झोपू प्राधिकरणातील सुरक्षा रक्षकाला जबाबदारीचे भान

सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेटवर दिसतात उभे 
मुंबई - झोपू प्राधिकरण बांद्रा पूर्व या कार्यालयात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी धारकांची आणि विकासकांची वर्दळ पाहायला मिळते.कित्येक वेळा झोपू प्राधिकरणावर झोपडपट्टी धारकांकडून मोर्चा काढण्यात येत असतो अशा वेळी झोपू प्राधिकरण कार्यालयाच्या गेट बाहेरील सुरक्षा रक्षकांवर मोठा भार असतो त्यांना झोपडपट्टीधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.पोलीस नंतर येतात परंतु, अगोदर या सुरक्षा रक्षकांवर संपूर्ण जबाबदारी असते अशा स्थितीत मोर्चा आला कि, त्यांना गेट बाहेरच थांबविण्याचे आदेश असल्याने सुरक्षा रक्षक आपल्या जीवाची काळजी न करता त्यांना थांबविण्याचे प्रयत्न करत असतात.कित्येक वेळा त्यांना इजाही होत असते. कशाचीही पर्वा न करता ते आपली जबाबदारी पार पाडत असतात. सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत गेटबाहेर उन्हे राहून आपली ड्युटी करताना दिसतात.यातील काही सुरक्षा रक्षक कार्यालयाच्या आत आपली ड्युटी करत असतात परंतु आतमध्ये एसी असल्याने आणि बसण्यासाठी आसन असल्याने त्यांना त्रास होत नसतो.परंतु,गेट बाहेर असलेले सुरक्षा रक्षक सतत उभे राहून चोखपने आपली जबाबदारी पार पडताना बघण्यात येते.. यातच श्री.विलास आंबुलकर हे गेल्या १० वर्षांपासून झोपू प्राधिकरणामध्ये कार्यरत असून नित्य नियमाने ते त्यांची जबाबदारी पार पडताना नागरिक वार्ताचे संपादक यांनी पहिली आहे.खरेतर अशा लोकांचा गौरव करण्यात आला पाहिजे.झोपू प्राधिकरणातील कार्यकारी अधिकारी श्री.दीपक कपूर याकडे जातीने लक्ष घालतील आणि गेट बाहेरील सुरक्षा रक्षकांचाही गौरव करतीलच यात शंका नाही. सतत उभे राहून त्या सुरक्षा रक्षकांचेही पाय दुखत असतील हा विचार करून त्यांनाही कार्यालयाच्या आत तर कधी बाहेर ड्युटी दिली पाहिजे अशी बदली झाल्याने त्यांना काम करण्याची स्फूर्ती मिळून अधिक जोमाने काम करतील.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget