March 2020

बारामती - पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कोरोना संकटाच्यानिमित्ताने लोकांना अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. उद्या १ एप्रिल आहे. त्यानिमित्ताने 'एप्रिल फूल' कोणाला करु नका, भीतीचे वातावरण तयार करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल. एक एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमाव बंदी उठली आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे. 'एप्रिल फूल' केल्यामुळे प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास वायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे. तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यानी काढले आहे.देश आणि राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. लोकांना कोणीही घाबरविण्याचा किंवा त्यांची फसवणूक करु नका. विनाकारण प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे १ एप्रिलला 'एप्रिल फूल' न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

मुंबई - ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवून अजित पवारांनी ही मागणी केली आहे. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची १६ हजार ६५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही थकबाकी मिळावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर यांनी अधिक लक्ष घालावे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातून कोरोना ग्रामीण भागाच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यशासनाला ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी राज्याकडून आता होऊ लागली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचे ९० रुग्ण आहेत, तर पुण्यात ४२, सांगलीमध्ये २५, ठाणे जिल्ह्यात २३, नागपूरमध्ये १६, यवतमाळ ४, अहमदनगर ५, सातारा २, कोल्हापूर २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, बुलडाण्यामध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. दर भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७१ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९२ नवे रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

सांगली - गोमूत्र आणि गायीचे तूप हे अति तीव्र जंतुनाशक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोना बाधित रुणांच्या वर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. त्याच्या पिण्यात सुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे खळबळजनक वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. 
दरम्यान, इस्लामपूरतील त्या कोरोना बधितांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले, अशी मागनी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा, तसेच चीन हा देशच कोरोना आहे, त्याच्यावर पाच वर्षे बहिष्कार घालण्याची मागणी ही भिडेंनी केली.
सांगलीत जिल्ह्यात १२ संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणाला मोठा धक्का बसला. सांगलीतील इस्लामपुरात हे १२ नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली. महत्त्वाचे म्हणजे इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या चार कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच कुटुंबातील २३ जणांना बाधा झाल्याने राज्य शासनाने खबरदारी घेत इस्मलापूर लॉकडाऊन केले.


हैदराबाद - दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या ६ भाविकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यात तेलंगणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश आहे. १३ मार्च ते १५ मार्च दरम्यान हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेलंगणा सरकारने सोमवारी ही माहिती दिली.दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील ६ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगणा मधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता.मृतांपैकी दोघांचा येथील गांधी रुग्णालयात तर, दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोघांपैकी एकाचा निजामाबाद तर, दुसऱ्याचा गढवाल येथे मृत्यू झाला, असे सरकारकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे.निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले. यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या काळात दिल्लीमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी लागू होती. यामुळे एका वेळी इतक्या लोकांना एका ठिकाणी एकत्र आणणे, हे सरकारी आदेशाचेही उल्लंघन होते. सध्या या कार्यक्रमातील १७५ लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता, जवाहरलाल नेहरू स्टेडियमला 'क्वारन्टाईन सेंटर' बनवले जाणार आहे. नैऋत्य दिल्लीच्या जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या 'मरकज' कार्यक्रमानंतर अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना येथे ठेवले जाण्याची शक्यता आहे.नैऋत्य दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे येथील जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी स्पोर्टस अ‌‌‌‌ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 'कोरोना विलगीकरण केंद्र' बनवले जावे, यासाठी स्टेडियम तत्काळ प्रभावाने हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्सचे कोरोना रुग्णांसाठी 'क्वारन्टाईन सेंटर' बनवले जाणार आहे. दिल्लीत निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक कार्यक्रम झाला होता. या वेळी, शेकडो लोक उपस्थित होते. यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या बाधित लोकांना येथे बनवलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे. यातील अनेक लोकांना याआधीच दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता काही लोकांना जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्येही ठेवले जाऊ शकते.
नवी दिल्ली - कोरोना वायरसच्या विळख्यातून देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. माणसांच्या संपर्कात आल्यामुळेच हा विषाणू पसरु शकतो हे सिद्ध झाले आहे. जगातल्या सर्वच तुरुंगात कैद्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी कोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तुरुंगातून शनिवारी ४१९ कैद्यांना सोडण्यात आले. दिल्ली तुरुंगाचे महानिरिक्षक आणि प्रवक्ता राज कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. सोडण्यात येत असलेल्या ४१९ कैद्यांपैकी ३५६ कैदी हे अंतरिम जामिनातील वर्गात मोडतात. ६३ कैद्यांना आपत्कालिन पॅरॉलवर सोडण्यात आले आहे.अंतरिम जामिनावर कैद्याला ४५ दिवसांसाठी सोडण्यात येते. तर आकस्मिक पॅरॉलवर कैदी ८ आठवडे बाहेर राहु शकतो. तुरुंगात असलेल्या कैद्यांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.दिल्लीमध्ये तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांची क्षमता १० हजार इतकी आहे. पण इथे १७ हजार ५०० कैदी आहेत. सोशल डिस्टंसिंग राहावे यासाठी साधारण तीन हजार कैद्यांना सोडण्याचा विचार सुरु आहे.

जोधपूर - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. रविवारी सकाळी इराणमधील तब्बल २७५ भारतीय मायदेशी परतले आहेत.इराणच्या तेहरानमधून या नागरिकांना घेऊन निघालेले विमान रविवारी पहाटे जोधपूर विमानतळावर उतरले आहे. यामध्ये महिला, मुले, युवक आणि वृद्धांचा समावेश आहे. या सर्वांची भारतामध्ये उतरल्यानंतर विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. त्यांना जोधपूरमधील लष्करी तळावर नेण्यात आले. त्यांना याठिकाणी विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.इराणच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एकूण सहा हजारांहून अधिक भारतीय अडकले होते. त्या सर्वांना टप्प्या-टप्प्याने इराणमधून एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यापूर्वी एअरलिफ्ट करण्यात आलेल्यांना राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर येथील लष्करी तळावर तपासणी करण्यात आली आहे. गेल्या २५ मार्चला २७७ भारतीयांना ईराणमधून आणले होते. त्यांची विलगीकरण केंद्रात पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. लष्कराने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सर्व प्रकारचे उपचार आणि मदत केली जात असून करोनापासून बचाव करण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यायची, याची माहितीही देण्यात येत आहे. 

...

चेन्नई – आपल्याला कोरोना झाला आहे या संशयातून आंध्र प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राज्याच्या गुंतुर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने स्वतःला गळफास लावून घेत आपले जीवन संपवले.अक्काला व्यंकटय्या (५५) असे या व्यक्तीचे नाव आहे. गुंतुरमधील कोटापल्ली गावाचा तो रहिवासी होता. तो हैदराबादवरून आपल्या गावी परत आला होता. आपल्यामुळे आपल्या संपूर्ण गावाला कोरोनाचा संसर्ग होईल, अशी भीती त्याच्या मनात होती. या विचारातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही स्वयंसेवकांनी हैदराबादवरुन गावात आलेल्या व्यक्तींची नावे लिहून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास व्यंकटय्याने आपल्या मुलाला फोन करून आपल्याला कोरोना झाला असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, आपल्यामुळे संपूर्ण गावाला याची लागण होण्याची भीतीही त्याने व्यक्त केली.मुलाला म्हटला, माझा मृतदेह लांबूनच बघ.आपल्यामुले आपल्या मुलालाही कोरोना होईल, या भीतीने व्यंकटय्याने तसे सांगितले होते.यानंतर त्याचा मुलगा तातडीने त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

बेंगळुरू - राज्य सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या इंदिरा कँटिनच्या मार्फत कर्नाटकातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मोफत अन्नपाकिटे वितरित करण्यात येतील, असे शनिवारी जाहीर करण्यात आले. शुक्रवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.इंदिरा कँटीन ही रोज सकाळी साडेसात ते साडेदहा, दुपारी साडेबारा ते तीन आणि संध्याकाळी साडेसात ते रात्री नऊ या कालावधीत कार्यरत असतील. रस्त्यावरील विक्रेते, भिक्षेकरी, मजूर, कामगार आणि गरीब नागरिकांना या कँटीनमार्फत जेवणाची पॅकेट्स वितरित करण्यात येणार आहेत. इंदिरा कँटिनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि दहा रुपयांत जेवण देण्यात येते. मात्र, करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत गरीबांना मोफत जेवण आणि खाद्यपदार्थ वितरित करण्यात येणार आहेत.

वाशिम - जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी याबद्दलची माहिती दिली.जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत, त्यांना तिथेच राहण्याची सूचना नातेवाईकांनी करावी. बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था तिथल्या जिल्हा प्रशासनामार्फत करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेले लोक जिल्ह्यात आल्यास येथील नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत, त्यांना तिथेच जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविले जाईल. मात्र यापुढे जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, बाहेरील जिल्ह्यातील मजुरांना, नागरिकांना जिल्हा प्रशासन जीवनावश्यक वस्तू पुरविणार आहे. त्यामुळे, आपल्या जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत अथवा इतर राज्यातील, जिल्ह्यात मजूर आपल्या जिल्ह्यात असतील तर अशा लोकांची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार (भ्रमणध्वनी क्र. ७७४४९८४२६५) यांना कळवावीत, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले

कोल्हापूर - कोरोनाचा फटका देशात संघटीत, असंघटीत अशा सर्वच क्षेत्राला बसला आहे. काहीजणांकडे घरुन काम करण्याचा पर्याय असला तरी हातावर पोट असलेले अनेकजण शहरांतून स्थलांतराच्या प्रयत्नांत आहेत. रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे दुग्ध व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे.संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर बंदी आली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीला सुट दिली आहे. तरीही दुकाने बंद असल्याने या मालाची नेआण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाची भीती आणि पोलिसांच्या धाकाला घाबरुन अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. मालाची नेआण करण्यास माणसे नसल्याची परिस्थिती अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर दुधाची मागणी घटल्याचे समोर आले आहे. तसेच दुधाच्या उपपदार्थांची ही मागणी देखील कमी झाली आहे. गोकुळची विक्री फक्त ७ लाखांवर आली आहे. यामुळे दूध संघासमोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. म्हणून रोज पाच लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय गोकूळ व्यवस्थापनाने घेतला आहे.

नाशिक - शहर पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर मजा लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर थेट वाहनजप्तीचीच कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १३९ वाहने जप्त केली आहेत.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कर्फ्यू नियमांमधून सवलत मिळवून मजा लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांना नाशिक पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. रक्तपेढीच्या नावाखाली मोकळ्या रस्त्यावर पर्यटन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी कायद्याचा प्रसाद दिला. नाशिक शहरातील पोलिसांनी हे कडक धोरण आखले आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर दिसल्यास नाशिककरांना पुढील तीन महिने वाहनाला मुकावे लागणार आहे.

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून कोकण रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकणातून रेल्वेच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा भारताच्या विविध ठिकाणी पोहचवण्यात येणार आहे. फळांचा राजा अर्थात हापूस आंबासुद्धा रेल्वेच्या माध्यमातून नेण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखवली आहे.औषधे, मेडिकल इक्विपमेंटसह, फळे आणि भाजीपाला अशा अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी रेल्वेच्या माध्यमातून विविध ठिकाणी पोहचवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या या सुविधांसाठी सीनिअर कमर्शियल मॅनेजर यांनी ९००४४७०३९४ या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गरीब, कष्टकरी व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर शिवभोजन थाळीचे दर पाच रुपये करण्यात आले आहे. हे दर जून महिन्यापर्यंत असतील, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी केली आहे. यामुळे प्रत्येकजण आहे त्या ठिकाणी अडकून बसला आहे. यामुळे राज्यातील गरीब जनता, विद्यार्थी, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे ते कसल्याही परिस्थितीत आपला गाव गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपटीने वाढ करण्यात आली असल्याने मंत्री भुजबळ यांनी सांगितले. शहरी भागातील शिवभोजन केंद्रासाठी प्रति थाळी ४५ रुपये व ग्रामीण भागातील केंद्रासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी १६० कोटींची तरतूद शासनाने केली आहे. 


इटली - जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजारहून अधिक झाली आहे. इटलीबरोबरच स्पेन, फ्रान्स, ब्रिटन या युरोपीयन देशांमध्येही करोनाचा कहर दिसून येत आहे. इटलीमध्ये अजून करोनाच्या साथीची परमोच्च अवस्था अजून काही दिवस दूर आहे. त्यामुळेच १० हजारहून अधिक मृत्यू झालेल्या इटलीबरोबरच जगातील करोना बळींची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 
युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.अमेरिकेखालोखाल सर्वाधिक संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या शनिवारी ९२ हजार ४७२ इतकी होती. तर मरण पावलेल्यांची संख्या शनिवारी १० हजार २३ इतकी होती.

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी भारतीय-अमेरिकन वंशाचे 'गुगल' आणि 'अल्फाबेट' या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्स ( जवळपास ५९०० कोटी रुपये) एवढी आर्थिक मदत केली आहे. जगभरातील लघु व मध्यम व्यवसाय, आरोग्य संस्था आणि सरकारी संस्था आणि आरोग्य कर्मचारी यांना ही मदत देण्यात आली आहे. पिचाई यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.गेल्या वर्षभरापासून सक्रिय खाते असलेल्या जगभरातील लघु व मध्यम व्यवसायांना गुगल अ‍ॅड क्रेडिटच्या रूपात ३४० दशलक्ष डॉलर्स मिळतील. जागतिक आरोग्य संघटना १०० हून अधिक सरकारी संस्थांना २५० दशलक्ष डॉलर्स देण्यात येतील. स्वयंसेवी संस्था आणि बँकासाठी २०० दशलक्ष डॉलर्स देण्यात येतील. जेणेकरून लघु उद्योगांसाठी आर्थीक व्यवस्थापन करता येईल, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार जगातील १८० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसार झाला आहे. युरोपीत इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. जगभरातील इतरही खंडामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. आत्तापर्यंत सुमारे सहा लाख नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर २७ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी टाटा ट्रस्टने १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा, तपासणी किट, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही मदत खर्च करण्यात येणार आहे.मदत जाहीर केल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा म्हणाले, कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी तत्काळ संसाधने उभी करण्याची गरज आहे. जगातील आणि भारतातील परिस्थिती गंभीर असून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. टाटा उद्योग समुहातील कंपन्यांनी याआधाही देशाला गरज असताना मदत केली आहे. आधीच्या कोणत्याही संकटापेक्षा यावेळी मदतीची जास्त गरज आहे.कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी खासगी क्षेत्रातील अनेक कंपण्या समोर येत आहेत. रिलायन्स समुहाने रुग्णालया कोरोना रुग्णांना देण्याची तयारी दर्शवली आहे. तर वेदांता, महिंद्रा उद्योग समुहानेही मदत जाहीर केली आहे.

मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना, प्रशासनातील महत्त्वाच्या बदल्या करण्यावरही स्थगिती आली आहे. मार्च महिन्याअखेर राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांची मुदतवाढ संपणार होती, मात्र त्यांना आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मेहता हे सरकारच्या सेवेत जूनपर्यंत कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या मुदतवाढीमुळे इतर महत्त्वाच्या बदल्याही आता आपोआपच पुढे ढकलल्या जाणार आहेत. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्च रोजी केंद्र सरकारला पत्र लिहून अजय मेहता यांना तीन महिने मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने ही विनंती मान्य केली असून यासंदर्भातील पत्र सामान्य प्रशासन विभागाला पाठवले आहे. अजय मेहता हे नियत वयोमानानुसार सप्टेंबर २०१९मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेहता यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवून दिली. त्यानुसार मेहता यांचा कार्यकाळ येत्या ३१ मार्च रोजी संपणार होता. सध्या करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मेहता यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

मुंबई - करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हातांची स्वच्छता गरजेची असल्याचे वारंवार सांगण्यात येत असल्याने सध्या बाजारात हँड सॅनिटायझरची प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही औषध दुकानदार जास्त किंमतीत सॅनिटायझर विकत आहेत. मुंबईतील अशाच एका औषध दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या मेडिकलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरिवली (पश्चिम) येथील मेडिकल दुकानात बुधवारी हँड सॅनिटाझर चढ्या किंमतीत विकत असल्याची तक्रार एका तरुणाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर संबंधित मेडिकलच्या मालकीणीवर भादंवि कलम १८८ नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारच्या आवश्यक वस्तू अधिनियमानुसार, जास्त किंमतीत वस्तू विकल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २०० मिली बाटली १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत असताना संबंधीत मेडिकलमधील विक्रेत्याने ५०० मिलीची हँड सॅनिटायझरची बाटली तक्रारदार तरुणाला ६३० रुपयांना विकली होती.

विरार - लॉकडाऊनचा धसका घेऊन आपल्या गावी गुजरातला पायी जात असताना विरार येथे सात जणांना एका भरधाव टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी त्याचा धसका घेतला आहे. काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्यामुळे शेकडो कामगार आपआपल्या मूळगावी पायीच निघाले आहेत.शनिवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास हे कामगार मुंबई-अहमदाबाद मार्गावरून जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जाण्यास मनाई केल्यानंतर हे सर्व कामगार माघारी फिरले. वसईकडे जात असताना विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भधाव आयसर टेम्पोने पाठिमागून येऊन त्यांना धडक दिली. हा आयसर टेम्पो सातजणांना चिरडून वेगाने निघून गेला. या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. या सात जणांपैकी दोघांची ओळख पटली असून एकाचे नाव कल्पेश जोशी आणि दुसऱ्याचे मयांक भट असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत. 

पालघर - राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची तारांबळ उडाली आहे. पालघरमध्ये तर दोन मुलांनी तर त्यांच्या वडिलांचा मृतदेह बाईकवरून न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पालघर जिल्ह्याच्या चिंचारे येथे ही घटना घडली. चिंचारे येथील लडका वावरे यांना काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. वावरे यांच्यावर उपचार केल्यानंतर उपचार पूर्ण झाल्याचे सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे वावरे हे त्यांच्या मुलासोबत बाईकवर बसून घरी जात होते. घरी जात असतानाच मोटारसायकलवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे घरी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. अर्ध्या रस्त्यातच ही घटना घडल्याने रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवणंही शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटारसायकलवरूनच घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांनी वडिलांचा मृतदेह चक्क मोटारसायकलवरून नेला. 

नवी मुंबई - राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू कराव्या लागलेल्या तर्भे येथील भाजीपाला घाऊक बाजारात शुक्रवारी पहाटे अक्षरश: खरेदीदारांची झुंबड उडाली होती. कोणतीही खबरदारी न घेता बाजारात आलेल्या या खरेदीदारांमुळे व्यापारी मात्र कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. अन्न धान्य व इत्यादी बाजारपेठे सुरू करण्याचा आग्रह करणाऱ्या एपीएमसीच्या नियोजनाचा यामुळे पार फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाची टाळेबंदी जाहीर केली आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केली जाईल असे आश्वासन दिल्याने तुर्भे येथील भाजी व अन्न धान्य या दोन घाऊक बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येथील व्यापाऱ्यांनी या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोकण विभागिय आयुक्त शिवाजी दौंड यांनी बैठका घेऊन व्यापाऱ्यांना या जीवनावश्यक बाजारपेठा सुरू करण्याचा आग्रह केला. त्यानुसार शुक्रवारी पहाटेपर्यंत भाजी बाजारात एकूण ४५० ट्रक टेम्पो भारुन भाजी आल्याने खरेदीदारांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र होते. या घाऊक बाजारात वाहने सोडताना त्यांच्यावर जंतुनाशक फवारणी करुन ती आतमध्ये सोडली जात होती मात्र खरेदीदारांनी तोंडावर रुमाल, मास्क आणि हात धुवून प्रवेश करण्याची एपीएमसीची सूचना खरेदीदारांनी धुडाकावून लावल्याचे दिसून येत होते. नवी मुंबईतील या भाजीच्या घाऊक बाजारात रात्री उशिरा आवक सुरू होते. पहाटे सहा ते सात वाजर्पेयत येथील भाजी विकली जाते. भाजीच्या साडेचारशे ट्रक टेम्पो भरुन भाजी बाजारात आल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची झुंबड उडाली होती. खरेदीसाठी आलेल्या विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतल्याचे दिसून येत नव्हते. 

वसई - करोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन केला असल्याने वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी कामधंद्यानिमित्ताने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी हाताला काम नसल्याने थेट गावाचा रस्ता पकडला आहे. ये-जा करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे वाहन रस्त्यावर फिरत नसल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला आहे. 
दरवर्षी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा यांसह इतर खेडय़ापाडय़ातील मोठय़ा संख्येने मजूर दिवाळीनंतर वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी स्थलांतर करून येतात. या ठिकाणी हाताला मिळेल ती विविध प्रकारची कामे करून वर्षांला कमाई घेऊन पावसाळ्याआधी पुन्हा आपल्या गावी जातात. परंतु यंदाच्या वर्षी मागील काही दिवसांपासून करोना या रोगाने कहर केल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सर्व मिळणारी छोटी-मोठी कामे बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम नसल्याने या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.एरवी हे मजूर हाताला काम मिळावे म्हणून वसईच्या भागातील विविध ठिकाणच्या नाक्यावर येऊन थांबतात. ज्यांना या मजुरांची गरज आहे, ते बांधकाम व्यावसायिक, शेतकरी, भाजी व्यावसायिक, मच्छीमार, इतर नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी घेऊन जातात. त्यामुळे दिवस मजुरीतून यांची चांगलीच कमाई होत होती. आता मात्र सर्व काही थंडावल्याने हाताला काम नाही जर काम मिळाले नाही तर आम्ही खाणार काय यासाठी पुन्हा आम्ही गावाची वाट पकडली असल्याचे मजुरांनी सांगितले.

ठाणे - कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील विविध समाजाची धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 'लॉकडाऊन' करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील खर्डी येथील सुन्नी जामा मशीद देखील बंद करण्याचा निर्णय ट्रस्टकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गुरुवारपासूनच मशिदीतील सार्वजनिक नमाज पठण बंद करून मशिद 'लॉकडाऊन' करण्यात आली आहे.शुक्रवारी म्हणजे जुम्माच्या नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव शेकडोच्या संख्येने मशिदीमध्ये एकत्रित येतात. मात्र, कोरोनामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार देशभरात 'लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे. यामध्ये शाळा-कॉलेज, मॉल, थिएटर, सर्व धर्मियांची धार्मिक व प्रार्थनास्थळे आदी ठिकाणे बंद करून संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळेच नमाज अदा करण्यासाठी मशिदीत मुस्लीम बांधवानी येऊ नये, त्यांनी आपल्या घरीच नमाज पठण करावे, अशा सूचना सुन्नी जामा मशिदीच्या ट्रस्टकडून देण्यात आल्या आहेत.राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज्य सरकारच्या वतीने मुस्लीम समाजाला आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मशिदीत नमाज पठण करण्यास न जाता घरीच नमाज अदा करण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे संचारबंदी व 'लॉकडाऊन' असेपर्यत जिल्ह्यातील सर्वच धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहे. याच निर्देशाचे पालन करीत सुन्नी जामा मस्जिद 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय घेतल्याचे जामा मस्जिद ट्रस्टचे खजिनदार मुझ्झफर कोतवाल यांनी सांगितले. 

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारात हॅण्ड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. अशातच साठेबाजांनी हॅण्ड सॅनिटायझरची साठेबाजी करून चढ्या भावाने विकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने या विरोधात कारवाई करत २ लाख ५० हजार रुपयांच्या ५ हजार बाटल्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी तिघांना जणांना अटक केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारकडून १३ मार्च रोजी मास्क व हॅण्ड सॅनिटायझर या अत्यावशक वस्तू असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मास्क व हॅण्ड सॅनिटायझर हे ठरलेल्या भावात विकण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली. मात्र, मुंबईतील माहीम परिसरात दिनाथवाडी येथील एका फ्लॅटमध्ये हॅण्ड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार या ठिकाणी गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने छापा टाकत हिंदुस्तान लॅबोरेटरी कंपनीच्या हॅकिंटो जेल हॅण्ड सॅनिटायजरचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे, हे तिन्ही आरोपी ५० रुपये किंमत असलेने हॅण्ड सॅनिटायझर ६५ रुपयांना विकत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. 

मुंबई - कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दीत न जाण्याचे आवाहन पालिका व राज्य सरकारकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्चिम येथील भाज्यांचा घाऊक बाजार २९ मार्चपासून बंद करून हा बाजार आता दादरसह घाटकोपर, दहिसर, मुलुंड, वांद्रे या ठिकाणी विभागून सुरू होईल. यामुळे सध्या होणारी गर्दी कमी करण्यास येईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.दादर पश्चिम येथे सेनापती बापट मार्गावर भाजी मार्केट आहे. याठिकाणी घाऊक स्वरुपात भाजी स्वस्त मिळत असल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी आणि ग्राहक भाजी घेण्यासाठी येथे गर्दी करतात. सध्या कोरोनाने थैमान घातले असताना गर्दी टाळणे हाच उपाय आहे.भाजी विक्रेत्यांकडे होणारी गर्दी कमी करण्यासाठी घाटकोपर ते माटुंगा येथील व्यापाऱ्यांसाठी सोमय्या मैदान येथे, वांद्रे ते गोरेगाव येथील व्यापाऱ्यांसाठी एमएमआरडीए एक्झिबिशन मैदान येथे, मुलुंड ते घाटकोपर येथील व्यापाऱ्यांसाठी मुलुंड जकात नाका येथे, दहिसर ते मालाड येथील व्यापाऱ्यांसाठी दहिसर चेक नाका येथे तर मुंबई शहर विभागातील व्यापाऱ्यांसाठी सध्या दादर येथे सुरू असलेल्या भाजी मार्केटच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था पुढील आदेश मिळेपर्यंत सुरू राहणार आहे, असे पलिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मुंबई - संचारबंदी असतानाच्या काळातही गंमत म्हणून रस्त्यावर येणाऱ्यांना दंडक्यांचा प्रसाद देणाऱ्या पोलिसांना, अशा व्यक्तींच्या गाडय़ांच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहनांचा वापर करून दुकानांभोवती गर्दी केली जात असल्याचे आढळून आल्याने अशा गाडय़ा थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचवेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ओळखपत्रे जारी करण्यासही पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे.संचारबंदी लागू झाल्यानंतर याबाबतच्या आदेशानुसार चार किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे त्यात नमूद करण्यात आल्यामुळे एकही व्यक्ती वा वाहन रस्त्यावर दिसता कामा नये, असे अपेक्षित आहे. प्रामुख्याने घरातील एकच व्यक्ती जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडावी, असे अपेक्षा आहे. असे असतानाही काही रिकामटेकडे गंमत म्हणून फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. त्यांची गय न करण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बजावले आहे. मात्र त्याचवेळी जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाला त्रास न देण्यासही त्यांनी सांगितले आहे. टवाळखोरांना मात्र पोलीस अडवत असून त्यांना दंडुकांचा प्रसाद दिला जात आहे. दुचाकी घेऊन पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. त्यामुळे अशा टवाळखोरांच्या गाडय़ा जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्याचा बिनतारी संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. याशिवाय खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही चारचाकी वाहने रस्त्यावर आणून संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाहनांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांना त्यांना आवश्यक तेवढय़ाच वस्तुंची खरेदी करावी, असे आदेश असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठा साठा खरेदी केला जात आहे. दुकानदारही त्यांना आळा घालत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळींच्या गाडय़ाच जप्त केल्या तर त्यांच्याकडून खरेदीही माफक केली जाऊ शकते, या अपेक्षेने त्यांच्या गाडय़ा ताब्यात घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. 

अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ा वा या गाडय़ांवर काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय किराणा माल, औषधाची दुकाने, दूध, अंडी, पशुंचे खाद्य पुरविणारी दुकाने आदींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्रे देण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना विनाकारण पोलिसांचा त्रास सहन करावा लागणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. संचारबंदीच्या काळात एकही वाहन दिसता कामा नये, असे आदेशही सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. अन्यथा अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. 


मुंबई - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. अशातच अभिनेते ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचे समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारलाही उत्पादन शुल्काचा (एक्साईज) पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको. तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा, असे ऋषी कपूर म्हणाले आहेत. याआधीही दारुची दुकानं सुरु ठेवण्याची मागणी करत न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. मात्र, न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. तसेच याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेच्या नावावर व्यक्तिगत इच्छा मांडल्या आणि न्यायालयाचा वेळ वाया घालावल्याचा ठपका ठेवत दंडही केल्याची घटना घडली आहे.दरम्यान, केरळ आणि पंजाब राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात दारुचा समावेश आवश्यक गोष्टींमध्ये केला आहे. 

मुंबई - एकिकडे संपूर्ण देसभरात कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे सर्वच व्यवहारांवर याचे थेट पडसाद दिसून येऊ लागले आहेत. कलावर्तुळालाही कोरोना व्हायरसची झळ लागली आहे. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमध्ये एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'आरआरआर' असे नाव असणाऱ्या या चित्रपटाचा पोस्टर अभिनेता अजय देवगन याने प्रेक्षकांच्या भेटीला आणला. ज्यामघ्ये राईज, रिव्होल्ट, रोअर असे शब्द या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहेत. तर, आग आणि पाणी एकत्र आल्यामुळे नेमके काय होऊ शकते याची एक झलक या पोस्टरमधून पाहायला मिळत आहे. 
'बाहुबली' या चित्रपटामुळे प्रेक्षकांना राजामौली यांच्या या आगामी चित्रपटाच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. किंबहुना राजामौली यांनीही या अपेक्षांना अंदाज घेतच 'आरआरआर'चा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणल्याचे कळत आहे. या चित्रपटातून अभिनेता अजय देवगन एका खास भूमिकेत झळकणार आहे. दोन स्वातंत्र्यसैनिकांभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार आहे. जवळपास ३५० ते ४०० कोटी अशा निर्मिती खर्चामध्ये हा चित्रपट साकारला जात असल्याची माहिती समोर येत आहे. 
दरम्यान, 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अजय देवगन या चित्रपटातून नेमकी कोणती भूमिका साकारेल याविषयीची माहिती गुलदस्त्यात आहे. पण, चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहता त्याची भूमिका अफलातून असणार यात शंका नाही.

सांगली - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे दिसत आहे. सांगलीत आज तब्बल १२ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सांगलीतील इस्लामपुरात आज १२ नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल १४७ वर पोहोचला आहे.महत्त्वाचे म्हणजे इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्या ४ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचे कुटुंब मोठे आहे.
या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आधी पाच आणि आता बारा जणांची भर पडली आहे.

कोलकाता - कोरोनावर मात करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तूसाठी लोकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने गर्दी होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर उतरून खडूने रिंगण आखत लोकांना एकमेंकामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले. त्यांच्या या कृतीचे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी कौतूक केले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शहरातील काही भागांची पाहणी केली. मात्र, यावेळी किराणा दुकानात किंवा भाजीपाल्याच्या गाड्यावर लोक गर्दी करत असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यावर ममता बॅनर्जी रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्यासमोर उतरल्या आणि खडूने गोल रिंगण आखत त्यांना एकमेंकापासून १ मिटर अंतरावर उभे राहण्यास सांगितले. तसेच बाजारातील दुकानांसमोर 6 फूट अंतरावर वर्तुळे तयार करण्याच्या सुचना त्यांनी पोलिसांना दिल्या.लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या बंगालींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी देशातील १८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बंगाली नागरिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याचे व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी पत्रामध्ये केले आहे.

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. तसेच कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढला असून सध्या १३५ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच काळाची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन टोपेंनी केले. राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने आणि मेडिकल प्रॅक्टिस सुरू ठेवण्याची विनंती टोपे यांनी केली आहे. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. 'मीच माझा रक्षक', अशा ब्रीद वाक्याचा उच्चार यावेळी राजेश टोपे यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या महत्वाच्या सूचना दिल्या आहेतकाही डॉक्टरांनी भीतीपोटी खासगी दवाखाने बंद केले आहे, ते चुकीचे आहेसर्व डॉक्टरांना विनंती आहे की, त्यांनी मेडिकल प्रॅक्टीस सुरू ठेवावीगाव, वाड्या-वस्त्यांवरील डॉक्टरांना कोणताही त्रास होणार नाही, तुम्ही रुग्णालये सुरू ठेवावीतकोरोनाशिवाय इतरही आजार आहेत, त्यामुळे सर्व दवाखाने सुरू ठेवावेतओपीडी बंद, इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद आहेत. अशा वेळी दवाखाने सुरू असणे गरजेचेसर्व राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने आणि हॉस्पिटल सुरू ठेवावेत, नागरिकांना उपचार द्यावेत राज्याच्या रक्तपेढीत सात ते आठ दिवसांपुरते रक्त शिल्लक आहे.वेळेची आणि काळाची गरज लक्षात घेता रक्तदान महत्वाचेरक्त फक्त कोरोनासाठी लागते असे नाही; ते अनेक आजारांसाठी लागते.रक्तदान करण्याचे टोपेंचे आव्हानआयसोलेशनचे वॉर्ड आहेत, तिथे एन-९५ मास्क वापरण्याचा प्रोटोकॉलत्या व्यतिरीक्त साधे मास्क घातले तरी चालेल, त्यामुळे गैरसमज ठेवून घाबरू नका
पोलिसांनी आपल्या जबाबदारीमध्ये तत्परता दाखवावी. तसेच नागरिकांनी पोलिसांची अनावश्यक भीती बाळगू नये. पोलीस नियमाने काम करत असल्याचा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशावर उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आरबीयकडून एक पाऊल पुढे पाहायला मिळत आहे. आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये ०.७५ टक्के कपात केल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे जीडीपीवर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली.त्यामुळे रेपो रेट ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आलाय. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.९० टक्क्यांची कपात केली.
यामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकांत दास यांनी केली.रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे.

मुंबई - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असताना एक महत्वाची आणि समाधानकारक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.
एका बाजूला कोरोनामुळे संपूर्ण जगात २१ हजार लोकांचा मृत्यू झाला असताना. महाराष्ट्रातून ही सर्वात समाधनकारक बाब समोर आली आहे. संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वरून १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई येथे मौलवीचा मुलगा आणि मोलकरीण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. वाशीतील मशिदीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या वास्तव्यात आलेल्यांची चाचणी केली गेली. त्यानंतर हे कोरोना पॉझीटीव्ह समोर आले आहेत. यातील काही जणांचे रक्ताचे नमुने यायचे आहेत. त्यामुळे या रुग्णांमध्ये किती रुग्ण पॉझिटीव्ह येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मुंबई - सध्या देशभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण सापडले. आतापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १२२ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे या व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळत आहेत, ते पाहिल्यावर आता त्यांच्या टीकाकारांनीही त्यांची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे. एका अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंची माफी मागितली आहे.
सॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो... भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून 'शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला' असं मला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत. अशा आशयाची मराठी अभिनेते किरण माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर सध्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. ज्यात सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत.

श्रीनगर - जगभरात कोरोनाने थैमान मांडला आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोनाची लागण झाली आहे. आता काश्मीरमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेला असून हा काश्मीरमधील पहिला बळी आहे.कोरोनाबाधित ही व्यक्ती ताब्लिजी जमातीतील असून २३ मार्च रोजी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. सोपार इथे मूळ घर असलेला हा रूग्ण श्रीनगरमध्ये राहत होता. अवघ्या तीन दिवसांत या रूग्णाचा बळी गेला आहे. महत्वचे म्हणजे या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता. 
आतापर्यंत भारतात १४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर,जगभरात २१ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फक्त इटलीतच ७५०० लोकांचा कोरानामुळे बळी गेला आहे. स्पेनने चीनचा बळींचा ३६०० चा आकडा पार केला आहे. भारतात आतापर्यंत ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी भारतात १००नवीन कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद झाली तर तिघांचा मृत्यू झाला. गोव्यामध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ४२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे समजत आहे. 

आठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार, केंद्र सरकारचे‘कोरोना पॅकेज’ जाहीर
नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची केंद्र सरकारकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी १ लाख ७० हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुढील तीन महिने गरिबांना ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.आहेत.
निर्मला सीतारमन यांच्या घोषणा
१. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
२. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
३. देशात कोणही उपाशी राहणार नाही
४. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
५. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
६. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत
७. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
८ आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार
९. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार
१०. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
११. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा


-कोरोना महामारीमुळे ईपीएफच्या नियमात बदल करण्यास सरकार तयार आहे. जेणेकरुन पीएफ खात्यात जमा झालेला ७५% नॉन रिफंडेबल रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार (जे कमी असेल ते) काढता येतील. 
-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे योगदान भारत सरकार देईल. नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्या वतीने. हे पुढील तीन महिन्यांसाठी असेल. ज्या संस्थांमध्ये १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि ९० % पेक्षा कमी कर्मचाऱ्यांचा पगार १५ हजारांपेक्षा कमी आहे, त्या संस्थाना लागू
-मातृशक्ती, महिला ज्यांचे जनधन खाते आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला ५०० रुपये
– वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त एक हजार रुपये – तीन कोटी विधवा, वृद्ध, दिव्यांगाना लाभ, डायरेक्ट खात्यात मिळणार.
– मनरेगा माध्यमातून काम करणाऱ्यांची रोजंदारी १८२ वरुन २०२ रुपयांपर्यंत वाढवली
-१३० कोटी जनतेचे पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये भरणार, देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील
-पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता. जवळपास ८० लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल
-वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी यासारख्या योद्ध्यांना ५० लाखांचा आरोग्य विमा
-कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी १ लाख ७० हजार कोटीचं पॅकेज, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरजूंना लाभ

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. पण वसईत नाकाबंदी सुरू असताना एका माथेफिरू मोटारसायकल चालकाने चक्क पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या आयसीस रूग्णालयात उपचार सुरू आहेत.सुनील पाटील, असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वसई पूर्व एव्हरशाईन सर्कलवर आज सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे आहेत. त्याच पोलिसांच्या जीवावर आता घराबाहेर पडणारे नागरिक उठत असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई - एकीकडे कोरोना व्हायरसचा कहर वाढत असताना मास्कचा तुटवडा जाणवत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी वाढती मागणी लक्षात घेता मास्कची अवैधरित्या साठवणूक केल्याचे उघड झाले. विलेपार्ले पोलिसांनी एक कोटींचे मास्क जप्त केले आहेत.एक कोटींचे मास्क जप्तविलेपार्ले पोलिसांकडून २४ मार्चच्या रात्री बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांना गोदामातील कार्गो भागात मास्क बेकायदेशीर साठवल्याची माहिती मिळाली. त्यांनतर काणे यांनी कारवाई करत हा लाखोंचा साठा जप्त केला. थ्री फ्लाय प्रकारच्या या मास्कचे २०० खोकी त्यांनी जप्त केली आहेत.
सुरत - देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून ५६२ वर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये ७२ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे.शहरातील माजुरा गेट जवळ हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णलयात २५० खाट आहे. सुरतचे माजी जिल्हाधिकारी महेंद्र पाटील यांच्या निगराणीखाली रुग्णालय उभारण्यात आले. आरोग्य मंत्री कुमार कानानी यांनी रुग्णालयाची पाहणी केली आहे. दरम्यान मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच २१ दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे. 

तमिळानाडू - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे. देशभरात आरोग्य सेवा अतिशय सतर्क करण्यात आल्या आहेत. डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत. अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी हजर आहेत.आता तमिळनाडू सरकारने कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. या कर्मचाऱ्यांना बोसनमध्ये एक महिन्याचा पगार देण्यात येणार आहे.
तमिळानाडूचे मुख्यमंत्री ई.के.पलानीसामी यांनी, डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना बोनससह, रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये, तांदुळ, साखर आणि इतर आवश्यक वस्तू मोफत देण्याची घोषणा केली आहे.

पंजाब - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये लॉक डाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या भारतात ५०० हून जास्त झाली आहे. तर आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाल आहे. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांत तब्बल ९० हजार परदेशात राहणारे नागरिक भारतात परतले आहे. यामुळे भारतात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.परदेशातून आलेले नागरिक सगळ्यात जास्त पंजाबमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे पंजाब सरकारने Covid-१९ च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आणि इतर इमारती बांधण्यासाठी केंद्राकडे निधी मागितला आहे. पंजाबचे आरोग्य मंत्री बीएस सिद्धू यांनी, “पंजाबमध्ये बरेच अनिवासी भारतीय आहेत आणि गेल्या तीन-चार महिन्यांत ९०,००० लोक येथे आले आहेत. आम्ही केंद्राकडे पायाभूत सुविधा, आयसोलेशन वॉर्ड आणि इतर काही गोष्टी तयार करण्यासाठी १५० कोटींची मदत मागितली आहे”, असे सांगितले.

श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यामंत्री ओमर अब्दुल्ला यांना मंगळवारी मुक्त करण्यात आले. साधारणपणे आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. नागरी सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले.गेल्यावर्षी ५ ऑगस्टला त्यांना कैदेत ठेवण्यात आले होते. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारीला नागरी सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना कैद करण्यात आले होते. १० मार्चला ते ५० वर्षांचे झाले. आतापर्यंत साधारणपणे २३२ दिवस ते कैदेत होते.
मुंबई - कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र, मुंबईत या जमावबंदीच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर आता मुंबई पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ११२ गुन्हे नोंदवले आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत.
कोरोना व्हायरसबाबत गैरसमज पसरवणे – ३ गुन्हे दाखल
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १८८ नुसार ही कारवाई केली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही गंभीर पाऊलं उचलत आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासोबतच हा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वेगळे ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडण्यास मज्जाव करत आहे.
हॉटेल सुरू ठेवणे – १६ गुन्हे दाखल
पान टपरी सुरू ठेवणे – ६ गुन्हे दाखल
इतर दुकान सुरू ठेवणे – ५३ गुन्हे दाखल
हॉकर्स, फेरीवाले – १८ गुन्हे दाखल
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे – १० गुन्हे दाखल
अवैध वाहतूक करणे – ६ गुन्हे दाखल

मुंबई - कोरोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तूर्तास स्थगित करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्र पाठवून राज्य शासनाने केंद्र सरकारला याबाबत शिफारस करावी, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. “कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्याप कर्जांची वसुली, इएमआय, इन्स्टॉलमेंट्स, ऑटो डेबिट आदी बाबी थांबविण्यात आलेल्या नाहीत”, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले.
'आज शेतकरी, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार असे समाजातील सर्व घटक घरात अडकून पडले आहेत. बहुतांश लोकांकडे फारसे पैसे नाहीत. अत्यावश्यक सेवा म्हणून बॅंका भलेही सुरु असतील. पण उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाणघेवाण थांबली आहे', असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.
'कर्जाचे हप्ते, इन्स्टॉलमेंट भरायला लोकांनी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न आहे. एक जरी हप्ता चुकला तरी त्याचा ‘सिबिल’वर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे या मुद्याचा गांभीर्याने विचार करावा आणि सर्व वित्तीय संस्थांची, बॅंकांची सर्व प्रकारची वसुली तात्पुरती स्थगीत करावी. त्याचप्रमाणे जीएसटीची विवरणपत्रे आणि आयकर भरण्याची मुदत देखील वाढवून देण्यात यावी', अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल ठेवा. हात नीट स्वच्छ धुवा असा सल्ला दिला जातो आहे. कोरोनाव्हाययरसच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्याने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर कोरोनाव्हायरसची लागण होत आहे. मात्र ज्या हवेत आपण श्वास घेत आहोत, त्या हवेमार्फत तर आपल्याला कोरोनाव्हायरसचा धोका तर नाही ना? असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे.कोरोनाव्हायरस हवेत काही तास जिवंत राहू शकतो, असे संशोधनातून समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचा सूचना दिल्य आहेत. त्यामुळे हवेमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो आहे का? अशी भीती निर्माण झाली आहे.कोरोनाव्हायरसची हवेत तग धरण्याची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी न्यूबिलाझरच्या माध्यमातून व्हायरस एअरबॉर्न केला. ३ तासांसाठी हा व्हायरस हवेत राहत असल्याचे दिसून आले.शास्त्रज्ञांनी रुग्णालयातही तपासणी केली. त्यावेळी तिथल्या जमिनीवर, भिंतींवर कोरोनाव्हायरस आढळले, जे शिंकल्यानंतर आणि खोकल्यानंतर थेंबामार्फत पसरले होते. मात्र हवेत हा व्हायरस नव्हता. जमिनीवरील व्हायरसचा निर्जंतुकीकरणानंतर नाश झाला.
.

कोलकाता - देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. आज २३ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ३, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये आज दुपारी ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोलकातामधील सॉल्टलेक या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेशनवर होते. मात्र दुर्देवाने आज त्यांचा मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे या मृत रुग्णांची कुठल्याही प्रकारची ट्रव्हल हिस्ट्री नव्हती. हा रुग्ण १३ मार्च रोजी सर्दी, ताप आणि घसा खवखवत असल्याकारणाने रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर १६ मार्चला त्यांना श्वास घेण्यास अडचणी होत आहे. यानंतर १९ मार्चला त्यांचा कोरोनाची लागण झाल्याचे उघ़ड झाले होतेयानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि त्यांना व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले. मात्र आज हार्टअॅटकमुळे त्यांचा मृत्यू झाला.देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१५ इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक ३९, पुणे १६, पिंपरी चिंचवड १२ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. देशातील १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी १२ प्रयोगशाळेच्या माध्यमातून देशभरामध्ये १५ हजार तपासणी सेंटर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. चंदीगढ, दिल्ली, गोवा, जम्मू काश्मीर, नागालॅड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपूरा, तेलंगाणा, छत्तीसगढ, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.देशात ४१५ कोरोनाबाधित रुग्णाची संख्या असून कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याहून दिल्लीला पोहचलेल्या एका विमानात कोरोनाबाधीत प्रवासी असल्याची माहीती प्रवाशांना मिळाली. त्यामुळे घाबरलेल्या वैमानिकाने चक्क विमानाच्या खिडकीतून उडी मारली आहे.पुणे ते दिल्ली एअर एशियाच्या विमानात हा संशयित प्रवासी होता. दिल्ली विमान पोहोचताच प्रवाशांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यातच वैमानिकाला याची खबर लागताच त्याने बसलेल्या जागी शेजारी असलेल्या खिडकीतून उडी मारली.या घटनेनंतर या विमानाला रन वे वर वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. तसेच सगळ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या प्रवाशामुळे एकूण गोंधळ उडाला होता, त्या प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.
मुंबई - सरकारी निर्देशांबाबत नागरिकांच्या अनास्थेमुळे अखेर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी महाराष्ट्रात अखेर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात. आज सकाळपासून रस्त्यांवर अनेक वाहने विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्हाला आता नाईलाजाने राज्यभरात संचारबंदी लागू करावी लागत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
याशिवाय, राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठीही राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यातंर्गत सुरु असलेली विमान वाहतूकही बंद करावी, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले आहे.

* खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी सुरु राहतील. रिक्षात चालक सोडून एकजण आणि टॅक्सीत चालक वगळता दोन जणांना बसण्यास परवानगी
* जीवनावश्यक वस्तूंसह पशुखाद्याची दुकानेही सुरु राहतील. अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असल्याने हा निर्णय. कृषीमालाची वाहतूकही सुरु राहणार.
* सर्व धर्मीयांचा प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील.
* कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर डॉक्टरांबरोबरच नर्स आणि अन्य मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.
* आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ताच रोखला नाही तर हा विषाणू जगात घातले तसे थैमान राज्यातही घालेल.
* घरी विलगीकरण केलेल्यांनी सूचना पाळाव्यात. जनतेच्या हितासाठीच कठोर पावले उचलत आहोत. 
* आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.
* जनता कर्फ्युला जनतेने दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण केवळ टाळ्या, वाजवणं म्हणजे व्हायरस पळवणे नव्हे. जीवाची बाजी लावून लढण्याऱ्यांसाठी ते होते.
* हा निर्णायक टप्पा आहे. पुढचे दिवस महत्वाचे आहेत, हे ओळखलं नाही तर वेळ मिळून आपण उपयोग केला नाही असं होईल.
उत्तर प्रदेश - भारातामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ३५० पेक्षा अधिक झाली असून तब्बल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील १५ जिल्ह्यात २३ मार्च ते २५ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.भारतात कोरोना विषाणुच्या विरोधातील ही सामूहिक लढाई आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी विषाणूसंबधी जागरुक राहणे आणि काळजी घेणे हा एकमेव उपाय असल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. तसेच याला रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात असल्यचेही ते म्हणाले. नागरिकांनी स्वत:ला या संक्रमणापासून वाचवण्यासाठी वेगळे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.उत्तर प्रदेशमध्ये करण्यात येणाऱ्या लॉकडाउनमध्ये नोएडा, गौतमबुद्ध नगर आणि गाजियाबाद या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget