कोरोनाचा सामना करण्यासाठी उद्योजक अनिल अग्रवालांची १०० कोटींची मदत

मुंबई - देशात कोरोनांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनार नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. काल जनता कर्फ्यूच्या माध्यमातून ५ वाजता संपूर्ण देश या कठीण परस्थितीत एकत्र असल्यांचे दृश्य संपूर्ण जगाने पाहिले. त्यातच आता कोरोनाचा सामना करण्यासाठी व्यापारी आणि उद्योजग पुढे येत आहेत. आनंद महिंद्राच्या घोषणेनंतर वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही मदतीची घोषणा केली आहे.अनिल अग्रवाल यांनी कोरोना रोखण्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोना विषाणूचे औषध तयार करण्यासाठी ५ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
महिंद्र अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी पहिल्यांदा स्वत: स्वेच्छेने पुढे येत आपला संपूर्ण पगार देशाला देण्याची घोषणा केली होता. तसेच आपल्या सहकाऱ्यांना देखील कोरोना फंडामध्ये देणगी देण्यासाठी त्यांनी आवाहन केले. येत्या काही महिन्यांत अधिकाधिक हातभार लावणार असल्याचं ही त्यांनी म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget