कोरोनामुळे राजस्थानमध्ये 'लॉकडाऊन'

राजस्थान - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि त्याचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी भारताने तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व राज्यांमधील शाळा, कॉलेज, ऑफिसं बंद करण्यात आली आहेत. मात्र कोणत्याही शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. आता राजस्थान संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राजस्थान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. कोरोना व्हायरस थांबविण्याचा राजस्थान सरकारचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्य बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सर्व बाजारपेठा, आस्थापने व शासकीय कार्यालये बंद राहतील. रोडवेसह सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांच्या वाहतुकीवरही बंदी घातली आहे. या काळात काही महसूल संबंधित बाबींमध्ये काम केले जाऊ शकते.त्यामुळे राजस्थानमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्य ३१ मार्चपर्यंत बंद राहील. याबाबत राजस्थानच्या गृह विभागाने सविस्तर आदेशही जारी केले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget