केईएम आणि नायर रुग्णालय रिकामे करण्याचे आयुक्तांचे आदेश

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशासह मुंबई आणि महाराष्ट्रातही दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. मुंबई आणि परिसरातील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या पाहता रुग्णालये कमी पडणार असल्याने पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांमधील आरोग्य सेवेची गरज नसणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन रुग्णालये रिक्त कण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालये आणि आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. 
सध्या कस्तुरबा रुग्णालयात १२२ , जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात ५ असे एकूण १२७ रुग्ण भरती आहेत. कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशनचे १२७ बेड असून त्यावर सध्या १२२ रुग्ण आहेत. या रुग्णालयात कोरोनाची लागण झालेले आणि संशयित रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बेडची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात आयसोलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. 
पालिकेकडे सध्या असलेल्या बेडची क्षमता येत्या काही दिवसात संपणार आहे. सध्या वाढणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आयसोलेशन वॉर्ड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी परेल येथील केईएम आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना घरी पाठवून ते बेड कोरोनाच्या बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget