लहान व्यावसायिक आणि मजुरांना मदतीचा हात द्यायला हवा - सोनिया गांधी

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या घरात पोहचत आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जनतेला कोरोनाला न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 'कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आणि कोरोना संशयितांशी चाचणी करण्यासाठी तपासणीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. तसेच कोरोनाचा प्रभाव लहान व्यावसायिक आणि मजुरांवर पडला आहे. त्यासाठी सरकारने मदतीचे पॅकेजही जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. 
कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी चाचणी करणे, हा एक उत्तम उपाय आहे. देशामध्ये १३० कोटी लोक आहेत. त्यामध्ये आतापर्यंत १५ हजार ७०१ लोकांची चाचणी झाली आहे. उर्वरित लोकांच्या सुरक्षेसाठी आपण इतर देशांकडून शिकण्याची गरज आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आणि कोरोना संशयितांशी चाचणी होईल,अशी व्यवस्था करायला हवी, असे त्या म्हणाल्या.रुग्णालयातील खाट, आयसोलेशन वार्ड, व्हेंटीलेटर्स आणि वैद्यकीय टीम कमी असल्याची माहिती आहे. यासाठी एक पोर्टल बनवण्याची गरज आहे. जिथे सर्व माहिती मिळेल. तसेच यासाठी एक वेगळे अर्थनियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार होत असल्याची माहिती आहे. अशा गोष्टीवर कारवाई करून वस्तूचा पुरवठा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. नोटांबदीनंतर डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूने झटका दिला आहे. त्याचा परिणाम लहान व्यवसायिक आणि मजुरांवर पडला आहे. अशा वेळी सरकारने त्यांच्या आर्थिक मदतीसाठी उपाययोजना करायला हव्यात. प्रत्येक विभागाला दिलासा द्यायला हवा, तसेच कोरोनाचा प्रभाव शेतकऱ्यांवरही पडला आहे. त्यांच्यासाठीही सरकारने उपाययोजना करायला हव्यात, असेही सोनिया गांधींनी म्हटले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget