करायची आहेत, पण माझ्या हातात शक्ती नसेल तर काम कशी करता येईल. हे दुसऱ्या लोकांना जमणार नाही मला फक्त परळीत यशस्वी होऊन जमणार नाही. तर मला बीड जिल्हा मराठवाडा, पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताच सरकार आणायचे आहे, असे म्हणत मनातल्या मुख्यमंत्रिपदाची अपेक्षाही यावेळी पंकजांनी व्यक्त केली.

मालेगाव - मालेगाव येथील माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आपल्या समर्थक २० नगरसेवकांसह एमआयएम पक्षात प्रवेश केला. मुफ्ती यांच्या प्रवेशाने मालेगावात एमआयएमची ताकद वाढली आहे.प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावच्या मुशावर्त चौकात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. तीन तलाकच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका न घेतल्याने मौलाना मुफ़्ती मोहम्मद इस्माइल यांनी २० नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तातडीने हज यात्रेसाठी रवाना झाले होते. 
त्यामुळे मालेगावच्या राजकारणात मोठी अस्वस्थता पसरली होती. नुकतेच मौलाना मुफ्ती इस्माईल हज यात्रेवरून मालेगावमध्ये दाखल होताच मुफ्ती यांनी एमआयएममध्ये प्रवेश घेतला. मौलाना मुफ़्ती यानी एमएएममध्ये प्रवेश घेतल्याने मालेगावात पक्षाची ताकद वाढली आहे. मौलाना मुफ्ती यांनी मालेगावच्या राजकारणात स्थान निर्माण करत आधी जनता दल व नंतर काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मालेगाव मध्य मतदार संघातून २००९ साली जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी मिळवत थेट आमदारकीला गवसणी घातली होती.महापालिकेची सत्ता आपल्याकडे ठेवण्यातही त्यांना यश आले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१४ साली काँग्रेसचे शेख यांनी मुफ्ती इस्माईल यांचा पराभव केला. मौलाना मुफ्ती यांनी एमआयएममध्ये प्रवेश करत काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी विधानसभेत मालेगावमध्ये काँग्रेस व एमआयएम अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. 
मुंबई - काँग्रेसची पहिली यादी ५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीत १० जागांवर वाद आहे.आंबेडकर म्हणतात, मला मुख्यमंत्री घोषित करा. कडूनिंबाच्या पाल्यात साखर घातली तरी गोड होत नाही. आंबेडकर यांच्या मनांत काय कडू आहे माहीत नाही, भाजपला मदत होईल असे आंबेडकर वागत आहेत. त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलली. त्यांचा अल्टिमेटम आम्ही मानत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागा वाटपाची चर्चा सध्या दहा वादग्रस्त जागांवर अडकली आहे. २८८ पैकी २१२ जागांचे वाटप दोन्ही पक्षात पूर्ण झाले. यातील १०६ जागा काँग्रेस आणि १०६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. २०१४ साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या बहुतांश जागा आणि ज्या ठिकाणी २०१४ साली दोन नंबरच्या जागांचा समावेश आहे. तर इंदापूरसारख्या १० जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने त्याचे वाटप रखडले आहे. उरलेल्या ६६ जागा मित्र पक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. यात शेकाप, स्वाभीमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, बसपा यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या प्रतिसादाची वाट बघितली जात आहे.

मुंबई - मुंबईवर वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस वाहतूक प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यावर उपाय म्हणून आता वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबईच्या एस.व्ही रोड, गोखले रोड आणि न्यू लिंक रोड सह आणखी ५ रस्त्यांवर गाडी पार्कींग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आता गाडी पार्किंग करता येणार आहे.पण नेमकी पार्किंग करायची कुठे?असा महत्त्वाचा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दरम्यान, या रस्त्यांवर १४ किलोमीटरचा रस्ता नो पार्कींग झोनमध्ये वळवण्यात आला आहे. त्यामुळे १४ किलोमीटरचा आता तुम्ही कुठेही गाडी पार्क करू शकत नाही. सध्या या रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग असे फलक लावण्यात आले आहे. तर मुंबईतल्या सगळ्या बस थांब्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटरपर्यंत गाडी पार्क करता येणार नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अपघात घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. भरधाव वेगात आणि हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही वाहतूक पोलिसांनी देण्यात आले आहे.


रत्नागिरी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट झाली. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.उद्धव ठाकरेंसोबत तब्बल १५ वर्षांनी भेट झाली. त्यापूर्वी शरद पवार यांनी मंत्री केल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करून अभिनंदन केले आणि असाच मोठा हो, असा आशीर्वाद दिला होता. शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत कधीही भेट झाली नव्हती. गेल्या २००४ च्या निवडणुकीमध्ये माझ्याबाबत जे काही झाले ते का आणि कशामुळे झाले? याबाबत कधीतरी चर्चा व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. त्यामुळे ही भेट झाली. त्यावेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याची कारणे काय किंवा कशामुळे अन्याय झाला? त्याला कोण जबाबदार होते? याविषयी असलेले गैरसमज या भेटीत दूर झाले असल्याचे आमदार जाधव म्हणाले.

इस्लामाबाद - काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भडकाऊ वक्तव्य करत आहेत. यामध्ये आता आणखी एका भाषणाची भर पडली आहे. पाकिस्तानी नेत्याच्या वादग्रस्त भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होताना मी पाहत आहे असे वक्तव्य इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या रेल्वे मंत्री शेख राशिद खान यांनी केले आहे. रावळपिंडीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 
ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल. यासाठी जनतेला सज्ज करण्यासाठी निघालो आहे. युद्ध होईलच असे नाही पण मोदीला समजण्यासाठी मोठ्या सत्ताधाऱ्यांनी जी चूक केली ती मी करु इच्छित नाही असे ते म्हणाले. २४ ते २५ कोटी मुस्लिम पाकिस्तानकडे पाहत आहेत. आज आपल्याला आपल्यातले असंख्य मतभेद विसरुन काश्मीरचा आवाज बनत एकसाथ राहायचे आहे. सैन्याच्या खांद्याला खांदा लावावा लागेल नाहीत वर्तमान आपल्याला कदापि माफ करणार नसल्याचे भडकाऊ भाषण त्यांनी केले.

कोलंबो - श्रीलंकेचा क्रिकेटपटू अजंथा मेंडीसनं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून त्यानं निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्विट करत याबाबत माहिती दिली. अजंथा मेंडीस यांच्या गोलंदाजी शैली ही रहस्यमय होती. मेंडीसने ८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५२ गडी बाद केले आहेत. तर १९ कसोटीमध्ये ७० फलंदाज बाद केले असून ३९ टी-ट्वेन्टीमध्ये ६६ गडी बाद केले आहेत. मेंडीसने शेवटचा सामना २०१५ मध्ये न्यूझीलंडच्या विरोधात क्राइस्टचर्चमध्ये खेळला होता. ३४ वर्षाच्या मेंडीसची बॉलिंग सुरुवातीला कोणालाच लक्षात येत नव्हती. त्यामुळे तो जगभरात प्रसिद्ध झाला. मेंडीसच्या बॉलिंगने मोठ्या फलंदाजांना देखील हैराण केले होते. वेस्टइंडीजच्या विरोधात एप्रिल २००८ मध्ये त्याने ऑफ स्पिन बॉलर म्हणून पदार्पण केले होते. मेंडिसने पदार्पण केले त्याच वर्षी आशिया कपमध्ये फायनलमध्ये भारताच्या ६ विकेट घेत फक्त १३ रन दिले होते. वनडेमध्ये जलद ५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड मेंडिसच्या नावावर आहे. त्याने १९ सामन्यांमध्ये ५० विकेट घेतल्या होत्या. भारताचा माजी खेळाडू अजीत अगरकर आणि न्यूझीलंडचा मिशेल मॅक्लेनघनने २३ सामन्यांमध्ये ५० विकेट घेतले आहेत.

मुंबई - बेस्टच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वानाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यात मातोश्रीवरील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. मात्र या निर्णयाला कामगार नेते शशांक राव यांनी विरोध केला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली होती. या मागणीच्या पूर्ततेसाठी कामगार नेते शशांक राव यांनीही बेमूदत उपोषण सुरू केले. मात्र त्यांना या बैठकीला बोलवण्यात आले नाही.बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये वाढीव पगार दिला जाणार आहे. मात्र आम्हाला फसवी मध्यस्थी मान्य नसल्याचे शशांक राव यांनी सांगत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उपोषण असेच सुरू राहील असा निर्धार शशांक राव यांनी बोलून दाखवला आहे. संपाचा निर्णय आम्ही कधीही घेऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. 


ठाणे - ठाण्यातील घोडबंदर रोडवर स्कुल बसला अपघात झाला. काही विदयार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आल्याचे कळते. विरुद्ध दिशेने बस चालवणाऱ्या बसला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. ब्रम्हांड सिग्नल येथे यूनिवर्सल स्कूलची बस चुकीच्या दिशेने येत होती. या बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर चार ते पाच गाड्या इथे एकमेकांवर आदळल्या. दरम्यान स्कूल बसमधील एक ते दोन विद्यार्थी यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधी राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण सुनील तटकरेंनी हे वृत्त फेटाळून लावले. आता त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे हे शिवबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
लोकसभा निवडणुकीच्याआधी देखील अवधूत तटकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन सेना प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण त्या चर्चेतून पुढे काही निष्पन्न झाले नव्हते. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला महत्त्व आले आहे. राज्यभरात राष्ट्रवादी,काँग्रेसचे नेते शिवसेना, भाजपात जात असल्याने निवडणुकीत आघाडीची डोकेदुखी वाढवू शकते. 

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या नागरिकांचे विश्वास जिंकण्यासाठी आता केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. प्रत्येक मंत्र्याने आपल्या मतदारसंघात असलेल्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. तसेच पूर्ण करता येतील अशीच आश्वासने जनतेला द्या, अशी ताकीदही मोदींनी मंत्र्यांना दिल्याचे समजते.दुसरीकडे काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सरकार जम्मू काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले.जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर गेल्या २४ दिवसांत एकाही व्यक्तीला जीव गमवावा लागला नाही. हे आमच्यासाठी यश असल्याचे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले. तसेच पुढील दोन ते तीन महिन्यात जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवांमध्ये ५० हजार नोकऱ्या देणार असल्याची माहितीही मलिक यांनी दिली.


नवी दिल्ली - 'ईडी'ने अहमद पटेल यांच्या मुलाला चौकशीची नोटीस पाठवली आहे. स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात फैसल पटेल यांची चौकशी होणार असल्याचे समजते. या प्रकरणात 'ईडी'ने तिसऱ्यांदा फैसल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये कोट्यवधी रूपये जप्त करण्यात आले होते. स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे. ईडीने अहमद पटेल यांचे जावई इरफान सिद्दिकी यांचीही चौकशी केली होती. या गैरव्यवहारात इरफान सिद्दिकी यांच्याविरोधात पुरावे मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत. ईडीच्या तपासात संदेसरा समूहाने भारतीय बँकांच्या परदेशांतील शाखांमधूनही तब्बल ९००० कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ईडीने संदेसरा समूहाची परदेशातील ९७७८ कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये नायजेरियातील तेल खाणी, विमाने, जहाजे आणि लंडनमधील घराचा समावेश आहे. मुंबई - बेस्ट प्रशासन आणि कृती समितीतील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपाची भूमिका घ्यावी लागेल, असे कृती समितीने स्पष्ट केले. संपात पदाधिकारी सहभागी होणार असले तरी चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी झाल्यास बेस्ट सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बेस्ट कामगारांचा २०१६ ते २०२१ पर्यंतचा वेतनकरार व अन्य मागण्या प्रलंबित असून त्यावर गेल्या काही महिन्यांपासून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संप करावा की नाही यासाठी निवडणूक घेऊन कामगारांची मते जाणून घेतली व संपाचा कौल देण्यात आला होता. बेस्ट प्रशासनासोबत मंगळवारीही बैठक होती. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही आणि मंगळवारपासून संप होण्याची शक्यता होती. परंतु संपाऐवजी सध्या कृती समितीने बेमुदत उपोषण पुकारल्याचे समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. संपात उपोषण सुरूच राहणार असून तोडगा निघाला नाही तर संपाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेकडून संप फोडण्याचाही प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मनमाड - राज्यात आगामी काळात सत्ता कोणाची आली तरी 'कॅबिनेट' मात्र राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचेचाच राहणार, शेवटी आमच्यातून जे भाजप-सेनेत गेले आहेत त्यांचा डीएनए आमचाच आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेनेला टोला लागवला. निवडणुकीच्या काही दिवस अगीदाराचं नोटिसांचा सुळसुळाट झाला आहे. जे विरोधात बोलतात त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. शिखर बॅंकेशी साहेबांचा (शरद पवार) काहीही एक संबंध नाही. स्वतःचा महत्त्व वाढवून घेण्यासाठी गेल्या ५० वर्षांत असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. आम्हाला सवय आहे मात्र, वाईट याचे वाटते की ८० वर्षे वय असलेल्या माणसावर तो तुम्हाला विरोध करतो म्हणून पातळी सोडून राजकारण केले जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांची सध्या 'संवाद यात्रा' सुरू असून ही यात्रा नाशिक जिल्ह्यातील नांदगांव येथे आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नंतर प्रसार माध्यमाशीही संवाद साधला. शिखर बॅंकप्रकरणी अजित पवारसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणी शरद पवार यांची बदनामी बदनामी करण्यात येत असल्याचे मत यावर त्यांनी व्यक्त केले. शिवाय राज्यात आगामी काळात सत्ता कोणाचीही आली तरी कॅबिनेट राष्ट्रवादी कॉंग्रेस-काँग्रेसचे राहणार असून शेवटी आमच्यातून जे तिकडे गेले आहे. त्यांचा 'डीएनए' हा आमचाच आहे, असा भाजप-शिवसेनेला टोला लागवला.विशेष म्हणजे छगन भुजबळसोबत पंकज भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांचे नांदगावला आगमन झाल्यावर पंकज भुजबळ यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

मुंबई - पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना गृह विभागाकडून ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ते येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता त्यांना मुदतवाढ दिल्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. संजय बर्वे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी फक्त ६ महिने काम केले. त्यानंतर ३१ ऑगस्टला ते सेवानिवृत्त होणार होते. मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग, डॉ. रश्मी शुक्ला तसेच डॉक्टर वेंकटेशन यांची नावे चर्चेत होती. मात्र, त्यांना ३ महिन्यांची वाढीव बढती दिल्यामुळे सर्वांमध्ये नाराजी आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना बढती देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानी माध्यमांसह नेते मंडळींचा चांगलाच तिळपापड झाला आहे. मोदींनी ऐतिहासिक चूक केली आहे. आम्ही काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडला असून याप्रकरणी आपण कोणत्याही थराला जाऊ, असे इम्रान खान यांनी सोमवारी म्हणाले होते. आता पाकचे मंत्री फवाद चौधरांनींही बेताल ट्वीट करत याचा प्रत्यय दिला आहे.पंतप्रधान ईम्रान खान भारतासाठी पाकिस्तानची एअरस्पेस बंद करण्यात आली आहे.पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून(सीएए) याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे.२८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत कराची हवाई हद्दीतून सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याचे, पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोणत्या कारणामुळे बंदी घालण्यात आली, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पण पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून लवकरच आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असे ट्वीट पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरींनी यांनी याअगोदरच केलेआहे. त्याच बरोबर मोदींनी सुरुवात केली, मात्र शेवट आम्ही करू, असंही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई - ठाण्यातील मुंब्रा आणि दिवा परिसरांतील कांदळवनांची सर्रासपणे कत्तल करून उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अनधिकृत बांधकामांमध्ये मुंब्रा पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, सरकारी कार्यालये, शाळांसह गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. जानेवारी २०२० पर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.इराकी आरिफ नवाज यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे वारंवार बजावूनही काहीच कारवाई करण्यात येत नसल्याबाबत न्यायालयाने या वेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय कांदळवन संरक्षण कायद्याअंतर्गत कांदळवने नष्ट करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून कारवाईचा अहवाल जानेवारी २०२० पर्यंत सादर करण्याचे स्पष्ट केले आहे.ठाण्यातील मुंब्रा आणि दिवा परिसरांतील पाणथळ जमिनीवरील अतिक्रमण करून ती नष्ट केली जात असल्याची बाब याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. चार वर्षांपूर्वी इराकी यांनी ही याचिका केली होती. त्यावर तहसीलदारांनी चार वेळा प्रतिज्ञापत्र सादर करून या परिसरातील सरकारी आणि खासगी मालकीच्या जागांवरील कांदळवने नष्ट करून तेथे बेकायदा बांधकामे उभी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने वेळोवेळी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या ३१ जुलै रोजी न्यायालयाने अतिक्रमण करण्यात आलेल्या खासगी, सरकारी, पालिका जागांवरील तपशील देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते.मंगळवारी झालेल्या सुनावणीत तहसीलदार अधिक पाटील यांनी याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात या परिसरात उभ्या राहिलेल्या खासगी, सरकारी, पालिका जागांवरील बेकायदा उभ्या राहिलेल्या बांधकामांचा तपशील देण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्राची दखल घेत या बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

हरियाणा - हरियाणामध्ये एका तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर मुलगी खेळत असताना एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना राज्यातील धारुहीरा येथे घडली.या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपी पकडण्यास पोलिसांना मदत केली. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना अल्पवयीन मुलाने फसवून तिला अज्ञातस्थळी नेत अत्याचार केला. सुरक्षारक्षकाला मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने त्याने मुलीला वाचवले. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अल्पवयीन मुलाला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 
वायनाड - राहुल गांधी यांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा वायनाडचा दौरा केला आहे. राहुल गांधींनी मंगळवारी वायनाडमधील पुरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. मी केरळचा मुख्यमंत्री नाही. आमचे राज्यात किंवा केंद्र सरकारमध्ये सरकार नाही. मात्र, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणे माझे कर्तव्य आहे, असे पुरग्रस्त लोकांना राहुल गांधी म्हणाले.राहुल गांधी वायनाडमध्ये चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी वायनाडमधील चुनगाम आणि वलाडमधील बाधीत लोकांना काही आवश्यक वस्तूचे वितरण केले. पुरामुळे लोकांनी त्यांची शेती, पीक, आणि घरे गमावली आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार पक्षपात करत आहे. जेथे त्यांचे सरकार नाही. तिथल्या लोकांची त्यांना काळजी नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
केरळमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मल्लापूरम आणि पुथूमाला येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे दोन्ही गावे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

वाराणसी - दहशतवादी संघटनांकडून भारतात काही नव्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. भारतातील इतर ठिकाणी दहशतवादी तळ ठोकण्यासाठी या संघटनांकडून या हालचाली सुरु आहेत, ज्याअंतर्गत काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची आखणीही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळेल्या माहितीनुसार (LeT) म्हणजेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीसाठीचा मतदार संघ असणाऱ्या वाराणासीला निशाणा करण्यात आलं आहे. यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्करकडून या ठिकाणी मोठे दहशतवादी हल्ले करुन येथेच दहशतवाद्यांचे तळ ठोकण्याचा विचार आहे. काही महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या तुकड्या आणि काही दहशतवादी वाराणासी आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करुन गेले आहेत. 
सूत्रांच्या माहितीनुसार उमर मादनी नावाचा एक दहशतवादी त्याच्या नेपाळमधील आणखी एका सहकाऱ्यासोबत मे महिन्यात वाराणासीला आला होता. ज्यावेळी तो या ठिकाणी जवळपास चार दिवसांसाठी वास्तव्य केले होते. लष्कर- ए- तोयबाच्या तळासाठी कोणते ठिकाण योग्य असेल यावर त्यांनी पाहणी केली होती. शिवाय या ठिकाणी कशा प्रकारे मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणता येतील, याविषयीसुद्धा त्यांनी काही विध्वंसक आखणी केली होती. हे दहशतवादी ७ ते ११ मे या कालावधीत वाराणासीत एका विश्रामगृहात थांबले होते. यादरम्यान, मादनी याने काहीजणांची भेटही घेतली होती. मादनी हा लष्करसाठी दहशतवाद्यांची निवड करतो. गेल्या काही दिवसांपासून तो या कारवायांसाठी जास्तीत जास्त तरुण वर्गाला समाविष्ट घेण्याच्या प्रयत्नांत होता.मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी राज्य सहकारी बँकेच्या तब्बल २५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील अनेक मोठ्या १६ जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.एमआरए पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. २२ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात ५ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ व ४६७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे राज्यातील काही साखर कारखाने व सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, ही कर्जे पुन्हा वसूल न झाल्याने बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. हे कर्ज वाटप करण्याच्या काळात बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार, हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता. तर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ज्या सूत गिरण्या व साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आली त्यांचा संबंध हा राष्ट्रवादी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. 
राज्य सहकारी बँक गैरव्यवहार -राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँका कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणी यांच्यावर होणार गुन्हे दाखल -अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, प्रसाद तनपुरे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, दिवंगत पांडूरंग फुंडकर, मिनाक्षी पाटील, आनंदराव अडसूळ, जगन्नाथ पाटील, तानाजीराव चोरगे, जयंत पाटील, जयंतराव आवळे, दिलीप सोपल, राजन तेली, विलासराव जगताप, रजनीताई पाटील, माणिकराव कोकाटे
नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया रोखण्यासाठी आणखी ठोस पावले उचलण्याचे निर्देश राज्यांना दिले. डाव्या कट्टरतावादाचा प्रसार करणाऱ्या कारवाया कमी झाल्या आहेत. मात्र, हा कट्टरतावाद पूर्णपणे संपवण्यासाठी राज्यांनी शरणागती पत्करणाऱ्या लोकांसाठीची धोरणांमध्ये काळानुरूप योग्य ते बदल करावेत, असे शाह यांनी म्हटले आहे.'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'नव भारता'च्या स्वप्नामध्ये डाव्या कट्टरतावादाला स्थान नाही,' असे शाह म्हणाले. डाव्या कट्टरतावादावर उपाययोजना करण्यासाठी झालेल्या बैठकीत शाह यांनी डावा कट्टरतावाद पसरलेल्या राज्यांमध्ये सर्वंकष विकास करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. संरक्षक दलांनीही अधिक प्रभावीपणे याविरोधात धोरण राबवावे. अनेक सर्वसामान्य लोक माओवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. हे निष्पाप नागरिक यातून सुटू शकतील, असे अशा योजना राबवाव्यात, असे शाह म्हणाले. लोकशाहीचा हिंसेच्या मार्गाने उद्धवस्त करण्याचे माओवाद्यांचा कट आहे. भारत याविरोधात लढत आहे. सर्वांचा समान विकास करणे हे 'नव भारता'चे मोदींचे स्वप्त आहे,' असे शाह म्हणाले.जरी डाव्या कट्टरतावादाच्या कारवाया कमी झाल्या असल्या तरी तो समूळ नष्ट करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी राज्य आणि केंद्राने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत,' असे शाह म्हणाले.

नवी दिल्ली - सध्या देशात आर्थिक मंदी सुरु आहे. या मंदीचा परिणाम पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, आरबीआयने केंद्र सरकारला सावरण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रूपयांची मदत करणार आहे.केंद्र सरकारने याआधी आरबीआयकडे पैशांची मागणी केली होती. आरबीआयच्या निधीतून हे पैसे द्यावेत या मागणीसंदर्भात, आरबीआयच्या मुख्य कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारची मागणी मान्य करत, केंद्राला मदत पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी - रत्नागिरी येथे झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आता लवकरच म्हाडाची लॉटरी लागणार आहे.यावेळी पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लागला असून त्यांच्या वसाहतीसाठी १५५ कोटींची तरतूद करून त्याची शिफारस शासनाकडे केल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिपळूण आणि दापोली येथील घर बांधणीसाठी ९५ कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून कोकण नगर येथे बॅडमिंटन हॉल, सभागृह, रस्ते आणि गटार बांधणीला ११ कोटी मंजूर करण्यात आले.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी १० कोटींची तरतूद करून त्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले. दापोली येथें ३०० घरं, चिपळूण येथे ४०० घरं आणि एक नाट्यगृह आणि रत्नागिरीत दोन नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे १६० घरांची योजना राबविण्यात येणार आहे. कलाकारांसह पत्रकार, म्हाडा कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हाडाकडे केलेली मागणी मान्य करत कलाकारांसाठी तीनशे, पत्रकारासाठी दोनशे, तसेच शासकीय कर्मचार्यांसाठी दोनशे घरे विरारमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. या बैठकीला म्हाडा उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर, सभापती विनोद घोसाळकर, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, मुबंई म्हाडा मुख्यधिकारी राधाकृष्णन बी. आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई - गुहागर येथील राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण, त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. भास्कर जाधव हे शिवसेनेत जाणार कि काय ? हे पाहावे लागणार आहे. तर, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या भास्कर जाधव यांची घरवापसी होणार असल्याच्या राजकीय चर्चांनीही जोर धरला आहे.सध्या राष्ट्रवादीतील नेते मंडळी मोठ्याप्रमाणात युतीकडे जातांना दिसत आहेत. या अगोदर बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
भास्कर जाधव हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते. काही कारणाने त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विविध मंत्रिपदे भूषवणारे जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते.

नवी दिल्ली -  गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्ग खुला करत असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. ही माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी दिली आहे.यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरेंसनुसार कॉरिडॉरला अंतिम रुप देऊन त्याचे उद्धाटन करण्यात येईल. ज्याप्रमाणे मुस्लिमांना मक्का आणि मदीना आहे. त्याचप्रमाणे शीखांसाठी गुरु नानक पवित्र आहेत, असे त्या म्हणाल्या.'पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरला चालना देण्यासाठी पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि त्यासाठी सहकार्य देखील करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले होते.
भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. दररोज जवळपास पाच हजार भाविक कर्तारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेऊ शकतात. १५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात आहे.

नवी दिल्ली - राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना काश्मीरमध्ये मजा करायला जायचे असेल तर आम्ही त्याची व्यवस्था करू, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.संजय राऊत यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला राहुल गांधी यांना फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी काश्मीरमध्ये जायचे असेल तर आम्ही पर्यटन विभागाला तशी विनंती करू. जेणेकरून त्यांची योग्य ती व्यवस्था होईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.. 
राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी काश्मीरमध्ये जाण्यासाठी श्रीनगर विमानतळापर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यांना विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले. यामुळे केंद्र सरकार काश्मीरमधील खरी परिस्थिती लपवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. 
मात्र, संजय राऊत यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. राहुल गांधी काश्मीरमध्ये गेल्यास धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना विमानतळावरून परत पाठवण्याचा सरकारचा निर्णय योग्य होता, असे राऊत यांनी म्हटले. यावेळी राऊत यांनी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्याबद्धल केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असेही राऊत यांनी म्हटले. 


नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्या निधनाने देशाचे सर्वांत मोठे नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. सर्व पक्षीय राजकारणी,बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्सनी ट्विटरच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.भाजपच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रीपद स्वीकारण्यास नकार देत, ते सक्रिय राजकारणापासूनही दूर झाले होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच सरकारी निवासस्थान सोडले होते.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरशी संबंधित कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता काढून भारत आगीशी खेळत आहे. या निर्णयामुळे भारतातील धर्मनिरपेक्षता जळून खाक होईल, असे पाकिस्तानचे राष्ट्रपती अरीफ अल्वी यांनी म्हटले आहे.भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून तेथे दहशतवादाला प्रोत्साहन दिले असून त्याला पाकिस्तान जबाबदार नाही. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये चर्चा झाली. मात्र, परिषदेने कुठलीच भूमिका घेतली नाही. मात्र, पाकिस्तान हा मुद्दा उठवत राहणार', असे ते म्हणाले.भारत पुन्हा आपल्याच देशात पुलवामा सारखा हल्ला करेल आणि त्याचा आरोप पाकिस्तानवर लावेल. त्यानंतर आमच्या पाकिस्तानवर हल्ला करेल. मात्र, पाकिस्तान युद्द सुरू करू इच्छित नाही. मात्र, जर भारताने हल्ला केला तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ, असे अल्वी म्हणाले.भारताने जम्मू-काश्मीरचा विषेश दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आगपाखड सुरू आहे. पाकिस्तान जगभरात भारतविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाकचे नापाक मनसुबे अपयशी ठरत असून काश्मीर मुद्द्यावर एकाही देशाने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दिला नाही. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये बंद दरवाज्याआड चर्चा झाली. मात्र, यातूनही पाकिस्तानच्या हाती काही लागले नाही.

छत्तीसग - नारायणपूर येथील ओरछा जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकाने तेथे छापा घातला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात पाच नक्षलवादी ठार झाले. ओरछा पोलीस ठाण्यापासून सुमारे २० किलोमीटरवरील धुरबेडा खेडय़ाजवळील जंगलात ही चकमक झडल्याची माहिती पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली असता त्यांना नक्षलवाद्यांचे पाच मृतदेह सापडले, असे अवस्थी यांनी सांगितले. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना रायपूर येथे हलविण्यात आले.

मुंबई - विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राज्यात शिवसेना आणि भाजपामधील इनकमिंग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेतेसुद्धा सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकमधील शिवसैनिकांनी केलेल्या विरोधानंतर भुजबळांसाठी शिवसेनेची दारे जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसैनिकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सद्दी संपली आहे. ते येवला आणि नांदगावमध्ये जागा वाचवू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून, त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईत मातोश्री येथे जाऊन थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे कळते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या असल्या तरी त्याबाबत स्पष्ट निर्णय न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: भुजबळ यांना पक्षात घेतल्यास राज्यात त्यांचा फायदा होऊ शकत नाही का? त्यांच्या प्रतिप्रश्नामुळे संबंधित संभ्रमात पडले आहेत. 
दरम्यान,विधानसभा निवडणुकीमुळे पक्षांतरे सुरू असून, त्यातच छगन भुजबळ हे स्वगृही परतणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेतील एक गटाने भुजबळ यांच्या स्वगृही परतण्यास विरोध सुरू केला आहे. शुक्रवारी शहरात भुजबळ यांच्या विरोधात फलक लागले होते आणि त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते. छगन भुजबळ यांना प्रवेश दिल्याने पक्षाला फायदा होणार नाही, असे सांगताना समजा भुजबळ यांना प्रवेश दिलाच तर त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देऊ नये, अशाही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

कच्छ - सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी हरामी नाल्यातून दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळ हरामी नाला आहे. जप्त केलेल्या दोन्ही बोटी मासेमारीच्या असून त्या सोडून देण्यात आलेल्या होत्या. या दोन बोटी सापडल्यानंतर या भागात बीएसएफने मोठया प्रमाणात शोध मोहिम सुरु केली आहे. पण अजूनपर्यंत काहीही संशयास्पद सापडलेले नाही.शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या बीएसएफने हरामी नाल्यातून सिंगल इंजिन असलेल्या दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या. यावर्षी मे महिन्यात बीएसएफने याच भागात एक पाकिस्तानी बोट पकडली होती. पण त्यावरील मच्छीमार निसटण्यात यशस्वी ठरले होते.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget