येस बँकेवरील निर्बंध हटणार ; खातेधारकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली - बुडीत कर्ज आणि व्यवहारातील अनियमिततेमुळे येस बँकेवर गेल्या आठवडय़ात घालण्यात आलेले निर्बंध १८ मार्चपासून हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे खातेधारकांना ५० हजारांहून अधिक रक्कम काढता येणार आहे. आतापर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांमुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील केवळ ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत होती, मात्र आता खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
येस बँकेच्या पुनर्बाधणी योजनेला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या बँकेच्या खातेदारांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात शासकीय आदेश जारी झाल्यानंतर तीन दिवसांत येस बँकेवरील निर्बंध मागे घेतले जातील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली होती. त्यानंतर शासकीय आदेश जारी करण्यात आला असून तीन दिवसांनंतर घालण्यात आलेले निर्बंध हटविण्यात येणार आहेत. बुडीत कर्ज आणि व्यवहारातील अनियमिततेमुळे येस बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध लादले होते. त्यानंतर येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुनर्बाधणी योजना तयार करण्यात आली होती. या योजनेला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 
आराखडय़ानुसार स्टेट बँक त्या बँकेचे ४९ टक्के भागभांडवल संपादित करणार आहे. अ‍ॅक्सिस बँक येस बँकेत ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. एचडीएफसी बँकेनेही येस बँकेत १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकही येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget