ओडिशामधील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला

भुवनेश्वर - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू लॉकडाऊन वाढवणारे ओडिसा हे पहिले राज्य ठरले आहे.मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ३० एप्रिलपर्यंत केंद्राला रेल्वे आणि हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती केली आहे. ओडिशाच्या मंत्रिमंडळाने लॉकडाऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला असून केंद्र सरकारलाही असे करण्याची शिफारस केली आहे.मानवजातीला सर्वात मोठा धोका कोरोना विषाणूमुळे निर्माण झाला आहे.ओडिशामध्ये ४२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २ जण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच कोरोनामुळे राज्यातील एक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ५४० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ७३४ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी ५ हजार ९५ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. 




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget