April 2020

नवी मुंबई - नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आणखी दोन भाजीपाला व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही व्यापारी कोरोनाबाधित व्यापाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे म्हटले जात आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने एपीएमसीमधील भाजीपाला मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे दोन्ही व्यापारी मार्केटमधील E विंगमध्ये व्यापार करत होते. दोघांना कोरोनाची लागण झाल्याने E विंग पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या दोघांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे दोघेही कोरोनाबाधित व्यापारी जवळपास ४० जणांच्या संपर्कात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शनिवारपासून भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय भाजीपाला महासंघातर्फे घेण्यात आला आहे.
पहिल्यांदा एपीएमसी मार्केटमध्ये २७ एप्रिलला एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर २८ एप्रिलला एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. याआधीही L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेट्स लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाईझ करुन गाड्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यपारी आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे नियम येथे पाळले जात नसल्याने कोरोना रुग्णामंध्ये वाढ होत आहे.

वॉशिंगटन - एका मोठ्या संशोधनात रेमदेसिव्हीर हे औषध कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. आज अमेरिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेमदेसिव्हीर हे औषध पुरेशा प्रमाणात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.संशोधनात १०६३ रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांना रेमदेसिव्हीर औषध देण्यात आले, त्यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा काळ ३१ टक्क्यांनी घटला. पूर्वी कोरोना रुग्णाला बरे होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागायचा, आता ११ दिवसातच रुग्णांची प्रकृती स्थिर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर औषध हे मृत्यू दर देखील कमी करत असावे, मात्र आशिक निष्कर्षांवरून हे सिद्ध झालेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.रेमदेसिव्हीर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करू शकतो, एवढेच या संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, रेमदेसिव्हीरची चाचणी ही आरोग्य दुरुस्तीचे मानक असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त कोरोना विषाणूविरुद्ध इतर दुसरे औषध शोधावे लागेल, असे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे चिकित्सक डॉ. अँटोनी फॉसी यांनी व्हाईटहाऊसमधून बोलताना सांगितले.

श्रीनगर - दहशतवाद्यांशी संबध असल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक देविंदर सिंग यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज काश्मीर पोलीस आणि एनआयएने तारिक अहमद मीरला अटक केली आहे. त्याच्याकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी तारिक अहमद मिरला अटक केली आहे. मीरचे देविंदर सिंगशीही संबंध होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.जम्मू काश्मीर पोलीस दलात सिंग पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. जानेवरीमध्ये दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून घेवून जात असताना त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर नावेद बाबू, आतिफ आणि इरफान असे तीघेजण त्यांच्या गाडीतून जात होते. या सर्वांना सिंग यांनी त्राल आणि जम्मू येथील आपल्या घरी ही आश्रय दिला होता.देविंदर सिंह यांना अटक केली तेव्हा त्यांच्या गाडीत शस्त्रसाठी आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला असता आणखी शस्त्रसाठा सापडला. या अधिकाऱ्याला चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यातही आले होते.ते श्रीनगर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात होते.

मध्यप्रदेश - तबलिगी जमातशी संबंधित एका दाम्पत्याला बासवाडा मध्यप्रदेशच्या सीमेवर अडवण्यात आले. तेथूनच त्यांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले. यावरून प्रशासन आपल्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे कोणतेही विलगीकरण केंद्रात राहिल्याचे पुरावे नव्हते आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरणाचे नियम लागू असतील, असे म्हटले आहे.
तबलिगीजिल्ह्यातील रहिवासी मोईन खान आणि त्यांची पत्नी १५ मार्चला दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकज जमातमध्ये सहभागी झाले होते. तेथे दोन दिवस थांबून जयपूरच्या जमात बरोबर मध्यप्रदेशमधील दतिया येथे गेले. तेथे हे दाम्पत्य सात दिवस राहिले. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर त्यांना दतियामध्ये विलगीकरण ठेवण्यात आले. १ एप्रिलला दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, त्यांना विलगीकरणात काही दिवस ठेवण्यात आले. २८ दिवस विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून ड्रायव्हरसोबत बासवाडाला जाण्यासाठी आम्ही रवाना झालो. मात्र, येथे सीमेवर आम्हाला अडवण्यात आले. विलगीकरण कक्षातही आम्हाला वेगळे ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्याचे कोणतेही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांना आम्हाला विलगीकरणात ठेवावे लागले. जिल्हावासियांच्या खबरदारी साठी आपण कोणताही धोका घेऊ शकत नाही आणि त्यांच्याशी भेदभाव करण्याचा संबंध नाही, इतरांच्या प्रमाणेच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे यावर जिल्हा प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले आहे.

कानपूर - शहरात बुधवारी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. तर, घटनेतील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
बुधवारी एका व्यक्तीला क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या टीमवर काही लोकांनी हल्ला केला. यानंतर पोलीस प्रशासनाने या भागात पैरामिलिट्री फोर्स आणि पीएसी तैनात केले. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. आज व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी यातील १० लोकांना अटक केली आहे. बाकी ३० ते ३५ लोकांचा शोध सुरु आहे.

नाशिक- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नाशिकमधील मालेगाव हे कोरोनाचे मोठे 'हाॅटस्पाॅट' बनले आहे. २४ तासात मालेगावात ८२ कोरोनाचे नव्याने रुग्ण वाढले आहेत. एकट्या मालेगावात २५३ तर जिल्ह्यात कोरोना बधितांनाचा आकडा आता २७६ वर पोहोचला असल्याने नाशिकच्या चिंतेत वाढ झाली आहे.या नवीन कोरोना रुग्ण वाढीने मालेगावात कोरोना बाधित रुग्णांनांचा आकडा २७६ वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत मालेगावात ८२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात १५ पोलीस कर्मचारी आणि एका ३ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे.राज्याचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी बुधवारी नाशिकला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मालेगाव हॉटस्पॉट नियंत्रणासाठी पंचसूत्री योजना जाहीर केली. ही पंचसूत्री योजना लवकर अमलात आणली जाईल. या योजनेत हा परिसर दाटीवाटीचा असल्याने याठीकाणी होम क्वारंटाईन शक्य नाही. त्यामुळे येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यास उपचार, 'पोर्टेबल एक्स-रे'द्वारे चाचणीत न्युमोनिया तपासणी व औषधे, डॉक्टरांच्या शीघ्र कृती दल तर्फे उपचार, अशी पंचसूत्री अभियानात वापरली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

नवी दिल्ली - देशातील लॉकडाऊन संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७१८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ३३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत १०७४ लोकांनी जीव गमावला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.३ मे रोजी देशातील लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी परराज्यांमध्ये अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी आणि पर्यटकांना पुन्हा आपापल्या राज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने सशर्त मंजुरी दिली आहे. मात्र, नागरिकांच्या या आदानप्रदानासाठी दोन्ही राज्यांची परवानगी आवश्यक असेल. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांनाच इतर राज्यांमध्ये पाठवले जाईल. तसेच निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केलेल्या  बसमधून लोकांची वाहतूक व्हावी, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. 

मुंबई - देशासहित राज्याला कोरोनाने ग्रासले आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कारण लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे, असे सूतोवाच केले आहे.
देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभे राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे. लॉकडाऊनमुळे ४० दिवसांपासून सगळे काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारचा २०२०-२०२१ चा जो अर्थसंलकल्प सादर केला होता, त्यात एकंदर राज्याचे महसूल उत्पन्न तीन लक्ष ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल, असे चित्र दिसत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आज सुधारित माहिती घेतली असता महसूलात तूट पडेल असे दिसत असल्याची चिंता व्यक्त केली.
महसूली तूट १ लक्ष ४० हजार कोटी इतकी असेल. याचा अर्थ एकूण येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम सरकारच्या कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक संकट उभं राहणार आहे. मी पंतप्रधन मोदी यांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर भागात दोन साधूंची हत्या झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. गावातील मंदिरात साधुंचे मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बुलंदशहर घटनेवर प्रतिक्रिया देताना, पालघरच्या घटनेचा दाखला देत योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला चिमटे काढले. खा. राऊत यांनी ट्विट करत, उत्तर प्रदेशातील घटना भयंकर असून याला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. पालघरमध्ये असा प्रकार झाला होता, अशा आशायचे ट्विट केले होते.
राऊत यांच्या आरोपाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाद्वारे ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. याचसोबत पालघर जिल्ह्यामधील साधुंच्या हत्येबद्दल कोण राजकारण करत आहे असा सवालही आदित्यनाथ यांनी खा. राऊत यांना विचारला आहे.
बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास होते. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील अंधेरी एमआयडीसीतील एका कंपनीत घरफोडी करून सोने-चांदी व हिऱ्यांचा तब्बल सात कोटी रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या हा एका सेवाभावी संस्थेचा संस्थापक असून त्याला लॉकडाऊन काळात गरजूंना अन्न वाटप करण्याचे महापालिकेचे कंत्राट मिळाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात राहणारे तक्रारदार राजकुमार लुथरा यांच्या कंपनीत लॉकडाऊन काळात १९ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान सिमेंटचे छत तोडून चोरी झाली होती. त्यांनी या घटनेत तब्बल सात कोटींचे हिरे सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू चोरीला गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही पथक बनवून कुर्ला, वसई-विरार, अंधेरी, पवई या परिसरात तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंधेरी एमआयडीसी परिसरातील विपुल चांबरीया या आरोपीला अटक केली.अटक झालेल्या आरोपीने पोलीस चौकशीत त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी दिमाण छोटूलाल चौहान (३२), मुन्नाप्रसाद हिरालाल खैरवार (४९), लक्ष्मण दांडू (४९), शंकर कुमार येशू (४३) राजेश शैलू मारपक्का (२९) आणि विकास तुळशीराम चनवादी (२४) या आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे तक्रारदाराच्या कंपनीत काम करीत होते. दिमन चौहान हा स्टॉक होल्डर म्हणून काम करीत होता. तर, मुन्ना प्रसाद हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. पोलिसांनी आरोपींकडून ३ कोटी ४२ लाख रुपयांचे हिरे, १ कोटी ३१ लाख रुपयांचे हिरे जडीत सोन्याचे दागिने आणि ५५ लाख रुपयांची सोने मिश्रित माती असा पाच कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवी दिल्ली - मेहूल चोकसी, विजय मल्ल्यासोबतच इतर ५० थकबाकीदारांचे जवळपास सुमारे ६८,६०७ कोटी रुपये माफ केले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नीरव मोदी, मेहुल चोकसी याच्यासोबतच भाजपच्या मित्रांची नावं 'बँकेच्या चोरांच्या' यादीत समाविष्ट केली आहेत, असं ते म्हणाले होते. अशा प्रकारे देशातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. ज्यावर आता खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले आहे.एकामागून एक ट्विट करत या शृंखलेतून त्यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली. विजय मल्ल्यापासून नीरव मोदीपर्यंत भाजप सरकारने कर्ज वसुलीसाठी नेमकी किती आणि कशी पावले उचलली हे त्यांनी सांगितले. 
मेहुल चोकसी याच्याविषयीसुद्धा सीतारमण यांनी काही आकडेवारी सादर करत राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. त्याच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर ऑर्डरचा उल्लेख करत चोकसीच्या प्रत्यर्पणासाठी एक अर्ज एँटीग्वामध्ये पाठवण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.मद्यसम्राट आणि घोटाळेबाज विजय मल्ल्या याच्या संपत्तीविषयीची माहितीसुद्धा त्यांनी दिली. मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत या गोष्टी उघड झाल्या. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत या केंद्रीय बँकेकडून ५० विलफुल डिफॉल्टर्स आणि त्यांच्याकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची १६ फेब्रुवारीपर्यंतची परिस्थिती याविषयीचा तपशील मागवला होता. याच प्रकरणी राहुल गांधी यांनी मोठ्या बँकांमधील डिफॉल्टर्स अर्थात थकबाकीदाराचे नावं लपवल्याचा गंभीर आरोप भाजप सरकारवर लावला होता.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना स्मरणपत्र दिले आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. या विनंतीवर राज्यपालांनी विचार करतो, असे म्हटले असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली 
राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना आम्ही ९ एप्रिल रोजी पत्र पाठले होते. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात ते पत्र होते. दरम्यान आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे, काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊन आम्ही स्मरणपत्र पाठवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्याच्या मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी यावर विचार करतो असे सांगितले आहे, असं जयंत पाटील म्हणाले.आम्ही आता कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. यासंदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. राज्यात स्थिर सरकार असायला हवे. राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधी हा प्रस्ताव मंजूर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

मुंबई - मंत्रालयाच्या इमारतीमध्ये सॅनिटाईज करणार असल्याने दोनही इमारती दोन दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या जुन्या आणि नव्या इमारती पूर्णपणे सॅनिटाईज होणार आहेत. केंद्र सरकारने जे मार्गदर्शक तत्व आखून दिले आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २९ आणि ३० एप्रिलला मंत्रालय पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
दोनही इमारतीच्या खोल्या आणि भाग सॅनिटाईज करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लॉकडाऊमुळे मंत्रालयात अतिशय कमी कर्मचारी कामावर आहेत. तर बहुतांश मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत.मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हेही मातोश्रीवरूनच कारभार बघत आहेत. तर ज्येष्ठ मंत्री क्वचितच मंत्रालयात येत असतात. सगळे मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत.


मुंबई - कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करून लढली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपले लक्ष फक्त कोरोनाची लढाई जिंकण्यावर असले पाहिजे. टीका करायची असेल त्यांना करू द्या, त्यांच्याकडे रिकाम वेळ असेल, अशी मिश्किल टीप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे लष्कराच्या शिस्तीप्रमाणे पालन करा -लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे. हे लॉकडाऊन कॅफे किंवा कॉफी डेमध्ये जाण्यासाठी नाही, तर काम करून आपण नियम व कायदे पाळू. देशाला आज कामाची गरज आहे. काम व कष्ट करून आपले राज्य व देश उभा करण्याची वेळ आहे. नुसते घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी दिशा देतील, सरकार जे नियम व कायदे बनवेल त्याचे पालन करावे. हे नियम व कायदे सरकारसाठी नाही, तर आपल्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील त्याचे लष्कराच्या शिस्तीप्रमाणे पालन करा, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले.जनतेला आज राज्य व देश बांधण्याची, कष्ट करण्याची, एकमेकांचे हात धरण्याची आणि विचारांची लढाई लढण्याची वेळ आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. माझ्या पक्षाचे लोक चांगले काम करत आहेत. त्यांचे कौतुक करणारे पोस्ट करण्याचे सरकारने नियम केल्यावर बंद केले. आज ४० दिवस झाले मी घराबाहेर पडलेली नाही. मी सरकारचे नियम तंतोतंत पाळत असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. नियम पाळू तितक्या लवकर लॉकडाऊन उठेल. त्यामुळे लवकर आर्थिक अडचणीवर मात करू शकतो. आपले राज्य पायावर उभे कसे राहील? आज आपल्यासमोर काम करून आपली आर्थिक स्थिती जाग्यावर आणण्यासाठी काम केले पाहिजे. आरोग्य व आर्थिक स्थिती यांच्यातील सुवर्णमध्य साधूनच आपल्याला पुढे जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. आज अन्न वाटतोय. पण, त्यांना 
शिजवून दिलेले अन्न नको, तर रेशन हवे आहे. दहा दिवसाचे रेशन दिले तर ती लोकं दहा दिवस घराबाहेर पडणार नाहीत. शिवाय प्रशासनावरील ताणही कमी होईल त्यामुळे शक्यतो रेशन कीट देणेच महत्वाचे आहे, असा सल्लाही सुळे यांनी दिला आहे.

आज कोरोनाच्या काळात २४ तास प्रशासन काम करत आहे. त्यांचा अभिमान बाळगतानाच या सर्व योगदानाबद्दल सुळे यांनी सर्वांना मानाचा मुजरा केला. शिवाय बलिदान दिलेल्या पोलिसांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कुटुंबाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. त्यांच्यासोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. सरकारने त्यांच्या कुटुंबाबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबाबत सरकारचे आभार मानले.गरोदर मातांना किंवा तिच्या लेकराला वेळेवर मदत मिळालीच पाहिजे. त्यांच्यासाठी काही निर्णय सरकारला घेता येतात का? हे पहावे आणि तसा प्रयत्न करावा, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. समाजातील अनेक घटक आज अडचणीत आहेत, याची जाणीव सरकारला आहे. केंद्र व राज्य सरकार यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या काळात साथ दिली त्याप्रमाणे कोरोना संकटावर मात केल्यानंतर देखील द्या. त्यामुळे महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा राहून अडचणींवर मात करेल, असे आवाहन सुळे यांनी केले.

डेहराडून - शंकर महादेवाचे अकरावे ज्योतिर्लिंग आणि विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धामचे दरवाजे बुधवारी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून उघडण्यात येणार आहेत. यावेळी धामचे पुजारी, रावळ आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावेळी पहिल्यांदाच भाविकांच्या गैरहजेरीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत येथे गर्दी टाळण्यात येणार आहे. गंगोत्री धामप्रमाणेच केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिली पूजा केली जाणार आहे.केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यासाठीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. बाबा केदारनाथांची डोली केदारधाममध्ये पोहोचली आहे. बुधवारी सकाळी विधीवत केदारनाथाचे दरवाजे उघडले जातील. यासाठी मंदिराला झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत केवळ १८ ते २० नागरिकांच्या उपस्थितीत धामाचे दरवाजे उघडले जातील. सुरक्षित अंतर पाळण्याकडेही लक्ष दिले जाईल. यंदा पुरोहितांची संख्याही कमी करण्यात आली आहे.यमुनोत्री आणि गंगोत्री धामाचे दरवाजे उघडल्यानंतर आता बुधवारी केदारधामचे दरवाजे उघडले जातील. येथेदेखील गंगोत्री आणि यमुनोत्री धामाप्रमाणे प्रथम पंतप्रधान मोदींच्या नावाने भगवान आशितोष यांची पूजा केली जाईल. चारीधाम आणि संतांच्या आशीर्वादाने पंतप्रधान मोदी सध्याच्या कोरोना संकटातून देशाला बाहेर काढतील, असे धर्मस्व स्वामी सतपाल महाराज यांनी सांगितले.
सातारा - सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्याच्या जिंती गावात दोघांचा मृत्यू झाला आहे. दारू आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल हा घटक असतो, पण दोघांचाही परिणाम भिन्न असल्यामुळे दारू पिणाऱ्यांना जीवाला मुकावे लागले आहे.
लॉकडाऊनमुळे दारू बंद आहे, तर कोरोनामुळे हॅण्ड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. हॅण्ड सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे अनेक तळीरामांनी दारूची तलफ हॅण्ड सॅनिटायझरवरती भागवण्याचा प्रयत्न केला. तामीळनाडूमध्ये हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आता त्याचीच पुनरावृत्ती सातारा जिल्ह्यातल्या जिंती गावात घडली आहे. 
साताऱ्यातल्या दोघांनी नशेसाठी हॅण्ड सॅनिटायझरसदृष्य द्रव पिल्याने अस्वस्थ झालेल्या दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या दोघांनी सॅनिटायझरसारखे काही तरी प्राशन केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या दोघांच्याही शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.सॅनिटायझर आणि दारूमध्ये अल्कोहोल असतं, पण दोघांमध्ये भरपूर फरक आहे. यामुळे सॅनिटायझरचा नशेसाठी वापर करुच नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

रायपूर - छत्तीसगडमधील सुखमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या डीआरजी पथकाला मोठे यश आले आहे. मैलासोर येथील जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या छावणीवर हल्ला केला. मोठ्या प्रमाणात जवान येत असल्याचे पाहून नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे सुरक्षा दलांच्या हाती मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रात्रे लागली.
भेज्जी पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमल्याची माहिती सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानंतर एसटीएफ आणि कोब्रा बटालियनचे जवानांनी संयुक्त ऑपरेशन राबविले. ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ एप्रिलला जवानांनी नक्षल कॅम्पवर हल्ला केला. जवानांनी पळून जाणाऱ्या नक्षलींचा पाठलाग केला. मात्र, सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले.जवांनानी नक्षली कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन राबविले. ५ बंदुका, विजेच्या तारा, गन पाऊडर, टिकली पटाखा, लोखंडाचे तुकडे, नक्षलवाद्यांचे ड्रेस आणि इतर सामुग्री हाती लागली.

नवी दिल्ली - कोरोनाच्या तपासणीसाठी चीनकडून आणण्यात आलेली चाचणी किट खराब दर्जाचे निघाले. यानंतर भारताने स्वत: टेस्टींग किट बनवण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी या विषयावर आढावा बैठक घेतली. आरोग्यमंत्री म्हणाले की लवकरच आपण टेस्टिंग किट बनवू, त्यानंतर दिवसात एक लाख चाचण्या करता येतील.बायो टेक्नॉलॉजी विभागासह इतर संघटनांशी चर्चेनंतर डॉ. हर्षवर्धन यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञ, बायोटेक्नॉलॉजी तज्ञांनीही ही लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या व्यतिरिक्त, अनुवांशिक अनुक्रमांवर अभ्यास देखील सुरू झाला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, मे महिन्यापर्यंत भारतात आरटी-पीसीआर, किटची चाचणी करण्यात आपण यशस्वी होऊ. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाल्यानंतरच उत्पादन सुरू होईल. ३१ मे पर्यंत देशात दररोज एक लाख चाचण्या होतील.सध्या भारतात दररोज ४० ते ५० हजार चाचण्या घेतल्या जातात, त्याची क्षमताही सतत वाढविली जात आहे. मंगळवारी सकाळपर्यंत देशात ७ लाखाहून अधिक कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे.

मुंबई - गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देणारा अभिनेता इरफान खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानच्या आईचे निधन झाले होते. लॉकडाऊनमुळे इरफान त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नव्हता. इरफानची आई सईदा बेगम या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जयपुरच्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही. मात्र इरफानने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या आईचं शेवटचे दर्शन घेतले होते. 
इरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर आहे. परदेशातून कॅन्सवर उपचार करुन आल्यानंतर इरफान रुटीन चेकअपसाठी कोकिलाबेन रुग्णालयात जातो. मिळालेल्या माहितीनुसार, आता इरफानला याच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. २०१७ च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान कामातून ब्रेक घेऊन परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेला होता. इरफानने स्वत: त्याच्या आजाराबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. 

मुंबई - महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची सर्वात जास्त आहे. आणि त्यात झपाट्याने वाढ होताना दिसते.शनिवारी राज्यात २२ जणांचा या महामारीने बळी घेतला आहे. यामध्ये मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त मुंबईत आहेत. मुंबईमध्ये करोनाग्रस्तांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.त्यात रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.गिरगाव, ग्रॅन्ट रोड, वरळी, भायखळा, धारावी, गोवंडी, मानखुर्द आदी विविध भागांमधील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईमध्ये करोनाग्रस्तांची संख्या पाच हजारावर गेली असून आतापर्यंत १९१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ३२३ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, विविध रुग्णालयांतील १६७ करोनाबाधित बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले. 
करोनाबाधितांवर रक्तद्रव उपचार पद्धतीद्वारे (प्लाझ्मा थेरपी) उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे. बऱ्या झालेल्या तीन रुग्णांकडून रक्तद्रवाचे तीन युनिट उपचारासाठी उपलब्ध झाले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पात्र रुग्णांवर रक्तद्रव उपचार पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी आवश्यक प्लाझ्मा फेरेसिस मशीन नायर रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले असून करोनातून बऱ्या झालेल्यांच्या रक्तद्रवाचे विलगीकरण तेथे करणे शक्य होणार आहे.

मुंबई - महाराष्ट्रात ३ मे नंतर आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी रात्री स्पष्ट केले आहे. येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो, असे संकेत टोपे यांनी दिले. 
महाराष्ट्रात १८ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत. तथापि, यासंदर्भात तसा कोणताही निर्णय झालेला नाही. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाचे राज्यात ५१२ कंटेनमेंट झोन आहेत. अशा ठिकाणी लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा प्रश्न नाही. हॉटस्पॉट झोनबाबतही मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, असे टोपे यांनी नमूद केले. 
महाराष्ट्रातील दुकाने उघडण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही, असे नमूद करताना राज्यात ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद करून काही महत्त्वाच्या व्यवहारांना राज्य सरकार परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तविली आहे. मुंबई प्रदेश महानगर क्षेत्र आणि पुणे प्रदेश महानगर भागात कोरोनाबाधित रुग्णसंख्या राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे मुंबई पुण्यातील लॉकडाऊनच्या कालावधीबाबतही मुख्यमंत्री यांच्या स्तरावर अंतिम निर्णय सोमवारनंतरच होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. मोदी सरकारने सैनिक आणि कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते कापण्याऐवजी सेंट्रल विस्टा, बुलेट ट्रेनसारख्या योजना आणि वायफळ खर्च थांबवावे अशी टीका काँग्रेसने केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये कपात केली जाऊ नये. अशा कठीण प्रसंगात केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांवर असा निर्णय लादणं योग्य नसल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले. 
लाखो करोडोंची बुलेट ट्रेन योजना आणि सेंट्रल विस्टा सौंदर्यीकरण परियोजना थांबवण्याऐवजी कोरोनाशी लढून जनतेची सेवा करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेंशनर्स आणि देशातील सैनिकांचा महागाई भत्ता कापत आहे. हे सरकार असंवेदनशील आणि अमानवीय असल्याची टीका काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तुम्ही मध्यमवर्गीयांकडून पैसे घेत आहात पण ते गरिबांना देत नाही तर सेंट्रल विस्टावर खर्च करत आहात.माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी देखील सरकारच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेस नेता वेणुगोपाल, रणदीप सिंह सुरजेवाला, मनीष तिवारी, सुप्रिया श्रीनाते, गौरव वल्लभ, रोहन गुप्ता आणि प्रविण चक्रवर्ती यांनी देखील सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. 
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे तीन भाग थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यावर्षी १ जानेवारीपासून सुरु झालेला ४ टक्के महागाई भत्ता देखील यामध्ये येतो. कर्मचाऱ्यांना सध्याच्या दरानुसार महागाई भत्ता मिळत राहील.महागाई भत्त्याचा सध्याचा दर १७ टक्के आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणान ५० लाख कर्मचारी तसेच ६१ लाख पेंशनधारकांवर होणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कामगारांना कमी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या आर्थिक समस्येवर टाटा कंपनीने मात्र अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यावरही हे कर्मचारी कायमचे घरातूनच काम करणार आहेत. 
टाटा इंडस्ट्रीमधील टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) या कंपनीने हा ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेतला. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीत सध्या जवळपास ३ लाख ५५ हजार कर्मचारी काम करत आहेत. यांपैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितले आहे व २० टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतील. 
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनोख्या योजनेला त्यांनी ‘मॉडेल २५’ असे म्हटले आहे. हा प्रयोग सुरुवातीला ते २०२५ पर्यंत करुन पाहणार आहेत. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर हा प्रकार तसाच सुरु राहील. एक मोठी कंपनी चालवण्यासाठी भरपूर पैसे लागतात. लॉकडाऊनमुळे सध्या अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णपणे थांबले आहे. कंपन्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आटत चालले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पुरेसे पैसे नाहीत. परंतु, अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणे हा देखील कुठल्याच समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही.

सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील तोंगपाल येथील दामनकोटा क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. सुकमा पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी माहिती दिली. 
शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात दरम्यान नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला. त्याचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. याचबरोबर घटनास्थळावरून ३१५ बोर बंदूक आणि शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चकमकीनंतर आसपासच्या परिसरात जवानांची शोधमोहीम सुरूच होती.

रत्नागिरी - संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यामुळे पुन्हा ३ मी पर्यंत लॉकडाऊन घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोकणातील अनेक चाकरमाने काम करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद करून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमानी कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी असे जाधव म्हणाले आहेत.

गोंदिया - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना आहे तिथेच राहावे. त्यांच्यासाठी निवार केंद्र तयार करण्यात आले आहेत. आता त्यांच्या मनोरंजनासाठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. परप्रांतीय मजूर, नागरिकांना निवारा केंद्र ठेवण्यात आले आहे. त्यांना कुठल्या अडचणी आहेत काय?, याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री शनिवारी गोंदियात आले होते. यावेळी ते बोलत होते. 
देशमुखांनी २५ एप्रिलला गोंदियामध्ये आढावा बैठक घेतली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांना गोंदियातील निवारा केंद्राला भेट दिली. यामध्ये बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश आदी परप्रातांतून आलेल्या मजुरांना ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्या अडचणी आहेत का? याची विचारपूस देशमुखांनी केले. तसेच सर्वांना आपआपल्या घरी परत जायचे आहे. मात्र, सध्या त्यांना परत पाठविता येणार नाही. लवकरच सर्व राज्याचे मुख्यमंत्री मजुरांच्या घरवापसीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतील. पंतप्रधानांनी परवानगी दिल्यास रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून मजुरांची घरवापसी केली जाईल. मात्र, लॉकडाऊनमध्ये एकाही परप्रांतियांना घरी पाठवता येणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

पुणे - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यांनी शनिवारी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत कोविड-१९ बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाने मॉल्स व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. 
अजित पवार म्हणाले, क्वारंटाईन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल किंवा खासगी शैक्षणिक संस्थांची अथवा खासगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक अ‍ॅक्टनुसार जिल्हाधिकारी यांना संबंधित इमारती अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतिरिक्त ५५ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या २ महिन्यात ८ वा, ९ वा आणि १० वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे.पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी शारीरिक अंतराचे पालन होऊन, परिणामी कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल. ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल, अशा नागरिकांनी स्वत:च्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

मुंबई - उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. याची माहिती उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या १८०० चे २००० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना १४ दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे १८०० ते २००० विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारने त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडूम कोटामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे.’विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राजस्थान सरकारला पत्र लिहले असून कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थांबद्दलची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या व्यवस्थेबद्दल विचारपूस करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आगामी तीन-चार दिवसांत सर्वांना राज्यात माघारी आणले जाईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गोहलत यांचे आभार मानले आहेत.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोन्ही युवा नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आदित्य याचे कौतुक केले. 
काही प्रसिद्ध संस्थांच्या मजी विद्यार्थ्यांनी करोना व्हायरस या महामारीविरोधात लोकांसाठी सरकारसोबत काम करण्याची इच्छा रोहित पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. रोहित पवार यांनी तात्काळ मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे हा निरोप पोहचवला. आदित्य ठाकरे यांनीही गांभीर्य ओळखून तासभरात रोहित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. या सर्व घडामोडी वेगाने घडल्यामुळे रोहित पवार यांना आदित्य ठाकरे आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे कौतुक वाटले म्हणून ट्विट करत ते म्हमाले की, कोणताही प्रश्न तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न अनेक मंत्री करतात,हे याचे जिवंत उदा.आहे.काही प्रसिद्ध संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांनी लोकांसाठी सरकारसोबत काम करण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. हा निरोप मी आदित्य ठाकरे यांना देताच त्यांनी तासाभरात विसी वरुन मिटिंग घेतली.

नांदेड - देशावर कोरोनाचे संकट गडद होत असल्याने लॉकडाऊन-२ जारी करण्यात आले. त्यामुळे आता ३ मेपर्यंत राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या लॉकडाऊनमुळे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ३३० भाविक अडकले आहेत. त्यांना पंजाब आणि हरियाणा या राज्यात पाठविण्यात आले आहेत. तशी केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या शिख भाविकांची घरवापसी सुरु होणार आहे. सचखंड गुरुद्वारात पंजाब आणि हरियाणा राज्यातील तीन हजाराहून अधिक भाविक अडकलेले होते. यापैकी बहुतांश भाविक हे शेतकरी आहेत. तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 
पंजाब आणि हरियाणामध्ये गहू कापनीचे दिवस असल्याने आम्हाला घरी परत पाठवावे, अशी विनंती या भाविकांनी केली होती. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याबाबत पंतप्रधानांकडे विनंती केली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकारशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला.

मुंबई - कोरोनामुळे जागतिक स्तरावर असलेल्या लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसमोरील समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)च्या अंदाजानुसार भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील सुमारे २९ लाख जणांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती आहे. आशिया पॅसिफिक विभागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रासह पर्यटनावर पडत आहे. 
भारतातील हवाई वाहतूक क्षेत्र व त्याच्या पूरक क्षेत्रातील सुमारे २९ लाख ३२ हजार ९०० नोकऱ्या यामुळे प्रभावित होण्याची भीती आहे. कोरोनामुळे देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान उड्डाणे महिन्याभरापासून बंद आहेत. लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर लावण्यात आलेले हे निर्बंध कधीपर्यंत कायम राहतील याबाबत अनिश्चितता आहे. या कालावधीत ज्या प्रवाशांनी हवाई वाहतुकीसाठी तिकीट आरक्षित केले होते त्यांना तिकिटाचा पूर्ण परतावा द्यावा लागत असल्याने व सरकारने पुढील आदेश येईपर्यंत तिकीट आरक्षित करू नये, असे निर्देश दिलेले असल्याने सध्या हवाई वाहतुकीचे आरक्षण बंद आहे.हवाई वाहतूक क्षेत्र आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटकाळातून मार्गक्रमण करत आहे. भारतातून हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना या कालावधीत तब्बल ८५ /९० हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील एका नोकरीला जोडून प्रवास व पर्यटनाशी संबंधित २४ नोकऱ्या संलग्न असतात, त्या सर्वांना या परिस्थितीचा फटका बसणार आहे.

कोईबंतूर - लोकांना सरकारविरोधात भडकावणारे आणि खोटे वृत्त प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली ‘सिपलीसिटी’ न्यूज पोर्टलच्या संपादक आणि मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोईबंतूर शहरातील ही घटना असुन, कोईबंतूर महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.अँड्र्यू सॅम राजा पांडियन असं सिपटीसिटी न्यूज पोर्टलच्या संपादक आणि मालकाचं नाव आहे. कोईबंतूर पोलिसांनी त्यांना गुरूवारी अटक केली. महापालिकेचे सहायक आयुक्त एम. सुंदरराजन यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. न्यूज पोर्टलवर खोटे आणि लोकांना सरकारविरोधात भडकावणारे वृत्त पांडियन यांनी प्रकाशित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
न्यूज पोर्टलवर पीजी डॉक्टर आणि रेशन दुकानावरील कर्मचाऱ्याविषयी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. हे वृत्त सोशल मीडियावर पसरल्याने डॉक्टरांध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे करोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना डॉक्टर आंदोलनही करू शकतात. त्याचबरोबर रेशन कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळून येऊ शकतो, असे सुंदरराजन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर सुंदरराजन यांना गुरूवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शहरातील तुरूंगात हलवण्यात आले. या अटकेप्रकरणी डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी निषेध नोंदवला आहे. एआयएडीएमकेचे कोईबंतूरचे मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री एस. पी. वेलूमनी यांच्यावर निशाणा साधत “पोलीस दलाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. “ही कारवाई बेकायदेशीर आहे. पांडियन यांना तातडीने मुक्त करावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे - कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे खाकी वर्दीतील देवाचे दर्शन सर्वत्र होत आहे, तर ठाण्यात खाकीतील राक्षसांचे क्रूर कृत्यही समोर आले आहे.कोरोनाचा सर्वत्र हाहाकार सुरु असतानाच अनेक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांच्या मदतीला धावून आले आहेत. हातावर पोट असलेल्या हजारो नागरिकांना दररोज जेवण दिले जात आहे. हेच सत्कर्म करणाऱ्या दोन युवकांना दिवा येथे पोलिसांनी अमानुष मारहाण केलाचा निंदनीय प्रकार घडला आहे.काही कामानिमित्त दिवा पोलीस चौकीसमोर उभे असलेल्या पीडित अमोल केंद्रे आणि प्रवीण निकम यांना काठीने बेदम मारहाण केली. मारहाण करत याबाबत वाच्यता कुठे केली तर घरातून फरपटत आणून आणखी गंभीर कलमे लावण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील अमोल केंद्रे या तरुणाने केला आहे. या गंभीर घटनेची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहखात्यासह पोलीस आयुक्तांना केली आहे. 
अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पीडित युवकांनी केली आहे. अन्यथा युवकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. युवक आपल्या राहत्या घरी उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
एकीकडे रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची तुलना देवाशी केली जात आहे. मात्र, ठाणे पोलिसांच्या या कृत्याने खाकीत काही दानव समाजात फिरत आहेत, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. ठाणे पोलिसांच्या या कृतीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.

शहापूर - लॉकडाउन असतानाही घरी बसण्याचे सोडून तानसा अभयारण्यात शिकार करण्यासाठी गेलेल्यानी एका भेकराची शिकार केली मात्र दक्ष वन अधिकाऱ्यांमुळे हे शिकारी पकडले गेले आहेत. या प्रकरणी तानसा परिसरात नर जातीच्या भेकराची शिकार करणाऱ्या तिघांच्या वन्यजीव अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. भेकराचे रीतसर दहन करण्यात आले असून तिघांना २७ एप्रिल पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.तानसा अभयारण्य क्षेत्रातील वेहलोंडा मधील डोगर शेत या ठिकाणी वन्यजीवांची शिकार झाल्याची माहिती तानसा वनक्षेत्रपाल आर.एन चन्ने यांना मिळाली होती. वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील व सहाय्यक वनसंरक्षक डी.एल.मते यांच्या मार्गदर्शनानुसार चन्ने यांनी वनपाल संजय भालेराव व पथकासह घटनास्थळी धाव घेतली. 
घटनासथळी विष्णू गावित (डिंभे), शंकर साराई (टहारपूर) व अक्षय सराई (टहारपूर) सर्व शहापूर तालुक्यातील असून त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये भेकर (नर) हा प्राणी मृत अवस्थेत आढळून आला. या भेकराची दगडाने ठेचून व काठीने मारून हत्या करण्यात आलेल्या या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे वनक्षेत्रपाल आर.एन चन्ने यांनी सांगितले. या तिघांना शहापूर न्यायालयाने २७ एप्रिल पर्यंत फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे.

कल्याण - करोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून एका तरुणाला काही नागरिकांनी मारहाण केली. तसेच मारहाणीदरम्यान गटारात पडून त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. या घटनेची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहेत.कल्याणमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्रच लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश गुप्ता हा काही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला. त्याचवेळी रस्त्यावर काही पोलीस कर्मचारी इतर नागरिकांची चौकशी करत असल्याचे गुप्ता याने पाहिले. त्यामुळे त्याने दुसऱ्या रस्त्याने जाण्याचे ठरवले. दुसऱ्या रस्त्याने पायी जात असताना, तो खोकताना दिसला. करोना झाल्याच्या संशयातून तेथून ये-जा करणाऱ्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना, तो अचानक रस्त्यालगतच्या गटारात पडला.त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून,खडकपाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ठाणे - महापालिकेच्या भाईंदर पाडा येथील क्वारंटाईन केंद्रावर कार्यरत असलेल्या डॉक्टरला कोरोनाबाधित रुग्णाच्या नातलगाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर करीम अब्दुल कादर शेख या आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, ठाणे न्यायालयाने शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी याबाबतची माहिती दिली.कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत, असे असतानाही डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना सुरूच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार तसेच, रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथील ठाणे महापालिकेच्या इमारतीमध्ये केंद्र कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी ठाण्यातील विविध ठिकाणचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. हे क्षेत्र प्रतिबंधीत असून इथे इतर नागरिकांना प्रवेशास मनाई आहे.शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास येथे दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णासाठी नातेवाईक करीम शेख हा काहीतरी सामान घेऊन गेला होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षक व कर्तव्यावरील डॉक्टर सुनिल पातकर यांनी शेख याला मज्जाव केला. याचा राग मनात धरून शेख याने शिवीगाळ करीत डॉ.पातकर यांना मारहाण केली. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून, कासारवडवली पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली.

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेच्या बहुतेक रुग्णालयात कोरोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत असून नर्सिंग होम आणि खासगी डॉक्टरांनीही त्यांचे दवाखानेही बंद ठेवल्याने रुग्णांची आणखीनच गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर नर्सिंग होम चालक आणि खासगी डॉक्टरांना मुंबई पालिकेने सक्त ताकीद दिली आहे. नर्सिंग होम सुरू न केल्यास नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्यात येईल, असा इशारा देतानाच खासगी दवाखाने सुरू न करणा-या डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच मुंबई महापालिकेने दिली आहे. 
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला या नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. सोसायटी आणि चाळीच्या आवारात असलेले नर्सिंग होम किंवा खासगी दवाखाने सुरू करण्यास सोसायटी, चाळीतील रहिवाशी, घरमालक किंवा शेजाऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावरही साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करतानाच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही परदेशी यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. 
मुंबईतील सर्वच्या सर्व नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही पालिकेच्या २४ विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या सर्वेक्षणा दरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी. तर जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांची माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक अ‍ॅक्ट १८९७’ नुसार कारवाई सुरू करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याच्या खातेप्रमुखांद्वारे म्हणजेच ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी’ यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुंबई - राज्यात मद्याची दुकाने उघडायला हरकत काय? असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका मंडळी होती.त्याला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत महाराष्ट्रातील देशी आणि विदेशी मद्याची दुकाने सुरु होता कामा नये, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ही दुकाने सुरु झाली तर मद्य विकत घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडेल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होईल. यासोबतच काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरात पैसे येणे बंद झाले आहे. अशावेळी मद्याची दुकाने उघडायला परवानगी दिल्यास मध्यमवर्गीय घरांमधील पैसा उधळला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 
दरम्यान,मद्यविक्रीतून राज्याला मोठ्याप्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे मद्याची दुकाने सुरु झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत काही पैसे जमा होतील. तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यातील मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली होती. 
मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा उपरोधिकपणे समाचार घेण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत, असा खोचक टोला शिवसेनेकडून राज यांना लगावण्यात आला होता.

मुंबई - ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. त्यांनी शनिवारी 'मिंट' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भात खुलासा केला. यावेळी टोपे यांनी म्हटले की, कोरोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असे टोपे यांनी सांगितले. 
सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा विषय आहे. आपल्याला कंटेन्मेंट झोनचा परिसर पूर्णपणे रिकामा राहील, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरांसाठी आपल्याला ३ मे नंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवावा लागू शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिली.त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावे लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट या दोन शहरांमध्ये आहेत. मुंबईतील तब्बल आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर आहे. यापैकी प्रत्येक वॉर्डात कोरोनाचे २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यातही कोरोनाच्या मृतांचा आकडा जास्त आहे.

ठाणे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोव्हिड-19 ची चाचणी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत घरच्या घरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबतचे किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्यास त्या व्यक्तीपासून सामान्य व्यक्तीला कोव्हिड 19 चा संसर्ग होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतला आहे. 
ठाणे महापालिका क्षेत्रात आयसीएमआरने प्राधिकृत केलेल्या खासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. जर त्या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला तर या कालावधीत त्याच्यापासून अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.संबंधित बाब लक्षात घेऊन एखाद्या व्यक्तीने कोव्हिड 19 साठी तपासणी केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक राहणार आहे. सदर व्यक्ती घरच्याघरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबत किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र त्याने चाचणीच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे. कोरोनाची बाधा इतरांना होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ५०० पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरु आहे.दिल्ली सरकारने कोरोनाविरुद्ध टॉप डॉक्टरांचे पॅनल बनवले आहे त्यांनी दिल्लीत १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवला पाहिजे असे मत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडले आहे. डॉक्टर पॅनलचे प्रमुख एस. के. यांनी याबाबत सांगितले आहे की, लॉकडाऊन १६ मे पर्यंत वाढवायला हवे. यामुळे कोरोना संक्रमणचा ग्राफ खाली उतरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दिल्ली आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एका दिवसात १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने हा आकडा २ हजार ५१४ पर्यंत पोहचला आहे.तर एका दिवसात ३ जणांचा मृत्यू झाल्याने दिल्लीत आतापर्यंत मृतांचा आकडा ५३ इतका झाला आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईतील मुस्लीमबहुल ठिकाणी रमजानच्या महिन्यात नजर ठेवण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमजानचा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे. लॉकडाऊन मुस्लीम समाजाला सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
रमजानच्या काळात लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रकारची तयारी केली आहे,मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळावेत. कोणत्याही मशिदीमध्ये, इमारतीच्या टेरेसवर जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचा भंग होऊ नये म्हणून ड्रोनच्याद्वारे नजर ठेवण्यात येईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे निशानदार यांनी माध्यमांना सांगितले.कंटेन्टमेंट झोन आणि मुस्लीमबहुल परिसरात शासन, सामाजिक संघटना यांच्यावतीने अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. यामुळे जीवनाश्यवक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिल, यामुळे सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणालाही बाहेर पडण्याची गरज नाही, असे निशानदार म्हणाले.मशिदींमधून अजानची घोषणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रमझानच्या खऱेदीसाठी प्रसिद्ध असणारा मुंबईतील मोहम्मद अली रोड गेल्या २५० वर्षांमध्ये पहिल्यांदा कोरोनामुळे बदं ठेवण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आझमी, काँग्रेस नेते नसीम खान आणि इतर मान्यवरांनी रमजान निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.मुस्लीम समाजाचे नेते आणि धर्मगुरुंनी वारंवार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन आणि शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मुस्लीम बांधवांना केले आहे.

नवी दिल्ली - देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले उत्तर प्रदेशातील कामगार, मजूर लोक सध्या लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरी परत पोहोचवणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सर्वांनी मिळून एका दिशेने एकत्र प्रयत्न केले तर कोरोनाला पराभूत करणे अशक्य नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच मजुरांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे त्यांनी आभार मानले.
मी सतत हा मुद्दा मांडला आहे. त्या दिशेने सरकारचे हे एक अर्थपूर्ण पाऊल आहे. ते पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी उर्वरित मजुरांच्या परताव्याची योजना आखणेदेखील आवश्यक आहे. याचप्रकारे जर आपण सकारात्मक वृत्तीने देशहितासाठी सहकार्य करत राहिलो, तर कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला बरीच शक्ती मिळेल, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.दरम्यान,शुक्रवारी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांची यादी बनवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई - कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने काही दुकाने सुरु करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र,मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार, अशी भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे. राज्य सरकारचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत मुंबईसह राज्यातली दुकानं बंदच राहतील असे रिटेल ट्रेडर्स असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने खुली करण्याचे केंद्रीय गृहखात्याने आदेश दिले होते. त्यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. 
दरम्यान, ३० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज केंद्रीय गृहखात्याच्या आदेशाने दुकाने उघडी होत असली तरी दारूची दुकाने खुली होणार नाहीत, असे केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातली सर्व प्रकारची दुकाने आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शहरी भागात मॉल वगळता सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने खुली होती. मात्र आता इतर दुकानंही खुली करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र मॉल्स आणि मल्टीब्रँड्स अजूनही बंदच राहणार आहेत. शिवाय अन्य दुकाने सुरू करण्यासाठी केंद्राने कठोर नियम लागू केले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. शुक्रवारी मध्यरात्री केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला. या निर्णयानुसार आजपासून म्हणजेच २५ एप्रिलपासून देशातली सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यरात्री हा निर्णय देण्यात आला. असे असले तरीही दुकानदारांना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरु ठेवण्यात आली होती. पण आता सर्व प्रकारची दुकान खुली राहणार आहेत. असे असले तरीही मॉल्स, शॉपिंग कॅम्पेल्क्स बंदच असणार आहेत.सरकारतर्फे जारी केलेल्या आदेशानुसार दुकानांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारीच काम करु शकतील. तसेच सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
मात्र, मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार, अशी  भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे. 

पुलवामा - जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. यामध्ये एक त्यांच्या म्होरक्या होता. इतर दोघांची ओळख पटणे बाकी आहे. एन्काऊंटरनंतर आजुबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.अवंतीपोराच्या गोरीपारामध्ये दहशतवादी लपल्याची बातमी सुरक्षारक्षांना मिळाली होती. यानंतर सेनेच्या जवानांनी रात्री उशीरापर्यंत विभागाला घेराव घातला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. 
दरम्यान, शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहेडा येथील अरवानी भागात देखील चकमक झाली. यामध्ये २ दहशतवादी मारले गेले. या उग्रवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलीस जवानास ताब्यात घेतले होते. पण या जवानास सुरक्षित परत आणण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद 
नवी दिल्ली -  पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदींनी ई ग्राम स्वराज्य मोबाईल ऍप आणि स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला.स्वामित्व योजनेनुसार सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून संपत्तीचा लेखाजोखा घेतला जाईल, त्यानुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल, त्यामुळे वाद मिटतील आणि कर्ज घेणे सुलभ होईल, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात प्रायोगित तत्वावर ही योजना सुरु होईल. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करुन देशभर लागू करण्यात येईल.वेगवेगळ्या ऍपमध्ये काम करण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व पंचायतींची माहिती उपलब्ध असेल, गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर पाहू शकेल, यातून पारदर्शकता वाढेल आणि कामाला गती येईल, असेही मोदींनी सांगितले.
एके काळी शंभर पंचायातींमध्येही ब्रॉडबँड नव्हता,आता सव्वा लाख पेक्षा अधिक पंचायातींपर्यंत ब्रॉडबँड सुविधा पोहोचली, शहर-गावातील अंतर मिटवण्यासाठी आज दोन नव्या योजना ई ग्राम स्वराज आणि स्वामित्व योजना सुरु केल्या आहेत.गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्याच्या संकल्पाचे फलित म्हणजे पंचायत राज. कोरोना’च्या अनुभवाने सर्वात मोठा धडा शिकवला, तो रस्ता म्हणजे आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल, त्याशिवाय अशी संकटं झेलता येणार नाहीत, असे मोदी म्हणाले.
कोरोनामुळे आपल्याला व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधावा लागत आहे, देशभरातील सरपंच यामध्ये सहभागी आहेत, सर्वांचे स्वागत, चांगल्या कामासाठी पंचायतींना पुरस्कार, गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्यासाठी पंचायत महत्त्वाची असते असेही मोदींनी नमूद केले.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचेच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री सायंकाळी एका पोलीस कर्मचाऱ्याचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची माहिती आहे.जावेद अहमद पैरी असे संबधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चतवतन येथील राहत्या घरातून जावेदचे अज्ञात बंदूकधार्‍यांनी अपहरण केले. जावेद हे श्रीनगरमधील एसडीपीओ झाकुरा येथे कार्यरत आहेत. जावेद यांचे अपहरण झाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले.

औरंगाबाद - कोरोनामुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बंद असलेली आर्थिक उलाढाल सुरु होण्यास चालना मिळणार आहे. औरंगाबादमधील बजाज कंपनीसह इतर ५० उद्योगांना सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हे उद्योग आजपासून सुरू होणार आहेत. बजाज कंपनीला ८५० कर्मचारी ठेवून कंपनी सुरु करता येणार आहे. कंपनीत कर्मचारीसुद्धा शहरातून जाणार नाहीत. कोरोचा फैलाव होत असल्याने उद्योग-धंदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. लॉकडाऊन-२ घोषित करण्यात आल्यानंतर २० एप्रिलला थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यासाठी कडक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे कोणीही कारखाने सुरु करण्यास धजावत नव्हते. मात्र, औरंगाबादमध्ये आता ५० उद्योग सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरु होणार आहेत.
जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर या कंपनी सुरु होणार आहेत. या कर्मचाऱ्यांना शहरात येण्यावरसुद्धा बंदी असणार आहे. बाहेरुन कोणालाही कंपनीत प्रवेश मिळणार नाही, याची दक्षता कंपनीला घ्यायची आहे. कंपनी सुरु होणे ही निश्चित दिलासा देणारी बातमी आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बंद पडलेल्या उद्योगांना चालना मिळणार आहे.

नवी दिल्ली - आरोग्यसेवा कर्मचाऱ्याविरोधातील कुठल्याही प्रकारचा हिंसाचार, त्यांची छळवणूक सहन केली जाणार नाही. हल्लेखोरांवर फौजदारी कारवाई केली जाईल. त्यासाठी १२३ वर्षे जुन्या ‘महासाथीविरोधातील कायदा- १८९७’ मध्ये बदल करण्यात आला असून तसा अध्यादेश तातडीने काढला जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली होती. त्यानंतर यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला होता. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशावर शिक्कामोर्तब केले आहे.
डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हल्लेखोरांना किमान तीन महिने ते सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.तसेच, ५० हजार ते ५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाईही होऊ शकते. हल्लेखोरांविरोधातील दाखल झालेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असेल. त्याची ३० दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल आणि एका वर्षांत दोषींना शिक्षा ठोठावली जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांविरोधातील हल्लेखोरांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget