चेक बाउन्स प्रकरणी आठ महिने कारावास

वैजापूर - महिला पतसंस्थेचे कर्ज फेडण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) न वटल्याप्रकरणी कुसुम भाऊसाहेब हेकडे (रा. विद्यानगर) या महिलेस न्यायालयाने आठ महिने कारावास व २३ हजार ३३६ रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन महिने शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
शहरातील विद्यानगर भागातील रहिवासी कुसुम हेकडे हिने रेणुकामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून दहा हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, तिने विहित मुदतीत कर्जाची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेने तिच्याकडे वारंवार थकित रकमेची मागणी केली. त्यामुळे हेकडेने औरंगाबाद जालना ग्रामीण (महाराष्ट्र गोदावरी ) बँकेचा ११ हजार ६६८ रुपयांचा धनादेश दिला. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. त्यामुळे पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय शिंदे यांनी अॅड. एस. एस. ठोळे यांच्यामार्फत हेकडे हिस नोटिस पाठवून धनादेशाची रक्कम पंधरा दिवसात जमा करण्यास सांगितले. तरीही हेकडे हिने रक्कम न भरल्यामुळे पतसंस्थेने अॅड. एस. एस. शिंदे यांच्या मार्फत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १३८नुसार न्यायालयात फिर्याद दाखल केली. याप्रकरणात फिर्याद, सबळ साक्षीपुरावा व दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. आर. शिंदे यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget