नगर महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

नगर - सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची नगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. मायकलवार यांना तत्काळ आयुक्तपदाचा पदभार घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता तीन महिन्यांनंतर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळणार आहे. 
नगर महापालिकेचा आयुक्तपदाचा पदभार गेल्या तीन महिन्यांपासून प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेत विविध योजना राबविल्या. त्यांची कारकीर्द शहरामध्ये चांगलीच गाजली होती. गेल्या तीन महिन्यांपासून आयुक्तपदी कोण? यासाठी तर्कवितर्क मांडले जात होते. त्यातच शुक्रवारी नगरविकास खात्याने सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मायकलवार यांची बदली नगरला आयुक्त म्हणून केली आहे. नगरविकास खात्याचे उपसचिव कैलास बधान यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. मायकलवार लवकरच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
दरम्यान, सध्या मार्च महिना असल्यामुळे नगरमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. थकबाकी वसूल व्हावी, यासाठी वेगवेगळ्या योजना सुद्धा राबविण्यात येत आहेत. नवीन येणाऱ्या आयुक्तांसमोरही थकबाकी वसुलीचे आव्हान असणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget