नवीमुंबई महापालिका निवडणूक पुढे गेल्याने नागरी कामे मंजूर करण्याचा सपाटा

नवी मुंबई - करोना विषाणू संसर्गामुळे सभा, सभारंभ, बैठका घेण्यास सरकारने बंदी घातली असताना शुक्रवारी नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभेत ४५ नागरी कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नवी मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता न लागता निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याने नगरसेवकांनी प्रशासनाकडून नागरी कामे मंजूर करण्याचा सपाटा लावला आहे. या नागरी कामांतून मतदारांना खूश तर केले जाते, शिवाय खिसेही भरत असल्याने कामे मंजूर करण्यावर जास्त भर असल्याचे दिसून आले आहे. 
नवी मुंबई पालिकेची एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात निवडणूक होणार होती. मात्र करोना संसर्गामुळे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. पालिका प्रशासनाने निवडणूक कालावधी लक्षात घेता मागील महिन्यापासून नागरी कामांचे प्रस्ताव सादर करू नयेत असे निर्देश जारी केले होते, मात्र आचारसंहिता लागेपर्यंत स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत नागरी कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याची अहमहमिका लागली होती. राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आल्याने गंभीर स्थिती असल्याचे राज्य सरकार जाहीर करीत आहे. असे असताना केवळ आपले प्रस्ताव मंजूर व्हावेत यासाठी शुक्रवारी स्थायी समितीची सभा सभापती नवीन गवते यांनी आयोजित केली होती. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ही सभा घेऊ नये, असे सुचविले होते; पण सर्वपक्षीय नगरसेवकांची नागरी कामे शेवटच्या क्षणी मंजूर करण्यासाठी ही स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती.माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दहा व रामास्वामी यांच्या दोन वर्षांच्या कालावधीत नगरसेवकांनी सुचविलेल्या अनेक कामांना कात्री लागली होती. ती सर्व कामे या काळात मंजूर करून घेण्यावर नगरसेवकांनी भर दिला होता. निवडणूक जाहीरनाम्यात ही कामे केल्याचा दावा करण्याबरोबरच या कामातून स्थानिक नगरसेवकांना कंत्राटदारांकडून पैसे दिल्याचे बोलले जात आहे निवडणुकीसाठी लागणारा खर्च या नागरी कामांच्या लक्ष्मीदर्शनामुळे होणार असल्याने मागील दोन ते तीन महिन्यांत अनेक नगरसेवकांची असंख्य नागरी कामे झालेली आहेत. 

सत्ताधारी सदस्यांनी नियम डावलून सभा घेतली आहे. नगरविकास विभागाने ज्या प्रस्तावांना स्थगिती दिली असूनदेखील ते प्रस्ताव पुन्हा पटलावर घेत प्रस्ताव नामंजूर केले.पैशांकरिता हा सगळा आटापिटा सुरू आहे. स्थायी समिती सभापती व त्यांना साथ देणाऱ्या सदस्यांवर कारवाई करावी. 
विजय चौगुले, विरोधी पक्षनेते 

स्थायी समिती सभा रद्द करण्यासंदर्भात महापौर व सभापती यांना विनंती करण्यात आली होती. तरीदेखील त्यांनी सभा घेतली. बैठकीत प्रशासनाचे केवळ तीन अधिकारी उपस्थित होते. 
अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त 

या प्रस्तावातून महापालिकेची ११ कोटींची लूट होणार होती. त्यामुळे आम्ही हे पुन्हा पटलावर घेऊन नामंजूर केले आहेत. आजची सभा ही लोकहिताच्या कामासाठी घेतली होती. तसेच आयुक्तांकडून कोणतीही विनंती आली नव्हती. आधी तीनच विषय पटलावर होते, मग उलट आयुक्तांनी उर्वरित प्रस्ताव कसे काय आणले? 
-नवीन गवते, सभापती, स्थायी समिती 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget