परराज्यातील कामगारांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करा ; भुजबळांनी दिले आदेश

मुंबई - लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिली होती. आता परराज्यातील कामगारांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नागरी अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.कोरोनाशी लढताना जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. उपजीविकेचं साधन नसल्यामुळे त्यांना अन्न-धान्याची निकड निर्माण झाली आहे. परराज्यातील कामगार, तसेच शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अतिरिक्त ५ टक्के धान्यसाठा उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
शिधापत्रिका नसलेल्या गरीब व्यक्तींना अन्न आणि निवाऱ्याची गरज आहे. काही जणांनी स्वतःची राहण्याची सोय केली आहे, तर कुठे सरकार किंवा महापालिकांकडून निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. काही जणांना शिजवलेले अन्न पुरवले जाते, मात्र निधीचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वयंसेवी संस्था किती काळ त्यांना अन्न पुरवतील, हा प्रश्न आहे. अशावेळी त्यांना धान्य उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात असल्याचा उल्लेख परिपत्रकात केला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशनकार्डधारकांना अन्न पुरवले जात आहे. यातून अतिरिक्त धान्य परराज्यातील कामगारांना उपलब्ध करुन देण्यास भुजबळ यांनी सुचवलं आहे. एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांसाठी ही तरतूद करत येईल, असेही भुजबळांनी म्हटले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमानुसार गहू दोन रुपये प्रतिकिलो, तर तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget