October 2019

ठाणे - गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात पोलिसांनी गुडविनच्या मालकाची महागडी मर्सिडीज कार जप्त केली आहे. तर डोंबिवलीच्या पलावा सिटीतील दोन फ्लॅटही रामनगर पोलिसांनी कारवाई करून सील केले. तर जप्त केलेली मर्सिडीज कार पोलीस ठाण्यात जमा केली आहे हजारो गुतूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालून फरार झालेला गुडविनचा मालक सुनील कुमार याच्या स्वतःच्या नावावर या मर्सिडीज कारचे रजिस्टर आहे. ही मर्सिडीज कार एका मोठ्या गुंतवणूकदाराला गँरटी म्हणून देण्यात आली होती. मात्र, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कार पोलिसांनी उचलून आणली. या मालमत्ता जप्त करून त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार का? हाच मोठा प्रश्न आहे.
मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन संजय राऊत भेटले. पण ही भेट राजकीय नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. भाजपवर दबाव टाकण्यासाठी संजय राऊत शरद पवारांची भेट घेत आहेत का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे.
दुसरीकडे शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण सोनिया यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे आता सोनिया गांधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसने आधी भूमिका ठरवावी, सोनिया गांधींची परवानगी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसच्या या नेत्यांना दिला. शरद पवारांच्या या सल्ल्यानंतर काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी युती करताना ठरला होता, असे जरी शिवसेनेकडून सांगण्यात येत असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीतील संबंध ताणले गेले. 

मुंबई - शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. आम्ही शिवसेना आमदार स्वत: राज्यभरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. तसेच राज्यपालांनी स्वत: पंचनामा करताना उपस्थित राहावे अशी विनंती आम्ही त्यांना केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 
क्यार वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरवात झाली. जिल्ह्यात सुमारे ४० टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसला असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा धास्तावला होता. कराची - पाकिस्तानातील कराची रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला आग लागली आहे. या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. कराची रावळपिंडी एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर या अपघातात जे जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी म्हणजेच आज कराची रावळपिंडी तेजग्रा एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीचा भडका उडाला, या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. लियाकतपूर या ठिकाणी आग लागली. ही आग नेमकी कशी लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावरुन चर्चांना उधाण आले. त्यानंतर मुंडे यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून ‘तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे मुंडे समर्थकांना सांगण्यात आले.
माहितीनुसार बुधवारी रात्री मुंडे यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथे काही प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या. मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर सोशल मिडियावर अफवांना उधाण आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने ट्विटरवरुन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंडे समर्थकांना केले. पोटदुखीच्या त्रासाच्या तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद, असे ट्विट धनंजय मुंडेच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आले. धनंजय मुंडे यांनाही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट रिट्विट केले आहे.
दरम्यान, परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा ३० हजार ७०१ मतांनी पराभव केला आहे. काल मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतरच त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याचे समजते.

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून देखील युतीत सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून अपक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव करणारे अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिवा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन पाटील यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला.
शिवसेनेला आतापर्यंत ७ अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ ५६ वरून वाढून ६३ झाले आहे. तर दुसरीकडे भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्याही वाढली आहे. त्यांना ९ अपक्ष आमदारांनी आतापर्यंत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ आता १०५ वरून ११४ वर गेले आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीर राज्य आजपासून दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलंय. जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं अशा आशयाची अधिसूचना गुरुवारी मध्यरात्री जारी केली. ३१ ऑक्टोबरच्या सकाळी राधाकृष्ण माथुर यांनी लडाखच्या उपराज्यपाल पदाची शपथ घेतली. जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी त्यांना ही शपथ दिली. राधाकृष्ण माथुर हे केंद्रशासित प्रदेश लडाखचे पहिले उपराज्यपाल ठरले आहेत. उमंग नरुला यांना माथुर यांचा सल्लागारपदी नेमण्यात आले.
दरम्यान,केंद्र सरकारच्या विनंतीवरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरच्या आणि लडाखच्या पहिल्या उपराज्यपालांची नियुक्ती केली होती. जम्मू-काश्मीरचे पहिले उपराज्यपाल म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली. 
सरदार पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत, राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. त्यामुळे देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या ७ वरुन वाढून ९ होणार आहे, तर राज्यांची संख्या २९ वरून २८ होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत विधानसभेच्या ८७ जागा आहेत. यापैकी ४६ जागा काश्मीर, ३७ जागा जम्मू आणि लडाखमध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत. आता जम्मूतील विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. तर काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघ कमी होणार आहेत. हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित असले तरी जम्मू काश्मीरमध्येच विधानसभा असणार आहे. लडाखमध्ये विधानसभा नसेल. तर श्रीनगर उच्च न्यायालय आणि जम्मू-काश्मीर खंडपीठ पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांनी प्रथम अजित पवार यांचे नाव राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी सुचवले. याला जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, नवाब मलिक हसन मुश्रीफ आणि अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले. तसेच पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळीत गोड खाते आले नसल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, “आपण आपल्या निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे मात्र, आनंदी नाहीत. जनतेने आपल्याला मजबूत विरोधीपक्षासाठी कौल दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण विरोधी पक्षात राहून अनेक प्रश्न ताकदीने मांडू.काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विधीमंडळ विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्याच नेत्याची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

मुंबई - राज्याच्या सत्ता स्थापनेसाठी युतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.राज्यातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाचीच भूमिका बजावणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज बुधवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार जयंत पाटील आणि आमदार नवाब मलिक यांची बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही अंतर्गत स्पर्धा नाही. पक्षातील स्रव निर्णय शरद पवार हे पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच घेत असतात. ते जो निर्णय घेतात तो अंतिम असतो, असे गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना पाटील म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. विरोधीपक्ष नेत्याबाबत शरद पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यात कोणाच्याही इच्छुकतेचा प्रश्न उद्भवतो असे वाटत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
दरम्यान,नवाब मलिक यांनीही सरकार स्थापनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. “विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी केले आहे.

नवी दिल्ली - हरियाणामध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली असली तरी महाराष्ट्रात सत्तेची समिकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत आहे,अशी टीका आझाद यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहून मला भारतीय मतदारांचे अभिनंदन करायचे आहे. हरियाणा असो किंवा महाराष्ट्रातील निवडणूक किंवा पोटनिवडणुक भाजपा पूर्णपणे हरला आहे. आता ते चौटाला यांच्यासोबत हरयाणात सत्ता स्थापन केली असून त्यांना अद्याप महाराष्ट्रात सत्ताही स्थापन करता आली नाही, असा टोला आझाद यांनी लगावला आहे. दिल्लीमधील एका जाहीर सभेमध्ये भाषणादरम्यान त्यांनी ही टीका केली.निवडणूक जवळ आल्यावर मते मिळवण्यासाठी क्षेपणास्त्रे डाकण्याचे भाजपाचे समिकरण जनतेने नाकारले आहे. आता लोकांना शेकतकऱ्यांचे आत्महत्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यासारख्या समस्या महत्वाच्या वाटू लागल्याचे हे संकेत आहेत. मात्र भाजपाला या प्रश्नाबद्दल काहीच वाटत नाही, असे आझाद आपल्या भाषणात म्हणाले आहेत. सरकार रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेत आहे, असेही आझाद आपल्या भाषणामध्ये म्हणाले आहेत.

नवी दिल्ली - पाकिस्तानचे नेते नेहमीच काहींना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात असेच गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या आणखी एका नेत्याने क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. काश्मीर प्रकरणी जो देश भारताला पाठिंबा देईल, त्या देशावर क्षेपणास्त्र हल्ला केला जाईल,अशी धमकी पाकिस्तानचे मंत्री अली अमीन गंडापुर यांनी दिली. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.काश्मीरच्या मुद्द्यावर जर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढल्यास पाकिस्तानला नाईलाजाने युद्ध करावे लागेल. जो देश भारताचे समर्थन करेल त्याला आम्ही आमचे शत्रू मानू. भारताव्यतिरिक्त त्या देशावरही आम्ही क्षेपणास्त्र डागू, असा इशारा अली अमीन यांनी दिला. पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान अस्थव्यस्थ झाला आहे. तसंच पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यही करण्यात येत आहेत.
यापूर्वी आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताचे नाव न घेता पुन्हा अणुहल्ल्याची धमकी दिली होती. “आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीने युद्ध केले जाणार नाही,” असे रशीद म्हणाले होते.

मुंबई - राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सहाय्य करतील. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जातात. त्यांच्या मदतीसाठी सरकारने राष्ट्रीय उप-सल्लागारांची नियुक्ती केली आहे. अजित डोवाल यांना आता राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची साथ लाभणार आहे. पडसलगीकर अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी पार पाडतील. पडसलगीकर यांनी यापूर्वी ‘आयबी’मध्ये संचालकपदावरही आपली सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीर हे परिचयाचे आहेत. दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या. दहशतवाद, दहशतवादी संघटनांबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्यासारख्या अनुभवी, कर्तव्य कठोर, प्रामाणिक अधिकाऱ्याचा डोभाल यांना निश्चित फायदा होणार आहे.मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण तपासात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी मुंबई हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील धागेदोरेही शोधून काढले होते. याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. पडसलगीकर यांनी अरूण गवळी टोळीचे कंबरडे मोडले होते. नागपुरमधील मटका आणि बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात त्यांनी मोठी कारवाई केली होती त्यांच्या अनेक कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रीय उप-सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


नाशिक - देवळाली कॅन्टोमेंटमध्ये लष्कराच्या ११६ इन्फ्रा पॅरा बटालियनची भरती सुरु आहे. यामध्ये अवघ्या ६३ जागांसाठी तब्बल ३० हजार विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तरुणांना प्रशासनाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच झोपून रात्र काढावी लागली. तसेच ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.लष्कराच्या अवघ्या ६३ जागांसाठी हजारो तरुण नाशिकमध्ये दाखल झाल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडालेली आहे. यावरुन किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी समाजात वाढलेली असल्याचे दिसून येत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दाखल झाल्याने सर्वांचा गोंधळ उडालेला आहे. ना राहण्याची, ना जेवणाची व्यवस्था, ना कागदपत्र कुठे द्यायचे, कोणाला भेटायचं याची माहिती. ऐन सणासुदीच्या दिवसात शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या या परिक्षार्थींच्या नशिबी अक्षरशः हाल अपेष्टा आल्या आहेत. तसेच येथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची तीन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती, अशी खंत येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई - वडाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कोठडीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी पाच पोलिसांना निलंबित केले आहे. तसेच मृत विजय विजय सिंहची तक्रार करणाऱ्या प्रेमी युगुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप विजयच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.मृत विजय सिंह एका फार्मा कंपनीत काम करत होता. सोमवारी 28 ऑक्टोबर रात्री एका प्रेमी युगुलासोबत वाद झाल्याने विजयला वडाळा पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर विजयच्या छातीत दुखू लागले. परंतु, पोलिसांनी केवळ नाटक करत असल्याचे म्हणत दुर्लक्ष केले आणि विजयला मारहाण केली, असा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही हे प्रकरण व्यवस्थित हाताळून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
विजयला पोलिसांनी पकडल्यानंतर विजयची आई पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. पण त्यांनाही भेटू दिले नाही. रात्री २ वाजता विजय जमिनीवर कोसळला असता त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.विजयच्या मृत्यूनंतर विभागात अनेकांनी मोर्चे काढले. तसेच पोलिसांवर कारवाई करत त्यांना निलंबित करा. विजयचा मृत्यू संशयास्पद आहे, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत होती. 
विजय सिंह फार्मा कंपनीत कामाला होता. २८ ऑक्टोबरला रात्री विजय ट्रक टर्मिनल येथील एमएमआरडीए कम्पाऊंड परिसरात गेला होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीचा प्रकाश तेथे बसलेल्या प्रेमी युगुलावर पडला. त्यावरुन प्रेमी युगुल आणि विजयमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच प्रेमी युगुलाने विजयला मारहाण केली. त्यानंतर विजयने आपल्या चुलत भावांना फोन करुन बोलावून घेतले. विजयचे भाऊ येताच तेथे जोरदार हाणामारी झाली. या दरम्यान गस्तीवरील पोलिसांची गाडी घटनास्थळी आली. पोलिसांसमोर तरुणीने विजय आणि त्याच्या भावावर छेडछाड करत असल्याचे आरोप लावले. त्यामुळे पोलिसांनी विजयसह त्याच्या भावांना पोलीस स्टेशनमध्ये नेले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पोलिसांनी चौकशी न करता विजयला मारहाण केली. यावेळी त्याच्या छातीत मुका मार लागला. मुका मार लागल्याने विजयच्या छातीत दुखू लागले. त्यावेळी त्याने पाणी देण्याचीही विनवणी केली. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण काहीवेळाने विजय बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र पोलिसांनी विजयला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि रुग्णालयात नेण्याची सूचना केली. रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्यामुळे विजयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.वडाळा कोठडीतील मृत्यू प्रकरणात विजयची तक्रार करणाऱ्या प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणूस न्यायमूर्ती शरद बोबडे विराजमान होणार आहे. शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बोबडे यांच्या नावाची शिफारस गोगोई यांनी कायदा मंत्रालयाला केली. त्यानंतर आता न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. 
प्रक्रियेनुसार सध्याचे सरन्यायाधीश पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठवतात. सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती भवनातून होते. बोबडे यांची नियुक्ती १८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१ पर्यंत या कार्यकाळाकरता झाली आहे. 
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी बोबडे सरन्यायाधीश म्हणून पदाची सूत्रे हातात घेतील. 

परळी - विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.“जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे…भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!” असे ट्विट करत मुंडेंनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटोही ट्विटरद्वारे शेअर केला. सुप्रिया सुळेंच्या फोटोसोबत ट्विट करताना मुंडेंनी “मानलेले जरी असले तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसते बहिण भावाचे नाते असेच अनमोल असते !

श्रीनगर - काश्मीरमधल्या सोपोरमध्ये अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये २० जण जखमी झाले. सोपोर बस स्टँडजवळ प्रवाशांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात जखमी झालेल्या 3 जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.हल्ल्यानंतर आता सुरक्षा दल सतर्क झाली असून त्यांनी या भागाला वेढा घातला. याठिकाणी लपून बसलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत.CRPF च्या १७९ क्रमांकाच्या तुकडीने हल्ल्याच्या ठिकाणी घेराव घातला. पोलिसांनी हल्लेखोर अतिरेक्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत कोणालाही पकडण्यात आलेले नाही.
याआधी श्रीनगरच्या काका सरायमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर हल्ला केला होता. यामध्ये ६ जवान जखमी झाले होते.हा हल्ला केरन पोलीस स्टेशनवर संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी झाला. यामध्ये जखमी झालेल्या जवानांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याआधीही कुलगाम जिल्ह्यात CRPF च्या जवानांवर ग्रेनेड हल्ला झाला होता.

जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर जळगावातील मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी मुक्त चर्चा केली. यामध्ये नाराज खडसेंनी अनेक गौप्यस्फोट केले. आधी मंत्रिमंडळातून हकालपट्टी, त्यानंतर तिकीटही कापले, शिवाय मुलीचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने, एकनाथ खडसे दुखावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी पक्षाला थेट इशारा दिला आहे.म्हातारा झालो समजून पक्षाला सोडून नातवंडांसोबत घरी बसू, असा इशारा खडसेंनी दिला. मंत्रिमंडळात पुन्हा घेऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, मात्र सांगायच्या गोष्टी वेगळ्या आणि करायच्या गोष्टी वेगळ्या असतात, असे म्हणत खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवला.याशिवाय भाजपला आपल्या अनुभवापेक्षा विखे-पाटलांसारखे विरोधी पक्षातले अनुभवी लोक पक्षांमध्ये असल्याने त्यांचे अनुभव पक्षाला महत्त्वाचे वाटत आहेतशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्याप्रमाणे ते स्वत:च मुख्यमंत्री होणार, असेही भाकीत खडसेंनी वर्तवले.

१ ) शिवसेना नेते सुरेश जैन यांना मुख्यमंत्री बनवा हे सांगण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो होतो. मात्र बाळासाहेबांनी सुरेश जैन हे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या हातात सत्ता देण्यास नकार दिला होता. त्यावेळेस बाळासाहेबांची उंची आपल्याला कळली असे खडसे म्हणाले.
२ ) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलताना खडसे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, तेच ठरलेले आहे आणि तेच होणार आहे. मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होणार आहेत.
३ ) आपण सरकारविरोधी वक्तव्य कधीच केले नाही. मात्र आपली स्टेटमेंट हे अर्धे तोडून मोडून दाखवली गेली, असा आरोप खडसेंनी मीडियावर केला.
४ ) आपल्याला पक्षाकडून न्याय अपेक्षित आहे. आपल्याबद्दल पक्षाची भूमिका हे विचारांच्या पलिकडे आहे. पक्षाला याबद्दल विचारणार आहोत आणि वाटले तर म्हातारा झालो आहे म्हणून पक्षाला सोडून आपण घरी नातवंडांसोबत बसू, असा इशारा खडसेंनी दिला.
५) आपल्या अनुभवापेक्षा विखे-पाटलांसारखे विरोधी पक्षातले अनुभवी लोक पक्षांमध्ये असल्याने त्यांचे अनुभव पक्षाला महत्त्वाचे वाटत आहेत, असा खरपूस समाचार खडसे यांनी यावेळी घेतला.
६) मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असे जाहीर केले होते. मात्र सांगायच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि आपल्या गोष्टी वेगळ्या असतात, असा टोला खडसेंनी लगावला.
७) आता निवांत काळामध्ये आपण पुस्तक लिहिणार आहोत. या आत्मचरित्रामध्ये 25 ते 30 अशा राजकारणातील गोपनीय गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या कुणालाही माहीत नाहीत, त्यांचा पण उल्लेख करणार आहोत. त्या गोष्टी जगापुढे येतील, असे खडसे यांनी जाहीर केले आहे.
मुंबई - नेवासा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेना सोडवेल अशी अपेक्षा असल्याने शिवसेनेसोबत जात असल्याचे शंकरराव गडाख यांनी म्हटले. आता पर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहचले आहे.

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावले आहे. दाऊदचा हस्तक इकबाल मिरचीशी संबंधित एका प्रकरणासंबंधी ही नोटीस बजावण्यात आली आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

मुंबई - प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू आणि राजुकमार पटेल यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्रच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 
अचलपूर आणि मेळघाट या मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्याची प्रहार जनशक्तीची मागणी आहे. त्याच प्रमाणे दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचाही प्रहार जनशक्तीचा आग्रह आहे. अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावरही प्रहार जनशक्तीने भर दिलेला आहे. याच मुद्द्यांवर प्रहार जनशक्तीने शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांच्या,आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्यानेच आपण शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मुंबई - राष्ट्रवादीकडून जबरदस्ती चुनाभट्टी-बीकेसी उड्डानपुलाचे उदघाटन करण्यात येत असल्याने त्यांना अडवण्यासाठी प्रियदर्शनी सर्कल येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी याबाबत नोटिसा पाठवल्या होत्या. 
जेसीबीवर चढून नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सकाळी वाजातगाजत चुनाभट्टी-बीकेसी उड्डानपुलाजवळ आले. प्रियदर्शनीसमोर नबाव मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. सुरूवातीला नवाब मलिक यांनी आजच्या आज उड्डानपुलाचे लोकार्पण करावी अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रशासनाला आठ दिवसाची मुदत देत आंदोलन माघारी घेतले. पोलिसांनी सिग्नल सुरू करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. आठ दिवसांत पुल वाहतूकीसाठी सुरू करण्याचे आव्हान पोलिस आणि प्रशासनासमोर असेल. 
आठ दिवसांमध्ये चुनाभट्टी-बीकेसी उड्डानपुल वाहतूकीस सुरू न केल्यास आता जेसीबी घेऊन आलो होतो पुढील वेळी रोलर आणू असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. लोकशाही आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेल्या व एमएमआरडीएने बांधलेल्या चुनाभट्टी – बीकेसी हा उड्डाणपुल वाहतूकीसाठी सुरू करावा यासाठी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

मुंबई - दिवाळीच्या निमित्ताने सेलिब्रिटी मंडळीही या क्षणाचा आनंद लुटत आहेत. मित्रमंडळींच्या, कुटुंबीयांच्या आणि काही खास मित्रांच्या सहाय्याने ही सर्व मंडळी दिवाळीचा आनंद लुटत आहेत. यामध्येच अभिनेत्री सारा अली खान हिचाही समावेश आहे. साराने यंदाच्या दिवाळीची सुरुवात काही खास व्यक्तींसोबत केली आहे. ही खास मंडळी आहेत, साराचे वडील अभिनेता सैफ अली खान, करिना कपूर खान, भाऊ ईब्राहिम आणि तैमूर. आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या साराने काही खास क्षण कुटुंबीयांसमवेत व्यतीत केला आहे. खुद्द सारानेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.'दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ', असे कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये सारा, करिना आणि सैफ अली खान पारंपरिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. 'स्टार स्टडेड' अशा या फोटोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधत आहे ते म्हणजे तैमूर आणि ईब्राहिम. सैफची ही दोन्ही मुले, सोशल मीडियावर सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.

मुंबई - शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला कायम काहीतरी शिकवून जात असतो. त्यातील प्रत्येक घटना ही आपल्यासाठी प्रेरणादायी तर असतेच पण नकळत मराठी म्हणून आपल्या संस्काराचा भाग झालेली असते. अशीच एक कथा म्हणजे हिरकणीची कथा आहे.पोटाच्या लेकरासाठी रायगडाचा पश्चिम कडा उतरून गेलेली हिरकणी इतिहासात प्रत्येकाने ओझरती पहिली, पण तीच शौर्य आणि मातृत्वाची ओढ मात्र कायमच एक दंतकथा बनून इतिहासाच्या पानात गुडूप होऊन गेली. याच पानांवरील धूळ बाजूला सारत हा विषय आपल्यासमोर आणला आहे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी.हिरकणीचा विषय मांडायचा नुसता विचार करणे आजच्या काळात सोपे असले तरीही तो प्रत्यक्ष पडद्यावरमांडणे वाटते तेवढे सोपे निश्चितच नाही. पण हिरकणी या सिनेमाचे सगळ्यात जास्त वेगळेपण हे त्याच्या मांडणीत आहे. जास्त पसारा न मांडता मोजके पण प्रभावी प्रसंग मांडून अवघ्या दीड ते पावणे दोन तासात ही कथा प्रसाद आणि त्याच्या टीमने आपल्यासमोर उलगडली आहे.सिनेमा सुरू होतो तो शिवराज्याभिषेक दिनापासून, गेले काही दिवस शिवराज्याभिषेक गीत गाजतय त्याच गाण्याने सिनेमा सुरू होतो आणि थेट पसारा न मांडता थेट हिरा आणि जिवाच्या कथेत आपल्याला घेऊन जातो. बहिर्जी नाईक यांच्या हेरखात्यात काम करणाऱ्या जीवाची हिरा ही पत्नी तिला सुरुवातीपासूनच स्वराज्य उभं करणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि अभिमान तर आहेच पण एकदा त्यांना स्वतः भेटण्याची ओढ सुद्धा आहे. अशात तिला दिवस जातात आणि तिला एक गोड मुलगा होतो. आणि खऱ्या कथेला सुरुवात होते. दररोज महाराजांच्या मुदपाकखान्यात दूध देण्यासाठी जाणारी हिरा तिथे नक्की कशी अडकते आणि त्यानंतर कडा उतरून कशी येते हे अनुभवायचे असेल तर आपल्याला थेट सिनेमा बघायला हवा त्यातच त्याची खरी गम्मत आहे. सोनालीने तिच्या मेहनतीच्या आणि कामाच्या बळावर आपली निवड सार्थ ठरवली आहे. हिराच जगणे, तीच भावविश्व हे सगळे तिने मोठ्या ताकतीने उभे केले आहे. शेणात हात घळण्यापासून हांडे घेऊन अनवाणी पायाने रानावनात चालण्यापर्यंत, आणि गायी म्हशीच दूध काढण्यापासून, ते लहान मुलाच आपल्या लेकराप्रमाणे सारे काही करण्यापर्यंत सार काही तिने स्वतः मेहनतीने साकारले आहे. या भूमिकेचे सगळ्यात मोठे आव्हान होत ते नऊवारी साडी नेसून कडा उतरण्याच त्यातही तिने लागेल ते कष्ट घेऊन कुठेही कामचलाऊपणा वाटणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली आहे. त्यामुळेच सोनालीने आजवर साकारलेल्या भूमिकामध्ये ही सगळ्यात सरस ठरेल यात शंका नाही.नवोदित अमित जांभेकर याने जिवाच्या भूमिकेत तिला छान साथ दिली आहे. पडद्यावर त्याच व्यक्तिमत्त्व चांगलेच खुलून दिसले आहे. त्यामुळे येत्या काही काळात एक चांगला नट म्हणून तो नक्की नाव कमावेल असे वाटते. बाकीच्या कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.काही विभागाचे विशेष कौतुक करायला हवे ते म्हणजे अमितराज याच सांगीत, शिवराज्याभिषेक गीत, हिरा जीवाचे प्रेमगीत आणि अशा भोसले यांनी गायलेली आईची आरती खरच खूप चांगली झाली आहे. सर्वच गायकांनी या गाण्यांना आपल्या आवाजाने चार चांद लावले आहेत. दुसरा विभाग म्हणजे सिनेमॅटोग्राफी संजय मेमाणे यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अवघड वाटणारे प्रसंग अगदी सहज सोपे वाटावेत एवढया सुंदररित्या टिपले आहेत. सुभाष नकाशे यांनी केलेली शिवराज्याभिषेक गीताची कोरिओग्राफी लक्षवेधी आहे. काही प्रसंगात वापरलेले व्हिएफएक्सचं कामही सरस झालं आहे. ऐन दिवाळीत आपण आपल्या मुलाना इतिहासाची तोंडओळख व्हावी यासाठी त्यांच्यासोबत किल्ला बनवतो, पण ज्या रायगड किल्ल्यावर एवढा मोठा प्रसंग घडला तो प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्याची संधी या दिवाळीत आपल्याला मिळत आहे. त्यामुळे हिरकणीच्या या अतुलनीय साहसाची आणि असामान्य मातृत्वाची गोष्ट आपण नक्कीच पहा.

मुंबई - भारतीय जनता पक्षातर्फे मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे 'दिपावली स्नेह मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येत्या काही दिवसातच युतीचे सरकार स्थापन करणार असून युतीबाबत कोणालाही काही शंका असता कामा नये; सर्व काही युतीत सुरळीत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.आघाडीला मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेच्या भूमिकेबाबत चर्चांना उधान आले आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्याचा एकप्रकारचा प्रयत्न फडणवीस यांनी यावेळी केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईतून निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित आमदार, मुंबईतील खासदार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई - सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या लेखी ग्वाहीशिवाय सत्तेत सहभागी होणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेने लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या ५०-५० सूत्राचा आग्रह धरला. शिवसेनेला ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळणार नसेल, तर अन्य पर्याय खुले आहेत, पण ते पाप मला करायचे नाही, असा इशाराही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत सत्तेत समान वाटा आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सत्तेचे वाटप व्हावे आणि तसे भाजपने लेखी द्यावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकार स्थापनेतील तिढा आणि भाजपची चिंता वाढली आहे. 
शनिवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ‘मातोश्री’वर झाली. सत्ता स्थापण्यासाठी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. भाजप नेत्यांशी झालेल्या चर्चेची माहितीही ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते. निवडणुकीत समान जागावाटप आणि सत्तेत सम-समान वाटा हे सूत्र शहा आणि फडणवीस यांनीही मान्य केले होते. मुख्यमंत्रिपदाबाबतही आपण त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते, असेही ठाकरे यांनी सांगितले. 
निवडणूक जागावाटपात शिवसेनेने कमी जागा स्वीकारल्या, कारण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. शहा आणि फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेतील सूत्रानुसारच सत्तेचे वाटप झाले पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. जे ठरले आहे, त्यापेक्षा मला कणभरही अधिक नको. सत्तेच्या वाटपाबाबत भाजपने लेखी स्वरूपात देणे अपेक्षित आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजप-शिवसेना युती अभेद्य आहे. मात्र ठरलेल्या सूत्रानुसार सत्तावाटप झाले पाहिजे, असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. 
भाजपकडून लेखी प्रस्ताव आल्याशिवाय सत्ता स्थापनेबाबत शिवसेना कोणताही निर्णय घेणार नाही, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. सत्तावाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसारच निर्णय व्हावा, अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी काही आमदारांनी बैठकीत केली. त्याचबरोबर चांगली खाती मिळावीत, असाच शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या एकूण पवित्र्यावरून स्पष्ट होते. दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांच्या या पहिल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड मात्र करण्यात आली नाही.

मुंबई - दिवाळीनंतर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सर्व उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. निवडणुकीनंतरची धोरणात्मक आखणी केल्यानंतर जनमत पाहता अधिक जोमाने काम करून नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. दिवाळी झाल्यावर यासंबंधी वाटचाल करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. 
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला आहे, त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. निवडणुकीत महाआघाडीच्या सर्व घटकांनी मनापासून प्रयत्न केले. प्रत्येक कार्यकर्त्याचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो, असे पवार म्हणाले. दरम्यान, निवडणुकीत किती टोकाची मते मांडायची याला काही मर्यादा असते. पण यावेळी प्रचाराची सीमा विरोधकांकडून ओलांडली गेली. जे पक्ष सोडून गेले आणि निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उभे राहिले, त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. 
दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार आहे. तसेच राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. सरकार स्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल. भाजप-शिवसेनेला कौल मिळाला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यामुळे तरुण नेत्याकडे विरोधी पक्षनेते पद असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा विषय पावसाळा संपूनही अधांतरीच राहिला आहे. बाजार धोकादायक झाले असल्याने या ठिकाणी कधीही दुर्दैवी घटना घडू शकते, त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार रिकामी करावे, यासाठी व्यापाऱ्यांना मुदतही देण्यात आली होती. या विरोधात व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडली. सध्याची बाजाराची जागा आणि बाजार समितीने ट्रान्झिस्ट कॅम्प म्हणून देऊ केलेली जागा यात मोठी तफावत असल्याने कमी जागेत व्यापारी व्यापार करू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या जबाबदारीवर सध्या असलेल्या जागेवरच व्यापार करू द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. बाजार समितीने टप्प्याटप्प्याने बाजार बांधण्यास सुरुवात करावी. त्यानुसार व्यापारी गाळे रिकामी करून देतील, अशी तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व्यापाऱ्यांना आहे त्याच गाळ्यांमध्ये व्यापार करण्याची परवानाही देण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे स्थलांतर टळले.वाशीतील घाऊक बाजार समिती मधील कांदा-बटाटा बाजार हे १९८१च्या दरम्यान मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतर झाले. याच दरम्यान या बाजाराची उभारणी करण्यात आली. आता या बाजाराच्या बांधकामाला ४० वर्षे होत आहेत. त्यामुळे हे बांधकाम पूर्णपणे जीर्ण झाले आहे. बाजाराचे बांधकाम कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वीच बाजार समितीने बाजाराच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला होता. व्यापाऱ्यांना तशी कल्पना दिली होती. बाजारातील गाळे आम्ही खरेदी केलेले आहेत. त्यामुळे पुनर्बांधणी करताना बाजार समितीने हे बाजार बांधून द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. बांधकामाचा काही खर्च व्यापाऱ्यांनी उचलावा, अशी भूमिका बाजार समितीने मांडली. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. शिवाय बाजार कसे बांधायचे, या वरूनही व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात एकमत होत नव्हते. बाजार समितीने व्यावसायिक संकुल उभारावे आणि त्यातून मिळणाऱ्या निधीतून बांधकामाचा खर्च उचलावा, असे व्यापाऱ्यांनी सुचवले. बाजार समितीने त्याला नकार दिला. बांधकाम करताना बाजारातील सध्या मोकळी असलेली जागा वापरात आणावी आणि मोठे व्यवसायिक संकुल उभारावे, असाही एक विचार पुढे आला. त्याचबरोबर बाजारातील बिगर गाळाधारक व्यापारी जे आता लिलावगृहामध्ये व्यापार करत आहेत. त्यांनी आम्हालाही नवीन बांधकामात गाळे मिळावे, अशी मागणी हेली. त्यामुळे बाजारातील गाळ्यांच्या पुनर्बांधणीचा विषय वाढतच गेला. अखेर हा वाद न्यायालयात गेला. 

अनेक व्यापारी संघटनांनीही आपापल्या मुद्द्यावरून न्यायालयात धाव घेतली. आता तर हे बाजार अतिधोकादायकच्या यादीत आल्याने बाजार समितीने ३० मेपर्यंत बाजार रिकामी करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या, मात्र बाजार रिकामी करून व्यापारी जाणार कुठे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर बाजार समितीने बाजारातील लिलावगृह आणि बाजाराच्या मालकीच्या असलेल्या मॅफ्कोच्या भूखंडावर व्यापाऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. मात्र सध्या असलेले कांदा-बटाटा बाजार हे १६ एकरच्या जागेवर वसलेले आहे. स्थलांतर करण्यासाठी दिलेली जागा फक्त दोन एकरच्या घरात आहे. त्यामुळे इतके व्यापारी, त्यांचा व्यापार दोन एकर जागेवर होणे शक्य नाही, हे व्यापाऱ्यांनी बाजार समिती आणि न्यायालयाला पटवून दिले. न्यायालयाने व्यापाऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांना स्थलांतर न करता राहण्याची परवानगी दिली.

ठाणे - मिठाईचे उत्पादन घेणाऱ्या नवी मुंबईतील एका कंपनीवर कारवाई न करण्यासाठी १ लाख ४० हजारांची लाच घेणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडलेकर याच्याविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) आरोपीचा शोधही घेतला. मात्र आरोपी सापडला नसून आरोपीच्या घरीही छापा मारला असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. 
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमध्ये तक्रारदार यांचा कारखाना असून या कारखान्यात मिठाई तयार करण्यात येते. मिठाईचे निरीक्षण करून कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी तसेच मागील पाच वर्षे कारवाई केली नाही म्हणून तक्रारदाराकडे पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. एसीबीच्या नवी मुंबई युनिटकडे तक्रारदाराने धाव घेत तक्रार केली. लाचेच्या मागणीविषयी एसीबीने दुसऱ्या दिवशी पडताळणी करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाखाची मागणी केली. नंतर तडजोडीअंती १ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु आरोपीने लाचेची रक्कम तत्काळ देण्याचा तगादा लावला होता.

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील गुडविन हा ज्वेलर मंगळवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा ज्वेलर पसार झाल्याने शेकडो ठेवीदारांनी ज्वेलर्स दुकानावर धाव घेऊन एकच गोंधळ घातला. दुसरीकडे फरार झालेल्या दुकानाच्या मालकानी ठेवीदारांना कोट्यवधींचा चुना लावला असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील असलेला प्रथमेश ज्वेलर्स हा दुकानदार गेल्याच वर्षी ठेवीदारांना चकमा देऊन फरार झाल्याची घटना ताजी असताना त्याच भागातील गुडविन ज्वेलर्सचा मालक त्याच्या दुकानाला टाळे ठोकून पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.डोंबिवली मानपाडा रोडला स्टेशनपासून जवळच असलेल्या एका इमारतीच्या तळ अधिक पहिल्या मजल्यावर या गुडविन ज्वेलरने दुकान थाटले आहे. २ वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत स्थानिक नेत्यांच्या हस्ते या ज्वेलरने सोन्या-चांदीची पेठी उभी केली. दागिन्यांसह हा ज्वेलर सोने तारण कर्ज आणि ठेवींचा व्यवसाय करत आहे. या ज्वेलरच्या दुकानात २५-३० कामगार काम करत आहे. हे कामगार डोंबिवलीतील अनेक नागरिकांना फोन करून आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यासाठी गळ घालत असत. मात्र, मंगळवारी सकाळी उघडलेले हे दुकान दुपारी अचानक बंद करण्यात आले. या दुकानच्या बंद शटरवर हे दुकान २ दिवस बंद राहण्याचे कागद चिकटविण्यात आल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर गेली २ दिवस याविषयी पोस्ट व्हायरल झाले. त्यामुळे ठेवीदारांनी दुकानाकडे धाव घेऊन गेल्या ६ दिवसापासून एकच गर्दी केली.डोंबिवलीतील ख्यातनाम आणि विविध पक्षातील राजकारण्यांच्या वरदहस्त असलेला गुडविन ज्वेलर्स हा ज्वेलर गाशा गुंडाळून निर्भयपणे फरार झाला आहे. त्याने जवळपास ५०० डोंबिवलीकरांना १० कोटींच्यावर चुना लावल्याचे फसवणूक झालेले ठेवीदार रिचर्डवाज यांनी सांगितले. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहेर यांच्याकडून या सोनाराच्या दुकानाला सील करून फरार झालेल्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

पनवेल - निवडणूक आली की, आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय बॅनर काढण्यात येतात केवळ बिगरराजकीय परवानगी घेऊन लागलेले बॅनर झळकत असतात. परंतु,विधानसभेचा निकाल जाहीर होताच दुसऱ्याच दिवसापासून पनवेल शहरात पुन्हा बॅनरबाजी सुरू झाली आहे.आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांना कोणतेही बेकायदा फलक लावता येत नाही. आचारसंहिता जाहीर होताच, निवडणूक विभाग संबंधित महापालिका प्रशासन आपापल्या हद्दीतील बेकायदा बॅनर हटवितात. पनवेल महापालिकेने सरसकट सर्वच बॅनर हटविले होते. महापालिका हद्दीतील चारही प्रभागात विशेष मोहीम राबवून शहर बॅनरमुक्त करण्यात आले होते. शहरातील अस्ताव्यस्त बॅनर काढण्यात आल्यामुळे निवडणूक काळात शहर स्वच्छ दिसू लागले. पनवेल शहरात महापालिकेने ठरवून दिलेल्या बॅनरखेरीज एकही बॅनर इतरत्र न लागल्यामुळे नागरिकदेखील आनंद व्यक्त केला, मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पनवेल शहरात पुन्हा बॅनरबाजी होऊ लागली आहे. कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, तळोजा या सर्व वसाहतींमध्ये बॅनर झळकले आहेत. आचारसंहिता संपताच खासगी व्यवसायिक, कोचिंग क्लास, व्यापाऱ्यांकडून पुन्हा विजेचे खांब, चौक, झाडे, बॅरिगेड्सवर फलक लावण्यास सुरुवात केली. निवडणुकीच्या कामातून सुटका झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचे याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

पालघर - पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरला. पालघरमधील डहाणू, कासा, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्क्याने पुन्हा हादरले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे पालघरमध्ये काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचे धक्के बसले. यामुळे स्थानिक लोकांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी कासा ,चारोटी, पेठ,शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सौम्य स्वरुपाचा असला तरी नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शुक्रवारी ५ सौम्य धक्के पालघरमध्ये बसले आहेत.दीड वर्षांपासून पालघरमध्ये सतत भूकंपाचे धक्के का जाणवत आहे, याची कारण शोधण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या विभाजनसाठी आठवडाभराचा अवधी शिल्लक असताना शुक्रवारी केंद्र सरकारकडून या दोन्ही स्वतंत्र प्रदेशांसाठी नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. तर जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपल सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. केंद्र सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संमतीने घेतलेल्या निर्णयानुसार गिरीश चंद्र मुरुम हे केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल असतील. तर राधाकृष्ण माथूर हे लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल असतील. जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झालेले गिरीश चंद्र मुरूम हे १९८५ च्या गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना गिरीश चंद्र मुरूम हे राज्याचे मुख्य सचिव होते. तर केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या पीएस श्रीधरन पिल्लई यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या तडकाफडकी बदलीसाठी त्यांचे एक वक्तव्य कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. राज्यपालपद हे अत्यंत दुबळे पद आहे. राज्यपदावरील व्यक्तीला साधी पत्रकारपरिषद घेण्याचा किंवा खुलेपणाने बोलण्याचेही स्वातंत्र्य नसते, असे मलिक यांनी म्हटले होते. 

चंदीगढ - हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत बहुमत न प्राप्त करू शकलेल्या भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीशी (जेजेपी) हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. जेजेपीला विधानसभेच्या ९० जागांपैकी १० ठिकाणी विजय मिळाला होता. तर भाजपला ४० जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे हरियाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हरियाणात कोणाची सत्ता येणार, याची उत्सुकता सर्वांना होती. 
मात्र, भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी वेगाने सूत्रे हलवत जेजेपीशी युतीचा फॉर्म्युला पक्का केला. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषेदत अमित शाह यांच्याकडून दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करण्यात आली. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचे शाह यांनी सांगितले. तसेच जेजेपीला २ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येईल. शनिवारी विधीमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर कुणाकुणाला मंत्रिपद द्यायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. 
दरम्यान, भाजपला ९ अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिली आहे. त्यामुळे जेजेपीच्या पाठिंब्यानंतर भाजप-जेजेपी सरकारचे संख्याबळ ५९ इतके झाले आहे. त्यामुळे भाजपचे मनोहरलाल खट्टर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. तर दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री होतील.

मुंबई - ठाणे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. अप जलद मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. दुरूस्तीसाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रूळाला तडा गेला आहे. ऐन सकाळच्या वेळेस बिघाड झाल्यामुळे चाकरमान्यांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना निश्चित वेळी ऑफीसमध्ये पोहोचण्यास आज विलंब होणार असल्याचं चित्र दिसत आहे. 
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत सत्तेची समीकरण ठरवण्यासंदर्भात उद्धव ठाकरे सर्व आमदारांचा कल जाणून घेतील. भाजपसोबत जायचे असेल तर कोणत्या अटी ठेवायच्या.५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर ठाम राहायचे की, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंबा घेवून सरकार केल़्यास काय होईल ? याबाबतही आमदारांचा कल घेतला जाण्याची शक्यता आहे.भाजप-शिवसेना महायुतीला १६२ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागांवर बाजी मारली आहे. चंदीगड - भाजपाची हरियाणात सत्ता गमावले जाण्याची शक्यता आहे. हरियाणात काँग्रेसने मनोहरलाल खट्टर यांची चिंता वाढवली आहे. त्रिशंकू परिस्थिती झाल्यामुळे काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे जननायक जनता पार्टी (जेजेपी) ने मुख्यमंत्रीपदाची अट ठेवत समर्थनाची ऑफरही दिली. सोनिया गांधींनी काँग्रेसचे हरियाणातील प्रमुख नेते भूपिंदर सिंग हुडा यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागा आहेत, तर बहुमतासाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. पण सुरुवातीच्या कलांनुसार भाजपला ४१ जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला २९ आणि जेजेपीला १० जागा मिळत आहेत. हरियाणातील परिस्थिती पाहता मनोहरलाल खट्टर यांना दिल्लीला बोलावण्यात आले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करत हरियाणाकडे लक्ष घातले आहे. एक्झिट पोलनुसार हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आले होते. शिवाय प्रचारातही भाजपने विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला होता.
हरियाणाच्या निवडणुकीत चौटाला परिवार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांनी इंडियन नॅशनल लोकदलपासून फारकत घेत जेजेपीची स्थापना केली. जेजेपीला १० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इंडियन नॅशनल लोकदलला पाच जागा मिळत आहेत. चौटाला कुटुंब एकत्र आल्यास काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्यापासून भाजपलाही रोखता येणार नाही.

नाशिक - विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. निवडणुकीपूर्वी पासूनच मुख्यमंत्रिपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू होती. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा खुलासा करून सेनेच्या इशाऱ्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार की, आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. शिवसेना भाजपसोबत राहूनही मुख्यमंत्रिपद घेऊ शकते, आता ते शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. 

मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला १०४ जागा, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागा तर काँग्रेसला ४५ जागा मनसे १, मिळाल्या आहेत. अपक्ष लढलेल्या उमेदवारांना २८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे अपक्ष नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी ज्या नेत्यांनी पक्षांतर केले अशा नेत्यांनाही फटका बसला आहे. मात्र, काही ठिकाणी पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेले उमेदवारही विजयी झाले आहेत.

विजयी झालेले अपक्ष उमेदवार

1) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून - प्रकाश आवाडे
२) चंद्रपूर मतदारसंघातून - अशोक जोरगेवार
३) रामटेक मतदारसंघातून - आशिष जैस्वाल (शिवसेनेचे बंडखोर, मल्लीकार्जुन रेड्डी)
४) वाशिम मतदारसंघातून - अनंतराव देशमुख
५) उरण मतदारसंघातून - महेश बालदी
६) अचलपूर मतदारसंघातून - बच्चू कडू (प्रहार)
७) मुर्तीजापूर मतदारसंघातून - प्रतिभा अवचार
८) गंगाखेड मतदारसंघातून - रत्नाकर गुट्टे (रासप)
९) बार्शी मतदारसंघ - राजाभाऊ राऊत
१०) करमाळा मतदारसंघ - संजयमामा शिंदे
११) मेळघाट मतदारसंघ - राजकुमार पटेल (प्रहार)
१२) वसई मतदारसंघात - हिंतेद्र ठाकूर (वंचीत बहूजन आघाडी)
१३) नालासोपार मतदारसंघात - क्षितीज ठाकूर (वंचीत बहूजन आघाडी)
१४) बोईसर मतदारसंघ - राजेश पाटील (वंचीत बहूजन आघाडी)
१५) गोंदिया मतदारसंघ - विनोद अग्रवाल
१६) उरण विधानसभा मतदारसंघ - महेश रतनलाल बालदी
१७) चंद्रपूर मतदारसंघ - किशोर जोरगेवार
१८) बडनेरा - रवी राणा
१९) शिरोळ मतदारसंघातून - राजेद्र येड्रावकर
२०) शाहूवाडी मतदारसंघ - विनय कोरे (जनसुराज्य)
२१) भंडारा विधानसभा मतदारसंघ - नरेंद्र भोंडेकर
२२) नेवासे मतदारसंघ - शंकरराव गडाख (शेतकरी कामगार पक्ष)
२३) मोर्शी विधानसभा - देवेंद्र भुयार (स्वाभिमानी)
२४) मुक्ताईनगर मतदारसंघ - चंद्रकांत पाटील
२५) धुळे शहर - फारुक शहा (MIM)
२६) मालेगाव मध्य - मोहम्मद मुफ्ती (MIM)
२७) साक्री - मंजुळा गावीत

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चिंदबरम दिवाळी तिहार तुरुंगाताच साजरा करणार आहेत.पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.मुंबई - विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. आदित्य ठाकरे हे विजयी झाल्यानंतर वरळीमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत. शिवसेना युवा नेते मा. भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर वरळीत ठिकठिकाणी लावले.
ठाकरे घराण्यातील पहिलाच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वरळीतील निकालाकडे लागले होते. आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण शिवसेना कामाला लागली. वरळीचे आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला. आदित्य ठाकरे यांना ८९ हजार २४८ मतं मिळाली आहेत. तर सुरेश माने यांना २१ हजार ८२१ मते मिळाली आहेत. आदित्य ठाकरे ६७ हजार ४२७ अधिक मताधिक्याने विजयी झाले.विशेष म्हणजे या मतदारसंघात ६ हजार ३०५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

चंदीगढ - हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी सकाळी मतमोजणीस सुरू झाली.हरियाणा विधानसभेच्या ९० जागांमधून भाजपने ४० जागांवर विजय मिळवला आहे.काँग्रेसने ३१ जागांवर बाजी मारली आहे जेजेपी १० जागांवर विजय मिळवला आहे. इतर उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.इंडियन नॅशनल लोक दलाने १ जागेवर विजय मिळवला आहे.माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुडा यांनी भाजपला राज्यात पराभूत करण्यासाठी इतर पक्षांना काँग्रेसला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे.दुसरीकडे भाजपाला जरी स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तरी देखील सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरलेला आहे. तर अपक्ष आमदारांना बरोबर घेत भाजपा पुन्हा सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राज्यपाला सत्यनारायण आर्य यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. बहुमतापासाठी भाजपाला सहा जागा कमी आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेत भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
दिल्लीमध्ये उद्या जेजेपी पक्षाने बैठक आयोजित केली आहे. हरियाणा विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही. त्यामुळे जेजेपी किंगमेकर बनण्याची शक्यता आहे. जेजेपी पक्ष भाजपला पाठिंबा देवून सत्तेमध्ये येवू शकतो. किंवा काँग्रेस, जेजेपी आणि इतर उमेदवार असेही समीकरण जुळू शकते. राज्यात झालेल्या त्रिशंकू पार्श्वभूमीवर निकाल हाती येण्याच्या आधापासूनच नेत्यांनी हालचाली सुरू झाल्या आहेत.काँग्रेसने जेजेपी प्रमुख दुष्यंत चौटाला यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली अशी माहिती पुढे येत होती. याबाबत चौटाला यांना विचारले असता, अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा यांच्याशी चर्चा केली. सरकार बनवण्यासाठी दिले स्वातंत्र्य. सोनिया गांधी राज्यातील परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. जननायक जनता पक्ष हरियाणा विधानसभा निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यालयात उत्साह पाहायला मिळाला. . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई कार्यालयात मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटील व भाजपचे शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यासोबतच शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि सर्व मित्रपक्षाचे त्यांनी आभार मानले आता अधिक जोमाने काम करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.काही महत्वाच्या जागा हातून गेल्या असल्या, तरीही स्ट्राईक रेटचा विचार करता तो मागील निवडणुकीच्या तुलनेत निश्चितच चांगला होता, असे ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपवर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे आभार व्यक्त करून त्यांनी कोथरूडच्या जनतेचेही आभार मानले आहेत.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा २०१९ चा निकाल स्पष्ट झाला आहे. मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार हे सुरुवातीपासूनच आघाडीवर पाहायला मिळाले. भाजपाने अबकी बार दोनशे पार आणि शिवसेनेने अबकी बार शंभर पार असा नारा दिला होता तसे झाले नसले तरी महायुतीचे सरकार बनवणार आहे हे निश्चित झाले आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले.
मुंबईत वरळीतील निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवली. यात त्यांना ८९ हजार २४८ मते मिळाली. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे यांच्या रुपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी इथे प्रचारासाठी जोर लावला होता. मुंबईतील ३६ मतदारसंघातून या उमेदवारांना मुंबईकरांनी कौल दिला आहे. 

मतदारसंघ आणि विजयी उमेदवार 

बोरिवली येथून भाजपचे सुनील दत्ताराम राणे विजयी
दहिसर येथून भाजपच्या मनिषा चौधरी विजयी
मागठाणे येथून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी
मुलुंड येथून भाजपचे मिहिर कोटेचा विजयी
विक्रोळी येथून शिवसेनेचे सुनील राउत विजयी
भांडूप-पश्चिम येथून शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी
जोगेश्वरी-पूर्व येथून शिवसेनेचे रविंद्र वायकर विजयी
कांदिवली-पूर्व येथून भाजपचे अतुल भातखळकर विजयी
चारकोप येथून भाजपचे योगेश सागर विजयी 
मालाड-पश्चिम येथून काँग्रेसचे असलम शेख विजयी
गोरेगाव येथून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी
वर्सोवा येथून भाजपचे डॉ. भारती लवेकर विजयी
दिंडोशी येथून शिवसेनेचे सुनील प्रभु विजयी 
अंधेरी पूर्व येथून शिवसेनेचे रमेश लटके विजयी
अंधेरी पश्चिम येथून भाजपाचे अमित साटम
विलेपार्ले येथून भाजपाचे पराग आळवणी विजयी 
चांदीवली येथून शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी
घाटकोपर पूर्व येथून भाजपाचे पराग शाह विजयी 
घाटकोपर पश्चिम येथून भाजपाचे राम कदम विजयी 
अणुशक्तीनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विजयी 
चेंबुर येथून शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर विजयी 
कुर्ला येथून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर विजयी
कलिना येथून शिवसेनचे संजय पोतनिस विजयी
वांद्रे पूर्व येथून झिशान बाबा सिद्दीकी विजयी
वांद्रे पश्चिम येथून भाजपाचे आशिष शेलार विजयी 
धारावी येथून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी 
सायन कोळीवाडा येथून भाजपाचे कॅप्टन तमिल सेल्वन विजय 
वडाळा मतदारसंघातून भाजपाचे कालिदास कोळंबकर विजयी 
माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी
वरळी येथून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी
शिवडी मतदार संघातून शिवसेनेचे अजय चौधरी यांचा विजय
भायखळा येथून शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी 
मलबार हिल येथून भाजपाचे मंगलप्रभात लोढा विजयी 
मुंबादेवी येथून काँग्रेसचे आमिन पटेल विजयी
कुलाबा येथून भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी 

अहमदनगर - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येणार आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला आहे. कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून होते. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित पवार यांनी विद्यमान मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला.विजयानंतर राम शिंदेंच्या घरी जाऊन रोहित पवार म्हणाले, ‘विकासासाठी कटिबद्ध आहे, कार्यकर्त्यांची भांडणे नको. आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. मात्र रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचे दर्शन घडवले आहे. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शिवाय राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.
राम शिंदे यांच्या कुटुंबियांनीही रोहित पवार यांचं स्वागत आणि मान-पान केले. शिंदे कुटुंबियांनी रोहित पवार यांना मानाचा फेटा आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

जळगाव - एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचा पराभव झाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या राजकीय जीवनातला हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील हे याआधी शिवसेनेत होते, विधानसभा २०१४ मध्ये देखील एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात १० हजारांचे अंतर होते. अखेर चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्रभैय्या यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चंद्रकांत पाटील यांना मोठी मदत झाली आहे. भाजपने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारून रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. 
नागपूर - राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला मोठे यश मिळाले नसले तरी दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला त्यांचा बालेकिल्ला असेलल्या विदर्भामध्य़े मात्र धक्का बसला आहे. विदर्भातल्या एकूण ६२ जागांपैकी २४ जागांवर भाजपचा विजय झाला आहे आणि ३ जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेनेने ४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने विदर्भात १२ जागा जिंकल्या असून ३ जागांवर ते पुढे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात ६ जागांवर विजय मिळवला. तर बच्चू कडूंच्या प्रहारने २ जागा पटकावल्या. बडनेऱ्यामधून आघाडीचे पुरस्कृत रवी राणा जिंकले आहेत. मोर्शीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांचाही विजय झाला आहे. तर विदर्भातून ४ अपक्ष निवडणूक जिंकले आहेत.

विजयी उमेदवार विदर्भाची आकडेवारी

मलकापूर- राजेश एकडे- काँग्रेस- विजयी

बुलडाणा- संजय गायकवाड- शिवसेना- विजयी

चिखली- श्वेता महाले- भाजप- विजयी

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे- राष्ट्रवादी- विजयी

मेहकर- संजय रायमुलकर- शिवसेना- विजयी

खामगाव- आकाश फुंडकर- भाजप- विजयी

जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे- भाजप- विजयी

अकोट- प्रकाश भारसाकळे- भाजप- विजयी

बाळापूर- नितीन देशमुख- शिवसेना- विजयी

अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा- भाजप- विजयी

अकोला पूर्व- रणधीर सावरकर- भाजप- विजयी

मूर्तिजापूर- हरीश पिंपळे- भाजप- विजयी

रिसोड- अमित झनक- काँग्रेस-आघाडी

वाशिम- लखन मलीक- भाजप- विजयी

कारंजा- राजेंद्र पाटणी- भाजप- विजयी

धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड- भाजप- विजयी

बडनेरा- रवी राणा- महाआघाडी समर्थन- विजयी

अमरावती- सुलभा खोडके- काँग्रेस- विजयी

तिवसा- यशोमती ठाकूर- काँग्रेस- विजयी

दर्यापूर- बळवंत वानखेडे- काँग्रेस- विजयी

मेळघाट- राजकुमार पटेल- प्रहार- विजयी

अचलपूर- बच्चू कडू- प्रहार- विजयी

मोर्शी- देवेंद्र भुयार- स्वाभीमानी शेतकरी संघटना- विजयी

आर्वी- दादाराव केचे- भाजप-विजयी

देवळी- रणजीत कांबळे- काँग्रेस- विजयी

हिंगणघाट- समीर कुनावार- भाजप- विजयी

वर्धा- पंकज भोयर-भाजप- विजयी

काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी- विजयी

सावनेर- सुनील केदार- काँग्रेस- आघाडी

हिंगणा- समीर मेघे- भाजप- विजयी

उमरेड- राजू पारवे- काँग्रेस- विजयी

नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप-विजयी

नागपूर दक्षिण- मोहन मते- भाजप- विजयी

नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे-भाजप- विजयी

नागपूर मध्य- विकास कुंभारे- भाजप- विजयी

नागपूर पश्चिम- विकास ठाकरे-काँग्रेस- विजयी

नागपूर उत्तर- नितीन राऊत- काँग्रेस- विजयी

कामठी- सुरेश भोयार- काँग्रेस- आघाडी

रामटेक- आशिष जयस्वाल- अपक्ष- विजयी

तुमसर- राजू कारेमोरे- राष्ट्रवादी- विजयी

भंडारा- नरेंद्र भोंडेकर- अपक्ष- विजयी

साकोली- नाना पटोले- काँग्रेस- विजयी

अर्जुनी-मोरगाव- मनोहर चंद्रीकापुरे- राष्ट्रवादी- विजयी

तिरोडा- विजय रहांगदळे- भाजप- विजयी

गोंदिया- विनोद अग्रवाल- अपक्ष- विजयी

आमगाव- सहसराम कोराटे- काँग्रेस- विजयी

आरमोरी- कृष्णा गजभे- भाजप- विजयी

गडचिरोली- देवराव होली- भाजप- आघाडी

अहेरी- धर्मरावबाबा अत्राम- राष्ट्रवादी- विजयी

राजुरा- सुभाष धोटे- काँग्रेस- विजयी

चंद्रपूर- किशोर जोरगेवार- अपक्ष- विजयी

बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार- भाजप- विजयी

ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार- काँग्रेस- विजयी

चिमूर- बंटी भंगडिया- भाजप- विजयी

वरोरा- प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- विजयी

वणी-संजीव बोदकुरवार- भाजप- आघाडी

राळेगाव- अशोक उईके- भाजप- विजयी

यवतमाळ- मदन येरावार- भाजप- विजयी

दिग्रस- संजय राठोड- शिवसेना- विजयी

आर्णी- संदीप धुर्वे- भाजप- आघाडी

पुसद- इंद्रनिल नाईक- राष्ट्रवादी- विजयी

उमरखेड- नामदेव ससाणे- भाजप- विजयी

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेल शॉपिंग मॉल आणि रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार यासंदर्भात लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकारकडून पेट्रोल पंप सुरु करण्याचे नियमही शिथील केले जाऊ शकतात. असे झाल्यास २५० कोटी मूल्य असलेल्या कंपन्याही पेट्रोल पंप सुरु करू शकतात. यापूर्वी ही मर्यादा २००० कोटी इतकी होती. याशिवाय, पेट्रोलियम क्षेत्राबाहेरील कंपन्यांनाही इंधन विक्रीचा परवाना मिळू शकतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोलियम मंत्रालयाने इंधनविक्री संदर्भातील नियम बदलण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. इंधन रिटेल बाजारात स्पर्धा वाढवण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समितीचे गठन केले गेले होते. आता सरकार याच समितीच्या आधारे काही निर्णय घेऊ शकते.मात्र, सरकारने हा निर्णय घेतल्यास त्यांची अंमलबजावणी नेमकी कशी होईल, याबाबत अजून पुरेशी स्पष्टता नाही. 

बारामती - राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून गुरुवारी निकाल लागणार आहेत.अशातच बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बसपाच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची धिंड काढल्याचा प्रकार घडला. पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उमेदवाराला मारहाण केली, तसेच त्यांची गावातून धिंड काढली.
अशोक माने असे उमेदवाराचे नाव आहे. बसपाकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदत केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली नसल्याचेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना राग अनावर झाला. माने यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, त्यांची उमेदवारी कायम राहिली होती. दरम्यान, राग अनावर झाल्याने कार्यकर्त्यांनी माने यांना मारहाण केली. तसेच त्यांचे कपडे फाडले आणि तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढली.मुंबई - कुर्ला ठक्कर बाप्पा कॉलनी येथून पंचराम राठाडिया यांची अंत्ययात्रा चेंबूरच्या दिशेने येत असताना दगडफेकीत नागरिक व पोलीस जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये काही वाहनावर जमावाने दगडफेक केली. मुरुड आगराच्या बसच्या पाठिमागील काचा फुटल्या. मात्र, कुठलाही प्रवासी जखमी झाला नाही.कुर्ला ठक्कर बाप्पा येथील रहिवासी पंचराम राठाडिया यांची आपली मुलगी ६ महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या मुलीचा शोध लागला नसल्याने त्यांनी १० दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यादरम्यान नातेवाईक व त्यांच्या कुटुंबाने घटनेचा शोध लागत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा चेंबूरच्या समशानभूमीकडे जाताना कुर्ला पनवेल मार्गावर जमावाने रास्ता रोको केला. यामध्ये एसटी बस व इतर वाहनावर दगडफेक करण्यात आली.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget