सरकारी नोकरी बढतीत आरक्षण ; उद्धव ठाकरेंचे विधान परिषदेत आश्वासन

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी नोकरीत अनुसुचित जाती-जमातींसाठीच्या आरक्षणानुसार बढती देणार असल्याचे स्पष्ट केले आहे विधानपरिषदेचे आमदार हरिसिंह राठोड यांनी सरकारी नोकरीच्या बढतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ही भूमिका स्पष्ट केली.हरिसिंह राठोड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद असतानाही राज्यात सरकारी नोकरीत बढतीमध्ये आरक्षण दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार मागासवर्गासोबत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा सर्व समाजाच्या पाठिशी ठाम उभा आहे. महाराष्ट्र सरकारने या विषयासाठी वकिलांची मोठी फळी सर्वोच्च न्यायालयात उभी केली आहे. जे शक्य होईल ते करु. लवकरच मागासवर्गीयांना आरक्षणनुसार पदोन्नती देईल. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. यावर उत्तर मागणे माझ्याकडून योग्य नाही.
राज्य सरकारने सरळसेवेने नियुक्ती झालेल्यांना वरिष्ठ पदांच्या बढत्यांसाठी आरक्षण अधिनियमन २००४ पासून लागू केलेले आहे. उच्च न्यायालयाने २०१७ च्या आदेशान्वये रद्द केली आहे. त्या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे.परंतू सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या इतर निकालांचा अभ्यास करुन महाधिवक्त्यांनी ते निकाल राज्यातील प्रकरणांमध्ये लागू करता येणार नाही, असा अभिप्राय दिला. कारण राज्यातील याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे सद्यस्थितीत बढतीतील आरक्षणानुसार कारवाई करता येत नाही. सध्या खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यात येत आहेत. त्यात मागासवर्गीयांना देखील पदोन्नती देण्यात येत आहे.
शासन नेहमीच या समाज घटकांच्या पाठिशी उभे राहिले आहे. परंतू हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आपण यात गुंतागुंत तयार होईल, असे काही करु नये, अशीही विनंती उद्धव ठाकरे यांनी रोठोड यांना केली.बढतीमध्ये आरक्षण देणं हे सर्वस्वी राज्यावर अवलंबून असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यावर राज्याने निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न भाई गिरकर यांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी असे असेल तर गेल्या ५ वर्षात हे का झालं नाही? हे तपासून बघू असा टोला लगावला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget