अहमदनगरमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखाची हत्या

शिर्डी - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश गिरे पाटील यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय आहे. भोजडे गावातील रहिवासी असलेले सुरेश गिरे काल रविवार १५ मार्च रोजी घरी होते. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास बाईक आणि कारमधून पाच ते सहा हल्लेखोर आले. त्यांनी गिरे यांना बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने वार केल्याचीही माहिती आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी सुरेश गिरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.गोळीबारात गंभीर जखमी झाल्यामुळे सुरेश गिरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.सुरेश गिरे यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्ववैमनस्यातून त्यांचा जीव घेतला गेल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget