करोना विषाणूचा निवडणुकीला फटका ; पालिका निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता

नवी मुंबई - करोना विषाणू संसर्गामुळे केंद्र सरकारने सर्व देशातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले असल्याने नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाच नवीन नागरी कामांचा शुभारंभ तातडीने रद्द करण्यात आला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई व औरंगाबाद पालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता अधिकारी वर्गात व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे. 
नवी मुंबई पालिकेच्या नगरसेवक सभागृहाची मुदत नऊ मे रोजी संपत आहे. तोपर्यंत पालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. सध्या प्रभागनिहाय मतदारांची यादी प्रसारित करण्यात आली असून त्यावर हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. प्रभाग कार्यालयात ठेवण्यात आलेल्या या मतदार यादींमुळे सध्या हरकती नोंदवण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची झुंबड प्रभाग कार्यालयात आहे. शहरात सर्वत्र निवडणुकीचा माहोल असल्याने हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांचा तर बार उडविला जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची आतापर्यंत आचारसंहिता लागू न झाल्याने आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांचे फावले आहे. केवळ निवडणुका असल्यामुळे नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात नागरी कामांचा शुभारंभ सुरू असून देशातील या संकटांची फारशी चिंता न करता इच्छुक उमेदवारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीमुळे मोठय़ा प्रमाणात नागरिक एकत्र येण्याची अहमहमिका लागलेल्या नवी मुंबई व औरंगाबाद पालिकेच्या निवडणुका देशावरील करोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत पुढे ढकलण्याची चर्चा सुरू आहे. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget