ठाण्यात हॉटेल, बीअरबार, वाइन शॉप, व्यावसायिक वाहनांवर बंदी

ठाणे - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळ्या पिवळ्या जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. शेअरिंग प्रकारामुळे प्रवासी एकत्र आल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने तो टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने, आस्थापने, हॉटेल, बीअरबार आणि वाइन शॉपबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. 
शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर व ग्रामीण भागातील काळ्या पिवळ्या जीपमधून सर्वसामान्य प्रवासी शेअरिंगद्वारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात. त्या अनुषंगाने प्रवासादरम्यान करोना विषाणू (COVID-१९)चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरिंग प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रवास ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही बंदी राहणार असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांवर 'महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२०च्या नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८मधील तरतुदींनुसार दंडनीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या आदेश २० मार्चपासून तात्काळ लागू करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचेही आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यामध्ये अत्यावश्यक किराणा सामान, दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय यांना वगळण्यात आले आहे. तसेच, 'टेक अवे' अर्थात घरी जेवण घेऊन जाण्याची ठिकाणे वगळता उर्वरित हॉटेल, बीअरबार, वाइन शॉपही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तर, किराणा मालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. परंतु अशा ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांकरिता हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget