रविवारी ३,७०० ट्रेन बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

नवी दिल्ली - देशात करोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च (रविवार) सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी या कालावधीत जनतेनं घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. आता रेल्वेनेही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेन यासंबंधी परिपत्रकही काढले आहे. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
२१/२२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget