छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला चोप

चंद्रपूर - छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन त्याच्या तोंडाला काळे फासल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी केलेल्या या कृत्याचे भाजपाचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भातील एक पोस्टच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.भाजपाचे खासदार असणाऱ्या संभाजीराजे यांनी ‘फुल्ल सपोर्ट’ या नावाने एक पोस्ट शेअर करत शिवसैनिकांचे कौतुक केले आहे. “विमानातून बाहेर आलो आणि मोबाईल मध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही,” असे संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इतकेच नाही पुढे त्यांनी या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता असेही म्हटले आहे. “मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन,” अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी शिवसैनिकांचे कौतुक केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget