कोरोना व्हायरस ;पंतप्रधान सहाय्य निधीसाठी इस्रोनेही दिली मदत

बंगळुरू - कोरोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी इस्रोही पुढे सरसावले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार पंतप्रधान सहाय्य निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान सहाय्य निधीमध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची भर पडणार आहे.इस्रोने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. कोरोनाच्या या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपणही देशासोबत उभे आहोत, असे इस्रोने यावेळी सांगितले. यासोबतच इस्रोचे संशोधक वैद्यकीय साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर कसे नेता येईल याबाबत संशोधन करत असल्याचेही त्यांनी सांगितले. जेणेकरून देशभरातील कोरोनाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार शक्य होईल. तसेच, देशभरातील डॉक्टारांनाही आवश्यक ते सुरक्षेचे उपाय अवलंबता येतील..
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget