मुंबईवर कोरोनाचे सावट; मुंबईमध्ये लोकलची गर्दी कमी होत नाही

मुंबई - देशात सर्वच राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने लोकांची भीती वाढली आहे.शिवाय मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.तरीही, लाखो मुंबईकर आजही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सरकार गर्दी करु नका असे सांगत असताना देखील याची गंभीरपणे कोणीही दाखल घेताना दिसत नाही.खासगी कंपन्यांची कार्यालय आणि इतर कार्यालय सुरुच आहेत. त्यामुळे नाईलाजाने लोकांना कामावर जावे लागत असल्याने मुंबईतली गर्दी या महामारीतही कायम आहे. इतर देश ज्या प्रकारे कोरोनाबाबत उपाययोजना करत आहे. तशी स्थिती महाराष्ट्रात खासकरुन मुंबईत दिसून येत नाही. एकीकडे सरकारने शाळा,कॉलेज,सिनेमागृह,मॉल आणि मपर्यटन स्थळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु, सरकार खासगी कंपन्यांना कोणतेही आदेश द्यायला तयार नाही. मात्र लोकांना एकमेकात सुरक्षित अंतर ठेवा असा सल्ला देत आहे. मुंबईत रोज लाखो चाकरमानी जीव हातात घेऊन लोकलने प्रवास करत असतात. पण आता या महामारीपुढे ही चाकरमान्यांपुढे जीव मुठीत घेऊन कामाला जाण्य़ाशिवाय काहीही पर्य़ाय दिसत नाही.आजूबाजूच्या शहरांमधून मुंबईत कामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होताना दिसत नाही.यामुळे जर मुंबईत कोरोना पसरला तर किती भंयकर परिस्थिती निर्माण होईल याचे गांभिर्य अजून ही सरकारला आले नाही असेच वाटते.. मुंबईच्या लोकलमध्ये ज्या प्रकारे लोकं गर्दीत प्रवास करतात. ते पाहता मुंबईत जर कोरोना आला तर मुंबईत मोठा हाहाकार माजू शकतो. आणि परिस्थिती हाताच्या बाहेर जावू शकते. हे सरकारने जाणून घेतले पाहिजे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget