काँग्रेसला बहुमताची चिंता नाही - हरिश रावत

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केले. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर मध्य प्रदेशातील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना खबरदारी म्हणून राज्याबाहेर हलवले होते. यापैकी काँग्रेसचे आमदार रविवारी हरिश रावत यांच्यासोबत भोपाळमध्ये परतले. यावेळी हरिश रावत यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आम्ही उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला त्याची बिलकूल चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे त्यांनी म्हटले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget