भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरीसेवेला प्रारंभ

मुंबई - भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो पॅक्स फेरी सेवा रविवारपासून सुरू करण्यात आली.त्यामुळे प्रवाशांना आता फक्त ४५ मिनिटात मांडव्याला पोहोचता येणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड आणि कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. 
महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. शासनाने मांडावा जेट्टी येथे यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असून किनारपट्टीच्या भागात सर्वत्र अशी जलवाहतूक सुरु करता येईल का ते आम्ही पाहत आहोत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या. प्रवाशांसाठी ही फेरीसेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा वारसा, एका आधुनिक पद्धतीनं आपण पुढे नेत आहोत, यासेवेमुळे, भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ पाऊण तासात पूर्ण होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होईल. मुंबई-गोवा मार्गावरची वाहतुक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget