शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई - जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना शेअर बाजारावर देखील याचा परिणाम दिसत आहे. सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेंसेक्स २३०७ अंकांनी पडलं. शेअर बाजार आज २७६०८ अंकावर उघडला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जवळपास ८०० अंकांनी घसरला. स्टॉक एक्सचेंज ७९४५ अंकावर उघडला.सकाळी ९.४० वाजता सेंसेक्स २७७५ अंकांनी घसरुन २७,१४० अंकावर आला. तर निफ़्टी ७,९४१ अंकावर पोहोचला. ८६० शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर फक्त ९० शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली.
याआधी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळाला होता. सेंसेक्स ४०० अंकांनी मजबूत झाला होता. निफ्टीमध्ये जवळपास १०० अंकांची वाढ झाली होती. पण काही वेळेतच घसरण ही पाहायला मिळाली.शुक्रवारी सेंसेक्स ५.७५ टक्क्यांनी म्हणजेच १६२७.७३ अंकांनी मजबूत होत २९,९१५.९६ वर बंद झाला होता. निफ्टी ४८२ अंकांनी मजबूत होत ८,७४५ अंकावर राहिला. एक दिवसाआधी तुलना केली तर सेंसेक्स २२०० अंकांनी रिकव्हर होत बंद झाला. तर निफ्टी ६८५ अंकांनी मजबूत झाला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget