अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली; प्रवाशी सुखरुप

अलिबाग - अलिबागजवळ समुद्रात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून मांडवा येथे प्रवासी घेऊन निघालेल्या या बोटीचा अपघात झाला आहे. खडकावर आदळून बोट पालटली. या बोटीत ७८ प्रवाशी होते. या सर्व प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांच्या बोटीने या प्रवाशांना बाहेर काढले आहे. प्रवाशी सुखरूप बाहेर आले असून सुदैवाने अनर्थ टळला. जेट्टीजवळ पोहोचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget