इटलीमध्ये अडकलेल्या २६३ भारतीयांना विशेष विमानाने दिल्लीत आणले

नवी दिल्ली - संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे.देशातील कित्येक नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये फसले आहेत. त्यातच इटलीमध्ये फसलेल्या २६३ भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विमानाने सुरक्षित भारतात आणले आहे. यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव हा इटलीवर होत आहे. इटलीमध्ये एकाच दिवसात ७९३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात १२ हजाराहून अधिक लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. तर जवळपास अडीच लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.इटलीमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी कोरोनामुळे इटलीमध्ये ६२७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५९८६ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण ४०३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर ४७ हजाराहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.भारताने कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक देशांमधून भारतात येण्यासाठी विमान उपलब्ध नाहीत. पण भारत सरकार इतर देशांमध्ये फसलेल्या लोकांना भारतात आणण्याचे काम करत आहे. आतापर्यंत इटली आणि इराण मधून ४०० हून अधिक लोकांना विशेष विमानाने भारतात आणले गेले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget