कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

भोपाळ - सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचे आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचे कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणे सरकारला कठीण झाले असल्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.याआधी मध्यप्रदेशच्या १६ बंडखोर आमदारांचा राजीनामा गुरुवारी रात्री विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी मंजूर केला आहे. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या २२ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे सर्व आमदार कर्नाटकमध्ये हलवण्यात आले होते.

विधानसभेतील आमदारांची संख्या
मध्यप्रदेश विधानसभेच्या एकूण जागा २३०
२ आमदारांचं निधन - २२८ 
काँग्रेसच्या २२ आमदारांचा राजीनामा - २०६
आता विधानसभेत बहुमताचा आकडा - १०४

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget