अखेर निर्भयाला मिळाला न्याय : चारही गुन्हेगारांना दिली फाशी

नवी दिल्ली - दिल्लीच्या रस्त्यांवर जवळपास ७ वर्षापूर्वी घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणात आज चारही आरोपींना फाशी देण्यात आली. सगळ्या कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर गुन्हेगारांना फासावर लटकवण्यात आलं. तिहाड जेलमध्ये सकाळी ५.३० मिनिटांनी या दोषींना फाशी देण्यात आली.यावेळी जेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.फाशी देण्याच्या आधी जेलमधील अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. ज्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. फासावर लटकवण्याच्या आधी जेव्हा दोषींना अंघोळीनंतर कपडे देण्यात आले तेव्हा दोषी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. त्यानंतर तो रडू लागला आणि माफी मागू लागला.
दोषींना फाशी देत असताना जेलच्या बाहेर गर्दी झाली होती. दिल्लीतील स्थानिक लोकं, समाजसेवक जेलच्या बाहेर उभे राहून हीच निर्भयाला खरी श्रद्धाजंली आहे अशी भावना व्यक्त करत होते. दोषींना फासावर लटकल्याची माहिती बाहेर येताच उपस्थितांनी समाधानीची भावना व्यक्त केली.
फाशी दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह घरच्या मंडळींकडे अंतिम संस्कारासाठी देण्यात येतील. जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही तर चारही गुन्हेगारांच्या मृतदेहावर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्यात येतील. ज्या जेल क्रमांक ३ मध्ये ही फाशी देण्यात आली त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दोषींच्या वकिलाची प्रतिक्रिया 
निर्भयाच्या दोषींच्या बाजुने लढणारे वकील एपी सिंह यांनी म्हणाले की, 'मला माहित होते की, निर्णय़ काय येणार आहे. तरी देखील मी ही केस हातात घेतली. खरेतर मला ही केस लढवायची नव्हती. पण पवनच्या आईने आणि पत्नीने मला विनंती केल्यामुळे मी ही केस लढली.'
एपी सिंह यांनी सांगितले की, 'मी ही केस हातात घेतल्यानंतर मला अनेक धमक्या आल्या. सोशल मीडियावर लोकांनी शिव्या दिल्या. पण त्यांनी म्हटले की, निर्भयाच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेतला गेला. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जागोजागी प्रोटेस्ट करुन घेतल्याचा आरोपा लावला.
निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया 
प्रत्येक वडिलांच काय कर्तव्य आहे. ही घटना घडली त्यानंतर आम्ही डोळे बंद केले नाही. आम्ही न्यायासाठी प्रयत्न केला आणि अखेर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. वडिलांच कर्तव्य आहे ते आम्ही केलं. म्हणून माझं प्रत्येक वडिलांना एकच सांगायचं आहे. मुलगा आणि मुलीमध्ये फरक करू नका. त्या दोघांना समान वागणूक द्या. तसेच आमची एक मुलगी गेली पण आज आम्हाला लाखो मुली भेटल्या आहेत. आमचं काम इथेच थांबल नाही. आम्हाला थांबायचं असतं तर आम्ही कधीच थांबलो असतो. कारण या नराधमांना फाशी देऊन आमची मुलगी काय परत मिळाली नाही. पण आम्ही लढणार देशातील इतर मुलींसाठी आमचा लढा कायम ठेवणार, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget