चटईक्षेत्रफळ वितरणासाठी ‘झोपु’मध्ये स्वतंत्र कक्ष

मुंबई - झोपडीवासीयांना २६९ ऐवजी ३०० चौ.फुटांचे घर मिळण्यातील विलंब दूर करण्यासाठी राज्य सरकारने उपमुख्य अभियंत्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कक्ष सुरू केला असून ही प्रकरणे एक महिन्यात निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता थेट चटई क्षेत्रफळ वितरण होणार असल्याने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्या अधिकारांचा संकोच झाल्याचे मानले जाते. 
नव्या विकास आराखडय़ात झोपडीवासीयांना ३०० चौ. फुटाचे घर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मंत्री आव्हाड यांनी त्याअनुषंगाने घोषणाही केली. झोपडीवासीयांना सध्याच्या २६९ चौ. फुटांच्या घराऐवजी ३०० चौ. फुटांचे घर मिळणार असल्यामुळे अनेक विकासकांनी प्रकल्प थांबवले होते. काही प्रकल्पात अर्धवट बांधकाम झाले होते, तर काही प्रकरणांना प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. ही प्रकरणे रखडली असल्याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला होता. अशा प्रकारच्या ४०० फाईल्स प्रलंबित असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. या सर्व प्रकरणांबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आव्हाड यांनी विधिमंडळात दिले होते. त्यानुसार गुरुवारी शासन निर्णय जारी करून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. प्राधिकरणाचे उपमुख्य अभियंता आर. बी. मिटकर यांना या कक्षाचे प्रमुख नेमण्यात आले. २६९ वरून ३०० चौ. फूट क्षेत्रफळ लागू केल्यास ३१ चौरस फूट चटईक्षेत्रफळ विकासकांना उपलब्ध होणार आहे. झोपडपट्टी कायद्यानुसार चटईक्षेत्रफळ वितरणाचा अधिकार फक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. असा निर्णय घेऊन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याआधी झोपडपट्टी कायद्यात सुधारणा करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता स्वतंत्र कक्षाचा निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

म्हाडामध्ये वसाहतींच्या पुनर्विकासाची प्रकरणे निकालात काढण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. तसे असले तरी पुनर्विकासाशी संबंधित प्रत्येक फाईल उपाध्यक्षांच्या मंजुरीनंतरच निकाली काढली जाते. झोपडपट्टी प्राधिकरणात उपमुख्य अभियंता मिटकर यांना कक्ष प्रमुख नेमण्यात आले असले तरी झोपडपट्टी कायद्यानुसार या सर्व फाईली निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागणार किंवा नाही, हे या आदेशात म्हटलेले नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

प्राधिकरण तातडीने प्रकरणे निकालात काढत नसल्यामुळे स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली आहे. फक्त ३१ चौरस फूट चटईक्षेत्रफळाचा हा प्रश्न आहे. त्यासाठी इतका गहजब करण्याची गरज नाही. झोपु योजना तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच हा भाग आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget