कोरोना; दिशाभूल मेसेज आणि भंबेरी...

कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून,जगातील लोक आज कोरोनाच्या भितीमुळे घाबरून गेले आहेत.कोरोनाबाधित कुटुंबीयांवर आसपासच्या नागरिकांनी बहिष्कार टाकल्याचेही समोर आले आहे. हे तर मानव जातीच्या विरोधातले कृत्य म्हणावे लागेल. आपल्या देशात सत्तरहून जास्त लोक पॉझिटिव्ह आहेत त्यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हे सत्य आहे! पण त्यासाठी अख्या देशातील नागरिकांनी घाबरून जाणे हे विचीत्र मानसिकतेचे लक्षण आहे.खरेतर यावर न घाबरता काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.नाहीतरी आपण कामाला जाताना रोज कितीतरी टीबी पेशंटच्या संपर्कात येत असतो श्र्वासावाटे होणारे किंवा स्पर्शातून होणारे शेकडो आजार आणि शेकडो बाधित व्यक्ती आपल्या संपर्कात रोज येत असतात. दररोज आपण हजारो व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो. बस,रिक्षा,टॅक्शी,लोकल, सार्वजनिक स्वच्छतागृह, हॉटेल, पाणी, हवा, माती कोरोनाच्या कितीतरी भयंकर विषाणू आपण भारतीय लोक नकळत रोज सामोरे जात असतो.आपली हम्मुनिटी खूप मजबूत आहे त्यामुळे असेल आजार आपल्याला लागत नाही.हजारातून एकादुसऱ्याला त्याची लागण होत असते.त्यासाठी कोण घाबरून जात नाही मग आता कोरोना व्हायरसमुळे भंबेरी कशाला होते.जेव्हा २०१७ मध्ये सार्स जगातील २० देशात धुमाकूळ घालत होता तेव्हा भारतात त्यामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. आपली लोकसंख्या आणि जगण्याची पद्धत एवढी भयंकर आहे की, अख्खा देश इन्फेक्ट व्हायला एक आठवडा पुरेसा आहे पण असे होत नाही कारण आपली इम्युनिटी खूप मजबूत आहे.देशातील नागरिक मास्क लावून का फिरत आहेत त्यामुळे याचा तुटवडा भासत असून मेडिकल दुकानदारदेखील हा मास्क जास्त दारात विकल्याचे समोर येत आहे.आपल्या देशात नवीन कोरोना व्हायरसचा मॉरटॅलिटी रेट आजच्या घडीला फक्त १% आहे. म्हणजे शंभर जण कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्यातील एकाचा मृत्यू होऊ शकतो.खरेतर,नको असलेली माहिती पसरविली जात असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.सर्वच वृत्तवाहिनीवर सध्या कोरोनाचीच बटमो दाखविली जात आहे.कोरोनाच्या ‘इपिडेमिक’ पेक्षा लोकांचा ‘इन्फोडेमिक’ जास्त वेगाने हानीकारक आहे. जगभरात या आजाराने झालेल्या मृत्युमध्ये साधारणपणे पन्नाशी, साठी ओलांडलेले किंवा आधीच श्वसनाचे आजारी आहेत ज्यांना ही लागण झाली आहे. याचा अर्थ काय होतो तर, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्याला साधारण इन्फेक्शन होत नाही आणि जरी झाले तरी उपचार योग्य घेऊन ठणठणीत बरे होता येते. ज्या वुहानमध्ये दीड महिन्यांपूर्वी मृत्यदर १७% होता तिथे तो आज ४% आहे. म्हणजे याच्यावर नियंत्रण मिळवणे तेवढे जास्त कठीण नाही.हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.मास्क लावण्याचा उद्देश हा नाही की, दुसऱ्यामुळे आपल्याला होणारे इन्फेक्शन थांबावे तर मुख्य उद्देश हा आहे की, आपल्यामुळे कोणाला इन्फेक्शन होऊ नये. जर स्वत:ला खरेच काही ताप, खोकला, श्वसनास त्रास असेल तर मास्क लावणे गरजेचे आहे.कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचे संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसतात. हा विषाणूचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही. सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, कोरोना विषाणूचा मूळ स्रेत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसमुळेच महारोगराई पसरल्याचे अखेर घोषित केले आहे. कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढायला हवे, असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्याही दर दिवशी वाढत आहे. मुंबई आणि पुण्यासह, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता चीनचा हा आजार आपल्याही दारात आल्याच्या भीतीने सर्वसामान्यांची आणि प्रशासनाचीही चांगलीच भंबेरी उडाली आहे. दोनच दिवसांत कोरोनाच्या भीतीने विधिमंडळाचे अधिवेशनही गुंडाळण्यात येणार आहे, तर शाळा-कॉलेजेसनाही सुट्टय़ा जाहीर झाल्या असून,मॉल आणि सिनेमागृह बंद ठजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या आजाराबाबतची भीती पसरवणे आता बंद करावे,सामान्य शहाणपणाने असे फॉरवर्डेड व्हीडिओ आता प्रत्येकानेच पुढे पाठवणे बंद केले पाहिजे, तरच याला काही प्रमाणात आळा बसू शकेल.चीनमध्ये कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष मृत्यू झालेल्यांची आकडेवारी यात मोठी तफावत आहे. चीनमधील मृत्यूदर हा केवळ तीन टक्के आहे. तरीही वृत्तवाहिन्यांवर रोज नव्या येणाऱ्या बातम्यांमधून या आजारावर मुक्तता नाही, अशी भीती निर्माण केली जात आहे. जी पूर्णपणे चुकीची आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचे स्तोम वाढल्याने योग्य माहिती आणि आजार उद्भवण्यामागचे सत्य आणि तथ्य मात्र जनतेपर्यंत पोहोचू शकलेले नाही. त्यामुळेच कोरोनाबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget