November 2019

ठाणे - आर्थिक मंदीच्या वातावरणात बांधकाम क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे महापालिका शहर विकास विभागाच्या उत्पन्नवसुलीला ओहोटी लागली असताना, मालमत्ता कराच्या वसुलीत ३५ कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिनाअखेर मालमत्ता कराची वसुली ५५ टक्क्य़ांपर्यंत झाली असून उर्वरित चार महिन्यांत ४५ टक्के कराची वसुली करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे. ठाणे महापालिका अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना उत्पन्नवसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. त्यापैकी मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो. त्यामुळे महापालिकेकडून मालमत्ता करवसुलीवर सर्वाधिक भर दिला जातो. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता करापोटी ५५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. त्यापैकी ५२५ कोटी रुपयांच्या कराची वसुली झाली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून नोव्हेंबर महिनाअखेपर्यंत ३५४ कोटी रुपयांची वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१९ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत ३५ कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे. 
ठाणे महापालिका मुख्यालय आणि नऊ प्रभाग समिती स्तरावर मालमत्ता कराची वसुली करण्यात आली. त्यामध्ये घोडबंदर परिसरासाठी असलेल्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक म्हणजेच १०५ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली झाली आहे. घोडबंदर परिसर मालमत्ता कर भरण्यात आघाडीवर असल्याची बाब आकडेवारीतून समोर आली आहे.

ठाणे - अल्पवयीन पीडित मुलीच्या आईशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, पीडितेवर ७० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही बाब पीडितेच्या शाळेमधील वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी आरोपीवर 'पोक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधमाला बेड्या ठोकल्या. तुळशीराम आंबोरे असे आरोपीचे नाव आहे.टिटवाळा पूर्व परिसरात आरोपी राहतो. मजुरीच्या कामानिमित्ताने मुलीच्या आईशी त्याची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन गैरकृत्य साधण्यासाठी मुलीच्या आईला टिटवाळ्यात घर भाड्याने घेण्यासाठी मदत केली. तिची आई इतर ठिकाणी घरकामासाठी सकाळी घरातून बाहेर जाऊन संध्याकाळी उशीरा येत असे. तसेच मुलगी शाळेतून आल्यानंतर ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने घरात घुसून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.दरम्यान, मुलीच्या शाळेमध्ये वैद्यकीय तपासणीवेळी डॅाक्टरांना तीने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर शिक्षकांनी तत्काळ मुलीच्या आईला सांगितले. याप्रकरणी आईने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करित नराधम तुळशीरामला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे

ठाणे - ठाणे येथील तीन हात नाका भागात बुधवारी रात्री मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून झाडांची कत्तल करण्यात आली असली तरी या घटनेकडे महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका सर्वत्र होऊ लागली आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.ठाणे आणि घोडबंदर परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठी महामार्गावर मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये तीन हात नाका भागातील झाडे अडसर ठरत होती. बुधवारी रात्री ‘एमएमआरडीए’कडून या झाडांची कत्तल करण्यात आली. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकरामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात ही घटना घडली असून त्याकडे महापाालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होऊ लागली आहे. या घटनेबाबत काही सामाजिक संघटनांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे तक्रार केलीअसून त्याआधारे म्हस्के यांनी महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाला लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाचे बंदी आदेश असतानाही गेले दोन दिवस मेट्रो-४ प्रकल्पासाठी अंधारात झाडांची कत्तल केली जात असून ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

नवी मुंबई - पालिका क्षेत्राची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आहे. त्यांना पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना कर माफी देणे शक्य आहे, पण जेमतेम १२ लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत्र असलेल्या मालमत्ता करावर पाणी सोडणे शक्य नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे हा अशासकीय प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
मुंबई पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी मंजूर केलेला ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचा अशासकीय प्रस्ताव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून मंजूर करून घेण्यात आला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचे प्रस्ताव सक्षम पालिकांनी दिल्यास मंजूर केले जातील, असे जाहीर केले. त्यामुळे नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत ५००चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून माफी देण्याचा अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याला जोड म्हणून ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याचाही प्रस्ताव मान्य करण्यात आला. याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मालमत्ता करात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली. 
हे तीनही प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पालिकेच्या नगरसचिव विभागातील कार्यालयात पडून आहेत. सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले अशासकीय प्रस्ताव हे राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय त्यांची अंमलबजावणी होत नाही. नवी मुंबई पालिका प्रशासनाने पालिकेला आर्थिकदृष्टय़ा गाळात नेणारे हे प्रस्ताव राज्य शासनाकडे अद्याप सादर केलेले नाहीत. 
लोकसभा, विधानसभा आणि आता पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे तीनही प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेतील सत्तांतरामुळे हे तीनही प्रस्ताव भाजपच्या नावावर जमा होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने आता नवी मुंबईकरांना दिलासा देणारा पण पालिकेची तिजोरी खाली करणारा हा अशासकीय प्रस्ताव पालिकेकडून मागवून महाविकास आघाडी स्वीकारते की नाकारते हे येत्या चार महिन्यांत स्पष्ट होणार आहे. निवासी, अनिवासी, एमआयडीसी क्षेत्रांत तीन लाख ४१ हजार मालमत्ता आहेत. पालिका या मालमत्ताधारकांकडून कर वसुली करून पालिकेचा कारभार हाकत आहे. राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत या शहरात असल्याने मुंबई पालिकेनंतर ही पालिका श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जाते, मात्र आता औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद पडले आहेत वा त्यांचे स्थलांतर झाले आहे. जे आहेत त्यांनी आयटीला प्राधान्य दिले आहे. सर्वोच्च न्यायालयामुळे औद्योगिक वसाहतीतून करवसुली करताना सक्ती करता येणार नसल्याने पालिका कारखानदारांसोबत नरमाई दाखवत कर भरून घेत आहे. त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. यंदा ५७० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, पण सरतेशेवटी ही जमा कमी होत असल्याचा अनुभव आहे. एलबीटी बंद झाल्यानंतर सुरू झालेल्या जीएसटीमधून पालिकेला महिन्याला ९२ ते ९३ कोटी रुपये येत आहेत, पण ही रक्कम विकास कामांवर खर्च करण्यासाठी पुरेशी नाही, अशा वेळी मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे एक सक्षम साधन आहे. 
नवी मुंबई पालिकेचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या दोन्ही बेताचीच असल्याने मालमत्ता करासारखे उत्पन्नाचे साधन विकलांग करणे शक्य नाही. त्यामुळे मालमत्ता कर माफी, सवलतीचे अशासकीय प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका

मुंबई - सलमान खानचा दबंग-३ सिनेमा रिलिज होण्याआधीच पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडा आहे. दबंग-३ पाहण्यासाठी जेवढा सलमान खानच्या फॅन्समध्ये उत्साह होता त्या उत्साहालाच कुठेतरी तडा जात असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. सोशल मीडियावर #BoycottDabangg3 हा हॅशटॅन तुफान व्हायरल होत आहे. 
सलमान खानच्या दबंग-३ सिनेमातील हुड हुड दबंग गाण्यावर हिंदू जन जागृती समितीनं आक्षेप घेतला आहे. यासोबतच हे गाणं सिनेमातून हटवण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी ह्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यामध्ये साधू-संत सलमान खानच्या मागे नाचताना दिसत आहेत. हुड हुड दबंग गाण्यावर साधू संत नाचताना शूट केलं आहे. अशा पद्धतीने हिंदुस्तानात साधू संतांचा अपमान सहन केला जाणार नाही. असे नेटकऱ्यांनी सुनावले आहे. दरम्यान हे गाणे चित्रपटातून हटवण्याची मागणीही केली जात आहे. या सिनेमात दबंगमध्ये दिसलेली सलमान आणि सोनाक्षी यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा दिसणार आहे. मराठी सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. सलमान या सिनेमात ‘पोलिसवाला गुंडा’ झाला आहे. याच बरोबर सलमान या सिनेमात सईसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सलमाननं स्वतः दबंग ३ साठी काही संवाद लिहिले आहेत. तसेच त्याच्या सांगण्यावरून सिनेमाच्या काही डायलॉग्समध्येही बदल करण्यात आले आहेत. सलमान नेहमीच सेटवर इनपुट्स देत असतो. ज्याचा सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला जातो. याशिवाय या सिनेमात तो हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीनच्या कोरिओग्राफीमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. हा सिनेमा २० डिसेंबरला रिलीज होत असून याचे दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभुदेवा करत आहे.

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्तानी' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केले. आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता त्यांनी प्रेक्षकांचे मोठ्या उत्साहात मनोरंजन केले. वाढत्या वयामुळे आरोग्याच्या समस्या देखील समोर आल्या. परंतु त्यांनी मागे वळून पहिले नाही.पण आता ते कलाविश्वला राम राम ठोकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आपण निवृत्त होत असल्याची कल्पना त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केली. सध्या ते 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मनालीमध्ये पोहोचले आहेत. मनालीला पोहोचण्याचा अनुभव त्यांनी शेअर केला, 'मनालीसारख्या सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी मला १२ तास लागले. शिवाय येथील रस्ते देखील खराब आहेत. त्याचप्रमाणे वातावरणात देखील फार वेगळे वाटत आहे. त्यामुळे आता निवृत्त व्हावे लागेल.' असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटात बिग बींसोबत अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर देखील झळकणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अयान मुखर्जींच्या खांद्यावर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाशिवाय बिग बी 'झुंड', 'गुलाबो सि‍ताबो', 'बटरफ्लाई' (कन्नड़), 'एबी आणि सीडी' (मराठी), 'उयरनधा' आणि 'चेहरे' या चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत.

गुवाहाटी - 'सुपर ३०' चे संस्थापक आनंद कुमार यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या सर्व याचिका गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.त्यावर प्रतिक्रिया देताना आनंद कुमार म्हणाले, मला न्याय मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्याविरोधात फसवणुकीची तक्रार होती. मी कधीही कोणत्या राज्याचे सरकार अथवा खासगी संस्थेकडून पैसे घेतले नाही. माझ्याविरोधात पाटणामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर काही विद्यार्थ्यांनी गुवाहाटीत तक्रार केली होती. मी शिक्षक आहे, तरीही फसवणुकीची तक्रार नोंदविण्यात आली. मला व माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे बिहार सरकारने माझ्यासाठी सुरक्षारक्षक दिले आहेत. न्यायालयाच्या निकालाने मी आनंदी आहे.कुमार हे २६ नोव्हेंबरला गुवाहाटी उच्च न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्याबद्दल कुमार यांनी न्यायालयाची माफी मागितली. कुमार यांच्याविरोधातील सर्व दावे खोटे असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले.
नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायलयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी काल गुरुवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले आहे.या प्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली दंडाधिकारी न्यायालयाकडे एक नोव्हेंबरला फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता. वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरु करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झालेले असतानाच त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरी समन्स पाठविले आहे.
सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती.

मुंबई - महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नावाची पाटी बदलण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव पाटीवर लिहिण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वीच ही सर्व तयारी करण्यात आली आहे. कार्यलयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली आहे. 
आजपासून महाविकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकासआघाडीचे उद्धव हे प्रमुख आहेत. राज्याच्या इतिहासात वेगळ्या विचारसरणीचे तीन राजकीय पक्ष एकत्र येत ही आघाडी स्थापन केली. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला.
शिवाजी पार्कवर झालेल्या या भव्य सोहळ्याला देशभरातले राजकीय नेते एकत्र आलेच होते पण त्याचवेळी उद्योगक्षेत्रातले मान्यवर आणि बॉलिवूड कलाकारही अवतरले होते. व्यासपीठावर देशाच्या राजकारणातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी झालेली पाहायला मिळत होती. उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना व्यासपीठावर अगदी पहिली मानाची जागा देण्यात आली होती. त्यांच्या शेजारी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. जोशींच्या शेजारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या शेजारी शरद पवार विराजमान होते.

मुंबई - महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर आणि गोआ फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गास कामत यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली. शिवसेनेने आता मिशन गोवा हाती घेतले आहे. गोव्यात भाजप सरकारसोबत असलेले आमदार आपल्या संपर्कात आहेत. विजय सरदेसाई आपल्या चार आमदारांसह आपल्या संपर्कात आहेत. सुदीन ढवळीकरांशीही आपली चर्चा झाली, असे राऊत यांनी म्हटले आहे. अनैतिक पायावर उभ्या असलेल्या गोवा सरकारमध्ये लवकरच भूकंप होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी उप-उपमुख्यमंत्री विजयी सरदेसाई यांच्यासह तीन आमदार शिवसेनेशी युती करणार आहेत. महाराष्ट्रात जसे घडले तसे एक नवीन राजकीय आघाडी गोव्यात आकार घेऊ लागली आहे. लवकरच गोव्यातही आपल्याला मोठा चमत्कार दिसून येईल, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला खऱ्या अर्थाने विराम मिळाला. त्यामुळेच या लढाईत शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या संजय राऊत यांनीही आपली तलवार म्यान केली. संजय राऊत यांनी गुरुवारी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहोळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. तसेच आपले हे नाते असेच राहू दे, अशी सदिच्छाही राऊत यांनी व्यक्त केली. 
शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. मात्र, शपथविधी सोहळ्यानंतर या दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच काढता पाय घेतला होता.संजय राव यांनी सतत शिवसेनेची बाजू मांडत रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला खडे बोल सुनावले होते.त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीकाही केली होती.

मुंबई - गुरुवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सहा कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीनंतर पहिली कॅबिनेटची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत हे सहा मंत्री उपस्थित होते.हे सर्वसामान्य जनतेचं सरकार असेल, 'महाराष्ट्र नंबर एकचे राज्य करू' अशी ग्वाही देत मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातील पहिला निर्णय म्हणजे, रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर करणे 'छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या संवर्धनासाठीचा पहिलाच प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आला. आत्तापर्यंत या कामासाठी २० कोटींचा खर्च झाला आहे. आणखीन २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे भाग्य मंत्रिमंडळाला मिळाले' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हंटले.'शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आत्तापर्यंत जाहीर केलेल्या आहेत, सुरु आहेत त्याचे वास्तव मांडण्याच्या सूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांना केलेल्या आहेत. नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करणार नाही. आढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती आणि समाधानकारक मदत करणार' असेही यावेळ उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई - गुरुवारी शिवतीर्थावर थाटात मुख्यमंत्री शपथविधी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच हल्लाबोल सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी अभिनंदनाचे ट्विट केल्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये थेट टीका केली आहे. 
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या” फडणवीस यांनी आधीच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. वर्षा निवासस्थानातून आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले. दिवसभर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या चित्रा वाघ , देवेंद्र फडणवीस यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांनी आज फडणवीसांची भेट घेतली होती.

मुंबई - मुंबई येथे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री शपथविधी संपन्न झाला.यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो लोक उपस्थित होते.उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.प्रथम उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. मग राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी तर नंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या शपथविधीने सांगता झाली.
यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी.जमलेल्या गर्दीतून राज ठाकरे आल्यानंतर सर्वांनीच जल्लोष केला.

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे आडनावबंधू अर्थात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आता विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत फारसे अनुकूल नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. परंतु खुद्द अशोक चव्हाण विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत अनुत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहावे लागणार आहे.शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद, तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत ठरल्याचे कळते.मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवार २८ नोव्हेंबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण शपथ घेणार, याची उत्सुकता आहे.

मुंबई - मउद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच अहाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे संख्य शिवसैनिकांसाठी शिवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे विविध मान्यवरांची, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती पाहायला मिळेल. खुद्द ठाकरे कुटुंबीयांनी या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने निमंत्रणासाठी पुढे सरसावत आप्तजनांना आवर्जून बोलावत असल्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्यांकडेही अनेकांचे लक्ष असेल. 
दरम्यान, गुरुवारी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रविकासआघाडीला ३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी सोनिया गांधींसह राहुल गांधी, अशोक गेहलोत, कमलनाथ, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के चंद्रशेखर राव आणि चंद्राबाबू यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. राज्यभरातून ४०० शेतकऱ्यांनाही शपथविधीसाठी खास बोलावण्यात आले आहे.शपथविधी सोहळ्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. ज्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क येथे होणारी गर्दी पाहता वाहतूक व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. . 
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. शपथविधीची माहिती देण्यासाठी ते राजभवानत दाखल झालेत. उद्या ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधीमंडळ राजकारणात उद्धव ठाकरेंचे पहिले पाऊल आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीचे नेता म्हणून निवडले गेले आहेत.एकिकडे आमदारांचा शपतविधी सोहळा विधिमंडळात सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे विधिमंडळात न येता ते थेट राजभवनात गेले. उद्या संध्याकाळी दादर शिवाजी पार्क अर्था शिवसेनेच्या शिवतीर्थावर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान, आमदारांच्या शपथविधीनंतर महाविकासआघाडीतील खातेवाटपाबद्दल चर्चा होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. त्यामुळे कोणाची मंत्रीपदी निवड होणार याचीही उत्सुकता आहे.

शिशिर आणि हेमंत ऋतूत शरीरातील अग्नी प्रदीप्त असल्यामुळे खूप पथ्ये नसतात. या ऋतूत काय खावे याचे काही साधे निकष सांगता येतील. जे खाऊ ते ‘बृहण’ करणारे, म्हणजेच पोषण करणारे हवे. या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत. अशा पदार्थाची काही उदाहरणे देत आहोत.
१) गाजर - गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असतो. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारी आम्लताही कमी करते. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबरोबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने वजन वाढायला मदत होते.
२) बार्ली / जव - बार्ली वा जवाला ‘धान्यराज’ किंवा संस्कृतमध्ये ‘यव’ असेही संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणात खातात. पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही. फार तर ‘बार्ली वॉटर’ किंवा ‘पफ बार्ली’ आपल्याला माहिती असते. जव हे बलकारी, गुरू व मधुर रसात्मक आहे. थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो, नाक वाहते अशांना आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता येईल. थंडीत शरीर व स्नायू आखडण्याचा त्रासही अनेकांना होतो. त्यावरही जव आहारात असण्याचा प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो. जवात ‘ब’ जीवनसत्त्व व आवश्यक अमिनो आम्ले भरपूर असून ते पौष्टिक आहे.
३) बोरे - :हिवाळ्यात बोरे मुबलक मिळतात. बोरे गुणांनी स्निग्ध, बृहण करणारी, पचायला जड (गुरू) व मधुर आहेत. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा त्रास होतो. तो टाळण्यासाठीही बोरे चांगली. बोरे अग्निदीपन करणारी असून ती पित्त व कफ कमी करणारी व सारकदेखील आहेत. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत.
४) लसूण - स्निग्ध गुणांचा, बृहण करणारा, उष्ण आणि मधुर गुणांचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. असा हा लसूण थंडीत विविध सूप्समध्ये वापरता येईल किंवा रोज एक लसूण पाकळी कच्चीच चावून खाल्ली तरी चालते. एक कप पाण्यात लसणीची एक पाकळी किंचित ठेचून घाला व पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवा. असा काढा गाळून दिवसात एकदाच कोमट असताना घेता येतो. अनेक स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर वारंवार मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो. अशा तक्रारींमध्ये जंतुघ्न असलेला लसूण आहारात ठेवल्यास फायदा होऊ शकतो.

मुंबई - राज्यातील सत्ता नाट्य चांगलेच रंगले होते. कोण कुठे जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील हे कोणीही सांगू शकत नव्हते.एकीकडे महाविकास आघाडी सत्ता स्थापनेच्या अगदी जवळच असताना अजित पवारांनी बॅड करून भाजपाला समर्थन केले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या ४ दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकासआघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचे नेते राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले. तर दुसरीकडे बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक येथे दाखल झाले. या बैठकीला अजित पवारांशिवाय छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु असून बैठकीला इतर नेतेही नुकतेच दाखल झाले आहेत.

मुंबई - महाविकास आघाडीकडून एकमताने मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या तारखेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा शपथविधी १ डिसेंबरला शिवतीर्थावर होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीख बदलण्यात आली आहे. आता त्यांचा शपथविधी २८ नोव्हेंबरला दुपारी पाच वाजता शिवतीर्थावरच पार पडेल. २७ तारखेला सकाळपासून विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात येईल. 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमताने मंजूर केला. यानंतर सभागृहात जल्लोष केला गेला.मुंबई - देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना अमेरिकेतुन आमदार आणावे लागतील असा टोला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहार जनशक्तीच्याही दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेना जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. अजित पवार हे आता राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे नेते राहीले नाहीत. त्यामुळे अजित पवार आणि व्हीप हा मुद्दाच होऊ शकत नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय  सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे. तसेच बहुमत चाचणीच्यावेळी व्हिडिओ चित्रिकरण करायचे आहे. ही चाचणी संध्याकाळी ५ वाजपर्यंतच्या आत संपविण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेणार. गुप्त पद्धतीने मतदान होणार नाही. त्यामुळे उद्या भाजप बहुमत सादर करू शकणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे गरजेचे असून,घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्याच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर आज त्यांनी बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई - राज्यात सत्ता संघर्ष अद्यापही कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र पळवल्याचा आरोप केला होता. मात्र, आता राष्ट्रवादीच्या आमदारांसह अन्य २ पक्षांच्या आमदारांच्या सह्या घेऊन महाविकासआघाडीचे नेते राजभवनात पोहोचले आहेत. त्यांनी हे पत्र राजभवनातील अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.राज्यात भाजपने बहुमत नसताना सत्ता स्थापन केल्याचा आरोप महाविकासआघाडीचे नेते करीत आहेत. भाजपने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले तर भाजप बहुमत सिद्ध करणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई - राज्यपाल आणि राष्ट्रपती हे निपक्ष असले पाहिजेत परंतु, महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचे आल्याने त्यांच्या बाजूनेच मत मांडतात यामुळे लोकशाहीचा गाला घोटाळा जात आहे.त्यामुळे,महाराष्ट्राच्या राज्यपालांची बदली करुन तत्काळ निष्पक्ष राज्यपालांची नेमणूक व्हावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे. यासाठी समितीकडून उच्च न्यायालयात निवेदन देण्यात येणार आहे.राष्ट्रपती व राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावेत. याकरीता दोन्ही सभागृहात दुरुस्ती विधेयक मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकशाहीचा व मतदारांच्या भावनांचा आदर करुन, घटनेच्या गाभ्याचा सन्मान करायचा असेल तर, या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाने आणि राष्ट्रपतींनी स्वत:हून याची दखल घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेसंदर्भात बैठका सुरू असतानाच शनिवारी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यपाल्यांच्या भूमिकेवरून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावर नियुक्ती केली जाणारी व्यक्ती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावी, ही या पदासाठीची अट असते. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय पेचात राज्यपाल कोश्यारी हे भाजपच्या पारड्यात जाणारे निर्णय घेत असल्याची टीका करण्यात येत आहे.

परभणी - अमडापूर येथील लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झला तर इतर ५ कमगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्यावेळी हे कामगार मशीनच्या सर्व्हिसिंगचे काम करत होते. टर्बाईनमध्ये ओव्हर ऑयलिंग करताना टर्बाईन मशीनचा स्फोट झाला. स्फोटातील जखमींवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युसूफ अली साहेब अली शेख (६५)असे मृत इसमाचे नाव आहे. तर जखमींमध्ये बाळआसाहेब गोविंदराव दंडवते(४५), सुभाष पेंडगे(५०), नरहरी शेजुळ(३५), ज्ञानेश्वर कन्हाळे (३०), आणि शेशराव वाघ (४०) यांचा समावेश आहे.
या स्फोटामुळे अमडापूर परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी घडली. अद्यापही स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्याचे पो.नि. पाडाळकर अधिक तपास करत आहेत. 

राज्यातील निवडणुकांवेळी सर्वच पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.यावेळी राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या स्तराला गेली होती कि, राज्यातील नागरिक मात्र त्रस्त झाला होता.एकीकडे ओल्या दुष्काळाने राज्यात धुमाकूळ घातला होता शेतकरी राजा बेजार झाला होता.परंतु,या कडे कोणत्याही नेत्याने त्यावेळी लक्ष घातले नाही मग माध्यमांवर बातम्या यायला लागल्यावर सगळेच नेते ओल्या दूषकळांचा दौरा करण्यास निघालेले पाहायला मिळाले.निवडणुकीच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' असे वक्तव्य केले होते.राज्यभरातून या वक्तव्याची खिल्ली उडवली जात होती.शिवसेनेनंतर अगदी मनावरचं घेतले होते कि काहीही झाले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल त्यामुळे अचानक राज्यात घडामोडी घडत गेल्या शिवसेना,राष्ट्रवादी,आणि काँग्रेस नेत्यांचे सूर मिळायला लागले.निवडणुकीत अक्षरशः खळायच्या पातळीवर एक दुसऱ्यांवर चिकलफेक केलेले नेते आता एकत्र आले होते.कारण त्यांना भाजपाला सत्ता स्थापनेपासून रोखायचे होते.त्यामुळे या तिन्ही पक्षात वाटाघाटी सुरु झाल्या मोठ्या प्रमाणात बैठक घेण्यात आल्या त्यात काँग्रेसने अधिकच खेचून धरले त्यामुळे शिवसेनेच्या सत्तास्थापनेला उशीर झाला आणि त्यातच त्यांचा भाजपने गेम केला असे म्हंटले तरी काय वावगे ठरणार नाही.कारण अचानक २३नोव्हेंबर सकाळी ८ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.खरेतर सत्ता शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसची येणार होती.परंतु एका रात्रीत भाजपने अजित पवारांचा विश्वास संपादन करून सत्ता काबीज केली आहे.निकाल लागल्यानंतर महिनाभर मुख्यमंत्री पदावरून राजकीय नाट्य चांगलेच रंगले होते.शिवसेनेने ३० वर्षाची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर भाजप पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते.कोणालाही असे वाटले नव्हते कि मी पुन्हा येईन म्हणजे खरोखरच येतील.खरेतर राज्यात चाललेल्या बारीक सारीक घडामोडींवर भाजपचे लक्ष होते.शिवसेना गाफील राहिल्यानेच त्यांचा गेम झाला आहे.यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना मात्र धक्काच बसला आहे.ज्या कारणांसाठी त्यांच्या ५४ आमदारांच्या साह्य घेतल्या होत्या त्याच त्याच राज्यपालांना अजित पवारांनी सादर केल्या आहेत.यामध्ये अजित पवारांनी शब्द पवारांचा गेम केला का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुलासाही केला आहे कशाप्रकारे अजित पवारांनी त्या आमदारांच्या संमती पत्र सादर करून राज्यपालांची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे.आता राजकीय नाट्य अजून रंगणार यात काहीच शंका माही कारण शिवसेनेला मुख्यमंत्रीपद.गमवावे लागले आहे.तर,राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याने सत्ता नाट्य पुन्हा रंगू शकते.राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांनी अजित पवारांकडे पाठ फिरवली कि,सरकार पडू शकते आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनू शकतो.मात्र फोडाफोडीचे राजकारण नाही झाले तरच पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होण्याची शक्यता आहे.भाजपने देशभरात फक्त फोडाफोडीचे राजकारण करूनच सत्ता काबीज केली आहे हे आजवरचा इतिहास सांगतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कट्टर विरोधी असलेले अजित पवार यांना चक्क उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपने काय साध्य केले आहे.फडणवीसांनी आपला शब्द राखण्यासाठीच अजित पवारांबरोबर तडजोड केली का? हा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर खात्यावरून देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन'चा तो व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे.त्यामुळे मी पुन्हा येईन हा शब्द फडणवीसांनी पूर्ण करून दाखवला आहे.मात्र त्यासाठी कट्टर विरोधी असलेले अजित पवार यांचा हात धरूनच मुख्यमंत्री झाले,असेच म्हणावे लागेल. 

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाची यंदाही बॉक्स ऑफिसवर छाप पाहायला मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणेच आयुष्मानने यंदाचे वर्षही गाजवले. त्याचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'ड्रीमगर्ल' हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यापाठोपाठ आता त्याचा 'बाला' चित्रपटाचीही १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे.मागच्या वर्षी आयुष्मान खुरानाचे 'अंधाधून' आणि 'बधाई हो' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती. 'अंधाधून' चित्रपटातील भूमिकेसाठी आयुष्मानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.यावर्षी त्याचे कॉमेडी मात्र, सामाजिक संदेश देणारे 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुरूवातीपासूनच आयुष्मान त्याच्या हटके स्क्रिप्टसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याचे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला.भूमी पेडणेकरने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे. 
सौदी अरेबियामध्ये देखील 'बाला' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अमर कौशिक यांचे दिग्दर्शन असलेल्या 'बाला' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केले होते.

मुंबई - #MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर संगीतकार-गायक अनु मलिकने ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वातून परीक्षकपदावरून स्वत:हून माघार घेतली आहे. गायिका सोना मोहपात्राने अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतरही रियालिटी शोचे परीक्षकपद अनु मलिकला दिल्याने सोशल मीडियावरून तिने वाहिनीवर जळजळीत टीका केली होती. आता अनु मलिकने स्वत:हून माघार घेतल्याने, ‘हा लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या महिलांचा विजय आहे’, अशी प्रतिक्रिया सोनाने दिली आहे.सोनी वाहिनीने अनु मलिकला परीक्षकपदावरून हटवण्यासाठी फार वेळ घेतला. पण अखेर त्यांनीच माघार घेतल्याने मला आनंद झाला. हा लढा संपूर्ण देशासाठी होता. राष्ट्रीय वाहिनीवर अशाप्रकारे त्यांनी झळकणे अनेक महिलांना मान्य नव्हते. यामुळे इतरांनाही चुकीचा संदेश मिळत होता. मी न्यायासाठी लढत होते. अनु मलिक यांनी वाईट वागणूक दिलेल्या प्रत्येक महिलेचा हा विजय आहे, असे सोना म्हणाली.२०१८ मध्ये गायिका सोना मोहपात्राने अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतर सोनी वाहिनीने त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून काढून टाकले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. या दोन गायिकांनीही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले.\ 
‘इंडियन आयडॉन’च्या अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून जेव्हा अनु मलिक परतला, तेव्हा सोनाने सोशल मीडियाद्वारे पुन्हा मोहिम सुरु केली. अनु मलिकविरोधी तिच्या मोहिमेला सोशल मीडियावर अनेक महिलांचा पाठिंबा मिळाला. अखेर गुरुवारी अनु मलिकने स्वत:तून माघार घेतली व शो सोडण्याचा निर्णय घेतला.परीक्षकपदावरून माघार घेतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अनु मलिक म्हणाला, “मी फक्त तीन आठवड्यांचा ब्रेक घेतला आहे. माझे निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर मी पुन्हा येईन.”

नवी मुंबई - प्रकल्पग्रस्तांच्या मृतदेहाचे सिडको मुख्यालयासमोर प्रतीकात्मक दहन केल्यानंतरही सिडको प्रशासनाला जाग येत नसल्याने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन उभारणार आहेत. त्यासाठी गावागावांत बैठका घेतल्या जात असून चौदा गावांतील प्रकल्पग्रस्त पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या १४ गावांपैकी चार गावांच्या काही समस्या अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळ्यात डुंगी, कोंबडभुजे, पारगाव, चिंचपाडा या गावांत पाच ते सहा फूट पाणी साचले होते. प्रकल्पग्रस्तांना घरगुती गणेशोत्सवाचे मुदतीपूर्वी विसर्जन करावे लागले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. १४ गावांपैकी दहा गावांची ६७१ हेक्टर जमीन विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जाणार असल्याने ही गावे दापोली, वडघर या गावांशेजारी स्थलांतरित केली जाणार आहेत. यात वरचा ओवळा, डुंगी, कोंबडभुजे, उलवा या गावांचा समावेश नव्हता. या गावांत पाणी साचल्याने आता त्या गावांनाही स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सिडको या गावांच्या स्थलांतराबद्दल निर्णय घेताना काही सार्वजनिक व वैयक्तिक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चार गावांतील प्रकल्पग्रस्तांनी आठ दिवसांपूर्वी बेलापूर येथील सिडको मुख्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे प्रतीकात्मक मृतदेहाचे दहन केले, मात्र त्यानंतरही सिडको प्रशासन चालढकलपणा करीत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलाविले जात नाही. त्यामुळे चार गावांतील प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी गावागावांत बैठका घेतल्या जात असून इतर दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळणार आहे. 
आठ दिवसांपूर्वी झालेल्या प्रतीकात्मक मृतदेह आंदोलनालाही आगरी कोळी समाजाच्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. पनवेल उरण तालुक्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांचा संभाव्य आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.

ठाणे - कलानी कुटुंबीयांना सत्तेचे कवच प्राप्त करून देणाऱ्या भाजपला शुक्रवारी महापौर निवडणुकीत ओमी कलानी यांनी शिवसेनेच्या मदतीने धूळ चारल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कलानी कुटुंबीयांना उमेदवारी नाकारली होती. हा राग मनात असलेल्या ओमी कलानी यांनी राज्यातील बदलती सत्ता समीकरणे लक्षात घेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संधान साधले. पक्षातील जुन्या जाणत्यांचा विरोध असतानाही कलानी कुटुंबीयांना आपलेसे करणाऱ्या भाजपला ओमी यांनी धक्का दिल्याचे मानले जात आहे. 
भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या दहा कलानी समर्थक नगरसेवकांनी ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशान यांना मतदान केले. त्यामुळे भाजप आणि साई पक्षाचे उमेदवार जीवन इदनानींचा पराभव झाला. पक्षादेश झुगारून या नगरसेवकांनी मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपचे नेते कोकण आयुक्तांकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, राज्यातील नव्या सत्तासमीकरणामुळे उदयास येणाऱ्या नव्या सत्तेचा लाभ नगरसेवकांना दिले जाईल, असा शब्द शिवसेना नेत्यांकडून ओमी कलानी यांना दिला गेल्याचे वृत्त आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शहापूर-भिवंडी महामार्गावरील शान्ग्रीला रिसॉर्ट येथे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ओमी कलानी यांच्यात झालेल्या बैठकीत भाजपला धक्का देण्याची रणनीती पक्की करण्यात आली होती.कलानी समर्थक नगरसेवकांना आपल्याकडे ओढत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाइं, पीआरपी, भारिप नगरसेवकांची मोट बांधली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भिवंडीतील एका हॉटेलमध्ये या सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यात आले होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी रात्री ४३ नगरसेवकांची मोट बांधल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. त्यामुळे महापौर पदाचा निकाल रात्रीच लागल्याची चर्चा होती. 
सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू होताच पराभव दिसू लागल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी गोंधळ घालत सर्व नगरसेवकांना जागी बसवण्याचे आदेश देण्याची मागणी पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांना केली. आम्ही या जागी सुरक्षित असल्याचे सांगत फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेच्या गोटात बसणे पसंत केले. तासभर सुरू झालेल्या या गोंधळानंतर अखेर मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्या वेळी शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पीआरपी अशा एकूण ४३ नगरसेवकांनी शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांच्या पारडय़ात मते टाकली, तर साई पक्षाच्या जीवन इदनानी यांना ३५ मते मिळाली. त्यासोबत रिपाइंचे भगवान भालेराव यांना ४४ मते मिळाल्याने त्यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

नवी मुंबई - नवी मुंबई पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनावेळेत पगार न मिळाल्याने मागील आठवडय़ात पालिका मुख्यालयासमोर आंदोलनानंतरही पगार न झाल्याने शुक्रवारी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह पालिका मुख्यालयात उद्यान विभागात ठिय्या मारला. यानंतर सायंकाळी यातील १५ कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदाराने अदा केले असून इतरांचे सोमवारी वेतन देण्याचा आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तर उद्यान विभागातील ६० कर्मचाऱ्यांचे दोन महिने पगार झालेले नाहीत. याविरोधात गुरुवारी (१४ नोव्हेंबर) रोजी पालिका मुख्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या मारला होता. पालिका अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला होता. घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील त्रुटी सुधारण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या आंदोलनानंतरही पगार न झाल्याने हे कर्मचारी कुटुंबीयांसह शुक्रवारी थेट उद्यान विभागाच्या दालनात शिरले. त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मारला. त्यानंतर सायंकाळी यातील १५ कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने पगार झाले, तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे सोमवारी पगार दिले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मागील आठवडय़ात महापालिकेचे तिन्ही दरवाजे बंद केले होते. यानंतर सोमवापर्यंत पगार होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कामगारांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे शुक्रवारी कुटुंबीयांसह आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई - केंद्र सरकारकडून ‘फेम १’ योजनेअंतर्गत ६० टक्के अनुदानातून नवी मुंबईला मिळालेल्या सर्व ३० विद्युत बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या असून १ डिसेंबरपासून त्या प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर धावतील, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली. केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत बसचा वापर वाढावा यासाठी महापालिकांना ६० टक्के अनुदानावर विद्युत बस देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने ‘फेम १’ या योजनेअंतर्गत ३० बसचा प्रस्ताव केंद्राला पाठविला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर या बस गेल्या काही महिन्यांपासून टप्प्या टप्याने नवी मुंबई दाखल झाल्या होत्या. यापूर्वी २० बस शहरात आल्या होत्या. प्रायोगिक तत्त्वावर परिवहन उपक्रमाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या विद्युत वातानुकूलित १५ बसची प्रवासी सेवा सुरू केली होती. साध्या बसचे तिकीट तात्पुरते आकारले जात होते. २१ नोव्हेंबर रोजी उर्वरित सर्व बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आल्या आहेत. प्रादेशिक परिवहनकडून तपासणी झाल्यानंतर १ डिसेंबरपासून या सर्व ३० विद्युत बस आता नवी मुंबईत प्रवासी वाहतूक करणार आहेत. या पर्यावरणपूरक विद्युत बसमुळे प्रदूषणालाही आळा बसणार असून इंधन बचतीलाही हातभार लागणार आहे.प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या बस सेवेला गेल्या काही दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे प्रवासी संख्याही वाढत आहे. आता या सर्व बस सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत अधिक वाढ होईल, असे ‘एनएमएमटी’ प्रशासनाने सांगितले. ३० बस रस्त्यावर धावण्यासाठी चार्जिग स्टेशनही वाढवण्यात येणार असून घणसोली, वाशी रेल्वे स्टेशन व सीबीडी बस स्थानकात चार्जिग केंद्रांचे काम सुरू आहे.

मुंबई - राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना आज सकाळी मोठा भूकंप घडला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत ८ ते १० आमदार होते. मात्र, त्यातील काही आमदारांनी अजित पवारांची पोलखोल केली. आम्हाला अजित पवारांचा फोन आला. त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यांनी केवळ बैठक आहे. त्यामुळे तुम्ही या त्यानंतर आम्ही गेलो. मात्र, तेथील जी काही परिस्थिती दिसून आल्यानंतर आम्हालाही धक्का बसला. भाजपचे नेते मंडळी होती. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस तेथे आल्याने आमच्या लक्षात काय ते आले. त्यानंतर आम्ही पक्षनेतृत्वाला सांगितले.आम्हाला यातील काहीही सांगितले नाही, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. 
अजित पवार यांची पोलखोल राजेंद्र शिंगणे यांनी केली. रात्री १२ वाजता फोन आला. सकाळी ७.०० वाजता धनंजय मुंडेंच्या घरी बोलावले गेले. तिथे ८-१० आमदार होते. एका बैठकीसाठी जायचे आहे असे सांगितले गेले आम्हाला. राजभवनावर जाईपर्यंत पुसटशी कल्पनाही नव्हती.अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनावर शपथविधी झाला, अशी माहिती राजेंद्र शिंगणे, संदीप क्षिरसागर, सुनील भुसारे यांनी दिली. आपण शरद पवारांसोबत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संदीप शिरसागर, सुनील भुसारे यांच्यासह पाच आमदार हे शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिंगणे आणि भुसारे यांनी आम्हाला फसवणूक करुन नेल्याचे म्हटले आहे. आम्ही पक्षासोबत आहोत, असे त्यांनी जाहीर सांगितले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असताना भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला. अजित पवारांनी भाजपसोबत जात सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे.. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. मात्र, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अजित पवार यांनी दिलेले पत्र हे पाठिंब्याच्या सह्यांचे नव्हते. त्यांनी राज्यपाल यांचीही फसवणूक केली आहे. 
राज्यात जनमत जे आहे. ते भाजपच्या विरोधात आहे, असे असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध आहे, जर पुन्हा निवडणूक झाली तर त्यांचा पराभव हा निश्चित केला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई - शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. अहमद पटेल यांनी यावेळी भाजपवर टीका केली. विधीवत जे झाले पाहिजे होते ते नाही झाले. एका नेत्याने एक यादी देऊन शपथविधी झाला.यावेळी संविधानाची अवहेलना करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने बोलणी सुरु होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु होती. उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना फोन केल्यानंतर आम्ही लगेचच महाराष्ट्रात आलो. चर्चा झाली. आज आमची पुन्हा बैठक होणार होती. पण सकाळी जे झाले त्यांचा आम्ही निषेध करतो.
आमच्याकडून कोणताही उशीर नाही झाला. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फोन आल्यानंतर लगेचच आम्ही येथे आलो. राष्ट्रवादीचा एक नेता बाहेर पडल्यामुळे हे सगळे झाले आम्ही एकत्र आहोत. विश्वासदर्शक ठरावात आम्ही त्यांना पराभूत करु. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आमची पत्रकार परिषद ठरली होती. आधी बैठक असल्यामुळे आम्ही शिवसेना-राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत येऊ शकलो नाही. आमचे सगळे आमदार सोबत आहेत. आमचेच सरकार बनेल असेही अहमद पटेल यांनी सांगितले.
तिन्ही पक्ष मिळून विश्वासदर्शक ठरावात याला विरोध करु. आमचे आमदार फुटणार नाहीत. पण तरी आम्ही काळजी घेऊ. शिवसेनेसोबत कोणत्याच मुद्द्यावर मतभेद नाहीत.उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. शरद पवारांनी आधीच याबाबत घोषणा केली आहे. असे देखील काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी स्पष्ट केले आहे.मुंबई - महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत मंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे महाविकासआघाडीची सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु असताना हा शपथविधी झाला. या सगळ्या घटनेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. शरद पवार यांच्यासोबत सकाळी अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर असलेले काही आमदार देखील उपस्थित होते. आम्हाला काही सांगण्यात आले नसल्याचे या आमदारांनी यावेळी म्हटले आहे.
'महाविकासआघाडीकडे १५६ आणि काही अपक्षांचा पाठिंबा आहे. सकाळी राजभवनावर राष्ट्रवादीचे काही जण गेल्याचे कळाले. राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात अजित पवार गेले. पक्षाचे सदस्य १० ते ११ सदस्य सहभागी झाले होते. त्यापैकी ६-७ आमदार अजित पवारांसोबत आहेत. हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही जणांनी संपर्क साधायला सुरुवात केली. जे सदस्य पक्ष विरोधी गेले आहेत. त्यांचा पुन्हा पराभव करु. त्यांच्या विरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचा संयुक्त उमेदवार देऊ असे शरद पवारांनी म्हंटले आहे.अजित पवार यांनी विधीमंडळाचा अध्यक्ष म्हणून आमदारांची सह्या असलेली यादी नेली. या यादीमुळेच राज्यपालांना आपल्याला ५४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे भासवले असेल. पण आम्ही सगळे एकत्र आहोत. एकत्र राहणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या देशामध्ये लोकशाहीचा खेळ सुरु आहे. नवा हिंदुत्व आणि जनादेशाची काळजी करणारे नवे लोकं आले आहेत. जनादेशाचा अपमान केला असा आरोप आमच्यावर केला जात आहे. पण आम्ही करतो ते दिवसाढवळ्या करतो. रात्री नाही करत. बिहार, हरियाणामध्ये झाले ते महाराष्ट्रात का चालत नाही. केंद्रीय मंत्रीमंडळाची पहाटे बैठक झाली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी जशी ही बैठक होती. पण आम्ही एकत्र आहोत. मी पणा विरोधात ही लढाई सुरु आहे. राजकारण म्हणजे रात्रीस खेळ चाले असे झाले आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई - अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे भावूक झाल्या आहेत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया व्हॉट्सऍप स्टेटवरून कळत आहे. अजित पवारांनी शरद पवारांसोबत केलेला अविश्वासघात हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांबरोबरच सुप्रिया सुळेंच्या देखील जिव्हारी लागला आहे.सुप्रिया सुळेंना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भावूक होऊन योग्य वेळी ऑफिशिअल स्टेटमेंट देऊ असे म्हटले आहे. मात्र त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू सर्व भावना व्यक्त करत होते. अजित पवारांच्या या निर्णयाने फक्त राष्ट्रवादी पक्षच नाही तर पवार कुटुंबात देखील फूट पडली आहे.
तसेच सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या स्टेटसमध्ये म्हटलंय की,'ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला. ती व्यक्ती अशी फसवेल असे कधीच वाटले नव्हते. ज्या व्यक्तीला इतके प्रेम दिले त्यांनी त्याबद्दल बघा काय दिले.' असे स्टेटस ठेवले आहे. सुप्रिया सुळेंचं भावूक होणं आणि या स्टेटसवरून अजित पवारांचं हे वागणं जिव्हारी लागल्याचं स्पष्ट होत आहे.मुंबई -  शरद पवार आजच्या राजकीय घडामोडींवर दुपारी १२.३० वाजता भूमिका मांडणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. चव्हाण सेंट्रलला दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय भूकंप आला. अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा होता का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण शरद पवारांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली. 
अजित पवार शुक्रवारी रात्री ९ पर्यंत महाआघाडीच्या बैठकीत उपस्थित होते, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. तर अजित पवारांनी हा निर्णय कधी घेतला? अजित पवारांनी शरद पवारांना विश्वासात का घेतले नाही? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहे. यावर शरद पवार पहिल्यांदा आपली भूमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एका रात्रीत असे काय घडले हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. याचे उत्तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या पत्रकार परिषदेत देतील का? संपूर्ण महाराष्ट्राचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपासोबत गेली का ? अशी चर्चा सुरु झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले. 
राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांचा या सर्वाला पाठींबा नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे शरद पवार हे सर्व आमदारांना फोन करत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. कोणते आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत याची चाचपणी केली जात आहे. अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांना धक्का मानला जात आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक हालचाली घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज सकाळी म८ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर हा शपथविधी सोहळा पार पडला.राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपासोबत गेली का ? अशी चर्चा सुरु झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - आधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. परंतु गेले अनेक दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे ‘चाणक्य’ मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता समोर येत आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे कळते आहे.आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे कट्टर शिवसैनिक आणि खासदार अरविंद सावंत, ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे, राज्यसभा खासदार अनिल देसाई, विधानपरिषदेचे आमदार सुभाष देसाई यांचीही नावे चर्चेत आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे संजय राऊतांचे नाव आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच संजय राऊत नाव पुढे केल्याचे म्हंटले जात आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा झाली, संजय राऊत यांनी भाजपला शिंगावर घेत शिवसेनेची खिंड ताकदीने लढवली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पारड्यात झुकते माप असल्याचं मानले जात आहे.
संजय राऊत यांनी कायमच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना सत्ता स्थापन करेल, अशी भूमिका घेतली आहे. परंतु ‘शिवसैनिक’ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसेल, असे अनेक वेळा त्यांच्याच बोलण्यातून येणारे शब्द संजय राऊतांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा जाण्याचे संकेत मानले जातात.महासेनाआघाडी शनिवार २३ नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.
.

मुंबई - राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच राज्याचे नेतृत्व करावे अशी जनतेची, आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा असून त्याला तिन्ही पक्षांची सहमती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली आहे. शिवसेनेला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच मुख्यमंत्रिपद काय इंद्राचे आसन दिले तरी नको असे रोख ठोक सांगितले.
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याने आता मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत उद्धव ठाकरे बसणार का याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.मुंबईत आज तीनही पक्षांच्या आमदारांच्या बैठकांचा धडाका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सकाळी शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्तास्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे.

मुंबई - राज्याच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून,आजच.महाविकासआघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा मुहूर्त साधत शपथविधी होऊ शकतो. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. काल उशीरा रात्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. 
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला काँग्रेसकडून के.सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीतील काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त बैठक सकारात्मक झालेली असली तरी मॅराथॉन बैठका सुरूच आहेत. आज पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन्ही पक्षांची एकत्र बैठक होणार आहे. त्यानंतर दिल्लीतल्या बैठकांचे सत्र संपणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. उद्या पुन्हा मुंबईत आघाडी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर सत्ता स्थापनेची घोषणा केली जाणार आहे.दरम्यान, 'महाशिवआघाडी'त सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.शिवसेना मुख्यमंत्रिपदासह १६, राष्ट्रवादी १५ तर काँग्रेसला १२ मंत्रिपद असा फॉर्मुला होऊ शकतो.
महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्षांची आघाडी सरकार बनवणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत महाशिवआघाडी सरकार स्थापनेबाबत तब्बल साडे चार तास सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्या शुक्रवारी पुन्हा आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. सरकार स्थापन करताना आणि सरकार चालवताना तिन्ही पक्षांचा समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाईल. बुलेट ट्रेनला विरोध केला जाईल, आणि तो पैसा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला जाईल. शिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यावर प्राधान्य देण्याचे या बैठकीत ठरले असून या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते.

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात युती करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. सीडब्ल्यूसीने शिवसेनेशी युती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यकारिणी बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही राष्ट्रवादीशी झालेल्या आमच्या चर्चेबाबत आम्ही सीडब्ल्यूसीला कळविले आहे.काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील ताज्या राजकीय परिस्थितीबद्दल सीडब्ल्यूसी सदस्यांना माहिती दिली आहे. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरूच आहे. उद्या मुंबईत निर्णय घेण्यात येईल.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांची शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत एक बैठक होणार आहे, तेथे युतीची घोषणा केली जाऊ शकते. बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात पाच तास बैठक झाली. ही बैठक मध्यरात्री संपली. त्यानंतर शिवसेनेबरोबर फोनवर किमान समान कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. त्यावर सहमती झाली आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवार मोदींना भेटणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले होते.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये हतबल शेतकरी केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा असे अग्रलेखातून सान्गण्याचा प्रयत्न केला आहे.शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांचीही भेट घेऊ शकतात, कारण पंतप्रधान हे देशाचे असतात. असेही वक्तव्य संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला, मंत्रीमंडळातील खातेवाटप, महामंडळाचे वाटप, किमान समान कार्यक्रम, विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांचे वाटप कसे असावे याबाबत तयारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत शिसेनेशी चर्चा केली जाईल. शिवसेनेबरोबर अंतिम चर्चा करण्याआधी दोन्ही पक्षात एकवाक्यता नर्माण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे कळते आहे.
मुंबई - आठवड्याभरात सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यपालांकडे बहुमताचा आकडा घेऊन गेल्यावर राज्यपाल सरकार स्थापनेचे निमंत्रण देतील आणि डिसेंबरपूर्वी मजबूत सरकार बनेल असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पवार साहेब भेटणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. आजची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शेवटची बैठक असेल. त्यानंतर बैठका होणार नसल्याचे ते म्हणाले. 
शिवसेना एनडीएतून बाहेर असून त्यांना विरोधी बाकांवर जागा दिल्याचे एनडीएनकडून स्पष्ट करण्यात आले.संजय राऊत अद्यापही राज्यसभेत आपल्या खुर्चीवर बसले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खुर्ची बदलल्यामुळे संजय राऊत राज्यसभेत गेले नाहीत आणि राज्यसभेत जाणारही नाहीत अशी माहिती समोर येत आहे. 

चेन्नई - देशात सर्वत्रच राजकीय समीकरण बदलत चालली आहेत.मक्कल नीधी मय्यम (एमएनएम) या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिनेते कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची पाठराखण केली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबाबत रजनीकांत यांनी केलेले वक्तव्य ही टीका नसून सत्यपरिस्थिती आहे, असे वक्तव्य कमल हसन यांनी केले. तामिळनाडूच्या हितासाठी आपण रजनीकांतसोबत आहोत. मात्र, हे राजकीयदृष्ट्या एकत्र येणे आहे की नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही.तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल असे पलानिस्वामींना स्वप्नातदेखील वाटले नसेल, त्यांची झालेली प्रगती हे एक आश्चर्य आहे; असे रजनीकांत यांनी म्हटले होते. यावर अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. याबाबत कमल हसन यांना त्यांचे मत विचारले असता, ही सत्यपरिस्थिती आहे, असे म्हणत त्यांनी रजनीकांतची पाठराखण केली.रजनीकांत यांनी आधीच आपण राजकीय पक्ष स्थापन करणार असून, पुढील विधानसभा निवडणूका लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर, कमल हसन यांचा एमएनएम हा राजकीय पक्ष आधीच स्थापन झाला आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या हितासाठी हे दोघे एकत्र येणार म्हणजे, राजकीय युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.आम्ही एकत्र येणे ही काही नवी बाब नाही, आम्ही गेली ४४ वर्षे एकत्रच आहोत, असे कमल हसन यांनी सांगितले.

मुंबई - महाराष्ट्रामध्ये सत्ता पेच सुटला नसून, सत्तास्थापनेसाठी महाशिवआघाडीच्या बैठकांवर सुरु आहेत. किमान एकसुत्री कार्यक्रमावर तीनही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. सत्तास्थापने संदर्भात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अल्टीमेटम दिल्याचे कळते आहे. या पार्श्वभुमीवर छोट्या सहयोगी पक्षांशी चर्चा करुन शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत समाजवादी पार्टीने हिरवा कंदील दाखवला आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन आमदार असलेल्या समाजवादी पार्टीच्या अबू आझमी शिवसेनेसोबत जाण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. पण यासाठी काही अटी असतील असेही ते म्हणत आहेत. शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा दूर ठेवून किमान एकसूत्री कार्यक्रमावर बोलण्यास तयार असेल तर आम्हाला राज्यात शिवसेनेसोबत एनसीपी आणि काँग्रेस सरकारमध्ये जाण्यास हरकत नसेल असे अबू आझमी म्हणाले. पण यासंदर्भातील शेवटचा निर्णय हा अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतरच होईल असेही ते म्हणाले.शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार चालावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पूर्ण पाच वर्षे सरकार चालावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापसातही काही गोष्टींवर चर्चा करत आहेत. त्यामुळे वेळ लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना आल्याने त्यांनी सत्ता स्थापनेचा निर्णय जलदगतीन घ्या अशी मागणी केली आहे.
मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आले. त्यामुळे गरजू लोकांना मदतीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. लोकांना ही सुविधा मिळावी म्हणून सर्वच पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. राज्यपालांच्या आदेशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षावर तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, काम अद्यापही ठप्प आहे.नागरिक मदतीची मागणी करत आहेत,परंतु मदत मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गरजू लोकांना आजही मदतीशिवाय परतावे लागत आहे. गुरुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या दरवाजावर आणि बाजूला असलेले नियम आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे बोर्ड लावले होते. पण सोमवारी ते देखील काढण्यात आले आहेत. ज्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून राज्यातील हजारो रुग्णांना आजवर मोठी मदत झाली. त्या कक्षाचे हे दार राज्यपालांच्या आदेशानंतरही बंद आहे.
राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे मुख्य उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिकांना 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली याचे व्यवस्थापन करण्यात आले होते. या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण मुख्यमंत्री पाहत होते.
nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget