इराणमधून २३४ भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली - करोना व्हायरसने थैमान घातलेल्या इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणहून भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत आले. इराणमधून आलेल्या नागरिकांची आधी तपासणी करण्यात येणार आहे. जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतत्रं कक्षात सर्वांची करोनाची तपासणी करण्यात येईल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडले जाईल.इराणमधून मंगळवारी ५८ प्रवाशांना आणण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी ४४ प्रवाशांना आणले गेले होते. इराणमध्ये शनिवारी करोना व्हायरसने जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला. यानुसार इराणमधील करोनामुळे मृतांची संख्या ७००पर्यंत पोहोचली. इराणमध्ये १३ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. पश्चिम आशियात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव इराणमध्ये झाला आहे.इराणचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली आहे. इरानचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सल्लागारालाही करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाने दोन आठवड्यांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget