कोरोनाचा धसका; कोकण रेल्वे मार्गावरील पॅरेंजर रद्द

मुंबई - कोरोनामुळे राज्यशासनाने प्रवास करु नये, असे आवाहन करुनही अनेक जण मुंबईतून गावी जाण्यास प्राधान्य देत आहेत. कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अचानक वाढले आहे. राज्य शासनाने ३१ मार्च २०२० पर्यंत प्रमुख महानगरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून घरीच राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. असे असताना काही जण स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घातल आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा अंशत: बंद करण्याचा घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर,एक्सप्रेस गाड्यारद्द करण्यात आल्या होत्या कोकणात जाऊ नका आणि येऊ नका, असे आवाहन करण्यात येत आहे. 
दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही संख्या ६४वर पोहोचली आहे.कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरीच राहावे, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सगळ्यांनी घरीच राहून सर्वांना पोहोचणारा धोका टाळा, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोंकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. यात मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, डबल डेकर, तुतारी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget