कोरोनाचा कहर ; या आठवडय़ात उच्च न्यायालयाचे कामकाज दोनच दिवस सुरु

मुंबई - करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा इशारा म्हणून उच्च न्यायालय प्रशासनाने पुढील आठवडय़ात केवळ दोनच (२३ आणि २४ मार्च) दिवस काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खंडपीठांची संख्याही कमी करण्यात आली असून, अत्यंत तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा आदेश उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांना लागू असणार आहे. 
सर्व खंडपीठांचे कामकाज मंगळवारपासून दोनच तास चालवण्यात येत आहे. कनिष्ठ न्यायालयाचे कामकाजही तीनपेक्षा अधिक तास चालवण्यात येऊ नये, असे आदेशही उच्च न्यायालय प्रशासनाने दिले होते. पुढील आदेशापर्यंत अशाचप्रकारे कामकाज चालणार असून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्याचेही उच्च न्यायालय प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु मुंबईसह राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि राज्य सरकारनेही गर्दी टाळण्याचे आव्हान केले आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ात उच्च न्यायालयाचे कामकाज केवळ २३ आणि २६ मार्च असे दोनच दिवस आणि तेही दुपारी १२ ते २ या वेळेत होईल. याबाबतचे परिपत्रक उच्च न्यायालयाचे महानिबंधक एस. बी. अग्रवाल यांनी प्रसिद्ध केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget