मुंबईकरांनो सावधान;मुंबईत झपाट्याने पसरतोय कोरोना

मुंबई - कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे.त्यामुळे मुंबईकरांनो, कृपया घरात बसा. कारण दिवसेंदिवस मुंबईतले कोरोना हॉटस्पॉट वाढत आहेत. आता या क्षणाला अर्धी मुंबई कोरोनासाठी डेंजर झोन झाली आहे. कोरोनाने झोपडपट्टीतही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना आता अर्ध्या मुंबईत पोहोचला आहे. तो केव्हाही तुमच्या घरात येऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
मुंबईत कोरोना कसा पसरला आहे. मुंबईत अनेक भाग कंटेन्मेंट झोन ठरवण्यात आलेत. मुंबईतले हॉटस्पॉट निश्चित करण्यात आलेत आहेत. यात वरळी, मानखुर्द, वांद्रे , अंधेरी आदी ठिकाणचा समावेश आहे. ही मुंबईतली सर्वाधिक डेंजर झोनमधली ठिकाणे आहेत. यासह मुंबईत तब्बल १९१ कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत.ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडतो, त्या परिसराला पूर्ण सील केले जाते. त्या भागातून कुणालाही बाहेर पडू दिले जात नाही. तसेच कुणालाही आतमध्येही जाऊ दिले जात नाही. या काळात त्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका करते.मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण त्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळण्याची गरज आहे.या घडीला जवळपास अर्धी मुंबई डेंजर झोनमध्ये आली आहे मुंबईकर घरी बसले नाहीत, किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, तर अख्खी मुंबई डेंजर झोनमध्ये येईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे.

- धारावी ( १० लाख, ३ नगरसेवक आहेत)
- विक्रोळी पार्क साईड ( ५ लाख)
- दहिसर ( गणपत पाटील नगर) (३.३० लाख)
-मानखुर्द ( महाराष्ट्र नगर) (२.३०लाख)
-वांद्रे ( भारत नगर) (५ लाख)
- कुलाबा ( गीता नगर) (२ लाख)
- कुर्ला ( क्रांती नगर) (२.१५ लाख)
-अँटॉप हिल (१.१५लाख)
-जोगेश्वरी (१ लाख)
- दिंडोशी/गोरेगाव ( २ लाख)
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget